Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by anagha kulkarni on Tue, 06/24/2014 - 15:54
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा. गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे. खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून? यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते. गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार. यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील. मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
  • Log in or register to post comments
  • 40361 views

प्रतिक्रिया

Submitted by बॅटमॅन on Wed, 06/25/2014 - 21:24

In reply to चूक झाली ती सुधारणे जास्त by अम्रुता आफले

Permalink

अम्रुता जी ने क्या बात बोली

अम्रुता जी ने क्या बात बोली है, बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/25/2014 - 22:50

Permalink

अरे मूळ धागा कशावर होता हे

अरे मूळ धागा कशावर होता हे आठवतेय का कोणाला ??? जाऊंद्या, कायका असेना... आता ३०० वरच श्वास घ्या ! ;) Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 06/26/2014 - 07:22

Permalink

नारायण ! नारायण !

नारायण ! नारायण ! हिस्टरी रिपीट इट-सेल्फ असं काहीस म्हणतात बाँ... इतका दंगा चालु आहे पण कोणाला मिपावरचा याच विषयावरचा अजरामर धागा आठवला का ? नाही आठवत ? स्त्रिया आणि ड्रायव्हिंग असा तो धागा होता. अर्थात तो आता उपलब्ध नाही.बहुतेक त्यानंतर डॉ.प्रसाद दाढे यांनी इथे परत चक्कर टाकली नाही. :( जाता जाता :--- नारायण नारायण ! काय करणार ? हल्ली काडी टाकुन जायची सवय लागली आहे असं म्हणा हवं तर... डॉ.प्रसाद दाढे यांचा अजुन एक सुंदर धागा आहे. कोणता ? :- पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे चला माझे काम झाले ! ;) नारायण ! नारायण ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- प्यार हुआ चुपके से... :-1942 A Love Story
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 06/26/2014 - 11:09

In reply to नारायण ! नारायण ! by मदनबाण

Permalink

जुना धागा दिल्याबद्दल

जुना धागा दिल्याबद्दल बाणबुवांचे आभार. मज्जा आली वाचून! :) अवांतरः २०० होऊन गेलेले दिसतात, मला २०० वा प्रतिसाद द्यायचा होता ना! *beee*
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com