✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुरुषांचे ड्रायव्हिंग-माझा अनुभव

A
anagha kulkarni यांनी
Tue, 06/24/2014 - 15:54  ·  लेख
लेख
बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा. गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे. खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून? यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते. गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार. यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील. मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
40361 वाचन

💬 प्रतिसाद (204)

प्रतिक्रिया

नाही असे कधीही तिला कोणीही

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/25/2014 - 11:07 नवीन
नाही असे कधीही तिला कोणीही म्हटलेले नाही. उलट आमच्या घरामधे, ती घरात जास्त असते त्यामुळे आईबाबांना कुठे न्यायचे असेल तर म्हणून तिला गाडि शिकवली होती. मी आणि दादा हापिसात गेल्यावर गाडी चालवणारा कोण नाही म्हणून काम अडू नये. पण तिलाच बरोबर कोणीतरी असावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तुम्ही कोणी करता अहात असे

यशोधरा
Wed, 06/25/2014 - 11:22 नवीन
तुम्ही कोणी करता अहात असे म्हणण्याचा उद्देश्य नाही. ते बहुतांशी मुलींच्या लहानपणापासूनच नकळत सुरुच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

(No subject)

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/26/2014 - 12:56 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१

एस
Wed, 06/25/2014 - 11:15 नवीन
मानसिक कंडिशनिंग होतेच. 'गाडी नीट वळव' अशा सकारात्मक सूचना देण्याऐवजी 'गाडी वळवताना धडकवू नकोस मागच्यासारखी' अशा नकारात्मक सूचना दिल्या जातात. हेच तत्त्व मुलांच्या संगोपनालाही लागू आहे. कोणी असे सतत तुम्हांला म्हणत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून सकारात्मक स्वयंसूचना घेत राहणे ह्यासारखा दुसरा उपचार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

बायका वाईट ड्राईवींग करतात,

नानासाहेब नेफळे
Wed, 06/25/2014 - 10:55 नवीन
बायका वाईट ड्राईवींग करतात, याला जबाबदार पुरषांचे हॉर्मोन्स. ड्रायविंग हे फक्त पुरशांसाठीच असते. http://news.bbc.co.uk/2/hi/health/4202199.stm
  • Log in or register to post comments

त्याच बातमीत

धर्मराजमुटके
Wed, 06/25/2014 - 11:03 नवीन
त्याच बातमीत असही म्हटलयं की "Men do seem to be better at spatial abilities, and women at verbal and emotional skills" -Dr Nick Neave, British Psychological Society त्यामुळे ह्या आणि कोणत्याच धाग्यावर बायका पुरुषांना बोलायच्या बाबतीत तरी हार जाणार नाहीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

बास्स इथे धाग्याचे +३००

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/25/2014 - 12:16 नवीन
बास्स इथे धाग्याचे +३०० पोटेंशियल चालू झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

हेच म्हणतो

प्रसाद गोडबोले
Wed, 06/25/2014 - 11:57 नवीन
+३६२४३६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

चुका सगळेच करतात,

सस्नेह
Wed, 06/25/2014 - 12:25 नवीन
स्त्रिया अन पुरुष. पण काही काही पुरुष जितके बेदरकार अन सुपरफाईन ड्रायव्हिंग करतात, तितके एखाद्या स्त्रीला करताना अजून पाहिले नाही. मी तरी अजुनी हायवेलासुद्धा १०० गाठायला बिचकते.
  • Log in or register to post comments

मला पडलेले कोडे

मराठी कथालेखक
Wed, 06/25/2014 - 17:15 नवीन
मी तरी अजुनी हायवेलासुद्धा १०० गाठायला बिचकते.
स्वतः बर्‍यापैकी ड्रायविंग करु शकणारी माझी पत्नी शेजारी बसते तेव्हा मी वेग ८० च्या पलीकडे नेवू लागलो तर मला वेग कमी करण्यासाठी सूचना देवू लागते. १०० ला काट्याचा स्पर्श जरी झाला तरी 'ओरडणे' होते. त्याउलट ड्रायविंग न येणारी माझी आई शेजारी बसली असताना मी अनेकदा शंभरी पार केली आहे, पण आई काही बोलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हा प्रकार आणखी वेगळा.

खटपट्या
गुरुवार, 06/26/2014 - 01:22 नवीन
हा प्रकार आणखी वेगळा. जर बाजूला बसलेला माणूस ड्रायवर असेल तर तो समोर बघून त्याच्या मनामध्ये गाडी चालवत असतो. आणि अक्चुअल ड्रायवर ने त्याच्या मनाविरुद्ध काही केले कि बाजूला बसलेला अस्वस्थ होतो आणि सूचना देवू लागतो. या उलट जर बाजूला बसलेला ड्रायवर नसेल तर शांत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

वाहन चालवणे ही गोष्ट अनकॉन्शस

गवि
Wed, 06/25/2014 - 12:43 नवीन
वाहन चालवणे ही गोष्ट अनकॉन्शस माईन्डकडून(किंवा सबकॉन्शस माईन्ड- जो काही बरोबर शब्द असेल तो घ्यावा)झाली की ती स्मूथ होते. पण ते जर कॉन्शस माईंडच्या हाती सोपवलं तर वाट लागते. स्त्रियांच्या बाबतीत जास्त कथा अशासाठी तयार होतात की शंभरातल्या किमान पंचाहत्तर स्त्रिया लग्न झाल्यावर / पस्तिशीनंतर पहिल्यांदा ड्रायव्हिंग शिकतात. त्यावेळी पुरुष किंवा स्त्रिया या सर्वांचाच नवीन शारिरीक कौशल्य शिकण्यातला आत्मविश्वास कमी झालेला असतो. याचा परिणाम म्हणजे वाहनचालन करताना प्रचंड कॉन्शसनेस. संपूर्ण लक्ष ड्रायव्हिंगकडे देण्याच्या नादात आणि अतिरिक्त अ‍ॅलर्टनेस ठेवण्याच्या प्रयत्नात स्नायू एकदम स्टिफ होतात / आखडलेले राहतात.. आठवा.. स्टियरिंग किंवा हँडल कसं घट्ट गच्चम धरलेलं असतं आणि नजर जशी "एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार" सारखी सम्मोर रोखलेली. मग बाजूने कोणी आलं की त्यासाठी वेगळं प्लॅनिंग केलेलं नसल्याने गाळण. अशा वेळी आता कोणता गियर टाकायचा या विचाराने मनातले विचार गोठून जातात. मग न्यूटनचा नियम लागू पडतो. गतीशील असल्यास गती तशीच ठेवणे आणि थांबलेले असल्यास थांबून राहणे.. मग कोणालातरी डेंटचा लाभ किंवा मागून हॉर्न्सची लाखोली. या सर्वावर उपाय म्हणजे ज्यांच्याकडे वाहन आहे त्यांनी लहान वयातच मुलींना ते शिकवावं किंवा ड्रायव्हिंग स्कुलात नाव घालावं. पती किंवा पिता हे स्वतः स्त्रियांना वाहन शिकवायला कुचकामी असतात. कारण ते सब्जेक्टिव होतात. शिकवतात कमी आणि खेकसतात जास्त. शिकणार्‍या स्त्रीचं लक्ष वाहनचालनात कमी आणि बाजूच्या पुरुषाकडून येणार्‍या पुढील जजमेंटकडे जास्त असं होतं. अगदी खराखरा कॉन्फिडन्स यायचा असेल तर गाडीचे तत्व समजून घेऊन पूर्ण एकट्याने गाडी चालवावी. सोबत कोणी असल्यावर आत्मविश्वास यायला फार जास्त वेळ जातो. कोणी सतत बाजूला बसून जजमेंट करत नाहीये म्हटल्यावर ते घट्ट पकडून अन स्नायू आखडून चालवणं कमी होतं आणि सफाई येते. हँडल ढिले पकडा. सहा महिन्याचे बाळ समजा. ते हातातून निसटू नये इतकीच घट्ट पकड पण त्याला आवळले जाऊ नये इतकी हलकीही.
  • Log in or register to post comments

गविटच..

योगी९००
Wed, 06/25/2014 - 12:58 नवीन
हँडल ढिले पकडा. सहा महिन्याचे बाळ समजा. ते हातातून निसटू नये इतकीच घट्ट पकड पण त्याला आवळले जाऊ नये इतकी हलकीही. गविटच म्हणतात तो हाच काय...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि _/\_

अजया
Wed, 06/25/2014 - 13:24 नवीन
गवि _/\_ तुम्हाला कसं कळलं !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि _/\_

सखी
Wed, 06/25/2014 - 17:18 नवीन
हेच म्हणते. माझी चायनीज ड्रायव्हींग कोच सांगायची स्टीअरींग म्हणजे मोठं अंड आहे असे समज, सोडलं तर पडुन फुटेल आणि घट्ट धरलं तर हातातच फुटेल. बाकी तुम्ही म्हणता आहेत ते खरेच आहे बहुतेक बायका या तिशिचाळीशीच्या दरम्यान कार चालवायला शिकतात तेव्हा त्यांच्या डोक्यात काळज्या अधिक असतात. हे खालचे रिसर्च दुवे अर्थातच परदेशातले आहे आणि त्यावरुन हेही सिद्द होऊ शकते मुली/बायका जास्त सुरक्षित कार चालवतात कारण बहुतेक मुलं+मुली बरोबरच १५ वर्षाच्या आसपास कार चालवायला शिकतात. दुवा १ दुवा २ याबरोबरच पुरुषांना दिशांचा (डिरेक्शन) अंदाज खूप चांगला असतो हे वाचले होते आणि अनुभवपण खुपदा आलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

स्टीअरींग व्हील वर हात आणि आत्मविश्वास

मराठी कथालेखक
Wed, 06/25/2014 - 17:22 नवीन
[हे माझे मत आहे] कमी आत्मविश्वास Image removed. चांगला आत्मविश्वास Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

याबद्दल्चे निरिक्षण असे की मी

रेवती
Wed, 06/25/2014 - 21:47 नवीन
याबद्दल्चे निरिक्षण असे की मी पहिल्या फोटूप्रमाणे हात ठेवले तर बाकीचे लोक्स दुसर्‍या फोटूप्रमाणे असतात. मात्र मी कान्फिडन्स दाखवायला गेले की लोकांचे सुकाणूवरील हात पैल्या फोटूप्रमाणे होतात. अवांतर- तुम्ही परपिडावाले काहो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

अवांतर- तुम्ही परपिडावाले

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/26/2014 - 11:00 नवीन
अवांतर- तुम्ही परपिडावाले काहो?
'जनातलं,मनातलं' मध्ये माझ्या आतापर्यंत सात पोस्ट्स आहेत...तुम्ही फक्त दोनच वाचल्या असतील तर तुम्ही तसं म्हणू शकता.. *smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

"एकच तारा समोर आणिक पायतळी

कवितानागेश
Wed, 06/25/2014 - 13:00 नवीन
"एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार" =))
  • Log in or register to post comments

रिस्की ड्रायव्हर कोण...

राजेश घासकडवी
Wed, 06/25/2014 - 13:09 नवीन
इथे वाचा... http://www.aami.com.au/sites/default/files/fm/pdf/AAMI-Facts_MenWomen_08.pdf
  • Log in or register to post comments

हॅ

प्रसाद गोडबोले
Wed, 06/25/2014 - 13:23 नवीन
Women tend to have fewer crashes and their car accident claims tend to cost less than men’s (source: 2007 AAMI claims data
हॅ ! पहिल्याच वाक्यावर वाचायचे सोडले ... हे म्हणजे सुडो-स्टॅटिस्टिक्स चा उत्तम नमुना आहे ! अहो असं काऊंट बेसीस वर कंपॅरिझन नाही करता येणार , कंपॅरिझन परसेंटेज बेसीस वर व्हायला हवे ... टक्केवारी काढा पाहु ... उदा: समजा १०० बायका गाडी चालवतात त्यातील २५ रिस्की गाडी चालवतात आणि १००० पुरुष गाडी चालवतात त्यातील २०० रिस्की गाडी चालवतात , मग २५ < २०० म्हणुन बायकांपेक्षा पुरुष जास्त रिस्की गाडी चालवतात असे अनुमान काढता येईल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

काहीही

सखी
Wed, 06/25/2014 - 17:18 नवीन
काहीही म्हणजे १०० बायका १००० पुरुषांच्या बरोबरीने? तुलनाच करायची तर नंबर तरी सेम घ्या ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अगं तेच तर ते म्हणत आहेत...

पिलीयन रायडर
Wed, 06/25/2014 - 17:23 नवीन
अगं तेच तर ते म्हणत आहेत... बायकांची संख्या कमी आहे म्हणुन तर अ‍ॅपल टु अ‍ॅपल तुलना व्हावी म्हणुन % घ्या म्हणत आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

हम्म

पैसा
Wed, 06/25/2014 - 17:31 नवीन
पण अ‍ॅपल हे अ‍ॅपल असतं आणि करवंद हे करवंद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

That is altogether different

पिलीयन रायडर
Wed, 06/25/2014 - 17:51 नवीन
That is altogether different question!!! मी तर आधीच म्हणलं होतं.. मुळात मेंदुच वेगळे आहेत.. तुलना तशीही होऊ शकत नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पण मग जर मेंदूच वेगळे आहेत तर

बॅटमॅन
Wed, 06/25/2014 - 18:13 नवीन
पण मग जर मेंदूच वेगळे आहेत तर परीक्षेत मार्क तरी सेम स्केलवर का द्यायचे म्हणे =)) तुलना करणारे अंमळ मूर्खच असावेत नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आपण ड्रायव्हिंग बद्दल बोलत

पिलीयन रायडर
Wed, 06/25/2014 - 18:49 नवीन
आपण ड्रायव्हिंग बद्दल बोलत होतो ना? अशी थिअरी वाचनात आली होती की नेव्हीगेशन मध्ये पुरुष जास्त चांगले असतात.. त्यांना एकच एक फोकस्ड काम जास्त चांगलं जमतं.. तर बायका मल्टि टास्किंग जास्त चांगली करतात वगैरे.. ह्यानुसार बायकांना मुळातच ड्रायव्हिंग स्किल्स कमी आहेत.. हा माझा आणि पै तै चा मुद्दा आहे..
पण मग जर मेंदूच वेगळे आहेत तर परीक्षेत मार्क तरी सेम स्केलवर का द्यायचे म्हणे
मुळात घेताय ती परीक्षा पद्धत आयडीयल आहे हे ग्रुहितक आहे इथे.. आधी ते बघा.. मग मार्क वगैरेच पाहु..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मुळातच रडीचा डाव खेळायचा असला

बॅटमॅन
Wed, 06/25/2014 - 18:57 नवीन
मुळातच रडीचा डाव खेळायचा असला की असली कारणं सुचतात. नेव्हिगेशन आणि ड्रायव्हिंग हे एकच आहे असं तर नै ना सुचवायचं? बाकी परीक्षेच्या रडी मुद्द्यालाही फाट्यावर मारले गेले आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

रडीचा डाव?

पिलीयन रायडर
Wed, 06/25/2014 - 19:06 नवीन
रडीचा डाव? तुला समजुन घ्यायचं नाहीये की समजत नाहीये.. थोडं नीट वाच.. आपण ज्या मुद्द्यावर स्त्री पुरुष तुलना करु पहत आहोत, त्या बाबतीत जर त्यांचे मेंदु सिग्निफिकंटली वेगळे असतील तर ती तुलना व्हॅलिड राहील का? जी गोष्ट तुम्हाला अगदी सहज जमते ती करताना स्त्रीया बर्‍ञाच गोंधळतात.. सिंपल.. ह्यात न कळण्या सारखं काय आहे.. पण आता वैयक्तिक टिका सुरु झालीये.. सो.. रामराम... तसेही इतके इयत्ता दुसरी ब ला समजावायचे पेशन्स माझ्यात नाहीत... धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मुळात सिग्निफिकंट डिफरन्स आहे

बॅटमॅन
Wed, 06/25/2014 - 19:13 नवीन
मुळात सिग्निफिकंट डिफरन्स आहे यालाच आक्षेप आहे. असा बचाव करण्याने तो डिस्प्रूव्ह होत नाही. त्या आक्षेपाला भक्कम पुरावा असेल तर तुझं सगळं मान्य करतो, नसेल तर मात्र हा रडीचा डावच. सिग्निफिकंट डीफरन्स नक्की कुठल्या क्षमतेत आहे, किती आहे, कोण सिद्ध केलं, इ.इ. विदा दिल्यास पुढची चर्चा ठीक होईल. नपेक्षा स्लगफेस्ट आहेच नेहमीची- दुसरी ब आणि पहिली फ. काय? स्लगफेस्ट खेळायचीय की कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा करायचीय? केव्हापासून पाहतोय, एक अ‍ॅझम्प्शन कवटाळून बसलेलं पाहतोय. सपोर्टिंग विदा द्या मग बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अ‍ॅपल टु अ‍ॅपल

सखी
Wed, 06/25/2014 - 17:38 नवीन
अगं नाही गं १०० बायका आणि १००० पुरुष - मग अ‍ॅपल टु अ‍ॅपल कसे होणार? ते म्हणजे अ‍ॅपल टु मोठ्ठा फणस होईल ना. दोघेही शंभरच घ्याना. हे स्टडीज केले गेले होते त्यात पण ७०० की ८०० बायका आणि पुरुष होते असे मागे वाचले होते, नक्की आकडा लक्षात नाही पण मोठ्या प्रमाणात हा स्टडी केला गेला होता, दोघांचे प्रमाण समसमान होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुला सॅम्पल साईझ सेम ठेवा असं

पिलीयन रायडर
Wed, 06/25/2014 - 17:49 नवीन
तुला सॅम्पल साईझ सेम ठेवा असं म्हणायचय का? तसं असेल तर कशासाठी नक्की? कारण % काढलं की तसंही येणारं उत्तर हे "१०० पैकी क्ष" असंच असणार ना दोन्ही गटांसाठी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

+१

बॅटमॅन
Wed, 06/25/2014 - 18:15 नवीन
सँपल साईझ कितीही असो, तुलना फक्त अ‍ॅब्सोल्यूट नंबर ऑफ अ‍ॅक्सिडेंटची नको तर % ची पाहिजे. वरच्या पीडीएफमध्ये किमान ३ इंडिकेटरमध्ये स्त्री आणि पुरुषांत सिग्निफिकंट डिफरन्स दिसून येत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१

प्रसाद गोडबोले
Wed, 06/25/2014 - 18:41 नवीन
वरच्या पीडीएफमध्ये किमान ३ इंडिकेटरमध्ये स्त्री आणि पुरुषांत सिग्निफिकंट डिफरन्स दिसून येत नाहीये.
पार्शली करेक्ट ! पण .... सदर लेखक महाशयांनी वेरीयन्स बाबत काहीच उल्लेख केला नाहीये ,त्यामुळे सगंळंच शंकास्पद आहे . पण लेखकाला बेनीफीट आफ डाऊट देवुन वेरीयन्सही सिग्निफिकन्टली वेगळा नाहीये असे मानु ! इन दॅट केस ... ड्रायव्हिंगच्या बाबतीत पुरुषांची बाजु सध्यातरी नक्कीच वरचढ ठरते कारण स्त्रीया जे छोट्या सेट मध्ये जो परफॉर्मन्स दाखवतात तोच पुरुष मोठ्ठ्या सेट मध्ये दाखवत आहेत ... सोप्प्या अ‍ॅनालॉजीत , सद्यस्थितीत स्त्रीया "विराट कोहली " आहेत तर पुरुष "सचिन तेंडुलकर" :D ! अवांतर : मला करवंद आवडतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रैट्ट, व्हॅरियन्स सेम आहे

बॅटमॅन
Wed, 06/25/2014 - 18:58 नवीन
रैट्ट, व्हॅरियन्स सेम आहे याची खात्री पटल्याखेरीज अ‍ॅनोव्हा किंवा काही लावता येतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हॅ ! पहिल्याच वाक्यावर

राजेश घासकडवी
Wed, 06/25/2014 - 18:21 नवीन
हॅ ! पहिल्याच वाक्यावर वाचायचे सोडले ...
च्यायला, पहिल्या वाक्यातच सगळं कंपॅरिटिव्ह स्टॅटिस्टिक्स यावं अशी अपेक्षा होती तर. भाऊ, पुढचं वाचा. तुम्हाला हवी तशी पर्सेंटेजं दिलेली आहेत. एका वाक्यावरून आख्ख्या स्टडीबद्दल मत बनवता यावरून तुमच्या मताला किती किंमत द्यायची हे लक्षात आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अंहं

प्रसाद गोडबोले
Wed, 06/25/2014 - 18:30 नवीन
पहिल्या वाक्यातच सगळं कंपॅरिटिव्ह स्टॅटिस्टिक्स यावं अशी अपेक्षा होती तर. भाऊ, पुढचं वाचा. तुम्हाला हवी तशी पर्सेंटेजं दिलेली आहेत.
>>>> मग तर अजुनच वाईट ! संपुर्ण योग्य अ‍ॅनालिसिस करुनही सुरवातीला जर चुकीचे विधान टाकत असतील तर त्या लेखकाच्या दृष्टीकोनाबद्दलच शंका निर्माण होते आणि तो लेखक नक्कीच बायसड असणार असे अनुमान काढावे लागते !
एका वाक्यावरून आख्ख्या स्टडीबद्दल मत बनवता यावरून तुमच्या मताला किती किंमत द्यायची हे लक्षात आलं.
गुड ! अभिनंदन ! आता योग्य अ‍ॅनालिसीस करुन चुकीचे / मिसलिडींग वाक्य / हेडर देणार्‍या लेखाला किती किंमत द्यायची हे कळाले की कळवा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तो ष्टडी वाचून पुरेसे चित्र

बॅटमॅन
Wed, 06/25/2014 - 18:58 नवीन
तो ष्टडी वाचून पुरेसे चित्र डोळ्यांसमोर उभे राहत नसल्याने त्याला प्रमाण किती मानायचे हा प्रष्ण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

एकदा डोळे मिटूनच घ्यायचे

राजेश घासकडवी
गुरुवार, 06/26/2014 - 01:56 नवीन
एकदा डोळे मिटूनच घ्यायचे ठरवले तर समोर ताजमहाल असला तरी चित्र उभं राहत नाही. बाकी प्रमाण वगैरे कोणी सांगावं? एक डेटापॉइंट म्हणून तरी बघा. त्याला काउंटर डेटा पॉइंट दाखवला तर आम्ही पण उघड्या डोळ्यांनी बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ड्राइविंग बद्दल अज़ून थोडेसे काही

फोटोग्राफर243
Wed, 06/25/2014 - 14:04 नवीन
ड्राइविंग बद्दल अज़ून थोडेसे काही, कृपया लक्षात घ्या हे माज़े लिखाण नाही... http://palshikar.blogspot.in/2006/01/blog-post_113679477670113272.html
  • Log in or register to post comments

बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग

म्हैस
Wed, 06/25/2014 - 14:40 नवीन
बायकांचे मेंदु ड्रायव्हिंग ह्या बाबतीत पुरुषां एवढे प्रगत नाहीचेत
म्हणून तर बायका driving च्या वेळी driving करतात . आणि पुरुष driving च्या नावाखाली गोंधळ घालतात .
  • Log in or register to post comments

पुरुष driving च्या नावाखाली

शिद
Wed, 06/25/2014 - 14:48 नवीन
पुरुष driving च्या नावाखाली गोंधळ घालतात
म्हणजे नक्की काय व कसा गोंधळ घालतात, जरा प्रकाश पाडाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

माझा अनुभव

विटेकर
Wed, 06/25/2014 - 14:41 नवीन
स्वतः ची गाडी घेतल्यावर हौसेने विटुकाकूला क्लास लावला गाडी शिकवली . आणि एक दिवस पार्किंगच्या खांबावर धा..ड.. काय काय तुटले आठ्वत नाही पण ४५ हजार बिल झाले.. थान्कु इन्शुरन्स वाले ! दुरुस्त करुन आणल्यावरही गाडीतून असंख्य आवाज येत , ते नेमके अपघाताचे आहेत की बनावटीतील आहेत हे गाडी विकेपर्यन्त कळले नाही. त्यानंतर आज तागायत ती चालवत असेल तर मी गाडीत बसत नाही ! ते धैर्य गोळा करायला ३-४ जन्म जातील. बाकी सध्याच्या गाडीला असंख्य ठिकाणी जख्मा झाल्या आहेत. अर्थात ती ज्या गाडीवर शिकली त्याचा मेक वेगळा होता हा काही तिचा दोष नाही !त्या मेकची गाडी असती तर तिने असे काही होऊच दिले नसते असा तिचा दावा आहे ! ( असेल ही तसे !)
  • Log in or register to post comments

भन्नाट प्रतिसाद काका. अगदी

धन्या
Wed, 06/25/2014 - 17:33 नवीन
भन्नाट प्रतिसाद काका. अगदी पोट धरुन हसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

मस्त हो काका! काहीही असलं तरी

रेवती
Wed, 06/25/2014 - 21:44 नवीन
मस्त हो काका! काहीही असलं तरी विटूकाकू गाडी चालवायचे सोडत नैत ना? मग झालेतर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

चूक झाली ती सुधारणे जास्त

अम्रुता आफले
Wed, 06/25/2014 - 15:46 नवीन
चूक झाली ती सुधारणे जास्त महत्वाचे आहे मग ती कुणाची का असेना . पुरुष बायकांच्या चुका काढतो बाई पुरुषाच्या येवढा करूनसुद्धा अपघात काही टळत नाहीत होताच राहतात मग येवढा मोठा लिखाण करण्याचा काय उपयोग
  • Log in or register to post comments

एक प्रसिद्ध वाक्य आहे, नेमकं

धन्या
Wed, 06/25/2014 - 17:36 नवीन
एक प्रसिद्ध वाक्य आहे, नेमकं कुणाचं आहे ते माहिती नाही.
किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि लावणीने तो बिघडला नाही.
इथे किर्तन शब्दाच्या ऐवजी मिसळपाववरील लेखन असे वाचलेत की तुम्हाला उत्तर मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अम्रुता आफले

इथे किर्तन शब्दाच्या ऐवजी

प्रसाद गोडबोले
Wed, 06/25/2014 - 18:43 नवीन
इथे किर्तन शब्दाच्या ऐवजी मिसळपाववरील लेखन असे वाचलेत
>>> मग लावणी शब्दाच्या ऐवजी काय वाचावे ? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

टैमप्लीज

पैसा
Wed, 06/25/2014 - 19:49 नवीन
मिपावरचे तमाशे नेहमीच 'आतून कीर्तन वरून तमाषा' पेक्षा मनोरंजकअसतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मिपावरचे तमाशे नेहमीच 'आतून

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 06/26/2014 - 11:04 नवीन
मिपावरचे तमाशे नेहमीच 'आतून कीर्तन वरून तमाषा' पेक्षा मनोरंजकअसतात!
आणि म्हणुनच मिपावर चर्चा करायला मजा येते !! आय लव्ह मिपा !! *give_rose*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा