Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by anagha kulkarni on Tue, 06/24/2014 - 15:54
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा. गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे. खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून? यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते. गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार. यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील. मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
  • Log in or register to post comments
  • 40361 views

प्रतिक्रिया

Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 06/24/2014 - 18:35

In reply to अर्थात माझं ड्रायव्हिंग हा by शिद

Permalink

"अर्थात माझं ड्रायव्हिंग हा

"अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी" ह्याबद्दल पण बोला म्हणजे लेखात नमूद केलेल्या तुमच्या निरीक्षणांबरोबर तुलना करता येईल. की फक्त दुसर्‍यांनाच नावं ठेवायची?
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं पाहायचं वाकून. :D
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Tue, 06/24/2014 - 18:47

In reply to "अर्थात माझं ड्रायव्हिंग हा by धन्या

Permalink

बाडिस

*biggrin*
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 06/24/2014 - 18:32

Permalink

ते उजवीकडे सिग्नल देऊन

ते उजवीकडे सिग्नल देऊन डावीकडे वळणं किंवा उलट याबद्दल कसे कुणी अजून लिहिले नाही? :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 06/24/2014 - 18:42

Permalink

ताजाच अनुभव

आता माझा कालचाच अनुभव सांगतो : संध्याकाळच्या वेळेला घरी येत होतो , हिंजवडी चौकाचौनेहमीप्रमाणेच भयंकर टृअ‍ॅफीक होते, पण दोन कार च्या मधे जी स्पेस होती त्यातुन मला पटकन माझी बाईक काढुन पुढे जाता आले असते ...पंण त्या मागची कार मॅडम चालवत होत्या ... मी मधुन जाणार असे लक्षात आलायावर लगेच गाडी पुढे घेतली आणि म्हणालाय "नो" ( हे मी लिप्स रीडींग वरुन ओळखलं )... शुध्द देशी आडगेपणा !! आता खरंतर , बाईकवाले असे बाईक बाजुला काढुन चारचाकी गाड्यांना रस्ता रिकामाच करुन देत असतात , पण ह्या मॅडमना ते मान्य नव्हतं मग काम मी बाजुने बाईक काढली , पुढे मोकळा रस्ता होता तरी मुद्दाम मॅडमच्या गाडी पुढे जाऊन थांबलो ... सिग्नल सुटला तरी थांबलो , हॉर्न वाजवत होत्या तरी थांबलो . "कफ यु " म्हणण्याचा आणि मध्यमाअंगुली निर्देश करण्याचा अनावर मोह होत होता पण घरच्या संस्कारांना जागुन तो आवरला ... अवांतर : आता ह्या असल्या अडग्या लोकांवर अजुन एक अभिनव प्रयोग करायचे ठरवले आहे ... एक काळी बाहुली विकत घेवुन सोबत ठेवणार आहे अन असला कोणी आडगे पणा केला की फक्त एका चिठ्ठीवर नंबर लिहिलाय असे दाखवायचे अन ती ती चिठ्ठी काळ्या बाहुलीला टोचायची अन मग ती काळी बाहुली असल्या लोकांसमोर नाचवायची :D (असले लोक आधीच घाबरट असतात त्यांच्याबर काही सायकॉलॉजिकल परिणाम होतो का ह्याचा अभ्या करता येईल ह्या निमित्ताने =)) )
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 18:51

In reply to ताजाच अनुभव by प्रसाद गोडबोले

Permalink

भावलीची ऐड्या यकदम जबराट!!!!!

भावलीची ऐड्या यकदम जबराट!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Tue, 06/24/2014 - 19:28

In reply to ताजाच अनुभव by प्रसाद गोडबोले

Permalink

ह्याचा अभ्या करता येईल ह्या

ह्याचा अभ्या करता येईल ह्या निमित्ताने
अवांतर, पण सध्या 'अभ्या' कुठे आहे..? तो सोलापूरचा ..
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 06/24/2014 - 18:42

Permalink

अनघा तै.. शक्य तेवढी मदत केली

अनघा तै.. शक्य तेवढी मदत केली आहे.. योग्य दिशेने वळवला आहेच.. मंडळी (नेहमी प्रमाणे) पेटली आहेतच.. उद्या सकाळ्पर्यंत धागा (राहिलाच तर) १-२ शतकं पार करुन गेला असेल.. तेवढं आमच्याही धाग्यावर यायचं लक्षात ठेवा बरं का!! संपादकांना रात्रपाळीसाठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 18:44

In reply to अनघा तै.. शक्य तेवढी मदत केली by पिलीयन रायडर

Permalink

धागा (राहिलाच तर)

धागा (राहिलाच तर)
गर्भित धमकी नोंदवल्या गेली आहे...शेवटी मोर ईक्वल असल्यावर हे चालायचंच म्हणा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Tue, 06/24/2014 - 18:46

In reply to धागा (राहिलाच तर) by बॅटमॅन

Permalink

शेवटी मोर ईक्वल असल्यावर हे

शेवटी मोर ईक्वल असल्यावर हे चालायचंच म्हणा.
म्हणजे धाग्याची मोराची चिंचोली होणार तर.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 18:48

In reply to शेवटी मोर ईक्वल असल्यावर हे by धन्या

Permalink

मला तर वाटलं 'चेच'न्या प्रांत

मला तर वाटलं 'चेच'न्या प्रांत होणार =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 06/24/2014 - 18:58

In reply to शेवटी मोर ईक्वल असल्यावर हे by धन्या

Permalink

चला धाग्याच्या निमित्ताने नवा

चला धाग्याच्या निमित्ताने नवा वाक्प्रचार मिळाला. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 06/24/2014 - 18:58

In reply to चला धाग्याच्या निमित्ताने नवा by सूड

Permalink

असेच म्हणतो

असेच म्हणतो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 06/24/2014 - 18:43

Permalink

धमाल फक्त धमाल.

धमाल फक्त धमाल. बाकी आजकालच्या मुली (बाप्येही) बिगर गिअरच्या स्कुट्या अ‍ॅक्टीव्ह्या सुझुक्या भरधाव वेगाने घेवून जातांना त्याच्या अज्ञानाची किव करावी वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 06/24/2014 - 18:57

In reply to धमाल फक्त धमाल. by पाषाणभेद

Permalink

पाभे

पाभे , ह्या निमित्ताने एखादी लावणी/ भारुड / होवुन जाऊ दे , बरेच दिवसात तुमचे काही लेखन वाचनात आलेले नाहीये , आज बरेच दिवसांनी दिसलात ... त.टी मी तुमच्या कवितांचा लई मोठ्ठा फॅन आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 06/24/2014 - 19:02

Permalink

बाई, पुरुष असा काही

बाई, पुरुष असा काही चालवण्यातला फार फरक मला तरी आढळला नाही ब्वॉ! आपल्या वाहनाच्या मागे ठराविक अंतर ठेवून अनेक मैल कोणी येत असलं तर सहज ओळखवं की ड्रायव्हर किंवा ड्रायव्हरीणबाई (मुद्दाम लिहिलेय तसे) फोनवर बोलत बोलत येतायत व आपल्या गाडीचा सहारा आहे. गाडी मध्येच तिरकी जाऊन एकदोनदा सरळ केली म्हंजे मनुष्य (बाई/ पुरुष) टेक्स्टींग करतायत. लाल दिव्याला उभे असलेले वाहन हिरव्या दिव्याला जरा उशिराने हलले आणि लगेचच्या लाल दिव्याला थांबायची घाई असली की बाई असल्यास बरेचदा मेक अप चाललेला असणे, पुरुष असेल तर गाडीतील कचरा उचलून ट्रॅश ब्याग भरायची वेळ असते. हायवेला बुंगाट जाणार्‍या गाड्या एकदम सुतासरख्या सरळ झाल्यास पुढे मामारावांची स्वारी दिसणे, कोणालातरी पकडलेला असणे यातील एक किंवा दोन्ही गोष्टी असल्याचे निदर्शक! दोन अठवड्यांपूर्वी एक १८ चाकी बंब्या ट्रक आडवा झाला होता. रस्त्यात सगळी ट्रकमधील बॉक्सेस पसरली, काचा फुटल्या व पोलीसकार्य चालू होते. मुलांच्या शाळा सुटण्याची वेळ झाल्याने आम्हा सर्व पालकांना पोहोचण्याची घाई झाली होती. चालू असलेल्या एकाच लेनमधून जाताना सगळे बाई किंवा पुरुष नव्हते तर फक्त पालक होते. मध्ये जिथे पूर्ण थांबावे लागले तिथे सर्व बाया व पुरुषांनी हात मोकळे फोन फिरवून आपापल्या मुलांना कळवले की उशीर होतोय. तरण्या मुलींनी मेक अप व मुलांनी टेक्सटींग सुरु केले. त्यातूनही जे काही किंचित फरक दिसतात ते तसेच असू द्यावेत तर मजा आहे. नैतर धाग्याला विषय कसे मिळणार? न्यूजर्सीच्या वाटेवर एक बाई मुरांब्यामधून हळूहळू चालवताना सुकाणूवर पुस्तक ठेवून वाचत चालली होती तर एक बुवा सुकाणूवर नकाशा पसरून चालवत होता. कुठला आलाय डोंबलाचा फरक? दोन वेगळे (पण तसे नैसर्गिक) अनुभव म्हणाजे वाहतुकीच्या मुरांब्यात वृद्धांना नैसर्गिक बोलावणे धरवत नाही तेंव्हा नाईलाजाने ते बाजूच्या जंगालात जातात. आपणाही कधीतरी त्या वयात असणार आहोत ही जाणीव ठेवणे महत्वाचे. दुसर्‍या अनुभवात एक बाई भयंकर जोरात गाडी वळवून एका मोडक्या घरापाशी थांबली व माझ्या गाडीच्या पुढे गाडी घातली तिने. मलाही करकचून थांबावे लागले. तिने पटकन गाडीचे दर उघडले, तान्ह्या बाळाला कारसीटमधून काढले आणि आधी त्याला पाजायला सुरुवात केली. ते रडणे थांबल्यावर मला कल्पना आली. त्यावेळी कोणीही पुरुष तिथे निरिक्षण शक्ती पणाला लावत बघत बसले नव्हते हे महत्वाचे! भारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 06/24/2014 - 19:22

In reply to बाई, पुरुष असा काही by रेवती

Permalink

बाई, पुरुष असा काही चालवण्यातला फरक

बरेच फरक आहेत ... बारीक निरीक्षण केल्यास लक्षात येतील ... माझ्या निदर्शनास आलेले हे काही १. बायका गाडी थांबवायची असल्या विमानाची चाके बाहेर येतात तसे दोन्ही पाय बाहेर काढतील ...पुरुश दोनचाकी गाडी थांबवायची असल्यास कायम डावाच पाय पाय जमीनीवर टेकवतील ( मग ते अ‍ॅक्टीव्हा चालवत असले तरीही ) २. पुरुश गाडी चालवताना नेहमी ऑप्टीमम / फ्युएल एफिशियंट वाट काढतील , बायका सहसा कंफर्ट वर भर देतील . ३ पुरुषांन सिग्नल तोडायला आवडेल पण पण लईच हाय ऑन अ‍ॅड्रीनॅलीन असतील तेच सिग्नल तोडतील , बायकांना कदाचित सिग्नल पाळायला आवडेल पण सिग्नल सुटल्यावरही मागुन चार वेळा हॉर्न वाजल्या शिबाय हलणार नाहीत . ४. चारचाकी गाड्यां मधे पुरुष कधीच मान उंच करुन रस्ता पाहण्याचा प्यत्न करणार नाही , बायका मात्र कायम कायम मान उंचावुन चेक करत राहतील (पुढचे चाक पंक्चर आहे काय हे पाहण्याचा प्रयत्न करत असतात की काय देव जाणे ) बरेच आहेत फरक ...
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 06/24/2014 - 19:43

In reply to बाई, पुरुष असा काही चालवण्यातला फरक by प्रसाद गोडबोले

Permalink

पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत

पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत असेल तर नावे ठेवण्यात हाशील नाही ना! तिथे शेजार्‍यांच्या काकू असोत नाहीतर तुमची पत्नी, मुलगी असोत. ते असेच करणार. बरेचदा परिस्थिती अशी असते की त्या जागी फक्त मनुष्यप्राणी उरतो. बाई पुरुष असे ठ्सठशीतपणे न राहता! किंचित नैसर्गिक फरकांपलिकडे जाण्याचा प्रयत्न मी केलाय. यात ना पुरुषांना नवे ठेवत ना स्त्रीयान्ला! तुमचा स्वत:च मुलगा आणि मुलगी यात फरक असणारच्चे. मुले अस्तील तर त्यांच्या वागणुकीतून कळले असेलच, नसतील तर भविष्यात कळेल (अशी आशा). शाळेच्या सहलीचा अपघात, शाळेत गोळीबार झाल्यावर तातडीने तिकडे गाडी काढून पळणारे पालक हे आई, वडील यातील नैसर्गिक फरकामुळे वेगळ्या प्रतिक्रिया देतीलच पण काळजीने धाव ज्या प्रकारे घेतील ती एका मनुष्याला आपल्या बाळाची वाटणारी काळजी असेल. नियम न तोडण्याची शिकस्त करत गाडी पळवणे वगैरे प्रकारांचा विचार करून पहा! काये ना, रोजच्या गाडी चालवण्यापलिकडे आयुष्यात बर्‍याच गोष्ती आहेत, बाईने मान उंचावून बघितले की पुरषाने एक पाय टेकवला यात मला खरेच इंतरेस्ट नाही. अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. बायकांना वेगळ्या गोष्टींची काळाजी करावी लागते तर पुरुषांना आणाखी वेगळ्या, कधीकधी दोघांनाही घर चालवण्याची भ्रांत पडलेली असते. ते बॉडीलँग्वेजमधून दिसते एवढेच. त्यातून काही अपघात घडत नसतील असे नाही, असतीलच, अडचणीही येत असतील पण त्यासाठी एकट्या बाईला किंवा पुरुषाला वेगळे काढणे जमणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 06/24/2014 - 19:54

In reply to पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत by रेवती

Permalink

>>त्यासाठी एकट्या बाईला किंवा

>>त्यासाठी एकट्या बाईला किंवा पुरुषाला वेगळे काढणे जमणार नाही. +१
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Tue, 06/24/2014 - 20:28

In reply to पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत by रेवती

Permalink

बॅलन्स्ड प्रतिसाद!!

रेवतीताईंच्या वरील दोन्ही प्रतिसादांशी प्रचंड सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 06/25/2014 - 11:54

In reply to पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत by रेवती

Permalink

मग

काये ना, रोजच्या गाडी चालवण्यापलिकडे आयुष्यात बर्‍याच गोष्ती आहेत, बाईने मान उंचावून बघितले की पुरषाने एक पाय टेकवला यात मला खरेच इंतरेस्ट नाही.
ओके , मग तुमचे आधीचे अर्ग्युमेन्ट की "स्त्री पुरुषांच्या ड्रायव्हिंग मधे तसा काही फरक नसतो" हे "लॉजिकली" चुकीचे आहे ... तुर्तास इतकेच म्हणतो !! फरक असतोच आणि त्याचा इतरांना अनुभवही येतो पण तुम्ही फरक मानत नाही इतकेच !! ह्या लॉगिकने तर मग कोणातच काहीच फरक नसतो असेही म्हणता येईल :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 06/25/2014 - 18:13

In reply to मग by प्रसाद गोडबोले

Permalink

किरकोळ गोष्टी आहेत या, याची

किरकोळ गोष्टी आहेत या, याची चर्चा करण्यात वेळ घालवणार नाही. टंकाळा हेही कारण आहेच. काल लै टंकलय.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 06/25/2014 - 20:33

In reply to बाई, पुरुष असा काही चालवण्यातला फरक by प्रसाद गोडबोले

Permalink

विमानाची चाके

म्येलो... म्येलो... लँडिंग ङियर...
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 06/24/2014 - 22:47

In reply to बाई, पुरुष असा काही by रेवती

Permalink

त्यावेळी कोणीही पुरुष तिथे

त्यावेळी कोणीही पुरुष तिथे निरिक्षण शक्ती पणाला लावत बघत बसले नव्हते हे महत्वाचे! भारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?
चला, नविन मुद्दा. निवासी विरुद्ध अनिवासी. होऊ दे दंगा.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 06/24/2014 - 23:34

In reply to बाई, पुरुष असा काही by रेवती

Permalink

...त्यावेळी कोणीही पुरुष तिथे

...त्यावेळी कोणीही पुरुष तिथे निरिक्षण शक्ती पणाला लावत बघत बसले नव्हते हे महत्वाचे! भारतात अश्या परिस्थितीत काय केले असते? हे चुकून "महाभारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?" असे वाचले :) त्यामुळे जिज्ञासा जागी झाली... खरंच, महाभारताच्या काळी रथ चालवायचे आणि ओव्हरटेक करायचे (विशेषतः युद्धभूमीवर) काही नियम होते काय? जाणकारांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 06/25/2014 - 18:19

In reply to ...त्यावेळी कोणीही पुरुष तिथे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

एकतर आखाती धागे काढून, जास्त

एकतर आखाती धागे काढून, जास्त माहिती देऊन तुम्ही मला त्यांचा हेवा वाटवलाय. इथं ड्रायव्हिंग करून भयानक कंटाळा आलाय आणि तिकडे बायकांना परवानगी नाही म्हणे! अरे, हवीय कोणाला स्त्रीमुक्ती? ;) गाडी माझी आणि एक ड्रायव्हर! मज्जाए! येत्या ३ दिवसात मी कमीतकमी दीडशे मैल डाईव्ह करणारे, त्यानंतरच्या अठवड्यात किमान २०० मैल! आणि मला म्हणतात सगळेजण की हिला फिरायला आवडत नाही. अरे, काय फिरणार?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/25/2014 - 18:35

In reply to एकतर आखाती धागे काढून, जास्त by रेवती

Permalink

(No subject)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 06/24/2014 - 19:09

Permalink

धाग्याने शतक करावे ह्यासाठी आमचा पण..

एक प्रतिसाद... बाकी चालू द्या...
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Tue, 06/24/2014 - 20:31

Permalink

डायव्हर

मला कुणाच्याच ड्रायव्हिंग बद्दल बोलायचं नाही. पण मी कधीकाळी ड्रायव्हिंग शिकलो तेंव्हा आमच्या ट्रेनर ने जे मौलिक विचार ऐकवले ते लिहित आहे. ' रास्तेमें कोई गाय, भैंस या औरत आयेगी ना, तो कभीभी उसके पीछेसेही निकलनेका !'
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 06/24/2014 - 20:38

In reply to डायव्हर by तिमा

Permalink

अगदी असेच मला हैदराबादेच्या

अगदी असेच मला हैदराबादेच्या ट्रेनरने शिकिवले. "अम्मा, रास्तेमे औरत लोगां चार चार बच्चे लेके क्रास करतें, तब रुकना पडता पर आदमी लोगांके लिये हारन (हॉर्न) मारे तो ब्बी नै हिलते" मला त्याने सांगितल्याप्रमाणे किंवा आणखी वेगळेही अनुभव आलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Tue, 06/24/2014 - 21:48

Permalink

चांगलं आणी रद्दड ड्रायव्हींग

चांगलं आणी रद्दड ड्रायव्हींग करणारे पुरूष असतात आणि बायकाही. फरक इतकाच की रद्दड ड्रायव्हींग करणारा मुलगा आईच्या वळणावर गेलेला असतो आणि चांगलं ड्रायव्हींग करणारी मुलगी बाबांच्या ! ;-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Wed, 06/25/2014 - 17:03

In reply to चांगलं आणी रद्दड ड्रायव्हींग by मराठे

Permalink

फरक इतकाच की रद्दड

फरक इतकाच की रद्दड ड्रायव्हींग करणारा मुलगा आईच्या वळणावर गेलेला असतो आणि चांगलं ड्रायव्हींग करणारी मुलगी बाबांच्या
यावरुन काही आठवलं... नवीनच नोकरीस रुजू झालो होतो, पहिली दुचाकी (बाईकच्या जमान्यात स्कूटर) घेतली होती. मी आणि बाबा आपापल्या कंपनीत रात्रपाळी करुन आपापल्या स्कूटरवर परतत असताना मी बाबांना बुंगाट ओवरटेक केली. नंतर बाबांनी आईला ऐकवले. "तो कसा रॅश चालवत होता " पासून चालू झालेली गाडी मग "तु लाडावले आहेस त्याला.." वगैरे पर्यंत आल्यावर मग आईनेही उत्तर दिले "पण त्याला गाडी चालवायला मी नाही ना शिकवले..."
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 06/24/2014 - 22:05

Permalink

असं नाही....

असं मुळीच नाही. जनरलाईझ करणं चुकीचं आहे. एवढंच आहे की या सगळ्या वर नमूद केलेल्या गोष्टींपैकी अनेक गोष्टी पुरूष मंडळी मुद्दाम आणि उद्दामपणे करतात, तर महिला मंडळी धांदरटपणामुळे किंवा अनवधानाने करतात. करतात मात्र सगळेच. ड्रायव्हिंग चं डिसिप्लीन नसणं हा एक मूलभूत प्रॉब्लेम आहे भारताचा. किंबहुना, कुठलाच नियम पाळण्याची वृत्तीच नसणं हाच प्रॉब्लेम आहे. असो. बोलावं तितकं कमीच. पण हा असला फरक करणं मात्र बरोबर नाही. महिला मंडळी सगळ्याच बाबतीत नियमाने वागतात असं नव्हे याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 06/25/2014 - 14:26

In reply to असं नाही.... by वेल्लाभट

Permalink

या सगळ्या वर नमूद केलेल्या

या सगळ्या वर नमूद केलेल्या गोष्टींपैकी अनेक गोष्टी पुरूष मंडळी मुद्दाम आणि उद्दामपणे करतात, तर महिला मंडळी धांदरटपणामुळे किंवा अनवधानाने करतात. करतात मात्र सगळेच.
अगदी हेच म्हणायला आलो होतो....! (पण समोरच्याला धोक्यांचे अवधान नसणे आणि समोरचा जाणून बु़जून धोका घेणे यातला कुठला धोका जास्त?)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/24/2014 - 22:35

Permalink

चाकामागे नाही बसलो पण

चाकामागे नाही बसलो पण चाकवाल्याच्या मागे बसलो आहे .अमकु डरायविंग नहि आना काली ऐदराबादका हिंदी आना ।ब्याटमानका मकान किदरका जी ? चांगले ड्रायविंग म्हणजे गाडी कायम गिअरमध्ये असणे .वेग अक्सेलेटरने वाढवायचा आणि गिअर वरचा टाकायचा .काही जण अक्सेलेटर दाबतात सोडतात पुसूक पुसूक गाडी चालवतात .
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/24/2014 - 22:45

Permalink

धाजण इकवेळ ठिवायला गेलो तर

धाजण इकवेळ ठिवायला गेलो तर कुणीतरी फुडं आणि कुणीतरी म्हागं पडणारच की .हे जाजसायबांनी तवाच वळकलं हुतं .तेंच्या फारमवर सर्व्या अनिमलांसाटी तसा फलेक्सच लिवून ठिवलाय .
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 06/24/2014 - 23:26

Permalink

ओ काकू, का कू न करता जरा त्या

ओ काकू, का कू न करता जरा त्या पुढच्या हायवे पर्यंत सोडता का?
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on Wed, 06/25/2014 - 00:06

Permalink

हे ड्रायवींगच्या नियमात बसतं

हे ड्रायवींगच्या नियमात बसतं की नाहि माहिती पण गाडी चालवतांना एकदम काच खाली करून किंवा दार उघडून थुंकतांना मात्र फक्त पुरूषांनाच पाहिलय... थंकतांथं
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता चौगुले on Wed, 06/25/2014 - 10:05

In reply to हे ड्रायवींगच्या नियमात बसतं by स्वप्नांची राणी

Permalink

+++१११

+++१११
  • Log in or register to post comments

Submitted by हुकुमीएक्का on Wed, 06/25/2014 - 00:27

Permalink

हा व्हिडियो पाहिल्यानंतर

        हा व्हिडियो पाहिल्यानंतर काही वेळा असे वाटते की पुरुष नक्कीच असे अपघात करत नाहीत. शक्यतो पुरुषांचे होणारे अपघात हे जास्त वेगामूळे होतात. व्हिडियो खाली पहावा. नेहमी चूक स्त्रीयांचीच असते असे नाही परंतू लेन पद्धत न पाळल्यानेच खुपदा स्त्रीयांवर ही टिका करण्यात येते की त्यांना गाडी नीट चालवता येत नाही.         आता ज्या लेन मधून ७०-८० च्या वेगाने गाडी चालवायची आहे तेथे ४० ने गाडी चालवल्यावर मागचे लोक हॉर्न वाजवणारच. आणि हे हॉर्न वाजवणारे बहूदा चारचाकी वालेच असतात कारण त्या लेन मधून सहसा दुचाकी असणारे जातच नाहीत.                      
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Wed, 06/25/2014 - 07:22

In reply to हा व्हिडियो पाहिल्यानंतर by हुकुमीएक्का

Permalink

रेव्वाकाशी बाडीस.

रेव्वाकाशी बाडीस. आता हा व्हिडिओ पाहील्यावर असे म्हणायला पाहीजे का की बायका असे अपघात कधी करत नाही :)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 06/25/2014 - 11:53

In reply to रेव्वाकाशी बाडीस. by सखी

Permalink

खालील व्हिडीओ पण पहा

खालील व्हिडीओ पण पहा http://www.youtube.com/watch?v=vRfbL6memSs
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on गुरुवार, 06/26/2014 - 05:26

In reply to खालील व्हिडीओ पण पहा by खटपट्या

Permalink

आवो मी बी हाच इडियो दिलता

आवो मी बी हाच इडियो दिलता नवता का? :)
  • Log in or register to post comments

Submitted by हुकुमीएक्का on Wed, 06/25/2014 - 22:32

In reply to रेव्वाकाशी बाडीस. by सखी

Permalink

व्हिडियो पाहून

अरेरे पुरुषसुद्धा असे अ‍ॅक्सिडेंट्स करतात हे व्हिडियो पाहून पटले. सखी म्हणत आहेत त्यातही तथ्य आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Wed, 06/25/2014 - 01:25

Permalink

शंभरीसाठी शुभेच्छा

पहिल्याच धाग्यात शंभरी जवळ पोहचल्याबद्दल अभिनंदन...
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 06/25/2014 - 02:21

Permalink

झाले का शंभर! गुड!

झाले का शंभर! गुड! लेखिकाबै, तुमच्या धाग्याची शंभरी पार करवून दिलीये, आमचा कट पाठवून द्या. आता इथला मुक्काम हलवते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Wed, 06/25/2014 - 10:35

In reply to झाले का शंभर! गुड! by रेवती

Permalink

ऑ

आज्जीबैनी सुपारी घेतली होती तर ?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/25/2014 - 12:51

In reply to झाले का शंभर! गुड! by रेवती

Permalink

हळू हळू ध्यानात येत

हळू हळू ध्यानात येत ध्याग्याची शंभरी करायच्या आयडिया ;) :) (हघ्या हेवेसांन)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/25/2014 - 12:58

In reply to हळू हळू ध्यानात येत by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

हळू हळू ध्यानात येत आहेत

हळू हळू ध्यानात येत आहेत ध्याग्याची शंभरी करायच्या आयडिया ;) :) (हघ्या हेवेसांन)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 06/25/2014 - 10:33

Permalink

तुमच्या निरीक्षणाशी सहमत.

तुमच्या निरीक्षणाशी सहमत. पुरुष बर्‍याच वेळेला बेदरकारपणे वाहनं हाकतात. पण सिग्न तोडताना बाया आणि बाप्याना सारख्याच प्रमाणात पाहीले आहे. त्यामुळं या एका निरीक्षणाशि मात्र असहमत आहे. बाकी गाडीचे जजमेंट पुरुषाना पटकन येते आणि बायका एकदम एखाद्या अरुंद जागेत गाडी घुसवायला घाबरतात हे मी स्वतः अनुभवले आहे. माझी वहीनी गाडी चालवत असेल तर शेजारी बसलेल्यास विचारते निघेल का? शक्यतो शेजारी दादाच बसतो, तो नसेल तर मी. जर हो म्हटले तर हाकते गाडी पुढे. दादा आणि वहीनी एकदम गाडी शिकले पण दादा स्वतः गाडी घेऊन कुठेही जाऊ शकतो पण वहीनीला पुण्याबाहेर गाडी न्यायची असेल तर शेजारी कोण्तरी ड्रायव्हींग करू शकणारा बसायला लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 06/25/2014 - 10:41

In reply to तुमच्या निरीक्षणाशी सहमत. by llपुण्याचे पेशवेll

Permalink

वहीनीला पुण्याबाहेर गाडी

वहीनीला पुण्याबाहेर गाडी न्यायची असेल >> ह्यासाठी वाहन चालकतेच्या कमतरतेपेक्षा आयुष्यभर जर 'तुला जमणार नाही/ तुला जमेल का/ बाईमाणसाला जमेल का' वा तत्सम झालेले मानसिक कंडिशनिंग (मराठी शब्द?) अधिक कारणीभूत असण्याची शक्यता अधिक.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: अभिशेक पाटिल 2
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:14
  • सदस्य: Abhishek C
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:05
  • सदस्य: देव@मिसलपाव
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 08:44
  • सदस्य: आम्ही कोण म्हण…
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:38
  • सदस्य: मिपाखरु
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:36

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com