Skip to main content

पुरुषांचे ड्रायव्हिंग-माझा अनुभव

लेखक anagha kulkarni यांनी मंगळवार, 24/06/2014 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा. गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चारचाकी गाडी घेवून जातेय (अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे. खरतरं रस्त्याच्या ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . लेन बदलत असताना गाडीच्या मागील बाजूस असलेला सिग्नल देणे , किंवा हात बाहेर काढून सिग्नल देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , मागच्या गाडीत असलेल्या ड्रायव्हर न काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लेन बदलणार आहेत म्हणून? यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग रस्ता स्वता:च्या मालकी हक्काचा असल्यासारखे वागतात. गाडी हळु चालवायची असेल तर यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ती सुद्धा मधल्या लेन मध्ये किंवा एकदम उजवीकडील लेन मध्ये चालवतात. जसा यांना डावीकडची लेन वापरायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि पुढच्या गाडीमध्ये फर्लांग भर अंतर नक्कीच असते. गाडी सरळ जात असताना मधेच यांना यु टर्न घेण्याची हुक्की येते. यात बसवाले, ट्रकवाले पण आले. आपण दोन्ही बाजुच्या रहदारीला अडथळा करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. दोन्हीकडची रहदारी आपल्यामुळे अडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणखी एक प्रकार म्हणजे रस्त्यावर गाडी थांबवून हुज्जत घालणे .अहो मान्य आहे गाडीला थोडासा खरचटलं असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार. यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री ड्रायव्हर आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते लेन मोडतील , आजूबाजूच्या ड्रायव्हर ना हार्ट -अट्याक देतील, पण त्या स्त्री ड्रायवर च्या गाडीच्या पुढे जातील. मी असा नाही म्हणत आहे स्त्री ड्रायव्हर गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला हौर्न वाजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 40557
प्रतिक्रिया 204

प्रतिक्रिया

>>>>ज्या लेन असतात त्या गाड्या सुरळीत पणे पुढे जाण्यासाठी असतात, आणि त्या पाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. या पाळण्यासाठी नाही तर शिस्त मोडण्यासाठी असतात. पण यांना गाडी पळवण्याची एवढी घाई असते कि ते मागे गाडी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ दुसर्या लेन मध्ये गाडी घुसवतात . अशी भांडणं (जी माझी अनेकदा होतात) ती तुम्हीच तुमच्या लेखात दिलेल्या एक-दोन कारणांमुळे होतात. एकदा हिंजवडीच्या अलिकडे एका कारने अगदी जवळून माझ्या गाडी समोर गाडी घातली. त्याला अडविले असता दिशादर्शक (इंडिकेटर) टाकला होता नं, दिसत नाही का? असा उर्मट प्रश्न केला. त्याच्या मते दिशादर्शक टाकला की आपल्याला कशीही कुठेही वळायला कायदेशीर परवानगीच आहे. चांगला कुटुंब वत्सल गृहस्थ. बरोबर त्याची पत्नी आणि मुलगीही होती. त्याला मी हिंजवडी वाहतूक पोलीस चौकीत घेऊन गेलो. तिथे पोलीसाला सांगितलं की त्याने कशी असुरक्षित मार्गिका बदलली आणि अपघात टाळण्यासाठी मला कसा कचकावून गतिरोधक (ब्रेक) दाबावा लागला. त्यावर त्याला समजावून सांगण्या ऐवजी त्या पोलीसाने त्या कुटुंबाला 'तुम्ही जा साहेब, मी बोलतो ह्यांच्याशी' असे सांगून सोडून दिले आणि 'अपघात झाला का?' असे मलाच विचारले. मी म्हंटले पण, 'अहो, दुर्घटना घडल्यावरच पोलीसात जायचं का? दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणं चालकाचं कर्तव्य नाही का? तो जर तशी काळजी घेत नसेल तर तो चालक अपघाताला निमंत्रण देऊन, नियम पाळत वाहन चालविणार्‍या इतर निष्पाप चालकांच्या आयुष्याशी खेळत नाही का?' असे म्हंटल्यावर तो पोलीस म्हणतो, 'तुम्ही म्हणता तसं झालं तर रामराज्य येईल. आमची गरजच काय?' मार्गिका बदलण्यासाठी वाहतूक खात्याचे कांही ठोस नियम आहेत. त्या पोलीसाची त्याच्या वरीष्ठांकडे तक्रार करावी असा विचार मनात आला होता पण काळ उलटल्यावर आपला राग कमी होतो, तक्रारींचा कांही परिणाम होत नाही आणि वरीष्ठाच्या वाहतुक सुरक्षेच्या ज्ञानाविषयी असलेली साशंकता ह्यामुळे तो प्रसंग तिथेच आटोपला. >>>> पण हे गाडी जीथल्यातीथे थांबवणार, गाडीतून उतरणार अन्ही मागच्या गाडीवाल्याशी किंवा रिक्षावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या गाड्या आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी लेन थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. गाडी बाजूला घेवून मगं भांडाना चर्चा करून कांही होत नाही, पोलीसात जाऊन कांही होत नाही. अवजड वाहनांना चढणीवर उभे करून नंतर आपण निघून जावे आणि त्याला ते भरलेले वाहन घाटात चढविण्यासाठी त्रासदायक व्हावे एवढेच आपण करू शकतो.

पुरुष काय किंवा स्त्री काय, पुण्यात वाहतुकीचे नियम पाळून आणि आपल्या बेदकारपणे वाहन चालवण्याने आपल्याबरोबर इतरांचेही जीव धोक्यात येऊ शकतात याची जाणिव ठेवणारे वहनचालक विरळाच.

युगप्रवर्तक चेसुगुंची आठवण झाली ..

अशीच स्थिती दिल्ली दरबार च्या सिग्नल पासुन ते डोंगरी पर्यंतच्या रस्त्यावर असते. सिग्नल असुन नसल्या सारखा, कोणी कशी हि गाडी नेतात त्यात तर बाईक स्वार तर सगळे "धुम" शान मध्येच. पोलिस हि या एरिया मध्ये दुर्लक्ष करतात कारण अल्पसंख्याक इथे जास्त प्रमाणात. पोलीसावरही हाथ उचलायला कमी करत नाहीत. इथुन स्टेशन पर्यंत चालत जायचे कधी म्हंटले तरी जीव मुठीत घेऊन जावे लागते कारण स्त्री पाहिली कि कट ठरलेला.

In reply to by भावना कल्लोळ

स्त्री पाहिली कि कट ठरलेला.
ही मनोवृत्ती पुरुषांच्या सुप्त भीतीतून येते. "व्हाट डज् एव्हरी पॉवरफुल मॅन वॉण्ट? मोर पॉवर." असे आहे ते. ह्याचेच सामान्यीकरण करायचे झाले तर नियम तोडून गाडी दामटणे ह्यात आपले कोणी वाकडे करू शकत नाही हे इतर वाहनचालकांना दाखवून देणे आणि त्यातून स्वतःचे तथाकथित सामर्थ्य/वर्चस्व/नियंत्रण पडताळून पाहणे हा उद्देश असतो. अरुंधती रॉय यांना ढोबळमानाने उद्धृत करायचे झाले तर 'द स्ट्रॉन्ग हॅव मोर फीअर ऑफ द वीक, बिकॉज दे थिंक द वीक विल अल्टीमेटली गेट स्ट्रॉन्ग.' (वाक्य नीट आठवत नाही.)

In reply to by बॅटमॅन

आज सकाळचाच प्रसंग !! बर्‍यापैकी लहान गल्लीत एक काकू कार चालवत समोरुन येत होत्या. हॉर्न देऊनही त्यांची गाडी माझ्या दुचाकीच्या दिशेने वळतेय हे पाहिल्यावर मी बाईक थांबवली. कार जवळ आल्यानंतर कळलं त्या काकू उजव्या हातात मोबाईल धरुन तो डाव्या कानाला लावून मोबाईलवर बोलत होत्या आणि डाव्या हाताने स्टेअरिंग सांभाळलं होतं. आता धागा वाचल्यावर मला हे लक्षात येतंय की चूक त्या काकूंची नव्हती. तो आलेला कॉल जर एखाद्या पुरुषाचा असेल तर ती त्याची चूक होती तो जर पुरुषेतर कोणाचा असेल तर 'मी' दोनदा हॉर्न दिल्यामुळे काकू बावचळल्या असं म्हणावं लागेल. थोडक्यात काय, चूक त्यांची नव्हतीच. ;)

In reply to by सूड

अगदी अगदी. तुझीच चूक रे सुडक्या =)) काकूंचा काय दोष? आरामात फोनवर बोलत होत्या ते दिसलं नै ते नै, वर आणि हॉर्न मारतोस? कुठं फेडशील ही पापं =))

In reply to by बॅटमॅन

तुमच्या दुचाकीला रिवर्स गियर नव्हता, नव्हता तर तुम्ही खास बनवून घेतला नाही, किमानपक्षी दुचाकी पायाने ढकलत ढकलत मागे जाण्याचा क्षीण प्रयत्न केला नाही, वगैरे वगैरे...

In reply to by एस

अन सर्वांत मोठे पाप म्हणजे त्या काकू होत्या हे पाहिल्यावरही हॉर्न मारण्याचे डेरिंग केले. काका असते तर चाललं असतं, पण काकू दिसताहेत अन तरी हॉर्न? उद्धटपणाची कमालच झाली ही तर!

In reply to by बॅटमॅन

काहीही करा अथवा न करा, प्राईम सस्पेक्ट इन द सो कॉल्ड क्राईम नेहमी तुम्हीच.

In reply to by एस

अर्थातच. शिवाय काही बोललं तर स्त्रीद्वेष्टेपणाचा (साला हा लय पापिलवार चलनी सबुद है आजकालचा) शिक्का तर आहेच.

In reply to by बॅटमॅन

एका बाईक च्या मागे लिहिले होते
महिला ड्रायव्हर म्हणजे आकाशातले तारे, ते तुम्हाला दिसतात पण त्यांना तुम्ही दिसालच याची खात्री नाही

In reply to by दिनेश सायगल

"स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी" म्हटले की "पुरुषांना नावे ठेवण्यासाठी" हे अध्याहृतच आहे ओ.

In reply to by टवाळ कार्टा

शक्यता नाकारता येत नाही..यद्यपि प्रथमहस्ती विदा नसल्याने तूर्त सर्वार्थ साधणारी गुळणी ऊर्फ मौन धरून बसलो आहोत.

म्हटले होते की नाही १०० कुठेच गेले नाहीत

अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी
ह्याबद्दल पण बोला म्हणजे लेखात नमूद केलेल्या तुमच्या निरीक्षणांबरोबर तुलना करता येईल. की फक्त दुसर्‍यांनाच नावं ठेवायची? माझं निरीक्षणः १. स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी पुरुषांना नावे ठेवण्यासाठी काढलेला धागा. - श्रेयअव्हेरः दिनेश सायगल. २. स्वतःकडे चारचाकी असल्याची जाहिरात.

In reply to by शिद

क्या तोबी बोलरा इन्हे! धागा बोल्ता, ये मरद लोगां कैसा ड्रायविंग करते बोलके लिखने होना. उस्मे जित्ती जित्ती गल्ति होती, सब्बिच मरद लोगोंकी आउर खाला लोगां जो करते उसका बी जिम्मेदारी मरद लोगोंकाइच! अब ऐसे बोल्ते तो तुम क्या तो बी बोलरा रे? पयलेइच बोला ना सब गलती मरद लोगांच करते, औरतानको नक्को बोल करके? खुंदल खुंदल के ड्रायविंग करे तोबी गलती, हल्लू हल्लू गाडी मारे तोबी गलती! ठोका तोबी गलती, नै ठोका तब्बी गलतीच!! आउर दूसरा सोचो नक्को तुम!

In reply to by शिद

"अर्थात माझं ड्रायव्हिंग हा विषय परत कधीतरी" ह्याबद्दल पण बोला म्हणजे लेखात नमूद केलेल्या तुमच्या निरीक्षणांबरोबर तुलना करता येईल. की फक्त दुसर्‍यांनाच नावं ठेवायची?
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं पाहायचं वाकून. :D

ते उजवीकडे सिग्नल देऊन डावीकडे वळणं किंवा उलट याबद्दल कसे कुणी अजून लिहिले नाही? :)

आता माझा कालचाच अनुभव सांगतो : संध्याकाळच्या वेळेला घरी येत होतो , हिंजवडी चौकाचौनेहमीप्रमाणेच भयंकर टृअ‍ॅफीक होते, पण दोन कार च्या मधे जी स्पेस होती त्यातुन मला पटकन माझी बाईक काढुन पुढे जाता आले असते ...पंण त्या मागची कार मॅडम चालवत होत्या ... मी मधुन जाणार असे लक्षात आलायावर लगेच गाडी पुढे घेतली आणि म्हणालाय "नो" ( हे मी लिप्स रीडींग वरुन ओळखलं )... शुध्द देशी आडगेपणा !! आता खरंतर , बाईकवाले असे बाईक बाजुला काढुन चारचाकी गाड्यांना रस्ता रिकामाच करुन देत असतात , पण ह्या मॅडमना ते मान्य नव्हतं मग काम मी बाजुने बाईक काढली , पुढे मोकळा रस्ता होता तरी मुद्दाम मॅडमच्या गाडी पुढे जाऊन थांबलो ... सिग्नल सुटला तरी थांबलो , हॉर्न वाजवत होत्या तरी थांबलो . "कफ यु " म्हणण्याचा आणि मध्यमाअंगुली निर्देश करण्याचा अनावर मोह होत होता पण घरच्या संस्कारांना जागुन तो आवरला ... अवांतर : आता ह्या असल्या अडग्या लोकांवर अजुन एक अभिनव प्रयोग करायचे ठरवले आहे ... एक काळी बाहुली विकत घेवुन सोबत ठेवणार आहे अन असला कोणी आडगे पणा केला की फक्त एका चिठ्ठीवर नंबर लिहिलाय असे दाखवायचे अन ती ती चिठ्ठी काळ्या बाहुलीला टोचायची अन मग ती काळी बाहुली असल्या लोकांसमोर नाचवायची :D (असले लोक आधीच घाबरट असतात त्यांच्याबर काही सायकॉलॉजिकल परिणाम होतो का ह्याचा अभ्या करता येईल ह्या निमित्ताने =)) )

अनघा तै.. शक्य तेवढी मदत केली आहे.. योग्य दिशेने वळवला आहेच.. मंडळी (नेहमी प्रमाणे) पेटली आहेतच.. उद्या सकाळ्पर्यंत धागा (राहिलाच तर) १-२ शतकं पार करुन गेला असेल.. तेवढं आमच्याही धाग्यावर यायचं लक्षात ठेवा बरं का!! संपादकांना रात्रपाळीसाठी शुभेच्छा!!

In reply to by पिलीयन रायडर

धागा (राहिलाच तर)
गर्भित धमकी नोंदवल्या गेली आहे...शेवटी मोर ईक्वल असल्यावर हे चालायचंच म्हणा.

धमाल फक्त धमाल. बाकी आजकालच्या मुली (बाप्येही) बिगर गिअरच्या स्कुट्या अ‍ॅक्टीव्ह्या सुझुक्या भरधाव वेगाने घेवून जातांना त्याच्या अज्ञानाची किव करावी वाटते.

In reply to by पाषाणभेद

पाभे , ह्या निमित्ताने एखादी लावणी/ भारुड / होवुन जाऊ दे , बरेच दिवसात तुमचे काही लेखन वाचनात आलेले नाहीये , आज बरेच दिवसांनी दिसलात ... त.टी मी तुमच्या कवितांचा लई मोठ्ठा फॅन आहे :)

बाई, पुरुष असा काही चालवण्यातला फार फरक मला तरी आढळला नाही ब्वॉ! आपल्या वाहनाच्या मागे ठराविक अंतर ठेवून अनेक मैल कोणी येत असलं तर सहज ओळखवं की ड्रायव्हर किंवा ड्रायव्हरीणबाई (मुद्दाम लिहिलेय तसे) फोनवर बोलत बोलत येतायत व आपल्या गाडीचा सहारा आहे. गाडी मध्येच तिरकी जाऊन एकदोनदा सरळ केली म्हंजे मनुष्य (बाई/ पुरुष) टेक्स्टींग करतायत. लाल दिव्याला उभे असलेले वाहन हिरव्या दिव्याला जरा उशिराने हलले आणि लगेचच्या लाल दिव्याला थांबायची घाई असली की बाई असल्यास बरेचदा मेक अप चाललेला असणे, पुरुष असेल तर गाडीतील कचरा उचलून ट्रॅश ब्याग भरायची वेळ असते. हायवेला बुंगाट जाणार्‍या गाड्या एकदम सुतासरख्या सरळ झाल्यास पुढे मामारावांची स्वारी दिसणे, कोणालातरी पकडलेला असणे यातील एक किंवा दोन्ही गोष्टी असल्याचे निदर्शक! दोन अठवड्यांपूर्वी एक १८ चाकी बंब्या ट्रक आडवा झाला होता. रस्त्यात सगळी ट्रकमधील बॉक्सेस पसरली, काचा फुटल्या व पोलीसकार्य चालू होते. मुलांच्या शाळा सुटण्याची वेळ झाल्याने आम्हा सर्व पालकांना पोहोचण्याची घाई झाली होती. चालू असलेल्या एकाच लेनमधून जाताना सगळे बाई किंवा पुरुष नव्हते तर फक्त पालक होते. मध्ये जिथे पूर्ण थांबावे लागले तिथे सर्व बाया व पुरुषांनी हात मोकळे फोन फिरवून आपापल्या मुलांना कळवले की उशीर होतोय. तरण्या मुलींनी मेक अप व मुलांनी टेक्सटींग सुरु केले. त्यातूनही जे काही किंचित फरक दिसतात ते तसेच असू द्यावेत तर मजा आहे. नैतर धाग्याला विषय कसे मिळणार? न्यूजर्सीच्या वाटेवर एक बाई मुरांब्यामधून हळूहळू चालवताना सुकाणूवर पुस्तक ठेवून वाचत चालली होती तर एक बुवा सुकाणूवर नकाशा पसरून चालवत होता. कुठला आलाय डोंबलाचा फरक? दोन वेगळे (पण तसे नैसर्गिक) अनुभव म्हणाजे वाहतुकीच्या मुरांब्यात वृद्धांना नैसर्गिक बोलावणे धरवत नाही तेंव्हा नाईलाजाने ते बाजूच्या जंगालात जातात. आपणाही कधीतरी त्या वयात असणार आहोत ही जाणीव ठेवणे महत्वाचे. दुसर्‍या अनुभवात एक बाई भयंकर जोरात गाडी वळवून एका मोडक्या घरापाशी थांबली व माझ्या गाडीच्या पुढे गाडी घातली तिने. मलाही करकचून थांबावे लागले. तिने पटकन गाडीचे दर उघडले, तान्ह्या बाळाला कारसीटमधून काढले आणि आधी त्याला पाजायला सुरुवात केली. ते रडणे थांबल्यावर मला कल्पना आली. त्यावेळी कोणीही पुरुष तिथे निरिक्षण शक्ती पणाला लावत बघत बसले नव्हते हे महत्वाचे! भारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?

In reply to by रेवती

बरेच फरक आहेत ... बारीक निरीक्षण केल्यास लक्षात येतील ... माझ्या निदर्शनास आलेले हे काही १. बायका गाडी थांबवायची असल्या विमानाची चाके बाहेर येतात तसे दोन्ही पाय बाहेर काढतील ...पुरुश दोनचाकी गाडी थांबवायची असल्यास कायम डावाच पाय पाय जमीनीवर टेकवतील ( मग ते अ‍ॅक्टीव्हा चालवत असले तरीही ) २. पुरुश गाडी चालवताना नेहमी ऑप्टीमम / फ्युएल एफिशियंट वाट काढतील , बायका सहसा कंफर्ट वर भर देतील . ३ पुरुषांन सिग्नल तोडायला आवडेल पण पण लईच हाय ऑन अ‍ॅड्रीनॅलीन असतील तेच सिग्नल तोडतील , बायकांना कदाचित सिग्नल पाळायला आवडेल पण सिग्नल सुटल्यावरही मागुन चार वेळा हॉर्न वाजल्या शिबाय हलणार नाहीत . ४. चारचाकी गाड्यां मधे पुरुष कधीच मान उंच करुन रस्ता पाहण्याचा प्यत्न करणार नाही , बायका मात्र कायम कायम मान उंचावुन चेक करत राहतील (पुढचे चाक पंक्चर आहे काय हे पाहण्याचा प्रयत्न करत असतात की काय देव जाणे ) बरेच आहेत फरक ...

In reply to by प्रसाद गोडबोले

पण हे सगळे सर्वांच्याच बाबतीत असेल तर नावे ठेवण्यात हाशील नाही ना! तिथे शेजार्‍यांच्या काकू असोत नाहीतर तुमची पत्नी, मुलगी असोत. ते असेच करणार. बरेचदा परिस्थिती अशी असते की त्या जागी फक्त मनुष्यप्राणी उरतो. बाई पुरुष असे ठ्सठशीतपणे न राहता! किंचित नैसर्गिक फरकांपलिकडे जाण्याचा प्रयत्न मी केलाय. यात ना पुरुषांना नवे ठेवत ना स्त्रीयान्ला! तुमचा स्वत:च मुलगा आणि मुलगी यात फरक असणारच्चे. मुले अस्तील तर त्यांच्या वागणुकीतून कळले असेलच, नसतील तर भविष्यात कळेल (अशी आशा). शाळेच्या सहलीचा अपघात, शाळेत गोळीबार झाल्यावर तातडीने तिकडे गाडी काढून पळणारे पालक हे आई, वडील यातील नैसर्गिक फरकामुळे वेगळ्या प्रतिक्रिया देतीलच पण काळजीने धाव ज्या प्रकारे घेतील ती एका मनुष्याला आपल्या बाळाची वाटणारी काळजी असेल. नियम न तोडण्याची शिकस्त करत गाडी पळवणे वगैरे प्रकारांचा विचार करून पहा! काये ना, रोजच्या गाडी चालवण्यापलिकडे आयुष्यात बर्‍याच गोष्ती आहेत, बाईने मान उंचावून बघितले की पुरषाने एक पाय टेकवला यात मला खरेच इंतरेस्ट नाही. अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. बायकांना वेगळ्या गोष्टींची काळाजी करावी लागते तर पुरुषांना आणाखी वेगळ्या, कधीकधी दोघांनाही घर चालवण्याची भ्रांत पडलेली असते. ते बॉडीलँग्वेजमधून दिसते एवढेच. त्यातून काही अपघात घडत नसतील असे नाही, असतीलच, अडचणीही येत असतील पण त्यासाठी एकट्या बाईला किंवा पुरुषाला वेगळे काढणे जमणार नाही.

In reply to by रेवती

काये ना, रोजच्या गाडी चालवण्यापलिकडे आयुष्यात बर्‍याच गोष्ती आहेत, बाईने मान उंचावून बघितले की पुरषाने एक पाय टेकवला यात मला खरेच इंतरेस्ट नाही.
ओके , मग तुमचे आधीचे अर्ग्युमेन्ट की "स्त्री पुरुषांच्या ड्रायव्हिंग मधे तसा काही फरक नसतो" हे "लॉजिकली" चुकीचे आहे ... तुर्तास इतकेच म्हणतो !! फरक असतोच आणि त्याचा इतरांना अनुभवही येतो पण तुम्ही फरक मानत नाही इतकेच !! ह्या लॉगिकने तर मग कोणातच काहीच फरक नसतो असेही म्हणता येईल :)

In reply to by प्रसाद गोडबोले

किरकोळ गोष्टी आहेत या, याची चर्चा करण्यात वेळ घालवणार नाही. टंकाळा हेही कारण आहेच. काल लै टंकलय.

In reply to by रेवती

त्यावेळी कोणीही पुरुष तिथे निरिक्षण शक्ती पणाला लावत बघत बसले नव्हते हे महत्वाचे! भारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?
चला, नविन मुद्दा. निवासी विरुद्ध अनिवासी. होऊ दे दंगा.

In reply to by रेवती

...त्यावेळी कोणीही पुरुष तिथे निरिक्षण शक्ती पणाला लावत बघत बसले नव्हते हे महत्वाचे! भारतात अश्या परिस्थितीत काय केले असते? हे चुकून "महाभारतात अश्या परिस्थितीत काय केले असते?" असे वाचले :) त्यामुळे जिज्ञासा जागी झाली... खरंच, महाभारताच्या काळी रथ चालवायचे आणि ओव्हरटेक करायचे (विशेषतः युद्धभूमीवर) काही नियम होते काय? जाणकारांच्या प्रतिक्षेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकतर आखाती धागे काढून, जास्त माहिती देऊन तुम्ही मला त्यांचा हेवा वाटवलाय. इथं ड्रायव्हिंग करून भयानक कंटाळा आलाय आणि तिकडे बायकांना परवानगी नाही म्हणे! अरे, हवीय कोणाला स्त्रीमुक्ती? ;) गाडी माझी आणि एक ड्रायव्हर! मज्जाए! येत्या ३ दिवसात मी कमीतकमी दीडशे मैल डाईव्ह करणारे, त्यानंतरच्या अठवड्यात किमान २०० मैल! आणि मला म्हणतात सगळेजण की हिला फिरायला आवडत नाही. अरे, काय फिरणार?

मला कुणाच्याच ड्रायव्हिंग बद्दल बोलायचं नाही. पण मी कधीकाळी ड्रायव्हिंग शिकलो तेंव्हा आमच्या ट्रेनर ने जे मौलिक विचार ऐकवले ते लिहित आहे. ' रास्तेमें कोई गाय, भैंस या औरत आयेगी ना, तो कभीभी उसके पीछेसेही निकलनेका !'

In reply to by तिमा

अगदी असेच मला हैदराबादेच्या ट्रेनरने शिकिवले. "अम्मा, रास्तेमे औरत लोगां चार चार बच्चे लेके क्रास करतें, तब रुकना पडता पर आदमी लोगांके लिये हारन (हॉर्न) मारे तो ब्बी नै हिलते" मला त्याने सांगितल्याप्रमाणे किंवा आणखी वेगळेही अनुभव आलेत.

चांगलं आणी रद्दड ड्रायव्हींग करणारे पुरूष असतात आणि बायकाही. फरक इतकाच की रद्दड ड्रायव्हींग करणारा मुलगा आईच्या वळणावर गेलेला असतो आणि चांगलं ड्रायव्हींग करणारी मुलगी बाबांच्या ! ;-)

In reply to by मराठे

फरक इतकाच की रद्दड ड्रायव्हींग करणारा मुलगा आईच्या वळणावर गेलेला असतो आणि चांगलं ड्रायव्हींग करणारी मुलगी बाबांच्या
यावरुन काही आठवलं... नवीनच नोकरीस रुजू झालो होतो, पहिली दुचाकी (बाईकच्या जमान्यात स्कूटर) घेतली होती. मी आणि बाबा आपापल्या कंपनीत रात्रपाळी करुन आपापल्या स्कूटरवर परतत असताना मी बाबांना बुंगाट ओवरटेक केली. नंतर बाबांनी आईला ऐकवले. "तो कसा रॅश चालवत होता " पासून चालू झालेली गाडी मग "तु लाडावले आहेस त्याला.." वगैरे पर्यंत आल्यावर मग आईनेही उत्तर दिले "पण त्याला गाडी चालवायला मी नाही ना शिकवले..."

असं मुळीच नाही. जनरलाईझ करणं चुकीचं आहे. एवढंच आहे की या सगळ्या वर नमूद केलेल्या गोष्टींपैकी अनेक गोष्टी पुरूष मंडळी मुद्दाम आणि उद्दामपणे करतात, तर महिला मंडळी धांदरटपणामुळे किंवा अनवधानाने करतात. करतात मात्र सगळेच. ड्रायव्हिंग चं डिसिप्लीन नसणं हा एक मूलभूत प्रॉब्लेम आहे भारताचा. किंबहुना, कुठलाच नियम पाळण्याची वृत्तीच नसणं हाच प्रॉब्लेम आहे. असो. बोलावं तितकं कमीच. पण हा असला फरक करणं मात्र बरोबर नाही. महिला मंडळी सगळ्याच बाबतीत नियमाने वागतात असं नव्हे याची नोंद घ्यावी.

In reply to by वेल्लाभट

या सगळ्या वर नमूद केलेल्या गोष्टींपैकी अनेक गोष्टी पुरूष मंडळी मुद्दाम आणि उद्दामपणे करतात, तर महिला मंडळी धांदरटपणामुळे किंवा अनवधानाने करतात. करतात मात्र सगळेच.
अगदी हेच म्हणायला आलो होतो....! (पण समोरच्याला धोक्यांचे अवधान नसणे आणि समोरचा जाणून बु़जून धोका घेणे यातला कुठला धोका जास्त?)

चाकामागे नाही बसलो पण चाकवाल्याच्या मागे बसलो आहे .अमकु डरायविंग नहि आना काली ऐदराबादका हिंदी आना ।ब्याटमानका मकान किदरका जी ? चांगले ड्रायविंग म्हणजे गाडी कायम गिअरमध्ये असणे .वेग अक्सेलेटरने वाढवायचा आणि गिअर वरचा टाकायचा .काही जण अक्सेलेटर दाबतात सोडतात पुसूक पुसूक गाडी चालवतात .

धाजण इकवेळ ठिवायला गेलो तर कुणीतरी फुडं आणि कुणीतरी म्हागं पडणारच की .हे जाजसायबांनी तवाच वळकलं हुतं .तेंच्या फारमवर सर्व्या अनिमलांसाटी तसा फलेक्सच लिवून ठिवलाय .

हे ड्रायवींगच्या नियमात बसतं की नाहि माहिती पण गाडी चालवतांना एकदम काच खाली करून किंवा दार उघडून थुंकतांना मात्र फक्त पुरूषांनाच पाहिलय... थंकतांथं

        हा व्हिडियो पाहिल्यानंतर काही वेळा असे वाटते की पुरुष नक्कीच असे अपघात करत नाहीत. शक्यतो पुरुषांचे होणारे अपघात हे जास्त वेगामूळे होतात. व्हिडियो खाली पहावा. नेहमी चूक स्त्रीयांचीच असते असे नाही परंतू लेन पद्धत न पाळल्यानेच खुपदा स्त्रीयांवर ही टिका करण्यात येते की त्यांना गाडी नीट चालवता येत नाही.         आता ज्या लेन मधून ७०-८० च्या वेगाने गाडी चालवायची आहे तेथे ४० ने गाडी चालवल्यावर मागचे लोक हॉर्न वाजवणारच. आणि हे हॉर्न वाजवणारे बहूदा चारचाकी वालेच असतात कारण त्या लेन मधून सहसा दुचाकी असणारे जातच नाहीत.                      

In reply to by हुकुमीएक्का

रेव्वाकाशी बाडीस. आता हा व्हिडिओ पाहील्यावर असे म्हणायला पाहीजे का की बायका असे अपघात कधी करत नाही :)