अज्जुका यांची 'बिघडलीये काच' बघून अचानक आम्हाला कवितेच्या दोन-दोन प्रतिमा दिसायला लागल्या आणि मग दुसरी प्रतिमा टंकण्याखेरीज प्रत्यवाय उरला नाही! B)
भलताच जाच घडलाय.
दोन काव्यबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
दुसरं डोळे वटारणारं.
विडंबन केलेल्या
कवितेच्या कवीच्या डोळ्यांसारखे
कवीचेच डोळे
विडंबनात दिसत रहातात.
मी समजावत रहातो स्वतःला.
कुणाचं कोण..
एखादी मंद आठवण..
एक गम्मतकाव्य..
जुन्यानव्या कविता सोलून त्यावर..
विडंबकाची गुजराण...
सगळं सगळं
त्या डोळ्यात टिपलं जातं.
मी समजावत रहातो..
कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात
खरंच
भलताच हा जाच
संपवलाच पाहिजे!
चतुरंग
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3667
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास, रंगाबापू झकास!!
हाहाहाहा...
+१
In reply to हाहाहाहा... by बेसनलाडू
चांगला चेंडू येईपर्यंत वाट बघावी लागते बाबा!
In reply to हाहाहाहा... by बेसनलाडू
दोन्ही..
हेच..
In reply to दोन्ही.. by प्राजु
आप महान हो!
आयला
जबरदस्त
पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन
रंग्या रंगला रे
>कवितेच्या
माझा 'भलताच जाच'