Skip to main content

(भलताच जाच!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 15/10/2008 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
अज्जुका यांची 'बिघडलीये काच' बघून अचानक आम्हाला कवितेच्या दोन-दोन प्रतिमा दिसायला लागल्या आणि मग दुसरी प्रतिमा टंकण्याखेरीज प्रत्यवाय उरला नाही! B) भलताच जाच घडलाय. दोन काव्यबिंबं दिसतात हल्ली. एक साधंच दुसरं डोळे वटारणारं. विडंबन केलेल्या कवितेच्या कवीच्या डोळ्यांसारखे कवीचेच डोळे विडंबनात दिसत रहातात. मी समजावत रहातो स्वतःला. कुणाचं कोण.. एखादी मंद आठवण.. एक गम्मतकाव्य.. जुन्यानव्या कविता सोलून त्यावर.. विडंबकाची गुजराण... सगळं सगळं त्या डोळ्यात टिपलं जातं. मी समजावत रहातो.. कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात खरंच भलताच हा जाच संपवलाच पाहिजे! चतुरंग
लेखनविषय:

वाचने 3667
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मूळ कविताही छान आहे आणि विडंबनही मस्त जमलंय... मी समजावत रहातो.. कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात :))

बरेच दिवस नॉन-स्ट्रायकर् म्हणून उभे होतात काय? आज स्ट्राइक् मिळालाय ;) आणि लगेच चौकार! हाहाहा ... आवडला फटका .. लगे रहो (प्रेक्षक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

हेच म्हणतो ! चतुरंग फॉर्मात आले आहेत ! :-) उत्तम विडंबन !

In reply to by बेसनलाडू

हल्ली बरेच सरपटी येतात त्यामुळे उचलून मारता येत नाही! ;) (आजूबाजूच्या मैदानांवर सुद्धा बघून आलो मी ;) ) हा भन्नाट हाफव्हॉली होता! :) चतुरंग

एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

एकदम खास.. निरजाच्या कवितेइतकचं विडंबनही खास.. प्राजुसारखेच म्हणते. स्वाती

आयला रंग्या! तुझ्या विडंबनाचा हा भलताच जाच देखील आम्हाला आवडला.. :) छ्या! रंग्या तूदेखील अंमळ वेडझवाच विडंबनकार आहेस.. :) तात्या.

कविता ही छान व विडंबन तर लै भारी! अवांतर : कोण म्हणालं कविता छान का जे काय म्हणायचंय ना ते तिथेच सरळ म्हणा ना. इतर ठिकाणी कशाला? :-)

पहिल्या दर्जाचे आणि महत्त्वाचे विडंबन. हे काव्य कळूनदेखील भारी वाटते आहे. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आता एखादी हाफ व्हॉली दिसली की रंग्याच्या विडंबनाची उत्सुकता असते :) ---------- अवांतर >> "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" नशीब धम्मकलाडूने "तुझं वजन किती? तू चरतोयस किती?" असं नाही विचारलं. ;)

>कवितेच्या कवीच्या डोळ्यांसारखे >कवीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात सुंदर विडंबन.. आवडले. --लिखाळ.

सहन करुन(ही) दाद देणार्‍या रसिकांचे आभार! ;) चतुरंग