Skip to main content

कावळा बायकांनाच का शिवतो?

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 14/06/2014 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे. कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले! मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते. नोकरीला लागल्या नंतर सुरुवातीच्या काळात मी कधीतरी शेव्हींग किट, तेल, साबण आणायला जात असे.एकदा गेलो असता एका सुंदर पॅकेट वर नजर पडली. 'ये क्या है? 'नैपकिन सरजी' काऊंटरवरील एयरमनने माहिती पुरवली. 'जरा एक निकालना' माझी फ़रमाईश. 'सिंगल पीस नही पूरा पैकेट लेना पडेगा ' चेहऱ्यावर वैताग दाखवत तो म्हणाला. अशा काउंटर ड्यूटीमुळे परेशान एयरमन मनात म्हणत असावा की माझे काम विमान दुरूस्त करायचे सोडून मी इथे कँटीनमधे आलेल्यांच्या फालतू विचारणात का वेळ घालवतोय?' 'ठीक एक पॅक देना 'मी ऑर्डर दिली. त्याच्या शेजारच्या काउंटरवरील एक सीनियर सरदारजी 'चीफी उर्फ फ्लाइट सार्जेंट' म्हणाला,' सर, मॅडम नहीं आई? 'मॅडम क्या खाक आएगी! अभीतक मेरे घर बारात नही आयी है' मी सरदारजीला दमात घेत म्हटले. "सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे। दबक्या आवाजात सरदारजींनी पुरूषी सीनियारटी दाखवत दटावले. कधी कधी पँटचे झीप नीट बंद नाही असे दाखवून दिल्याबद्दल ओशाळलेला चेहरा होतो तसा करत मी परतलो. कावळा शिवल्यावर पुढे पुढे या पैकेट्सचे ढीग घरी येऊ लागले तशी हळू हळू उत्सुकता मावळली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 39494
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

इथे नाने, माकु आणि बरेच लोक नको इतका चावुन चोथा करतात...ते अजुन आहेत की...चायला आम्हीच कोणतं घोडं मारलय :)

In reply to by राजेश घासकडवी

अहो तुम्हांला इतकंही कळत कसं नाही? हे विषय का गंमतीचे असतात? किमान ४ चमचे एरंडेल मारल्याशिवाय अशा विषयांवर एक तर चर्चाच संभवत नाही. त्यातून पुरुषांनी अशा बायकांच्या रिझर्व्ह विषयांवर, तेही मजेमजेत चर्चा करणे म्हणजे पंचमहापातकांच्या बरोबरीचे महापापच म्हटले पाहिजे. इतकं असूनच्या असून आणि वर म्हणता 'भावना का दुखावून घेता'? हैट आहे.

In reply to by टवाळ कार्टा

गंभीर विषयामध्ये अवांतर करत असल्याबद्दल क्षमस्व.. पण हे चहाटळ म्हणजे नक्की काय हो ? जल्ला चहा आठवतो नेहमी.. :)

In reply to by बॅटमॅन

हॅ हॅ हॅ .. सर्वसाधारण अर्थ ठाऊक आहे हो.. परंतु 'चहा' 'टळ' या शब्दाची व्युत्पत्ती , आणि अर्थाशी संबंध लागत नाही म्हणून प्रश्न .. धन्स, त्वरित उत्तर दिल्याबद्दल धन्स..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मम्मट आणि अभिनवगुप्त या दोघांनीही चहाटळ या शब्दाची उपपत्ती दिलेली आहे: मरहट्ट देशातील पुण्यपत्तनस्थ नगरीतील सत्व-शिव या पेठिकेतील अभिजन हे त्यांचेकडे कुणी अतिथि आलेला असता, चहाटळ चहाटळ असे म्हणतात, आणि आतल्या कक्षात जातात. याचा अभिप्राय असा, की आम्ही चहा नामक कषायपेय प्राशन करण्यास आत जात आहोत, तस्मात तुम्ही येथून सत्वर गमन करावे.

In reply to by चित्रगुप्त

हाण तेज्यायला.. चित्रगुप्तकाकांचा जब्र्या सिक्षर!!!!

In reply to by यशोधरा

यशोधराशी सहमत आहे. विषय असा आहे की संयमीत प्रतिसाद असतील तर तो 'मौज-मजा' कडे झुकावा पण ताळतंत्र सोडल्यास, जसे कांही जणांनी सोडले आहे, धागा बिभत्सतेकडे झुकू शकतो. कांही अंशी तो तसा झाला आहे. दुर्दैवाने दोन्ही कडून प्रतिवाद करता येऊ शकत असल्याने विरोधाच्या मूळ हेतूचे गांभिर्य राहणार नाही आणि उगाच मनस्ताप मात्र वाट्याला येतो. आता समाज जास्त पुढारला आहे, ओळखिच्या मिश्र गर्दीत कांही प्रमाणात विनोद कथनात ढिलाई आली आहे. तरीपण अनोळखी मिश्र गर्दीत अजूनही आपण शिष्टाचाराच्या मर्यादा पाळतो. मला वाटतं, यशोधराला हेच म्हणायचे आहे की संस्थळावर जरी आपण एकमेकांना नांवाने ओळखत असू तरी तेवढी मोकळीक घेऊ नये जेणे करून कांही सद्स्यांना अवघडल्यासारखे वाटू शकेल. प्रत्यक्ष भेटीत आपल्या मैत्रीच्या घनिष्टतेला अनुसरून आपण शिष्टाचारांचे पालन करावे किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न असतो पण संस्थळावरील प्रत्येकाशी आपली मैत्री तितकी घनिष्ट नसल्याने सर्वांना रुचेल असेच वर्तन असावे. माझ्या मतांशी सर्वच जणं सहमत असतीलच असे नाही. संस्थळावरील मागिल सर्व अनुभव विचारात घेता 'असहमत' सदस्यच जास्त असण्याची शक्यता आहे. पण मत मांडावेसे वाटले ते मांडले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हा विषय विनोदाचा असु शकत नाही.मिपावर बर्‍याच वेळा अशा लेखांच्या प्रतिक्रियांआडुन लोक आपसातले हिशोब सेटल करायला बघतात असे वाटते.म्हणजे सहसा सभ्यतेचा बुरखा पांघरायचा...पण मग अशा एखाद्या लेखाच्या निमित्ताने पुरुष वि. स्त्रिया असे गरळ ओकायला सुरुवात...आणि शिवाय अनाहीतामध्ये डोकावता येत नाही याचा राग वगैरे वगैरे...चालुद्या

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

बाकी ठीक एकवेळ, पण
अनाहीतामध्ये डोकावता येत नाही याचा राग
अनाहिता म्हणजे काय एफबीआय आहे की रॉ ऑर फॉर द्याट म्याटर सेन्सॉरबोर्ड की जिथे प्रवेश मिळत नसल्याचा राग यावा?

In reply to by बॅटमॅन

नैच आहे मुळी अनाहिता म्हंजे एफ बीआय. तरी पण्ण प्रत्येक ठिकाणी, जम्मेल तिथे कोण बै सत्तत अनाहिताचा उल्लेख केल्याशिवाय राहूच शकत नै?

In reply to by टवाळ कार्टा

टका आणि बॅमॅ, अनाहिता हे संपूर्ण वेगळे प्रकरण आहे. ते इथे उकरून काढणे औचित्याचे वाटत नाही. याप्रकरणी यशोधरांशी सहमत.

In reply to by टवाळ कार्टा

इतक्या प्रामाणिक उत्तराबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद पण तुम्ही " just pile on" करणार्‍यापैंकी होऊ नये/ असू नये ही मनापासूनची इच्छा. :)

In reply to by प्रभाकर पेठकर

श्री. पेठकर यांच्याशी सहमत. काही टवाळ आयडी आपल्या नावाशी इमान राखत देत असलेले प्रतिसाद पाहून गंमत वाटली.

धाग्याचा हेतू नक्की काय आहे समजले नाही किंवा काही समजून घेण्याआधी प्रतिसादांनी आणखी कन्फ्यूज केलेय. पण तरी हे वाचून माझा एक किस्सा आठवला, फार पूर्वी लग्ना आधी एकदा मित्राबरोबर मॉलमध्ये या सेक्शनहून त्या सेक्शनमध्ये फिरता फिरता मी एकटाच टीशर्ट च्या भागात गेलो, बकेटमधील ढिगारा छानपैकी उपसू लागलो, हँगरला लटकावलेले चाळू लागलो, अगदी अंगाला वगैरे लाऊन आरशात बघू लागलो, आणि इतक्यात एक सेल्स गर्ल पुढे येऊन म्हणाली, "सर ये लेडीज सेक्शन है" ... असला ओशाळलो मी.. तरीही वेळ मारून न्यायला मैत्रीणीसाठी बघतोय अशी चक्क थाप ठोकली. पण ज्या प्रकारे अंगाला वगैरे लाऊन मी आरसा न्याहाळत होतो त्यावरून ती पचली नसावी. बरोबरचा नालायक मित्र पाठोपाठ हजर होऊन ज्या प्रकारे हसला ते पाहता नक्कीच नाही..

कावळा बायकांना शिवत असेल तर कावळी पुरुषांना शिवत असेल ओ.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कावळा शिवला तर बाईने बाजुला बसायचे अन काव़ळी शिवली तर कावळीने घरट्या बाहेर बसायचे ... म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्त्रीनेच घराबाहेर नसायचे ... षी: बाई काय ही घाणेरडी पुरुषी मनोवृत्ती ... तुमचा विरुध्द निषेध ठराव माडला जाईल आता ... त्या तिथे ...कोपर्‍यात =))

विनोदी म्हणताय ना, ठीकाय. समोर मुली, कळत्या वयाच्या नाती बसलेल्या असतील तेव्हा हाच विनोद असाच वाचून दाखवा. त्यांची काय प्रतिक्रिया येते ती कळवा. प्रतिसाद वैयक्तिक वाटल्यास संपादक मंडळाने उडवून टाकावा. :)

In reply to by टवाळ कार्टा

>>आजकालच्या मुली काय काय बोलतात याची काहिच कल्पना नाही का?? आहे की कल्पना!! फक्त आपल्या आजोबा किंवा वडिलांच्या वयाच्या माणसाकडून असे सो कॉल्ड 'विनोद' ऐकले की त्यांची प्रतिक्रिया काय असते माहीत नाहीये.

In reply to by टवाळ कार्टा

आजकालच्या मुली काय काय बोलतात याची काहिच कल्पना नाही का?
थोडीफार कल्पना आहे ... पण ह्याविषयावर स्वतंत्र धागा निघाला पाहिजे जेणे करुन ' आजवर इतरांनी ऐकलेले तारे तोडणारे डायलॉग ऐकायला मिळतील ' असे मत नोंदवत आहे =))

In reply to by टवाळ कार्टा

गेल्याच आठवड्यात एका मुलीकडून व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपवर फॉरवर्ड केला गेलेला एक मेसेज... गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले - समाजसेविका सन्नी लिओनी पाचच मिनीटात अजून एक याहून खतरनाक लिओनी उवाच मेसेज तिच्या मैत्रीणी कडून त्याच ग्रुपवर आला (चुकून तिकडल्या ग्रुप ऐवजी इकडे पडले होते म्हणे) पुढारलेपणात आम्ही फार मागे आहोत हे आता कळतेय. ;)

अपेक्षित आयडींकडून अपेक्षित प्रतिसाद.

In reply to by पैसा

असेच म्हणतो.

टाकणार्‍यांनी सकाळी सकाळी धागा टाकला पण मिसळीच्या मॅनेजर्सनेही हा धागा तस्साच ठेवला आहे... मिसळीचे अभिनंदन... उच्च अभिरुची आणि धागा टाकण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल बाय द वे या सदस्याला हेही सांगावे पूर्वी .... जाऊ दे

http://www.sherv.net/cm/emoticons/birds/feeding-birds-smiley-emoticon.gif . . . . . . . . . .. . . . . . .. . . . . . . . . . . . . . . http://www.sherv.net/cm/emoticons/birds/pigeons-smiley-emoticon.gif

लहाणपणापासुन मला जितकं आठवतंय त्यावरुन सांगतो की आमच्या घरी मासिकपाळी दरम्यान आई किंवा बहीणी घरात वेगळ्या बसलेल्या अश्या पाहील्या नाहीत किंवा असं क्रिप्टीक बोललेलं देखील स्मरत नाही. दररोज घरातील नियमित केली जाणारी सगळी कामं ते व्यवस्थित करत असत फक्त देवाची पूजा सोडून. कधीकाळी मैत्रिणीने तिला 'चर्म्स' आले आहेत असं सांगितल्यामुळे ह्या शब्दाची नविन माहीती मिळाली व आजतागायत आई/बायकोबरोबर बोलताना आम्ही हाच शब्द वापरतो.

In reply to by शिद

असेच डाऊन होणे या शब्दा बद्दलपण ऐकले आहे. अगदी कॉलेजातल्या दिवसापासून पिणार्‍या मित्रांमधे किती पेग, खंबे यात डाऊन झाला वगैरे चर्चा, स्पर्धा चालायची. त्यामुळे डाऊन होणे हा शब्द, पडणे मग पिऊन पडणे असो किंवा खडतर ट्रेक च्या पायपिटीने थकून पडणे अशा दोन्ही अर्थाने वापरला आहे. पण मैत्रिणींमधे पण डाऊन होणे असे काही असते आणि त्याचा खुलासा एका मित्राला त्याच्या कॉलेजवयापासूनच्या प्रेयसीने केल्यावर आमच्यापर्यंत पोचला. तोवर "अरे काल वासोटा आणि नागेश्वर एका दिवसात मारला" आणि परत आल्याअवर ५ मित्रांपैकी पैकी ४ डाऊन" असे आम्ही सर्रास म्हणत असू." आणि त्यावर मुली फिदी फिदी हसत असत.

ओक काकांच्या नेताजींबद्दलच्या आणि अन्य काही चांगल्या धाग्यांवर चुकून कधी प्रतिक्रिया न देणार्‍यांनीही इथे हजेरी लावून धाग्याचे शतक लावल्याबद्दल मंडळ हाबारी आहे! असाच कृपालोभ असू द्यावा. यशोधरा आणि पेठकर काका, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळलं आहे, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही. एवढे बोलून मी माझे ५० शब्द संपवते.

In reply to by पैसा

पैसातै, मला एका प्रश्णाचे उत्तर द्या. तुमचा आक्षेप नेमका कशावर आहे ? विषयावर, कंटेंटवर,माैजमजा/विरंगुळा हे लिहिण्यावर की आणि कशावर ? लेखात बिभत्स वर्णने नाहीत, अश्लिल टिप्पणी नाही, इतकेच काय मेजर भागात पाळीपेक्षा लेखकाला सॅनिटरी नॅपकिन्स माहित नसल्यामुळे झालेल्या गंमतिवर जास्त भर आहे. पाळी आणि तदनुशंगिक सर्व गोष्टी अर्वाच्य समजत असाल तर गोष्ट वेगळी. जाता जाता :- हाच लेख असाच्या असा पण लेखकाचे नाव रामदास आहे असे समजुन परत वाचा, खटकले तर सांगा. ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मी कधी म्हटलं माझा कशाला आक्षेप आहे म्हणून? मी सांगतेय की ओक काकांनी नेताजींच्या सहवासात आणि हवाईदलावर अनेक चांगले धागे लिहिलेत त्यांनाही उदार आश्रय द्या. धागा ओक काकांचा. कोणाला आवडला, कोणाला नाही आवडला. कोणी त्यापासून लांब राहिले, कोणी आपली नाराजी सरळ व्यक्त केली. त्यावरून गोंधळ घालण्यासारखं काय आहे? "ओक काकांचा धागा म्हणून असल्या प्रतिक्रिया येतात" असं कोणी म्हणालं, कोणी अनाहिता आणि संपादकांचा प्रच्छन्न उल्लेख केला. हे सगळं या धाग्यावर आवश्यक होतं का? धागा तुम्हाला आवडला तर खुल्या मनाने चांगला आहे म्हणा. नाही आवडला तर तसे सांगा. इतकं साधी गोष्ट आहे. मला जाब विचारण्यासारखं मी काही बोलले आहे असं मला वाटत नाही. मी कॉलेजात असताना एखादी मुलगी काळे कपडे घालून आली तर पोरं व्हिस्पर व्हिस्पर म्हणून हसत असत. केअरफ्री नावाचे नॅपकिन्स त्याच्या बरेच आधीपासून उपलब्ध होते. सैन्यात अधिकारी असलेल्या एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीला सॅनिटरी नॅपकिन्स माहित नसतील ही गोष्ट मुळात मला पटलेली नाही. पण असो. डॉ. खरे यांच्या पूर्ण गंभीरपणे काढलेल्या धाग्याचा लोक विचका करू शकतात तर या अशा धाग्यावर एखाद्याला संकोच वाटण्यासारख्या प्रतिक्रिया येणार आणि हेच लोक नंतर इतर संस्थळांवर जाऊन "मिपा म्हणजे टवाळांचा अड्डा आहे" "मिपा म्हणजे आंतरजालाचे बेसिन आहे" इ. लिहिणार हे खरं तर यशोधरा, पेठकर काका इ. ना माहिती असायला हवे होते. यशोधरा तुम्हारा चुक्याच!

कावळ्यांच्यात कावळा शिवणे हा प्रकार नक्कीच पाळत नसावेत असा एक अंदाज आहे ... नाहीतर मग कावळा बिचारा कावळीशी जवळिक करायला जायचा अन कावळी म्हणायची "आता मी बाहेर बसते ...जस्ट कावळा शिवला " =))

बर्‍याच जणाना लेखात लिहिलेय ते वाचून इतकं चिडायला काय झालं हेच मला कळत नाही. पाळी हा फक्तं बायकांनी बायकांशी बोलायचा विषय कींवा अजिबात (सौम्यसाही) विनोद न करण्याचा विषय का बरे? तिथे ओककाका फक्तं आपली फजिती सांगतायत. आणि अश्या फजित्या होतात हे आपणा सगळ्यानाच माहित्येय. आम्ही आठवीत असताना कुठल्याश्या धड्यात विस्पर शब्दं आला होता तेव्हा एका मुलीने विस्पर म्हणजे कुजबुज असेल तर ते पॅक कसलं दाखवतात टिवीवर असं आमच्या सराना विचारलं होतं वर्गात. सरांनी पण बायकांचे रूमाल असतात आणि बायका कुजबुजत बोलतात म्हणून त्यांचे नाव विस्पर असे सांगितले. पाळी ही काहितरी लपवायचि , प्रचंड सिक्रेट, पुरूषांशी तर अज्जिबात न बोलायची गोष्टं आहे असे समजल्याने कित्येक बायका अगदी मरणाच्या दारात अ‍ॅडमिट झाल्यात आमच्या हॉस्पिटलात. यापेक्षा पाळी ही एक अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्यात फार काही लपविण्यासारखे नाही हे समजून चालू लागणे उत्तम. जसे हगूमुतूचे लहान मुलांचे जोक्स निरागस असतात तेव्हा गोड वाटतात मात्रं काहीवेळा मोठे लोक जोक्स बीभत्सपणे मारतात तेव्हा ईक्स वाटतं तसंच . हा किस्सा मला तरी निरागस वाटला. असेच आपण उगाच सापसाप म्हणून भुई धोपटू लागलो तर जगात केव्हातरी 'स्त्रीपुरूष यांच्यातील मानसिक भेद तरी संपणे' हे कठिण आहे.

In reply to by साती

बलिवर्द नेत्रभंजक प्रतिसाद !!! तुम्हाला काय म्हणायचं आहे ते काही लोकांना कळेल, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही. एवढे बोलून मी माझे २५ शब्द संपवतो.;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

१०० शब्दांत लिहिले असते तर शतशब्दकथा/शतशब्दप्रतिसाद म्हणुन प्रसिध्द तरी करता आले असते कि हो विमेकाका!

In reply to by साती

सोनाराने कान टोचले ते उत्तम केलं. जबर्‍या प्रतिसाद! इतकं सांगून तरी योग्य ज्यांना कळेल की नै हे सांगवत नै हेच दुर्दैव.

In reply to by साती

है शाब्बास! इतका वेळ हा धागा केवळ धमाल तमाशा/कलगीतुरा/आजची करमणूक म्हणून वाचत होतो, पण वरील प्रतिसाद अगदी मार्मिक वाटला. या प्रतिसादासाठी साती यांना आजचे सामनावीर घोषित करण्यात येत आहे.

In reply to by साती

प्रतिसाद आवडला.
पाळी ही काहितरी लपवायचि , प्रचंड सिक्रेट, पुरूषांशी तर अज्जिबात न बोलायची गोष्टं आहे असे समजल्याने...
आपल्याकडे पुरातन काळापासून पाळीला विटाळ मानून अपवित्र, गलिच्छ मानलं गेलेलं आहे. या अत्यंत नैसर्गिक घटनेभोवती काही काळी जादू असावी अशा पद्धतीने त्या काळात सर्व स्त्रियांना वागवलं जायचं, अजूनही हा प्रकार अनेक ठिकाणी चालू असतोच. या अमंगळपणाच्या वलयामुळेच 'ह्या विषयावर बोलायचं नाही' असा टॅबू निर्माण झाला. तोच टॅबू आपण पाळत राहिलो तर खरोखरच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जगात केव्हातरी 'स्त्रीपुरूष यांच्यातील मानसिक भेद तरी संपणे' हे कठिण आहे.

In reply to by साती

साती, तुमचा निरागसपणा खूप आवडला. :) तरीही सांगू इच्छिते की पाळी ह्या विषयावर काही लिहिलेय म्हणून माझा आक्षेप नाहीये. हे मी आधीही इथे प्रतिसादात म्हटले आहे. माझा आ़क्षेप का आहे ते मी लिहिलेय, ते वाचले असेल तर समजावून घ्यायचाही जमले तर प्रयत्न करा. माझे डाँ., घरातील व्यक्ती, जवळचे मित्रमंडळी ह्यांच्याशी मीही बोलू शकते पाळी आणि तत्सम टॅबू विषयांवर. त्यांच्या आणि माझ्या एकमेकांच्या विश्वासावर ठरत हे, कोणाशी काय, किती आणि कसं बोलावं हे मी ठरवणार. मला धागा खटकला, मी तितकंच सांगितलं. तो माझा अधिकार. धागा उडवा म्हटलं नाही की काहीच नाही. तो मी केलेला धागाकर्त्याच्या लेखनस्वातंत्र्याचा आदर. समानता ही अशी असते, असावी. केवळ पाळीवर बायका पुरुषांनी एकत गप्पा मारुन ती सोयीपुरती धागा टू धागा पहायची नसते. :) फोरमवर पाळी/ सॅनिटरी नॅ बद्दलचे किस्से न चघळल्याबद्दल मी प्रतिगामी ठरणार असेन, तर माझी काहीच हरकत नाही :) ओकांच्या नाडीबद्द्लच्या धाग्यांची मनसोक्त टर उडवणार्‍यांनी आणि मिपावरच्या लोकांना मायबोलीवर जाऊन नावं ठेवणार्‍यांनी आणि समोरच्याचा माला एखादी गोष्ट पटली नाही हे सांगायच्या मूलभूत हक्काची बूज न ठेवता आपल्या सोयीने मूळ मुद्दा लक्षात न घेता, दुसर्‍याच गोष्टींचा बतंगड बनवणार्‍यांनी समानतेच्या गप्पा करणं हा एक मोठा विरोधाभास. आणि हो, तुमचे ब्राऊनी पाँईट्सबद्दल अभिनंदन! आता मात्र लेखनसीमा. धन्यवाद.

In reply to by यशोधरा

ओकांच्या एका धाग्याची टर उडवली म्हणून त्यांच्या सगळ्याच धाग्यांवर आगपाखड करावी हे बरोबर नव्हे. त्यांनी काही बरं लिहिलं आणि मला चुकीचं वाटलं नाही तर उगाच फक्त त्यांनी लिहिलंय म्हणून आगपाखड मी तरी करणार नाही. आता तुम्ही वर काय काय मिपा माबो हे नी ते लिहून काड्या करायचा प्रयत्न केलाय तरी तुम्ही उद्या काही चांगलं लिहिलंत किंवा चांगला प्रतिसाद दिलात तर मी त्याला अ‍ॅप्रेशिएटच करेन. या पूर्वी 'य' वेळा केलंही आहे. माझा वाद- संवाद आयडीशी नसून आयडीयेशी असतो. आणि सगळी संकेतस्थळे फार एअर टाईट कंपार्टमेंटे असून इथल्या (खाजगीच ठेवा अश्या नियमनसलेल्या) गोष्टी तिथे लिहिल्या किंवा इथल्या एकाद्या इंटरेस्टींग धाग्याची लिंक तिकडे दिली किंबा इथल्या (अनाहितात नसलेल्या) एखाद्या मुद्द्याची चर्चा तिकडच्या आयडींशी केली किंवा इथल्या संपादकमंडळाची स्तुती तिथे केली किंवा कुणाला एखादी रेसिपी हवी असल्यास इथली रेसिपी लिंक दिली तर काही धर्मं बुडत नाही. पण तुमचा मुद्द्याला विरोध न करता नको ते मुद्दे उगाळून काढणे (जे मागे पण माझ्या माबोवरच्या होमिओपथीविषयीच्या प्रतिसादांवरून इथे उगाच टोमणे मारले होतेत ते) वैगेरे तुमची इम्यॅच्युरिटी दाखबितो. हा प्रतिसादही कदाचित उडवालच कारण तुमच्या हातीच कात्रीची मूठ आहे. पण असो. तुमच्या अनाठायी स्त्रीवादाला किंवा दादागिरीला घाबरणे माला तरी शक्य नाही. ;)

In reply to by साती

ओकांच्या एका धाग्याची टर उडवली म्हणून त्यांच्या सगळ्याच धाग्यांवर आगपाखड करावी हे बरोबर नव्हे. >> ह्याच लॉजिकने मला ओककाकांचा हा धागा खटकला, त्यात मी सांगितलं त्यावरुन स्त्री पुरुष समानतेवरुन सोयीस्कर गळे काढणं तितकंच चूक आहे की. :)
हा प्रतिसादही कदाचित उडवालच कारण तुमच्या हातीच कात्रीची मूठ आहे. पण असो. तुमच्या अनाठायी स्त्रीवादाला किंवा दादागिरीला घाबरणे माला तरी शक्य नाही.
हीहीही! ही खरी मॅच्युरिटी! :)