भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले.
स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...
त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...
दैवगति अविचारी असते. माणसांचे व तिचे हिशेबच वेगवेगळे असतात. महाजन मुंडे यांच्या कुटुंबांवर जे आघात झाले ते शत्रूवरही होउ नयेत असे होते.काहीसे मिश्कील तर बरेचसे गंभीर असे मुडे अजून खूप जगायला हवे होते.बाळासाहेब ठाकरे,
विलासराव देशमूख यांच्या निधनानंतर मुंडे यांच्या निधनाने मराठी मन पोरके होते की काय असे वाटू लागले आहे.
आज दिवस उजाडला तो ही वाईट बातमी घेऊनच. एक उमदे आणि धडाडीचे व्यक्तिमत्व हरपले.महाराष्ट्राची आणि देशाची मोठी हानि आहे. महाराष्ट्रातली राजकीय समीकरणे बदलू शकतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
मुंडेजी लोकनेते तसेच भावी मुख्य मंञी सुद्धा होते
फक्त क्षुल्लक अपघात होऊन त्यांचे जाणे मनास पटत नाही
इंडिका गाडी नक्की कुणाची?
ड्रायव्हर ताब्यात आहे तर ही चूक जाणूनबूजून की मुद्दम हे काही कऴले नाही
चोप्य पस्ते करुन
अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे.
टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.
आणि दु:खद बातमी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
दोन वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या 'आयडिया एक्स्चेंज'मध्ये झालेली त्यांची मुलाखत वाचली. त्यातला हा भाग वाचून पहा -
गिरीश कुबेर - सत्तेने भाजपला शांत केलेय का? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषा अत्यंत अस्पष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ दाखविण्यापुरता विरोध आणि बाकी सगळे एकत्र असे वातावरण असून यात भाजपचा नक्की वाटा काय?
मुंडे- अविवाहितांना विवाहितांच्या समस्या समजू शकत नाहीत. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा अनेक गोष्टी मांडल्या. असं करू, तसं करू.. मात्र सत्ता आल्यानंतर कळते ही या गोष्टी करणे पॉसिबल नाही. एकेकाळी विरोधी पक्षाने सत्तेचा लवलेशही पाहिला नव्हता. तेव्हा आम्ही बोलत होतो त्याला धार होती. पण केंद्रात सत्तेवर आलो. महाराष्ट्रात सत्तेवर येऊन गेलोय, काही राज्यांत सत्तेत आहोत. पण सत्तेत जाऊन आले की विरोधाची धार थोडी कमी होते. आम्ही सरकार चालवून बघितलेले आहे. म्हणून आम्ही त्या काळात काही भूमिका मांडल्या होत्या, त्या आता मांडत नाही. आता कोकणात जैतापूरला विजेचा प्रकल्प येतोय. त्याला भाजप विरोध करीत नाही. ही प्रगल्भता आता सत्तेत जाऊन आली आहे. सत्तेत नसताना आपण अनेक गोष्टी मांडतो पण सत्तेत गेल्यावर त्या गोष्टी करता येत नाहीत याची अनुभूती येते. त्यांनाही आता विरोधकात राहून विरोधकांच्या अडचणी काय असतात हे कळले आहे.
दिनेश गुणे- त्यावेळी एन्रॉनला विरोध केला, त्याबद्दल आज तुम्हाला काय वाटते?
मुंडे- एन्रॉनला विरोध केला तो आजही योग्यच वाटतो. विरोधाचे कारण वीज नको हे नव्हते. तर एन्रॉनच्या कराराला विरोध होता. एन्रॉनचा करार हा निविदा न काढता दोघांनी सामंजस्याने केला होता. एन्रॉनची कॅपिटल कॉस्ट ही ९ हजार ८० कोटींेची होती. कोणत्याही प्रकल्पाची कॅपिटल कॉस्टच जेवढी जास्त असते तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्तच असतो. ती कमी करा हीच माझी मागणी होती. माझी मागणी एन्रॉन रद्द करा अशी नव्हती तर एन्रॉनचा दर घोषित करा अशी मागणी होती. पण आम्ही म्हटले की फेकून द्या एन्रॉनला अरबी समुद्रात. पण हे मी जर बोललो नसतो तर आम्ही निवडणूक जिंकून सत्तेत आलो नसतो.
RIP. After staying in opposition for 15 yrs now he got so close to an opportunity to be in power in Maharashtra & he has to leave. Very Sad. Deepest Sympathies for family n friends.
But no one seems to worry about cause of death. Its like failing to prevent preventable cause & waiting for next one. Its a road traffic accident. According to other car's (indica which hit Munde's car) driver, munde's drive run a red light leading to crash. So where is main culprit ? Is it free yet?
अनेक ठिकाणी या संदर्भात वाचले.... अर्थात नक्की काय झाले हे कदाचीत पोलीस आणि मुंडे यांच्या ड्रायव्हर-सचिवासच माहीत असेल.
धडक दिलेल्या गाडीत मुंडे होते हे समजल्यावर इंडीका गाडीच्या ड्रायवरने पोलीसांना फोन करून कळवले आणि स्वतः अपघातस्थळी थांबला होता.
मुंडे यांचा ड्रायवर देखील गाडी चुकीच्या पद्धतीने, बाजूने चालवत असावा असे प्रथम दर्शनी वाटत आहे.
धडक देता क्षणी धक्का जरी बसला असला तरी मुंडे यांच्या केवळ नाकालाच खरचटणे म्हणावे इतकीच जखम झाली होती.
त्यांनी प्रथम ड्रायव्हर आणि सचिवाची चौकशी केली. ते दोघे ठिक आहेत म्हणल्यावर ते म्हणाले की असेच विमानतळावर जाऊ. दुखापतीचे नंतर पाहुयात असा संवाद त्यांच्यात झाला.
अर्थात नंतर सगळेच बदलले. त्यांनी पाणी मागितले. ते घेतल्यामुळे नसावे पण मुंडे यांची अस्वस्थता वाढली आणि पुढची दुर्दैवी घटना घडली.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे, मुंडेंची शुद्ध हरपली तेंव्हा सिपिआर अर्थात प्रथमोपचाराने हृदयक्रीया तात्काळ चालू करण्याचे प्रयत्न कसे करावेत याचे शिक्षण ड्रायवर आणि सचिवास नसल्याने ते तात्काळ काही करू शकले नाहीत. असे प्रथमोपचार हे तात्काळ म्हणजे अक्षरशः काही (३-४) मिनिटांमधे करावे लागतात. त्यातच त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झालेला होता...
खाली श्रीरंगने म्हणल्याप्रमाणे झालेले दुर्दैवाने कोणीच बदलू शकणार नाही, पण असे परत होणार नाही या जाणिवेने सगळ्यांनी वागणे अतिशय महत्वाचे आहे. असो.
----
अजून एक अपडेटः अंतर्गत रक्तस्त्राव आणि मज्जारज्जूस बसलेल्या धक्क्यामुळे हृदयक्रीया बंद पडली. अर्थात हा हृदयविकाराचा झटका नव्हता.
माहिती साठी धन्यवाद. काल जे झाला ते दुर्दैवी आहेच. पण असं वाटतं जे आज अंतिम संकारा वेळी झालं तेही चुकीचं होतं. एक गाडी जाळली गेली, मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, राज ठाकरे जे सरकार मध्ये नाहीत त्यांना घेराव घालण्यात आला. आजच बातमी होती कि सरकार ने चौकशी केलेली आहे आणि यात घातपात नाही, पण तरीही कार्य कर्त्यांची डोकी भडकावण्यात आली आणि या गोष्टी झाल्या. हे थांबलं पाहिजे. मिसळपाव वर लोकांनी अफवा पसरवण्याच थांबवण्यासाठी प्रयत्न केले ही चांगली गोष्ट आहे.
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते.
अजून एक गोष्ट नीट वाचली नाही पण नुसता फोटो पाहीला: महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले.
या संदर्भात किंचीत वेगळी पण एक पद्धत आठवते (मला वाटते आपल्याकडे ती पाळली जाते का ते माहीत नाही): अमेरीकन राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीच्या वेळेस एक रँडम सेक्रेटरी (कॅबिनेट मंत्री) हा गैरहजर असतो आणि अज्ञात स्थळी असतो.
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते.
सहमत. पण मॉब सायकोलॉजी हा एक वेगळा आणि समजायला आणि नियंत्रण करायला कठीण असलेला विषय आहे, अर्थात या कॄत्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येउ शकत नाही.
महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले.
लोकांच्या भावना अनावर झाल्या हे खरं तर या प्रकाराच्या मागचे कारण आहे. मंत्री/संत्री यांच्या गाड्यांना घेराव घातला गेला आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली गेली. एका लोकप्रिय नेत्याच्या मागे किती जनाधार असतो हे या घटनेने दिसुन आले. तसेच लोक उद्विग्न {जनता पिसाळली } तर ते मंत्री-संत्री लोकांना घेराव घालु शकतात/अडवु शकतात हे देखील दिसुन आले.
दोन गोष्टींचे खरच कौतुक केले पाहिजे.
१. भाजप कार्यकर्त्यांनी फारशा ठिकाणी बंद न पाळता दाखवलेला संयम.
२. पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.
पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.
वैदीक काळात कदाचीत ही रुढी असेल आणि आजच्या पुढारलेल्या जातींमधेही हे फारस नविन नाही, जर नविन काही असेल तर बीडसारख्या मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे.. समाज नेत्याला घडवतो, पण एक चांगला नेता, स्वता:ही समाजाला घडवतो, याचे एक छान उदाहरन म्हणुन ही गोष्ट लक्षात राहील.
सहमत.
झाले ते दुर्दैवीच आहे. पण ही गोष्ट जनतेच्या नजरेत आणण्यासाठी माध्यमांनी कष्ट घेतले पाहीजेत असे वाटते.
बाकी पुढारलेल्या कुटूंबांबद्दलच बोलायचे तर मला वाटते: इंदीरा गांधींनी नेहरूंचे, मल्लीका साराभाईंनी विक्रम साराभाईंचे, सावित्रीबाईंनी महात्मा फुल्यांचे अंत्यसंस्कार केले होते... असे अजून अनेक असतील. पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन....!
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी.
प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजपला आणखी एक हादरा. भाजप, महाराष्ट्रराज्य आणि देशाची न भरून येणारी हानी.
श्री मुंढे यांना भावपुर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन!
शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अनेकदा त्यांच्यासोबत संंबंध आलेत. कधी ते आंदोलकांच्या बाजूने असायचे तर कधी महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री म्हणू्न आंदोलकांशी चर्चा अथवा वाटाघाटी करायला आंदोलकांसमोर यायचे.
एक खंबीर आणि धडाडीचा नेता म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व विलोभनिय होते.
अत्यंत दु:खद घटना.
जनसामान्यांशी नाळ जुळलेलं एक धडाडीचं नेतृत्व आज आपल्यात नाही हे स्वीकारणं फारच क्लेशदायक आहे.
या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. मागच्या सीटवर बसून गोपीनाथरावांनी सीटबेल्ट लावला असता तर... झालेलं बदललं जाऊ शकत नाही पण रस्त्यांवरून चालणार्यांनी (पायी, वाहनावरून वा वाहनातून) स्वयंशिस्त बाळगणे ही गोपीनाथरावांना योग्य श्रद्धांजली ठरेल.
धन्यवाद विकास इथे दुवा आणि अजुनही माहिती दिल्याबद्द्ल, मुंडे यांच्या पत्नी काय परिस्थितीतुन जात असतील याची कल्पना करवत नाही. फुले कुटुंब काळाच्या पुढे होते हे अनेक गोष्टींवरुन माहिती होते पण सावित्रीबाईंनी ज्योतिबांचे अंत्यसंस्कार केल्याचे माहिती नव्हते.
प्रामाणिक मराठी माणसाला खरचं दिल्ली लाभत नाही की काय? दत्ताजी शिंदे, पेशवे ह्यांना सुद्धा दिल्ली आणि आसपासच्या मातीनी टिकु दिलंं नाही. प्रमोद महाजनांच्या धक्क्यातुन भा.ज.प. सावरतोय नाही सावरतोय तोच मुंडे ह्यांच्या सारखे मातब्बर नेते मृत्युमुखी पडावेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. :(
बाकी मुंडेना झालेला अपघात आणि त्याच दिवशी सरसंघचालकांच्या (मोहन भागवत...परत मराठीच) गाडीला दिल्लीतच अपघात व्हावा ह्यात योगायोग आहे असं वाटत नाही.
मुंडेसाहेब हे बहुजनांचे मोठे नेते होते. मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव देण्या साठी दिलेल्या लढ्यात त्यांचा सहभाग होता तसेच ते तळागाळातील समाज ह्यांच्या बाजूने उभे राहत. भाजप सारख्या पार्टीत राहूनही ते कधी कडवे नव्हते तर त्यांनी मध्यममार्ग स्वीकारला होता. दलित,ओबीसी जनतेचा महाराष्ट्रातील हितचिंतक गेला. मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..
गदीमांच्या चेपूपानावर सौमित्र माडगुळकरांनी लिहीलेला मेसेज येथे चिकटवत आहे...
काही मृत्यू मनाला चटला लावून जातात,मा.मीनाताई ठाकरे,शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे,विलासरावजी देशमूख,प्रमोदजी महाजन व आता गोपीनाथजी मुंडे...
१९६७ साली उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघातून स.गो.बर्वे विजयी झाले,केंद्र सरकारमध्ये त्यांचा अर्थमंत्री म्हणून प्रवेश निश्चित होता पण दुर्दैवाने त्याच रात्री त्यांचे ह्रदयक्रिया बंद पडून निधन झाले,गदिमांचा व त्यांचा स्नेह होता,एका पत्रकाराने फोन वर त्यांना प्रतिक्रिया विचारली व गदिमा उत्तरले.....आज गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने त्याच ओळी परत आठवतात...
अजुनी कुंकुमतिलक कपाळी| सत्काराच्या गळ्यात माळा|
राजमान्यता स्वीकाराच्या भरात आहे अजुनी सोहळा|
तोच काय हे घडे अचानक| चैतन्याचे होय कलेवर|
लक्ष मुखातील जपनादाचा होय हुंदका एक अनावर|
....ग.दि.माडगूळकर
प्रतिक्रिया
विश्वास बसत नाही. श्रद्धांजली
श्रद्धांजली.
प्रमोद महाजन ०३.०६.२००६ तर खा
प्रमोद महाजन ०३-०५-२००६
महाजन
दैवगति...
भावपूर्ण श्रध्दांजली.बातमी
श्रद्धांजलि
...*~*~*~* श्री. गोपीनाथ'जी
मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली....
घातपात असू शकतो का?
चोप्य पस्ते करुन
खुप दुख्खद घटना
श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
महाराष्ट्राचं दुर्दैव.
मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!
धक्कादायक
आयला, पॉलिटिशियन असूनही इतका
श्रद्धांजली.
वेळ खरेच चुकली
अम्मांचा एन डी ए मध्ये प्रवेश
अजूनही शपथविधी आठवतोय.....
लोकनेत्याला विनम्र आदरांजली......
भावपूर्ण श्रध्दांजली....
वाईट बातमी.
वाईत बातमी पन
या संदर्भात
- धडक दिलेल्या गाडीत मुंडे होते हे समजल्यावर इंडीका गाडीच्या ड्रायवरने पोलीसांना फोन करून कळवले आणि स्वतः अपघातस्थळी थांबला होता.
- मुंडे यांचा ड्रायवर देखील गाडी चुकीच्या पद्धतीने, बाजूने चालवत असावा असे प्रथम दर्शनी वाटत आहे.
- धडक देता क्षणी धक्का जरी बसला असला तरी मुंडे यांच्या केवळ नाकालाच खरचटणे म्हणावे इतकीच जखम झाली होती.
- त्यांनी प्रथम ड्रायव्हर आणि सचिवाची चौकशी केली. ते दोघे ठिक आहेत म्हणल्यावर ते म्हणाले की असेच विमानतळावर जाऊ. दुखापतीचे नंतर पाहुयात असा संवाद त्यांच्यात झाला.
- अर्थात नंतर सगळेच बदलले. त्यांनी पाणी मागितले. ते घेतल्यामुळे नसावे पण मुंडे यांची अस्वस्थता वाढली आणि पुढची दुर्दैवी घटना घडली.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे, मुंडेंची शुद्ध हरपली तेंव्हा सिपिआर अर्थात प्रथमोपचाराने हृदयक्रीया तात्काळ चालू करण्याचे प्रयत्न कसे करावेत याचे शिक्षण ड्रायवर आणि सचिवास नसल्याने ते तात्काळ काही करू शकले नाहीत. असे प्रथमोपचार हे तात्काळ म्हणजे अक्षरशः काही (३-४) मिनिटांमधे करावे लागतात. त्यातच त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झालेला होता... खाली श्रीरंगने म्हणल्याप्रमाणे झालेले दुर्दैवाने कोणीच बदलू शकणार नाही, पण असे परत होणार नाही या जाणिवेने सगळ्यांनी वागणे अतिशय महत्वाचे आहे. असो. ---- अजून एक अपडेटः अंतर्गत रक्तस्त्राव आणि मज्जारज्जूस बसलेल्या धक्क्यामुळे हृदयक्रीया बंद पडली. अर्थात हा हृदयविकाराचा झटका नव्हता.माहिती साठी धन्यवाद. काल जे
सहमत + अजून थोडे
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे
अतिशय दुर्दवी घटना आहे. श्री
गोपिनाथ मुंडे यांना श्रद्धांजली.
पंकजा ही गोपिनाथरावांची
१०० % सहमत
पंकजानी अंत्यसंस्कार
मागासलेल्या भागातील, इतर
+१
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११!!!!
१,००,००० % सहमत !
व्यक्तिमत्व विलोभनिय होते.
मुंडे साहेबांना विनम्र
भावपूर्ण श्रद्धांजली
+१
अग्रलेख
आईकाना.. !
धन्यवाद
प्रामाणिक मराठी माणसाला खरचं
भाजपा
मुंडेसाहेब हे बहुजनांचे मोठे
स गो बर्वे