Skip to main content

गोपिनाथ मुंडे

लेखक विकास यांनी मंगळवार, 03/06/2014 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
Munde भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले. स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25429
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

अम्मांचा एन डी ए मध्ये प्रवेश होण्याची शक्यता ही च्नागली बातमी कानावर पडते तोवर ही वाईट बातमी वाचायला मिळाली. विनम्र श्रद्धांजली

RIP. After staying in opposition for 15 yrs now he got so close to an opportunity to be in power in Maharashtra & he has to leave. Very Sad. Deepest Sympathies for family n friends. But no one seems to worry about cause of death. Its like failing to prevent preventable cause & waiting for next one. Its a road traffic accident. According to other car's (indica which hit Munde's car) driver, munde's drive run a red light leading to crash. So where is main culprit ? Is it free yet?

In reply to by समिर१२३

अनेक ठिकाणी या संदर्भात वाचले.... अर्थात नक्की काय झाले हे कदाचीत पोलीस आणि मुंडे यांच्या ड्रायव्हर-सचिवासच माहीत असेल.
  1. धडक दिलेल्या गाडीत मुंडे होते हे समजल्यावर इंडीका गाडीच्या ड्रायवरने पोलीसांना फोन करून कळवले आणि स्वतः अपघातस्थळी थांबला होता.
  2. मुंडे यांचा ड्रायवर देखील गाडी चुकीच्या पद्धतीने, बाजूने चालवत असावा असे प्रथम दर्शनी वाटत आहे.
  3. धडक देता क्षणी धक्का जरी बसला असला तरी मुंडे यांच्या केवळ नाकालाच खरचटणे म्हणावे इतकीच जखम झाली होती.
  4. त्यांनी प्रथम ड्रायव्हर आणि सचिवाची चौकशी केली. ते दोघे ठिक आहेत म्हणल्यावर ते म्हणाले की असेच विमानतळावर जाऊ. दुखापतीचे नंतर पाहुयात असा संवाद त्यांच्यात झाला.
  5. अर्थात नंतर सगळेच बदलले. त्यांनी पाणी मागितले. ते घेतल्यामुळे नसावे पण मुंडे यांची अस्वस्थता वाढली आणि पुढची दुर्दैवी घटना घडली.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे, मुंडेंची शुद्ध हरपली तेंव्हा सिपिआर अर्थात प्रथमोपचाराने हृदयक्रीया तात्काळ चालू करण्याचे प्रयत्न कसे करावेत याचे शिक्षण ड्रायवर आणि सचिवास नसल्याने ते तात्काळ काही करू शकले नाहीत. असे प्रथमोपचार हे तात्काळ म्हणजे अक्षरशः काही (३-४) मिनिटांमधे करावे लागतात. त्यातच त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झालेला होता... खाली श्रीरंगने म्हणल्याप्रमाणे झालेले दुर्दैवाने कोणीच बदलू शकणार नाही, पण असे परत होणार नाही या जाणिवेने सगळ्यांनी वागणे अतिशय महत्वाचे आहे. असो. ---- अजून एक अपडेटः अंतर्गत रक्तस्त्राव आणि मज्जारज्जूस बसलेल्या धक्क्यामुळे हृदयक्रीया बंद पडली. अर्थात हा हृदयविकाराचा झटका नव्हता.

In reply to by विकास

माहिती साठी धन्यवाद. काल जे झाला ते दुर्दैवी आहेच. पण असं वाटतं जे आज अंतिम संकारा वेळी झालं तेही चुकीचं होतं. एक गाडी जाळली गेली, मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक झाली, राज ठाकरे जे सरकार मध्ये नाहीत त्यांना घेराव घालण्यात आला. आजच बातमी होती कि सरकार ने चौकशी केलेली आहे आणि यात घातपात नाही, पण तरीही कार्य कर्त्यांची डोकी भडकावण्यात आली आणि या गोष्टी झाल्या. हे थांबलं पाहिजे. मिसळपाव वर लोकांनी अफवा पसरवण्याच थांबवण्यासाठी प्रयत्न केले ही चांगली गोष्ट आहे.

In reply to by नाव आडनाव

दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. अजून एक गोष्ट नीट वाचली नाही पण नुसता फोटो पाहीला: महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. या संदर्भात किंचीत वेगळी पण एक पद्धत आठवते (मला वाटते आपल्याकडे ती पाळली जाते का ते माहीत नाही): अमेरीकन राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीच्या वेळेस एक रँडम सेक्रेटरी (कॅबिनेट मंत्री) हा गैरहजर असतो आणि अज्ञात स्थळी असतो.

In reply to by विकास

दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे अतिशय दुर्दैवीच नाही तर निषेधार्ह होते. सहमत. पण मॉब सायकोलॉजी हा एक वेगळा आणि समजायला आणि नियंत्रण करायला कठीण असलेला विषय आहे, अर्थात या कॄत्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येउ शकत नाही. महाराष्ट्रातले अनेक नेते (त्यात उध्दव आणि राज पण होते) हे एकाच हेलीकॉप्टरमधून परत आले. मी यातील कुणाचाही समर्थक नाही, पण असे सगळ्यांनी एकाच हेलीकॉप्टरमधून जाणे हे जरा बेदरकारपणाचे लक्षण वाटले. लोकांच्या भावना अनावर झाल्या हे खरं तर या प्रकाराच्या मागचे कारण आहे. मंत्री/संत्री यांच्या गाड्यांना घेराव घातला गेला आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली गेली. एका लोकप्रिय नेत्याच्या मागे किती जनाधार असतो हे या घटनेने दिसुन आले. तसेच लोक उद्विग्न {जनता पिसाळली } तर ते मंत्री-संत्री लोकांना घेराव घालु शकतात/अडवु शकतात हे देखील दिसुन आले.

पंकजा ही गोपिनाथरावांची राजकीय वारसदार आहे की नाही हे काळच ठरवेल, पण तिला त्यांच्या अंत्यविधिचा आधिकार देणार्‍या कुटुंबाला माझा सलाम..

In reply to by शैलेन्द्र

दोन गोष्टींचे खरच कौतुक केले पाहिजे. १. भाजप कार्यकर्त्यांनी फारशा ठिकाणी बंद न पाळता दाखवलेला संयम. २. पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.

In reply to by संपत

पंकजानी अंत्यसंस्कार केल्यामुळे ग्रामीण बहुजन समाजात एक उदाहरण ठेवले जाईल. अंत्यविधीला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेक लोक प्रेरणा घेतील आणि मुलगाच का हवा ह्यातले एक कारण तरी पुढे मागे लोप पावेल अशी अपेक्षा.
वैदीक काळात कदाचीत ही रुढी असेल आणि आजच्या पुढारलेल्या जातींमधेही हे फारस नविन नाही, जर नविन काही असेल तर बीडसारख्या मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे.. समाज नेत्याला घडवतो, पण एक चांगला नेता, स्वता:ही समाजाला घडवतो, याचे एक छान उदाहरन म्हणुन ही गोष्ट लक्षात राहील.

In reply to by शैलेन्द्र

मागासलेल्या भागातील, इतर मागासवर्गीय समाजतील एका लोकनेत्याच्या कुटुंबियांनी धाडसाने हा पायंडा पाडणे
हेच म्हणायचे होते.

In reply to by शैलेन्द्र

सहमत. झाले ते दुर्दैवीच आहे. पण ही गोष्ट जनतेच्या नजरेत आणण्यासाठी माध्यमांनी कष्ट घेतले पाहीजेत असे वाटते. बाकी पुढारलेल्या कुटूंबांबद्दलच बोलायचे तर मला वाटते: इंदीरा गांधींनी नेहरूंचे, मल्लीका साराभाईंनी विक्रम साराभाईंचे, सावित्रीबाईंनी महात्मा फुल्यांचे अंत्यसंस्कार केले होते... असे अजून अनेक असतील. पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.

In reply to by विकास

पण जनतेला सतत या कहाण्या सांगण्याची गरज असते.
अतिशयच सहमत. असे सतत बिंबवल्याने काही अंशी तरी फरक पडेलसे वाटते.

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन....! अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजपला आणखी एक हादरा. भाजप, महाराष्ट्रराज्य आणि देशाची न भरून येणारी हानी. श्री मुंढे यांना भावपुर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन! शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अनेकदा त्यांच्यासोबत संंबंध आलेत. कधी ते आंदोलकांच्या बाजूने असायचे तर कधी महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री म्हणू्न आंदोलकांशी चर्चा अथवा वाटाघाटी करायला आंदोलकांसमोर यायचे. एक खंबीर आणि धडाडीचा नेता म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व विलोभनिय होते.

अत्यंत दु:खद घटना. जनसामान्यांशी नाळ जुळलेलं एक धडाडीचं नेतृत्व आज आपल्यात नाही हे स्वीकारणं फारच क्लेशदायक आहे. या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. मागच्या सीटवर बसून गोपीनाथरावांनी सीटबेल्ट लावला असता तर... झालेलं बदललं जाऊ शकत नाही पण रस्त्यांवरून चालणार्‍यांनी (पायी, वाहनावरून वा वाहनातून) स्वयंशिस्त बाळगणे ही गोपीनाथरावांना योग्य श्रद्धांजली ठरेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

रस्त्यांवरून चालणार्‍यांनी (पायी, वाहनावरून वा वाहनातून) स्वयंशिस्त बाळगणे ही गोपीनाथरावांना योग्य श्रद्धांजली ठरेल. सहमत.

In reply to by विकास

धन्यवाद विकास इथे दुवा आणि अजुनही माहिती दिल्याबद्द्ल, मुंडे यांच्या पत्नी काय परिस्थितीतुन जात असतील याची कल्पना करवत नाही. फुले कुटुंब काळाच्या पुढे होते हे अनेक गोष्टींवरुन माहिती होते पण सावित्रीबाईंनी ज्योतिबांचे अंत्यसंस्कार केल्याचे माहिती नव्हते.

प्रामाणिक मराठी माणसाला खरचं दिल्ली लाभत नाही की काय? दत्ताजी शिंदे, पेशवे ह्यांना सुद्धा दिल्ली आणि आसपासच्या मातीनी टिकु दिलंं नाही. प्रमोद महाजनांच्या धक्क्यातुन भा.ज.प. सावरतोय नाही सावरतोय तोच मुंडे ह्यांच्या सारखे मातब्बर नेते मृत्युमुखी पडावेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. :( बाकी मुंडेना झालेला अपघात आणि त्याच दिवशी सरसंघचालकांच्या (मोहन भागवत...परत मराठीच) गाडीला दिल्लीतच अपघात व्हावा ह्यात योगायोग आहे असं वाटत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भाजपा वा ईतर कुठल्या पक्षाची अमराठी लॉबी ह्यामागे आहे असा तुला म्हणायचे आहे का? ह्यांनाही असाच संशय आहे.

मुंडेसाहेब हे बहुजनांचे मोठे नेते होते. मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव देण्या साठी दिलेल्या लढ्यात त्यांचा सहभाग होता तसेच ते तळागाळातील समाज ह्यांच्या बाजूने उभे राहत. भाजप सारख्या पार्टीत राहूनही ते कधी कडवे नव्हते तर त्यांनी मध्यममार्ग स्वीकारला होता. दलित,ओबीसी जनतेचा महाराष्ट्रातील हितचिंतक गेला. मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..

गदीमांच्या चेपूपानावर सौमित्र माडगुळकरांनी लिहीलेला मेसेज येथे चिकटवत आहे...
काही मृत्यू मनाला चटला लावून जातात,मा.मीनाताई ठाकरे,शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे,विलासरावजी देशमूख,प्रमोदजी महाजन व आता गोपीनाथजी मुंडे... १९६७ साली उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघातून स.गो.बर्वे विजयी झाले,केंद्र सरकारमध्ये त्यांचा अर्थमंत्री म्हणून प्रवेश निश्चित होता पण दुर्दैवाने त्याच रात्री त्यांचे ह्रदयक्रिया बंद पडून निधन झाले,गदिमांचा व त्यांचा स्नेह होता,एका पत्रकाराने फोन वर त्यांना प्रतिक्रिया विचारली व गदिमा उत्तरले.....आज गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने त्याच ओळी परत आठवतात... अजुनी कुंकुमतिलक कपाळी| सत्काराच्या गळ्यात माळा| राजमान्यता स्वीकाराच्या भरात आहे अजुनी सोहळा| तोच काय हे घडे अचानक| चैतन्याचे होय कलेवर| लक्ष मुखातील जपनादाचा होय हुंदका एक अनावर| ....ग.दि.माडगूळकर