✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गोपिनाथ मुंडे

व
विकास यांनी
Tue, 06/03/2014 - 09:12  ·  लेख
लेख
Munde भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले. स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
25242 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

अरेरे, वाईट बातमी श्रध्दांजली

अमोल केळकर
Tue, 06/03/2014 - 09:16 नवीन
अरेरे, वाईट बातमी श्रध्दांजली
  • Log in or register to post comments

RIP. Gopinath Munde. Can't

बालगंधर्व
Tue, 06/03/2014 - 17:44 नवीन
RIP. Gopinath Munde. Can't express my emotions. I dont know is there god or not. But what is happened, is very bad and sorrowful. We are unable to forget you.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

धक्कादायक

सुमीत भातखंडे
Tue, 06/03/2014 - 09:20 नवीन
खूप धक्कादायक बातमी... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... असेच म्हणतो. मनापासून आदरांजली.
  • Log in or register to post comments

मुंडेसाहेबांना श्रध्दांजली!!

किसन शिंदे
Tue, 06/03/2014 - 09:21 नवीन
मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!! :(
  • Log in or register to post comments

लोकनेता..

नाखु
Tue, 06/03/2014 - 09:22 नवीन
राजकारणा पलिकडे समयोचीत समाजकारण अंगिकारणार्या "महाराष्ट्र" सुपुत्रास विनम्र श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments

जबरदस्त धक्कादायक बातमी.

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 06/03/2014 - 09:25 नवीन
जबरदस्त धक्कादायक बातमी. खर तर विश्र्वास बसत नाही. भावपुर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments

मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच

llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/03/2014 - 09:26 नवीन
मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच महाराष्ट्रातल्या राजकारणाचे नुकसान झाले आहे. पवारबाजीला वेसण घालण्याची ताकद मुंडेंमधे होती. मुंडेसाहेब तुमची आज देशाला, महाराष्ट्राला फार गरज होती. का गेलात इतक्या तडकाफडकी.
  • Log in or register to post comments

त्या पवारांना नडायची धमक

आनन्दिता
Tue, 06/03/2014 - 09:57 नवीन
त्या पवारांना नडायची धमक दाखवणारा एकटाच नेता ..! आता उरलेत ते सगळे त्यांचे बगलबच्चे!ं छ्या ..देवा खुप चुकीचं केलंस तु ,,. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

प्रमोद महाजन, विलासराव देशमुख

सुहास..
Tue, 06/03/2014 - 09:26 नवीन
प्रमोद महाजन, विलासराव देशमुख आता मुंडे :(
  • Log in or register to post comments

अतिशय दु:खद बातमी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/03/2014 - 09:27 नवीन
केंद्रीय ग्रामविकास मंत्री खा.गोपीनाथ मुंढे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक. मराठवाड्याचा एक मोठा लोकनेता, सामान्य माणसाशी संपर्क असलेला असा एक मोठा माणुस निघून गेला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली... !

विटेकर
Tue, 06/03/2014 - 09:28 नवीन
एका झुंजार नेत्याचा अकाली अंत ! ओम शांती शांती शांती !!!
  • Log in or register to post comments

अगदी धक्कादायक आहे !

मदनबाण
Tue, 06/03/2014 - 09:32 नवीन
अगदी धक्कादायक आहे ! :( आत्ताच काही वेळा पूर्वी ही वाईट बातमी कळाली... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

मुंडेसाहेबांच्या

किसन शिंदे
Tue, 06/03/2014 - 09:32 नवीन
मुंडेसाहेबांच्या मृत्यूमध्येही आता काही लोकं राजकारण करू पाहत आहेत. आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्यासंबंधीच्या अफवा पसरण्यास सुरूवातही झाली आहे. या दुर्दैवी घटनेतही राजकारण करू पाहणार्‍या लोकांच्या मनाचा कोतेपणा कधी जायचा?? :(
  • Log in or register to post comments

अफवा आणि कोतेपणा

विकास
Tue, 06/03/2014 - 09:50 नवीन
धन्यवाद किसनराव स्पष्ट केल्याबद्दल... आपण सर्वच हे लक्षात ठेवून कुठल्याही माध्यमातून असले मेसेजेस दुर्लक्षित करूया आणि फॉरवर्ड करण्याचे पूर्णपणे टाळूयात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अत्यंत वाईट बातमी.

नितिन थत्ते
Tue, 06/03/2014 - 09:36 नवीन
अत्यंत वाईट बातमी. श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

@स्वतः मंत्री असले तरी ही

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/03/2014 - 09:36 नवीन
@स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...>>> +++१११ एक खरा लोकनेता हरपला! :(
  • Log in or register to post comments

(No subject)

सुहास..
Tue, 06/03/2014 - 09:38 नवीन
  • Log in or register to post comments

मुंडेसाहेबांना आदरांजली.RIP.

नानासाहेब नेफळे
Tue, 06/03/2014 - 09:39 नवीन
मुंडेसाहेबांना आदरांजली.RIP.
  • Log in or register to post comments

ट्रॅफिक सिग्नल

विकास
Tue, 06/03/2014 - 09:43 नवीन
एनडीटिव्हीवर सांगितल्याप्रमाणे: एका गाडीने ट्रॅफिक सिग्नल लाल झाला तरी तो सिग्नल तोडून पुढे आली, जेंव्हा मुंडे यांची गाडी हिरव्या दिव्यामुळे पुढे आली होती. त्या गाडीला बाजूने (काटकोनात) जोरात धक्का मारला. थोडक्यात ही हानी होण्याचे कारण केवळ लाल सिग्नल तोडणे हे होते... डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे: त्यांना आणले तेंव्हाच त्यांचे श्वसन बंद होते आणि हृदयक्रीया बंद होती. जवळपास ५० मिनिटे त्यांना रिवाइव करण्याचा प्रयत्न केला गेला. एक नाकावर किंचित जखम सोडल्यास वरकरणी काहीच लागलेले नाही. अंतर्गत जखमा झाल्या होत्या का ते शवविच्छेदनानंतरच समजेल असे म्हणले जात आहे.
  • Log in or register to post comments

R. I. P. मुंडेजी

पगला गजोधर
Tue, 06/03/2014 - 09:48 नवीन
R. I. P. मुंडेजी
  • Log in or register to post comments

लोकनेत्याला श्रद्धांजली.

प्रचेतस
Tue, 06/03/2014 - 09:49 नवीन
लोकनेत्याला श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

अत्यंत वाईट बातमी.

मुक्त विहारि
Tue, 06/03/2014 - 09:49 नवीन
श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

धक्कादायक बातमी!!!

सावत्या
Tue, 06/03/2014 - 09:50 नवीन
धक्कादायक बातमी!!! महाराष्ट्राचे एक झुंजार नेतृत्व हरपलं!!!! महाराष्ट्राला त्यांची उणीव सदैव भासेल!!! मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!
  • Log in or register to post comments

दु:खद बातमी. श्रद्धांजली.

आतिवास
Tue, 06/03/2014 - 10:01 नवीन
दु:खद बातमी. श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

अगदी वाईट झाले

हुप्प्या
Tue, 06/03/2014 - 10:03 नवीन
फार वाईट वाटले. असे व्हायला नको होते. नवी खासदारकी, नवे मंत्रीपद, कर्तृत्वाला आवाहन करणारी नवी क्षितिजे उघडत असताना दैवाने डाव साधला. माझी श्री मुंडे यांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

धक्कादायक.

प्रभाकर पेठकर
Tue, 06/03/2014 - 10:03 नवीन
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी. कठोर संघर्ष करीत नावारुपाला आलेल्या धडाडीच्या नेत्याला केंद्रात मानाचे मंत्रीपद मिळाले असताना अचानक काळाने घाला घातला.
  • Log in or register to post comments

अत्यंत वाईट बातमी.

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/03/2014 - 10:06 नवीन
अत्यंत वाईट बातमी. श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

अगदी धक्कादायक आहे

सुधीर जी
Tue, 06/03/2014 - 10:10 नवीन
अगदी धक्कादायक आहे श्री मुंडे यांना श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

सौंदाळा
Tue, 06/03/2014 - 10:10 नवीन
श्रद्धांजली चांगला लोकनेता हरपला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.
  • Log in or register to post comments

अत्यंत धक्कादायक बातमी.

मितान
Tue, 06/03/2014 - 10:15 नवीन
अत्यंत धक्कादायक बातमी. मराठवाड्यात वाढलेल्या माझ्यासारख्या असंख्यांच्या बालपणावर प्रमोद महाजन्,विलासराव देशमूख आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावाचे ठसे उमटलेले आहेत. माहेरचा कर्तबगार माणूस गेल्याचं फीलिंग येतंय :( सतत संघर्ष, अनेक यशापयश, कौटुंबिक आणि पक्षीय बंडाळी या सर्वांना पुरून उरलेला हा माणूस एका अपघातात गेला यावर विश्वासच बसत नाही. श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

गड आला पण..

मितभाषी
Tue, 06/03/2014 - 10:28 नवीन
मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली....
  • Log in or register to post comments

मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली....

शिद
Tue, 06/03/2014 - 10:44 नवीन
आयुष्यभर एक ध्यास घेऊन अखंड झटत राहायचं... कष्टांना नुकतीच कुठं फळं येऊ लागली असताना अपघाती मृत्यू व्हावा... अगदी हळहळ वाटण्यासारखं आणि सुन्न करून टाकणारं आहे हे!गोपीनाथ मुंडेंच्या अविरत कष्टांना सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली...!
  • Log in or register to post comments

अत्यंत वाईट बातमी.

विजय_आंग्रे
Tue, 06/03/2014 - 10:52 नवीन
अत्यंत वाईट बातमी. श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

पैसा
Tue, 06/03/2014 - 10:55 नवीन
ज्यासाठी इतकी वर्षे लढा दिला ते करून दाखवायची संधी समोर असताना असं व्हावं हे प्रचंड दुर्दैव. सगळ्यांचंच. मुंडेसाहेबांना श्रद्धांजली. मात्र प्रमोद महाजनांना भावाने गोळ्या घातल्यावर एकट्याने उचलून हॉस्पिटलमधे नेणारा माणूस शॉकमधे जाऊन हार्ट अटॅक येऊन गेला यावर विश्वास बसत नाहीये. टीव्हीवर गाडी दाखवताहेत तिलाही फार धक्का बसल्याचं जाणवत नाहीये.
  • Log in or register to post comments

दैवदुर्विलास

सर्वसाक्षी
Tue, 06/03/2014 - 11:00 नवीन
भाजप वैभवाच्या शिखरावर असताना आणि गोपिनाथजींना त्यांच्या दिर्घ पक्षनिष्ठेचे योग्य ते फळ मिळालेले असताना ते फळ चाखण्यापूर्वीच त्यांचे असे निधन व्हावे हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. मुंडेसाहेबांची लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला नेत्रदिपक यश मिळवुन देण्याची महत्वाकांक्षा अधुरी राहीली. मा. श्री गोपिनाथ मुंडे यांना सादर श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

भावपुर्ण श्रद्धांजली

शुभां म.
Tue, 06/03/2014 - 11:13 नवीन
महाराष्ट्राचे एक जेष्ठ नेते व मराठवाड्याचा बुलंद आवाज मा.खा.गोपिनाथ मुंडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

..........

_मनश्री_
Tue, 06/03/2014 - 11:19 नवीन
अत्यंत धक्कादायक बातमी!! भावपुर्ण श्रध्दांजली........ *sad*
  • Log in or register to post comments

भावपुर्ण श्रद्धांजली !

धर्मराजमुटके
Tue, 06/03/2014 - 11:24 नवीन
काही नेते नुकतेच नावापुरते नेते असतात. मात्र गोपीनाथ मुंडे हे खरेच लोकनेते होते. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! अशा अकाली निधनाच्या बातम्या वाचल्यावर उरात धडकी भरते. जन पळभर म्ह्णतील हाय हाय ! मी जाता राहिल कार्य काय ! रामकृष्ण ही आले गेले त्या विना जग का ओसची पडीले ! ही भा. रा. तांबेंची कविता आठवते. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणार्‍यांचे काय होईल हा विचार मनात सारखा सारखा येत असतो. इतर वेळेस मस्त मजेत जगताना असे प्रसंग मुळापासून हादरवतात. त्यामुळे कल करे सो आज कर ! आज करे सो अब ! पल मे प्रलय होएगी , बहुरि करेगा कब ? हेच खरे !
  • Log in or register to post comments

धक्कादायक...!

आत्मशून्य
Tue, 06/03/2014 - 11:26 नवीन
भावपुर्ण श्रध्दांजली.... :(
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

पेट थेरपी
Tue, 06/03/2014 - 11:30 नवीन
अतिशय वाइट वाटले. उमदे व्यक्तिमत्व . त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
  • Log in or register to post comments

मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही.

psajid
Tue, 06/03/2014 - 11:37 नवीन
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
  • Log in or register to post comments

+१

सखी
Tue, 06/03/2014 - 17:14 नवीन
असेच....अतिशय दु:खद आणि धक्कादायक, त्यांच्या कुटुंबियांना या कठिण काळातुन जाण्याचे बळ येवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: psajid

श्रद्धांजली

मित्रहो
Tue, 06/03/2014 - 11:39 नवीन
मराठवाड्याचा वाघ हरवला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना. -मित्रहो
  • Log in or register to post comments

श्रध्दांजली

स्पार्टाकस
Tue, 06/03/2014 - 11:49 नवीन
गोपीनाथरावांना विनम्र श्रध्दांजली..!!! अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments

अपघात नसून घातपात असण्याची

आतिवास
Tue, 06/03/2014 - 11:59 नवीन
अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते. अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही.

psajid
Tue, 06/03/2014 - 11:52 नवीन
"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
  • Log in or register to post comments

मुंढेसाहेबांना श्रद्धांजली !

सस्नेह
Tue, 06/03/2014 - 11:53 नवीन
मुंढेसाहेबांना श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

भाजपला महाराष्ट्रात खऱ्या

संपत
Tue, 06/03/2014 - 11:57 नवीन
भाजपला महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने वाढवणाऱ्या लोकनेत्याला श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

नि३सोलपुरकर
Tue, 06/03/2014 - 12:09 नवीन
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
  • Log in or register to post comments

ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो

प्यारे१
Tue, 06/03/2014 - 12:43 नवीन
:( ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा