आमची सुट्टी झ्याक.
राती अंगणात झोपायचं, सकाळी गार पाण्याची आंगोळ.
दिवसभर आंबे, खेळ.
अब्यास न्हाई. मार न्हाई.
घरात लई पावणे. आत्याची, मामाची पोरं.
त्यांच्यासंग शुद्ध बोलते.
अन्यादादान कागदाचे रंगीत तुकडे आणलेत.
मोजले म्या. सव्वीस लाल, सव्वीस काळे.
‘क्याट’ म्हनत्येत त्येला.
खेळतात ती समदी.
त्यादिशी बगत बस्ली.
सोनीदीदी अन्यादादाला “किलवर दश्शी” मागितली.
अन्यादादा बोल्ला, “नाटेठोम”.
मंग अन्यादादाने मागितलं तर राजादादाने येक पत्ता दिला त्याला.
मंग आमचा दादा राजादादाला “नाटेठोम” म्हन्ला.
म्या इचारलं “नाटेठोम? म्हंजे?”
दादा म्हन्ला, “घरात नाही”.
तितक्यात बायेर कुनीतरी आलं.
“अण्णा आहेत का पोरी?” काका इचारले.
“नाटेठोम” म्या सांगितलं.
आईने हाक मारली.
कैतरी काम असणार.
म्या म्हन्ली ” नाटेठोम”!
*शतशब्दकथा
वाचने
13976
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली कथा.
मस्त! आन्जी नवा शब्द शिकली तर
+१
In reply to मस्त! आन्जी नवा शब्द शिकली तर by यशोधरा
मस्तं.
लगे रहोssss! नाटेठोम.
गोड अन्जी
सव्वीस लाल, सव्वीस काळे.
आन्जी रॉक्स
आन्जी रॉक्स...
छान
आञ्जी रॉकति रॉकते!!!
मस्तच !!
मस्तच...
आवडली...
नाटेठोम !!
भारीये.
हाहाहा!
आईने हाक मारली.
आन्जी गोड आहे. तिचे केस
+१
In reply to आन्जी गोड आहे. तिचे केस by रेवती
काळाच्या ओघात ....
आन्जी हुश्शार आहे !
ह्म्म्म...
In reply to आन्जी हुश्शार आहे ! by मनीषा
आन्जी चिंटू बनते आहे
In reply to ह्म्म्म... by योगी९००
आडौली.
येक नंबर!!!
आभार
हा हा हा हा हा ..लईच !
नाटेठोम!
नाटेठोम
मोजक्या शब्दातील कथा आवडली.
अशा गोष्टी वाचल्या ना... की
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}