मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाटेठोम

आतिवास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आमची सुट्टी झ्याक. राती अंगणात झोपायचं, सकाळी गार पाण्याची आंगोळ. दिवसभर आंबे, खेळ. अब्यास न्हाई. मार न्हाई. घरात लई पावणे. आत्याची, मामाची पोरं. त्यांच्यासंग शुद्ध बोलते. अन्यादादान कागदाचे रंगीत तुकडे आणलेत. मोजले म्या. सव्वीस लाल, सव्वीस काळे. ‘क्याट’ म्हनत्येत त्येला. खेळतात ती समदी. त्यादिशी बगत बस्ली. सोनीदीदी अन्यादादाला “किलवर दश्शी” मागितली. अन्यादादा बोल्ला, “नाटेठोम”. मंग अन्यादादाने मागितलं तर राजादादाने येक पत्ता दिला त्याला. मंग आमचा दादा राजादादाला “नाटेठोम” म्हन्ला. म्या इचारलं “नाटेठोम? म्हंजे?” दादा म्हन्ला, “घरात नाही”. तितक्यात बायेर कुनीतरी आलं. “अण्णा आहेत का पोरी?” काका इचारले. “नाटेठोम” म्या सांगितलं. आईने हाक मारली. कैतरी काम असणार. म्या म्हन्ली ” नाटेठोम”! *शतशब्दकथा

वाचने 13969 वाचनखूण प्रतिक्रिया 32

पैसा गुरुवार, 05/29/2014 - 22:11
नवा शब्द कसा वापरायचा आन्जीला लग्गेच कळलं!

भृशुंडी गुरुवार, 05/29/2014 - 22:34
आईने हाक मारली. कैतरी काम असणार. म्या म्हन्ली ” नाटेठोम”!
हे एक नंबर! कथेची रचनाही खूप आवडली

चौकटराजा Fri, 05/30/2014 - 08:24
काळाच्या ओघात घोळू, डिंग्री, या भाजा, भुतांखेतांच्या गोष्टी, कल्हईवाला, कंदिल, पिवडीचा रंग हे सगळे गायब व्हायला लागलेयत कसचे गायब झालेयत. जो पर्यंत चर्चगेट- विरार , छशिट- कर्जत लोकल आहेत तो पर्यंत पत्याना मरण नाही पण नाटेठोम ला भवितव्य नाही. या अजब खेळाची आठवण करून दिल्याबद्द्ल धन्स !

In reply to by मनीषा

योगी९०० Fri, 05/30/2014 - 16:06
आन्जी हुश्शार आहे ! नविन शिकलेला शब्द कधी आणि कसा वापरायचा हे तिला बरोबर कळतं. यावेळी मात्र आन्जी निरागस वाटली नाही. थोडे वय वाढल्याने "निरागसपणा दाखवत स्वतःचे काम कसे करून घ्यावे" हे समजण्याची हुशारी आन्जीला आली आहे असे वाटले. बाकी शशक आवडली.

जयनीत Sat, 05/31/2014 - 14:25
आन्जे करून घे नखरे जोवर पावने हायेत घरात तवर. एक डाव जाऊ दे त्याईले मंग आई अण्णा दावतील तुले नॉट्याठोम म्हंजे काय -हायते थे.

मदनबाण गुरुवार, 06/12/2014 - 10:35
अशा गोष्टी वाचल्या ना... की दिवस यकदम ग्वाड होउन जातो बघा. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}