Skip to main content

पडघम २०१४-भाग १७: पूर्ण देशातील अंदाज

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 11/05/2014 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
पडघम २०१४-भाग १७: पूर्ण देशातील अंदाज यापूर्वीचे लेखन भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक भाग २: क्रिटिकल मास भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा) भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश भाग १२: बॅटलग्राऊंड स्टेट-पंजाब भाग १३: बॅटलग्राऊंड स्टेट-उत्तराखंड भाग १४: बॅटलग्राऊंड स्टेटस-उत्तर भारतातील इतर राज्ये भाग १५: बॅटलग्राऊंड स्टेटस-पूर्व भारतातील राज्ये भाग १६: बॅटलग्राऊंड स्टेटस-दक्षिण भारतातील राज्ये आता या भागात आपण आतापर्यंत मांडलेल्या अंदाजांचा आढावा घेऊ.त्यापूर्वी पश्चिम भारतातील गोवा, दिव-दमण आणि दादरा नगर हवेली या चार लोकसभा मतदारसंघांचे अंदाज राहिले आहेत त्याविषयी लिहितो. गोव्यातील दोनपैकी उत्तर गोव्याची जागा भाजपला तर दक्षिण गोव्याची जागा कॉंग्रेसला धरतो. दिव-दमण आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांवर गुजरातमधील वातावरणाचा मोठा परिणाम होतो.त्यामुळे या दोन्ही जागा भाजपला मिळतील असे धरतो. तसेच पूर्व भारतात अंदमान-निकोबारच्या जागेचा अंदाज व्यक्त केलेला नव्हता. १९९९ प्रमाणे यावेळीही भाजपचे विष्णूपद रे जिंकतील असे मला वाटते. तसेच दक्षिण भारतात लक्षद्वीपच्या जागेचाही अंदाज व्यक्त केलेला नव्हता.ही जागा कॉंग्रेस जिंकेल असे धरतो. तेव्हा विभागनिहाय निकालांचे अंदाज पुढीलप्रमाणे १. दक्षिण भारत
 
दक्षिण भारत 
एकूण जागा१३१
  
एन.डी.ए३२
भाजप१६
तेलुगु देसम१२
पी.एम.के
मद्रमुक
  
यु.पी.ए२९
कॉंग्रेस२७
केरळ कॉंग्रेस मणी
मुस्लिम लीग
  
डावी आघाडी१२
  
इतर५८
अण्णा द्रमुक२१
वाय.एस.आर कॉंग्रेस१४
द्रमुक१३
तेलंगण राष्ट्रसमिती
जनता दल (धर्मनिरपेक्ष)
एम.आय.एम
२. पूर्व भारत
 
पूर्व भारत 
एकूण जागा१५४
  
एन.डी.ए५४
भाजप४८
लोक जनशक्ती
उत्तर-पूर्वेतील इतर एन.डी.ए पक्ष
  
यु.पी.ए३७
कॉंग्रेस२६
राजद१०
झारखंड मुक्ती मोर्चा
  
डावी आघाडी१५
  
इतर४८
तृणमूल कॉंग्रेस२५
बीजू जनता दल१४
जनता दल (संयुक्त)
झारखंड विकास मोर्चा
सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट
उत्तर-पूर्वेतील इतर पक्ष
३. उत्तर भारत
 
उत्तर भारत 
एकूण जागा१५१
  
एन.डी.ए९१
भाजप८७
अकाली दल
हरियाणा जनहित कॉंग्रेस
  
यु.पी.ए२६
कॉंग्रेस२४
नॅशनल कॉन्फरन्स
  
इतर३४
समाजवादी पक्ष१६
बहुजन समाज पक्ष१३
आय.एन.एल.डी
पी.डी.पी
आम आदमी पक्ष
४. पश्चिम भारत
 
पश्चिम भारत 
एकूण जागा१०७
  
एन.डी.ए८३
भाजप६७
शिवसेना१५
शेतकरी संघटना
  
यु.पी.ए२३
कॉंग्रेस१६
राष्ट्रवादी कॉंग्रेस
  
इतर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
तर पूर्ण देशातील निकालांचे अंदाज पुढील तक्त्यात दिले आहेत.
     
 दक्षिण भारतपूर्व भारतउत्तर भारतपश्चिम भारतएकूण
 १३११५४१५११०७५४३
      
एन.डी.ए३२५४९१८३२६०
भाजप१६४८८७६७२१८
तेलुगु देसम१२   १२
पी.एम.के   
मद्रमुक   
लोकजन शक्ती   
उत्तर-पूर्वेतील इतर एन.डी.ए पक्ष   
अकाली दल   
हरियाणा जनहित कॉंग्रेस   
शिवसेना   १५१५
शेतकरी संघटना   
      
यु.पी.ए२९३७२६२३११५
कॉंग्रेस२७२६२४१६९३
केरळ कॉंग्रेस मणी   
मुस्लिम लीग   
राष्ट्रीय जनता दल १०  १०
झारखंड मुक्ती मोर्चा   
नॅशनल कॉन्फरन्स   
राष्ट्रवादी कॉंग्रेस   
      
डावी आघाडी१२१५२७
      
इतर५८४८३४१४१
अण्णा द्रमुक२१   २१
वाय.एस.आर कॉंग्रेस१४   १४
द्रमुक१३   १३
तेलंगण राष्ट्रसमिती   
जनता दल (धर्मनिरपेक्ष)   
एम.आय.एम   
तृणमूल कॉंग्रेस २५  २५
बीजू जनता दल १४  १४
जनता दल (संयुक्त)   
झारखंड विकास मोर्चा   
सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट   
उत्तर-पूर्वेतील इतर पक्ष   
समाजवादी पक्ष  १६ १६
बहुजन समाज पक्ष  १३ १३
आय.एन.एल.डी   
पी.डी.पी   
आम आदमी पक्ष   
महाराष्ट्र नवनिर्माण सेना   
यावरून कळते की एन.डी.ए ला २६० (भाजप: २१७) आणि यु.पी.ए ला ११५ (कॉंग्रेसला ९३) जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे ७ खासदार आणि वाय.एस.आर कॉंग्रेसचे १४ खासदार नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला फार अडचण करतील असे नाही.तसेच सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि उत्तर पूर्व भारतातील इतर काही पक्ष यांचाही पाठिंबा नरेंद्र मोदींना मिळायला अडचण येऊ नये.तेव्हा नरेंद्र मोदीच भारताचे पुढचे पंतप्रधान होतील असे मला वाटते. काही राज्यांमध्ये जनमत चाचण्यांपेक्षा मी एन.डी.ए ला कमी जागा दिल्या आहेत.उत्तर प्रदेशात भाजप तब्बल ३८% मते मिळवेल असे काही चाचण्या म्हणत आहेत.चतुरंगी लढतीत भाजपने ३८% मते मिळविल्यास माझ्या अंदाजाप्रमाणे भाजप ६० जागा सुध्दा जिंकू शकेल.अर्थात ३८% मते पक्षाला मिळणे या गृहितकावर हे अवलंबून आहे.तसे झाल्यास एन.डी.ए ला निर्विवाद बहुमत मिळेल. नक्की काय होते हे १६ मे रोजीच कळेल. मतमोजणी झाल्यानंतर मी एकूण निकाल आणि माझे अंदाज यांच्यात तुलना करणारा एक लेख नक्कीच लिहेन. सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल आणि सहकार्याबद्दल आभार. मिपाकरांचे प्रोत्साहन नेहमीच हुरूप वाढविणारे असते. तसेच पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे ज्ञानोबाचे पैजार, पैसाताई, राहुलजीव्ही, सुहासदवन आणि श्रीरंग जोशी यांनी ही आकडेवारी एकत्र करायला महत्वाची मदत केली. त्यांचे परत एकदा आभार मानून पडघम-२०१४ या लेखमालेची सांगता या लेखाबरोबर करत आहे. धन्यवाद

वाचने 43334
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

+1

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

+१११

@क्लिंट@:एवढ्या जागा मिळाल्या तर तुमच्या तोंडात साखर पडो. भाजपला साधारणपणे २२० किंवा त्या पेक्षा थोड्या जास्त जागा मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होणार यात शंका नाही.सध्याच्या एनडीएला २६० जागा मिळाल्या तर अनेक छोटे मोठे पक्ष त्यांना येवून मिळतील. वायएसआर आणि टीएसआर बद्दल तुम्ही बोलला आहातच.मात्र त्याबरोबरच नवीन पटनाईक,द्रमुक किंवा अद्रमुक आणि आत्ता कितीही नाही नाही म्हणत असल्या तरी ममता / माया येणार नाहीतच असे नाही. खरे तर माया/ममता/ जयललिता न येता सरकार बनले तर तेच जास्त चांगले ठरेल.आपण परिश्रमपूर्वक ही लेखमालिका लिहिली याबद्दल आपले आभार!

In reply to by दुश्यन्त

हो बरोबर. समजा २६० जागा खरोखरच एन.डी.ए ला मिळाल्या तर उगते हुए सुरज को प्रणाम म्हणून इतर अनेक पक्ष मागे यायची शक्यता आहेच. मग सेक्युलॅरिझम वगैरे गेले तेल लावत. जनमताचा कौल मोदींना मिळाला मग त्यांना नाही म्हणणारे आम्ही कोण हे जस्टीफिकेशन आहेच. :) त्यातल्या त्यात नवीन पटनायक बरोबर आले तर चांगले होईल. जितके शक्य होईल तितके जयललिता, ममता आणि मायावती या पाताळयंत्री राजकारण्यांना दूर ठेवता आले तर चांगलेच.

In reply to by क्लिंटन

नवीन पटनायक बरोबर आले तर चांगले होईल.
याची शक्यता खूप कमी वाटते. ओरिसामध्ये लोकल पातळीवर फार फाटलं आहे भाजपा आणि बीजेडीचं असं वाचनात आलं होतं मध्ये.

In reply to by अनुप ढेरे

याची शक्यता खूप कमी वाटते.
हो बरोबर. याची शक्यता कमीच आहे.तरीही मायावती, ममता, जयललिता यांच्यासारख्यांपेक्षा नवीन पटनायक कधीही परवडले. अर्थात कोणालाही बरोबर घ्यायची गरज लागली नाही तर सर्वात चांगले होईल.

In reply to by क्लिंटन

सगळे येतील, अगदी मुलायम, ममता सुद्धा येतील. पाय चाटत येतील. ही लोक सत्ते वर येण्यासाठी काहीही करतील.

In reply to by क्लिंटन

उगते हुए सुरज को प्रणाम म्हणून इतर अनेक पक्ष मागे यायची शक्यता आहेच. मग सेक्युलॅरिझम वगैरे गेले तेल लावत. अगदी!! साहेबांचा नॅशनलिस्ट पक्ष पण एनडीए मध्ये जाईल...

In reply to by क्लिंटन

निवडणुक अंदाज आणि निकाल... क्लिंटन आपण अत्यंत कष्टपुर्वक विदा मिळवून सादर केलेल्या विविध राज्यातील अंदाज सहज पाहण्यात आले. कांग्रेस व अनेक पक्षांचे पानिपत पाहता पूर्व निकालाचा अनुभव नेहमीच कामाला येतो असे नाही असे दिसते. असो. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा चुनाव मधे आपले ्अंदाज वाचायला मिळावेत.

प्रचंड मोठं काम केलंस! तरी हे अंदाज बरेच सावध वाटत आहेत. प्रत्यक्षात भाजप + मित्रपक्षांना याहून जास्त जागा मिळू शकतील असे वाटते. द. गोव्याची जागा काँग्रेसला जाईल असा तुझा अंदाज असला तरी यावेळी परिस्थिती वेगळी आहे. विधानसभा निवडणुकांत भाजपाने द. गोव्यात चांगली कामगिरी बजावली होती. मगोपने अगदी मनापासून भाजपचा प्रचार केला आहे. आणि आआपच्या उमेदवार स्वाती केरकर या भाजपापेक्षा काँग्रेसचीच मते खातील असा अंदाज आहे. प्रचारात काँग्रेसचे अस्तित्वच कुठे जाणवले नव्हते. अ‍ॅड. नरेंद्र सावईकर तसे बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत. त्यामुळे द. गोव्यातही भाजप जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही. उ. गोवा श्रीपाद नाईक यांच्यासाठी सोपी लढत असते. त्यातही दयानंद नार्वेकर यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केल्याने श्रीपादभाऊंना ही लढत आणखीच सोपी झाली आहे. काही अनपेक्षित निकालांमुळे एन डी ए पूर्ण बहुमत कदाचित मिळवू शकेल असे वाटते. काही झाले तरी परत निवडणुका नको आहेत आणि सध्याचे सरकार तर गेलेच पाहिजे.

In reply to by पैसा

तरी हे अंदाज बरेच सावध वाटत आहेत. प्रत्यक्षात भाजप + मित्रपक्षांना याहून जास्त जागा मिळू शकतील असे वाटते.
हो बरोबर.यापेक्षा जास्त जागाही मिळू शकतील.म्हणूनच मी एन.डी.ए वर २६० ते २९० मध्ये बुल स्प्रेड आणि युपीए वर १४० आणि ११० मध्ये बेअर स्प्रेड करत आहे :)

In reply to by पैसा

+१... नार्वेकरांनीही काही ठराविक एरियातच प्रचार केला. पुर्ण मतदार संघही नाही. आमच्या भागात दयानंद नार्वेकर आलेसुद्धा नाही. एक गंमत सांगते. T-20 world cup च्या मॅचेस च लाईव स्ट्रीमिंग आमच्या इथे असलेल्या Goa Cricket Association च्या ग्राउंडावर सुरु होत. तर आम्ही तिथे मस्त मॅच बघत बसलो होतो. तर आप वाल्यांनी आपली प्रचाराची गाडी तिकडे अणुन पार्क केली. आणि त्यांची गाणी, वै. वै. सुरु केली. माझ्या मागचे तरुण शिव्या घालत हओते त्यांना अक्षरशः काँग्रेस चा दुसरा पक्ष म्हणे. आणि काही वेळाने लोकांनी त्यांना तिथले हाकलले .

In reply to by प्रीत-मोहर

माझ मत उत्तर गोव्यात आहे, पण सासर द. गोव्यात असल्याने तिथली स्थिती माहित आहे. पै तै ,चर्चिल आलेमाव वगैरे लोकांच काँग्रेसमधुन बाहेर पडण बरच महागात पडेल काँग्रेस ला. आलेमाव ब्रदर्स आणि फॅमिलीने गोव्यात काँग्रेस चा प्रचारही केलेला नाहीये. चर्चिल्कन्या वालंका उठुन गोव्याबाहेर पोचली होती प्रचाराला.

वर पश्चिम भारतात (महाराष्ट्रात) आरपीआयला २ जागा दाखवल्या आहेत. मात्र हा पक्ष केवळ एक जागा (सातारा) लढवत आहे आणि ती जागा ते नक्कीच हारणार आहेत. मात्र सेनेच्या २ जागा वाढू शकतात किंवा स्वाभिमानीची एखादी जागा वाढू शकते तेव्हा एकूण बेरीज फार बदलणार आहे असे वाटते.

In reply to by दुश्यन्त

वर पश्चिम भारतात (महाराष्ट्रात) आरपीआयला २ जागा दाखवल्या आहेत. मात्र हा पक्ष केवळ एक जागा (सातारा) लढवत आहे आणि ती जागा ते नक्कीच हारणार आहेत.
तपशीलातील चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. सोमवारी एक्झिट पोल्सचे अंदाज प्रसिध्द होतील.त्यापूर्वी ही लेखमाला पूर्ण करायची होती.मधल्या काळात एका नातेवाईकांच्या आजारपणामुळे या लेखमालेवरील काम मागे पडले होते.तेव्हा गेल्या दोन दिवसात बरेच लेख पूर्ण करायचे होते आणि त्याचा ताण पडला. यातून ही तपशीलातील चूक झाली. ती दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल करत आहे.

सुपर्ब...ह्या अप्रतिम लेखमालेसाठी आभार. तू निवडणुकांचा अभ्यास प्रचंड मेहनतीने, चिकाटीने आणि काळजीपूर्वक केला आहेस, ते प्रत्येक लेखात दिसून येते. जागांचे बहुतेक अंदाज बरोबर वर्तवलेस. आता वाट १६ मे ची :) कॉंग्रेसचा नायनाट होवो :)

अत्यंत अभ्यासपूर्ण लेखमाला. त्या टी व्ही वरच्या " कोंबड्यांच्या झुंजी " व त्यांचे निवडणूक अंदाज ह्यांच्या पेक्षा कितीतरी पट सरस विश्लेषण वाचून समाधान झाले. तुमचा अंदाज -बुल स्प्रेड , अचुक येइल असे वाटते.

आतापर्यंत वाचलेल्या मालिकांमधली सर्वात परिश्रम घेऊन लिहीलेली लेखमाला. अत्यंत उत्क्रुष्ट विश्लेषण. तुमचे अंदाज बरोबर ठरोत आणि
एकूण निकाल आणि माझे अंदाज यांच्यात तुलना करणारा एक लेख
लिहिण्याची वेळच न येवो अशी शुभेच्छा व्यक्त करतो ;) तसेच आगामी विधानसभा निवड्णुकांदरम्यान अशीच लेखमाला परत वाचायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

क्लिंटन, तुमच्या लेखमालेबद्दल अभिनंदन! भाजपला कोणाच्याही कुबड्या न घेता संपूर्ण बहुमत मिळावे व काँग्रेसला ५४ पेक्षा कमी जागा मिळाव्या अशी इच्छा आहे. इश्वरेच्छा बलियसी!

अजून एक शक्यता समजा एनडीए २४०-२५० पर्यंत सिमित झाले तर त्या जागा नक्की अन्य ठीकाणी जातील जेणेकरून काँग्रेसच्या पाठींब्याने तिसरी आघाडी पुढे यायची शक्यता आहे. मोदींना रोखायला काहीपण, कसेपण, कुठेपण या न्यायानी. शक्यता कमी असली तरी शून्य नक्कीच नाही. क्लिंटनबा, फार परिश्रमपूर्वक लिहीलेली लेखमाला.

मेहनत खुप घेतली आहे हे दिसतेच आहे. पण हे असे होण्याची शक्यता खुप कमी वाटते. खासकरुन पुर्व आणि उत्तर भारतात. दक्षिण आणि पश्चिम भारतात मात्र परिस्थिती बरोबर दिसते आहे. एनडीए ला साधारण २०० ते २२० जागा मिळतील असे वाटते. मी चुकीचा ठरल्यास मला आनंदच होइल.

धन्यवाद. जरी काही राज्यात थोडा फरक वाटला तरी एकुणात अभ्यासपुर्ण. मोदी सरकार पूर्ण बहुमतानी यावे ही इछ्छा.

हि लेखमालिका लिहीण्यासाठी तुमची मेहनत, परीश्रम, चिकाटी व अभ्यास ह्या साठी तर बोलण्यास शब्दच नाहीत म्हणुन _/\_ स्विकारा. *good* बाकी तुम्ही वर्तवलेले सगळे अंदाज बरोबर यावेत व मोदी सरकार पूर्ण बहुमतानी सत्तेत यावे अशी आशा बाळगतो.

इंडियाटुडेचा मतदानोत्तर एक्झिट पोल एनडीला पूर्ण बहुमत मिळेल असे दाखवतोय (२६१ ते २८३). बाकीचे पोल पण साधारण असेच आकडे दाखवत आहेत. तसे झाले तर २७२ चा जादुई आकडा गाठायला अडचण येवू नये. आणि तेलंगण राष्ट्र समिती, बीजेडी वगैरे मागाहून बरोबर येतील किंवा काही जन बहरून पाठींबा देतील.ममता, माया, जयललिताच्या नाकदुर्या काढायला लागू नये हीच इच्छा. सगळ्यात बेभरवशी तर ममताच वातात.मात्र पोल दाखवतात तसे २६०+ जागा सध्याच्या एनडीएला मिळाल्या तर चिंताच मिटली. एकूण मोदींच्या नेतृत्वात भाजप मित्रपक्षांसह सरकार बनवेल अशीच जोरदार शक्यता आहे. १६ मेला असाच निकाल येवो.

प्रतिसाद देणार्‍या सर्व मिपाकरांना धन्यवाद. मिपाकरांच्या प्रोत्साहनामुळे आणि चर्चेत सक्रीय सहभाग घेतल्यामुळेच ही लेखमाला शक्य झाली. महाराष्ट्रावरील लेख आलेले असताना माझ्या नातेवाईकांच्या आजारपणामुळे मी तितका सक्रीय सहभाग घेऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी.

यावेळेस १९८४ पेक्षा देखील जास्त मतदान झाले आहे. मोदींना (फक्त भाजपाला) बहुमत मिळो अश्या मनापासून हार्दिक शुभेच्छा, पण राजीव गांधींसारखे पाशवी बहुमत न मिळो अश्या बाकींच्यांना शुभेच्छा!! मला व्यक्तिशः या वेळच्या निवडणूका सारे स्टॅतिस्टिकल अंदाज चुकवतील असे वाटते, कारण एक मोठा नवीन वर्ग यावेळेस मतदानासाठी उतरला आहे, आणि त्याच्या ट्रेण्ड चा बेंचमार्क कुठेही उपलब्ध नाही.

धन्यवाद, क्लिंटन ..!! उत्तम मालिका. कशी कधी प्रश्न पडतो की इतके सायास तुम्हाला रोजचे काम सांभाळून कसे जमत असतील! ग्रेट आहात. बाकी मोदींबद्दल वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवठेला बरा. ते पीएम झाले न झाले तरी फार मोठा फरक पडणार आहे असे कोणी मानू नये. खरेतर या अति-स्वप्नाळू आणि अवास्तव अपेक्षांमुळेच काँग्रेससारख्या धूर्तांचे फावते आणि ते परत परत येत राहतात. आपण आणि आपल्या आजू बाजूचे आहे तसेच (रस्त्यांवरची अनागोंदी, बारीक सारीक 'चलता है' म्हणत केलेल्या गोष्टी इत्यादि) राहणार असेल तर मोदी देखील या खंडप्राय देशात लगेच फार मोठा परिणाम करू शकणार नाहीत याची जाणीव ठेवावी लागेल.

In reply to by हाडक्या

बाकी मोदींबद्दल वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवठेला बरा. ते पीएम झाले न झाले तरी फार मोठा फरक पडणार आहे असे कोणी मानू नये. खरेतर या अति-स्वप्नाळू आणि अवास्तव अपेक्षांमुळेच काँग्रेससारख्या धूर्तांचे फावते आणि ते परत परत येत राहतात. आपण आणि आपल्या आजू बाजूचे आहे तसेच (रस्त्यांवरची अनागोंदी, बारीक सारीक 'चलता है' म्हणत केलेल्या गोष्टी इत्यादि) राहणार असेल तर मोदी देखील या खंडप्राय देशात लगेच फार मोठा परिणाम करू शकणार नाहीत याची जाणीव ठेवावी लागेल.
हो बरोबर. आता १६ तारखेची वाट बघत आहे.मला स्वतःला तरी मोदी पंतप्रधान होण्यात फार अडचण येईल असे वाटत नाही.तरीही एकदा ते आकड्यांमधून कन्फर्म झाले की मोदींपुढील आव्हाने म्हणून अजून एक लेख लिहावा असे म्हणत आहे :)

In reply to by क्लिंटन

१६ मे च्या मतमोजणीसाठी धागा सुरू करायची इच्छा आहे. त्यात निवडणुकीपुर्वीच्या मतदानपूर्व चाचणीचे अंदाज, मतदानोत्तर चाचणीचे अंदाज व तुमचे स्वतःचे अंदाज असे तीनही अंदाज द्यायचे आहेत. प्रत्यक्ष निकालानंतर तीनही अंदाजांची तुलना करता येईल. या निवडणुकीसाठी तुम्ही सुरवातीपासून अनेक अभ्यासू लेख लिहिले आहेत. त्यामुळे हा धागा सुरू करण्याचा मान तुमचाच आहे. १५ मे पूर्वी हा धागा सुरू करता येईल का? तुम्हाला वेळ नसल्यास मी सुरु करीन.

In reply to by श्रीगुरुजी

या निवडणुकीसाठी तुम्ही सुरवातीपासून अनेक अभ्यासू लेख लिहिले आहेत. त्यामुळे हा धागा सुरू करण्याचा मान तुमचाच आहे. १५ मे पूर्वी हा धागा सुरू करता येईल का? तुम्हाला वेळ नसल्यास मी सुरु करीन.
१५ मे पूर्वी मला धागा सुरू करणे थोडे कठिणच आहे.कारण सगळे एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोल शोधून त्यांचे दुवे देणे हे थोडे वेळखाऊ काम असेल.आणि खरे सांगायचे तर गेले काही दिवस एक्सेल फाईल्स, पीव्होट टेबल इत्यादींमध्ये खेळून थोडीशी दमछाकच झाली आहे.तेव्हा तुम्हाला धागा सुरू करायचा आहे ते जरूर करा. यात मानाचा प्रश्नच नाही.शेवटी जे काही लेख येतील ते आपल्या मिपासाठीच. मग ते कोणी का चालू केले असेनात :)

या लेखासाठी मुद्दाम आलो होतो. झकास लेख ! मला तुमचे विश्लेषण नेहमीच आवडते, अतिशय वस्तुनिष्ठ आणि न्यायी असे! तुम्ही भाजपवाले वाट्ता पण ते तुमच्या विष्लेषणात अजिबात डोकावत नाही ! तुमचा अंदाज थोडासा सावध वाटतो भाजप+ सहज बहुमत मिळवेल असा माझा कयास आहे. अर्थात आध्र आणि दक्षिण फार स्लीपरी आहे हे ही तितकेच खरे ! तुमच्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम !

फारच अभ्यासपूर्ण. काही दिवसातच तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून टिव्हीवर दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. मी पूर्ण मालिका नीट वाचली व फार कमी ठिकाणी माझी मते वेगळी होती. अर्थात हा प्रतिसाद आपल्याला व आपल्या टीमला धन्यवाद देण्यासाठी लिहिला आहे.

खास अभिनंदन! सगळी लेखमाला एक नंबर. तुमचे अभिनंदन करण्यासाठी खूप दिवसांनी मिपावर लॉगिन केले. पुढील लेखांची वाट पहात आहे. येऊ द्या.

क्लिंटन, खुप कष्ट घेतलेत राव तुम्ही.. अन त्यातुन आकाराला आलेली ही लेखमाला केवळ अफाट. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर भाजप ला बहुमत मिळो अन तुमच्या तोंडात साखर पडो.!

भाजपा ची व कॉग्ग्रेस ची आर्थिक धोरणे सारखी आहेत. दोघांच्या काही मजबूरी ( उदा. दलिताना पाठिंबा, अन्न सुरक्षा ई ) देखील सारख्या आहेत. प्रशासनात मनमोहन यांच्या पेक्षा आलेच तर मोदी उजवे ठरतील. मनमोहन यानी स्वयंपाकाच्या गॅस पुरवठ्यातील गैरप्रकार शोधून समस्या सोडविली आहे. असा काही प्रयत्न करून खालच्या थरातील भ्रष्टाचार दूर करण्याचे मोदीनी ठरविले तर........? पण हा त्तरच मोठा अजब प्राणी आहे.

तुमच्या अभ्यासाला आणि चिकाटीला सलाम.... निकाल तुम्ही मांडले तसेच लागले तर अत्यानंद होईल. ह्या वेळी भाजपाला पूर्ण बहुमत मिळो आणि काँग्रेसचा नायनाट होवो ही ईच्छा आहे.....

तुमच्या पॅशनला सलाम. खुपच चिकाटीचं काम आहे हे. आशा आहे की - अब की बार मोदी सरकार..

आपले अंदाज चुकल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन! ;) जोक्स अपार्ट, बरेच अंदाज 'अतिसावध' होते हे लिखाणातही जाणवत होतंच. :)

अंदाज सगळ्यांचेच चुकले. ३३६ जागा एनडीएला मिळतील असे भाजपच्या नेत्यांनाही वाटले नसेल. फक्त चाणक्यच्या एग्जिट पोल सर्वे ने एनडीएला ३४० जागा दाखवल्या होत्या आणि सगळ्यांना हे अंदाज अगदीच अवास्तव वाटत होते. पण अखेरीस तेच अंदाज खरे ठरले. :-) भले भले गारद झाले. छगन भुजबळ पडले हे उत्तम झाले. राष्ट्रवादीची धूळदाण महराष्ट्रासाठी उपकारक ठरेल. अत्यंत घाणेरडे राजकारण करणारा हा गुंडांचा पक्ष जितक्या लवकर संपेल तितके राज्याचे लवकर भले होईल. शरद पवारांना आता तरी आपल्या राजकारणातल्या चुका लक्षात आल्या असतील. भयंकर उन्माद, सत्तेचा माज, अराजक, पराकोटीचा भ्रष्टाचार, अरेरावी, गुंडगिरी, स्वार्थ, जातीजातींमध्ये तेढ, ब्राम्हण-मराठा द्वेषाची पेरणी, नुकत्याच घडलेल्या ऑनर किलिंगच्या लाजिरवाण्या घटना, सत्तेसाठी हपापलेपण (शरद पवार आता एनडीएची स्तुती करत तिथे काही जागा मिळतेय का याची चाचपणी करत होते) याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राला काय दिले हा प्रश्न शरद पवारांनी स्वतःला विचारावा आणि शांतपणे निवृत्त होऊन बारामतीमध्ये तिथल्या क्रिकेट असोसिएशनला जमेल तसे (फार जास्त नाही) मार्गदर्शन करावे हेच त्यांच्यासाठी उत्तम आहे. अजित पवारांसारखा बेजबाबदार नेता पुन्हा उभा राहणे महाराष्ट्रातल्या जनतेला परवडणारे नाही. शरद पवारांची गणिते चुकली. धूर्त, मुत्सद्दी, दिग्गज नेता असल्या स्वतःच्याच खोट्या प्रतिमेत अडकलेला परंतु भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतात सगळ्यात जास्त बदनाम झालेला नेता याखेरीज त्यांची अजून काही प्रतिमा होणे शक्य नाही. चुकीच्या विचारांना कवटाळल्याने काय परिणाम होतो हे त्यांना आज कळले असेल. आता राष्ट्रवादी काँग्रेस नामशेष झालेलीच उत्तम! विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपवणे हे महाराष्ट्रातल्या जनतेचे आद्य कर्तव्य आहे. 'आप'ला दीड वर्षात लोकसभेत ४ जागा मिळतात आणि पवारांसारख्या तथाकथित धूर्त, मुत्सद्दी, अनुभवी वगैरे राजकारण्याने १५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जेमतेम ५ जागा मिळतात हीच पवारांसाठी नामुष्कीची आणि लज्जास्पद गोष्ट आहे. असल्या भयंकर दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसने बरखास्त करावी हेच उत्तम!! महाराष्ट्राने उगीच या नेत्याला मुत्सद्दी, धोरणी, धूर्त वगैरे म्हणून डोक्यावर घेतले. वास्तविक स्वतःच्याच चुकीच्या धोरणांनी स्वतःचे इतके नुकसान करून घेणारा क्वचितच कुणी दुसरा नेता असेल. मराठा समाजाच्या बळावर आपल्याला वाट्टेल तसे घाणेरडे राजकारण करता येईल अशी दिवास्वप्ने बघणारा हा नेता आता राष्ट्रीय राजकारणातून हद्दपार झालेला आहे. एनडीएला आता कुठल्याच पक्षाच्या आधाराची गरज नाही. फुटकळ खासदारांच्या जोरावर हा माणूस पंतप्रधानपदाची स्वप्ने कशी काय बघत होता हे कळत नाही. हा मुत्सद्दी, धूर्त वगैरे नेता इतका कसा काय भोळा असू शकतो? केवळ बापजाद्यांच्या जमिनी, माज, सत्तेत भागीदारी, गुर्मी, गुंडगिरी, गुंठामंत्रीगिरी असले दुर्गुण निर्भेळ यश कधीच देऊ शकत नाहीत हे पवारांसारख्या चलाख वगैरे नेत्याला कळले नाही हे आश्चर्यच आहे. शेवटी त्यांची महत्वाकांक्षा अपूर्णच राहिली आणि अपूर्णच राहणार यात शंकाच नाही! राजकीय अपयश यापेक्षा वेगळे ते काय असू शकेल? बाकी अमाप पैसा तर हजारो-लाखो लोकं (प्रामाणिकपणे) देखील कमवतात. सुप्रिया सुळेंची लढत राष्ट्रवादीला बारामतीमध्येच किती अवघड गेली हे आठवून आठवून पवारांना आपण काय गमावले हे आयुष्यभर डाचत राहिल. आणि तेच योग्य आहे.

In reply to by समीरसूर

हीच लाट विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकेल आणि त्यात राष्ट्रवादीसारखा समाजकंटकी पक्ष नेस्तनाबूत होईल अशी आशा. पुढारी लोक आपण जनतेचे सेवक आहोत, त्यांचे प्रतिनिधी आहोत वगैरे नाटकी संवाद तरी म्हणत असत. पण राष्ट्रवादीने हे नाटकही करणे बंद केले होते. गुर्मी, माज, मग्रूरी ह्या गोष्टींनी उच्छाद मांडला होता. भुजबळ बुडाला, तटकरे थोडक्यात का होईना पण बुडला, तीच गोष्ट बारावी पास डॉक्टर नाईकांची हे उत्तम झाले. शंकाच नाही. सुळेबाईंनाही झटका मिळाला असता तर बरे झाले असते. पण आज नाही तर उद्या ते होईल अशी आशा. पवारांसारख्या चालू माणसाचे समर्थन भाजपाला घ्यायची वेळ येणार नाही हे ईश्वराचे भाजपावरच नव्हे तर भारतावर उपकार आहेत. त्यांचा मुत्सद्दी, मुरब्बी वगैरे विशेषणांचा धुराचा पडदा लवकरच विरो आणि त्या माणसाचे क्रूर, स्वार्थी, ढोंगी, खोटारडे रुप समाजासमोर येवो. समीरसूर, तुमच्या सगळ्या लेखाशी सहमत.

In reply to by समीरसूर

वाक्यावाक्याशी सहमत! प्रचंड टाळ्या!! पवाराइतका भेकड, निकम्मा आणि हरामखोर माणूस भारतीय राजकारणात झाला नाही. उगाच पब्लिकनी डोक्यावर चढवलेला एक अतिमहत्त्वाकांक्षी, पाताळयंत्री पण निकम्मा माणूस अशीच मी त्याची गणती करतो. मी भाजपाचा वा मोदींचा समर्थक नाही, पण पवारला पुरतं ओळखून चुकलेला जर कोणी माणूस असेल तर तो म्हणजे नरेंद्र मोदी असं मला नेहेमी वाटत आलय. असल्या माफियाला स्वतःच्या बळावर दोन आकडी जागा मिळवता आल्या नाहीत. जिथे जयललिता, ममता वा नवीन पटनाईक ने मोदी लाटेत सुद्धा २०-३५ जागा घेतल्या, तिथे ह्या स्वयंघोषित जाणत्या राजाला ४-५ खासदारांवर भीक मागायची वेळ मतदारांनी आणली, हे असल्या माफिया, गुंडगिरीच्या राजकारणाचे मोठे अपयश आहे. पुन्हा एकदा खणखणीत शब्दात मांडल्याबद्दल अभिनंदन!

In reply to by बाळकराम

मनातील शरद पवाराविषयी असणार्‍या भावनाना योग्य शब्दात मांडल्याबद्दल धन्यवाद.अत्यंत हलकट राजकारण करणारा हा नेता मराठा असुच शकत नाही.ह्याला यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील ह्याच्या रांगेत उभे करणार्‍याची किव केली पाहिजे.

हे पहा निकाल.... NDA UPA AAP OTHERS TOTAL NEWS TV 335 60 4 144 543 ABP NEWS 336 59 4 144 543 INDIA TV 334 61 4 144 543 NEWS 24 337 58 4 144 543 NEX EXPRESS 336 60 4 143 543 NEWS NATION 337 61 4 141 543 SAMAY 334 59 4 146 543 Z BUSINESS 336 59 4 144 543 TIMES NOW

अपेक्षेहून अधिक खरं निघालं की.

नमस्कार मंडळी, माझे अंदाज चुकले याचा मला आनंदच आहे. पुढील राज्यात अंदाज बर्‍यापैकी बरोबर आले असे म्हणायला हरकत नाही: १.राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, छत्तिसगडः यापैकी केवळ उत्तराखंडमध्ये मी भाजपचा स्वीप होईल असे म्ह्टले होते.प्रत्यक्षात या राज्यांपैकी मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या राज्यांमध्ये एकूण जागा कमी आल्या आणि बाकी सगळ्या जागा भाजपने जिंकल्या. या राज्यांमध्ये मी भाजपला ९५ जागा दिल्या होत्या.प्रत्यक्षात जागा आल्या १०३. हे अंदाजांचे तितक्या प्रमाणावर अपयश जरूर आहे पण या राज्यांमध्ये अंदाज बर्‍यापैकी बरोबर आले असे म्ह्णायला हरकत नसावी. तसेच झारखंडमध्ये १४ पैकी १२ जागा मी दिल्या होत्या.त्या तितक्याच आल्या. २. बाकी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये निकालांचे अंदाज आकड्यांमध्ये नक्कीच चुकले पण एकूण निकालांचा कल (कोणता पक्ष जास्त जागा जिंकेल) हे बरोबर ओळखले होते. उत्तर प्रदेशात ८० पैकी ७३ जागा मला वाटते चाणक्य सोडून इतर कोणीच दिल्या नव्हत्या. ३. कर्नाटक आणि केरळमधील अंदाजांचा आकडा आणि कल दोन्ही चुकले. असो. या अंदाजांचे यश आणि अपयश दोन्ही माझेच. :)

In reply to by क्लिंटन

केलेले विदापुर्वक लेखन महत्वाच्या विषयावर वाचायला मिळते. अंदाज चुकले कारण त्यामगील अभ्यास वा दिशा चुकीची न्हवतीच तर या निवडणुकीत विचारात घ्यायचे फॅक्टर्सच फार बदलले आणी यापुढील निवडणुका हे फॅक्टर्स टाळु शकणार नाहीत. विशेषतः (कर्तुत्ववान) तरुणांचे मानसीक खच्चीकरण करणारी राजनीती यापुढे बाद होत जाणार.

In reply to by क्लिंटन

असो. या अंदाजांचे यश आणि अपयश दोन्ही माझेच. त्याबद्ल तुम्ही अमेरिकेच्या अदध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे राव ... आता खरे सांगतो कॉगीचे पानीपत २००९ मध्येच व्हायचे पण त्यांचे अलायन्स त्यावेळी नीट जमले म्हणून. बाकी शरद पवार, राज ठाकरे या घरभेद्यांचे तीन तेरा वाजले हे चांगले झाले.आता राजने स्वता: ला उद्धवच्या पक्षात विलीन करावे व शरद पवारानी स्वत: चा जातीयपणा विसरत कॉग्रेसमधे सामील व्हावे. गांधी घराण्याचा नाद करायचा नाय हे जर कोंगीना कळले नाही तर २०१९ मधे फक्त चार सीट मिळतील. जोतिरादित्य सिंदिया हा नेता बनायला चांगला आहे असे वाटते.

In reply to by क्लिंटन

देशाचा एकूण कल तुझ्या बरोबर लक्षात आला होता, पण सगळीकडे दिसणारे 'वारे' आणि लोकांची मनस्थिती पाहता तुझे अंदाज काहीसे सावध आहेत आणि भाजपा आघाडीला संपूर्ण बहुमत मिळू शकेल असं वाटलं होतं. आणि तसंच झालं. हे असंच घडताना गोव्याच्या विधानसभा निवडणुकांत पाहिलं होतं. लोकांच्या भावना न समजण्याची चूक काँग्रेसला चांगलीच महाग पडली आहे. यावरून ते काही शिकतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. नव्याने आलेले मतदार सगळे एकगट्ठा भाजपकडे वळलेले दिसतात. आणि इतर पक्षही लोकांचा राग समजू शकले नाहीत. या निवडणुकांत लोकांनी काँग्रेसला पायउतार करू शकणार्‍या एकाच पक्षाला मते दिली आहेत. अपवाद जया अम्मा आणि ममता आणि बिजू जनता दल यांचा. कठीण प्रसंगात भारतीय जनता एकदिलाने आणि एका सामुदायिक शहाणपणाच्या प्रेरणेने वागते हे परत अधोरेखित झालं. इतक्या सुंदर अभ्यासू लेखमालिकेसाठी पुन्हा एकदा धन्यवाद!

महागाई, घोटाळे, निर्णय न घेणे, बेताल वक्तव्ये, जनतेला गृहीत धरणे, सत्तेची मस्ती आणि बर्याच ठिकाणी गुंडागर्दी या सगळ्या गोष्टी कॉंग्रेस आघाडीला भोवल्या. भाजपचा शिस्तबद्ध प्रचार, मोदींचा करिष्मा, मोदी आणि गुजरात मॉडेलचे लोकांना आकर्षण यामुळे देशात भाजपा आणि एनडीएला अभूतपूर्व यश मिळाले आहे. विधानसभेतही आता महायुतीच येईल. फक्त यशाने हुरळून न जाता जोमाने प्रचार करत राहायची गरज आहे.

काही अंदाज चुकले असले तरी कल बरोबर होता तुमचा. निकाल सगळ्यांनाच अनपेक्षित होते. जनतेच्या मनाचा ठाव लागणे तसे कठीणच. तरीही तुमचा अभ्यास, पृथ्थकरण, माहितीसंकलन, इत्यादी कौतुकास्पद होतेच. त्यामुळे तुमचे अभिनंदन करावेच लागेल. :-) समीर

आप्ले अंदाज हे स्टॅटिस्टिकल मॉडेलवर आधारित होते. (थोड्याफार प्रमाणावर निश्चित). स्टॅटिस्टिक्सची ही एक मोठी कमतरता आहे की तेथे जमिनीवर काय चालले आहे ते कळत नाही. तुम्हाला जर सगळ्या ठिकाणी दौरा करता आला असता तर तुमचे अंदाज जास्त बरोबर आले असते.......

महारष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे अंदाज व्यक्त करणार्‍या धाग्याची आतुरतेने वाट पहात आहे ...

In reply to by प्रसाद गोडबोले

+१ बाकी, विविध राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालात भाजपची बर्‍यापैकी पिछेहाट झालेली दिसतेय. आता महाराष्ट्र व हरीयाणा मध्ये काय होतं हे पाहणं रोचक ठरेल.

युती व आघाडी यांच्यात जागावाटप नक्की झाल्यानंतरच अंदाज व्यक्त करता येतील. सद्यपरिस्थितीत युती व आघाडीने एकत्रित निवडणुक लढविली (एकमेकांनी कसेही जागावाटप केले) तर युतीचा दणदणीत विजय नक्की आहे. पण भाजप वि. शिवसेना वि. आघाडी किंवा भाजप वि. शिवसेना वि. राकाँ. वि. काँग्रेस असे सर्वजण वेगळे लढले तर भाजप सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरेल परंतु कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही.

क्लिंटन , आपण हा सांख्यिकीय डेटा कोठुन मिळवत होता ? मी इलेक्शन कमीशनच्या साईटवर सर्चुन पाहिले पण सत्व डेटा पीडी एफ रीपोर्ट्स मधे आहे , त्याचे क्लीनींग करुन अ‍ॅनालिसिस करणे हे बरेच जिकरीचे काम आहे :( जर इतरत्र कोठे हा डेटा उपलब्द असेल तर जरुर कळवा :)

In reply to by प्रसाद गोडबोले

http://www.indiavotes.com/ या साईटवरून आम्ही आधी टेबल्स कॉपी पेस्ट करत होतो. पण नंतर क्लिंटनला आणखी एक साईट सापडली होती, तिथे सगळा डेटा एक्सेलमधे उपलब्ध होता. ती कोणती ते मात्र मला आता आठवत नाहीये.