Skip to main content

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 13/04/2014 05:21 या दिवशी प्रकाशित केले.
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?

तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये

बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये

                                         - गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==

लेखनविषय:

वाचने 34101
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by गंगाधर मुटे

मुटे सहेब, अता उन एत्का वदहला अहे के, सुरय्य देवने पन तेची जात दावु नये असे महनावे लगेल.[ थनदेइ कुनामुले पदते ते महित नहे. नायतर तयचए पन कदलि असते थन्दिमधये. अहो जात कदलि मह्नुन अन्गनाआवर भुनकाअयाल तो कय बओस अहे क? शिवया घलतना बओसच चेरा समोर अनयचाअ. :) कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. (संपादित)

In reply to by बालगंधर्व

काय लिहिलंय..................मेलो ना मी =)) >>>>>>>> कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे. नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)) :)) :)) या बाल्याला कुणितरी आवरा रे! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका. -दिलीप बिरुटे
बिरुते सर, मि अप्ला अबहरि अहे. नय्तर इक्दे बहव्नचा कुहुप इसुह्यु होतो.

In reply to by बालगंधर्व

तब्बल पंधरा मिनिटे लागली प्रतिसाद वाचून समजायला. :) रच्याकने खूप कष्ट पडले असतील नै, जाणून बुजून अशुध्द टंकलेखन करायला. ;)

In reply to by पैसा

ओह! धन्यवाद पै नविन व्याख्या समजावून सांगितल्याबद्दल. पण बालगंधर्व अचानक कसे काय अवतरले ब्वॉ? अन् ते ही मुंटेंच्या धाग्यावरच??

काय ठरलं मग? जात पडताळणी / वैधता कागदपत्रांची पूर्तता झाली का? शेवटची मुदत कधीपर्यंत? मेन ऑफिस पुण्यालाच आहे ना अजून? मुळात हे 'देव'लोक जातीचं प्रमाणपत्र घ्यायला लायक आहेत का? आर टी आय खाली माहिती मिळेल काय?

छान .आवडली.

कविता आवडली. मुटे सरांचे प्रतिसाद आवडले .