वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये
वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये
एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये
कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?
तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये
बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये
- गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==
वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये
एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये
कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?
तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये
बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये
- गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
34101
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुटे सहेब, अता उन एत्का वदहला
In reply to सर काळजी नसावी. by गंगाधर मुटे
अरारा....
In reply to मुटे सहेब, अता उन एत्का वदहला by बालगंधर्व
हा हा....
In reply to अरारा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै नै तुम्ही लिहित राहा.
In reply to @मुते साहेब.....>>>> by अत्रुप्त आत्मा
अहो काका
In reply to नै नै तुम्ही लिहित राहा. by बालगंधर्व
खूप कष्ट पडले असतील नै, जाणून
In reply to मुटे सहेब, अता उन एत्का वदहला by बालगंधर्व
हेहे!
In reply to खूप कष्ट पडले असतील नै, जाणून by किसन शिंदे
ओह! धन्यवाद पै नविन व्याख्या
In reply to हेहे! by पैसा
हल्ली भावना भलतीच संवेदनशील
काय ठरलं मग?
छान.
कविता आवडली.
कविता आवडली.. गाभ्रीचा पाउस