✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

भ
भावना कल्लोळ यांनी
Mon, 04/07/2014 - 21:10  ·  लेख
लेख
डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे. कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले. सगळी सांगोवांगी, फोन अ फ्रेंड, रामराम (आपले ते व्हाटस अप) वर सगळ्यांना पिंगवून सगळ्याजणी जमल्या. अस्मादिक मात्र गेल्या कट्ट्याला जागल्या प्रमाणे आणि रविवार असल्या कारणाने सुस्त येस टी च्या कृपेमुळे सगळ्याच्या नंतरच नियोजित ठिकाणी पोहचल्या. ठाणे ओवळे नाका इथे उतरून पहिल्या एका टपरीवजा हॉटेल मालकास विष्णुजी कि रसोई कुठे आहे रे बाबा? असे विचारले. केवढा मोठा तरी प्रश्नचिन्ह त्या बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर *unknw* . माझ्या मनात तर अरे तुझे विष्णु जी कि रसोई नाही माहित मग ठाण्यात राहतोस तरी कशाला असे काहीसे आलेले :-| शेवटी चारपाच रिक्क्षावाले, २ आजोबा यांना विचारून झाले. सगळ्याचे उत्तर माहित नाही. ऑ? आता असेच घरी जावे लागते आहे कि काय असा प्रश्न येउन गेला. मीच मधुराला फोन करून काही स्थळखुण आहे का विचारले. तर म्हणाली कि नवीन पेट्रोल पंपाचे काम चालू आहे त्याच्या बाजुला. तरी ७ मिनिटे चालून सुद्धा कुठे हि बांधकाम चालू असलेले दिसले नाही. शेवटी एक "सोलकढी" नामक हॉटेलात शिरून एकदम गरीब भाव चेहऱ्यावर आणत तिथल्या मेनेजरला ओशाळवाणे हसत पत्ता विचारला. मराठीदाक्षिण्य दाखवत त्याने मला सांगितले याच रस्त्यावर सरळ चालत जा ५ एक मिनिटावरच आहे. त्याचे आभार मानुन बाहेर आले. मनात म्हंटले हेमे, कसली आहेस ग तू, एका हॉटेलात शिरून सरळ दुसऱ्या हॉटेलचा पत्ता विचारतेस. नगच आहेस बाई … खिक्क. शेवटी त्याने सांगितल्या प्रमाणे बोर्ड दिसला. हुश्श …. म्हणजे कट्ट्याला हजेरी लागणार आपली. :yahoo: दरवाज्यातुन आत जाताच चिमण्याचा किलबिलाट ऐकू आला. ( म्हणजे काय? आणखीन कोण असणार?). आत जाताच एक मस्त डायलॉग चिटकवला " कुठे फेडाल ग हि पाप, १ किलोमीटर चालवले मला, २ किलो वजन कमी झाले न?" असे म्हणत हसत हसत विराजमान झाले. माझ्या अगोदरच सौ. मुवी, कस्तुरी, अजया, सूर( २कन्या समवेत), सविता ००१, अद्वेय ( सुपुत्र समवेत ), मीच मधुरा( त्यांच्या कन्ये समवेत), दुर्गावी, इनिगोय( त्यांच्या सुपुत्र समवेत), मोक्षदा आणि सेंटर ऑफ कट्टा मृणालिनीने अगोदरच हजेरी लावली होती. उशीरा आल्यामुळे अजयाने बहरेन इथुन आणलेल्या अत्तर आणि चॉकलेटला मला मुकावे लागले :'-( अजयाच्या घरी असलेल्या झाडावरचे आवळे तेवढे पदरात पडले तेच पवित्र मानले आणि आम्ही सुद्धा काही कमी नाही असे म्हणत वसई गावातले नुकतेच तोडुन आणलेले जाम स्टाटर म्हणून समोर टिपोय वर टाकताच दोन मिनिटात गुडूप पण झाले. मग बसल्या बसल्या सगळ्याची ओळख परेड झाली आणि गप्पांना वेग आला. १२. १५ चे १. १५ झाले हे पोटात कावळे काव काव करायला लागल्यावर समजले. मग भोजनस्थित झालो. हसत खेळत अस्सल महाराष्ट्रीयन आणि पंजाबी जेवणाचा फडशा पाडला. जेवण सांगता श्रीखंड व आइसक्रीमने करण्यात आली. अमंळ जेवण जास्त झाले म्हणून परत सोप्यावर ठाण मांडण्यात आले आणि पाहतो तर समोरच पानाचे काऊन्टर दिसले. मग काय दोन दोन पानाबरोबर परत गप्पाचा फड रंगला. प्रत्येकीला त्यांची बाकीचे हि कामे व बाहेर तात्काळले ड्रायवर असल्याने व मुले सुद्धा दंगामस्ती करून झाल्याने पेंगुळली होती. शेवटी जड अंतकरणाने आणि तुडुंब पोटाने विष्णुजीच्या रसोइतुन बाहेर पडलो. पण तरीही आजबाजूच्या अतिशय शोभिवंत व जून्या कालीन वस्तु समवेत फोटो काढण्याचे मोह आवरेना. शेवटचे फोटोशेशन करून पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी *BYE* करून पांगल्या. फोटो आणि बाकी काही तपशीलवार प्रतिसादातून पुरवले जातील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
23116 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

मस्त लिहिला आहे वृ हेमे,

यशोधरा
Mon, 04/07/2014 - 21:15 नवीन
मस्त लिहिला आहे वृ हेमे, आवडला. अवांतर : संजीवनी मंत्र म्हट्ला गं. २५००/- ला पडला मंत्र!
  • Log in or register to post comments

मस्त वृत्तांत...

शिद
Mon, 04/07/2014 - 21:22 नवीन
मस्त वृत्तांत... :) फक्त संमं सांगुन
पोरगी माघारपणाला येत आहे
चे 'माहेरपणाला' बदल करुन घ्या.
  • Log in or register to post comments

मस्त व्रुत्तांत....

मुक्त विहारि
Mon, 04/07/2014 - 21:26 नवीन
आवडला...
  • Log in or register to post comments

मस्त वृत्तांत!

अजया
Mon, 04/07/2014 - 21:49 नवीन
काही क्षणचित्रे! १.सर्व छायाचित्रे मोक्षदा ताईंनी काढली आहेत.अत्यंत उत्साहाने त्या सर्व जणींमध्ये मिसळून गेल्या! २. सौ.मुविनी कट्ट्याला हजेरी लावुन कुटुंब रंगलय कट्ट्यात चा प्रत्यय दिला.विशेष म्हणजे त्या आम्हा सर्व जणींना प्रथमच भेटल्या आहेत असे वाटलेच नाही!पण त्यांनी वड्या आणल्या नव्हत्या ,त्यामुळे वड्या मुविच बनवत असावेत असं वाटतय! ३.भावनाने मस्त किस्से आणि विडंबनं ऐकवुन मजा आणली कट्ट्याला! ४.सर्व बच्चा मंडळींनी आयांना अजीबात त्रास न दिल्याने कट्ट्याला जास्तच मजा आली! Image removed. सुरुवातेला जमलेल्या मैत्रिणी Image removed. Image removed. मिळून सार्‍याजणी! (लाल कपड्यांमध्ये अद्वेय आणि पुढे अद्वेयचा मुलगा अद्वेय, बाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस, इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया, अजया च्या मागे दुर्गावी, तिच्या पुढे सविता ००१, साविच्या मागे कस्तुरी, तिच्या बाजूला भावना कल्लोळ, पुढे सौ मूवी, बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर - आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+) Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

फोटोंमध्ये न दिसणार्‍या दोन

अजया
Mon, 04/07/2014 - 22:19 नवीन
फोटोंमध्ये न दिसणार्‍या दोन अनाहितांनी फोनमधुन कट्ट्याला हजेरी लावली होती.सानिकाने पश्चिमेकडुन आणि मनुराणीने पूर्वेकडुन!आमच्या इतक्याच उत्साहाने त्याही या कट्ट्याच्या ठरवण्यापासुन सहभागी होत्या. त्यामुळे फोनमधुन असल्या तरी त्या कट्ट्याला आल्या होत्याच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

जोरदार!!

सानिकास्वप्निल
Mon, 04/07/2014 - 22:39 नवीन
कट्टा दणक्यात होणार खात्रीच होती, खुसखुशीत वृत्तांत भावनाकल्लोळ आणी मस्तं फोटो मोक्षदाताई :) ह्या कट्ट्याला यायला जमले नाही म्हणून जळजळ झाली खरी पण मैत्रीणींशी गप्पा मारून खूप छान वाटले, मागच्या कट्ट्याची आठवण आली :) अनाहिता रॉक्स!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

फोटो आणि वृत्तांत छानच आहेत.

मनुराणी
Tue, 04/08/2014 - 15:27 नवीन
फोटो आणि वृत्तांत छानच आहेत. कट्ट्याला हजर नसलो तरी तिकडे काय चालू असेल, भेटल्या असतील का सगळ्याजणी, काय गप्पा चालू असतील, आता फोन करू का नंतर असे बरेच प्रश्न पडत होते. सर्व अनाहितांनी ठरवल्याप्रमाणे मागच्या वेळेप्रमाणे कट्टा जोरदार यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन. आणि असेच अनेक कट्टे भविष्यात होण्यासाठी खूप शुभेच्छा. जमेल तेवा आणि जमेल तशी हजेरी लावली जाईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

हा आता खरेच इनो ची बाटली

आरोही
Mon, 04/07/2014 - 22:29 नवीन
हा आता खरेच इनो ची बाटली ,सोडा -लिंबू ,कोकम सरबत काय हवे ते घ्या पण जरूर घ्याच .याची खरी गरज आहे आता काहींना ताक, Image removed. चिंचेचे सार https://farm8.staticflickr.com/7450/13690327384_971a0617b9.jpg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

चिंचेचे सार वडाभात

आरोही
Mon, 04/07/2014 - 22:33 नवीन
Image removed. चिंचेचे सार वडाभात Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

खरडा आणि ठेचा

अजया
Mon, 04/07/2014 - 22:49 नवीन
खरडा आणि ठेचा Image removed. Image removed. पाकातली बोरं! Image removed. लसूण फ्राय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

अग मी या फोटो ची वाट बघत होते

आरोही
Mon, 04/07/2014 - 22:56 नवीन
अग मी या फोटो ची वाट बघत होते मोक्षदा ताई कडून अजून असतील बघ चटण्यांचे जवळ जवळ ५-६ प्रकार होते त्याचे पण फोटो काढलेत ग ...;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

तीळाची चटणी,दाण्याची चटणी

अजया
Tue, 04/08/2014 - 07:40 नवीन
तीळाची चटणी,दाण्याची चटणी,पंचामृत Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अरेरे हा फोटो माझ्याकडून

आरोही
Tue, 04/08/2014 - 12:17 नवीन
अरेरे हा फोटो माझ्याकडून टाकायचा राहिला होता ....घ्या आता हा बघा ...होऊ दे जळजळ ... ;-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

पाकातली बोरं :-)

श्रीरंग_जोशी
Wed, 04/09/2014 - 09:27 नवीन
पाकातली बोरं - लहानपणी शाळेबाहेर मिळायची. मधल्या सुटीत अनेकदा खायचो. आजही ती चव जीभेवर रेंगाळत आहे :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

सौदीला जाण्यापुर्वी,

सौ.मुवि
Tue, 04/08/2014 - 21:22 नवीन
ह्यांनी वड्या केल्या होत्या.त्या संपल्या. आता पुढच्या वेळी, वड्या नक्की आणीन. बादवे, कट्टा मस्त झाला.तुम्हा सगळ्या जणींना भेटून मला खूप आनंद झाला. खरे तर, तुम्हा सगळ्या जणींना भेटण्यापुर्वी मनांत थोडी धाक-धूक होती, की आपण इथे नविन आहोत.सगळ्या जणी आपल्याशी कशा वागतील.पण पहिल्या क्षणा पासूनच तुम्ही मला तुमच्या सामावून घेतलेत. रोजच्या रांधा-वाढा अन उष्टी काढा, ह्या सरधोपट रहाटगाडग्यातून थोडे वेगळे पण मिळाले.त्यामुळे मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

वाह! कश्या का असेना पण

स्पंदना
Wed, 04/09/2014 - 05:14 नवीन
वाह! कश्या का असेना पण एक्स्प्रेस झाल्या तुम्ही अन त्याचा अतिशय आनंद वाटला. मुवि आम्हाला खुप आमचे वाटतात अन त्यांच्या म्हणुन तुम्हां बद्दलपण तोच जिव्हाळा आहे. कळावे अपर्णा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौ.मुवि

अपर्णा तै, प्रत्येक वाक्याशी

आरोही
Wed, 04/09/2014 - 14:21 नवीन
अपर्णा तै, प्रत्येक वाक्याशी सहमत ....सौ .मूवी छान वाटले तुम्हाला भेटून ...+)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

ओळख परेड ..

आरोही
Wed, 04/09/2014 - 14:34 नवीन
वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा ..+)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अरे

आरोही
Wed, 04/09/2014 - 14:41 नवीन
प्रतिसाद फोटो च्या खाली का येत नाहीये ?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

प्रतिसाद फोटोच्या खालीच आहेत.

प्यारे१
Wed, 04/09/2014 - 14:45 नवीन
प्रतिसाद फोटोच्या खालीच आहेत. ओळंबा लावा. (प्लंब बॉब) . . . . . . . . . . थोडे खाली आहेत एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

ओळख परेड

आरोही
Wed, 04/09/2014 - 14:38 नवीन
वरतून तिसऱ्या फोटो मध्ये लाल कपड्यांमध्ये मी आणि पुढे माझा मुलगा अद्वेय,माझ्याबाजूला इनिगोय आणि तिचा मुलगा वेधस ,इनीच्या मागे मृणालिनी ,dr .अजया ,अजया च्या मागे दुर्गावी,तिच्या पुढे सविता ००१ ,साविच्या मागे कस्तुरी ,तिच्या बाजूला भावना कल्लोळ ,पुढे सौ मूवी ,बाजूला मिचमधुरा तिच्यापुढे तिची लेक स्विनी आणि सूर आर्या आणि अनन्या सोबत आणि पुढे बसलेल्या मोक्षदा . ....+)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

फोटो टाकले हे छान झालं. मस्त

शुचि
Mon, 04/07/2014 - 21:50 नवीन
फोटो टाकले हे छान झालं. मस्त मस्त वृत्तांत :)
  • Log in or register to post comments

ओळख परेड हि होऊन जाउद्या

खटपट्या
Mon, 04/07/2014 - 21:52 नवीन
ओळख परेड हि होऊन जाउद्या
  • Log in or register to post comments

मस्त वृत्तांत!

पैसा
Mon, 04/07/2014 - 21:57 नवीन
मस्त वृत्तांत आणि फोटो! सगळी छोटी मंडळी पण मज्जेत दिसताहेत! करा धमाल!
  • Log in or register to post comments

खरेच मस्त कट्टा झाला न ..

आरोही
Mon, 04/07/2014 - 21:59 नवीन
खरेच मस्त कट्टा झाला न ...सकाळी ११ .३० वाजेपासून ३.३० फक्त धमाल नुस्ती....खरेतर बच्चे कंपनी नि सुद्धा खूप एन्जोय केले ..सगळी अगदी आधीपासून एकमेकांना ओळखत असल्यासारखी मिसळली एकमेकांत ..माझा मुलगा तर आज पण इनि च्या मुलाची आठवण काढत होता ...+)
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.. बहुतेकजणी

इनिगोय
Mon, 04/07/2014 - 23:01 नवीन
अगदी अगदी.. बहुतेकजणी समोरासमोर पहिल्यांदाच भेटल्या आहेत हे जाणवलंसुद्धा नाही. मला घरी गेल्यावर ज्युनिअर्सनी केलेल्या धांगडधिंग्याचा डिट्टेल अपडेटही मिळाला! बैलगाडीवर कस्सली धमाल केली आणि खुर्च्यांखाली कस्से लपलेलो याच्यासकट. :-D मस्त रिफ्रेश झालो सगळ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

फोटूsssssssssssssssssssssssss

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/07/2014 - 22:01 नवीन
फोटूssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss!!! :-/
  • Log in or register to post comments

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/07/2014 - 22:05 नवीन
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.............बोमल्यावरनं कमेंट जाईपर्यंत फोटू आले सुद्धा! :) आता ओळख परेडsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss :-/ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

फोटू साजरे आलेत !

मितान
Mon, 04/07/2014 - 22:02 नवीन
मस्त झालाय कट्टा...:) बाकी गॉसिप वाचायच्या आशेने आले होते पण..... हेमे, तुझसे ये उम्मीद न थी :(
  • Log in or register to post comments

अग आणि मोक्षदा ताई ने आणलेली

आरोही
Mon, 04/07/2014 - 22:02 नवीन
अग आणि मोक्षदा ताई ने आणलेली मोगऱ्याचे गजरे आणि चाफ्याची फुले पण तुला नाही मिळाली भावने... .....+)
  • Log in or register to post comments

वा! मस्त झालेला दिस्तोय कट्टा

बॅटमॅन
Mon, 04/07/2014 - 22:08 नवीन
वा! मस्त झालेला दिस्तोय कट्टा. यञ्जॉय!
  • Log in or register to post comments

अजून खादाडी चे फोटो यायचे

आरोही
Mon, 04/07/2014 - 22:08 नवीन
अजून खादाडी चे फोटो यायचे आहेत जरा वाट बघा .... +)
  • Log in or register to post comments

वा व्वा.. अभिनंदन...

केदार-मिसळपाव
Mon, 04/07/2014 - 22:20 नवीन
देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते. फोटो छान आहेत. बाकी अनहिता मंडळी कुठेही मागे नाहित. कट्टाही अगदी तोडिस तोड आहे. आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
  • Log in or register to post comments

हेच बोल्तो.

आत्मशून्य
Mon, 04/07/2014 - 22:34 नवीन
कट्टा आवडल्या गेल्या आहे... अनाहीताचा कट्टा हा तुलनेने कमी दिसणारा प्रकार आहे. याची वारंवारता वाढवली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

सहमत- असहमत

लंबूटांग
Tue, 04/08/2014 - 01:27 नवीन
देशात एकुणच कट्टा करण्याचे पेव फुटलेले दिसते. फोटो छान आहेत.
सहमत.
आणि कट्ट्याचा वृतांत अनाहिता सदरात न टाकता सर्वसामाण्य जणतेच्या विभागात टाकल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला? असो. बरेच अनुत्तरीत प्रश्न आहेत त्या विभागाच्या गरज आणि जस्टिफिकेशन(मराठी शब्द?) बद्दल त्यात हा अजून एक. किती वेळ राहतोय हा प्रतिसाद ते संमंच जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

समर्थनियता...

प्रभाकर पेठकर
Tue, 04/08/2014 - 01:30 नवीन
जस्टिफिकेशन(मराठी शब्द?) = समर्थनियता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

@ लंबूटांग -अनाहितांचा

पियुशा
Tue, 04/08/2014 - 10:50 नवीन
@ लंबूटांग -अनाहितांचा वृत्तांत इथे टाकण्याचे प्रयोजन समजले नाही. जर वेगळा विभाग आणि त्यांचाच कट्टा आहे तर मग हे इथे कशाला? का ? तुमची काही हरकत ? सगळ्या मिपाकराना वाचता यावा म्हणुनच टाकला असेल ना ? बाकी कट्टा एकदम झक्कास बर का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

शेवभाजी

आरोही
Mon, 04/07/2014 - 22:41 नवीन
शेवभाजी Image removed. झुणका Image removed. चना मसाला Image removed. पनीर बटर मसाला Image removed. दाल तडका Image removed. जीरा राईस Image removed.
  • Log in or register to post comments

जेवण के फोटो डकवने वालो, मिपा

सूड
Tue, 04/08/2014 - 11:22 नवीन
जेवण के फोटो डकवने वालो, मिपा की जनता माफ नहीं करेंगी!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

अनाहिता

आत्मशून्य
Mon, 04/07/2014 - 22:52 नवीन
अनाहिता मधे नसल्याचे दुखः निर्माण करणारा धागा. णीशेद..!णीशेद..!णीशेद..!
  • Log in or register to post comments

बाप्रे!

पैसा
Mon, 04/07/2014 - 23:02 नवीन
खादाडी मस्तच आहे!
  • Log in or register to post comments

पै तै, चटण्यांचे हि खूप

आरोही
Mon, 04/07/2014 - 23:05 नवीन
पै तै, चटण्यांचे हि खूप प्रकार होते परत श्रीखंड ,फुलके ,भाकरी,रोटी ,नान आणि खमंग अशी गरमागरम कांदाभजी पण होते ...+)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पै तै, चटण्यांचे हि खूप

आरोही
Mon, 04/07/2014 - 23:06 नवीन
पै तै, चटण्यांचे हि खूप प्रकार होते परत श्रीखंड ,फुलके ,भाकरी,रोटी ,नान आणि खमंग अशी गरमागरम कांदाभजी पण होते ...+)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ए तायांनो आधीच जळजळ झालीय.

सखी
Mon, 04/07/2014 - 23:21 नवीन
ए तायांनो आधीच जळजळ झालीय. अभी रुलाओगे क्या हमे :( :'(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोही

हेच म्हणते. बस, अब रुलाओगे

रेवती
Mon, 04/07/2014 - 23:34 नवीन
हेच म्हणते. बस, अब रुलाओगे क्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

विष्णुजी की रसोई

विकास
Mon, 04/07/2014 - 23:06 नवीन
चांगला वृत्तांत. परत शोधाशोध करायची वेळ आल्यास खालील नकाशा दाखवा. ;)
  • Log in or register to post comments

एकदा जाऊन आल्यावर परत शोधाशोध

आरोही
Mon, 04/07/2014 - 23:16 नवीन
एकदा जाऊन आल्यावर परत शोधाशोध कशी करावी लागेल बर ?????;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

विकासजी,

प्रभाकर पेठकर
Tue, 04/08/2014 - 14:00 नवीन
विकासजी, ह्यातून कसे शोधायचे? 'विष्णुजीकी रसोई' ह्या व्यतिरिक्त कांहीच खुणा नाहीत. आणि तेच तर शोधायचे आहे. हे दृष्य ७-८ हजार फुटांवरून पाहिल्यासारखे वाटते आहे. रस्त्याच्या मुख्य आणि ढोबळ खुणाही दिसत नाहियेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अहो,

ब़जरबट्टू
Wed, 04/09/2014 - 08:02 नवीन
काका, त्या चित्रावर जा, व उंदिराची कळ दाबा जरा, ७-८ हजारावरुन ७०-८० किमी वर सहज याल तुम्ही... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

:(

ब़जरबट्टू
Wed, 04/09/2014 - 12:26 नवीन
किमी नाय.. फूट .. फुट.. फुअतोयच आता.. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा