✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

भ
भावना कल्लोळ यांनी
Mon, 04/07/2014 - 21:10  ·  लेख
लेख
डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे. कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले. सगळी सांगोवांगी, फोन अ फ्रेंड, रामराम (आपले ते व्हाटस अप) वर सगळ्यांना पिंगवून सगळ्याजणी जमल्या. अस्मादिक मात्र गेल्या कट्ट्याला जागल्या प्रमाणे आणि रविवार असल्या कारणाने सुस्त येस टी च्या कृपेमुळे सगळ्याच्या नंतरच नियोजित ठिकाणी पोहचल्या. ठाणे ओवळे नाका इथे उतरून पहिल्या एका टपरीवजा हॉटेल मालकास विष्णुजी कि रसोई कुठे आहे रे बाबा? असे विचारले. केवढा मोठा तरी प्रश्नचिन्ह त्या बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर *unknw* . माझ्या मनात तर अरे तुझे विष्णु जी कि रसोई नाही माहित मग ठाण्यात राहतोस तरी कशाला असे काहीसे आलेले :-| शेवटी चारपाच रिक्क्षावाले, २ आजोबा यांना विचारून झाले. सगळ्याचे उत्तर माहित नाही. ऑ? आता असेच घरी जावे लागते आहे कि काय असा प्रश्न येउन गेला. मीच मधुराला फोन करून काही स्थळखुण आहे का विचारले. तर म्हणाली कि नवीन पेट्रोल पंपाचे काम चालू आहे त्याच्या बाजुला. तरी ७ मिनिटे चालून सुद्धा कुठे हि बांधकाम चालू असलेले दिसले नाही. शेवटी एक "सोलकढी" नामक हॉटेलात शिरून एकदम गरीब भाव चेहऱ्यावर आणत तिथल्या मेनेजरला ओशाळवाणे हसत पत्ता विचारला. मराठीदाक्षिण्य दाखवत त्याने मला सांगितले याच रस्त्यावर सरळ चालत जा ५ एक मिनिटावरच आहे. त्याचे आभार मानुन बाहेर आले. मनात म्हंटले हेमे, कसली आहेस ग तू, एका हॉटेलात शिरून सरळ दुसऱ्या हॉटेलचा पत्ता विचारतेस. नगच आहेस बाई … खिक्क. शेवटी त्याने सांगितल्या प्रमाणे बोर्ड दिसला. हुश्श …. म्हणजे कट्ट्याला हजेरी लागणार आपली. :yahoo: दरवाज्यातुन आत जाताच चिमण्याचा किलबिलाट ऐकू आला. ( म्हणजे काय? आणखीन कोण असणार?). आत जाताच एक मस्त डायलॉग चिटकवला " कुठे फेडाल ग हि पाप, १ किलोमीटर चालवले मला, २ किलो वजन कमी झाले न?" असे म्हणत हसत हसत विराजमान झाले. माझ्या अगोदरच सौ. मुवी, कस्तुरी, अजया, सूर( २कन्या समवेत), सविता ००१, अद्वेय ( सुपुत्र समवेत ), मीच मधुरा( त्यांच्या कन्ये समवेत), दुर्गावी, इनिगोय( त्यांच्या सुपुत्र समवेत), मोक्षदा आणि सेंटर ऑफ कट्टा मृणालिनीने अगोदरच हजेरी लावली होती. उशीरा आल्यामुळे अजयाने बहरेन इथुन आणलेल्या अत्तर आणि चॉकलेटला मला मुकावे लागले :'-( अजयाच्या घरी असलेल्या झाडावरचे आवळे तेवढे पदरात पडले तेच पवित्र मानले आणि आम्ही सुद्धा काही कमी नाही असे म्हणत वसई गावातले नुकतेच तोडुन आणलेले जाम स्टाटर म्हणून समोर टिपोय वर टाकताच दोन मिनिटात गुडूप पण झाले. मग बसल्या बसल्या सगळ्याची ओळख परेड झाली आणि गप्पांना वेग आला. १२. १५ चे १. १५ झाले हे पोटात कावळे काव काव करायला लागल्यावर समजले. मग भोजनस्थित झालो. हसत खेळत अस्सल महाराष्ट्रीयन आणि पंजाबी जेवणाचा फडशा पाडला. जेवण सांगता श्रीखंड व आइसक्रीमने करण्यात आली. अमंळ जेवण जास्त झाले म्हणून परत सोप्यावर ठाण मांडण्यात आले आणि पाहतो तर समोरच पानाचे काऊन्टर दिसले. मग काय दोन दोन पानाबरोबर परत गप्पाचा फड रंगला. प्रत्येकीला त्यांची बाकीचे हि कामे व बाहेर तात्काळले ड्रायवर असल्याने व मुले सुद्धा दंगामस्ती करून झाल्याने पेंगुळली होती. शेवटी जड अंतकरणाने आणि तुडुंब पोटाने विष्णुजीच्या रसोइतुन बाहेर पडलो. पण तरीही आजबाजूच्या अतिशय शोभिवंत व जून्या कालीन वस्तु समवेत फोटो काढण्याचे मोह आवरेना. शेवटचे फोटोशेशन करून पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी *BYE* करून पांगल्या. फोटो आणि बाकी काही तपशीलवार प्रतिसादातून पुरवले जातील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
23116 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

जबराट कट्टा

मधुरा देशपांडे
Mon, 04/07/2014 - 23:14 नवीन
जबराट कट्टा आणि वृत्तांत. काल चेपूवर फोटू बघूनच जळजळ झाली होती. आता डीट्टेल वृत्तांत आणि त्यावर खाद्यपदार्थांचे फोटू बघून तर खूपच झाली. त्यात अजून भर म्हणून माहेरचे वऱ्हाडी पदार्थ. वडा भात आणि झुणका आणि पाकातली बोरं आणि... हाय राम...
  • Log in or register to post comments

नाही मी बोलत आऽऽता!

रेवती
Mon, 04/07/2014 - 23:33 नवीन
नाही मी बोलत आऽऽता! ;)
  • Log in or register to post comments

आईशप्पथ!!

सानिकास्वप्निल
Tue, 04/08/2014 - 00:03 नवीन
खादाडीचे फोटो बघून जळजळजळ्जळ होतेय ...किती किती तो छळवाद....श्या पाकातली बोरं ....आईग्ग्गं....
  • Log in or register to post comments

आसुरी आनंद झाला!

प्यारे१
Tue, 04/08/2014 - 00:48 नवीन
आसुरी आनंद झाला! आपल्या पाकृ आमची अशीच जळजळ होत असते. बा द वे, विष्णु मनोहर हे आमच्या मातोश्रींच्या आवडीचे शेफ आहेत. उपलब्ध साहित्यामध्येच उत्तम पाकॄ बनवण्याचं कौशल्य हेच उत्तम बल्लव असण्याचं लक्षण आहे. ते कौशल्य विष्णू मनोहरांच्या कार्यक्रमामध्ये वारंवार दिसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

पाकातली बोरं हा नक्की काय

बॅटमॅन
Tue, 04/08/2014 - 00:17 नवीन
पाकातली बोरं हा नक्की काय प्रकार आहे बादवे> कृपया जाणकारान्नी मार्गदर्षण करावे ही इणंती.
  • Log in or register to post comments

मला वाटतं पाकात ते लहान

शुचि
Tue, 04/08/2014 - 00:53 नवीन
मला वाटतं पाकात ते लहान बोराएवढे रसगुल्ले असतात. अतिशय चविष्ट लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रसगुल्ले? मग बोरं कशाला

बॅटमॅन
Tue, 04/08/2014 - 00:57 नवीन
रसगुल्ले? मग बोरं कशाला म्हणतील त्याला? असो. असतीलही, आपल्याला काय शेवटी चव उत्तम लागल्याशी कारण म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हाहाहा अरे मी खाल्लेले -

शुचि
Tue, 04/08/2014 - 00:59 नवीन
हाहाहा अरे मी खाल्लेले - रसमालाईच पण अनेक लहान लहान रस्गुल्ला बोराएवढे घातलेली. अफाटच लागते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वा जबराटच!!!

बॅटमॅन
Tue, 04/08/2014 - 01:02 नवीन
वा जबराटच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

नै शुचि ही खरोखरची छोटी बोरं

आनन्दिता
Tue, 04/08/2014 - 03:35 नवीन
नै शुचि ही खरोखरची छोटी बोरं साखरेच्या / गुळाच्या पाकात शिजवलेली असतात... ऑस्स्स्स्स्स्स्म्म्म लागतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

(No subject)

शुचि
Tue, 04/08/2014 - 03:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

रसमालाईच पण अनेक लहान लहान

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 04/08/2014 - 11:42 नवीन
रसमालाईच पण अनेक लहान लहान रस्गुल्ला बोराएवढे घातलेली. तिला अंगूरमलाई म्हणतात. मस्त असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

पाकातली बोरं

मधुरा देशपांडे
Tue, 04/08/2014 - 01:05 नवीन
जी आपली नेहमीची बोरे असतात, ती वाळवतात आणि मग त्यांना गुळाच्या कि साखरेच्या पाकात शिजवतात. विदर्भात आणि बहुधा खानदेशात देखील हा प्रकार केला जातो. प्रमाणासहित पाकृ माहित नाही. जमल्यास ज्येष्ठ महिलांना विचारून सांगेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सॉरी मी एक पदार्थ खाल्ला होता

शुचि
Tue, 04/08/2014 - 01:08 नवीन
सॉरी मी एक पदार्थ खाल्ला होता ज्यामध्ये रसमलाईत लहान लहान बोराएवढे रसगुल्ले होते. मला वाटला त्याबद्दलच आपण बोलता आहात :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

तुम्ही म्हणताय ती अंगूर मलाई

मधुरा देशपांडे
Tue, 04/08/2014 - 01:10 नवीन
तुम्ही म्हणताय ती अंगूर मलाई असावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स

शुचि
Tue, 04/08/2014 - 01:11 नवीन
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

ऐला भारीचे की प्रकार! धन्स.

बॅटमॅन
Tue, 04/08/2014 - 01:12 नवीन
ऐला भारीचे की प्रकार! धन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

हा प्रकार

ब़जरबट्टू
Tue, 04/08/2014 - 12:56 नवीन
विदर्भात हा सहज आढळतो.. वाळलेली बोरे पातळ साखरेच्या पाकात थोडी मुरु दिली की झाले, चटमट एकदम... :) आता उन्हाळा सुरु झाला की, आंबा रस, वड्यांची भाजी, व त्या भाजीत ही बोरे मस्त.. आहाहा... (तोंपासु )बजरू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

साखर नाही, गुळाचा पाक.

त्रिवेणी
Tue, 04/08/2014 - 14:25 नवीन
साखर नाही, गुळाचा पाक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

साखरेचा पण असतो. दोन्ही

मधुरा देशपांडे
Tue, 04/08/2014 - 14:37 नवीन
साखरेचा पण असतो. दोन्ही प्रकार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

धन्यवाद

हवालदार
Tue, 04/08/2014 - 14:07 नवीन
हा प्रकार प्रथमच ऐकला. बोरे अह्मदबादी घ्यायची की गावठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

फोटोतली बोरे

रमेश आठवले
Tue, 04/08/2014 - 19:53 नवीन
फोटोतली बोरे अमदावादी नाहीत. ती बोरे लंब गोलाकार असतात आणि आपल्याकडे मिळतात त्या पेक्षा मोठ्या आकाराची. त्यांचा रंग हिरव्यापासून पिकण्याच्या स्थिती प्रमाणे पिवळा होत जातो - पण ती सहसा लाल होत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हवालदार

छानच हो.

अप्पा जोगळेकर
Tue, 04/08/2014 - 00:22 नवीन
छानच हो.
  • Log in or register to post comments

ह्या कट्ट्यावरी शतदा प्रेम करावे.......

प्रभाकर पेठकर
Tue, 04/08/2014 - 01:09 नवीन
व्वा! कट्टा आणि कट्टा वृत्तांत दोन्ही झकास. अनाहिताचे असेच वाढते कट्टे होवोत आणि संम्मेलनं भरोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments

हे सर्व पदार्थ तिथे रोज

खटपट्या
Tue, 04/08/2014 - 01:32 नवीन
हे सर्व पदार्थ तिथे रोज मिळतात ? कि स्पेशल सांगावे लागतात ? कारण हे ठिकाण माझ्या घरापासून जवळ आहे. जाता येईल.
  • Log in or register to post comments

संपर्कक्रमांक...

प्रभाकर पेठकर
Tue, 04/08/2014 - 01:36 नवीन
प्रत्येक कट्ट्याच्या खादाडीच्या वर्णनाशेवटी त्या त्या उपहारगृहाचा संपर्क क्रमांक देण्याची प्रथा सुरु करावी असे सुचवितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

विश्णूजी की रसोई,ओवळा नाका

अजया
Tue, 04/08/2014 - 08:03 नवीन
विश्णूजी की रसोई,ओवळा नाका ,ठाणे ९००४७९५४३२. ९९६७५४२८०५
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

धन्यवाद अजया तै

खटपट्या
Tue, 04/08/2014 - 10:26 नवीन
धन्यवाद अजया तै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

हम भी खड़े है राहोंमे

भीडस्त
Tue, 04/08/2014 - 12:44 नवीन
<<पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी Bye करून पांगल्या>> जीडीसीच्या पाप्यांनासुद्दील दया आवातानं एखान्दिशी... ;-) ;-) म्हणजे पो ट दु खी छातीतली ज ळ ज ळ एकदाची थांबेल तरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

बा भिडस्ता, जीडीसीच्या

अजया
Tue, 04/08/2014 - 14:25 नवीन
बा भिडस्ता, जीडीसीच्या पाप्यांना आवतानं कधीपासुन लागायला लागली? जळजळीसाठी इनो घे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त

एक स्तुत्य उपक्रम.

प्रभाकर पेठकर
Tue, 04/08/2014 - 14:03 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

धमाल केली...

कौशी
Tue, 04/08/2014 - 03:14 नवीन
फोटो आणि कट्टा वृत्तांत आवड्ला.
  • Log in or register to post comments

रसरशीत अन खुसखुशीत कट्टा झाला

स्पंदना
Tue, 04/08/2014 - 06:41 नवीन
रसरशीत अन खुसखुशीत कट्टा झाला. मी नेमकी मुलांबरोबर बाहेर गेले होते नाहीतर नक्कीच हजेरी लागायची होती. चटण्यांच वर्णन येइल का गो बायांनो?
  • Log in or register to post comments

संजिवनी मंत्र २५००/ ,तर

कंजूस
Tue, 04/08/2014 - 07:57 नवीन
संजिवनी मंत्र २५००/ ,तर गायत्रि मंत्र कितीला ? हे पदार्थ स्वत: वि०म० येऊन करतात का फक्त हॉटेल (खाणावळ)चे नाव आहे ?
  • Log in or register to post comments

छान कट्टा आणि वृत्तांत

प्रमोद देर्देकर
Tue, 04/08/2014 - 08:33 नवीन
छान कट्टा आणि वृत्तांत
  • Log in or register to post comments

दाल तडकाचा फोटो बघुन काय काय

स्पंदना
Tue, 04/08/2014 - 08:41 नवीन
दाल तडकाचा फोटो बघुन काय काय होतय ते कस सांगु?
  • Log in or register to post comments

सगळ्या अनाहितांचे खुप खुप

Mrunalini
Tue, 04/08/2014 - 09:40 नवीन
सगळ्या अनाहितांचे खुप खुप धन्यवाद!! माझ्यासाठी सगळ्याजणी अगदी खास वेळ काढुन आल्या. खुप छान वाटले. प्रत्येकीला पहिल्यांदाच भेटत होते, पण कुठेही असे जाणवले नाही. असे वाटत होते जसे काही बर्‍याच वर्षांपासुन एकमेकांना ओळखतोय. खरच खुप छान दिवस गेला तो. मस्त एंजॉय केले सगळ्यांनी. धन्स सर्वांना. :)
  • Log in or register to post comments

निमंत्रण....

प्रभाकर पेठकर
Tue, 04/08/2014 - 14:06 नवीन
'अनाहिता' ऐवजी मुख्य फलकावर निमंत्रण पाठविले असते तर बरेच जणं आले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

मस्त्...मस्त...

निवेदिता-ताई
Tue, 04/08/2014 - 10:54 नवीन
मस्त्...मस्त...
  • Log in or register to post comments

एकदम सही कट्टा आणि वृतांत

अस्मी
Tue, 04/08/2014 - 11:08 नवीन
एकदम सही कट्टा आणि वृतांत :)
  • Log in or register to post comments

पुण्यनगरीस्थित अनाहितांनो..

पिलीयन रायडर
Tue, 04/08/2014 - 11:13 नवीन
पुण्यनगरीस्थित अनाहितांनो.. खुप झालं इनो घेणं.. ह्या मुंबैकरांच्या नाकावर टिच्चुन कट्टा व्हायलाच हवा..!! (ह्याउप्पर मी अजुन काहीहि बोलणार नाहीये ह्या कट्ट्या बद्दल.. मुझे दुश्मनोने चेपु, अनाहिता और मिपा.. सब तरफसे घेर लिया है..)
  • Log in or register to post comments

चला आपण पण विश्नुजी की रसोईला

त्रिवेणी
Tue, 04/08/2014 - 11:19 नवीन
चला आपण पण विश्नुजी की रसोईला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पुण्यात पण आहे का ते? मग

पिलीयन रायडर
Tue, 04/08/2014 - 11:52 नवीन
पुण्यात पण आहे का ते? मग नक्की जाउ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

हो आहे. मी जाऊन आले एकदा तिथे

त्रिवेणी
Tue, 04/08/2014 - 11:57 नवीन
हो आहे. मी जाऊन आले एकदा तिथे. चला आता ठरवा बर पटापट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पुण्यातल्या विष्णूजी की

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 04/08/2014 - 14:23 नवीन
पुण्यातल्या विष्णूजी की रसोईचा पत्ता आणि फोन नंबर मिळू शकेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

सिध्दी गार्ड्न जवळ, म्हात्रे

त्रिवेणी
Tue, 04/08/2014 - 14:41 नवीन
सिध्दी गार्ड्न जवळ, म्हात्रे ब्रीज,डी.पी. रोड, एरंडवणा, पुणे. फोन नं.-7304418961
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

घ्या... त्रिवेनी ह्यांनी

प्रभाकर पेठकर
Tue, 04/08/2014 - 14:45 नवीन
घ्या... त्रिवेनी ह्यांनी तातडीने माहिती पुरविली आहे. कधी करताय पुण्याचा कट्टा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

तुम्हीच सांगा...

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 04/08/2014 - 19:41 नवीन
तुम्ही इथेच असलात तर... बोला कोणता दिवस मोकळा आहे? मी पुढाकार घेतो. नाहीतर पुढची फेरी होईल तेव्हा कळवा. तेव्हा तर नक्की करूच. (तेव्हा अगोदर एक ट्रायल रन ही झालेली असेल ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 04/08/2014 - 14:49 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

जमवाच आता! इज्जत का सवाल!!!

अजया
Tue, 04/08/2014 - 12:42 नवीन
=)) मुंबैकरणी पुण्यनगरीला पण येउन कट्टा करुन जातील बरं का,तुम्ही जमेपर्यंत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा