Skip to main content

डु आयडी !

लेखक इरसाल यांनी शनिवार, 05/04/2014 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा. तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते. त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा, १. खोडसाळपणा २. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे. ३. उगाच दंगा करणे ४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. ५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. ६. संपादकांना त्रास देणे. असो. तर आता मातृभाषेतुन सुरु करतो. तर लोकेसोन, मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस. मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्‍हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे. जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु. पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ? तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्‍हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं !

वाचने 31542
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

नेमक्या कारणावर कधीच एकमत होणार नाही १. खोडसाळपणा = १००% २. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे = ५०% - ५०% ३. उगाच दंगा करणे = ५०% - ५०% ४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. = ५०% - ५०% ५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. = ५०% - ५०% ६. संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१%

In reply to by आत्मशून्य

संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१% मी स्वता एकेकाळी ऑर्कुटवर केलेय. युवा जोशमध्ये असताना. काय कुठे अन कसे ते पुन्हा कधीतरी. पण मुद्दा हा की एखाद्याला वाटले की त्याच्याशी काहीतरी अन्याय वा पक्षपात झाला आहे तर बंडखोरी घडू शकते. संचालकांकडे अधिकार असतो की एखाद्याच्या पोस्ट उडवा वा बॅन करा तर मग याला उत्तर म्हणून फेक प्रोफाईल वा ड्यू आयडीचे हत्यार वापरले जाऊ शकते.

In reply to by तुमचा अभिषेक

मिपावर बहुतांश सध्याचे संपादक हे तसे एकतर सदस्यांच्या उपद्व्यापाने वैतागलेले अथवा पद प्रिय असल्याने विवादात जाणीवपुर्वक तठस्थ भुमीका राखणारे असतात. त्यामुळे ते उघड अन्याय करायच्या फंदात पडत नाहीत व प्रथम जमाव तुमच्या विरोधात जाण्याची वाट पहायचा मार्ग पत्करतात व मग (पडद्यामागुनच) कृती करणे पसंत करतात. सामान्य सदस्य तंत्रज्ञानाने इतका प्रगत नाही की तो कोणी काटा काढला याचे इनवेस्टीगेशन स्वबळावर करु शकेल. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे खापर संपादकांवर फोडने एव्हडे सोडले तर कोणीही सामान्य सदस्य संपादकांना त्रास देण्याचा द्रवीडी प्राणायाम करायला समर्थ नाहीच. त्यात ज्या गोश्टींचा निर्णय संपादकांना घेता येत नसेल असे वाटते, तेथे डायरेक्ट थर्ड अंपायर उर्र्फ साक्षात मालकच निवाडा करतात. एक घाव दोन तुकडे, नो अपील. म्हणून वरील सर्वकरणांमुळे संपादकांना त्रास देणे हा हेतु मनात धरुन डु आयडी काढणे ही अतिशय दुर्मीळातील दुर्मीळ घटना ठरते, असे करायची कोणाची किती तिव्र इछ्चा असते-नसते हा वेगळा विषय आहे पण सध्या आपण फक्त प्रत्य्क्ष किती लोक हे करु जातील याचा विचार केला तर संपादकांना त्रास देण्याच्या हेतुने डू-आयडी काढत राहणे ही दुर्मीळातील दुर्मीळ घटनाच मानावी लागेल... नॉट टु मेंन्शन त्यासाठी पॉलीटीकली करेक्ट राहण्याचे गट्स किती मोठे लागतील :)

In reply to by आत्मशून्य

कारण माझे अनुभव ऑर्कुट समूहांवरचे आहेत. माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ प्रोफाईल्स होते. आणि ते विविध हेतूने बनवले होते. तसेच इतर लोक्स सुद्धा ज्या हेतूंनी फेक प्रोफाईल बनवायचे त्यांचे हेतूही लक्षात घेतले तर त्याची हेतूनुसार टक्केवारी वेगळी निघेल. असो, मराठी संकेतस्थळांचा फारसा अनुभव नसल्याने किंवा इथे अजून खोलवर रुळलो नसल्याने सध्या आपण बोलत आहात तेच प्रमाण मानून चालतो. :)

In reply to by तुमचा अभिषेक

माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ प्रोफाईल्स होते. नारायण ! नारायण ! इथे नक्कीच एकच आयडी आहे ना ? ;) @पैसाताय तू ज्यांच्या बद्धल म्हणतेस ना... ते म्हणजे कंपु नंबर १ बरं का. ;)

In reply to by मदनबाण

तो फक्त लिखाण करायला. थोडे वेगळ्या शैलीत लिहिले की त्या आयडीतून टाकतो एवढेच. बाकी तो काही लपवलाय असेही नाही. पुढे मागे येथील सक्रियता वाढली की कदाचित आणखी एखाद्याची गरज भासेलही आणि विश्वास ठेवा तो मी काढेलही. मुळात ड्यू आय डी हे प्रकरण सर्रसकट वाईट नसते हो, जर तुम्ही अभिमानाने वा किमान संकोच न बाळगता आपल्या एखाद्या आयडीची जबाबदारी घेऊ शकत असाल तर त्या आयडी बनवण्यामागचा तुमचा हेतू काहीही वाईट नव्हता हे माझे लॉजिक झाले.

In reply to by बॅटमॅन

एक्सेल शीटच बनवून ठेवली असेल नै? >>>>>> मान गये उस्ताद.. ग्रेट मॅन थिंक्स अलाईक असे काहीसे बोलतात ना, तसे झाले हे.. खरेच एक्सेल शीटच बनवली होती, पैकी जे प्रोफाईल करंट वापरात असायचे त्यांच्यासाठी एक सामाईक मास्टर पासवर्ड होता, म्हणजे इथून तिथे उडी मारताना पासवर्ड आठवायचा त्रास नाही डोक्याला ;)

तुम्ही लिहिलीत ती सगळी कारणं कमी अधिक प्रमाणात असणारच. ज्या कारणांसाठी हे मिपावर येत नाहीत ती म्हणजे १. चांगले काही लिहिणे-वाचणे २. लोकांबरोबर विचाराचे आदान-प्रदान ३. आपली ओळख देणे किंबहुना आपण काहीतरी चुकीचं करत आहोत हे त्यांना चांगलंच माहित असतं आणि ते करत असताना आपल्याला कोणी पकडू नये, म्हणजे आपला संभावितपणाचा मुखवटा कायम रहावा अशी त्यांची इच्छा असते. थोडक्यात म्हणजे शिवराळ भाषा तर वापरायची आहे पण त्याचे परिणाम नकोत अशी काहीतरी मानसिकता असते. याउलट काही लोक चांगल्या हेतूने पण असे डु आयडी वापरताना दिसतात. म्हणजे या दंगेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी. कोणाचा डु आयडी कोण आहे हे नीलकांत आणि प्रशांत आयपी अ‍ॅड्रेस आणि लॉग इन करण्याची वेळ यावरून सहज शोधू शकतात. आणि आम्हा संपादकांना शंका आली की आम्ही त्यांना विचारून घेतो पण प्रॉब्लेम असा की एका ऑफिसातून/घरातून लॉग इन करणार्‍या दोन तीन लोकांचे आयपी अ‍ॅड्रेस कधी कधी एकच येतात. त्यामुळे डु आयडी कोण आहे हे साधारण कळलं तरी थेट अ‍ॅक्शन घेता येत नाही. फक्त ज्या अवतारात खोडसाळपणा केला असेल तो बॅन करणे हा एकच उपाय रहातो. पण यात एखादा माणूस चांगला अवतार जिवंत ठेवून इतर अनेक खोडसाळ अवतार घेत रहातो. याला काही औषध नाही. सगळेच लोक चांगल्या कारणाने मिपावर येतात असंही नाही. काहीजण मिपावर फक्त गोंधळ घालण्यापुरते येतात आणि दुसर्‍या संस्थळांवर चांगलं काम करतात हेही पाहिलं आहे. पण असे लोक माहित असले तरी ते नियमांच्या चौकटीत राहून गोंधळ घालत असल्याने तावडीत सापडत नाहीत. तुम्ही खान्देशी बोलीत लिहिलं आहे ना? बर्‍यापैकी कळलं. अधून मधून लिहीत जा. नव्या बोलीशी ओळख होईल.

In reply to by पैसा

कोणाचा डु आयडी कोण आहे हे नीलकांत आणि प्रशांत आयपी अ‍ॅड्रेस आणि लॉग इन करण्याची वेळ यावरून सहज शोधू शकतात
नाही. आयपी हा विश्वसनीय प्रकार ठरत नाही. एक तर आयपी लपवायची इछ्चा राखणारा हे चुकवु शकतो. आणी दुसरे म्हणजे एकाच (अगदी स्टॅटीक असला तरी) आयपी वरुन दोन वेगवेगळे आयडी (अगदी एकाच वेळी) कार्यरत राहणे हीसुधा संपुर्ण निकोप गोष्ट आहे, व ते डू आयडी असण्याची शाश्वतीही नाही.
याउलट काही लोक चांगल्या हेतूने पण असे डु आयडी वापरताना दिसतात. म्हणजे या दंगेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी.
आपल्या हेतुबद्दल शंका नाही परंतु असे सरसकटीकरण करणे टाळावेच. विशेषतः त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला चक्क डु-आयडी काढणारे विषेश दुट्प्पी आणी विषेश हरामखोर समजावेत. आपण पातळी सोडू शकतो हे जगापासुण लपवणे हा तर खरा नालायकपणा होय, न्हवे अशां महाभागाचे मुळ आयडीच डू आयडी ठरवले पाहिजेत.. पण असो, ही तात्वीक बाब आहे, व फक्त माहिती पुरेशी आहे. जालीय आचरणाच्या पातळीवर ही लागु केलीच पाहिजे असे नाही. आणी हो, राहता राहीले माझे वैयक्तीक मत. म्हणजे व्यक्ती तशा प्रवृत्ती, पण उद्या समजा मला डु आयडी काढावा वाटला तर माझ्यापुरते त्याचे नेमके काय कारण असेल.... १) खोडसाळपणा (अर्थात हा मुळ आयडीचाही भाग आहेच) २) माताय, सगळी दुनीया डुआयडी काढुन दंगा करुन गेली राव आणी आपलं मात्र हे कधीच करायचं राहीले ही चुटपुट नको. बघुया तरी डु-आयडी प्रकरणातुन किती धमाल उडवता येते ते.... :)

In reply to by आत्मशून्य

डु.आयडी प्रकाराबद्दल बद्दल तुम्हाला इतकी माहिती आणि कळकळ आहे हे पाहून छान वाटले! यापुढे एखादा डु. आयडी असल्याची शंका आली तर ओळखण्यासाठी तुमची मदत नक्कीच मागेन!

In reply to by पैसा

काहीजण मिपावर फक्त गोंधळ घालण्यापुरते येतात आणि दुसर्‍या संस्थळांवर चांगलं काम करतात हेही पाहिलं आहे.
असे का होत असावे बरे? तुमचा काय अंदाज आहे ?

In reply to by पैसा

आयच्यान सांगतो तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. कुठल्या वाक्यात नक्की? आणि हो, एकदम खरे उत्तर हवे आहे. उत्तर म्हणजे, तुमचे मत.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मिपावर गोंधळ घालायला येतात. दुसरीकडे गोंधळ घालत नाहीत. तेच कारण आहे आणि परिणाम पण. आता मला गोंधळात सापडायची इच्छा नाही. त्यामुळे इति लेखनसीमा.

भऊ मना अहिराणी लिवलस ते म्हून आवडलं . मला अजून बावनकशींची ओळख झाली नाही खरी पेढीवर पण मी त्यांना लेखनातून ओळखतो .डुआइडीने (?)चांगलं लिखाण केलं तरी मी वाचतो .ठिगळ सुरेख लावलं तरी बघतो . आता काही जणांकडे वेळ भरपूर आहे . "काई करु काई करु नवीन लुगडं धांडे करु ". "होळीतला नारळ पेटून ठूसफुसायचाच ,वेळीच काढला तर खोबरं गोड नाहीतर कोळसा ". या भाषेत काहीपण लिहून राहा .

In reply to by कंजूस

कंजुसभौ, आवडनं बरं आपले हाइ. अहिराणीमा गैर्‍ह्या चांगल्या गोट भरेल शेतस. एक म्हण मनी भी. काम नही काय करु लुगडं फाडी दांडे करु.

विश्रांती मोड ऑफ- मी मिपावरचे किमान 14 डुआयडी सांगु शकतो , यातील एक संपादकाचा आहे . नुकताच आं ची या मागील खरा आयडी कोण आहे हे सांगु शकतो . आशु च्या 4थ्या मुद्याशी सहमत-विश्रांती मोड ऑन

काकूच्या विषयाशी सहमत आहे. बाकी खाली जे लिहिलंय ते कळालं आणि आवडलंही. अहिराणीत शे काय???

In reply to by बॅटमॅन

र लोकेसोन, मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस. मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्‍हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे. जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु. पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ? तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्‍हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं ! ते असे आहे, तर लोकहो, मिपावर काही लोकं मनात कुठली कुठली घाण भरुन येतात आणी इथे जी काही हातावर मोजण्याइतकी चांगली लोकं आहेत त्यांना त्रास द्यायचं सुरु करतात. मला एक समजत नाही असं करुन ह्या भ*** काय भेटत असेल आणी अश्यांमुळेच मिपाच नाव खराब होत आहे. जेव्हा बघावे तेव्हा नवा डु आयडी घेवुन इथ्थेच्च. ह्या माणसाला त्रास देवु त्या बाइला त्रास देवु. पण हा डु आयडी काढायला काय करावं लागतं ?म्हणजे समजा अस बघा मी दोन तीन इमेल आयडी काढले आणी ते वापरुन इथे लॉगीन केले पण दरवेळेस मी माझा कॉम्पुटरतर नाही ना बदलु शकत.मग असे लोक पकडले कसे जात नाहीत ?आणी ज्या लोकांना हे माहित पडते की हा डु आयडी आहे तर मग ते बोंब ठोकत नाहीत.(हे लाक्षणिक अर्थाने बर कां !)अस न करण्या त मिपावरील लोकांचा काय फायदा आहे ? तर हे माहित करण्यासाठी मी हा काथ्याकुट टाकत आहे, जसं जमेल तशी उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.

In reply to by आनंदी गोपाळ

धन्यवाद भौ. मले अहिरानी म्हंजे मराठी विश्वकोशमा दिलेला लहानसा प्यारेग्राफच आठवतो शे. "यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याच्या शेपले मुडना काटा. नाइभौ, नाइभौ, काड तं खरी काटा, म्हने. नाइ म्हने, याना काटा काडु दे." इ.इ.इ. पूर्ण आठवत नै, पण लै मजा आली होती हे वाचून. :)

वा वा इरसाल काका ... पण मला तर कायम तुम्हिपण डुयाडीच वाटत आलेले आहात

आंचीला तुम्ही डु आयडी आहात असे खडसावल्यावर त्यानेच उलट माझ्या नावाने बोंब मारली होती. आंचीच्या __चा घो.

DO http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/awkward-turtle-smiley-emoticon.gif आयडी !

मिपाला जी-मेल सारखं "पिन अ‍ॅक्सेस" देता येणार नाही का? मि.पा. ला लॉगिन केलं की की नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर ४ ते ८ आकडी पिन क्रमांक जाईल. तो पिन इथे परवलीच्या पर्यायासारखा वापरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. (सगळ्यांना थोडा त्रास होईल मान्य पण मिपाच्या प्रेमासाठी तेवढं नक्कीच सहन करता येइल). जेणे करुन काय होईल की मिपा वर खातं नोंदविताना एक क्रमांक दुसर्‍यांदा संपादकांच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही. नुसतं मिपावर डु-आयडी काढायचा म्हणुन जास्तीचे नंबर घेणारे लोकं नक्कीच कमी असतील. (जे तेवढ्यासाठी नवा नंबर घेतील त्यांच्या चिकाटीच कौतुक आणि उद्देशाचा णिशेध) डु-आयडींचे प्रमाण नक्कीच कमी करता येईल. अर्थात त्याआधी खालच्या गोष्टींचा विचार करायला लागेल. १. वन टाईम पिन अ‍ॅक्सेस मुळे मिपाच्या सर्व्हर वर किती अतिरिक्त ताण पडेल? २. जो संदेश पाठवला जाईल त्यासाठी काही खर्च येईल का? ३. आय-पी आणि भ्रमणध्वनीच्या क्रमांकाची सांगड घालता येईल का? म्हणजे घरच्या किंवा ऑफिसच्या दुसर्‍या नंबरवरुन डु-आयडी मिळवता येणार नाही. (ऑफिसातुन एकाच आय.पी. वरुन २-४ मिपाकर वाचन किंवा लेखन करत असतील तर त्यांच्यावर काय परिणाम होईल?) ४. पिन क्रमांक प्रवेश केल्यापासुन जास्तीत जास्त ३० सेकंदाच्या आत मिळेल का? बाकी असं करता येईल का ह्याबद्द्ल आपले आयटी तज्ञ लोक्स सल्ला देतीलचं. -- (हाऊ मेनी नंबर्स डज अ मॅन नीड?) जिओ मिपास्टॉय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यक्तिशः मला (एक सदस्य म्हणून) असा एखादा फोन नंबर घेतला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे सर्व्हरवर ताण वगैरे काही येऊ नये कारण तो खाते उघडताना एकदाच वापरला जाईल. पण त्यामुळे सदस्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतो असं काहीजणांचं म्हणणं आहे. म्हणजे काही असे सदस्यही आहेत की ज्यांना आपली कोणतीही खाजगी माहिती इथे द्यायला नको आहे पण ते दंगेखोर नाहीत. गंभीर सदस्य आहेत.

In reply to by पैसा

>>>>> पण त्यामुळे सदस्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतो असं काहीजणांचं म्हणणं आहे. सध्या आपण मेल आयडी देतो. मेल आयडीचा वापर संकेतस्थळ वापरकर्त्याने केवळ खाते उघडण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. असेच भ्रमनध्वनीच्या बाबतीत आपण कितीतरी ठिकाणी फोन रजिष्टर केलेला असतो. कामाच्या ठिकाणी, ब्यांक, अमुक-धमुक, तिथे तुमची प्रायव्हसी भंग होत नाही ? सुरक्षित असेल तिथे आपण अशी रिस्क घेतोच की मग मराठी संकेतस्थळांनी असं केलं तर काय बिघडेल ? ज्याला खाज असेल तो लिहिल नै तर राहीलं ? अशी अनेक माणसं आहेत जी उत्तम लिहितात मराठी संकेतस्थळे वाचतात पण ती मराठी संकेतस्थळावर लिहित नाही म्हणून काय संकेतस्थळं बंद पडली नाहीत. काही कच्च-बच्च लेखन येतच असतं. आज लेखनाचा दर्जा खुप उच्च नसेल पण लेखन येतच आहे की नै... तेव्हा पै भविष्यात अनेक मराठी संकेतस्थळ असं करतील. किंवा सरकार असा काही कायदा करेल की लिहिणा-या सदस्याची माहिती आवश्यक आहे, संकेतस्थळ मालक-चालक यांची माहिती हवी आहे. एक दस्तऐवज तुम्हाला दरवर्षी सरकारला द्यावा लागेल तेव्हा हा पर्याय तुम्हाला वापरावाच लागणार आहे, आज आपल्याला हे पटत नसलं तरी भविष्यात होऊ शकते असे वाटते.... लावता का शर्यत पाच-पाचशे रुपयाची ? :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैज अजिबात लावणार नै! भविष्यात असं होणं अगदी सहज शक्य आहे. आपले सायबर क्राईमचे कायदे आणि पोलीस अजून प्राथमिक अवस्थेत आहेत. पण पुढे कधीतरी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी घ्यायला लागेल. कॉपीराईट पाहिजे तर जबाबदारीही घ्यायला पाहिजे. तुमच्या बाकी बहुतेक मुद्द्यांशी सहमत आहेच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कामाची ठिकाणे अन मराठी संकेतस्थळे यांत काहीच फरक नाही काय? इथे लोक टाईमपास करायला येतात. फुकट बिग ब्रदरगिरी करण्याला तुमचे समर्थन असेल असे वाटले नव्हते.

In reply to by बॅटमॅन

एखाद्याचा करमणूकीसाठी केला गेलेला 'टाईमपास' इतर ५०(/५००/५०००...इ.) जणांसाठी कधीतरी त्रासदायकही होउ शकतो. त्यासाठी 'फुकट बिग ब्रदरगिरी' काहीवेळेस करावी लागते. शिवाय कामाची ठिकाणे अन मराठी संकेतस्थळे यात फक्त 'फरक'च आहे का? 'साम्य' बिलकुल नाही का? 'सोशल एटिकेट्स' सगळीकडे सारखेच पाळायला हवेत, असं मला वाटतं.

In reply to by कवितानागेश

'सोशल एटिकेट्स' सगळीकडे सारखेच पाळायला हवेत, असं मला वाटतं.
मग सगळीकडे फिरा. इथे याच अशी सक्ती आहे काय ? का जे सगळीकडे तुम्ही करता तेच इथेही करायला भेटले पाहिजे हा अट्टहास त्यामागे आहे ?

In reply to by आत्मशून्य

वि़कृत स्त्रिमुक्तीच्या कल्पना तिच्या डोक्यात आहेत सोशली त्या ती नेटाने फॉलो करते तिने इथे तेच करावे काय ? माझा एक मित्र आहे बायकोच्या ताटाखालचं मांजर. विवाहीत स्त्रियांचा जबर धसका त्याने घेतला आहे हे त्याचे सोशल एटीकेट्स पुन्हा पुन्हा हेच सिध्द करतात, त्याने इथेही तसेच वागावे काय ?

In reply to by कवितानागेश

बर्राच फरक आहे. सोशल एटिकेट पाळायचे तर एकतर्फी नकोत-त्याचं एक किळसवाणं उदा. मिपावर अलीकडंच पाहिलंय, ते एक असोच. बाकी साम्य काय आहे? इथे लोक कशाला येतात, काय करतात, याची मुख्य पर्पज काय, इ.इ. पाहिले तर सहज लक्षात यावे. कुणीतरी सटीसहामाशी केलेले ट्रोलिंग कंट्रोल करण्यासाठी अन्य वेळेस इतकी बंधने घालण्याचे समर्थन अतिशय हास्यास्पद आहे. बाकी काही नाही झालं तरी लोकांचा ओढाच कमी होईल. तसंही एका संस्थळात दुसर्‍यापेक्षा लै युनिक काही नसतं. अनाहितासारख्या ग्रूपची गोष्ट वेगळी पडते. तिथे व्हेरिफिकेशन गरजेचे आहे हे एकवेळ मान्य करू शकतो - कारण पर्पज वेगळी आहे. अर्थात तिथेही मतभेद आहेत, पण अनाहितावर एक पुरुष मत व्यक्त करणारा कोण नै का? म्हणून गप्प बसतो झालं. पण तोच न्याय सर्वत्र लावणे हे बालिश आहे. मॉनिटरिंगचा अतिरेक केला की लोकांचं ट्रॅफिक नि:संशय कमी होईल. मग बसा एटिकेट्स-एटिकेट खेळत. लोक आंजावर येतात ते प्रत्यक्ष आयुष्यापासून ब्रेक म्हणून. तिथेही असले नियम लावत बसला तर कोण येईल कशाला तुमच्याकडे? (किंवा अजून कुणीकडे) ही साधी गोष्ट लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. मिपावर असलं काही सुरू झालं तर मी तरी इथे थांबणार नाही. मी किंवा अजून कोणी गेल्याने मिपाला शष्प फरक तसाही पडणार नाही, पण मत व्यक्त केलं इतकंच. आता मत व्यक्त करणारा मी कोण टिकोजीराव? तर ज्या अ‍ॅथॉरिटीने राजकारण ते बालसंगोपनादि विषयांवर लोक बोलतात त्याच अ‍ॅथॉरिटीने मी बोलतोय. असो.

In reply to by बॅटमॅन

अनाहितासारख्या ग्रूपची गोष्ट वेगळी पडते.
मला ह्या विभागाची संकल्पना अतिशय आवडली. त्या विभागाबाबत/ अनेक सदस्यांबाबत मला अतिशय आदर व ममत्वही आहे, व उत्तरोत्तर वाढतच जाइल. पण नुकतेच या विभागाच्या नावाचा अतिशय घाणेरडा अब्युज केला गेला.(कोणीत्याही त्रयस्थ व्यक्तीने ज्याचा मिपासोबत चुकुनही व दुरान्वयेही संबंध नाही त्याने ते अद्रुश्य केलेले संभाषण जरुर वाचावे आणी त्याचे मत घ्यावे) आणी हे सुधा त्यांच्या व्हेरीफाइड सदस्यांकडुन घडले. म्हणजे व्हेरीफिकेशन ही मुळात कसलीच एटीकेट्सची गॅरंटी देत नाही, उलट हुच्चभ्रुपणाचा पांघरलेल्या बुरख्या खाली जोपसलेल्या उबदार चाळीतल्या नळावरच्या भांडणाच्या एटीकेट्स मात्र सुरेख उघड्या पडल्या. आता बोला. खरे तर कारभाराची पारदर्शकता पुरेशी असते जसे १) कोणता प्रतिसाद का संपादीत/ अद्रुष्य केला गेला याची कारणमिमांसा. (ति चुकली असल्यास चुक दामटायचा हेकेखोरपणा टाळुन, खुल्या मनाने चुक सुधरायची इच्छा शक्ती). २) मिपा खुल्या विभागाच्या सदस्यांना ते स्त्रीलिंगी आहेत की पुल्लींगी हे नमुद करणे सपशेल रद्द( अनाहीतासाठी स्वतंत्र आयडीची व्यवस्था). ३) आपण संस्थळावर आहोत पिताश्रींच्या प्रॉपर्टीवर न्हवे याचे सदस्यांनी राखावयाचे भान. ४) वादविवाद असेल तर दंगा होणार हे मान्य करावे. अगदी संसदही त्यास अपवाद नसते. (आशा आहे संसद हे इथे सोशल ठिकाणच गणले जातेय)

In reply to by आत्मशून्य

पण नुकतेच या विभागाच्या नावाचा अतिशय घाणेरडा अब्युज केला गेला.
तो तर नेहमीच सुरू असतो. पण त्याबद्दल काही बोलणे म्ह. पाप आहे. बाकी सहमत आहेच!

In reply to by बॅटमॅन

मॉनिटरिंगचा अतिरेक केला की लोकांचं ट्रॅफिक नि:संशय कमी होईल. मग बसा एटिकेट्स-एटिकेट खेळत.
नेमक्या शब्दांत "मनोगत" लिहिले आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>>>मिपाला जी-मेल सारखं "पिन अ‍ॅक्सेस" देता येणार नाही का? मि.पा. ला लॉगिन केलं की की नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर ४ ते ८ आकडी पिन क्रमांक जाईल. तो पिन इथे परवलीच्या पर्यायासारखा वापरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. मिपाचं भविष्यातली वाटचाल माहिती नाही पण मराठी संकेतस्थळावर लिहिणा-या-वाचणा-यांचा वावर जेव्हा खुप वाढेल आणि जी काही मोजकी मराठी संकेतस्थळं असतील की जिथे लिहिण्या-वाचण्याचं वेड लागेल अशा ठिकाणी तुम्हाला 'व्यवस्थित' वावरायचं आहे तिथे भ्रमनध्वनी व्हेरीफिकेशनचा पर्याय उत्तम ठरणारच आहे. आज इनमिन साडेतीन मराठी संकेतस्थळावर तीच माणसं इकडे आणि तीच माणसं तिकडे. आपण खूप हुशार आहोत असे समजणारे शे-पाचशे लोक एकाच ठिकाणी रमू शकत नाही. संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी जेव्हा प्रचंड वाढेल तेव्हा असे काही प्रयोग मराठी संकेतस्थळावर नक्कीच होतील असे वाटते. म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हणून लिहितो की जसे मिपावर काही कोणाशी पटलं नाही की, ती 'हुशार माणसं' कशाला लिहायचं मिपावर. फेसबूकवर लिहू. फेसबूकवर लिहून लाईक्स कमी पडायला लागले की मग ब्लॉगवर लिहायचं. तिकडे झाले की पुन्हा मनोगतावर सॉरी नमोगतावर लिहायचं. तिथे नै पटलं की पुन्हा मिपावर डु आयडीने लिहायला यायचं किंवा असलेल्या आयडीने नुसती मस्ती करायला यायचं. सतत उंटासारखे तिरपे तिरपे लिहायचं. काढलं की पुन्हा बोंबलत बसायचं असं होत असतं. मुळात लिहिण्याचा-वाचण्याचा आनंद सोडून व्यक्तीचे स्वतःचे अहंकार बोचायला लागले की अनेक प्रॉब्लेम्स होतात. जालावर मराठी संकेतस्थळाच्या बाबतीत असा व्हेरीफिकेशनचा प्रयोग वेगळ्या पद्धतीने राबवलेला अनाहिताच्या निमित्ताने दिसला यश अपयश येता काळ ठरवेल पण मला व्यक्तिगत ती एक मराठी संकेतस्थळासाठी एक उत्तम सुरुवात वाटली. भविष्यात अजून काय दडलेले असेल आज तरी मला माहिती नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by धन्या

मुळात लिहिण्याचा-वाचण्याचा आनंद सोडून व्यक्तीचे स्वतःचे अहंकार बोचायला लागले की अनेक प्रॉब्लेम्स होतात.
याच्याशीही भयानक सहमत आहे. एखाद्याने मेहनत घेऊन कितीही चांगलं लिहिलेलं असो, तो आमच्या कंपूत नाही ना, मग पाडा त्याचं लिखाण, प्रतिक्रिया देऊ नका असा विचार करणारी खेकड्याची मनोवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असंच चालायचं. संस्थळावर आपला अहं कुरवाळण्यासाठी येणारे किती आणि खरोखर विरंगुळा म्हणून, काही चांगलं वाचायला/लिहायला, अगदी निव्वळ मजा करायला येणारे किती याच शोधच घ्यावा लागेल. मजा करायलाही हरकत नाही पण ती दुसर्‍याला त्रास देणारी असू नये. काही जण तर फक्त एखाद्याला टार्गेट करायला डु. आयडी घेऊन येतात अशीही उदाहरणं पाहिली आहेत. ही विकृती झाली. या नगांना आपली ओळख लपवायची असते कारण आपण करतोय ते बरोबर नाही हे कुठेतरी कळत असतंच ना! मग घ्या डु. आयडी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी जेव्हा प्रचंड वाढेल तेव्हा असे काही प्रयोग मराठी संकेतस्थळावर नक्कीच होतील असे वाटते. >>> लय आशावादी व्बा तुम्ही ;) फरक व्हेरियेशन चा आहे च ...पण मग म्हणुनच हल्ली प्रत्येकाला इतिहासरंजणाचा वा स्मरणरंजणाचा संसर्ग होत असावा :)

खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही. (पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य) आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात. (कुणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नाही आहे. फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही) २. दुसरे हेतू - वर उल्लेख झालेलाच आहे.

In reply to by विवेकपटाईत

खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही... ...आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात. असा विचारच कधी केला नव्हता ! *unknw* आता ते खरं आहे का ते अंतर्मनात खोल्खोल / खोल्वर (यापैकी एका किंवा दोन्ही पद्धतीने) डोकावून पाहिले पाहिजे. ;) :) (...फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही) हे पटलं. हे खरं असण्याची जास्त शक्यता वाटते. :) ...(पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य) यात माझापण नंबर असावा अशी कल्पना करून उगाचच गार्गार वाटवून घेतलं... ही ही ही... ;) आता माझं म्हणणं किंवा शंका (ज्याला जे वाटेल ते, आम्ही लान्हपनापासून लोक्शाहीवादी हौत हो !)... "जालावरच्या सर्वच आयड्या ह्या, अनलेस प्रूव्ह्ड अदरवाईज, डू आयड्या असतात." असा आमचा सिद्धांत आहे. कारण १. "इस्पीकचा एक्का" हा मुखवटा कारण ते शब्द सर्वसाधारणपणे व्यक्तीचे नाव म्हणून वापरण्याची सामान्यपणे प्रथा नाही. ठीक आहे. २. पण जर मी "अरविंद देशमाने" या (खर्‍या वाटणार्‍या पण कल्पीत नावाने) नावाने लिहायला सुरुवात केली तर ते माझेच खरे नाव आहे हे सिद्ध होते का ??? नाही ! ३. आयडी हे खरं नाव आहे हे सिद्ध करायला प्रत्येक सभासदाला "फोटो आयडीचा" दाखला देवून मगच नाव नोंदवावे लागेल. हे होत नाही तोपर्यंत, सर्व आयडीज व्हर्चुअल असणार. मग ते त्या आयडीच्या धारकाचे खरे नाव असो वा नसो. एवढेच नाही तर... {लै खत्री 'बाल की खाल' मोड} अगदी कट्ट्याला प्रत्यक्ष भेट झालेल्या सभासदांचे सो कॉल्ड खरे नावही आपण फोटो आयडीचा पुरावा मागून खात्री करून घेत नाही. त्यामुळे तेथे ऐकलेले माझे वरचे "अरविंद देशमाने" हे नावही खोटे असू शकते, नाही का? खी...खी...खी... ;) {/लै खत्री 'बाल की खाल' मोड} एकंदरीत, "ब्रम्ह सत्यं, (जाल)जगत् मिथ्या" असे आपले पूर्वसूरी सांगून गेले ते काय उगाचच ! ;) आता आमचे ब्रम्हज्ञान (बरेच लोक मिपावर डोस देत असतात, आम्हीच काय घोडं मारलय? हमाराभी हक बनता हय भाया)... आयडीचा (लेखनाचा गुण)धर्म* पहा, शेवटी नावात काय आहे??? * धर्म : एखाद्या जीवाची/वस्तूची वागण्याची पद्धती (यात लेखनही आलेच). याला मराठीत कॅरॅक्टरिस्टिक्स असे म्हटले जाते. *** विवेकपटाईत साहेब (आता आम्हाला तुमची आय्डीच म्हाय्ती हाय म्हणून आय्डी कडेच गार्‍हाणं कर्तोय) ह घ्या. हा तुमच्या प्रतिसादावर कमी आणि जालावरच्या सर्वसाधारण समजूतींवर जास्त असा प्रतिप्रतिसाद आहे. विनोदी अंगानं लिहायचा क्शीण प्रयत्न असला तरी लॉजीकमध्ये कमी राहू नये याची खबरदारी घेतली आहे.***

आता जे डुआयडी आहेत त्यांना तसे का करावेसे वाटते? हे जाणुन घ्यायला आवडेल.मला तर हा प्रकार स्किझोफ्रेनिक वाटतो.डुआयडी घेउन त्रास देणे ही मानसिक विकृती आहे का? मला त्या मृगरुप घेउन कामेच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार्‍या किंदम ऋषी त्यांची आठवण येते. ऋषी या प्रतिमेमुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक उर्मी व्यक्त करता येत नसाव्यात म्हणुन त्यांना असे मृगरुप घ्यावे लागले.काही डूआयडींचे बाबतीत तसेच काहीसे असावे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडेजी, तुम्हाला कुणी मृगनयनी भेटली नसावी अजून. त्यामुळे मृगरूप घेण्याची इच्छा झाली नसावी ;)

आपले रसातळाला गेलेले धागे वर काढण्यासाठी काही डु आय डी घेतले जातात असे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. म्हणजे "आपुलाचि संवादु आपणासी .." असे काहीसे.

In reply to by मनीषा

आपले रसातळाला गेलेले धागे वर काढण्यासाठी काही डु आय डी घेतले जातात असे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. म्हणजे "आपुलाचि संवादु आपणासी .." असे काहीसे. >> +१०००० काही लोक्स हे करतात आणि काही स्वताच्या कंपुतलेच वापरतात .........

फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे. एका साध्या फोरमवर लिहिण्यासाठी इतकी मगजमारी करावी लागत असेल तर कोण कशाला येईल तिथे? जिथे व्हेरिफिकेशन इ. सक्तीचे / गरजेचे आहे ते सोडा पण अन्यत्र इतकी कै वेळ आलेली नाही. अँटी डुआयडी लोकांचे डेस्परेशन पाहून मजा वाटते खरीच. एखादा डु आयडी ट्रोलिंग करत असेल तर सरळ उडवण्याचा पर्याय आहेच की. पण नियमात बसण्याइतपत ट्रोलिंग असेल तर इतका कपाळशूळ का उठावा कै कळ्ळं नाही. अंमळ बालिश प्रकार आहे हा सगळा.

>>>> फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे. एका साध्या फोरमवर लिहिण्यासाठी इतकी मगजमारी करावी लागत असेल तर कोण कशाला येईल तिथे? जिथे व्हेरिफिकेशन इ. सक्तीचे / गरजेचे आहे ते सोडा पण अन्यत्र इतकी कै वेळ आलेली नाही. >>> पुर्ण सहमत..!! >>> अगदी सहमत. शिवाय एखाद्या शब्दाचा भलता अर्थ स्वतःवरच ओढवून घेऊन कंपूने तुटून पडणारे अन वर स्वतःच्या नैतिकतेची/बुद्धीची टिमकी वाजवणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही... >>>> असहमत..!! आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत हे पुर्णपणे जाणून सुद्धा, कोणी त्याला काउंटर केलं आणि प्रकरण अंगावर शेकल कि 'कंपुबाजी/ स्त्रिवाद / डूआयडी ' ई.ई. केविलवाणे कोकलत, स्वतः च स्वतः चे हास्यास्पद समर्थन करणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. तसेच वरिल नमुन्यांना अविचाराने समर्थन देणारे आणि 'आमची ती बुद्धीमता/ लॉजिक/ नैतिकता आणि तुमचा तो कंपु' अशी संभावित भुमिका घेणारेही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. अर्थात योग्य वातावरण हा परत सापेक्ष शब्द आहे. प्रत्येक जिवाचे योग्य वातावरणाचे निकष वेगळे असतात. त्यामुळे फोन नंबर घेणे, आधारकार्ड घेणे, ओटिपी ई.ई. त्यावरचे उपाय नाहियेत. वातावरण कसेही असले तरी योग्य वेळी थोडिफार झाडझूड करुन बहुतेक वेळा काम भागतेच. नाही भागले की व्हॅक्युम क्लिनर असतोच राखिव.!!

डुआयडी वगैरे काय नसतयं. हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जैसा मनी भाव तैसा दिसे देव ! हा मातरं येका माणसाचे येकापेक्षा ज्यादा आयडी असू शकतात. त्याला डुआयडी का बरं म्हणता ?