Skip to main content

डु आयडी !

लेखक इरसाल यांनी शनिवार, 05/04/2014 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा. तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते. त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा, १. खोडसाळपणा २. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे. ३. उगाच दंगा करणे ४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. ५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. ६. संपादकांना त्रास देणे. असो. तर आता मातृभाषेतुन सुरु करतो. तर लोकेसोन, मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस. मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्‍हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे. जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु. पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ? तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्‍हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं !

वाचने 31542
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत हे पुर्णपणे जाणून सुद्धा, कोणी त्याला काउंटर केलं आणि प्रकरण अंगावर शेकल कि 'कंपुबाजी/ स्त्रिवाद / डूआयडी ' ई.ई. केविलवाणे कोकलत, स्वतः च स्वतः चे हास्यास्पद समर्थन करणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही. तसेच वरिल नमुन्यांना अविचाराने समर्थन देणारे आणि 'आमची ती बुद्धीमता/ लॉजिक/ नैतिकता आणि तुमचा तो कंपु' अशी संभावित भुमिका घेणारेही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही.
पर्सनल उल्लेख केलेला नसतानाही एखाद्याची आई काढणारे सदस्य पाहिले आहेत. एरवी मारे संभावित असल्याच्या थाटात जगाला उपदेश करत फिरतात - पण पातळी सोडून बोलूनही वर स्वतः ढोंगीपणे उच्च नैतिक भूमिका घेणारे सदस्य. यांना तर काहीच बोलायचा हक्क नाही. यांचे खरे रंग स्वतःच दाखवून दिल्याबद्दल खरे तर त्यांचे आभारच मानले पाहिजेत. असो. (स्वप्नांची राणी यांना हा प्रतिसाद वैयक्तिकरीत्या उद्देशून नाही. ज्याला आहे त्याला कळालं तर ठीक- यद्यपि अपेक्षा नाहीच. रडीचा डाव खेळणारी पोरं माझी स्टंप आहे म्हणून मला दोनदा खेळू द्या नैतर मी स्टंपा घेऊन जातो इ.इ. थयथयाट करतात त्याप्रमाणेच एखादी गोष्ट नै पटली की झाडू घेणार्‍यांची वागणूक आहे. अन याबद्दल मी ठाम आहे. खरं बोलण्याबद्दल कुणाच्या नाकदुर्‍या काढायची गरज नाही- वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास अथवा संपादित करण्यास लोक समर्थ आहेतच.)

In reply to by बॅटमॅन

>>>> वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास अथवा संपादित करण्यास लोक समर्थ आहेतच >>>> ईतक मिपाफोबिक व्हायची काय गरज आहे म्हणते मी..? झालं यार, होउन गेलं... होता है!! मूव ऑन... मिपा मस्ट गो ऑन!!

In reply to by बॅटमॅन

मिपाफोबिक
अन बॅट्म्यान ? डबल ब्यारलचा ठोठो....! फोबिदायक बॉडीलँग्वेज प्रत्यक्ष कोणाची झालीय हे पण दुर्लक्षीत झालेले दिसतयं.

In reply to by बॅटमॅन

उत्तर द्यावं लागतय म्हणुन देते आहे. आई काढणे वेगळे अन आई सुद्धा एक स्त्री आहे हे जाणवुन देणे वेगळे. कोणाचीही तुलना कुत्र्याशी करणे वेगळे, अन जाणिवपुर्वक लिहुन घरात दारात अन समाजात दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात हे सांगणे वेगळे. नुसता वितंडवाद घालणार्‍या लोकांना मग ती स्त्री असो वा पुरुष कोणताच पायबंद नसतो, कारण तोंड उघडल की आपलीच जीत झाली पाहिजे असा एक समज त्यांच्या मनात भरौन गेलेला असतो. माझी मुलगी, माझा मुलगा, माझे आई वडिल हे सार्‍यांना असतात. त्यांच्याकडे जस आपण एक स्त्री वा पुरुष म्हणुन न पाहता एक नातेवाईक म्हणुन पाहतो तसच बाहेरच्या जगात वावरताना एक स्त्री वं पुरुष म्हणुन न पाहतां एक पुर्ण व्यक्ती म्हणुन पहायला शिकाल तो सुदिन!! आणि हो उगा फालतु शब्दाला शब्द वाढवायची तसदी घेउ नये. काही विचार करुन बोलावस वाटल तर बोलावे. नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं. इति लेखन सीमा.

In reply to by स्पंदना

आई काढणे वेगळे अन आई सुद्धा एक स्त्री आहे हे जाणवुन देणे वेगळे. कोणाचीही तुलना कुत्र्याशी करणे वेगळे, अन जाणिवपुर्वक लिहुन घरात दारात अन समाजात दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात हे सांगणे वेगळे.
प्रचंड सहमत.

In reply to by स्पंदना

नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं.
हेच स्वतः पाळलं असतं तर काय पाहिजे होतं? पण नियम एका साईडनेच पाळायचे असतात ना, त्याला इलाज नाही. चालूद्या!

In reply to by स्पंदना

नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं.
... आणि त्या उंचावलेल्या मानेची उंची ही अपमान केला गेलेल्या वाक्यातील शब्दांच्या व्यस्त प्रमाणात असते, हादेखिल गैरसमज हटेल तर बरं!! ;)

संस्थळावर आपला अहं कुरवाळण्यासाठी येणारे किती आणि खरोखर विरंगुळा म्हणून, काही चांगलं वाचायला/लिहायला, अगदी निव्वळ मजा करायला येणारे किती याच शोधच घ्यावा लागेल. हा शोध लागणे अवघड नाही थोडेफार लेखन आणि प्रतिसाद वाचले कि बर्‍यापैकी कळते . मजा करायलाही हरकत नाही पण ती दुसर्‍याला त्रास देणारी असू नये. प्रचंड सहमत

चला आता मॅच सुरू झाली ... इर्‍या तुला लैच प्रश्न पडायला लागलेत हल्ली , ...असो एक अनुभव सांगतो ...मिपावर पाच वर्षे झालीत आता ... एक असाच आयडी आला होता तात्याच्या काळात, लय चालल होते, रामायण महाभारत, उठ-सुट तेच सकाळी दुपारी तेच ...तेव्हा खरं नाव घेवुन आला होता ....मी एका वेगळ्या कंपुत होतो तेव्हा, त्यातले बरेच जण मिपावर नाहीत आता ...असा झोडला होता त्याला की त्याने आयडी बंद केला ..मग तात्याला मेल पाठवुन घेतला दुसरा आयडी ... बरेच दिवस गप्प पडुन होता ..मग हळुहळू जसा कंपु पांगत गेला..तसतसा तो लिहायला लागला ...सध्या संपादकाच्या गुडबुकात असुन सगळीकडे वावरतो ....आता बोल ....सुधारित डु आयडी की सर्वसामान्य आयडी ........... दुसर उदाहरण आहे एका माजोरी आयडी च ....हे जेव्हा आलंत तेव्हा पार ईग्रंजीमध्ये च मराठी टायपाला सुरुवात केली , कविता तर त्याच्या कवितापेक्षा ऑर्कुट च्या जरा बर्‍या वाटतील अश्या ...तेव्हा त्यान ते ईग्रंजीमधलं मराठीत टाईपकरून देण्यापर्यंत मदत केली मी, आज जिथे तिथे दात दाखवत असतो आणि तोंड तर अस करतो कट्ट्याला की तो लिहुन मिपावरच काय अख्ख्या मराठी आंजावर उपकारच करतो आहे ... अशी उदाहरणे बरीच आहे , पण तु कसा यात पडला आज ... आपल्याकडं काय म्हणतात माहीत आहे ना ! ज्यांच्यामुळे अडत नाही त्याच्या फंदात पडत नाही ;)

In reply to by सुहास..

सुहासभौ, सध्या काही धाग्यावर काही प्रतिसादामधे कोणी कोणी डु आयडीचे सरळ सरळ वाभाडे काढलेले दिसले तसेच काही खोडसाळ धागे काढणारे अचानक मिपा सोडुन गायबलेत आणी नवे अवतरलेत. बर्‍याच दिवसापासुन मला विचारायचे होते काही लोक हे कस शोधतात की अमुक अमुक डुआयडी आहे. म्हटले गरमागरमीचा माहोल आहे घ्या काथ्या कुटुन. बरेच दिवस पडावसं वाटल नाही पण उगाच कुठले संदर्भ कुठे लावले जातात म्हणुन रहावले गेले नाही. असो. तुम्हनाकडे गैर्‍हा किस्सा व्हतीन तेन्हामासला दोन तर वरथे मालुंग पडी ग्यात. कोन त्या कोन त्या सोंगे ? वरला उदाहरण मासला ?

चालायचेच. अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा?

In reply to by चिन्मय खंडागळे

अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा? लै भारी... आवडलं. पण दहाव्या डुप्लिकेट आयडीचं नाव अगोदरच डिक्लेअर करून सगळा सस्पेन्स फुस्स करून टाकला राव ;) :)

In reply to by चिन्मय खंडागळे

बॅड जोक !! ( हे म्हणजे 'डिफाईन फाईन' सारखे झाले, आणि त्यावर त्याला गुड वन ई. म्हणणारे संपादक आहेत याची नोंद घेतली, उगा ड्यु आयडी गोंधळ घालतात म्हणायचे आणि स्वतः मात्र , जिथे जरा गोंधळ दिसला तिथे हॅ हॅ हॅ करायला मोकळे, माझे स्पष्ट मत असे आहे की किमान तुम्हाला कारवाई/कंट्रोल करता येत नसेल तर टाळ्या तरी वाजवु नयेत आणि ते ही नसेल येत तर सर्वसामान्य सदस्य असल्याची टिमकी वाजवु नये )

इरसालभौ, मला अहिराणी वाचायला मजा येते आहे. सगळीच नाही समजत पण ऐकायला गोड वाटेल बहुतेक. मिपावर अहिराणी शिकवायचा धागा काढा बघू आणि शिकवा :)

In reply to by यशोधरा

मागे एक अहिराणीवर धागा काढला होता.पण तो मीमराठीवर होता की मिपावर हे आटवत नाय पघा ! दुसरा धागा काढण्याचा प्रयत्न करतो.

In reply to by इरसाल

>>दुसरा धागा काढण्याचा प्रयत्न करतो. काढा काढा. कोकणीच्या लेखांसाठी आम्ही आग्रह करुन करुन गप्प बसलो. तुम्ही निदान अहिराणीवरचे तरी लेख टाका.

नुकतेच एका धाग्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिसाद देणारे आणि दुसऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एक सदस्य येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढताना बघून गंमत वाटली.

In reply to by दिनेश सायगल

एका धाग्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिसाद देणारे आणि दुसऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एक सदस्य येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढताना बघून गंमत वाटली.
हेच म्हणायला आलो होतो ...

In reply to by प्रसाद गोडबोले

हायकोर्टाची भाषा करणारे सभ्य आणि बाकी सगळे असभ्य ?? आणि भाषा सभ्य असली तरी अंतरंग मात्र नादावलेला !! ....तसे असते तर झाडामागं गुलुगुलु बोलणारं जोडप सर्वात सभ्य म्हणावे लागेल.. .... फालतुच्या संकल्पनांना जबरदस्तीने संस्थळावर थोपणवार्‍याना तिच भाषा समजते अस अनुभव आहे ..... आणि दरवेळी असे करणार्‍यांची मस्ती उतरविण्यात येईल याची नोंद घ्यावी .. भाषेबाबत कुणाच्या बापाला भीक न घालणारा

In reply to by सुहास..

भगवान श्री गौतम बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गात सर्वप्रथम येते ती "अहिंसा" ! वरील प्रतिसादात आपण केलेली वाचिक हिंसा आणि कायिक हिंसा करण्याची दिलेली धमकी पाहुन आपल्या आध्यात्मिक अधःपतना बद्दल खेद वाटला ! भगवान बुध्द आपल्याला सत्यधर्माचा मार्ग दाखवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बाळ प्रसाद, कुठे अष्टांग मार्ग आणि कुठे अहिंसा .?? .गल्लत झाली की काय ." अहिंसो परमोधर्म " हे जैन धर्मात .... १.सम्यक दृष्टी : आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीचे स्थान सर्वप्रथम आहे. तसे तिचे महत्त्व प्रथम क्रमांकाचे आहे. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्याशिवाय कोणालाही बुद्धाप्रणित धम्ममार्ग समजायचा नाही. किंबहुना गृहस्थी जीवनातील दुःखाचे अस्तित्व आणि ते निवारण करणारा आर्य अष्टांगिक मार्ग यांना परम सत्य मानुन त्यावर श्रद्धा ठेवणे यालाच सम्यक दृष्टी म्हणतात. सम्यक दृष्टी म्हणजे या विश्वातील अनंत प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन. वैचारिक अधिष्ठान, अविद्येचा नाश करणे, व्रत वैफल्य यातील फोलपणा समजणे. ईश्वर व आत्मा न मानणे, कोणत्याही चमत्कारांवर विश्वास न ठेवणे, ग्रंथ प्रामाण्य न मानता व्यक्तीचे मन व विचार याचे स्वातंत्र्य राखणे इत्यादी सम्यकदृष्टीची उदाहरणे सांगता येतील... सम्यक दृष्टीचे महत्व सांगताना भगवान बुद्ध म्हणतात कि, हे विश्व एक अंधारकोठडी आहे व मनुष्य हा तिच्यातील कैदी आहे, ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे, अंधार इतका आहे जी, कैद्याला क्वचीतच काही दिसु शकते. कैद्याला आपण कैदी आहे हेही कळत नाही. खुप काळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तु अस्तित्वात असु शकते याबद्दल शंका वाटते. मन हे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळु शकतो, तथापि या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही कि, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. परंतु मानवात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतु निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही मनुष्याला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करु शकेल व शेवटी तो बंधमुक्त होईल. मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करु शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्वाला बंधमुक्त करु शकते. सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा उद्देश काय आहे..? अविद्या व मिथ्या दृष्टीचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. मनुष्याने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकुन देणे. अद्भुत कल्पनांचा त्याग करणे, निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी ताज्य आहेत. स्वतंत्र मन व स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. २.सम्यक संकल्प : कोणतीही कृती करण्यापुर्वी आपले मन स्वच्छ व स्पष्ट असावे, ते शुद्ध असावे, ते वाईट विचारांपासुन मुक्त असावे. प्रश्नांची, समस्यांची उकल करताना मन मुक्त असावे. उच्चस्तरांवरुन विचार केल्यास आपले मन संवेदनापासुन, विकृत इच्छा, क्रोध, द्वेष, संशय, चिंता आळस या सर्वांपासुन मुक्त असावे. हे केवळ ध्यान व एकाग्रचित्तने साध्य होईल. त्याचबरोबर आपण मानसिक, प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या बाबीवर मात कर शकतो. प्रत्येक माणवाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आशय आहे. व्यक्तीने आपली इच्छा, महत्वकांक्षा व ध्येय नेहमी उदात्त आणि चांगले ठेवावे. ज्यामुळे आपले तसेच इतरांचेच कल्याण होईल. तसेच शुद्ध ध्येय असावे. आपली महत्वकांक्षा कोणाच्याही अहितावर आधारित नसावी. शिवाय आपली शक्ती आणि योग्यता आजमावुनच महत्वकांक्षा बाळगावी यालाच सम्यक संकल्प असे म्हणतात. सम्यक संकल्पामुळे कर्त्याच्या पदरी निराशा येत नाही. त्याची जाणीव झाल्यावर कर्त्याला समाधान वाटते. त्यामुळे कर्त्याचे आणि मानवी समाजाचे कल्याण होते. स्वार्थी किंवा दुष्ट संकल्पामुळे शत्रुत्व वाढते. मुर्ख संकल्पामुळे अपयश येऊन जगात हास्य किंवा फजिती होते, जगातील कितीतरी व्यक्तींना स्वःताच्या किंवा इतरांच्या क्रुर महत्वकांक्षेला बळी पडल्यामुळे दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात. ३.सम्यक वाचा : सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. मधुर व शांत वाणीने शत्रुचे मित्र होता. उलट गर्विष्ट उपर्दकारक, वात्रट, ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तुडविणाऱ्या वाणीने मित्रही शत्रु होतात. (तुमच्या सारखे सुधरत नाहीत प्रेमाने बोलुन)म्हणुन प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा व अधिकार ओळखुनच बोलावे, खोटे बोलु नये. चांगले, गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे. . मित्तभाषा असावी. अश्लील बोलु नये. वाईट बोलण्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते. वाचेने पवित्र व विश्वास सदोदित रक्षण करावे, योग्यवेळी योग्य शब्द उच्चारावे, अर्थपुर्ण बोलावे. यालाच सम्यक वाचा म्हणतात. सम्यक वाचा आपल्याला शिकवते कि, १. माणसाने सत्य तेच बोलावे. २. असत्य बोलु नये ३. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलु नये. ४. माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासुन परावृत्त व्हावे. ५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरु नये. ६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७. माणसाने अर्थहीन व मुर्खासारखी बडबड करु नये., त्याचे बोलणे संमजसपणे व मुद्देसुद असावेत.. ४.सम्यक कर्मांत : सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती मनुष्याने आपले कर्तव्य योग्य दिशेने, योग्य वेगाने व जाणीव ठेवुन पुर्ण करावे हा 'सम्यक कर्मांत' होय. आपली वागणुक सदाचारी असावी. लोभाला बळी पडुन बळजबरी, चोरी किंवा व्यभिचार करु नये. सतत कार्य करावे. कार्य चिकाटीने पुर्णत्वास न्यावे. निरुपयोगी किंवा आळशी नसावे. सम्यक संकल्पाला सम्यक कृतीची जोड असल्याशिवाय तो पुर्ण होणार नाही. कोणत्याही चांगल्या ध्येयासाठी वाईट कर्म करु नये. आळस किंवा घाई गडबड टाळुन आपल्या प्रत्येक पाऊल ध्येयसिद्धीकडे टाकल्यास निराशा किंवा अपयश येणार नाही, हि सम्यक कर्मांताची लक्षणे आहेत. कामवासनेच्या बाबतीत योग्य वर्तन असणे हा सम्यक कर्मांतामधील महत्त्वाचा भाग आहे. त्याने कामांध होऊ नये किंवा व्यभिचार करु नये. आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावे. ५ सम्यक आजीविका/आहार : प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेसाठी साधन असते, हे साधन योग्य असावे हा सम्यक आजीविका चा अर्थ आहे. व्यक्तीने आपली उपजीविका चांगल्या उद्योगधंद्याने करावी. सचोटीने व प्रामाणिकपणाने काम धंदा करुन त्यावर जगावे. आपला उद्योगधंदा समाजाला उपयुक्त असावा. आपल्या धंद्यामुळे कोणाला दुःख होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. वाईट मार्गाने जसे चोऱ्या करुन, युद्ध करुन, दारु किंवा अपायकारक पदार्थाचे उत्पादन करुन अनीतीला पोषक होतील अशी साधने बनवुन असा एखादा वाईट धंदा करुन त्यावर उपजीविका करु नये. तसेच आळशी राहु नये, परक्याच्या कष्टावर जगु नये. एकुण सम्यक आजीवीका म्हणजे समान उपयुक्त नीतिमान उद्योग करणे व त्याद्वारा आपले जीवन जगणे होय. ६.सम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला प्रशिक्षण देण्यासाठी करावयाचे योग्य प्रयत्न होय. व्यक्तीने आपल्या चंचल व ओढाळ मनावर नियंत्रण ठेवुन त्याला शिस्त लावावी. मन भलतीकडे जाणार नाही, मनात अनीतीने कामवासनेचे किंवा वाईट विचार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आपल्या मनात असलेल्या सद्गुणाची वाढ करणे व नसलेले दुर्गुण जवळ येणार नाहीत याची काळजी घेणे या प्रयत्नांनाच 'सम्यक व्यायाम' असे म्हणतात. सतत योग्य प्रयत केल्यास दृढ मनोनिग्रहाने लागट दुर्गुण किंवा व्यसनांचा त्याग करणे शक्य आहे. सद्धर्माबद्दल श्रद्धा निर्माण होण्यासाठी सम्यक व्यायामाची आवश्यकता आहे. ७.सम्यक स्मृती : सम्यक स्मृती म्हणजे मनाची जागरुकता. व्यक्तीने आपले मन नेहमी स्मृतीमान ठेवावे. नेहमी विवेक जागा ठेवुन मनाच्या छोट्या मोठ्या हालचालींवर नेहमी ताबा ठेवावा. हीच सम्यक स्मृती होय. मनाची शक्ती फार मोठी आहे, आपण थोडे जरी गैरसावध राहिलो तर ते आपणास कुविचाराकडे घेऊ न जाते म्हणुन आपल्या मनात राग, लोभ, द्व्ष, तृष्णा, मत्सर, इ. विकारांचा उद्रेक न होण्यासाठी व्यक्तीने सतर्क आणि स्मृतिमान राहिले पाहिजे. ८.सम्यक समाधी : सम्यक समाधी म्हणजे योग्य चिंतन. आर्य अष्टांगिक मार्गातील वरील सात गोष्टींचे आपण अचुक पालन करतो कि नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच सम्यक समाधी सांगितली आहे. दुःक, दुःखाचे कारण, दुःखातुन मुक्तता आणि त्यातील आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करण्याची आपल्या मनाला नित्य सवय होण्यासाठी सम्यक समाधी उपयुक्त आहे. अशा एकात्म विचाराने अनेक गुंतागुंतीच्या समस्यांच्या उलगडा होतो. जीवनातील अनेक रहस्य व गहन प्रश्न सुटल्यामुळे आपल्या मनाला अद्वितीय आनंद होतो. एकाग्र मनाने केलेले चिंतन म्हणजे सम्यक समाधी होय. (संपादित)

In reply to by सुहास..

थॅन्क यु रे वाश्या! आणि वाश्याला उचकवल्याबद्दल थॅन्क यु रे पश्या! ;) गाभा (किमान वाच्यार्थानं) समजावून घेतल्यावर नंतर काहीतरी बोलायला हरकत नसावी.

In reply to by सुहास..

हे सगळ आपल्याला* करता आल तर किती बरं होईल ना! असो प्रयत्न करायला काय हरकत आहे? * आपण म्हणजे तुम्ही आम्ही आपण सगळेच

In reply to by सुहास..

आमच्या चुकीच्या , अज्ञानानाच्या, माहीतीने का होईना , तुम्ही धर्माचा परत एकदा विचार केलात ,आम्ही वर ईश्वरचरणी केलेली प्रार्थना सार्थक ठरली :) आम्हाला काय बौध्द जैन शैव वेदान्ती सारे सारखेच ...मग कधी कधी होतं इकडचं तिकडं ...पण " आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्व देव नमस्कारं केशवं प्रति गच्छति" सो काही टेन्शन नाही :) आता तुम्हीच लिहिलेल्या खालील पॅरावर चिंतन करा ...
३.सम्यक वाचा : सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. मधुर व शांत वाणीने शत्रुचे मित्र होता. उलट गर्विष्ट उपर्दकारक, वात्रट, ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तुडविणाऱ्या वाणीने मित्रही शत्रु होतात. (तुमच्या सारखे सुधरत नाहीत प्रेमाने बोलुन)म्हणुन प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा व अधिकार ओळखुनच बोलावे, खोटे बोलु नये. चांगले, गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे. . मित्तभाषा असावी. अश्लील बोलु नये. वाईट बोलण्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते. वाचेने पवित्र व विश्वास सदोदित रक्षण करावे, योग्यवेळी योग्य शब्द उच्चारावे, अर्थपुर्ण बोलावे. यालाच सम्यक वाचा म्हणतात. सम्यक वाचा आपल्याला शिकवते कि, १. माणसाने सत्य तेच बोलावे. २. असत्य बोलु नये ३. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलु नये. ४. माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासुन परावृत्त व्हावे. ५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरु नये. ६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. ७. माणसाने अर्थहीन व मुर्खासारखी बडबड करु नये., त्याचे बोलणे संमजसपणे व मुद्देसुद असावेत..
मस्ती उतरवण्यात येईल किंव्वा अल्-त्रिरत्नसंघाकडे तक्रार करु ही वाक्ये नक्कीच "सम्यक" नाहीत . लवकरच तुम्हाला हे पटेल :) मग तुमची बुध्दत्वाकडे खरी वाटचाल सुरु होईल !! तुमच्या धार्मिक उन्नतीला हातभार लावल्याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे :)

मराठी आंजावर डु आयडीला व टोपणनावांना बंदी नसावी, मात्र प्रत्येक आयडीमागचे खरे नाव फक्त मालकांना (संपादकांना वा इतर तंत्रज्ञांना नाही) सांगणे बंधनकारक असावे अशी माझी खूप जुनी भुमिका आहे. अजूनही ती तशीच आहे.

In reply to by बॅटमॅन

हा मुद्दा २००६ पासुन चर्चेत आहे. मराठी संकेतस्थळावरच विशेष करुन तुमचे नाव सांगा, कुठे रहाता ते सांगा इत्यादी इनंत्या येत असतात. इतर विशेषतः इंग्रजी भाषिक स्थळांवर (माझा वावर साधारणतः केवळ तंत्रज्ञान देवाणघेवाण फोरमवर असतो) अशा प्रकारचा आग्रह दिसत नाही. कुणीही काहीही नाव घेतो, ओळख दिली जात नाही. तरीही त्यांच्यावर मालकवर्ग अथवा मॉडरेटर तुम्ही ड्यु आयडी आहात वगैरे कुचेष्टा करत नाहीत.* हा प्रकार केवळ मराठी स्थळांवरच जास्त दिसतो आणि चर्चिला जातो. * याला अपवाद असतील ही शक्यता मान्य अहे,

In reply to by मारकुटे

मराठी संस्थळवाल्यांना नक्की कसली इन्सिक्युरिटी असते जेणेकरून हे सगळे डीटेल्स मागवावे वाटतात? वर आणि विचारतीलच, तुम्हांला डीटेल्स द्यायला काय झालं म्हणून. हा सगळा प्रकारच अत्यंत बालिश आणि तितकाच हास्यास्पद आहे. हे इंटरनेट आहे, शाळा नव्हे. टेक्नोसॅव्ही झाल्याने मनोवृत्ती बदलत नाही याचे एक उत्तम उदा. म्हणून हे नक्की सांगता येईल.

In reply to by बॅटमॅन

यामागचे कारण हे कायदेशीर दृष्ट्या आवश्यकता असे आहे. उद्या एखाद्या आयडीने काही बेकायदेशीर काम केले तर पोलिसांनी विचारणा केल्यावर त्या व्यक्तीची माहिती मालकांकडे असली पाहिजे - किमान विदागारातून ती काढता आली पाहिजे. बाकी त्याची खरी माहिती इतरत्र कुठेही घोषित होता कामा नये! अगदी संपादकांकडेही!

In reply to by ऋषिकेश

बेकायदेशीर काम करणे हे त्या संस्थळाच्या माध्यमातून केले तर आणि तरच त्याची गरज आहे. मात्र अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा, की अन्य इंग्रजी फोरम्स इ. ठिकाणी मात्र इतकी टाईट सुपरव्हिजन नसते. तेव्हा प्रॉब्लेम कसा काय येत नै आणि इथेच कसा काय येतो?

In reply to by ऋषिकेश

>>>>उद्या एखाद्या आयडीने काही बेकायदेशीर काम केले हा हा हा बेकयदेशीर काम? , म्हणजे नक्की काय? मिपावरुन वा मराठी संकेतस्थळावरुन इमेल पाठवता येत नाहीत. व्यनी खरड येते. आयपी अ‍ॅड्रेस वरुन व्यक्ती ट्रेस करायची असल्यास करता येते. बहुतांशी संकेतस्थळे द्रुपल वापरतात. त्यामधे आयडी चा सगळा लॉग असतो. त्या लॉगवरुन कोणा आयडीने काय केले हे डिट्टेल काढता येते. मध्यंतरी रच्याकन कुणी आयडीने अनेक जणांचे व्यनी वाचण्याचा उद्योग एका संकेतस्थळावर केला होता. ते सर्व लॉगच्या माध्यामातुन ह्ळूच शोधले गेले होते. आता व्यानी चोरुन वाचणे बेकायदेशीर असतांना त्यावर काही कारवाई केली गेली नाही. मग जर खरी माहिती असती तर केली गेली असती का? सांग सांग भोलानाथ अनेक संकेत स्थलावार मालकांशिवाय इतर दोन चार मदतनीस असतात अनुपस्थितीत काम करायला, हा विदा त्यांना मिलून ते वापरणार नाहीत कशाअवरुन? ऑऑऑऑ कान्ट से अनेक संकेतस्थाळाच्या मालकांनीच लोकांना टोप्या घातल्या आहेत... माणुस आहे हो शेवटी मालक सुद्धा ! होतात चुका !! मुद्दा हा की मराठी संकेतस्थळे जी बहुतांशी केवळ चर्चा वाचन आणि लेखन याच सेवा देतात तिथे खरी माहिती दिलीच पाहीजे हे बंधन निरर्थक आहे.

>>मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन. आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ?>> आहो, बोंब ठोकली होती एक आयडि समजला तेंव्हा!! सगळ्यांना कळलं होतं कोणाचा आहे तो. हात वर केलंन. मग काय करु शकता अशा वेळी?? आपलेच दात आणि आपलेच ओठ. सोडून द्यायचं. आता वर्षभर त्या आयडीनं तोंड लपवलंयन्. असो.

In reply to by सूड

तुम्ही नक्कीच चांगले काम केले होते पण काही झाल नाही म्हणता मग अशी बोंब करुनही काय उपयोग म्हणा !

In reply to by सूड

देवरुखकर तुम्हीपण ना. आता वाटलं कुणाला माशाचा डोळा व्हावं तर त्याचा काय एव्हढा बाऊ करायचा.

मिपावर लोक लिहायला वाचायला प्रामुख्याने येतात, हे प्रामूख्याने लेखक आणी वाचकांचे खुले व्यासपीठ आहे, मिटप डॉट कॉम न्हवे. बाकी चर्चा रोचक.