Skip to main content

युरोप मधील पहिला वाहिला धमाल मिपा.कट्टा म्युनिक मधला

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 19/03/2014 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख १३ आणि १४ मार्च २०१४ हे दिवस अविस्मरणीय राहतील माझ्या आयुष्यात कारण साधुसंत येती घरा...चा अनुभव मला परदेशात घेता आला . श्री.निनाद , श्री.पेठकर काका , सौ . पेठकर काकू आणि आम्ही दोघे असा कट्टा झाला . खरं तर कट्टे झाले २ दिवस सलग . निनाद यांनी मला आधी सांगितले होते कि काका आणि काकू म्युनिक दौर्यावर येत आहेत . मी तयार होतेच , कट्ट्याला हजेरी लावायला . :D १३ तारखेला सक्काळ सक्काळीच फोणाफोणी करुण आम्ही मरियन प्लात्झ (म्युनिक मधील प्रसिद्ध ठिकाण ) ला भेटायचं ठरवलं . त्यानुसार आम्ही भेटलो . पहिली ओळखपरेड झाली तीही गुथ्थि इष्टयील...काका - निनाद ,निनाद - काका , निनाद - काकू ,काकू - निनाद , दिव्यश्री - काका काकू , दिव्यश्री - निनाद .रेल्वे ठेसनातून बाहेर आल्यावर उंच टॉवर वर गेलो .लैच ड्यांजर होता चढायला *beee* . एका वेळेस एकाच माणूस एकतर वर जाऊ शकतो नाही तर खाली येऊ शकतो . हाश हुश्श करत करत पोहोचलो वरती ... टॉवर वरती ...काय नजारा होता .आहाहा एवढे जिणे चढल्याचे सार्थक झाले अगदी . म्युनिक शहराचा सुंदर नजारा दिसत होता *BRAVO* . गेल्या ३ वर्षात पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेले होते . निनाद सुंदर ठिकाण माहिती करून दिल्याबद्दल Tahnk You. :) त्या दिवशी हवामानाची ही कृपादृष्टी होती . इथे ती असेल तरच तुमच्या फिरण्याला मजा आहे . मग म्युनिक बान (रेल्वे, ड्योयीच बान) ने बरेच ठेषण पालथे घातले ...दुपारच्या जेवणासाठी ...गप्पांच्या नादात चुकुण चुकत होतो ...जाणा था जपाण *SCRATCH* असंच काहीस झाल . शेवटी एकदाच हॉटेल नट्राज (नटराज) आल . निनाद म्हणत होते बुफे / बफे घेऊ म्हणून त्यावर बराच खल झाला . शेवटी नटराज फायनल झालं . तिथे मी आणि काकू प्युअर व्हेज म्हणून मिक्स व्हेज आणि दाल माखनी , tandoori रोटी आणि णोण व्हेज वाल्यांनी पण कायतरी मागवला...इसरले ...स्वारी :( ....मस्त जेवणे झाली , फोटू काढले मग आम्ही पुणहा ठेष्णकडे कूच केली . आम्हाला डखाऊ कोन्संत्रेषण कॅम्पला जायचे होते . त्याप्रमाणे आम्ही डखाऊला पोहोचलो . ठेषण वर उतरलो , बाहेर येउण बशीत बसलो मग त्या कॅम्पच्या इस्टोपला उतरलो . तिथून चालत चालत गेलो , गेटमधून आत शिरलो ...सगळा कॅम्प पाहिला .कामाचा दिवस ( working day ) असल्यामुळे गर्दी नव्हती .खूप हाल हाल करून कैद्यांना मारलंय हे तेथील फोटोज वरून दिसत होत . :( संध्याकाळचे पाच वाजले होते . मुख्य गेस चेंबर बंद झाल होत . निनाद यांनी जर्मन भाषेतून बोलून सांगितलं कि काका काकूंना जाऊ द्या ते १० मिनिटात बघून येतील , ते भारताहून आले आहेत पण त्याने नाही सोडलं . मग आम्ही परत बशीत ... ठेषण ...तिथून बाणीत मग आमच्या घरी . मुरलेल्या मिपाकराप्रमाणे श्री . निनाद यांनी पेठकर काका आणि माझ्यात कडी सारली आणि भडका कधी उडतो याची वाट बघितली . :) फोटोज टाकायला अजूनही जमत नसल्यामुळे फोटो टाकले नाहीत . क्षमस्व . :( बाकीचा वृत्तांत ब्रेक के बाद ... अवांतर पण महत्वाचे : शुद्धीत राहून प्रतिक्रिया , प्रतिसाद , आपले अमुल्य मत प्रदर्शन करावे . प्रतिसाद /प्रतिक्रिया देताना वैयक्तिक शेरेबाजी टाळावी . कुठल्या प्रतिसादा /प्रतिक्रिये ला फाट्यावर मारायचे , पुणेरी शब्दात उत्तर द्यायचे याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे . दुसरा भाग लिहायचा कि नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार लेखिकेचा राहील . बाकी नेहमीप्रमाणेच सूचनांचे अर्थातच स्वागत राहील . :) क्रमशः . काही फोटो....  संग्रहालय  कैद्यांच्या बराकीचा नकाशा  कुप्रसिद्ध गेस चेंबर कडे जाणारा भयाण रस्ता  कुप्रसिद्ध गेस चेंबर माहिती नकाशा  जगातील एका मोठ्या , प्रसिद्ध मुधुशालेतील वाद्यवृंद   डखाऊ कॅम्प परिसर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19677
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

+१ निनादने दुसरा धागा काढतो म्हटल्यावर जरा वाट पहावी म्हणत होतो.

In reply to by बॅटमॅन

मी कुठे म्हणाले कि हे मी देशप्रेम,राष्ट्रभक्ती ई. दाखवण्यासाठी करते ??? *SCRATCH* माझा प्रतिसाद नीट वाचला तर समजेल मला काय म्हणायचं आहे ते . :( बाकी कुणी कुठे जावं , खावं, प्यावं याच्याशी मला काहीही देण-घेण नाही . मी फक्त माझ मत व्यक्त केल . त्यादिवशीही मी निनाद यांना सांगितलं होत तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता , मी घरून व्यवस्थित खाउन आले आहे . मी तिथे येणार नाही म्हणून मी त्यांच्या जाण्यावर कुठलंही बंधन केल नाही , आडकाठी केली नाही . धाग्याच काश्मीर करायचं नसेल तर हा विषय इथेच थांबवा . तसेही हा विषय मी काढलेला नाही . शतकी ,द्विशतकी धाग्यांची मला हौस नाही . ज्यांना त्याच्यात रुची असेल त्यांनी जरूर वेगळा धागा काढावा .

In reply to by बॅटमॅन

>>>>आपली राष्ट्रभक्ती जाहीर करायचा हा अंमळ केविलवाणा मार्ग वाटतो. केविलवाणा का बरं? मुळात राष्ट्रभक्ती वगैरे मनांत आहे. ती जाहीर करण्याची अजिबात गरज नसते. पण मित्रमंडळींमध्ये सहज संवादात आपले खरे मत मांडले तर ते केविलवाणे ठरते? बरं! ठरू दे. आहे ते आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

सहमत प्रत्येक माणसांची अनेक मुद्यांवर आपली ठाम मते , गृहीतके असतात. प्रत्येकवेळी आपल्या मतांशी ती सामाईक असणे अनिवार्य नसते , व्यक्ती तितक्या प्रक्रुती असतात. दिव्यश्री ह्यांचा पाकिस्तानी उपहारगृहात न खाणे किंवा सुधीर काळे ह्यांचा चीनी वस्तूंवर बहिष्कार असे अनेक मुद्दे मला जरी पटले नसले तरी ह्या हेतू मागील त्यांच्या भूमिकेवर मला कधीच संशय नव्हता, ह्या भूमिकेवरून आमच्यात मतांतरे असतील तर प्रत्येकाला आपापली मते असण्याचा अधिकार आहे. मिपा मला एका कुटुंबासारखे आहे , मतांतरे असून माझा येथील सर्व सद्स्यानावर लोभ आहे. पण जेव्हा माझी एखाद्याशी मतांतरे होतात तेव्हा तो आयडी कोणाचा आहे ह्यापेक्ष्या मुद्यांना माझा विरोध मी व्यक्त करतो. हा विरोध वैचारिक असतो , वयक्तिक नसतो , नसावा लवकरच भेटूया. एका नवीन शतकी धाग्यासह.

वृत्तांत, त्याबद्दलची चर्चा, सगळं मस्तच आहे! दिव्यश्री 'नयी हुं मय...पर अकेलीही सब पे भारी हुं मय' अगदी मस्त खरं करून दाखवलंस! आता आम्हाला अजून एक खमकी आणि खमंग मिपाकर मिळाल्याचा प्रचंड आनंद झाला आहे!

In reply to by पैसा

एक खमकी आणि खमंग >>>अश ना म्हणाच...आपण किती सध्या , सालस, गरीब ,बिचार्या ईई. णा . ;) :P