युरोप मधील पहिला वाहिला धमाल मिपा.कट्टा म्युनिक मधला
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
तारीख १३ आणि १४ मार्च २०१४ हे दिवस अविस्मरणीय राहतील माझ्या आयुष्यात कारण साधुसंत येती घरा...चा अनुभव मला परदेशात घेता आला . श्री.निनाद , श्री.पेठकर काका , सौ . पेठकर काकू आणि आम्ही दोघे असा कट्टा झाला . खरं तर कट्टे झाले २ दिवस सलग . निनाद यांनी मला आधी सांगितले होते कि काका आणि काकू म्युनिक दौर्यावर येत आहेत . मी तयार होतेच , कट्ट्याला हजेरी लावायला . :D
१३ तारखेला सक्काळ सक्काळीच फोणाफोणी करुण आम्ही मरियन प्लात्झ (म्युनिक मधील प्रसिद्ध ठिकाण ) ला भेटायचं ठरवलं . त्यानुसार आम्ही भेटलो . पहिली ओळखपरेड झाली तीही गुथ्थि इष्टयील...काका - निनाद ,निनाद - काका , निनाद - काकू ,काकू - निनाद , दिव्यश्री - काका काकू , दिव्यश्री - निनाद .रेल्वे ठेसनातून बाहेर आल्यावर उंच टॉवर वर गेलो .लैच ड्यांजर होता चढायला *beee* . एका वेळेस एकाच माणूस एकतर वर जाऊ शकतो नाही तर खाली येऊ शकतो .
हाश हुश्श करत करत पोहोचलो वरती ... टॉवर वरती ...काय नजारा होता .आहाहा एवढे जिणे चढल्याचे सार्थक झाले अगदी . म्युनिक शहराचा सुंदर नजारा दिसत होता *BRAVO* . गेल्या ३ वर्षात पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेले होते . निनाद सुंदर ठिकाण माहिती करून दिल्याबद्दल Tahnk You. :) त्या दिवशी हवामानाची ही कृपादृष्टी होती . इथे ती असेल तरच तुमच्या फिरण्याला मजा आहे . मग म्युनिक बान (रेल्वे, ड्योयीच बान) ने बरेच ठेषण पालथे घातले ...दुपारच्या जेवणासाठी ...गप्पांच्या नादात चुकुण चुकत होतो ...जाणा था जपाण *SCRATCH* असंच काहीस झाल . शेवटी एकदाच हॉटेल नट्राज (नटराज) आल . निनाद म्हणत होते बुफे / बफे घेऊ म्हणून त्यावर बराच खल झाला . शेवटी नटराज फायनल झालं . तिथे मी आणि काकू प्युअर व्हेज म्हणून मिक्स व्हेज आणि दाल माखनी , tandoori रोटी आणि णोण व्हेज वाल्यांनी पण कायतरी मागवला...इसरले ...स्वारी :( ....मस्त जेवणे झाली , फोटू काढले मग आम्ही पुणहा ठेष्णकडे कूच केली .
आम्हाला डखाऊ कोन्संत्रेषण कॅम्पला जायचे होते . त्याप्रमाणे आम्ही डखाऊला पोहोचलो . ठेषण वर उतरलो , बाहेर येउण बशीत बसलो मग त्या कॅम्पच्या इस्टोपला उतरलो . तिथून चालत चालत गेलो , गेटमधून आत शिरलो ...सगळा कॅम्प पाहिला .कामाचा दिवस ( working day ) असल्यामुळे गर्दी नव्हती .खूप हाल हाल करून कैद्यांना मारलंय हे तेथील फोटोज वरून दिसत होत . :( संध्याकाळचे पाच वाजले होते . मुख्य गेस चेंबर बंद झाल होत . निनाद यांनी जर्मन भाषेतून बोलून सांगितलं कि काका काकूंना जाऊ द्या ते १० मिनिटात बघून येतील , ते भारताहून आले आहेत पण त्याने नाही सोडलं . मग आम्ही परत बशीत ... ठेषण ...तिथून बाणीत मग आमच्या घरी .
मुरलेल्या मिपाकराप्रमाणे श्री . निनाद यांनी पेठकर काका आणि माझ्यात कडी सारली आणि भडका कधी उडतो याची वाट बघितली . :)
फोटोज टाकायला अजूनही जमत नसल्यामुळे फोटो टाकले नाहीत . क्षमस्व . :(
बाकीचा वृत्तांत ब्रेक के बाद ...
अवांतर पण महत्वाचे : शुद्धीत राहून प्रतिक्रिया , प्रतिसाद , आपले अमुल्य मत प्रदर्शन करावे . प्रतिसाद /प्रतिक्रिया देताना वैयक्तिक शेरेबाजी टाळावी . कुठल्या प्रतिसादा /प्रतिक्रिये ला फाट्यावर मारायचे , पुणेरी शब्दात उत्तर द्यायचे याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे . दुसरा भाग लिहायचा कि नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार लेखिकेचा राहील . बाकी नेहमीप्रमाणेच सूचनांचे अर्थातच स्वागत राहील . :)
क्रमशः .
काही फोटो....
संग्रहालय
कैद्यांच्या बराकीचा नकाशा
कुप्रसिद्ध गेस चेंबर कडे जाणारा भयाण रस्ता
कुप्रसिद्ध गेस चेंबर माहिती नकाशा
जगातील एका मोठ्या , प्रसिद्ध मुधुशालेतील वाद्यवृंद
डखाऊ कॅम्प परिसर
संग्रहालय
कुप्रसिद्ध गेस चेंबर कडे जाणारा भयाण रस्ता
डखाऊ कॅम्प परिसर
प्रतिक्रिया
वृत्तांत आवडला,
येसवायाजी
पण दिव्यश्री ने तेथे जाण्यास साफ नकार दिला.
जातिवंत मिपाकर ह्या नात्याने
धन्स निनाद. मजा केलीत तर.
>>>> अशी पाखरे येती ,आणिक
@यावर आपला संवाद झाला आहे .
टाळतो...टाळावे.
+१००
सहमत
म्हन्जे
मात्र याला एक अपवाद आहे तो
हे तुम्ही परदेशी असताना करता
बाकी जगभरात जे काही मि.पा. सदस्य पसरले आहेत ते एका अतुट, अनामिक नात्याने (मग कितीही वाद संवाद असो) एकमेकांशी घट्ट बांधले गेलेले आहेत हे अगदि खरं. ही वीण अशीच उत्तरोउत्तर अधिक घट्ट होवो हिच प्रार्थना.
स्वगतः- का बा कुणास ठाऊक मला इतर (मायबोली, ऐसी अक्षरे..., उपक्रम) स्थळांपेक्षा मिसळपावच जास्त आवडते.पम्यादादा, बेकरी व्यवसायात
शेळके
का बरे खटपट्या , भयै लोक
आणि मग तसं ठरवलं तर वडापाव
साफ चुक. तुमचा पाव आता दुर्गम
हे पाकिस्तानी / चिनी
+१
+१
मी कुठे म्हणाले कि हे मी
वरील प्रतिसादाने आपण आपल्या
असहमत.
सहमत
...वृतांत वाचला छान लिहीलाय, आवडला ...!!!
मस्तच!
खमकी
Pagination