आमचाही छोटेखानी मिपा कट्टा,:)

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
6 Sep 2008 - 11:39 pm

युरोपातला उन्हाळा आल्हाददायक असतो. २२ ते २५ अंश से तापमान,सूर्याचा ढगांशी लपंडाव आणि मध्येच एखादी हलकीशी सर असा 'श्रावण' उन्हाळाभर चालू असतो. साहजिकच ह्या वातावरणाचा जास्तीत जास्त उपयोग सगळे करून घेत असतात कारण त्यानंतर येणारी पानगळ दिवस लहान करते आणि तिच्यापाठोपाठची बोचरी थंडी सोबतीला करड्या संध्याकाळी आणते.त्यामुळे उन्हाळ्यात मौजमजेचे जास्तीत जास्त प्लान केले जातात्.व्हरांड्यात,गच्चीत,अंगणात केलेले बार्बेक्यू हे त्यात अग्रभागी असतात.अशा हवेत आम्हाला एकत्र काहीतरी करण्याची सुरसुरी न आली तरच नवल! त्यात आणि तात्याने अचानक छोटेखानी मिपा कट्टा! :)मा.मिच्या फोटोंसकट टाकल्याने मामि खायची इच्छा तीव्र व्हायला लागली पण इथे फ्रांकफुर्टात कुठला मामलेदार अन् कसली मिसळ? इथे फरसाण मिळते ते ही बिलकुल चांगले नसते पण मग मिळते तेच चांगले मानून मामि करूया असा बेत ठरवू लागलो.

अशातच एक दिवस प्रसादचा फोन आला.तो फ्राफुजवळच्या वेट्झलर येथे एका वर्कशॉपसाठी ४ दिवसांकरता येणार होता.त्याला फरसाण (मामि साठी पेश्शल )आणायचे फर्मान सोडले.तो ही मामि भक्त असल्याने कसे फरसाण हवे ते त्याला माहिती होतेच!दोस्तीला जागून त्याने फरसाण वाहून आणले आणि काल हातात फरसाण आल्यावर आज मामि करणे क्रमप्राप्तच होते.लिखाळ आणि केसुंना सांगावा धाडला पण लिखाळचे म्युनस्टर केसुंच्या डार्मस्टाट सारखे हाकेच्या अंतरावर नसल्याने त्याचा नाइलाज झाला.
आज सकाळीच मामिची तर्री करायला घेतली आणि मिसळीचा घमघमाट कॉरीडॉर पर्यंत पोहोचला.चव घेऊन पाहिली,मस्त झटका बसला.आता तिच्यावर तुटून पडायचा मोह नाइलाजाने टाळत आम्ही केसुंची वाट पाहत बसलो. न राहवून दिनेशने फोन लावला तेव्हा केसु फ्राफु मध्ये अवतीर्ण झाले होते आणि 'मदन'कडून गुलाबजाम वगैरे घेऊन येतो सांगून त्याने फोन ठेवला आणि मी इकडे रस्सा उकळवायला ठेवला.गुलाबजाम,गाजरहलवा आणि लाडूंसकट केसुंचे आगमन थोड्याच वेळात झाले आणि लालबुंद तर्रीत लुसलुशीत पाव बुडवत आम्ही मिसळीवर तुटून पडलो.

मामलेदार मिसळ फ्राफु मध्ये
पहिली प्लेट संपेपर्यंत कोणी कोणाशी एक अक्षरही बोलले नाही. प्रसादने ठाण्यातून मिसळ स्पेशल फरसाण आणल्याबद्दल त्याला दुवा देत,घाम टिपत,हायहुश्श करत पुढची प्लेट हाणली.एव्हाना रश्श्याचा घमघमाट म्युनस्टरपर्यंत पोहोचला असावा कारण लिखाळचा फोन आलाच!फ्राफु ते म्युनस्टर अंतर ६०० किमीच्या वर असल्याची रुखरुख त्या दोघांना लागली होती. म्युनस्टरच्या दिशेने मिसळीचे चार चमचे टाका असे फर्मान तिकडून सोडण्यात आले पण चार चमचे मिसळ वाया कशाला घालवा? त्याऐवजी एक घास काऊचा,एक घास चिऊचा या चालीवर एक घास लिखाळचा ,एक घास लिखाळीचा करत आम्ही खाऊ असे केसु आणि दिनेशने त्यांना ऐकवले.

एक घास लिखाळचा...
मिसळीची रसभरीत वर्णने करुन म्युन्स्टरवाल्यांना जरा जळवले,ते कमी म्हणून की काय नंतर खाणार असलेल्या रवाबेसन लाडू, गुलाबजाम आणि गाजरहलव्याचीही वर्णने केली.

पोट आणि मन तुडुंब भरल्यावर सुस्तावायला झालंच पण मग मास्तरांनी रेकमेंड केलेला 'रॉक ऑन' पाहताना दुपारचा आळस कुठल्याकुठे पळाला.शिनूमा पहायलाच हवा असाच आहे.दुपार सार्थकी लागली.थ्यांकू मास्तर!
चहा पिऊन केसुंनी आमचा निरोप घेतला आणि आमच्या छोट्याशा मिसळ कट्ट्याची इतिश्री झाली.

राहणीलेखबातमी

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Sep 2008 - 11:58 pm | यशोधरा

स्वातीताई, मामलेदार मिसळ फ्राफु मध्ये हा आणि शेवटचा फोटू दिसत नाही गं :(
आता वाचते... :)

वाचले ग... मस्तच. आता डान्यापण येतोय, त्याला मिळेल तुझ्या हातचं खायला... मेरेको कब मिलेगा रे?? @)

लिखाळ's picture

6 Sep 2008 - 11:56 pm | लिखाळ

वा वा.. जंगी बेत झालेला आहे !

>>लिखाळ आणि केसुंना सांगावा धाडला पण लिखाळचे म्युनस्टर केसुंच्या डार्मस्टाट सारखे हाकेच्या अंतरावर नसल्याने त्याचा नाइलाज झाला.<<
मीठ चोळा जखमेवर !
फोटो दिसत नाहित ते बरेच आहे..तेवढीच जळजळ कमी ! ;)

आता ऑक्टोबरात असाच एक जंगी बेत करुया :)
-- (मिपाकरांच्या आनंदात मनातून सहभागी)लिखाळ.

रामदास's picture

7 Sep 2008 - 12:03 am | रामदास

आणि मिसळीचे.
अभिनंदन.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

लिखाळ's picture

7 Sep 2008 - 12:30 am | लिखाळ

हे मस्तच..

आता दिसत आहेत फोटो !
--लिखाळ.
स्वगत : उद्या मोदक केलेच पाहिजेत !

यशोधरा's picture

7 Sep 2008 - 12:26 am | यशोधरा

स्स्स!! आहा!! दिसले दिसले फोटू!! आजि म्या मिसळब्रह्म पाहिले!! :)

छोटा डॉन's picture

7 Sep 2008 - 12:58 am | छोटा डॉन

आयला "जर्मनीतली मिपाकर" भारी आहेत भौ.
काय मस्त मस्त कट्टे करतात, सगळीकडे भ्रमण करतात व वरचेवर "पावभाजी + मिसळ" ही करतात ....

आपली चांगली ऐश होणार म्हणजे एकंदरीत ...

आता आहे स्वातीताईच्या हातची मिसळ + केसुची पावभाजी ...

अवांतर : माझी "प्रसाद" चा रोल करायला हरकत नाही, सांगा काय आणु इकडुन ?
शक्य असेल तर जरुर आणेन ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

7 Sep 2008 - 1:18 am | आनंदयात्री

>>अवांतर : माझी "प्रसाद" चा रोल करायला हरकत नाही, सांगा काय आणु इकडुन ?
>>शक्य असेल तर जरुर आणेन ....

बघा बघा कशी चापलुसी करतोय ! घेउन जा बेट्या बंगलोरातुन मिसळीसाठी लागणारे स्पेशल फरसाण घेउन जा !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Sep 2008 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयला "जर्मनीतली मिपाकर" भारी आहेत भौ.
काय मस्त मस्त कट्टे करतात, सगळीकडे भ्रमण करतात व वरचेवर "पावभाजी + मिसळ" ही करतात ....

थोडक्यात काय हे जर्मनीवाले लै मजा करतात. :)

सहज's picture

7 Sep 2008 - 9:53 am | सहज

थोडक्यात काय हे जर्मनीवाले लै मजा करतात

अगदी अगदी

विजुभाऊ's picture

8 Sep 2008 - 5:20 pm | विजुभाऊ

जर्मनीवाले भारी पडताहेत. काय मस्त मस्त कट्टे करतात . पश्चीम महाराष्ट्रवाले ही चैन करताहेत.
विदर्भ मराठवाड्यातले लोक अजून का मागे आहेत मग.
( नन्तर तक्रार करु नका की आम्च्यावर अन्याय केला जातो म्हणुन (ह घ्या)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

टारझन's picture

8 Sep 2008 - 5:41 pm | टारझन

स्वाती तै .... अब हमको बी जर्मनी आने का हय ... च्यायला लय झालं आता.... जबर्‍या फोटू...
गुलाबजामुन पाहून आतला बकासूर जागा झाला ....

नन्तर तक्रार करु नका की आम्च्यावर अन्याय केला जातो म्हणुन
दे टोला =)) =)) =)) लै जबरा हाणलाय .. जड देऊन हलके घ्या =)) =))
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

स्वाती राजेश's picture

7 Sep 2008 - 1:02 am | स्वाती राजेश

छोटेखानी मिपा कट्टा भारी झालेला दिसतो...:)
बाकी बेत मात्र झकास होता.....
फोटो मात्र जळवण्यासाठी नक्कीच नाहीत पण तोंडाला पाणी सुटण्यासाठी पाठवलेस ना?

नंदन's picture

7 Sep 2008 - 1:12 am | नंदन

फोटोज मस्त आलेत, वर्णनही मस्त. एकंदरीत मिसळपावचे 'ठाणे' आता फ्राफुमधेही मजबूतपणे प्रस्थापित झाले आहे :).
स्वगतः - मुंबई-ठाणे-पुणे-बेंगलोर-ईस्ट कोस्ट-जर्मनी झाले. आता वेस्ट कोस्ट आणि दक्षिण कॅलिफोर्नियाकरांनीही आघाडी उघडायला हवी.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

7 Sep 2008 - 2:16 am | बेसनलाडू

विचाराधीन आहे. २७ सप्टेंबर २००८ 'लाइक् ली' तारीख म्हणून पाहिली जात आहे.
(विचारवंत)बेसनलाडू

आनंदयात्री's picture

7 Sep 2008 - 1:20 am | आनंदयात्री

मस्त आहेत !! कट्ट्याची अजुन काही गमती जमती सांगा !

मदनबाण's picture

7 Sep 2008 - 3:39 am | मदनबाण

चालुध्या चालुध्या....मस्त कट्टा जमलेला दिसतो... :)

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

विसोबा खेचर's picture

7 Sep 2008 - 9:33 am | विसोबा खेचर

स्वाती, कट्टा वृत्तांत मस्त आणि मिसळीचे, आणि गुलामजाम-लाडवाचे फोटूही झकास...

केसूच्या चेहेर्‍यावर समस्त मिपाकरांना मुद्दामून जळवण्याचे जे भाव आहेत त्याबद्दल् मी कडवा निषेध व्यक्त करतो..! :)

तात्या.

केशवसुमार's picture

7 Sep 2008 - 1:30 pm | केशवसुमार

तात्यशेठ,
मी पण..निषेध करतो.. :P [(
पण साला मिसळ झालीच जहबहराहा होती..;)
जाऊ दे तुम्ही फोटो बघितलना मग समजून घ्या.. ;;)
(तृप्त)केशवसुमार
स्वगत: मुद्दामून दुसर्‍या दिवशी प्रतिसाद दिला..कुणाची नजर लागली नाही ह्याची खत्री झाल्यावर :& :D

असं बजावून कसा अर्धाच फोटू घ्यायला लावलाय ते बघितलं आम्ही केसूशेठ! :D
मिसळ जहबहराहा झाली असणार ह्यात शंकाच नाही, पहा ना ते चष्म्यामागून डोळे कसे लकाकताहेत! B)

(खुद के साथ बातां : केसूसमोरची इतर डिशेसची चळत चित्रात येणार नाही ह्याची काळजी कशी बरं घेतली असेल? ;) )

चतुरंग

ऋषिकेश's picture

7 Sep 2008 - 10:41 pm | ऋषिकेश

जहबहरा!!!!!!!!!
जर्मन मंडळींची ऐश आहे बॉ! ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्राजु's picture

8 Sep 2008 - 2:25 am | प्राजु

हे छान..
सगळे आपले छोटेखानी कट्टे करताहेत.. मजा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

8 Sep 2008 - 1:48 pm | धमाल मुलगा

सध्या नुसते कट्ट्यांवर कट्टे!!!
मस्त.

स्वातीताई, कट्टा वृत्तांत छानच...आणि मिसळीचा फोटु...... =P~ =P~ =P~ =P~

एक प्रश्नः मिसळ खाताना केसुशेठच्या चेहर्‍यावरचे भाव मला असं का सांगताहेत की त्यांना एखादं छप्परफाड विडंबन सुचलंय????

केसुशेठ,
आंतरीक उर्मी इतकी दाबुन ठेऊ नका, भावना तुंबुन जातील...
अहो, त्या खाल्या मिसळीच्या तर्रीला स्मरुन तरी एखादं विडंबनतरी कराच तुम्ही!

स्वाती दिनेश's picture

10 Sep 2008 - 1:18 pm | स्वाती दिनेश

आमच्या मिसळकट्ट्यात मनाने सहभागी झाल्याबद्दल 'छोटेखानी जर्मन मिपा कट्टा समिती'तर्फेउर्वरित मिपाकरांना मनापासून धन्यवाद,
स्वाती