Skip to main content

लग्न पाहावे करून

लेखक Prajakta२१ यांनी रविवार, 23/03/2014 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची) शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi ) तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26726
प्रतिक्रिया 122

प्रतिक्रिया

तेजश्री प्रधान कोण ते काय आठवत नाही हो. पण कालच हसी तो फसी पाह्यला. माझे त्याबाबतचे मत अनाहितामध्ये सव्वादोन ओळीत लिहिले आहे. कथा वरचेवर गुंडाळलेली वाटली. अगदी सहमत. तरी मनोरंजन झाले. मला गाणी आवडली. जरा वेगळ्या चाली होत्या म्हणून असेल कदाचित! पंजाबी वेडींग गाणे म्हणावे तसे चांगले झाले नाहीये, म्हंजे नाच! ती परिणीती चोप्रा मला आवडते म्हणून पाहिला. आता क्वीनबद्दल बरेच ऐकून आहे.

In reply to by प्यारे१

या धाग्याला एकही प्रतिक्रिया आली नव्हती म्हणून वर काढला हो. आता ती तेजश्री नाही म्हायती त्याला काय कर्णार? जे माहितीये ते ल्ह्यायचं झालं! तुम्ही बरे अगदी पाळतीवर आहात ते?

In reply to by रेवती

आणी अनुरागकश्य(चा डार्कनेस... खोलीत कोंडले गेले असल्याने अस्थीर मनाच्या व्यक्तीचे साडीतच मुतणे) वगैरेंचे स्टोरी टेलींग फॅक्टर्स कोठेही कथेचा ट्रॅक न घसरवता मिक्स केल्या गेल्याने दोन ध्रुव एकमेका भेटताही अनपेक्षिप पण अपेक्षीत तोल साधला गेला. परिणीता मात्र फारच आवडते. लै बोलके ड्वॉळे हायत तीचे, अभिनय करते मॉडेलींग नाही, हीच जमेची बाजु आहे. लॉट्स ऑफ सोफ्ट किसेस टु हर.

तेजश्री प्रधान कोण ते काय आठवत नाही हो>>>> *beee* :( अहो काय ओ रेवाक्का ...तुम्हाले ती सुप्रशिद्ध मालिका म्हायती नाय ? :P होणार सून(फूलं) *fool* मी त्या घरची *dash1* ...त्यातली सूनबाय हाय तेजश्री ...झेंडा मधली जुवेकरची भहीण. वेळ असल्यास लिंक बघा ... बाकी ह्यो पिच्चर कुड बघाया मिळल ? https://www.google.co.in/search?newwindow=1&site=&source=hp&q=tejashri+…

In reply to by बॅटमॅन

++१११ काय तर म्हणे ६-७ सासवा.. त्यांचे बिंडोक वागणे-बोलणे, उगिचच त्या मधूराच्या नवर्‍याला अगदि कुक्कुल बाळ समजून त्याचे लाड करत राहणे आणि त्यावर कहर म्हणजे या मधूराचे उगिचच चेहर्‍यावर हसू दाखवणे (जे तद्दन खोटे वाटते..)

In reply to by स्मिता चौगुले

आणि भरीस भर म्ह. अशा कैक सीर्यल्समध्ये 'चांगली' स्त्री पात्रे कधीही जीन प्यांट इ. घालत नाहीत, कायम साडी तरी नैतर पंजाबी तरी. तेच एखादी व्हँप इ. असेल तर मात्र जीन्समध्ये दाखवणार, या दीडदमडीच्या लोकांच्या मेंदूची कीव येते राव.

In reply to by बॅटमॅन

मलातर अशा सीरीयल्स मधील व्हॅम्पच आवडतात ... गुळुमुळु नायिकेपेक्षा त्याच भारी वाटतात.... शिवाय There is nothing more sexier than a women with secrets असं कुणीतरी म्हणुन ठेवलय :)

In reply to by प्रसाद गोडबोले

हे बाकी खरं हो पूर्णपणे! कैतरी जान पायजे, उगा नैतर ताटाखालची मांजरी झालेल्या गुड गर्ल अन इमोशनली डायबेटिक गोग्गोड नायिकेकडे बघवतही नै.

In reply to by बॅटमॅन

अरे सहीच काय एक एक शब्द आहेत ...माण गयेले हय उस्ताद आपुण तेरेकु . :D बाकी काहीही असो मिपामुळे माझ्या शब्दसंपदेमध्ये आणि जनरलच कणोलेजमध्ये भर पडत चालली आहे . :P *wink* *good*

In reply to by बॅटमॅन

ब्याटम्यान व प्रसादकाकांशी सहमत. उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने. घरातल्या घरात नटून बसणार्‍या नायिका व कपाळावर नागिणीच्या आकाराचे कुंकू/ टिकली लावणार्‍या दुष्टांगना पाहण्यात विंटरेष्ट नाही. एकदा काहीतरी पाहिले तर त्यात एक वाक्य तीनवेळा ढ्यांटढ्यां (हेही ३दा) वेगवेगळ्या कोनांमधून दाखवले होते. जौ दे ना राव!

In reply to by रेवती

उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने. रेवतीताई कित्ती कित्ती सुखी आहात तुम्ही ! जिच्या हाती पाळण्याची दोरी असायची ,हल्ली तिच्या हाती हल्ली रिमोट अस्तोय. सगळा इमोशनल अत्याचार सहन करावा लागतो..

In reply to by बॅटमॅन

इमोशनली डायबेटिक गोग्गोड नायिकेकडे
वाह! काय गोड उपमा (खायचा नव्हे ;-) ) आहे. मान गये, चेंडूफळीमाणसा..

In reply to by दिव्यश्री

अगो दिव्यश्री एक सांगायचे र्‍हायले. तेजश्री प्रधान कोण? हे एक मैत्रिण विचारत होती आणि मग मला ती कोण हे फाईंडौट्ट करायची भयंकर गरज वाटू लागली. शेवटी तिचा फोटू बघितलाच! चांगलीये दिसायला वगैरे.

In reply to by रेवती

ती कोण हे फाईंडौट्ट करायची भयंकर गरज वाटू लागली.>>> :D शेवटी तिचा फोटू बघितलाच! चांगलीये दिसायला वगैरे.>>>गोरी नाय ...सावळी हाय . *beee*

In reply to by बॅटमॅन

सौंदर्याच्या रेसिस्ट कल्पनांनी चांगलेच मनोरंजन झाले बरंका!>>>आपल्या सगळ्यांच्याच मणोरंजणासाठीच तर मिपा आहे नै का ? मला जरा रेसिस्ट या शब्दाची मराठीत व्याख्या सांगाल का ? तुमची स्वतः तयार केलेली नको . सौंदर्याच्या कल्पना या व्यक्तिसापेक्ष आहेत असे मला तरी वाटते . एकच गोष्ट , व्यक्ती , ठिकाण एकाच वेळेस सगळ्याच लोकांना आवडू शकेल अस मला नाही वाटत *NO* . प्रत्येक रंगामध्ये निरनिराळ्या छटा असतात . कोणाला कुठली छटा आवडावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे . :) मलातरी ती सावळीच वाटते . ती काही गोरी अथवा गहुवर्णीय नाही हे माझ स्पष्ट मत आहे . अगदी वैयक्तिक . बाकी ती तुम्हाला विश्वसुंदरी वाटली तरी मला काही समस्या नाही . :)

In reply to by दिव्यश्री

मलातरी ती सावळीच वाटते . ती काही गोरी अथवा गहुवर्णीय नाही हे माझ स्पष्ट मत आहे
आणि
बाकी ती तुम्हाला विश्वसुंदरी वाटली तरी मला काही समस्या नाही .
यात गोरे असणे=सुंदर असं अ‍ॅझम्प्शन जाणवतंय. शिवाय 'तुम्हांला विश्वसुंदरी वाटली तरी हर्कत नै' इ.इ. अनावश्यक शेर्‍यांवरूनही अ‍ॅटिट्यूड कळून येतो. हाच रेसिझम आहे. उदाहरण पुरवल्याबद्दल धन्यवाद.

पुरषांना मन मोकळे करुन देण्यासाठी धागा काढणार्‍या Prajakta२१ तै आणि तो वर आणणार्‍या रवतीबैंचे आभार्स. =))

हा "लग्नाळू" लोकांचा धागा हाये का काय? पण हा तो चे-पु निघाला

In reply to by Prajakta२१

कोणत्या चित्रपटांच्या? फक्त सांगा, आम्हाला चित्रपटाची चिरफाड (मत वगैरे नाही हां) करायला भयंकर मजा येते. ;) तुम्ही जर समीरसूर साहेबांना सांगितलत तर ते काम भन्नाट होते याची खात्री कोणीही मिपाकर देतील. ;)

आजकाल बरेच मराठी शिणेमे लग्न या विषयावर येतात वाट्टे आणि त्यात काम करणारी ही मराठी शीरियल्समधली मंडळी असतात काय? (मराठी शिरियल्स आणि सिनेम्यांबाबत घोर अज्ञानी)

In reply to by पैसा

दुर्दैवाणे हो असेच उत्तर आहे . हे दुष्टचक्र आहे . जे शिरेलीत त्येच पिच्चर मंदी (आर्थिक नव्ह ) आणि ज्ये पिच्चर मंदी तेच शिरेलीत . त्यांनी तरी णवीण , तडफदार , शिरेली आणि पिच्चारला शोभणारे थोबडे *shok* आणि नाजूक हिर्वनी कुडून आणायच्या ;) :D ? परतेग वेळेस नवीन क्ष्टुरी , सगळ चांगल त्येबी नवं कुढून आणाचे ?? *NO* येक तर बख्खळ पैका घालून हे बणवयाचं मग लोकांच्या श्या खायच्या *dash1* , मिपावाले तर टपूनच असतात कंदी बकरा मिळतोय म्हून . *beee*

In reply to by दिव्यश्री

स्मायलींबद्दल तुम्ही आमच्या आत्मूसगुर्जींच्या तोडीस तोड आहात एवढे बाकी नमूद करतो.

In reply to by बॅटमॅन

कस्ल कस्ल ...हे कस्च कस्च च्या ष्टायलीत वाचावे . :D बाकी साक्षात गुर्जीं बरोबर तुलणा केली गेल्याणे अजुण हवेतच आहे . *shok* योग्य वेळी योग्य उत्तर देणेत येयील . *stop*

In reply to by दिव्यश्री

>>कंदी बकरा हल्ली बकरे पण 'कंदी' मिळायला लागले? आमच्यावेळी असं नव्हतं. फक्त पेढेच कंदी मिळत असत, तेही सातार्‍याचे!!

In reply to by सूड

ठ्ठो =)) वशाडी येवो या सुडक्यावर =)) अन बकरा जर कंदी मिळाला तर खाणारेस काय रे, इतका हरखून विचारायलास ते =))

In reply to by दिव्यश्री

त्यांणा णवीण ष्टुरी हवी असल्यास आपन देऊ शक्तो की! पन खोलात जाऊण विचार वैग्रे करावा लागल त्याचं काय? दर्वेळी काय नवे चेहरे आनायची चिंता कराया नगं, हितं मिपावरची दोनचार मंडली पाठवूण दिली तर काम होईल. पैतै तर कायमस्वरुपी मिपासासू आणि मी कायमसोरुपी मिपाआज्जी हायेच! तू हिरवीन होते का? त्यामुळे आपन कुनाचं नुस्कान करत णाही. शिरेस विषयावर्ची शिरेल केली आनि विणोदी म्हणून गाजली तरी पैसा वसूल! माझ्याकडे फँड्रीसारखी एक ष्टुरी तयार है. नाव हाई 'लाँड्री'!

In reply to by रेवती

नाव हाई 'लाँड्री'!>>> *LOL* तू हिरवीन होते का?>>> व्हय जी... पण मी हिर्वीणी सारखी दिसत नाय ओ त्येच काय करणार ? :( ...आंन हिरू कोण *beee* ??? प्यांटवाल्यांना चानस द्येणार का हिरूचा ;) *blush* ? नायतर मी लेडी व्हिलन . हाय काय नाय काय . शिरेस विषयावर्ची शिरेल केली आनि विणोदी म्हणून गाजली तरी पैसा वसूल! >>> हाहाहाहा हीहीहीही सौ सुनार कि एक रेव्वाक्का कि ... :P :D

In reply to by रेवती

रेवाक्का रॉक्स!! चला हलवुन सोडु छोटा आनी मोठा बॉक्स!! काय न्हाय! काय न्हाय!! डायलॉग रायटर म्हुन वर्णी लावायचा प्रेयत्न. मलापण कायतरी साईड काम देवा हां. तुमी दोघी सासवा अन आज्ज्या झाल्यावर मला कायतरी शिल्लक ठेवा. >>>>लाँड्री>>>> अशक्य हायेस रेवाक्का!!

In reply to by स्पंदना

ओक्के, अपर्नातायी, तुमी मेक अपची जबाबदारी सांबाळता काय? तसं आसन तर लई झ्याक काम व्हील! ते नगं आसन तर मग आता तुमीच सांगा कोन्तं काम कराया आवडन!

In reply to by रेवती

पैसा-मिपा सासु रेवती-मिपा आज्जी गणपा- मिपा बाब्या सुड- मिपा वशाड (बॅटमॅन कडुन साभार) अभिजीत- मिपा नीच (नाही रे)

In reply to by सस्नेह

चालेल काय, धावेल की! @इरसाल भौ, अजून आम्ही मिपा व्हिलण कोण त्याचं नाव नाय घेतलं. सांगू का, सांगू??

In reply to by पैसा

बाय द रस्ता व्हिलणसे याद आया आपकी सुनबै दिख नी र्‍ही भोत दिनोसें.

In reply to by पैसा

हल्ली ६ सास्वांची फ्याशन आहे.>>> :D पैतै...अहो काय हो हे ...खरतर तुम्ही एकट्याच भारी (वजणाणे नव्हे ;) ) व्हायला पाहिजे ... *beee*

In reply to by पैसा

६?????? खर्र्र? अब मेरा क्या होगा?

In reply to by सस्नेह

स्णेहांकिता, बाळा, तुला शेतात फिरनार्‍या मुलीचा रोल पक्का! खरंतर आमाला सोळा वर्षाची पायजे हुती पन आता पंध्रा चालवून घ्यु! इरविण आनि हिरो आदीच ठर्लेत. दिव्यश्री आनि त्यांचं प्यांटवालं हैत की!

In reply to by रेवती

'एक गुड न्यूज आहे, तुमची मुलगी आई होणार आहे' हे १६ वर्षाच्या मुख्य हिरवीनीचे फक्तं तोंड पाहून सांगणार्या डॉक्टरणीचा रोल असल्यास मला द्या. ;)

In reply to by साती

माझी मुलगी आई होणार आहे ..?? हे भगवान ! पण मला मुलगी कधी झाली ?

In reply to by सस्नेह

धन्य आहात सगळ्याजणी! धागाकर्ती कधी कोणाला विचारणार नाही अमुकतमुक चित्रपट पाहीला का म्हणून!

In reply to by साती

आन ती आई व्हणार असते तिला भुताने झपाटल्याने. जमतय जमतय अपर्णा रेवाक्का मेपक म्हणत असली तरी तु ष्टुरी रायटर व्हायची सपन नको थांबवु.

In reply to by पैसा

आजकाल बरेच मराठी शिणेमे लग्न या विषयावर येतात वाट्टे आणि त्यात काम करणारी ही मराठी शीरियल्समधली मंडळी असतात काय? तरी लोकं लग्न पुढे पुढे ढकलतात......कारण एवढे थोराड नायक नायिका बघुन जर कोणाला वाटले की अशीच जर नवरा / बायको मिळाली तर.........

ते तेजश्री प्रधान, तो शशांक केतकर आणि त्याच्या त्या सहा आया डोक्याला वात आणतात. कधी नव्हे ते झी मराठीला चेपुवर लाईक केलं तर तिथेही यांचे प्रश्न!! आता जान्हवीच्या आयुष्यात काय होणार, श्री घरी परत येईल का? मी सरळ प्रतिसाद टाकला "अच्छा, म्हणजे श्री घर सोडून गेलाय का? नै त्याचं काये हल्ली एका लग्नाची तिसरी गोष्ट ही एकच मालिका बघतो आम्ही झी वर. त्यामुळे श्रीचं काय चाल्लंय ते माहीत नाही". ;)