Skip to main content

पोळी की चपाती

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 04/02/2013 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
पोळी की चपाती ??/ नेमके काय म्हणावे??? पोळी की चपाती?/ एक पक्ष....पोळी ही गुळाची ,पुरणाची असते.... साधी नेहमीची चपाती असते. दुसरा पक्ष...चपाति असे काही नसते गुळाची असो वा पुरणाची वा साधी..ती पोळीच असते.. नेहमीच्या पोळीत पण साधी व घडीची असे २ प्रकार ... बहुमत चपातीच्या बाजूने.... पोळपाटावर बनतात त्या पोळ्या... चपाती मशीनमधे बनतात त्या चपात्या....असेही एक मत आहे.. चपाती हा शब्द कन्नड मधून मराठीत आलेला असेही वाचण्यात आले म्हणजेच मूळ मराठी शब्द पोळीच. मुंबईत अनेक ठिकाणी पोळी भाजी केंद्र असतात तिकडे पोळी म्हणजे जिला अनेक जण चपाती म्हणतात तीच मिळते आमचा एक मित्र ऑम्लेटला अंड्याची पोळी असे म्हणतो तसेच पिठलं की बेसन?? काही जागी साबूदाण्याच्या खिचडीस साबूदाण्याची उसळ असेही म्हटले जाते.. पदार्थ तोच नावे निराळी

वाचने 35057
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by खबो जाप

आमच्याबी मनात आलं होतं "वध" टाकावं, पण इकडच्या तिकडच्या चर्चा वाचल्यावर "वाढ" ह्या शब्दाची प्रोफाइल जरा हाइ लेवेलची हाय आसं वाटलं. म्हंजे वध ही गोष्ट सामन्या माणसाने करायची गोष्ट नाही (हे माझं वैक्तिक मत हाये) आसं वाटलं ,म्हनून सोडून दिलं.

In reply to by अधिराज

"वध" ऐवजी चुकुन "वाढ" टाइप झालं,ते दुरुस्त कसं करावं माहीत नाही. परत असं वाचा. आमच्याबी मनात आलं होतं "वध" टाकावं, पण इकडच्या तिकडच्या चर्चा वाचल्यावर "वध" ह्या शब्दाची प्रोफाइल जरा हाइ लेवेलची हाय आसं वाटलं. म्हंजे वध ही गोष्ट सामन्या माणसाने करायची गोष्ट नाही (हे माझं वैक्तिक मत हाये) आसं वाटलं ,म्हनून सोडून दिलं.

In reply to by अधिराज

आजुन आठवलं जीव घेणे, टपकावणे. बाकी म्हैईला वर्गाकडं बी अशा शब्दांचा संघ्र हाये, हे बघुन कौतुक वाटतं.

पोळी-भाजी मटण-चपाती कधी मटण-पोळी किंवा पोळी-चिकन ऐकले नाही. इथे जात आडवी येत असावी काय ? (म्हणजे कोकण, विदर्भ, खांदेश, मराठवाडा इ.इ.)

In reply to by इरसाल

मटण-भाकरी कशी शोभते तशी चपाती नाय शोभत मटणाशी..

बबन राव, आवं चपटी ही काय अशी खुल्यात बोलायची गोष्ट हाय का वं? तिचा निवांत दाराआड आस्वाद घ्येत्यात लोकं. आणि मंग पडत्यात कुठंतरी कडंला..

अजून एक समान शंका - लाईट गेले की गेली? विज जाते, दिवे जातात, मग लाईट या विंग्रजी शब्दाला स्त्रीलिंगी म्हणावे की नपुसकलिंगी??

पदार्थ तोच नावे निराळी
काथ्याकूट तोच शीर्षके निराळी ;) बाकी पोळी आणि चपाती यांतील कुठला शब्द सांविधानिक आहे?

माझ्या घरी तर पोळीच म्हंटले जाते तांत्रिक नाव जरी फुलके असले तरीही. अन लहानपणीपासून मराठी चित्रपट, सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम पाहून असा समज होता की उच्चभ्रू लोक पोळीलाच चपाती असे म्हणतात. लहानपणी शाळेतल्या गुरुजींनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. भारत स्वतंत्र झाल्यावर भारताला भेट देणार्‍या परदेशी शिष्टमंडळासाठी तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंनी मेजवानी आयोजित केली होती. पाहुण्यांनी विविध भारतीय पदार्थांवर भरपूर ताव मारला. पण त्यापैकी एक नेहरूंना म्हणाले मि. नेहरू यू हॅव अरेंज्ड अ वंडरफूल डीनर; एव्हरीथींग इज गुड बट युअर चप्रासी इज नॉट गुड. नेहरूंना प्रथम आश्चर्य वाटले की काम करणारे चप्राशी (शिपाई) पाहुण्यांशी बेअदबीने वागले? तेवढ्यात त्या पाहूण्यांनी चपातीकडे इशारा केला. पाहुण्यांच्या भारतीय पदार्थांच्या मर्यादित ज्ञानाने घोळ केला होता.

"पोळी" हा शुद्ध प्रमाणित (म्हणजे पुणेरी) मराठीतला शब्द आहे. "चपाती" हा ग्रामीण मराठीतला शब्द आहे.

In reply to by श्रीगुरुजी

उलट असू शकते. चपाती हा सर्वसाधारणपणे सर्वत्र प्रचलित असलेला प्रमाण शब्द बनू शकतो.पोळी हा काही थोड्या लोकांकडून/मध्ये वापरला जाणारा घरगुती बोली भाषेतला शब्द बनू शकतो.

लुसलुशीत मऊ, अनेकपदरी आणि चिंचगुळाची आमटी+उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी अत्यंत योग्य असते ती "पोळी". पोळ्या दोन किंवा तीन खातात. सुके + रस्सा अशा दुहेरी मटणासोबत जाडजूड आणि दणदणीत अशी जी मस्ट असते ती "चपाती". चपात्या खाताना मोजत नाहीत. वगैरे..

आम्ही येथे पाव खातो क्वचित इंडियन उपाहारगृहात नान खातो ती सुद्धा गार्लिक आणि जोडीला पिकल असत . खरे तर येथे ह्या विषयावर लिहिण्यात अजिबात रस नव्हता. पण सदर लेख आमच्या आडनाव बंधूंनी काढला आहे. तेव्हा त्यांच्या आदरापोटी हि प्रतिक्रिया खरडली. मुक्काम पोस्ट .......

सोपे आहे. आट्याची केली, तर 'पोळी'. कणकेची केली, तर 'चपाती' संताचे पोल्ट्री फार्म होते, त्याला बंताने विचारले, अरे अंड्यातून पिल्लू निघाले, की तू ओळखतोस कसे, कोंबडा की कोंबडी ते? संता म्हणाला, "आसान है, सामने कुछ दाने फेको, चुगने लगा, तो मुर्गा. ... चुगने लगी, तो मुर्गी"

पोळी हे नाजूकपणे तुपाबरोबर खायचे प्रकरण आहे. जी चापली जाते ती चपाती. अंडाभुर्जी आणि चपाती खातात. पोळी नव्हे. शिकरणाबरोबर खातात ती पोळी. चपाती नव्हे.

हि पोळी साजूक तुपातली हिला म्हावर्‍याचा लागलाय नाद ... ;) मॉरल ऑफ द स्टोरी - म्हावर्‍याबरोबर खातात ती पोळी, मटणाबरोबर खातात ती रोटी, भाजी बरोबर खातात ती चपाती !!!

माझ्या मित्राच्या घरी पोळीला चपाती व काकू ला काकी म्हणणे हे अशुद्ध भाषेचे लक्षण मानले जायचे , आमच्या घरी सगळे पोळी म्हणतात म्हणून पोळी म्हणतो.

आता शब्दांवरूनच काथ्याकूट चाललाच आहे तर माझ्या मित्राने मराठीस बहाल केलेले दोन शब्द... मोठा असतो तो फोटो आणि आयकार्ड साईजचा तो छोटो... ज्या पोस्टाच्या तिकिटाला मागून डिंक लावलेला असतो त्याला म्हणायचे चिकिट...