✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोळी की चपाती

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Mon, 02/04/2013 - 11:14  ·  लेख
लेख
पोळी की चपाती ??/ नेमके काय म्हणावे??? पोळी की चपाती?/ एक पक्ष....पोळी ही गुळाची ,पुरणाची असते.... साधी नेहमीची चपाती असते. दुसरा पक्ष...चपाति असे काही नसते गुळाची असो वा पुरणाची वा साधी..ती पोळीच असते.. नेहमीच्या पोळीत पण साधी व घडीची असे २ प्रकार ... बहुमत चपातीच्या बाजूने.... पोळपाटावर बनतात त्या पोळ्या... चपाती मशीनमधे बनतात त्या चपात्या....असेही एक मत आहे.. चपाती हा शब्द कन्नड मधून मराठीत आलेला असेही वाचण्यात आले म्हणजेच मूळ मराठी शब्द पोळीच. मुंबईत अनेक ठिकाणी पोळी भाजी केंद्र असतात तिकडे पोळी म्हणजे जिला अनेक जण चपाती म्हणतात तीच मिळते आमचा एक मित्र ऑम्लेटला अंड्याची पोळी असे म्हणतो तसेच पिठलं की बेसन?? काही जागी साबूदाण्याच्या खिचडीस साबूदाण्याची उसळ असेही म्हटले जाते.. पदार्थ तोच नावे निराळी
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34882 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

या पोस्ट वरनं १ नक्की म्हणता

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/04/2013 - 11:57 नवीन
या पोस्ट वरनं १ नक्की म्हणता येइल...तुमच्याकडे कूट-काथ्यांचं भांडार आहे... :-p
  • Log in or register to post comments

झालं समाधान? आता रात्री

स्पंदना
Mon, 02/04/2013 - 12:03 नवीन
झालं समाधान? आता रात्री सुखाने झोपा हं! तरच उद्याच्या काथ्याची स्वप्ने पडतील.
  • Log in or register to post comments

पोळी/ळा/ळे

राही
Mon, 02/04/2013 - 12:03 नवीन
कणकेत(आता कणीक की नुसते गव्हाचे पीठ?)तेल्/तूप घालून नुसतीच लाटलेली ती चपाती आणि लाटताना आतमध्ये तेल/तूप लावून घड्या घालून पुन्हा लाटलेली ती पोळी असे वर्गीकरण पूर्वी होते.पोळी हे प्रकरण स्पेशलाइझ्ड असते.म्हणजे गूळपोळी,पुरणपोळी,खवापोळी वगैरे.आणखी काही क्राय्टेरिया आहेत.तव्यावर तेल/तूप सोडून त्यावर भाजलेले/तळलेले कुठल्याही पिठाचे अथवा वस्तूचे गोल पदार्थ म्हणजे पोळी/पोळा.तांदळाच्या पिठाच्या अशा प्रकारच्या पदार्थालाच फक्त घावन म्हणतात, इतरांना धिरडी अथवा पोळे. धिरडे थोडे जाडसर असते.घावन पातळसर.भाजणे आणि तळणे यातही फरक आहे.भाजणे म्हणजे कमी तेलावर किंवा कोरडेच विस्तवावर परतणे,रोस्टिन्ग;तर तळणे म्हणजे पदार्थ बुडेल इतक्या जास्त तेलात विस्तवावर शिजवणे,डीप फ्रायिन्ग. चिरणे-कापणे यातही अर्थाचा फरक असावा. तू टाक चिरुनी ही मान मध्ये मान हा जिवंत वस्तू आहे,भाज्या चिरणे मध्ये भाज्या याही चेतन आहेत.याउलट शिंपी कापड कापतो मध्ये कापड ही अचेतन वस्तू आहे.अर्थात हा फरक ढोबळ आहे,काटेकोर नाही आणि आजकाल तर असा फरक कोणीच लक्षात घेत नाही.
  • Log in or register to post comments

दुरुस्ती

राही
Mon, 02/04/2013 - 12:08 नवीन
मान ही वस्तू असे वाचावे.शिंप्याबरोबर खिसेकापूचेही उदाहरण घेता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

बरोबर पण थोडा फरक करावा....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/04/2013 - 16:42 नवीन
कणकेत(आता कणीक की नुसते गव्हाचे पीठ?)तेल्/तूप घालून नुसतीच लाटलेली ती चपाती आणि लाटताना आतमध्ये तेल/तूप लावून घड्या घालून पुन्हा लाटलेली ती पोळी असे वर्गीकरण पूर्वी होते हेच बरोबर आहे. पण, किंचित बदल करावा, असे वाटते. एका पोळीचा उंडा (च्यायला, उंडाच म्हणतात ना) पोळपाटावर घ्यायचा पण तिला लाटण्याने लाटायचे नाही. नुसते चापटी मारायची. चापटी मारत मारत केलेली ती चपाती (बाजरीच्या भाकरीला थापतात तसं) आणि घड्या घालून पोळपाटावर लाटलेली ती पोळी असं असावं असं वाटते. -दिलीप बिरुटे (अंदाजपंचे दाहोदरसे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

पोळी हाच मराठी शब्द असावा.

आयुर्हित
Sat, 03/08/2014 - 16:09 नवीन
माझ्या मते पोळी हा मराठी व चपाती हा शब्द मुळात हिंदी/परभाषीय असावा. "चपाती (Chapati)" के लिए हिन्दी अर्थ | Meaning of "चपाती" in Hindi एक प्रकार की पतली, हलकी और मुख्यतः हाथों से दबाकर बढ़ाई हुई (चकले पर बेली हुई रोटी से भिन्न) रोटी।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चपाती

बरखा
Sat, 03/08/2014 - 17:15 नवीन
मला वाटत. हिन्दी भाषेत रोटी अस म्हणतात. तेव्हा चपाती हा हिन्दी भाषी नसावा. बाकी चालुद्यात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

सपाती हा मुळचा अफगाणी शब्द

आयुर्हित
Mon, 03/10/2014 - 01:41 नवीन
Chapati is known as sapati or doday in Pashto language. सपाती हा मुळचा अफगाणी शब्द आहे. Chapati is noted in Ain-i-Akbari, a 16th-century document, by Mughal Emperor, Akbar’s vizier, Abu'l-Fazl ibn Mubarak.[1] १६००व्या शतकातील आईने अकबरी मध्ये याचा उल्लेख आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बरखा

रोचक माहिती. धन्यवाद.

बॅटमॅन
Mon, 03/10/2014 - 11:24 नवीन
रोचक माहिती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

सपाट असाही शब्द आहे का?

चित्रगुप्त
Fri, 03/14/2014 - 22:19 नवीन
सपाती-सपाटी ज्यावरून आले, तो मूळ पुष्तू शब्द कोणता? 'सपात' वा सपाट असा शब्द आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

अवघड

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 02/04/2013 - 12:05 नवीन
अवघड आहे. :-|
  • Log in or register to post comments

प्रयत्न चाम्गला आहे..पन्

गब्रिएल
Mon, 02/04/2013 - 12:15 नवीन
प्रयत्न चान्गला आहे..पन् तिकडे चालु अस्लेल्या महात्मा-राष्ट्रपिता-अहिंसा च्या मारामारीत गुन्तलेल्या लोकान्ला किति खेचून आणेल सांगता एत नाही. तरीपण शुभेच्च्चा !
  • Log in or register to post comments

+१००

खबो जाप
Mon, 02/04/2013 - 14:35 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

अकु, आता `चोळी' वर धागा काढा!

संजय क्षीरसागर
Mon, 02/04/2013 - 12:32 नवीन
चोळी की काचोळी ??/ नेमके काय म्हणावे??? चोळी की काचोळी? / एक पक्ष....चोळी ही बायकांची, वडारणीची असते.... साधी नेहमीची कंचुकी असते. दुसरा पक्ष...चोळी असे काही नसते बायकांची असो वा वडारणीची वा साधी..ती कंचुकीच असते ............. आमचा एक मित्र चोळीला झंपर असे म्हणतो तसेच ब्लाउज की टॉपलेस?? काही जागी टॉपलेसला नजरबंदी असेही म्हटले जाते ...जागा तीच नावे निराळी
  • Log in or register to post comments

__________________/\_________

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/04/2013 - 12:40 नवीन
__________________/\_______________________/\______________________/\_____________________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

छे छे !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/04/2013 - 13:04 नवीन
खरी गोष्ट अशी की, सुधारणावादी महिला म्हणाल्या की, "चोळी" ला "का चोळी" म्हणायचं ? ब्लाऊज का नाही?" यावरून "चोळी", "काचोळी" आणि "ब्लाउज" असे तीन प्रकार झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

इक्का,

संजय क्षीरसागर
Mon, 02/04/2013 - 13:12 नवीन
`चोळी' नाम आहे, `का चोळी?' हा प्रश्न आहे आणि "ब्लाउज हे उत्तर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हे उत्तर चूक आहे. आता बरोबर

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 13:55 नवीन
हे उत्तर चूक आहे. आता बरोबर उत्तर काय ते विचारु नका =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नाम, प्रश्न आणि उत्तर ही तिनही...

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/04/2013 - 14:26 नवीन
नाम, प्रश्न आणि उत्तर ही तीनही प्रश्नोत्तरातून मिळालेली नाम टाईपची उत्तरेच आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जातियता !!

सूड
Mon, 02/04/2013 - 12:54 नवीन
पोळी आणि चपाती यातही लोक जातियता आणल्याशिवाय राहत नाहीत. एक मैत्रीण चुकून चपाती म्हटली असता एका मित्राने ऐकवलेलं वाक्य उदाहरणादाखल्,"हे बघ!! तू माहेरची फडके आणि सासरची देवधर आहेस. चपाती नाही पोळी म्हण !!"
  • Log in or register to post comments

फडके आणि देवधर यात जातियता

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 02/04/2013 - 13:01 नवीन
फडके आणि देवधर यात जातियता कशी आली बुवा? बाकी अ.कु. चे धागे रोचक असतात. पोळी की चपाती हा प्रश्र्ण RTI मधे कॄशी किंवा अन्न आणि औषध खात्याला विचारायला पाहिजे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मस्त

चौकटराजा
Mon, 02/04/2013 - 13:01 नवीन
मुक्तछंदातील कवितेचा प्रयत्न वाखाणण्याजोगता आहे. होळी की शिमगा ? टोळी की कंपू ? कोळी की मासेमार ? चोळी की कंचुकी ? मोळी की गठ्ठा ? अ आ , कवितांना तयार आहात ना ?
  • Log in or register to post comments

हं..

गवि
Mon, 02/04/2013 - 13:01 नवीन
मला वाटतं पोळाच्या स्त्रीलिंगी काउंटरपार्टला, अर्थात उनाड गायीलादेखील पोळी म्हणत असावेत..
  • Log in or register to post comments

उनाड गायीला ऊडता येत असावं त्यामुळे तिला पोळी नाही...

संजय क्षीरसागर
Mon, 02/04/2013 - 13:09 नवीन
पाखरू म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बराबर....

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 02/04/2013 - 13:11 नवीन
बराबर..... जाडा जाडी, मामा मामी इ. गविंचे हे लॉजीक बरोबर असेल तर मग मला चोळीच्या काउंटर पार्टचा अर्थ समजला तो कदाचीत बरोबर असावा, पण तेच लॉजीक वीडी आणि मिडी ला का बसत नाही? गविच पण असच काहीस लॉजीक आहे का? पैजारबुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१ टू सूड

दिपक.कुवेत
Mon, 02/04/2013 - 13:05 नवीन
हेच बोल्तो. नुसतं चपातीविषयीच नाहि तर ईतरहि अनेक बाबतीत...जस कांदा चीर म्हणायचं...कांदा काप नाहि.
  • Log in or register to post comments

+१ साडी

अगोचर
Tue, 02/05/2013 - 01:24 नवीन
आणि साडी नेस म्हणायचं साडी घाल नाही -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

धागा "अप्रकाशित" केला

गवि
Tue, 02/05/2013 - 11:30 नवीन
धागा "अप्रकाशित" केला म्हणायचं, "उडवला" म्हणायचं नाही. कविता चान म्हणायचं.. भिकार नाही.. इत्यादि भर घालू इच्छितो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगोचर

अरे काय चाललं आहे मिपावर ? हा

नाना चेंगट
Mon, 02/04/2013 - 13:53 नवीन
अरे काय चाललं आहे मिपावर ? हा कसला काथ्याकुट? उद्या नवे असलेच काथ्या कुटायला काढाल कुल्ला कि ढुंगण? पाद की फुसकुली? छ्या !! काही खरं नाही ब्वा !!!
  • Log in or register to post comments

कुल्ला की ...

चौकटराजा
Mon, 02/04/2013 - 20:33 नवीन
यासाठी मोलसवर्थ यांचा जंगी मराठी इंग्रजी शब्दकोश पहावा .दोन्ही चा अर्थ एकच ! तिसरा पण एक शब्द दिलाय तिथं नाना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

विदर्भ वि. प. महाराष्ट्र..

चिगो
Mon, 02/04/2013 - 14:04 नवीन
विदर्भात (आमच्याकडे) चपाती नसतेच.. (मी तरी ऐकलेली नाही) फक्त पोळीच.. कणकेत तेल/तूपही घालत नाही, आणि ती नुसतीच भाजली जाते तव्यावर, आणि त्यानंतर गॅसवर टम्म फुगवली जाते, तरी पोळीच.. तसेच साबूदाण्याची "उसळ" असते.. बायकोच्या माहेरकडे (पक्षी: मुंबई) "चपाती" म्हणतात, जरी ती राहींनी सांगितलेल्या पद्धतीने तेल/तूप लावून, घड्या घालून केली जात असली, तरी चपातीच.. वरुन "अंड्याची पोळी, पुरणाची पोळी.. ही चपातीच !" हे ऐका.. च्यामारी, म्हणून तर म्हणतो ना राऽऽव, इदर्भावर अन्याय व्हतो, म्हून.. ;-)
  • Log in or register to post comments

असं आहे खरं. कर्नाटक

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 14:09 नवीन
असं आहे खरं. कर्नाटक-तमिऴनाडूमध्ये अनुक्रमे होळिगे-पोळिगे असा शब्द पुरणपोळीला आहे, तर "रेग्युलर" चपाती ही चपातीच असते. माझे बाबा-काका-मावसोबा या तिघांकडूनही ऐकलेले आहे, की त्यांच्या लहानपणी पुरणाची असेल तर पोळी, नैतर चपाती असे म्हणायचे. पण यात थोडा जातनिहाय फरकही आहे. काही जातींत चपातीला पोळी म्हणतात, म्हंजे चपाती हा शब्दच हद्दपार, तर काही जातींत दोन्हीही शब्द वापरले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

आणि ती नुसतीच भाजली जाते

पक्या
Mon, 02/04/2013 - 23:36 नवीन
आणि ती नुसतीच भाजली जाते तव्यावर, आणि त्यानंतर गॅसवर टम्म फुगवली जाते - ह्याला फुलका म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

ब्बार्र..

चिगो
Tue, 02/05/2013 - 12:44 नवीन
आणि ती नुसतीच भाजली जाते तव्यावर, आणि त्यानंतर गॅसवर टम्म फुगवली जाते - ह्याला फुलका म्हणतात.
तुम्ही फुलका म्हणा, आम्ही "पोळीच" म्हणतो.. आपली ती पोळी, दुसर्‍याचा तो फुलका.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

चाय बराबर खाताव ती चपातीच

चेतन माने
Mon, 02/04/2013 - 14:28 नवीन
चाय बराबर खाताव ती चपातीच असते. चाय-पोळी !!! अएह्ह कसं वाटत ते!!! चाय-चपाती च बेष्ट
  • Log in or register to post comments

चपाती

चेतन माने
Mon, 02/04/2013 - 14:29 नवीन
चाय बराबर खाताव ती चपातीच असते. चाय-पोळी !!! अएह्ह कसं वाटत ते!!! चाय-चपाती च बेष्ट
  • Log in or register to post comments

पुण्यामध्ये चपाती म्हणणारा हा

अधिराज
Mon, 02/04/2013 - 14:38 नवीन
पुण्यामध्ये चपाती म्हणणारा हा "गावंढळ" आणि पोळी म्हणणारा हा "सुधारलेला" असे समीकरण आहे, असे एका पुणेरी मित्राने संगितल्याचे स्मरते.खरतर विंग्लिश मध्ये पण चपातीच म्हन्त्यात.
  • Log in or register to post comments

खराय ते. पण इंग्लिशच्या आधारे

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 14:42 नवीन
खराय ते. पण इंग्लिशच्या आधारे एखादा मराठी शब्द चूक-बरोबर ठरवताना पाहून हहपुवा झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

नाहीओ सर, मराठी शब्द चूक

अधिराज
Mon, 02/04/2013 - 14:49 नवीन
नाहीओ सर, मराठी शब्द चूक-बरोबर ठरवण्यासाठी म्हणून नाही सांगितलं, पण विंग्लिश मध्ये आसल तर ते सरसकट करेक्ट असं मानण्याची पद्धत हाय म्हणून आपलं सांगितलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

विंग्लिश मध्ये आसल तर ते

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 14:59 नवीन
विंग्लिश मध्ये आसल तर ते सरसकट करेक्ट असं मानण्याची पद्धत हाय
पद्धत हाय म्हणून ती बरुबर आशिलच आसं काय नाय!! आसू सोडा जावा ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

पद्धत हाय म्हणून ती बरुबर

अधिराज
Mon, 02/04/2013 - 15:14 नवीन
पद्धत हाय म्हणून ती बरुबर आशिलच आसं काय नाय!! आसू सोडा जावा ओ.
का म्हनून लेकरावर येवडं कावताय?(;_;). मी कुठं म्हटलं काय बरोबर काय चुक. मला बी थोडं विंग्लिश येतं म्हणून त्यात काय म्हनत्यात ते सांगितलं ना. लहान असलो म्हनून काय झालं आम्ही आमचं निरीक्षण बी नोंदवू नाय व्हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लहान असलो म्हनून काय झालं

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 15:38 नवीन
लहान असलो म्हनून काय झालं आम्ही आमचं निरीक्षण बी नोंदवू नाय व्हय.
नोंदवा की काय त्यात, हिते कोणी पाणिनी नाय. फकस्त पद्दतीबद्दलचं मत खटाकलं म्हून म्हन्लो इतकंच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

बरोबर आहे. असा समज आहे

पक्या
Mon, 02/04/2013 - 23:40 नवीन
बरोबर आहे. असा समज आहे पुण्यात. शिवाय चपाती शब्द वापरणारे जास्त ब्राम्हणेतर लोक पाहिले आहेत. ओळखीतल्या ब्राम्हणांकडे पोळीला चपाती शब्द वापरलेला ऐकला नाही. हे फक्त निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

@ हे फक्त निरीक्षण आहे. >>> +

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/05/2013 - 15:05 नवीन
@ हे फक्त निरीक्षण आहे. >>> +++++++++++++१११११११११११११११११११११ आणी ते भरपूर खरे(ही) आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

सहमत आहे.

प्रकाश घाटपांडे
Fri, 02/08/2013 - 12:02 नवीन
अगदी बरोबर आहे निरिक्षण. माझ्या भाच्याने आंतरजातीय विवाह केला आहे. त्याची बायको चपाती म्हणते. तर बहिण तिला सांगत असते कि आता तू पोळी म्हणायचस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

;)

साती
Wed, 03/12/2014 - 18:35 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अकु काका,

कुंदन
Mon, 02/04/2013 - 15:00 नवीन
मि पा चे मुक्त पीठ का करताय?
  • Log in or register to post comments

उत्तर शोधताय का हुडकताय?

यसवायजी
Wed, 05/06/2015 - 06:31 नवीन
तुम्ही उत्तर शोधताय का हुडकताय? ------------------------ अजुन काही प्रश्न.. खीळा की मोळा? खांब की डांब? खड्डा की डबरा? साळुता की केरसुणी? कोल्हापुरी SYG
  • Log in or register to post comments

अजून अजून

चावटमेला
Mon, 02/04/2013 - 15:20 नवीन
बादली की बारडी? उभा आहे की उभारलोय? टमटम की सिक्स सीटर की वडाप? (सांगलीकर) चावटमेला
  • Log in or register to post comments

सगळे बरोबर. व्यक्तिशः मला

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 15:39 नवीन
सगळे बरोबर. व्यक्तिशः मला वडाप हा शब्द जास्त अर्थवाही वाटतो. दळपात दळतात, कांडपात कांडतात, तसं वडापमध्ये वडतात. (मिरजकर) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा