✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोळी की चपाती

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Mon, 02/04/2013 - 11:14  ·  लेख
लेख
पोळी की चपाती ??/ नेमके काय म्हणावे??? पोळी की चपाती?/ एक पक्ष....पोळी ही गुळाची ,पुरणाची असते.... साधी नेहमीची चपाती असते. दुसरा पक्ष...चपाति असे काही नसते गुळाची असो वा पुरणाची वा साधी..ती पोळीच असते.. नेहमीच्या पोळीत पण साधी व घडीची असे २ प्रकार ... बहुमत चपातीच्या बाजूने.... पोळपाटावर बनतात त्या पोळ्या... चपाती मशीनमधे बनतात त्या चपात्या....असेही एक मत आहे.. चपाती हा शब्द कन्नड मधून मराठीत आलेला असेही वाचण्यात आले म्हणजेच मूळ मराठी शब्द पोळीच. मुंबईत अनेक ठिकाणी पोळी भाजी केंद्र असतात तिकडे पोळी म्हणजे जिला अनेक जण चपाती म्हणतात तीच मिळते आमचा एक मित्र ऑम्लेटला अंड्याची पोळी असे म्हणतो तसेच पिठलं की बेसन?? काही जागी साबूदाण्याच्या खिचडीस साबूदाण्याची उसळ असेही म्हटले जाते.. पदार्थ तोच नावे निराळी
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34882 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

मिरजकर..

यसवायजी
Mon, 02/04/2013 - 16:23 नवीन
मानलं राव तुम्हाला.. काय लॉजीक लावलय?? खत्र्या.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सगळे बरोबर. व्यक्तिशः मला

चावटमेला
Mon, 02/04/2013 - 17:02 नवीन
सगळे बरोबर. व्यक्तिशः मला वडाप हा शब्द जास्त अर्थवाही वाटतो. दळपात दळतात, कांडपात कांडतात, तसं वडापमध्ये वडतात. सहमत... टमटम काय नि वडाप काय, सगळीकडे अगदी कोंबून कोंबून माणसं वडतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तसं नव्हे,

सस्नेह
Mon, 02/04/2013 - 22:11 नवीन
वडा कसा दोन पावांमधे कोंबतात तशी माणसे दोघा दोघांमधे कोंबतात म्हणून वडाप.. (इचलकरंजीकर) स्नेहांकिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

वा हेही सहीये!!!

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 22:22 नवीन
वा हेही सहीये!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

चिटकवणे की चिकटवणे

अधिराज
Mon, 02/04/2013 - 15:25 नवीन
चिटकवणे की चिकटवणे नेहेमी की नेहमी (कदाचित पहिले शब्द बरोबर)
  • Log in or register to post comments

>>चिटकवणे की चिकटवणे.....

मनराव
Mon, 02/04/2013 - 15:44 नवीन
>>चिटकवणे की चिकटवणे.....<< चिकट पदार्थाने चिकटवतात.... त्यामुळे चिकटवणे बरोबर असेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

डुलकी की

कुंदन
Mon, 02/04/2013 - 15:38 नवीन
डुलकी की डुकली?
  • Log in or register to post comments

डुकली हा सबूद आपण तरी नै

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 15:40 नवीन
डुकली हा सबूद आपण तरी नै ऐक्ला ब्वा कंदीपण. (भांबुर्ड्यातल्या एका सकलमहाराष्ट्रीय वसतीगृहात राहिलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मला तर दोन्ही ऐकुन झोप येते .

जेनी...
Tue, 02/05/2013 - 01:27 नवीन
मला तर दोन्ही ऐकुन झोप येते ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दोन्ही बरोबर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/04/2013 - 16:45 नवीन
मला तर दोन्ही बरोबर वाटतात. अर्थ पोहचतो. :) -दिलीप बिरुटे (कुंदनच्या प्रश्नांचा फ्यान)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

अजुन एक

स्पा
Tue, 02/05/2013 - 11:27 नवीन
पिशवी कि पिव्शी? बादली कि बालदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

झोपा आता

यसवायजी
Mon, 02/04/2013 - 15:57 नवीन
निजा.. झोपा.. लवंडा.. पसरा.. पडा.. की अजुन काही?? :D
  • Log in or register to post comments

उलथा?

आदूबाळ
Tue, 02/05/2013 - 00:57 नवीन
उलथा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

काथ्याकुट की एरंडाचे गुर्‍हाळ ?

प्रसाद गोडबोले
Mon, 02/04/2013 - 16:16 नवीन
काथ्याकुट की एरंडाचे गुर्‍हाळ ? =))
  • Log in or register to post comments

मारुन टाकणे, हत्या करणे, ठार

अधिराज
Mon, 02/04/2013 - 16:29 नवीन
मारुन टाकणे, हत्या करणे, ठार मारणे, खून करणे, गचकवणे, गेम करणे, खपवणे की अजुन काही?
  • Log in or register to post comments

महत्वाचं राहिलं

प्रसाद गोडबोले
Mon, 02/04/2013 - 16:43 नवीन
वध राहिला कि हो साहेब =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

+१

खबो जाप
Mon, 02/04/2013 - 17:02 नवीन
मी पण तेच म्हणार होतो वधायचे राहिले कि...... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हाणायचं

जेनी...
Tue, 02/05/2013 - 01:28 नवीन
हाणायचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

हाणायचं पण राह्यलं ?

जेनी...
Tue, 02/05/2013 - 01:29 नवीन
हाणायचं पण राह्यलं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

आवं पूजा बाई , हाणनं येगळ,

अधिराज
Tue, 02/05/2013 - 11:38 नवीन
आवं पूजा बाई , हाणनं येगळ, म्हंजे हाणणे, मारणे, खर्चापानी देणे, पाकिस्तान दाखवणे, हाडं काडं येक करणे, हात पाय तोडने वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आमच्याबी मनात आलं होतं "वध"

अधिराज
Tue, 02/05/2013 - 11:22 नवीन
आमच्याबी मनात आलं होतं "वध" टाकावं, पण इकडच्या तिकडच्या चर्चा वाचल्यावर "वाढ" ह्या शब्दाची प्रोफाइल जरा हाइ लेवेलची हाय आसं वाटलं. म्हंजे वध ही गोष्ट सामन्या माणसाने करायची गोष्ट नाही (हे माझं वैक्तिक मत हाये) आसं वाटलं ,म्हनून सोडून दिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

प्लीज़ इग्नोर अबाव प्रतिसाद

अधिराज
Tue, 02/05/2013 - 11:32 नवीन
"वध" ऐवजी चुकुन "वाढ" टाइप झालं,ते दुरुस्त कसं करावं माहीत नाही. परत असं वाचा. आमच्याबी मनात आलं होतं "वध" टाकावं, पण इकडच्या तिकडच्या चर्चा वाचल्यावर "वध" ह्या शब्दाची प्रोफाइल जरा हाइ लेवेलची हाय आसं वाटलं. म्हंजे वध ही गोष्ट सामन्या माणसाने करायची गोष्ट नाही (हे माझं वैक्तिक मत हाये) आसं वाटलं ,म्हनून सोडून दिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

अजुन काही

श्रिया
Mon, 02/04/2013 - 21:17 नवीन
अजुन काही वरचे तिकीट काढणे, वर पाठवणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

ढगात पाठवणे

आदूबाळ
Tue, 02/05/2013 - 00:57 नवीन
ढगात पाठवणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

हाण तेच्या मारी ............

खबो जाप
Tue, 02/05/2013 - 10:54 नवीन
हाण तेच्या मारी ............ :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आजुन आठवलं जीव घेणे, टपकावणे.

अधिराज
Tue, 02/05/2013 - 11:28 नवीन
आजुन आठवलं जीव घेणे, टपकावणे. बाकी म्हैईला वर्गाकडं बी अशा शब्दांचा संघ्र हाये, हे बघुन कौतुक वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

ह्यात ते टपका डालनेका बसतय का

यसवायजी
Tue, 02/05/2013 - 20:26 नवीन
ह्यात ते टपका डालनेका बसतय का बघा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

एक काडी

इरसाल
Mon, 02/04/2013 - 17:10 नवीन
पोळी-भाजी मटण-चपाती कधी मटण-पोळी किंवा पोळी-चिकन ऐकले नाही. इथे जात आडवी येत असावी काय ? (म्हणजे कोकण, विदर्भ, खांदेश, मराठवाडा इ.इ.)
  • Log in or register to post comments

भलतच.

सस्नेह
Mon, 02/04/2013 - 22:13 नवीन
मटण-भाकरी कशी शोभते तशी चपाती नाय शोभत मटणाशी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

ते मटण-भाकरीच लिहीणार होतो

इरसाल
Tue, 02/05/2013 - 11:00 नवीन
पण धागा पोळी-चपातीचा आहे ना !!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

चपटी बद्दलपन बोला कि राव!!!!

बबन राव
Mon, 02/04/2013 - 21:01 नवीन
चपटी बद्दलपन बोला कि राव!!!!
  • Log in or register to post comments

चपटी म्हनाव देशी म्हनाव कि

खबो जाप
Tue, 02/05/2013 - 10:56 नवीन
चपटी म्हनाव देशी म्हनाव कि गावटी व ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन राव

बबन राव, आवं चपटी ही काय अशी

नानबा
Mon, 02/04/2013 - 21:12 नवीन
बबन राव, आवं चपटी ही काय अशी खुल्यात बोलायची गोष्ट हाय का वं? तिचा निवांत दाराआड आस्वाद घ्येत्यात लोकं. आणि मंग पडत्यात कुठंतरी कडंला..
  • Log in or register to post comments

अजून एक समान शंका -

नानबा
Mon, 02/04/2013 - 21:14 नवीन
अजून एक समान शंका - लाईट गेले की गेली? विज जाते, दिवे जातात, मग लाईट या विंग्रजी शब्दाला स्त्रीलिंगी म्हणावे की नपुसकलिंगी??
  • Log in or register to post comments

हॅ हॅ

सुनील
Mon, 02/04/2013 - 21:18 नवीन
पदार्थ तोच नावे निराळी
काथ्याकूट तोच शीर्षके निराळी ;) बाकी पोळी आणि चपाती यांतील कुठला शब्द सांविधानिक आहे?
  • Log in or register to post comments

पोळी व चपाती

श्रीरंग_जोशी
Mon, 02/04/2013 - 21:29 नवीन
माझ्या घरी तर पोळीच म्हंटले जाते तांत्रिक नाव जरी फुलके असले तरीही. अन लहानपणीपासून मराठी चित्रपट, सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम पाहून असा समज होता की उच्चभ्रू लोक पोळीलाच चपाती असे म्हणतात. लहानपणी शाळेतल्या गुरुजींनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. भारत स्वतंत्र झाल्यावर भारताला भेट देणार्‍या परदेशी शिष्टमंडळासाठी तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंनी मेजवानी आयोजित केली होती. पाहुण्यांनी विविध भारतीय पदार्थांवर भरपूर ताव मारला. पण त्यापैकी एक नेहरूंना म्हणाले मि. नेहरू यू हॅव अरेंज्ड अ वंडरफूल डीनर; एव्हरीथींग इज गुड बट युअर चप्रासी इज नॉट गुड. नेहरूंना प्रथम आश्चर्य वाटले की काम करणारे चप्राशी (शिपाई) पाहुण्यांशी बेअदबीने वागले? तेवढ्यात त्या पाहूण्यांनी चपातीकडे इशारा केला. पाहुण्यांच्या भारतीय पदार्थांच्या मर्यादित ज्ञानाने घोळ केला होता.
  • Log in or register to post comments

पोळी म्हटलं कि बैलपोळाच आठवतो

खटासि खट
Tue, 02/05/2013 - 00:32 नवीन
पोळी म्हटलं कि बैलपोळाच आठवतो राव
  • Log in or register to post comments

अन बैलपोळा म्हंटलं की

श्रीरंग_जोशी
Tue, 02/05/2013 - 01:09 नवीन
मल तान्हापोळा आठवतो. धमाल असायची...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

मला तान्हापोळा आठवतो.

श्रीरंग_जोशी
Tue, 02/05/2013 - 01:30 नवीन
स्वयंसुधारणेची सुविधा हवी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

"पोळी" हा शुद्ध प्रमाणित

श्रीगुरुजी
Tue, 02/05/2013 - 12:52 नवीन
"पोळी" हा शुद्ध प्रमाणित (म्हणजे पुणेरी) मराठीतला शब्द आहे. "चपाती" हा ग्रामीण मराठीतला शब्द आहे.
  • Log in or register to post comments

उलट

राही
Tue, 02/05/2013 - 15:34 नवीन
उलट असू शकते. चपाती हा सर्वसाधारणपणे सर्वत्र प्रचलित असलेला प्रमाण शब्द बनू शकतो.पोळी हा काही थोड्या लोकांकडून/मध्ये वापरला जाणारा घरगुती बोली भाषेतला शब्द बनू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लुसलुशीत मऊ, पदर सुटलेली आणि

गवि
Tue, 02/05/2013 - 15:48 नवीन
लुसलुशीत मऊ, अनेकपदरी आणि चिंचगुळाची आमटी+उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी अत्यंत योग्य असते ती "पोळी". पोळ्या दोन किंवा तीन खातात. सुके + रस्सा अशा दुहेरी मटणासोबत जाडजूड आणि दणदणीत अशी जी मस्ट असते ती "चपाती". चपात्या खाताना मोजत नाहीत. वगैरे..
  • Log in or register to post comments

आवडल

प्रकाश घाटपांडे
Fri, 02/08/2013 - 12:05 नवीन
विश्लेषण आवडल. पटल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अहो तो जाडजूड दणदणीत रोटला

शुचि
Sun, 02/10/2013 - 06:03 नवीन
अहो तो जाडजूड दणदणीत रोटला बरं का .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नळ आला ,पानि आले ,पानि सूटले.

Gawade Jawahar…
Tue, 02/05/2013 - 17:23 नवीन
नळ आला ,पानि आले ,पानि सूटले...........
  • Log in or register to post comments

आम्ही येथे पाव खातो

निनाद मुक्काम …
Tue, 02/05/2013 - 18:54 नवीन
आम्ही येथे पाव खातो क्वचित इंडियन उपाहारगृहात नान खातो ती सुद्धा गार्लिक आणि जोडीला पिकल असत . खरे तर येथे ह्या विषयावर लिहिण्यात अजिबात रस नव्हता. पण सदर लेख आमच्या आडनाव बंधूंनी काढला आहे. तेव्हा त्यांच्या आदरापोटी हि प्रतिक्रिया खरडली. मुक्काम पोस्ट .......
  • Log in or register to post comments

चपाती म्हणणारे आम्ही लोक

आशु जोग
Fri, 02/08/2013 - 00:41 नवीन
चपाती म्हणणारे आम्ही लोक गावंढळ का
  • Log in or register to post comments

गावंढळ की गावठी की पावटे?

शुचि
Sun, 02/10/2013 - 06:05 नवीन
गावंढळ की गावठी की पावटे? अहो जोग तुम्हाला उद्देशून नाही बरं का. असच आपलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

नाही, उच्चभ्रू

श्रीरंग_जोशी
Sun, 02/10/2013 - 06:06 नवीन
http://misalpav.com/comment/457200#comment-457200
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

सोपे आहे.

चित्रगुप्त
Sat, 03/08/2014 - 14:18 नवीन
सोपे आहे. आट्याची केली, तर 'पोळी'. कणकेची केली, तर 'चपाती' संताचे पोल्ट्री फार्म होते, त्याला बंताने विचारले, अरे अंड्यातून पिल्लू निघाले, की तू ओळखतोस कसे, कोंबडा की कोंबडी ते? संता म्हणाला, "आसान है, सामने कुछ दाने फेको, चुगने लगा, तो मुर्गा. ... चुगने लगी, तो मुर्गी"
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा