✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कल्की

न
निलरंजन यांनी
Sat, 02/22/2014 - 15:37  ·  लेख
लेख
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे असे म्हटले जाते की कलियुगा मध्ये अशी वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील. त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली, तो अवतार झाल्यावर कल्की अवतार येतील जे लोक बदलले नाही त्या लोकांना शिक्षा करेल कल्की अवतार या millenium मधे होईल. तो भारतात जन्म घेईल. भविष्यवाणीनुसार कल्की अवतार संपूर्ण जगाचा राजा असेल संपूर्ण पापनाश केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेल तो वाईट लोकांना शिक्षा देईल पापी लोकावर तो दया करणार नाही. कल्की अवतार एक सुवर्णयुग स्थापन करेल कलियुगा आधी, हे कृष्णाने रणांगणात अर्जुनाला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर, कलि युग सुरूवातीस होईल. तो 5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात कलि युग आत सुवर्णयुग येतील. चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
23667 वाचन

💬 प्रतिसाद (136)

प्रतिक्रिया

पण मग या सगळ्याचा कल्कीशी काय

कवितानागेश
Tue, 02/25/2014 - 19:28 नवीन
पण मग या सगळ्याचा कल्कीशी काय संबंध? आणि आधीच जनकल्याण झालं तर कल्की कशाला येइल?
↩ प्रतिसाद: निलरंजन

कलियुग थोर आहे किती कल्याण

निलरंजन
Tue, 02/25/2014 - 22:04 नवीन
कलियुग थोर आहे किती कल्याण करायचे ठरवलं तरी 100 कोटी जनतेस आपण किती पुरणार अवतार त्या त्या वेळी होईल कृष्णाने सांगितले प्रमाणे ध्रमस्थापनेसाठी
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आता

इरसाल
Wed, 02/26/2014 - 15:56 नवीन
मी म्हणु शकतो मला"ला" ही.
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सृजनहीन विज्ञान व्यर्थ है

विटेकर
Wed, 02/26/2014 - 16:23 नवीन
विज्ञान आणि जनकल्याणाचा फार जवळचा संबंध आहे. विनाशकारी विज्ञान हवे आहे का तुम्हाला? चारित्र्य संपन्न समाज हीच कल्याणाप्रत नेणारी गोष्ट आहे. निर्माणों के पावन युगमे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीमे वसुधा का कल्याण न ना भूले आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है सृजनहीन विज्ञान व्यर्थ है यदि मानव का प्यार नहीं है भौतिकता के उत्थानोमे , जीवनका उत्थान न भूले.
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मला आजवर वाटत होते, इतिहास

मनीषा
Mon, 02/24/2014 - 14:23 नवीन
मला आजवर वाटत होते, इतिहास म्हणजे कुणीतरी जे बघितलेले, ऐकलेले असते, ते कुणाला सांगून अथवा लिहून ठेवलेले असते -- त्याला म्हणतात. इतिहास जतन करण्यासाठी योगसाधना म्हणजे अवघड आहे.
अस कुणास भगवंत दश॔न होत नाही
??? मग कल्की महाराज पृथ्वीवर अदृश्य स्वरूपात वावरणार आहेत की काय ?
↩ प्रतिसाद: निलरंजन

तुम्ही योग्य वाटलात तर

निलरंजन
Mon, 02/24/2014 - 21:01 नवीन
तुम्ही योग्य वाटलात तर तुम्हाला नक्कीच नुसते दिसणार नाही तर मोक्षप्राप्तीची आस पण पूर्ण करतील
↩ प्रतिसाद: मनीषा

धन्यावाद हो!

मनीषा
Tue, 02/25/2014 - 10:54 नवीन
धन्यावाद हो! पण मला मोक्षप्राप्तीची आस नाही. मला इथेच पृथ्वीवर बरं वाटतय. बाकी तुमच्या पूर्वावताराची थोडीफार कल्पना येऊ लागली आहे, बरं का !
↩ प्रतिसाद: निलरंजन

आस

विनायक प्रभू
Tue, 02/25/2014 - 20:15 नवीन
ंम्हणजे वेगवेगळ्या आस असतात. मोक्षाची वेगळी,नेहेमी ची वेगळी
↩ प्रतिसाद: निलरंजन

अर्थ काय काढावे तितके निघतात.

मनीषा
Tue, 02/25/2014 - 20:32 नवीन
अर्थ काय काढावे तितके निघतात. (असं म्हणतात मराठी भाषा इतकी लवचिक आहे, की वाकवावी तेव्हढी आणी तशी वाकते.) पण मी नेहमीच सरळ सरळ अर्थ घेते. उगीचच तिरका, गूढ, द्वयर्थं वगैरे जमत नाही.
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

आय काइंड ऑफ डाउट अबोट इट...

आत्मशून्य
Sun, 03/02/2014 - 19:51 नवीन
इफ हे रिअली मीन टु से मराठी आस...?
↩ प्रतिसाद: निलरंजन

सगळं काही वेदांत लिहीलेलं

शैलेन्द्र
Mon, 02/24/2014 - 21:16 नवीन
सगळं काही वेदांत लिहीलेलं असताना अजून पुराव्यांची गरजच काय म्हणतो मी? बाकी तुम्हाला मोक्षाचं फ्री टिकीट मिळतय तर घेवून ठेवा.
↩ प्रतिसाद: मनीषा

असं कसं ? पुरावा हवाच

मनीषा
Tue, 02/25/2014 - 11:00 नवीन
असं कसं ? पुरावा हवाच सामान्य जनांना जरूरी वाटला नाही, तरी इतिहास संशोधकांना त्याची गरज लागते ना! मला मिळालेलं फ्री टिकीट मला नकोय, म्हणून विकायचय. कुणाला हवं असेल तर कळवा. *biggrin* :-D
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

बघा इथे तर मोक्षाच्या

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/25/2014 - 18:55 नवीन
बघा इथे तर मोक्षाच्या तिकीटाचा सरळ सरळ काळाबाजार चाललाय ! ;)
↩ प्रतिसाद: मनीषा

मला मीच नव्याने ओळखले

स्पंदना
Sun, 02/23/2014 - 09:27 नवीन
मला मीच नव्याने ओळखले समथिंग ग्रेट असे मीच म्हटले त्रिवार सत्य!!

व्वा...........ह! क्या धागा

अत्रुप्त आत्मा
Sun, 02/23/2014 - 20:04 नवीन
व्वा...........ह! क्या धागा है? Image removed.

अरे अरे.. मला वाटलं वेगळीच

आनन्दा
Mon, 02/24/2014 - 12:33 नवीन
अरे अरे.. मला वाटलं वेगळीच कल्की आहे.. किती आशेने आलो होतो हो..

त्या कल्कीचा फोटो तरी दाखवा

निलरंजन
Mon, 02/24/2014 - 21:05 नवीन
त्या कल्कीचा फोटो तरी दाखवा राव!
↩ प्रतिसाद: आनन्दा

फक्त पुण्यवंतांनाच दिसते ती.

बॅटमॅन
Tue, 02/25/2014 - 19:00 नवीन
फक्त पुण्यवंतांनाच दिसते ती.
↩ प्रतिसाद: निलरंजन

थोडे पुण्य पुण्याचा म्हणून

निलरंजन
Tue, 02/25/2014 - 19:24 नवीन
थोडे पुण्य पुण्याचा म्हणून पदरात घाला
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असे करता येत नाही. पुण्य हवे

बॅटमॅन
Wed, 02/26/2014 - 16:05 नवीन
असे करता येत नाही. पुण्य हवे नशिबाला.
↩ प्रतिसाद: निलरंजन

सोजन्य विकिमिडिया

जेपी
Wed, 02/26/2014 - 10:27 नवीन
Image removed. कल्कि

छ्या !!!अ

धन्या
Fri, 02/28/2014 - 10:25 नवीन
से विकीवरुन फोटो चिकटवण्यापेक्षा वल्लीला आवाज दिला असतात तर त्याने ढिगाने स्वतः घेतलेले फोटो दिले असते. :)
↩ प्रतिसाद: जेपी

विकीवरुन फोटो चिकटवण्यापेक्षा

जेपी
Fri, 02/28/2014 - 10:34 नवीन
विकीवरुन फोटो चिकटवण्यापेक्षा वल्लीला आवाज दिला असतात तर त्याने ढिगाने स्वतः घेतलेले फोटो दिले असते फोटो टाकता येतो का ते बघत होतो .:-) १००

१०१!!

कवितानागेश
Fri, 02/28/2014 - 10:48 नवीन
१०१!! १०८ प्रतिसाद पूर्ण करा रे... ;)

आपल्याकडे अफाट ज्ञान आहे हो.

म्हैस
Fri, 02/28/2014 - 18:17 नवीन
आपल्याकडे अफाट ज्ञान आहे हो. सामान्य माणसं सुधा त्याचा उपयोग करू शकली असती. पण हजारो वर्षांपासून हे ज्ञान वेद, उपनिषदे , धार्मिक ग्रंथ ह्यांमध्ये एका विशिष्ट वर्गाने बंदिस्त करून ठेवलं. सामान्य माणसांना जर हे ज्ञान मिळालं आणि ती योग्य दिशेने विचार करू लागली, समृद्ध होऊ लागली तर आपल्याला कोणी विचारणार नाही. म्हणून मुद्दामच लोकांना ह्या ज्ञानाची कवाड बंद केली गेली. त्यामुळे आपल्याकडे काय आहे आणि काय नाही हे पुष्कळ लोकांना माहित सुधा नाहीये. राईट बंधूंच्या आधी ९ वर्षे तळपदे शास्त्रींनी भारद्वाज ऋषींच्या ग्रंथावरून विमान तयार केलं. ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, महादेव गोविंद रानडे आणि अजून १ कोणीतरी ब्रिटीश अधिकारी होता . ह्या तिघांच्या उपस्थितीत ८००० फूट उंच उडवून दाखवला. त्यानंतर ब्रिटिशांनी ती technology तळपदे शास्त्रींकडून विकत घेतली आणि त्यानंतर तळपदेनचा खून झाला. ती केस लगेच बंद करून टाकण्यात आली. त्यामुळे आधुनिक युगातल पाहिलं विमान उडवणारे राईट बंधू नाहीत. तिबेट मध्ये तर राईट बंधूंच्या आधी कितीतरी वर्षांपासून अशी विमानं उडवली जातात. फार पूर्वी सुधा आपल्याकडे असणार्या अफाट ज्ञानाचा उपयोग करून पुष्पक विमान, किवा उडणारे घोडे वगेरे तयार करण हि काही फार आश्चर्याची गोष्ट नाहीये.

राईट बंधूंच्या आधी ९ वर्षे

धन्या
Fri, 02/28/2014 - 18:24 नवीन
राईट बंधूंच्या आधी ९ वर्षे तळपदे शास्त्रींनी भारद्वाज ऋषींच्या ग्रंथावरून विमान तयार केलं. ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, महादेव गोविंद रानडे आणि अजून १ कोणीतरी ब्रिटीश अधिकारी होता . ह्या तिघांच्या उपस्थितीत ८००० फूट उंच उडवून दाखवला. त्यानंतर ब्रिटिशांनी ती technology तळपदे शास्त्रींकडून विकत घेतली आणि त्यानंतर तळपदेनचा खून झाला. ती केस लगेच बंद करून टाकण्यात आली.
याविषयी अधिक वाचायला आवडेल. काही संदर्भ देऊ शकाल का अधिक वाचनासाठी?
↩ प्रतिसाद: म्हैस

http://en.wikipedia.org/wiki

यसवायजी
Sun, 03/02/2014 - 17:40 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Shivkar_Bapuji_Talpade
↩ प्रतिसाद: धन्या

दुव्यासाठी धन्यवाद.

धन्या
Sun, 03/02/2014 - 18:22 नवीन
दुव्यासाठी धन्यवाद. मात्र विकीवरील माहितीची विश्वासार्हता शंकास्पद असते. :)
↩ प्रतिसाद: यसवायजी

हो ते तर आहेच. पण या

यसवायजी
Mon, 03/03/2014 - 18:39 नवीन
हो ते तर आहेच. पण या तळपदेंबद्दल इतर २-४ ठिकाणी ऐकले होते. अजुन कुणाकडे विश्वासार्ह दुवा आहे का? किंवा रानड्यांनी काही लिहिलंय का?
↩ प्रतिसाद: धन्या

त्यांचा वरिजिनल दुवा केसरी

बॅटमॅन
Mon, 03/03/2014 - 18:42 नवीन
त्यांचा वरिजिनल दुवा केसरी किंवा तत्सम ठिकाणी पाहिला पाहिजे. तदुपरि: या तळपदेंनी काही खर्रेखुर्रे विमान उडवले नव्हते. जे काही उडवले होते ते बलूनसदृश काही असण्याचा चान्सच जास्त, असे एके ठिकाणी वाचलेले आहे. अन यातही युनिक असे काही नाही. १८९५ साली तळपद्यांनी 'विमान' उडवले, त्याच्या आधी १०-१५ वर्षे गुजरातेत एतत्सदृश काही उडवल्याचे ऐकले आहे.
↩ प्रतिसाद: यसवायजी

भारद्वाज ऋषींच्या ग्रंथावरून विमान तयार केलं.

आत्मशून्य
Fri, 02/28/2014 - 19:08 नवीन
तशी विमाने मी सुधा शिशु वर्गाच्या ग्रंथा वरून तयार करत असे. मुद्दा हा आहे या विमानात सामान्य माणुस तिकिट काढुन बसु शकत होता काय ? कोमन मेंला त्याचा काय उपयोग झाला ? त्यापेक्षा सिलिकोन वेलित जे घडते ते आज ना उद्या प्रत्येकाच्या आवाक्यात येते . असे नाही की फक्त त्यांचे त्यांच्यात राहते.
↩ प्रतिसाद: म्हैस

अजून ही व्हॅलीची ओढ काही

निलरंजन
Sun, 03/02/2014 - 22:54 नवीन
अजून ही व्हॅलीची ओढ काही सुटत नाही बाबा तुझी अरे पण आपण आपल्या देशात संशोधनाने नाही का जगाला दाखवू शकत का? आपल्या कडे शास्त्र नाहीये का शास्त्रज्ञ? जगाला जीवनपद्धती शिकवणारया भारताला अमेरिकेची गरज का?

यु आर रियाल ग्रेट थिंकर

आत्मशून्य
Mon, 03/03/2014 - 00:16 नवीन
.
↩ प्रतिसाद: निलरंजन

@आत्मशून्य

म्हैस
Tue, 03/04/2014 - 16:11 नवीन
@आत्मशून्य अरे भल्या माणसं ते पहिला विमान होतं हे समजत नाहीये का ? कि अजूनही शिशु वर्गातच आहात ?

अर्थातच अजूनही शिशु वर्गातच आहे.

आत्मशून्य
Tue, 03/04/2014 - 16:25 नवीन
बाकी तुमच्या सिलेक्टीव रिडींगचे कौतुक आहे. माझ्यावर व्यवस्थीत चिखफेक केलीत पण उपस्थित केलेल्या मुद्यांना मात्र उत्तरे दिली नाहीत :(
↩ प्रतिसाद: म्हैस

काही संदर्भ देऊ शकाल का अधिक

म्हैस
Tue, 03/04/2014 - 16:15 नवीन
काही संदर्भ देऊ शकाल का अधिक वाचनासाठी?
ह्याच्यावर सकाळ मध्ये फार दिवसांपूर्वी लेख आला होतं. त्यात पुस्तकाचा संदर्भ दिला होतां. पण आत्ता मला त्याचं नाव आठवत नाहीये. बहुतेक विकिवर अजून दुवे मिळू शकतील
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा