Skip to main content

कल्की

लेखक निलरंजन यांनी शनिवार, 22/02/2014 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे असे म्हटले जाते की कलियुगा मध्ये अशी वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील. त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली, तो अवतार झाल्यावर कल्की अवतार येतील जे लोक बदलले नाही त्या लोकांना शिक्षा करेल कल्की अवतार या millenium मधे होईल. तो भारतात जन्म घेईल. भविष्यवाणीनुसार कल्की अवतार संपूर्ण जगाचा राजा असेल संपूर्ण पापनाश केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेल तो वाईट लोकांना शिक्षा देईल पापी लोकावर तो दया करणार नाही. कल्की अवतार एक सुवर्णयुग स्थापन करेल कलियुगा आधी, हे कृष्णाने रणांगणात अर्जुनाला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर, कलि युग सुरूवातीस होईल. तो 5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात कलि युग आत सुवर्णयुग येतील. चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23731
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

In reply to by मुक्ती

ते जे सांगताहेत ना , दुर्लक्ष कर ई. ई.. ई. त्यांना हे ही सांगा अनादर कसला ? हेच लिहिले आहे ना .....काय त्या रामायण महाभारतात ....मी तर एक पैलु दाखवितो आहे .......अजुन बरेच आहेत मुक्ती ताई .....अजुन लिहिले तर वाट लागेल या महा काव्यांची ! ( अभ्यास फक्त एक विशीष्ट समाज करत नाही )

In reply to by सुहास..

रामायण-महाभारताचे अनेक पैलू आहेत. जो म्हणाल तो पैलू इथे हजर आहे. तसेच बोलायचे झाले तर मग सांसारिक जबाबदारी सोडून रानावनात भटकायचे कारणही बुद्धाला नव्हते. एक मेलेला माणूस काय पाहिला आणि घर सोडून पळून गेला वगैरे बरेच बोलता येते. राळच उडवायची असेल तर कुणावरही कशीही उडवता येते. स्वमताच्या आग्रहासाठी 'विरुद्ध' पक्षावर राळ उडवण्यात कितपत हशील आहे ते मात्र मला माहिती नाही. बौद्ध तत्वज्ञान आणि त्याचे शंकराचार्यांनी केलेले खंडन हा तसा फेमस विषय आहे, पण वैयक्तिकरीत्या आचार्यांचे ते मुख्य योगदान आहे असे मला वाटत नाही. असो, तो विषय नंतर कधीतरी. अन अद्वैत वेदांत आचरणारे जसे अत्यल्प होते तसेच बौद्ध धर्माची तत्त्वे आचरणात आणणारेही थोडेच होते. कुठल्याही धर्माबद्दल असेच म्हणता येईल. अन उच्चनीचतेबद्दल बोलायचे झाले तर मग ते महायान-हीनयान वैग्रे भानगडी कशाला आल्या मग बौद्ध धर्मात? धर्माची मूळ तत्त्वे अन आचरणात फरक हा नेहमीच असतो. तो एकाच बाजूकडचा फरक अधोरेखित करण्यात काही अर्थ नाही. असो.

In reply to by सुहास..

सुहासदादा, धर्म मानणे, ना मानणे; कोणाला देव अथवा अवतार मानणे, ना मानणे या पूर्णपणे वैयक्तिक गोष्टी आहेत. "बौद्ध धम्मात बुद्धाला अवतार मानत नाहीत" किंवा "मी बुद्धाला अवतार मानत नाही." येवढेच लिहून थांबला असतात तर सर्वांनीच त्याबद्दल कौतुक केले असते, काहींनी अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री म्हणत पुढे काही बोलले गेले नसते. परंतु, तुम्ही त्याबरोबर कित्येक अनावश्यक विधाने केलीत. त्रिरत्न संघाकडे स्क्रीनशॉट पाठवणे काय, अवतार म्हणणे थांबवा काय, अन मी लहान माणूस नाही म्हणणे काय; हे सगळे एखाद्या मुतव्वाच्या फतव्यात शोभून दिसते. ओपन फोरमवर न्हवे. तुमच्या श्रद्धास्थानावर कोणीही चिखलफेक केलेली नाही आणि तरीही "त्याने केली तर मीही करेन" असे म्हणणे हे तथागताची शिकवण तुमच्यापर्यंत पोचली नाही हेच ठळकपणे दाखवून देते. सर्वसामान्य हिंदू माणूस बुद्ध किंवा बौद्ध यांना स्वतःपासून वेगळे समजत नाही. नसलेले भेद उभे करून वातावरण बिघडवायचा प्रयत्न कोणीच करू नये. तुम्ही बुद्धाला अवतार मानत नसाल तर त्या भावनेचा आदर आहे, तसाच आणखी कोणी अवतार मानत असेल तर त्याचाही आदर आहे. कारण भगवान गौतम बुद्धासारख्या महामानवाला "आमचा-तुमचा" अशा संबोधनात जखडून ठेवता येणे शक्य नाही. ते तर सगळ्या जगाचे असतात.

In reply to by मुक्ती

मी अजुन ही म्हणतो , अपप्रचार करू नका की बुध्द हा अवतार होता !! आणि स्क्रीन शॉट बद्दल ...ओपन फोरम बद्दल उत्तर देवुन केव्हाच झाले आहे. वाचा नेमके काय लिहीले आहे ते, समजले नसेल तर पुन्हा सांगेन ...... ज्यांना आस्था असते ते मनात प्रिज्युडाईस ( विष्णुचा अवतार म्हणे ) ठेवुन येत नाहीत .बेसीक्स मध्येच गडबड असली तर कन्सेप्ट काय कप्पाळ समजणार !! लहान मी देखील नाही, ज्या संकल्पनेने १००० वर्षे समाजाचा चुथडा केला, त्या संकल्पनेला धरून रहाण्याइतपत तर नक्कीच नाही

छोडो कल्की बाते कल्की बात पुरानी नये धागे पे खरडेंगे हम मिलकर नयी कहानी हम मिपास्थानी हम मिपास्थानी !

In reply to by अवतार

+++१११ टू अवतारबाबा! @छोडो कल्की बाते कल्की बात पुरानी नये धागे पे खरडेंगे हम मिलकर नयी कहानी हम मिपास्थानी हम मिपास्थानी ! >>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif

@बॅट्या बेटा चल आपली बिट लागली, १०००००००० रुपयाची तू ३०० वर्शाने चुकला आहेस.

In reply to by विनायक प्रभू

तुम्ही २९९ वर्षांनी चुकला आहात.

धाग्याचे शिर्षक वाचुन कल्की कोचलीन संबंधी काहीतरी असेल या अपेक्षेने धागा ऊघडला होता. पण हा धागा तर भलताच निघाला! जाऊ द्या, हा माझा विषय नाही. बाकी तुमचे चालु द्या.

कल्की जन्मल्याबरोबर तो 'अवतार' आहे हे कळणार?, की ते तो मोठा झाल्यावर समजेल? तुमचे लेखन वाचल्यापासून, कल्कीचा बालपणापासूनचा इतिहास कसा जतन करता येईल याची चिंता मला लागली आहे.

पुढे युगे सुरू राहतील, त्यात वाईट लोक असणार नाहीत का? म्हणजे आणखी अवतार का येणार नाहीत म्हणे?

आज स्वयंचलित वाहनांच्या युगात उडण्याची क्षमता असलेला पांढरा घोडा हे कल्कीचे वाहन असेल असे म्हणणे खुळचटपणाचे आहे. ज्या कुणाच्या सुपिक डोक्यातून हजार दोन हजार वर्षांपूर्वी ही अवताराची कल्पना निघाली असेल त्याला अर्थातच पुढे दोन तीन हजार वर्षांनी येणार्‍या यंत्रयुगाची कल्पना नसेल. म्हणून त्याने तेव्हा आपल्या तेव्हाच्या कुवतीनुसार उडणारा पांढरा घोडा ही कल्पना रंगवली.

In reply to by धन्या

त्याने नक्कइच यंत्र युग पाहिले असणार हो, तुमि लिहून घ्या... पण सालं त्या वेळच्या इतराना ते पट्वाय्चा प्रयत्न करणे आज लोकांना मंत्र शक्तीचे अनुभव विषद करणे इतकच कठिन असणार म्हणुन तो धोका पत्करला नसावा. कसं आहे की त्यावेळी मुर्ख लोक डायरेक कापाकापी करायचे. बुध्द अध्यात्मात होता अन महात्मा गांधिचाहि जन्म झाला न्हवता.

सफेद घोडा साभार: इस्रो हा घोडा उडवणारे कस्तुरी रंगन कि अब्दुल कलाम? हा कल्की अवतार आपल्या पुढच्या पीढीला सुरक्षितपणे पृथ्वीवरून दूर कोठल्या परग्रहावर घेऊन जाणारा तर नसेल?

माझ्या मते आपण वैज्ञानिक द्रुष्टीने जगापेक्षा प्रगत होतो उत्तरेकडून होणारे सततची परकीय आक्रमण आणि नंतरचे इंग्रज यामुळे कुठे तरी आपण आपले ज्ञान विसरून गेलोय गंमत पहा रामायण काळात आपल्या कडे पुष्पक विमान होते पण आपल्याला विमान कळाले राईट बंधू नी पेटंट घेतल्यावर ऋग्वेद सामवेद सारखे वेदांमधे हे ज्ञान लपून आहे त्याला संस्कृत आणि विज्ञान याची जोड देऊन बरेचसे आणखी शोध लागू शकतात बाकी ज्यांना अवताराचा ईतिहास लिहावे असे वाटते त्याने योग साधनेने अंतर्ज्ञानी व्हावे कारण अस कुणास भगवंत दश॔न होत नाही

In reply to by निलरंजन

हिंट्स देउ नयेत ! बाकि हो, होते पुश्पक विमान आपल्या पुर्वजांकडे ? पण त्याचा सामान्यांना काय उपयोग ? त्याचा सामान्यांना उपयोग करणे तेंव्हाच शक्य झाले जेंव्हा राइट बंधुनी पेटंट घेतले. हिच गोश्ट बहुतांश पेंटंटची आहे. उगा आपल्याकडे यांव होते त्यांव होते च्या गमज्या नकोतच जर त्या सुविधांचा सामान्य जनतेकडुन वापर होत नसेल तर. सिलीकॉन वेलीचे खरे मुल्य याच कारणामुळे आहे.

In reply to by आत्मशून्य

मला मीच नव्याने ओळखले
त्यांना स्वतःलाच पुनःप्रत्ययाचा आनंद मिळालाय. आणि तुम्ही चेष्टा करु राहिले...

In reply to by आत्मशून्य

ते ज्ञान कालही होते अन आजही आहे महत्व आहे ते वैज्ञानिक भाव ठेवून ते आपल्याला जनकल्याणासाठी कसे वापरता येईल याला शून्यात राहून ते कसे साध्य होईल? आणि राईट बंधु नी आपल्या कडील विमानाचे डिझाईन वापरले जे मुंबई च्या एकाने तयार केले आणि इंग्रजानी तुटपुंजा पैसा देवून विकत घेतले शेवटी व्हॅली तरी कोण जास्त आहेत ...भारतीय च ना पण आपल्या ला सवय लागली स्वतः ला देशाला नाव ठेवायची आणी दूसरया देशाचे गोडवे गायचे

In reply to by निलरंजन

जनकल्याण म्हणजे नक्की काय करायचं? आणि ते वैज्ञानिक भावानी कसे करायचे? काहितरी वैज्ञानिक असेल तर तिथे 'भाव' कसा काय येइल? आणि 'भावना' वैज्ञानिक कशी काय असेल? काहीच कळेना! :(

In reply to by कवितानागेश

भावना ही वैज्ञानिक का असू शकत नाही??????????? बाकी असूदे पण तुझ्याशी इथे एक जोर्दार असहमती नोन्दवतो मौतै.

In reply to by कवितानागेश

जनकल्याण म्हणजे एखाद्या शोध किंवा ज्ञानाचा रोजच्या वापरासाठी किंवा फायदयासाठी केलेला वापर भाव धार्मिक असण्याऐवजी वैज्ञानिक असावा म्हणजे त्यातून नक्कीच काहीतरी फायदा होईल कळ्ळलं....

In reply to by कवितानागेश

कलियुग थोर आहे किती कल्याण करायचे ठरवलं तरी 100 कोटी जनतेस आपण किती पुरणार अवतार त्या त्या वेळी होईल कृष्णाने सांगितले प्रमाणे ध्रमस्थापनेसाठी

In reply to by कवितानागेश

विज्ञान आणि जनकल्याणाचा फार जवळचा संबंध आहे. विनाशकारी विज्ञान हवे आहे का तुम्हाला? चारित्र्य संपन्न समाज हीच कल्याणाप्रत नेणारी गोष्ट आहे. निर्माणों के पावन युगमे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीमे वसुधा का कल्याण न ना भूले आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है सृजनहीन विज्ञान व्यर्थ है यदि मानव का प्यार नहीं है भौतिकता के उत्थानोमे , जीवनका उत्थान न भूले.

In reply to by निलरंजन

मला आजवर वाटत होते, इतिहास म्हणजे कुणीतरी जे बघितलेले, ऐकलेले असते, ते कुणाला सांगून अथवा लिहून ठेवलेले असते -- त्याला म्हणतात. इतिहास जतन करण्यासाठी योगसाधना म्हणजे अवघड आहे.
अस कुणास भगवंत दश॔न होत नाही
??? मग कल्की महाराज पृथ्वीवर अदृश्य स्वरूपात वावरणार आहेत की काय ?

In reply to by निलरंजन

धन्यावाद हो! पण मला मोक्षप्राप्तीची आस नाही. मला इथेच पृथ्वीवर बरं वाटतय. बाकी तुमच्या पूर्वावताराची थोडीफार कल्पना येऊ लागली आहे, बरं का !

In reply to by निलरंजन

ंम्हणजे वेगवेगळ्या आस असतात. मोक्षाची वेगळी,नेहेमी ची वेगळी

In reply to by विनायक प्रभू

अर्थ काय काढावे तितके निघतात. (असं म्हणतात मराठी भाषा इतकी लवचिक आहे, की वाकवावी तेव्हढी आणी तशी वाकते.) पण मी नेहमीच सरळ सरळ अर्थ घेते. उगीचच तिरका, गूढ, द्वयर्थं वगैरे जमत नाही.

In reply to by मनीषा

सगळं काही वेदांत लिहीलेलं असताना अजून पुराव्यांची गरजच काय म्हणतो मी? बाकी तुम्हाला मोक्षाचं फ्री टिकीट मिळतय तर घेवून ठेवा.

In reply to by शैलेन्द्र

असं कसं ? पुरावा हवाच सामान्य जनांना जरूरी वाटला नाही, तरी इतिहास संशोधकांना त्याची गरज लागते ना! मला मिळालेलं फ्री टिकीट मला नकोय, म्हणून विकायचय. कुणाला हवं असेल तर कळवा. *biggrin* :-D

मला मीच नव्याने ओळखले समथिंग ग्रेट असे मीच म्हटले त्रिवार सत्य!!

In reply to by जेपी

से विकीवरुन फोटो चिकटवण्यापेक्षा वल्लीला आवाज दिला असतात तर त्याने ढिगाने स्वतः घेतलेले फोटो दिले असते. :)

विकीवरुन फोटो चिकटवण्यापेक्षा वल्लीला आवाज दिला असतात तर त्याने ढिगाने स्वतः घेतलेले फोटो दिले असते फोटो टाकता येतो का ते बघत होतो .:-) १००

१०१!! १०८ प्रतिसाद पूर्ण करा रे... ;)

आपल्याकडे अफाट ज्ञान आहे हो. सामान्य माणसं सुधा त्याचा उपयोग करू शकली असती. पण हजारो वर्षांपासून हे ज्ञान वेद, उपनिषदे , धार्मिक ग्रंथ ह्यांमध्ये एका विशिष्ट वर्गाने बंदिस्त करून ठेवलं. सामान्य माणसांना जर हे ज्ञान मिळालं आणि ती योग्य दिशेने विचार करू लागली, समृद्ध होऊ लागली तर आपल्याला कोणी विचारणार नाही. म्हणून मुद्दामच लोकांना ह्या ज्ञानाची कवाड बंद केली गेली. त्यामुळे आपल्याकडे काय आहे आणि काय नाही हे पुष्कळ लोकांना माहित सुधा नाहीये. राईट बंधूंच्या आधी ९ वर्षे तळपदे शास्त्रींनी भारद्वाज ऋषींच्या ग्रंथावरून विमान तयार केलं. ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, महादेव गोविंद रानडे आणि अजून १ कोणीतरी ब्रिटीश अधिकारी होता . ह्या तिघांच्या उपस्थितीत ८००० फूट उंच उडवून दाखवला. त्यानंतर ब्रिटिशांनी ती technology तळपदे शास्त्रींकडून विकत घेतली आणि त्यानंतर तळपदेनचा खून झाला. ती केस लगेच बंद करून टाकण्यात आली. त्यामुळे आधुनिक युगातल पाहिलं विमान उडवणारे राईट बंधू नाहीत. तिबेट मध्ये तर राईट बंधूंच्या आधी कितीतरी वर्षांपासून अशी विमानं उडवली जातात. फार पूर्वी सुधा आपल्याकडे असणार्या अफाट ज्ञानाचा उपयोग करून पुष्पक विमान, किवा उडणारे घोडे वगेरे तयार करण हि काही फार आश्चर्याची गोष्ट नाहीये.

In reply to by म्हैस

राईट बंधूंच्या आधी ९ वर्षे तळपदे शास्त्रींनी भारद्वाज ऋषींच्या ग्रंथावरून विमान तयार केलं. ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, महादेव गोविंद रानडे आणि अजून १ कोणीतरी ब्रिटीश अधिकारी होता . ह्या तिघांच्या उपस्थितीत ८००० फूट उंच उडवून दाखवला. त्यानंतर ब्रिटिशांनी ती technology तळपदे शास्त्रींकडून विकत घेतली आणि त्यानंतर तळपदेनचा खून झाला. ती केस लगेच बंद करून टाकण्यात आली.
याविषयी अधिक वाचायला आवडेल. काही संदर्भ देऊ शकाल का अधिक वाचनासाठी?

In reply to by धन्या

हो ते तर आहेच. पण या तळपदेंबद्दल इतर २-४ ठिकाणी ऐकले होते. अजुन कुणाकडे विश्वासार्ह दुवा आहे का? किंवा रानड्यांनी काही लिहिलंय का?

In reply to by यसवायजी

त्यांचा वरिजिनल दुवा केसरी किंवा तत्सम ठिकाणी पाहिला पाहिजे. तदुपरि: या तळपदेंनी काही खर्रेखुर्रे विमान उडवले नव्हते. जे काही उडवले होते ते बलूनसदृश काही असण्याचा चान्सच जास्त, असे एके ठिकाणी वाचलेले आहे. अन यातही युनिक असे काही नाही. १८९५ साली तळपद्यांनी 'विमान' उडवले, त्याच्या आधी १०-१५ वर्षे गुजरातेत एतत्सदृश काही उडवल्याचे ऐकले आहे.

In reply to by म्हैस

तशी विमाने मी सुधा शिशु वर्गाच्या ग्रंथा वरून तयार करत असे. मुद्दा हा आहे या विमानात सामान्य माणुस तिकिट काढुन बसु शकत होता काय ? कोमन मेंला त्याचा काय उपयोग झाला ? त्यापेक्षा सिलिकोन वेलित जे घडते ते आज ना उद्या प्रत्येकाच्या आवाक्यात येते . असे नाही की फक्त त्यांचे त्यांच्यात राहते.

अजून ही व्हॅलीची ओढ काही सुटत नाही बाबा तुझी अरे पण आपण आपल्या देशात संशोधनाने नाही का जगाला दाखवू शकत का? आपल्या कडे शास्त्र नाहीये का शास्त्रज्ञ? जगाला जीवनपद्धती शिकवणारया भारताला अमेरिकेची गरज का?

@आत्मशून्य अरे भल्या माणसं ते पहिला विमान होतं हे समजत नाहीये का ? कि अजूनही शिशु वर्गातच आहात ?

In reply to by म्हैस

बाकी तुमच्या सिलेक्टीव रिडींगचे कौतुक आहे. माझ्यावर व्यवस्थीत चिखफेक केलीत पण उपस्थित केलेल्या मुद्यांना मात्र उत्तरे दिली नाहीत :(

काही संदर्भ देऊ शकाल का अधिक वाचनासाठी?
ह्याच्यावर सकाळ मध्ये फार दिवसांपूर्वी लेख आला होतं. त्यात पुस्तकाचा संदर्भ दिला होतां. पण आत्ता मला त्याचं नाव आठवत नाहीये. बहुतेक विकिवर अजून दुवे मिळू शकतील