अरे वा ! माझाच पहिला प्रतिसाद ! (हे क्वचित होते; आमचे एरवी नेहमी वरातीमागून घोडे असते :-) )
बिपिनराव , शुद्ध मराठीत सांगायचे तर एकदम इंटरेष्टींग सुरवात आहे. तुम्हाला मिसळपाववरचे येलोनॉटी माहिती आहेत काय ? त्यांच्या ष्टोर्या अशाच झकास असतात ! त्यांना कुणीतरी चेला मिळतोयसे दिसते आहे.
बाकी क्रमशः बघून तेव्हढे लोक वैतागणार. कायतरी महत्त्वाचे येते आणि क्रमशः चा मक्षिकापात होतो ! आम्ही वाट पहातो :-)
बिपिनराव, सुरवात चांगली केली आहे....
छान लिहिताय तुम्ही. आगे बढो फुल कॉन्फिडन्स के साथ!!
आणि मुक्तसुनीतराव तुमची फिरकी घेतायत!:)
त्या साल्या येलोनॉटीला आदरस्थान (कै. झाल्यासारखं वाटतं!!!) वगैरे करू नका, फारतर मित्र समजा....
अवजड शब्दजंजाळ ही मुक्तसुनितांची स्पेश्यालिटी आहे, तुमची-आमची नाही!!!! (मुसू, ह. घे!!)
:)
बाकी क्रमशः टाकणारे लेखक भेटले की त्या येलोनॉटीच्या प्रेमाला खूप भरती येते (असं ऐकून आहे हो.....:))
काय बिप्पिन भौ ... तुम्ही पण इंप्लिमेंटेशननेच सुरूवात केली का ? वा वा वा !!
आता आम्हाला करियर गायडंस (इंग्रजीत समुपदेशन) करा .... जबरा ... तसा मी ही हल्ली युरोप-अरब कंट्रीज मधे पोहायचं म्हणतोय ..
तुमच्याकड जॅक लावायला हवा ... फक्त टेस्ट मधे सेम प्रश्न विचारा .... नाय तर लोचा ..
:)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
मला आधी वाटल माझ खोबर नावाचा काही पोपट झाल्याचा अनुभव वगैरे आहे की काय !!
बिपिन भो एकदम सही सुरुवात ,काय !!!
>>या लिखाणात साहित्यिक मूल्यं वगैरे शोधू नका, नाही म्हणजे मिळणार नाहीत म्हणुन सांगितलं आपलं, उगाच तुमची निराशा
साहित्यीक मुल्य वगैरे शोधण्या साठी आम्ही नाही आहोत मिपा वर !!
आम्हाला निर्भेळ आणी दर्जेदार लिखाण हव , आणी ते नक्कीच इथे वाचायला मिळतये ...
अवांतरः क्रमशः चा प्रादूर्भाव सौदी पर्यंत पोचला की काय .....जरा मोठे भाग लिहा प्लीज .....
अर्धवट पोटी ताटावरून उठवल्याच पातक लागेल नाय तर तुम्हा क्रमशः मंडळींना !!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
बिपिनराव सुरवात चांगली केली आहे.
काय ४-५ श्या दिल्या असत्या तरी कानाला गोडच वाटलं असतं.
हे वाक्य आवडले आणि पाण्यात पोहणे पण आवडले.
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)
सुरुवात दमदार झाली आहे! मिसळपावात मुटका मारलाच आहे ना तर आता येऊद्यात भराभर!
हजरजबाब तुमच्यातला आत्मविश्वास दाखवतो. अल्-खोबर ला प्रयाण कधी झाले ते ऐकायचे आहे. आने दो और भी!
(मिपाकर मराठी पहिलीत नाहीत त्यामुळे क्रमशः थोडं जास्त ओळींनंतरही चालेल! ;)
(खुद के साथ बातां : इतके दिवस फक्त प्रतिक्रियेतून दिसणारे बिपिनराव लिहू लागले हा 'मिपा' इफेक्ट म्हणायचा का? ;))
चतुरंग
रंगाशेठ,
मिपाचे हे ऋण मलाच नाही तर बर्याच लिहित्या झालेल्यांना मान्य करावेच लागेल. नाहीतर मी शाळेत असताना निबंध लिहिले होते तेवढेच. इथे लिहिणार्या काही दिग्गजांचं लिखाण वाचून खूप छान वाटायचं. तसेच काही मित्र भेटले इथे मिपावर जे खरोखरच छान लिहायचे, गप्पा होत होत्या. म्हणून आपण पण प्रयत्न करावा असे वाटले. मला उणिवा कळत आहेत पण बहुतेक प्रतिसाद उत्साहवर्धक होते. मी खरंच ऋणी आहे.
बिपिन.
क्रमशः सोसायटीत स्वागत.
उत्तम ल्हिताय की
माझं खोबार हे शीर्षक वाचुन थोडा चक्रावलो. खोबार चे खोबरे झाले आणि लेख ज्योतिबा / खंडोबा या देवस्थानावर असेल असे वाटले.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
बिपीनभौ,
सह्हीच!
नाही नाही म्हणत होता, एकदम धक्काच दिलात की फटकन एक लेख टाकून. तोही असा झकास :)
येऊ द्या...
बाकी, इतके दिवस आपली लेखनप्रतिभा का बरं दाबुन ठेवली होती?
वर विजुभौ शः नीं तुमचं सोसायटीत स्वागत केलेलंच आहे तेव्हा क्रमशःची चिंता नको.
फक्त आमचा चक्का करु नका म्हणजे मिळवली :)
आयला, ह्या क्रमशःवरुन आठवलं,
ओ तात्याबा,
रोशनीचा पुढचा भाग कधी मिळेल हो वाचायला?
धमु,
तुमने हमारे मुंह की बात छिन ली !! :-)
>>> नाही नाही म्हणत होता, एकदम धक्काच दिलात की फटकन एक लेख टाकून. तोही असा झकास
बाकी, इतके दिवस आपली लेखनप्रतिभा का बरं दाबुन ठेवली होती?
वर विजुभौ शः नीं तुमचं सोसायटीत स्वागत केलेलंच आहे तेव्हा क्रमशःची चिंता नको.
फक्त आमचा चक्का करु नका म्हणजे मिळवली
च्या मारी आम्ही नेमके हेच म्हणून राह्यलो व्हतो.
लोकांना टाकण्याकरताच्या कौलासाठी थोडे अवांतर : धमु , बर्याच दिवसानी तुला पहातोय. बरे वाटतेय :-)
>>लोकांना टाकण्याकरताच्या कौलासाठी थोडे अवांतर :
=)) आयला, झालं! संपलं आता. आली तुमच्यावर करडी नजर.
>>धमु , बर्याच दिवसानी तुला पहातोय. बरे वाटतेय
हल्ली हापिसात काम अंमळ वाढलं होतं हो, त्यात अगदीच डोकं भणाणलेलं, प्रतिसादही मनासारखे देता येत नव्हते. उगाच द्यायचे म्हणुन काय द्यायचे? म्हणुन शांत बसायचो. आज जरा वेळ मिळालाय तर घालतोय धुडगुस :)
बाकी, मंडळी, असाच लोभ ठेवा ह्या अजाण लेकरावर. मग मला जगच जिंकल्यासारखं आहे.
असो, अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
>> काय बिशाद परत मिपावर कुणी रिक्कामपणीचे कौल टाकील! जबरा टारू.... नातू शोभतोहेस हो!
उगाच माझं नाव मधे आणून तू असा जो माझ्या मैत्रीचा अपमान केला आहेस आणि टारूबाळावर असणार्या माझ्या आज्जी-प्रेमाचा जो अपमान केला आहे ... X( ..त्याबद्दल तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
संपादकांचं याकडे लक्ष दिसत नाही की तू मुद्दाम मला यात घुसडत आहेस ...
जाऊ दे मेघना, फार पकवलं नाही मी सगळ्यांनाच ... होतं असं कधीकधी ... ;-)
(ह. घ्या असं सांगायची गरज नसावी)
(अवांतरः बिपीनभौंकडे तक्रार केली क्रमशः लवकर टाकलं म्हणून, मला स्वतःला सातवा भाग लिहिला पाहिजे)
रौशनी...
धम्या, तात्याला आता बहुतेक किडनॅपच करावं लागेल नाही तर खूप मोठ्ठं काहितरी घबाड प्रॉमिस करावं लागेल. तो ते रौशनीचं काय मनावर घेईना झालाय. प्लॅन करुया?
बिपिन.
बिपिन राव
स्वागतम. मस्त सुरुवात. पण...
१) 'खोबार' ह्या शीर्षकाचा अर्थ कळला नाही.
२) लेख जरा आकाराने मोठा हवा. बा़जूला जो स्क्रोल-बार दिसतो त्याचा आकार साधारपणे १ सें.मी. होईपर्यत लिहीत राहा आणि उत्कंठावर्धक बिंदूजवळ 'क्रमशः' हाणा.
अभिनंदन.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
बा़जूला जो स्क्रोल-बार दिसतो त्याचा आकार साधारपणे १ सें.मी. होईपर्यत लिहीत राहा आणि उत्कंठावर्धक बिंदूजवळ 'क्रमशः' हाणा ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायची काय गॅरेंटी हो पेठकर काका ..
आणि बा़जूला जो स्क्रोल-बार दिसतो त्याचा आकार साधारपणे १ सें.मी.
त्यांचा मॉनिटर ६४०x४८० असेल तर बरे आहे त्यांना. १९२०x१२०० वगैरे सारखा High resolution असेल तर बाकीची कार्ये सोडून दिवसभर लेखच लिहीत बसावे लागेल ना.
मग पुढच्या लेखात आणि मंडळी अश्या रितीने १ सें.मी. स्क्रोल-बार च्या नादात माझी परदेशातील नोकरी गेली. असा समारोप. :P
(स्वगत: एक तर कधी तरी प्रतिक्रिया देतोस, आणि त्या पण अवांतर :s )
ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायची काय गॅरेंटी हो पेठकर काका ..
हे जुळवून आणण्याची हातोटी आत्मसात करणे कठीण नाही.
त्यांचा मॉनिटर ६४०x४८० असेल तर बरे आहे त्यांना. १९२०x१२०० वगैरे सारखा High resolution असेल तर बाकीची कार्ये सोडून दिवसभर लेखच लिहीत बसावे लागेल ना.
ही टेक्नीकल बाजू माझ्या मतीमंद मेदूत आलीच नाही.
आणि मंडळी अश्या रितीने १ सें.मी. स्क्रोल-बार च्या नादात माझी परदेशातील नोकरी गेली
लोकं ऑफिसात ऑफिसचीच कामे करतात अशी माझी भाबडी समजूत. पण तसे करत नसतील आणि नोकरी गेली तर त्याला सर्वस्वी तेच जबाबदार राहतील.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
(स्वगत: एक तर कधी तरी प्रतिक्रिया देतोस, आणि त्या पण अवांतर )
अर्रे स्वगत घाबरतोस काय ? बिंद्धास्त प्रतिक्रिया दे ..वांतर असो वा अवांतर ...
असो तु अवांतर प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तात्या थोडी माफी द्या हो
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
सहिये....
पण एका दमात लिहायला काय होतं हो तुम्हां लोकांना?
क्रमश:चं शेपूट डकवून ठेवता ते?
असो -
मजा येतेय. 'डबा बांधून फेकणार की असंच फेकणार?' हे तर जबराच आहे! आपल्याला नसतं ब्वॉ सुचलं.
लवकर लवकर लिहा. यमीचा आदर्श ठेवून. ;)
>>मग पुढच्या लेखात आणि मंडळी अश्या रितीने १ सें.मी. स्क्रोल-बार च्या नादात माझी परदेशातील नोकरी गेली. असा समारोप.
=))
लिहा हो क्रमशः जमातीचे नवे पाईक!! लवकर लवकर लिहा!!
परवाच मला तू खरड पाठवली आहेस की, क्रमशः चा कंटाळा येतो म्हणून.
आता तुझे क्रमशः वाचायला आवडतील तरीही.. जास्ती नको क्रमशः घेऊ बाबा. २-३ भागातच संपव..
सुरूवात आवडली हे मनापासून सांगते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी