✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्मार्ट फोन ची निवडनुक

ज
जोशी 'ले' यांनी
Wed, 01/22/2014 - 10:54  ·  लेख
लेख
नमस्कार मित्रांनो... आज काल सगळ्यांच्याच खिशात स्मार्ट फोन विसावलाय, (विसावलाय कसला :-) ) किंवा ज्यांच्या कडे नाहि ते सुध्दा स्मार्ट फोनच घ्यायचा विचार करतायेत तसेच ज्यांच्या कडे आहे ते त्यांच्या माॅडेल ला कंटाळलेत, मार्केट मधे ईतक्या व्हरायटीज आहेत कि गोंधळुन जायला होतं, नेट वरिल रिव्हयुज पण एका मर्यादे पर्यंत मदत करतात कारण तेहि बर्याचदा पेड असतात, तर या सगळ्यांन वर आपण मिपाकर एक मेकांची मदत करु शकतो BaseMark OS II हे टुल वापरुन, कदाचीत बर्याच जनांना कंम्प्युटर साठी असलेले belark adviser आठवत असेल त्याच धर्तीवर हे टुल काम करते. हे एक क्राॅस प्लॅटफाॅर्म टुल असुन Android, iOS व Windows Mobile साठी उपलब्ध आहे http://www.rightware.com/consumer/basemark-os-ii/ हे अॅप. प्ले स्टोर, अॅप स्टोर व विंडोज मार्केट प्लेस वर उपलब्ध आहे या फ्रि व्हर्जन मधे overall performance, system performance, memory performance, graphic performance, व camera performance या टेस्ट घेता येतात. तर हे भन्नाट app आपल्या मोबाईल मधे डाऊनलोड करा व टेस्ट रिझल्ट्स मिपा वर शेअर करा , मोबाईल,टॅब चे  माॅडेल सांगायला विसरु नका :-) टेस्ट कंप्लिट व्हायला 5 मिनीट तरि लागतात..पेशंन्स ठेवा. मी सध्या micromax चा canvas 2 वापरतोय त्याचे रिपोर्ट कार्ड.....  :_(  1 3 अजुनही काहि वेगळे साॅफ्टवेअर माहित असल्यास नक्कि सांगा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
मत
शिफारस
माहिती
संदर्भ
प्रश्नोत्तरे
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10956 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

छान

llपुण्याचे पेशवेll
Wed, 01/22/2014 - 11:02 नवीन
नवीन माहीतीबद्द्ल धन्यवाद. असे काही टूल अस्तित्वात असेल असे वाटले नव्हते. परंतु मोबाईल घेताना असे टूल वापरून त्या मोबाईलची कार्यप्रवणता माहीती करणे अवघड वाटते. त्यासाठी हे टूल वापरून त्याचा विदा स्वतःहून पुरवणार्‍या प्रत्यक्ष वापरकर्त्यांच्या औदार्यावर अवलंबून राहावे लागणार हे ओघाने आलेच. परंतु ज्या वस्तू सध्या आपण वापरतो त्याची पडताळणी या टूल द्वारा नक्की करता येईल. धन्यवाद जोशी.
  • Log in or register to post comments

छान लेख....

मुक्त विहारि
Wed, 01/22/2014 - 11:14 नवीन
माझ्या द्रुष्टीने, मोबाईलचा उपयोग हा ऐन वेळी संभाषण करायला म्हणून योग्य. फोन घेणे आणि फोन करणे, इतपतच मी मोबाईलचा उपयोग करतो. आणि त्या साठी नोकिया १११० योग्य आहे. आणि तसेही फेसबूक किंवा इंटरनेट वरील वाचनासाठी पी.सी. किंवा लॅपटॉप जवळ असतोच. त्यामुळे स्मार्ट फोनचा नक्की उपयोग काय? हेच अद्याप समजले नाही. जाणकारांच्या प्रतिसांदाच्या अपेक्षेत. (स्पा आणि नानबा यांनी ह्या वर प्रकाश टाकला तर बरे.)
  • Log in or register to post comments

माझ्या द्रुष्टीने, मोबाईलचा

धन्या
गुरुवार, 01/23/2014 - 10:42 नवीन
माझ्या द्रुष्टीने, मोबाईलचा उपयोग हा ऐन वेळी संभाषण करायला म्हणून योग्य. फोन घेणे आणि फोन करणे, इतपतच मी मोबाईलचा उपयोग करतो.
+१ मी दैनंदीन वापरासाठी अगदी बेसिक फोन वापरतो. काळीमिरीचा वापर एमपीथ्री प्लेयर म्हणून करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वो मालक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/23/2014 - 13:13 नवीन
स्मार्ट फोन च्या काळात धन्यासेठ फोनचा वापर ऐकने आणि बोलणे करतात हे वाचून धक्का बसला आहे, निषेध म्हणून मी आज रात्रीचं जेवण घेणार नाही. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कळले नाही

अनिरुद्ध प
गुरुवार, 01/23/2014 - 13:18 नवीन
काळीमिरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आमच्या हरामखोर मित्रांनी

धन्या
गुरुवार, 01/23/2014 - 14:22 नवीन
आमच्या हरामखोर मित्रांनी आमच्या ब्लॅकबेरीचा लिलाव करताना वापरलेलं नाव आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

काळीमिरीपेक्षा काळंबेरं हे

बॅटमॅन
गुरुवार, 01/23/2014 - 17:01 नवीन
काळीमिरीपेक्षा काळंबेरं हे जास्त योग्य नाव आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

Karbonn K12+

टवाळ कार्टा
Wed, 01/22/2014 - 15:26 नवीन
Karbonn K12+ Overall = 121 System = 547 Memory = 84 Graphics = 85 Web = 55 किंमत रु.४९९९/- (on Flipcart.com) :)
  • Log in or register to post comments

फ्लिप्कार्टवर सगळ्या फोन्स चे

कवितानागेश
Wed, 01/22/2014 - 16:48 नवीन
फ्लिप्कार्टवर सगळ्या फोन्स चे व्यवस्थित रिव्ह्यू आहेत. ते बघा. आमच्याकडे sony xperia M आहे. चांगला आहे.
  • Log in or register to post comments

फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडिल

जोशी 'ले'
Wed, 01/22/2014 - 20:32 नवीन
फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडिल सारख्या साइट्स वर रिव्ह्युज नसतात तर स्पेसिफिकेशन्स असतात जे कंपनीने डिक्लियर केलेत तेच... तसं तर माझ्या Micromax A110 चा कॅमेरा चांगल आssठ मेगापिक्सल चा आहे :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

त्याच स्पेसिफिकेशन्स्च्या

कवितानागेश
गुरुवार, 01/23/2014 - 00:40 नवीन
त्याच स्पेसिफिकेशन्स्च्या खाली रिव्ह्यूज असतात. तो फोन मागवून वापरणाया लोकांनी लिहिलेले. बरे वाईट सगळे. शिवाय गेमिन्ग्वाल्या लोकांनी शिव्या घातलेल्यापण वाचायला मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

सहमत आहे, अत्ता पण तेच

जोशी 'ले'
गुरुवार, 01/23/2014 - 08:16 नवीन
सहमत आहे, अत्ता पण तेच रिव्ह्यूज वाचुन मत बनवायला लागते, पण हे टुल वापरुन बघायला काय हरकत आहे?...जसे माझ्या हापिसातल्या एकाचा sony zr चा ओव्हराॅल परफाॅरमन्स 1024 आहे तर celcone च्या एका स्वस्त 7000 रु. च्या 5 " स्क्रिन वाल्या फोनचा 190 आहे तर माझ्या फोनचा 96 :_( तुमच्या फोन चा नक्कि 400+ असनार :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हे रिव्ह्यूज निर्णय घेताना

धन्या
गुरुवार, 01/23/2014 - 10:47 नवीन
हे रिव्ह्यूज निर्णय घेताना मदत करण्याच्या ऐवजी अधिक गोंधळात टाकतात. लोक अशी उलट सुलट मतं मांडतात की आपल्याला "मैं कहा हूं" म्हणायची वेळ येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

उदाहरनार्थ इथेhttp://www

कवितानागेश
गुरुवार, 01/23/2014 - 00:47 नवीन
उदाहरनार्थ इथे http://www.flipkart.com/sony-xperia-e/product-reviews/ITMDGZK3GNH2TUWE?pid=MOBDGZKF3SHCAXXH
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

मदत हवी आहे.

जादू
Wed, 01/22/2014 - 17:43 नवीन
काही काळापुर्वी मि.पा वर मोबाईल अप्स विषयी माहीती आली होती, त्याची लिंक मिळू शकेल का?
  • Log in or register to post comments

http://misalpav.com/node

टवाळ कार्टा
Wed, 01/22/2014 - 18:38 नवीन
http://misalpav.com/node/23241
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जादू

जर तुम्हाला अ‍ॅन्ड्रॉईड अप्स

भाते
Wed, 01/22/2014 - 18:34 नवीन
जर तुम्हाला अ‍ॅन्ड्रॉईड अप्स विषयी माहिती हवी असेल तर ती इथे मिळु शकेल.
  • Log in or register to post comments

Quadrant, Antutu, 3D Mark ही

नांदेडीअन
Wed, 01/22/2014 - 20:14 नवीन
Quadrant, Antutu, 3D Mark ही अजून काही उदाहरणं Benchmarking apps ची.
  • Log in or register to post comments

technosavy लोकांसाठी http:/

वात्रट मेले
गुरुवार, 01/23/2014 - 06:22 नवीन
technosavy लोकांसाठी http://www.thinkdigit.com/ ही चांगली website आहे. सर्व नविन mobiles and gadgets ची चांगली माहिती मिळ्ते.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/23/2014 - 10:38 नवीन
आवडी चा विषय. अप्लिकेशन टाकतो -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काय रिझल्ट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/23/2014 - 15:35 नवीन
दाखवेना...! अप्लिकेशन चालना. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चाल्ते की

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/23/2014 - 15:45 नवीन
चाल्ते की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नै ना राव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/23/2014 - 16:57 नवीन
रिझल्ट म्हटल्यावर स्क्यान केल्यासारखं दहा मिनिताच्या पुढे दोनदा वाट पाहिली पण माझ्या मोबाईलची ताशीर त्याला काही समजेना :( एक तर 44 MB साठी 3G नेटावरून डाऊनलोडासाठी लै वेळ लागला, ब्याट्री उतरून गेली, पैसे कपात झाले ते वेगलेच. रागारागाने अप्लिकेशन अनइंस्टाल केले :( आता वायफायवरुन चान्स घेऊन पाहतो. -दिलीप बिरुटे (लै लवकर राग येणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

थोडा पेशन्स ठेवा थोडा वेळ

जोशी 'ले'
गुरुवार, 01/23/2014 - 21:05 नवीन
थोडा पेशन्स ठेवा :-) थोडा वेळ लागतोच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्माटफोन हे वापरणाऱ्यांना

कंजूस
गुरुवार, 01/23/2014 - 19:57 नवीन
स्माटफोन हे वापरणाऱ्यांना उल्लु बनवतात आणि अॅप्सकंपन्या ,फोनकंपन्यांना सतत श्रीमंत बनवतात असे माझे स्पष्ट मत आहे . स्मार्टचा जनक जॉब्स याला त्याच्या 'आयट्युन्स' या म्युझिक कंपन्यांना त्यांचे हक्काचे पैसे ( ३ पैकी २ डॉलर आयफोनला आणि १डॉलर आर्टिस्टला मिळवून दिले या कलपनेला श्रेय देतात . (बाकी आहे .)
  • Log in or register to post comments

स्माटफोनची तुलना

कंजूस
Sat, 01/25/2014 - 19:25 नवीन
स्माटफोनची तुलना त्याच्यातल्या प्रसेसरने होते .मिडिआटेक /क्वॉलकॉम/इंटेल आणि त्याचा नंबर . फोनची कंपनी मोठी आहे पण जर त्यांनी मिडिआटेक ड्यूल /क्वॉडकॉर प्रसेसर वापरला असेल तर त्याची तुलना क्वॉलकॉम असणाऱ्या मॉडेलशी करता येणार नाही .त्याचे अंटुटु बेंचमाक पाहू नका . काही मॉडेलचे परीक्षण "Gogi dot in "पाहा .
  • Log in or register to post comments

बाब्बौ!

पैसा
Tue, 01/28/2014 - 22:13 नवीन
४५ एम्बी चं अ‍ॅप्लिकेशन फोन मेमरीत टाकण्याऐवजी http://www.91mobiles.com/ असल्या एखाद्या साईटवर पण स्कोअर बघता येतो की!
  • Log in or register to post comments

या अॅप चा वापर समजुन घ्या, या

जोशी 'ले'
Tue, 01/28/2014 - 22:40 नवीन
या अॅप चा वापर समजुन घ्या, या अॅप द्वारे तुम्हि स्व:त मोबाईल चा performance audit करु शकतात, तो जर ईथे शेअर केला तर मिपाकरांना फायदाच होईल...मी स्वत: जे बघीतलेय त्यात जवळपास एकाच सेगमेंट मधले व स्पेक्स मधल्या मोबाईल ची तुलना केल्यास मायक्रोमॅक्स पेक्षा कार्बन व कार्बन पेक्षा सेलकाॅन चे रिझल्ट्स चांगलेय :-) तर सॅमसंग पेक्षा सोनी चे रिझल्ट्स चांगलेय.. बर्याच साईट्स वरचे रिव्ह्युज पेड असतात व बर्याच कंपन्या फेकु असतात जसं आता सगळेच जवळपास 8 mp कॅम देतात (छापायला काय जाते) पण आहे का तो 8mp त्या पेक्षा तर नोकिया चा 3.15 Mp बरा.. तर जरा बघा आपल्या मोबाईल चा स्कोर व शेअर करा , होऊ दे 44 Mb खर्च ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपल्या मोबाईलचे परफॉमन्स

कंजूस
Wed, 01/29/2014 - 08:14 नवीन
आपल्या मोबाईलचे परफॉमन्स पाहायला ४४ एमबि चे एप कशाला ! बरोबर . डब्बा फोन आणि कैमरा आहे हा रिझल्ट आला तर काय टाकणार आहे का ? पैसेंजर गाडीत बसून पोहोचायला किती वेळ लागतो पाहाण्यासाठी स्टॉपवॉच कशाला हवे ? सध्या दहा हजारात साठी १)नोकिआ लुमिआ ५२०/५२५ २) सैमसंग डयुओस २ ७५८२ ३)जोलो क्यु ८०० आणि थोडे महाग १)मोटो जी २)सोनी इक्स्पेरिआ एम ३)मायक्रोमैक्स टर्बो विचार करण्यासारखे आहेत .
  • Log in or register to post comments

Xolo Q800 पेक्षा Q700 चांगला

नांदेडीअन
Wed, 01/29/2014 - 10:43 नवीन
Xolo Q800 पेक्षा Q700 चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हे हे हे...

जोशी 'ले'
Wed, 01/29/2014 - 09:32 नवीन
विषय कल्लाच नाय काय ...बोला टाकायचा नाय कै ,पुढच्यास ठेच मागचा शहाणा या प्रमाणे मदत करा
  • Log in or register to post comments

अन् 19-20 हजार टाकायचेत

जोशी 'ले'
Wed, 01/29/2014 - 09:36 नवीन
अन् 19-20 हजार टाकायचेत मायक्रोमॅक्स नावाची कंपनी आहे हे विसरुन जा .
  • Log in or register to post comments

मला असं म्हणायचं आहे की आपलं

कंजूस
Wed, 01/29/2014 - 10:22 नवीन
मला असं म्हणायचं आहे की आपलं एक बजेट असतं .दुकानदार त्या रेंजमधले सर्व चालू फोन दाखवतो . एकात हे आहे आणि ते नाही असा प्रकार आहे . तरीही आपण घेतोच . कोणती गोष्ट नाही म्हणून अडणार आहे का नाही याचा विचार करायचा .
  • Log in or register to post comments

माफ करा मला वाटतं कि धागा

जोशी 'ले'
Wed, 01/29/2014 - 10:32 नवीन
माफ करा मला वाटतं कि धागा विषय व उद्देश पोहचवण्यास कमी पडलो :_(
  • Log in or register to post comments

मेमरीचा प्रॉब्लेम येतो हो!

पैसा
Wed, 01/29/2014 - 10:57 नवीन
माझ्याकडे एक जुना सॅमसुंग गॅलेक्सी वाय फोन आहे. त्यात तर एवढी फ्री शिल्लक मेमरीच नाहीये! दुसरा कार्बन ए१५ आहे. त्यात मेमरीचा प्रॉब्लेम नाही पण माझा अनुभव असा की एक अ‍ॅप इन्स्टॉल आणि अन इन्स्टॉल केलं की थोडीशी मेमरी कमीच होते. या अ‍ॅप्सचे काही रेसिड्यूज शिल्लक रहात असावेत. ती परत मिळवता येते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

App Cache Cleaner वापरा.

नांदेडीअन
Wed, 01/29/2014 - 11:14 नवीन
App Cache Cleaner वापरा. जर असे 3rd party app वापरायचे नसेल तर कोणतेही App uninstall करण्याआधी App Manager मधून ते App थांबवा, स्टॉप करा आणि मग त्याचा Data & Cache उडवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

माझा अनुभव असा की एक अ‍ॅप

मदनबाण
गुरुवार, 01/30/2014 - 15:10 नवीन
माझा अनुभव असा की एक अ‍ॅप इन्स्टॉल आणि अन इन्स्टॉल केलं की थोडीशी मेमरी कमीच होते. या अ‍ॅप्सचे काही रेसिड्यूज शिल्लक रहात असावेत. ती परत मिळवता येते का? पै तै... या ठिकाणी दिलेले Clean Master (Cleaner) - FREE वापरुन पहा. अ‍ॅप अनइस्टॉल करताना रेसिड्यूज डिलीट मारायचे का ? हा पर्याय यात आहे. जर तुझ्या फोन मधे बोल्टवेअर असतील तर ते जागा खातात्,त्यांना काढण्यासाठी रुट अ‍ॅक्सेस हाच एक पर्याय आहे. जाता जाता :- जर तुमचा फोन नेटला कनेक्टेड असेल तर गुगल तुमच्या फोन मधले त्यांना हवे ते अ‍ॅप अनइनस्टॉल करु शकते हे तुम्हाला ठावुक आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओक्के

पैसा
Fri, 01/31/2014 - 20:07 नवीन
म्हणजे फोन रूट करणे आवश्यक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

धागा पुन्हा वाचला .ठिक आहे

कंजूस
Wed, 01/29/2014 - 12:04 नवीन
धागा पुन्हा वाचला .ठिक आहे .अमुक एक अॅप सांगेल परफॉरमन्स .ते प्रत्येकाने आपल्या मॉडेलचे द्यायचे आहे . मी एवढेच म्हणेन की रोज नवीन मॉडेल्स बाजारात येतात ते घेण्याअगोदर याचे सर्व बेंचमार्कस त्याच दिवशी काही वेबसाईटवर येतात ते पाहू शकता .आणि तुमच्याकडच्या मॉडेल्सचेही डेटा आहेतच . ते वाचून आपण ठरवायचे कमीतकमी वाईट कोणता आहे . कोणत्याही मॉडेलचे वाईट गोष्टी सांगणाऱ्या (चांगला रिव्यु)वेबसाईटही आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

ओके

जोशी 'ले'
Wed, 01/29/2014 - 12:06 नवीन
ओके
  • Log in or register to post comments

पन्नासच्या वर डिवाईसचे डेटा

कंजूस
Wed, 01/29/2014 - 18:23 नवीन
पन्नासच्या वर डिवाईसचे डेटा रिव्युसह येथे (१)http://www.gogi.in/tag/video-review/ आहेत .
  • Log in or register to post comments

तुम्हाला खरच कळलं नाहिये का

जोशी 'ले'
Wed, 01/29/2014 - 20:35 नवीन
तुम्हाला खरच कळलं नाहिये का मला काय म्हणायचेय ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नाही . जाऊ द्या .

कंजूस
Wed, 01/29/2014 - 20:59 नवीन
नाही . जाऊ द्या .
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण धागा

स्पा
गुरुवार, 01/30/2014 - 14:22 नवीन
माहितीपूर्ण धागा :)
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण धागा... इतकेच म्हणून कसे काय चालेल...

मुक्त विहारि
Fri, 01/31/2014 - 20:22 नवीन
काही तरी प्रकाश टाका की राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा