Skip to main content

काही वेगळे चित्रपट....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 31/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मला चित्रपट परीक्षण किंवा पुस्तक परीक्षण जमत नाही, त्यामुळे तुम्ही चित्रपटाविषयी काही वाचायला ह्या धाग्यावर आला असाल तर, मी प्रथमतः माफी मागतो. गेली कित्येक वर्षे मी फक्त मराठी नाटके आणि इंग्रजी सिनेमे बघतो. गेल्या काही महिन्यांतील मला आवडलेले सिनेमे लिहीत आहे. १. रन लोला रन => एकाच तिकीटात ३ सिनेमे २. इन्सेपशन ==> निव्वळ खतरनाक "लिओनार्डो डिकाप्रिओ"च्या प्रेमात पडला नसाल तर नक्की बघा. ३. व्हँटेज पॉइंट ==> पैसा वसूल , थ्रिलर पटच पण वेगळ्या पद्धतीने घेतलेला. ४. मिलियन डॉलर बेबी ===> क्लिंट इस्ट्वूड आणी हिलरी स्वांक अधिक मॉर्गन फ्रीमॅन,,, अजुन काय पाहिजे? ५. क्लायंट ==> मूळ कथा , जॉन ग्रिशॅमची वाचली असल्यास, चित्रपट बघीतला नाही तरी चालेल. मी बघीतला तो, टॉमी ली जोन्स आणि सुसान साठी, दोघांनी पण निराशा केली नाही. ६. शटर आयलंड ===> एक मस्त सिनेमा , आपलेच लिओनार्डो डिकाप्रिओ आणि बेन किंग्स्ले. ७. कॅच मी इफ यु कॅन ===> परत एकदा आपलाच "लिओनार्डो डिकाप्रिओ" आणि जोडीला "टॉम हँक्स" अज्जून काय पाहिजे? ८. द टर्मिनल ====> "टॉम हँक्स" आणि फक्त "टॉम हँक्स" ९. सेव्हिंग प्राव्हेट रायन ===> "टॉम हँक्स" आणि "मॅट डॅमन" १०. द टुरिस्ट ====> जॉनी डेप (हा.. तोच तो पायरेट ऑफ द कॅरेबियन वाला) ११. जॅक रीचर ===> (मूळ पुस्तक : वन शॉट, लेखक : ली चाइल्ड...वाचले असेल तर, सिनेमा अजिबात बघू नका. बॉलीवूडने केलेली दुनियादारी आहे ही) त्यातून बघायचाच असेल तर टोम क्रुझ साठी नक्की बघा. मिशन इंपॉसिबलपेक्षा वेगळी अ‍ॅक्टिंग बघायला मिळेल. आता टॉम क्रुझचा विषय निघालाच आहे तर... १२. अ फ्यु गूड मॅन ==> "टॉम क्रुझ" अधिक "जॅक निक्लसन" एक सुंदर कथानक आणि तितकाच जबरा अभिनय. १३. अलाँग केम अ स्पायडर ===> मोनिका पॉटर आणि मॉर्गन फ्रीमॅन , नो कॉमेंट्स.... जस्ट वॉच.. १४. वाँटेड ===> रजनीकांतचा बाप ... डोके बाजूला ठेवून बघा .... आणि १५. द डिपार्टेड ====> जॅक निक्लसन, लिओनार्डो डिकाप्रिओ + मॅट डॅमन =============================================== वरील सिनेमात,मॅट्रिक्स,, ओशन्स , ट्रान्सपोर्टर इ. सिरीजचा उल्लेख जाणुन बूजून टाळला आहे....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38088
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

In reply to by आदूबाळ

द टर्मिनल बघाच. उगाच नाही, फॉरेस्ट गंप साठी टॉम हँक्सला ऑस्कर मिळाले...असे माझे मत आहे...

In reply to by आदूबाळ

ह्या सिनेमाने माझे डोळे उघडले. सैन्य, लढाई वगैरे गोष्टींच्या रोमँटिक कल्पना मनात बाळगल्या होत्या. देशभक्ती, देशाकरता शीर तळहातावर घेऊन लढणे वगैरे वगैरे. सदैव सैनिका पुढेच जायचे, अब तुम्हारे हवाले वतन साथियो वगैरे छापाची गाणी, त्याच साच्यातले सिनेमे, कादंबर्‍या वगैरे. पण ह्या सिनेमात युद्ध, लढाई हा प्रकार प्रत्यक्षात किती क्रूर, निर्दयी, तर्कदुष्ट व डोकेफिरू असतो हे (मला) प्रथम बघायला मिळाले. स्वयंचलित बंदुका, तोफा वगैरेच्या जमान्यात शौर्य नि धैर्य वगैरेपेक्षा नशीब कितीतरी वरचढ असते हे दिसले. सूडाची भावना, सततची असुरक्षितता ह्यामुळे माणसाचा पशु बनून कसे निर्दयपणे अगदी नि:शस्त्र सैनिकांना गोळ्या घातल्या जातात ते दिसले. कित्येकदा शत्रू सैनिकाला निव्वळ तो काय बोलतो आहे ते कळत नसल्यामुळे मारले जाते. कित्येक सैनिक लढाई सुरू व्हायच्या आधीच कुठून तरी गोळी येऊन मारले जातात. सगळे कसे अनिश्चित आणि घातक. माणसाचे माणूसपण घालवणारे युद्ध. श्पीलबर्गचे दिग्दर्शन आणि दिग्गज मंडळींचे अभिनय ह्यामुळे हा सिनेमा अगदी अस्सल वाटतो. पण सिनेमा आनंददायक वगैरे आजिबात नाही निव्वळ युद्धातील एका मोहिमेचा जिवंत अनुभव.

In reply to by हुप्प्या

अशीच एक "ऑल क्वायट ऑन द वेस्टर्न फ्रंट" नावाची कादंबरी आहे. ती वाचून झाल्यावर पोटात पडलेला खड्डा अजून आठवतो.

या मधले काही पाहिले आहेत आणि काही पहायचे आहेत. हॉरर मध्ये मला आवडलेला म्हणजे - निकोल किड्मन चा 'द अदर्स'. कुठेही जास्तीचा भडकपणा नाही,आणी शेवटी कथानकाला मिळणारी कलाटणी.

In reply to by पराग पाटील

निकोलचा माझे आवडता सिनेमा म्हणजे. बेविच्ड...(ते नाक हलावायचा सीन छान घेतला आहे तिने.हा सिनेमा मी विसरूनच गेलो होतो.परत एकदा बघतो.)

In reply to by खटपट्या

तुम्हाला कुठला आणि कुठल्या भाषेतील हवा ते सांगा. वरील सगळे हिंदी + इंग्रजी संवादासकट आहेत. शिवाय काही इंग्रजी सब टायटल सकट पण आहेत.

कास्ट अवे - टॉम हँक्स. एक अप्रतिम चित्रपट.आवर्जुन बघण्याजोगा.

In reply to by शेखर

टॉम हँक्स त्या सिनेमाला खरा न्याय दिला तो टॉम हँक्सनेच... तुमच्या सारखे रसिकच असे सिनेमे बघू शकतात.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

कास्ट अवे फारच सुंदर. टर्मिनल, फॉरेस्ट गम्प यापेक्षा जास्त आवडला. बाकी यात तुम्ही क्लासिक्स नाही घेतले. साउंड ऑफ म्युझिक, माय फेअर लेडी, झोर्बा द ग्रीक,रोमन हॉलिडेज, गॉन विथ द विंड हे माझे ऑल टाइम फेवरिट ! कदाचित हे 'वेगळ्या' सिनेमांमध्ये मोडत नसतील. तरीही शेअर करण्याचा मोह आवरला नाही.

खालील काही चित्रपट पहिले नसतील तर नक्की पहा! परस्युट ऑफ ह्याप्पिनेस, द चिल्ड्रेन ऑफ हेवन, क्रिस्तोफर नोलानचा द प्रेस्टीज, अगदी जुन्या कृष्णधवल मध्ये "१२ अंग्री मेन(१२ angry men, हे अर्धचंद्र कसा द्यायचा ते जरा कोण सांगंल तर बरं होईल बगा)" आणि त्याचा हिंदी रिमेक "एक रुका हुआ फैसला", कॉमेडी कुणाला आवडत असेल तर "माँटी पायथॉन and द होली ग्रेल", द animal. मराठी मधले - नितळ, वास्तुपुरुष, सावर रे, आनंदाचे झाड, नाटकांमध्ये - ब्यारीस्टर, आप्पा आणि बाप्पा, सूर्याची पिल्ले, ती फुलराणी, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, सौजन्याची ऐशी तैशी, अशी पाखरे येती, सुर्य न पाहिलेला माणूस इ. नक्की पाहण्यासारखे आहेत.

In reply to by अर्धवटराव

थॅन्क यु!(लगेच उपयोग करून पाहिला Smile आता बिनधास्त टॅण्व टॅण्व करता येइल). धन्यवाद!

थॅन्क यु!(लगेच उपयोग करून पाहिला :) आता बिनधास्त टॅण्व टॅण्व करता येइल). धन्यवाद!

एक माजिद मजीदीचा सेनेमा पहिला, (तोच तो चिल्ड्रन ऑफ हेवान वला इराणी दीर्गदर्शक ) सॉँग ऑफ दी स्परोव्स , आवडला , तसाच एक दि बॅण्ड्स विज़िट सिनेमा पण छान होता. 1 2 3

ओशेन एलेवन सिरीज , यातला पहिला लयभारी आणी तिसरा मस्त . सेंविग प्रायव्हेट रायन , फ्यु गुड मॅन , स्कायफॉल ,कॉमेडी डिक्टेटर , यादी बरीच लांब आहे .

In reply to by जेपी

ओशन इलेव्हन मध्ये ज्या पद्धतीने शेवटी ते SWAT च्या बुरख्याआड सगळे लुटारू अड्ड्यावरून पळतात तसा आमीर पळतो असे मला सिनेमा पाहताना वाटले @मूवी सगळे सिनेमा मला हवेत.

In reply to by खटपट्या

मीच या पिच्चरचं नाव टाकणार होतो.. पण तुम्ही टाकलेलं बघून आणंद जाहला.. आयुष्यात न विसरता येणारी कलाकृती.. बादवे यातले कलाकार आंजावर शोधण्याचा लयी प्रयत्न केला पण काही माहिती मिळू शकली नाही..

In reply to by ह भ प

सुंदर चित्रपट. 'आयॅम जॅग्वार पॉ. धिस इज माय फॉरेस्ट' मायन संस्कृतीच्या आसपासचा काळ, दोन टोळ्यांमधला सनातन जेता नि जीत ह्यांची लढाई, एक माणूस दुसर्‍याला गुलाम बनवताना वाटणारी चीड, अंधश्रद्धा, स्वतःसाठी नि त्यापेक्षा कुटुंबासाठी जिवंत राहण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, विजिगिषु वृत्ती नि त्या बळावर केलेलं अचाट वाटणारं धाडस. डायरेक्टर मेल गिब्सन वेडा आहे राव!

आवडीचा विषय काढलात मुक्तविहारी! तुमच्या लिस्टितले, टर्मिनल, सेविंग प्रायव्हेट रायन, डिपार्टेड बघितलेत. पुढे प्रतिसादातले फॉरेस्ट गम्प, कास्टअवे, पर्सुट ऑफ हॅप्पिनेस्स, ओशन्स इलेवन बघितलेत. एक से एक पिक्चर आहेत. हॉलिवुड मधे सर्वसाधारणपणे पिक्चर ला काहीतरी छान टेकअवे मटेरियल असतं. कुठून बघितला, असं होत नाही सहसा. माझं मत; त्यामुळे मला हॉलिवुड पुज्चर बघायलाच जास्त आवडतात. माझ्या लिस्ट मधले काही फेवरेट चित्रपट असे: १. द डार्क नाइट - काहीच बोलू शकत नाही... हीथ लेजर....नोलान.... २. क्रॅश - ऑस्कर विनर आहे, बरीच स्टारकास्ट आहे, एका कार क्रॅश च्या प्लॉट वर आधारित, आपण एखाद्या कम्युनिटीबद्दल जी प्रीऑक्युपाइड माइंड्स - पूर्वग्रहदूषित मनं घेऊन जगतो, त्यामुळे काय होतं हे सुंदर मांडलेलं आहे. ३ - डंब अँड डंबर - हा कॉमेडी मधला माझा फेवरेट. नन अदर दॅन जिम कॅरी. त्याची हॉट्शॉट सिरीजही मस्त आहे लिस्ट बरीच आहे...... बरीच.... टॉम हँक्स बाकी अफाट माणूस आहे बरं का. जाम आवडतो. कॅप्रियो इत्त्तका नाही पण ही इज गुड, नो डाउट. येउद्यात नावं. मलाही काही आठवले की सांगतो.

In reply to by वेल्लाभट

टॉम हँक्स बाकी अफाट माणूस आहे बरं का. >> फुल टू सहमत. मी त्याचे अगदी फिलाडेल्फिया पासून ते एंजल अ‍ॅन्ड डेमोनस पर्यंत सगळे पिक्चर बघत आलोय. पोलर एक्स्प्रेस हा अ‍ॅनिमेटेड पिच्चर मध्ये पण त्याचे कॅरेक्टर आणि आवाज फारच उच्च होते. बरी आठवण झाली. परत रतीब घातले पाहिजेत.

माझ्या स्ट्रगल च्या दिवसांत विक्टर नोवोर्स्की फार जवळचा मित्र होता!!! क्रॅकोझिया ला स्वातंत्र्य मिळते त्या सीन ला तर मी पहिल्या वेळी पाहताना रडलो होतो खुप

१९६२ च्या सुमारास "टाँम थम्ब" या चित्रपटापासून इंग्रजी सिनेमाचे वेड लागले. आजतागायत सुमारे २५०० इंग्रजी सिनेमे तरी पाहिले असतील. मनोरंजक पणा हाच निकष ठेवून मी सिनेमे पहातो. पण म्हणजे मनमोहन देसाई या टाईपचे इंग्रजी सिनेमे पहातो असे नाही. ज्या चित्रपटात कथा, अभिनय, संवाद,पटकथा व स्ंकलन हे एकमेकांशी इमानदार असतात असा कोणत्याही प्रकारचा सिनेमा म्हणजे उत्तम सिनेमा. क्लार्क गेबलच्या " गॉन विथ द विंड" पासून ही यादी चालू होते. विल्यम वायलर, डेव्हीड लीन, रोनाल्ड नीम, इरविन अ‍ॅलन,स्टीव्हन स्टीव्हन स्पील्बर्ग , कॅमेरॉन, कोपोला, जे ली थॉम्प्सन ई अनेक दिगदर्शकांचा मी त्यासाठी ॠणी आहे.

In reply to by चौकटराजा

आपण पाहिलेल्या २५०० चित्रपटापैकी सर्वोत्तम २०० चित्रपटाची यादी दिली तर इतर रसिकांना एक उत्तम सदंर्भाचा स्त्रोत मिळेल. सूचनेचा विचार व्हावा.

In reply to by कलंत्री

वर मुविनी म्हटलेला मुव्ही - व्हान्टेज पॉईंट, निक ऑफ टाईम टेकन, हाउस ऑफ नाईन, गन्स ऑफ नॅवरोन मॅकेन्नाज गोल्ड पसायडन अ‍ॅडवेंचर ओ माय गॉड द गिफ्ट ब्लेम इट ऑन रिओ इटालिअन जॉब ....दोन्ही सम ऑफ ऑल फिअर कसान्ड्रा क्रॉसिंग, फिअर इज द की पॅरिस आय लव यू टारझन दि एप मॅन गॉडफादर फ्रेंच कनेक्शन बेन हर टेन कमाडमेटस, हॉलो मॅन रेडर्स ऑफ लॉस्ट आर्क रेस विथ द डेव्हील फेडोरा अदर साईड ऑफ मिडनाईट ब्लडलाईन .....................आणि अनेक..

नोलानचे इन्सोन्मिया, द प्रेस्टिज ह्युज जॅकमनचा रिअल स्टील पण सुखद धक्का देऊन गेला.

श्वेतधवल आणि उत्तम सिनेमा त्या काळातल्या रिटायर्ड अभिनेत्रीची मानसिक अवस्था आणि तिला सांभाळून घेणारा तिचा नवरा हे एक सुंदर कथानक आहे. आपल्या राजेश खन्ना ह्यांना तसे सांभाळून घेणारे कुणी मिळाले का ? देव जाणे

इंग्रजी चित्रपटातील इंग्रजी उच्चार कळत नसतील आणि उपशिर्षकाचीही सुविधा उपलब्ध नसेल अशा वेळी इंग्रजी चित्रपटातील इंग्रजी उच्चार काय करावे यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.

ओशन इलेव्हन जुना पाहा एकदा. फ्रॅंक सिनात्रा, डीन मार्टीन आणि त्यांचा ’रॅट पॅक’! त्यातही शर्ले मॅक्लेनचा गेस्ट अ‍ॅपिरियन्स आणि रॅट पॅक चे ’इ-ओ-इलेव्हन’ अप्रतिम. जाता जाता- डीन मार्टीन बराच अन्डर रेटेड अ‍ॅक्टर... त्याचे किस मी स्टुपिड , द कॅडी ( जेरी लुईस आणि डीन धमाल आणतात आणि त्यातच दॅटस्‌ अमोरे...) , द यंग लायन्स, फाईव्ह कार्ड स्टड, रिओ ब्राव्हो पाहण्यासारखे...

In reply to by अजिंक्य विश्वास

खरे तर मी "डीन मार्टीनचा" मी एकच सिनेमा बघीतला... द सायलेन्सर... नावाचा.आपल्या जेम्स बाँडचे विडंबन. डोके बाजूला ठेवा आणि सायलेन्सर बघा.

WAIT UNTILL DARK हा सिनेमा पाहताना संपूर्ण थेटर मधून एकाच वेळी धरून ठेवलेला श्वास सोडण्यचा आवाज आज हि आठवतो

In reply to by देशपांडे विनायक

जेमतेम ६च कलाकार आणि ७वा टेलिफोन. ऑड्री हेपबर्न चा आणि फक्त तिचाच सिनेमा.... बाकी रोमन हॉलीडे आणि माय फेयर लेडी मध्ये पण तिने सुंदर काम केले... पण का कुणास ठावूक ऑड्री हेपबर्न म्हटले की "वेट अंटिल डार्कच" आठवतो. बादवे. चोरी चोरी ची गाणी आणि रोमन हॉलीडे मधली स्टार कास्ट हे काँबिनशन हवे होते. राज कपूर कुठल्याच अँगलने ग्रेगरी पेकची ग्रेस आणू शकत नाही. आपला देव आनंद थोड्या फार प्रमाणात, ग्रेगरी पेकची ग्रेस आणू शकला. पण ग्रेगरी पेक तो ग्रेगरी पेकच.

In reply to by मुक्त विहारि

ग्रेगरीपेक तो ग्रेगरी पेक. रोमन हॉलिडे च्या बरोबर त्याचा गन्स ऑव्ह नॅवरोन सुद्धा तितकाच आवडला होता. एक वेगळा चित्रपट म्हणून आठवतो तो फ्रान्सिस फोर्ड कोपोलाचा अ‍ॅपॉकलीप्स नाउ. विएत्नाम युद्धाच्या पार्श्वभूमीवरच्या या चित्रपटात मार्नन ब्रँडोच्या बरोबरीने मार्टिन शीन सुद्धा लक्षात रहातो.

द गुड, बॅड & अग्ली, ट्रेनस्पॉटिंग, कासब्लांका, वाइल्ड हॉग्स ई. अजुन भरपुर आहेत. नावे आठवत नाहीयेत आता. :)

In reply to by जेपी

कारण नैप्सस्टर हे पायरसी हैकर कल्चर अन जालीय स्वातंत्र्याचे परिणामी मुक्तीचे सिम्बोल झाले होते अन नुकतच त्यावर न्यायालयाने उसगावात बंदी आली होती.

नवा The italian job म्हणजे बॉलीवूड चा players ka? :)

टॉम हैन्क्स तर माझा सर्वात आवडता actor आहे आणि The Terminal तर मी आठवड्यातून एकदा तरी पहातेच. पटकन आठवलेला अजून एक अप्रतिम सिनेमा म्हणजे Hachi : A Dog's Tale अर्थात पाहताना रुमाल विसरू नका. डोळ्यातून पाणी कधी आले तेच कळणार नाही. अती सुंदर सिनेमा

महान इंग्रजी चित्रपट महानच असतात अशा भक्तिभावाने मी ते कधीच पाहत नाही. आणि स्पिलबर्गचा चित्रपट देखिल. mathematical certainty म्हटले कि मनात किती वैज्ञानिक हे लोक म्हणत टाळ्या न वाजवता ही कुठली सर्टेंटी असे विचारतो. त्यामुळे मला बेसिक इंस्टिंक्ट इ चित्रपटांतले बेसिक बेसिक सीनच तेवढे आवडतात. शिंडलर्स लिस्ट मधेही त्या खर्‍याखुर्‍या माणसाच्या व्यक्तित्वाने प्रभावीत झालो होतो, चित्रपटाने कमी. युद्ध, अतिरेकी, मानवतेवरचे संकट, वै़ज्ञानिक शोध, परग्रहवासी इ भिकार आयडीयांवर सारे हॉलिवूडपट असतात. पक्षी मी जयाचा परिचय पाहतो. And I don't care तो एक कॉपीड पिच्कर आहे.

In reply to by arunjoshi123

"युद्ध, अतिरेकी, मानवतेवरचे संकट, वै़ज्ञानिक शोध, परग्रहवासी इ भिकार आयडीयांवर सारे हॉलिवूडपट असतात." ओके. मी उल्लेख केलेल्या बर्‍याच सिनेमात वरील विषय नाही आहेत.तरी पण तुमच्या माहितीसाठी काही सिनेमे देत आहे. न चुकता बघा.. १. द गेम ===> मायकेल डग्लस आणि कथा. २. द बँक जॉब ===> एम.आय.६चे कट कारस्थान आणि जॅसन स्टॅथमची बर्‍यापैकी अ‍ॅक्टिंग.(खर्‍या घटनेवर आधारीत असल्याने अतिरेकी आणि माफिया आणि मंत्री-संत्री अपरिहार्य.) ३. वर उल्लेख केलेला वेट अंटिल डार्क. ४. द सिक्स सेंन्स ===> जस्ट वॉच. ५. यु हॅव गॉट अ मेल ===> परत एकदा टॉम हँक्स...आणि मेग रायन अधिक एकदम साधी प्रेम कहाणी. हे बघून झाले की कळवा.पैकी "बँक जॉब" वगळता इतर सगळे सिनेमे बायको बरोबरच बघा.जास्त रंगत येईल.

In reply to by arunjoshi123

आपले निरीक्षण चुकीचे आहे असे मला वाटते. जसे साऊथइंडियन म्हटले की फक्त मारधाड असा समज लोक करतात तसाच. मैट्रिक्स हा फक्त एक्शन साठी बघुन आपण उच्च कलाकृतीचा अपमान करत असतो. सत्य कितीही नाकारले तरीही, हॉलीवुड कलात्मकतेत आपल्या बरेच पुढे आहे( तांत्रिक तर आहेच) .

In reply to by arunjoshi123

अरुण भाउ, साउंड ऑफ मुझिक नावाचा एक सिनेमा आहे. तोहि परिचय सारखाच. तुम्हाला आवदेल. वेगळा पण आणि लोभस पण असा "ऑगस्त्ट रश" नावाचा सिनेमा आहे. तोहि कदचित आवडेल तुम्हाला. तुम्ही जर हिन्दि मधील तुम्हाला आवडणारे आणखी चित्रपट सांगितले तर इंग्रजी मधील त्या प्रकारात नक्किच चार चांगले चित्रपट सुचवु शकेन.

In reply to by arunjoshi123

अरुण जोशी तुम्हाला एकच सांगावे वाटते की ' हाय कम्बख्त तूने पि ही नहीं' युद्धपटात एनिमी ऑन द गेट पहाच, जो उंदीर मांजराचा खेळ या चित्रपटात दाखवला आहे तो अप्रतिम, फ़क्त उंदीर मांजराची भूमिका पलटत राहते. अजुन 'द पियानिस्ट' बघाच. ' सेविंग प्रायवेट रायन' मस्ट.त्यातील टॉम हैंक्स अप्रतिम. आपल्या मिपाकरानी सुचवलेल्या यादितिल सिनेमे पहाच, मत बदलले तर जरूर कळवा.

बरेच चित्रपट पाहिले, त्यातले आवडलेले म्हणजे - Saving Private Ryan, Empire of the Sun, Letters from Iwo Jima, War Horse, In Darkness (polish), Shutter (Korean), The Way Back, The Good, Bad & Ugly, Water (hindi). Lincoln आणि The best years of our lives हे चित्रपट उपलब्ध असूनही पहायचे राहिलेत.

सिनेमा हा दिग्दर्शका चा असतो. अगदी कथानका पासुन , पट्कथा, संवाद, कॅमेरा, संगीत ह्या सर्व गोष्टीत तो असतो. अगदी कास्टींग सुद्धा त्याच्या म्हणण्या नुसार होते. त्यामुळे कुठल्याही सिनेमा चा उल्लेख करायचा असेल तर तो abc or xyz दिग्दर्शकाचा असे करावा असे वाटते. तुम्ही सगळीकडे अभिनेत्यांचा च फक्त उल्लेख केला आहे. शटर आयलंड, द डिपार्टेड, अव्हिअटर हे एकाच दिग्दर्शकाचे आहेत.

In reply to by प्रसाद१९७१

यस, हे माझ्या कधी लक्षांतच नाही आले.पण बर्‍याच वेळा मी कलाकार किंवा कथानक बघूनच सिनेमे बघतो. असो... आता डायरेक्टर बघून पण सिनेमे बघत जाईन. माझ्यातील त्रुटीची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद.

Martin Scorsese चे Raging Bull Taxi Driver Goodfellas Gangs of Newyork Casino

On the Waterfront, A Streetcar named Desire ( मार्लन ब्रँडो साठी ) One Flew Over the Cuckoo's Nest ( जॅक निकोल्सन साठी ) The Shawshank Redemption ( कथानका साठी ) Pulp Fiction

नुसत्या कथानकासाठी पाहायचा असेल तर.... स्ल्यूथ, गॅम्बीट, एस इन द होल नक्की पहा. त्यात बिली वाईल्डरचे सगळे सिनेमा आले तरी चालतील.

एक से एक पिक्चर आहेत त्याचेपण. गॉडफादर चं नाव घ्यायचीच गरज नाही, इतका ग्रेट पिक्चर आहे. पण स्कारफेस बघा एकदा..... लई भारी.

In reply to by वेल्लाभट

अल पचिनोच्या ऑस्कर व्हॅल्युचे एनकॅशमेंट आणि कोकेनची जाहीरात. शिवाय तो फारच अतिरंजित वाटला.विशेषतः ती शेवटची हाणामारी. असो... पसंद अपनी अपनी... खयाल अपना अपना... सोच अपनी अपनी.... लेकीन,मिसळपाव सबका....

THE BLUE ANGEL या सिनेमाचे नाव काढले कि डोळ्यापुढे येते ते या सिनेमाचे पोस्टर !! नंतर असेही वाचनात आले कि या पोजसाठी LONG LEG असणारी नटी शोधणे हेच वेळखाऊ होते पिंजरा या सिनेमावरून काढला अशी वदंता होती

फक्त डायरेकटर साठी पाहयचे असतील तर..... बिली वाईल्डर- पूर्ण २७ सिनेमे स्टीव्हन स्पिलबर्ग- क्लोज एन्काउन्टर्स ऑफ थर्ड काईन्ड, ड्युएल, इन्डियाना जोन्स ट्रिओलॉजी, शिंडलर्स लिस्ट, हूक, लिंकन (बाकीची नावे वर आहेतच) ख्रिस्तोफर नोलान- सर्व सिनेमे ब्रायन सिंगर- द युजुअल सस्पेक्ट्स, अ‍ॅप्ट प्युपील, एक्स मेन सिरीज टीम बर्टन- बीटलज्युस, बॅटमॅन, एडवर्ड सिझरहॅन्ड्स, एड वूड, स्लीपी हॉलो, कॉर्प्स ब्राईड, इत्यादी Gore Verbinski (ह्याचा उच्चार जमत नाही बुवा)- पायरेटस ऑफ द कॅरिबियन ट्रिओलॉजी, द मॅक्सिकन, द वेदर मॅन, रँगो, द लोन रेंजर स्टॅनली कुब्रिक- ह्याचा स्पार्टाकस आणि द शायनिंग (जॅक निकोल्सनचा) आवडला. बाकीचे पाहायचे आहेत. बाकी नावे आठवली की सांगेन

१. अर्गो ... एक सुन्दर सस्पेन्स थ्रिलर २. बिहाईंड एनिमी लाईन्स ... युद्ध्कथा ३. इन्सिड्युअस (१ आणि २) ... भयकथा ४. पर्झानिया ... गोध्रा दंगलीवर आधारीत ५. तहान... काश्मिरी मुलगा आणि त्याच्या गाढवावर आधारीत लघुपट ६. सेरेंडीपिटी ... प्रेमकथा ७. अ‍ॅपोकॅलिप्टो ... मेल गिब्सन साठी बघावा

ब्रुस ऑलमायटी , एक्स मॅन सिरीज , अवतार , फायनल डेस्टीनेशन भाग 1 , टॅंग्लड , ET ( याचा हिंदी व्हर्जन कोई मिल गया ), मॅन ईन ब्लॅक सिरीज , राशोमान ( जपानी) , गॅल्डियेटर , एटिएम , नॅशनल ट्रेझर सिरीज

ग्रेगरी पेक १. Mackenna's Gold २. Roman Holiday 3. Guns of Navrone टॉम हँक्स १. Cast Away - - सर्वात आवडणार्‍या यादीतला 2. Terminal 3. Forrest Gump Ryan टॉम क्रुझ १.Last Samurai 2. A few good men 3. The Firm 4. Top Gun हॅरिसन फोर्ड - The Fugitive युद्धपट १. Saving Private Ryan 2. Bridge on river Kwai 3. Tora tora tora 4. Patton 5. Braveheart वेगळ्या धाटणीचे काही. १. Shall We Dance -- माझा अतिशय आवडता चित्रपट.. अतिशय subtle, उत्तम संवाद आणि प्रत्येक पात्र खूप उत्तम पणे उभं केलेलं आहे. २. Spanglish ३. Seven Samurai - Akira Kurosawa 4. Shawshank Redemption 5. Pursuit of Happiness - सर्वात आवडणार्‍या यादीतला 6. Finding Nemo 7. 12 Angry Men 8. Invictus - - सर्वात आवडणार्‍या यादीतला 9. Pretty Woman 10. Love Actually 11. The greatest game every played

अरेच्चा या यादीत माझा सगळ्यात आवडता कासाब्लँका कसा नाही दिसला? बॉलीवूड मध्ये जसे शोलेचे डायलॉग सुद्धा गाजले तद्वत हा कासाब्लँका... काय नाही या चित्रपटात.. वेग, रोमान्स, युद्धाचं वातावरण, नाट्य, संवाद, पटकथा केवळ अ प्र ति म.. धाग्याबद्द्ल धन्यवाद.. उतरवून घेतो नावं सवडीप्रमाणे.. नेटफ्लिक्स घ्यायलाच हवं आता.. :)

In reply to by उपास

बद्दल धन्यवाद... आज करू उद्या करू, म्हणता म्हणता राहूनच गेला. आत्ताच करायला टाकतो.... टाकला... ही घ्या लिंक... http://kickass.to/casablanca-1942-dvdrip-eng-fxg-t456644.html

War related:Das Boot (1981),Enemy at The Gates,Raid on Entebe Tears Of The Sun, The Hurt Locker,Munich,Proof Of Life Conceptual Films:V for Vendetta, I Robot, Comedy:Kung Fu Panda (both),God Must Be Crazy Series, Mr Bean Series,Little Rascals,50 First Dates, 17 Again Senti Pics:127 Hours, Fluke,click,Blast From The past, Suspence Taking Lives,perfect Stranger,The Number 23,One Missed Call,When Stranger Calls

जल्ला सगला मी.पा. चा स्टाफ त्या गोर्या कातडीवालीचा विन्ग्लिश शीनेमा बगतांव. लय भारी. पन आम्हास्नी जल्ला ते काय समजंतच नाय. वो मु.विं.नो जरा वाईच आम्हाला बी सांगा ना की कुठुनशान तुम्ही हे शीनेमे डाऊनलोड करतांव ते. त्यातुन जर बोट/शीपवाले , दुसर्या महायुध्दावरचे शीनेमे असतला तर त्यान्ची यादी द्याना. मला लई आवडतात.


In reply to by प्रमोद देर्देकर

वॉर मुव्हीज साठी गूगल वर खालील वाक्य टाईप केले. The 100 Best Films About World War II त्यातील एक लिंक उघडली. http://www.imdb.com/list/15G0PDAGhvE/ आता ह्या लिंक वर तुम्हाला बरेच सिनेमे दिसतील.त्यातला मला माहित असलेला एक सिनेमा मी निवडला. सिंडलर्स लिस्ट. आता परत गुगलला गेलो.आणि खालील वाक्य टाईप केले. schindler's list 1993 in hindi torrent आता त्याने मला बर्‍याच लिंक्स दिल्या. त्यातली मी खालील लिंक उघडली. http://kickass.to/schindlers-list-1993-dvdrip-dual-audio-eng-hindi-t5230... इथे तुम्हाला डाव्या हाताला , वर , कोपर्‍यात "डावुन्लोड टोरांट" असा आयकॉन दिसेल. तिथे क्लि़क करा.तुमचे डावूनलोड सुरु होईल. (माझ्या पी,सी. वर टोरांट डावूनलोड सोफ्ट्वेयर आहे.) तुम्ही क्लिक केलेत आणि डावूनलोड सुरु नाही झाले, तर तुम्हाला हे सॉफ्ट वेयर डावुन्लोड करायला लागेल.हे सॉफ्टवेयर फ्री आहे.त्यामुळे चिंता नसावी.टोरांट वरचे सगळे सिनेमे फ्री असल्याने बिंधास्त रहा. =========================================================== शिप किंवा बोटी साठीची लिस्ट देत आहे http://www.imdb.com/list/_GX7T27jAyQ/ त्यापैकी माझा आवडता सिनेमा म्हणजे The Perfect Storm (हा सिनेमा बघतांना आपल्या "काला पत्थर"ची आठवण येते.) त्याची डावूनलोड लिंक देत आहे. http://kickass.to/the-perfect-storm-2000-dual-audio-hindi-english-720p-b...

कोणी 'अवतार' चा उल्लेख कसा केला नाही अजून? तो पण एक कमाल होता. कॅमेरोन काका अशक्य आहेत.

In reply to by राजो

इथे..."तथास्तू" ह्यांनी उल्लेख केला आहे की. अवतार, टायटॅनिक, स्टार वॉर्स, टर्मिनेटर वगैरे सिनेमे टोकीज मध्येच बघायला मस्त वाटतात.

Perfume: The Story of a Murderer हा एक सुन्दर व वेगळ्या धाटणी चा चित्रपट आहे.

मुवि आणि सर्वाँना धन्यवाद माहितीबद्दल . १'दे डाईड हैपिली एवर आफ्टर ' मृत्युचे महत्व सांगणारा चित्रपट . २इटालिअन वेड्यांचा क्लब यामध्ये फक्त काहीतरी खूळ(=वेड)असणाऱ्यांनाच प्रवेश मिळतो यावरचा चित्रपट (?)अतिश्रीमंतांचे खूळ . ३ एक चाईनिज गाव ,गावातले कडक नियम पण गावात एक वेडा असतो त्याला सर्व माफ असते चित्रपट (?)हा चित्रपट माझ्या मित्राने मला आवर्जून पाहाण्यास सांगितले होते :"हा तुझ्यासाठी आहे ." ४ जेम्स बॉंडचे सिनेमे त्यातल्या काही सुरुवातीच्या दृष्यांसाठी :अ) पैरिस आइफल टॉवरवरून पराशुट उडी आणि पाठलाग .ब)बर्फावरून स्किइंग पाठलाग ५गॉडफादर चित्रपटापेक्षा कादंबरी वाचन आवडलं .

अशी लिस्ट मिळाली तर आवडेल. राजकीय गंभीर मला आवडलेले १. चित्रपट पाह्यचे ते पाहा, पण 'द वेस्ट विंग' सोडू नका २. द कंटेण्डर ३. वॅग द डॉग ४. ऑल द प्रेसिडेण्ट्स मेन ५. गांधी ६. सीरियाना ७. आइड्स ऑफ मार्च १०. प्रायमरी कलर्स ११. ब्रिटिश्/अमेरिकन हाउस ऑफ कार्ड्स सिरीज आणखी आठवतो आहे> राजकीय विनोदी १. पहिले म्हणजे यस मिनिस्टर व यस प्राईम मिनिस्टर या सिरीज २. त्याच दिग्दर्शकाचा 'द डिस्टिग्विश्ड जंटलमन' ३. इन द लूप (ब्रिटिश आहे) ४. द कॅम्पेन (विल फॅरेल) ५. द अमेरिकन प्रेसिड्ण्ट अजून सांगा. डॉ स्ट्रेन्जलव्ह एक माहीत आहे, मि.स्मिथ गोज टू वॉशिंग्टन हा आणखी एक. दोन्ही पाहायचे आहेत अजून.

माझे आवडते काही अप्रतिम युद्धपट इथे लिस्टींग करत आहे १. ब्रिज ऑन रिवर क्वॉय २. टीयर्स ऑफ द सन ३. ७१ इंटू द फायर ४. सेविंग प्रायव्हेट रायन ५. ब्लॅक हॉक डाऊन ६. ग्रीन झोन ७. द हर्ट लॉकर ८. बिहाईंड एनीमी लाईन्स (१ & २) ९. एनेमी अ‍ॅट द गेट्स (ज्युड लॉ ने केलेला अप्रतिम कॉम्रेड वस्सीली झाएत्सेव्ह चा अभिनय) १०. झिरो डार्क थर्टी ( बीन लादेन च्या अबोटाबाद कंपाऊंड चा पत्ता लावणा-या सी आय ए च्या प्रवासाचे चित्रण)

कुठल्यातरी पाशिमात्य शहरातील ही एक सत्यकथा आहे.. श्वान महाशयांची एकनिष्टा, लाजबाव..!! नक्की बघा..!!