Skip to main content

काही वेगळे चित्रपट....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 31/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मला चित्रपट परीक्षण किंवा पुस्तक परीक्षण जमत नाही, त्यामुळे तुम्ही चित्रपटाविषयी काही वाचायला ह्या धाग्यावर आला असाल तर, मी प्रथमतः माफी मागतो. गेली कित्येक वर्षे मी फक्त मराठी नाटके आणि इंग्रजी सिनेमे बघतो. गेल्या काही महिन्यांतील मला आवडलेले सिनेमे लिहीत आहे. १. रन लोला रन => एकाच तिकीटात ३ सिनेमे २. इन्सेपशन ==> निव्वळ खतरनाक "लिओनार्डो डिकाप्रिओ"च्या प्रेमात पडला नसाल तर नक्की बघा. ३. व्हँटेज पॉइंट ==> पैसा वसूल , थ्रिलर पटच पण वेगळ्या पद्धतीने घेतलेला. ४. मिलियन डॉलर बेबी ===> क्लिंट इस्ट्वूड आणी हिलरी स्वांक अधिक मॉर्गन फ्रीमॅन,,, अजुन काय पाहिजे? ५. क्लायंट ==> मूळ कथा , जॉन ग्रिशॅमची वाचली असल्यास, चित्रपट बघीतला नाही तरी चालेल. मी बघीतला तो, टॉमी ली जोन्स आणि सुसान साठी, दोघांनी पण निराशा केली नाही. ६. शटर आयलंड ===> एक मस्त सिनेमा , आपलेच लिओनार्डो डिकाप्रिओ आणि बेन किंग्स्ले. ७. कॅच मी इफ यु कॅन ===> परत एकदा आपलाच "लिओनार्डो डिकाप्रिओ" आणि जोडीला "टॉम हँक्स" अज्जून काय पाहिजे? ८. द टर्मिनल ====> "टॉम हँक्स" आणि फक्त "टॉम हँक्स" ९. सेव्हिंग प्राव्हेट रायन ===> "टॉम हँक्स" आणि "मॅट डॅमन" १०. द टुरिस्ट ====> जॉनी डेप (हा.. तोच तो पायरेट ऑफ द कॅरेबियन वाला) ११. जॅक रीचर ===> (मूळ पुस्तक : वन शॉट, लेखक : ली चाइल्ड...वाचले असेल तर, सिनेमा अजिबात बघू नका. बॉलीवूडने केलेली दुनियादारी आहे ही) त्यातून बघायचाच असेल तर टोम क्रुझ साठी नक्की बघा. मिशन इंपॉसिबलपेक्षा वेगळी अ‍ॅक्टिंग बघायला मिळेल. आता टॉम क्रुझचा विषय निघालाच आहे तर... १२. अ फ्यु गूड मॅन ==> "टॉम क्रुझ" अधिक "जॅक निक्लसन" एक सुंदर कथानक आणि तितकाच जबरा अभिनय. १३. अलाँग केम अ स्पायडर ===> मोनिका पॉटर आणि मॉर्गन फ्रीमॅन , नो कॉमेंट्स.... जस्ट वॉच.. १४. वाँटेड ===> रजनीकांतचा बाप ... डोके बाजूला ठेवून बघा .... आणि १५. द डिपार्टेड ====> जॅक निक्लसन, लिओनार्डो डिकाप्रिओ + मॅट डॅमन =============================================== वरील सिनेमात,मॅट्रिक्स,, ओशन्स , ट्रान्सपोर्टर इ. सिरीजचा उल्लेख जाणुन बूजून टाळला आहे....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38088
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

दुसर्‍या महायुद्धातल्या प्रसंगावर बेतलेला एक नितांत सुंदर चित्रपट तीन जर्मन आणि दोन ब्रिटीश वैमानीक नॉर्वेच्या बर्फाच्छादीत निर्मनुष्य पहाडांमधे अडकतात. योगायोगाने एकाच झोपडीत आश्रयाला येतात. जीवंत राहण्याची कसरत, राष्ट्राभीमान, शत्रुभाव, एकमेकांची प्रॅक्टीकल नीकड... अप्रतीम सिनेमा.

इथे कितीतरी चांगल्या चांगल्या चित्रपटांची यादी निर्माण झाली आहे. किमान किमतीत यांची उच्च दर्जाची प्रिंट कशी मिळवता येईल? प्रत्येक सवता पिक्चर प्लॅनेट एम सारख्या जागी ३००-४०० रुला आहे.

वरील यादीमधले जवळ जवळ सगळेच चित्रपट पाहिलेत आहेत… पण अजून माझ्या कडे असलेले कहे तुम्हाला आवडतील असे चित्रपट ज्यांचा इथे उल्लेख नाही आणि डाऊनलोड लिंक …… १) दि ग्रेटेस्ट गेम एवर प्लेड ( नट शाय ले बाउफ ) २) सेवेन पाउंडस ( नट विल स्मिथ आणि परसूट ऑफ हैप्पीनेसचाच दिग्दर्शक ) ३) बिग फिश ( टीम बर्टनचा एक अप्रतिम पाहावा असा चित्रपट ) ४० good as it gets ( नट जैक निकोलसन आणि हेलेन हंट) ५) गुड विल हंटिंग (नट मैट डेमन , बेन आफ्लेक , रॉबिन विलीअम्स ) ६) सेंट ऑफ ए वुमन (नट अल पचिनो आणि फक्त अल पचिनो ) ७) दि शॉशेंक रिडेम्शन ( नट टीम रॉबिन्स , मॉर्गन फ्रीमन ) ८) 42 ( नट हैरीसन फोर्ड आणि दिग्दर्शक आठवत नाही पण मस्त चित्रपट ) ९) दि ब्लाइंड साईड ( नटी सांड्रा बुल्लक ) १०) दि हेल्प ( नटी एमा स्टोन ) ११)नो रेजरवेशन (नटी काथरीन झेटा जोन्स ) १२) क्लाउड अेटलास ( नट टौम हेन्क्स नटी हाले बेरी ) १३) नाऊ यु सी मी ( नट जेसी इएसेन्बर्ग , मार्क रुफ्फालो , वूडी हारेलसन , मॉर्गन फ्रीमन , मायकल केन ) १४)सिल्वर लाईनइंग प्लेबूक (नट ब्रॅडली कूपर , नटी जेनेफेर लोरेन्स ) १५) दि कॉन्जुरिंग ( नट पेट्रिक विल्सेन , नटी व्हिरा फार्मिगा ) १६) दि लिंकन लॉयर ( नट मैथेउ मेक नोटी ) १७) दि बॉय विथ स्त्रीप्ड पायजमा १८) 1408 (नट जॉन क़्युसाक ) http://yify-torrents.com/ सर्व चीत्रापत ह्या सीटवर मिल्तिल…???? विथ सबटायटल सहा …….

In reply to by एल माचो

ह्यापैकी "नावु यु सी मी " माझ्या मुलाने डावुनलोड केला होता.तो मी मागच्याच आठवड्यात बघीतला.

टॉम हँक्स आवडतो तर त्याचा "चार्ली विल्सन्स वॉर" ही पाहण्यासारखा आहे. चार्ली विल्सन हा रंगेल काँग्रेसमन टॉमने जबरदस्त ताकदीने उभा केला आहे. आणखी एक वेगळा आणि टची चित्रपट म्हणजे "Taking Chance" इराकमध्ये मारला गेलेल्या एका अमेरीकन सैनीकाचे शव त्या सैनीकाच्या घरी पोहोचवताना पाळले जाणारे प्रोटोकॉल्स, शव साफ करणार्‍या टीमपासून ते त्याची वाहतूक करताना भेटलेल्या सर्व अनोळखी व्यक्तींनी त्या सैनीकाच्या मृतदेहाप्रती व त्याच्या एस्कॉर्टप्रती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दर्शवलेला आदर या भावनांचे भावूक चित्रण केले आहे. हॉस्टेज निगोसिएशन संदर्भात डेन्झेल वॉशिंग्टनचा "जॉन क्यू". स्वत:च्या मुलाच्या हार्ट ट्रान्प्लांट ऑपरेशनसाठी दुसरे हृदय उपलब्ध होवू शकत नाही म्हणून हॉस्पीटल व रूग्णांनाच ओलीस ठेवून स्वतःचे हॄदय देण्यासाठी आत्महत्या करण्याची तयारी असणारा बाप.. डेन्झेल वॉशिंग्टनचाच "टेकींग ऑफ पेल्हम वन टू थ्री" अर्धी ट्रेन ओलीस ठेवलेल्या जॉन ट्रॅव्होल्टासोबत असलेले संवाद खास आहेत.

In reply to by मुक्त विहारि

अन Tell him Wax in wax out, when u r secret agent u have to roll like a secret agent you speak in code language this to send message to enemy which means Wax is comming in and is gonnaa take you Out असली वाक्ये किंव्हा पाकिस्तानी दहशत वाद्यांवर नजर ठेवत असताना हुकर सोबत काम झाल्यावर gonaa love this country म्हणतो ते जबराट आहे

मस्त यादी आहे. कॉपी करुन ठेवली पाहीजे. :)

मस्त धागा! मुवि, धन्यवाद!

वर लिहिलेल्यांखेरीज मला आवडलेले काही इतर चित्रपट आणि माहित असल्यास नट/दिग्दर्शक (फक्त 'आवडलेले'... यात फार काही कलात्मक मूल्य वगैरे सापडतीलच असे नाही) - १) फुल मेटल जॅकेट - क्युब्रिक २) अ क्लॉकवर्क ऑरेंज - क्युब्रिक ३) रेक्वायम फॉर अ ड्रीम ४) द इलुजनिस्ट - एडवर्ड नॉर्टन ५) फाईट क्लब - एडवर्ड नॉर्टन / ब्रॅड पिट ६) रोड टू पर्डिशन - हॅंक्स ७) फिलाडेल्फिया - हँक्स ८) ड्यूड व्हेअर इज माय कार (नॉनसेन्स आवडत असल्यास) - अ‍ॅश्टन कचर / शॉन विल्यम स्कॉट ९) पर्फ्यूम १०) लॉर्ड ऑफ वॉर - निकोलस केज - टायटल सीक्वेन्स पाहण्यासारखा ११) कॅसिनो - डी नीरो १२) टॅक्सी ड्रायव्हर - डी नीरो १३) काईट रनर १४) पल्प फिक्शन - टॅरेंटीनो १५) किल बिल - दोन्ही भाग - टॅरेंटीनो

In reply to by घाटावरचे भट

तिकडचा दादा कोंडके चित्रपट महाणाय्चो! बाकी बहुतांश मेनस्ट्रीम चित्रपट देऊन वेग्ले चित्रपट असे नाव या धाग्याला का आहे हां प्रश्नच आहे? बाकी इथले बहुतेक चित्रपट वर्ड टू वर्ड तोंडपाठ असल्यान आपला पासे

"अमेरिकन सिव्हिल वॉर" तसेच मिपा वर प्रसिद्ध झालेल्या "क्लोन्डायक गोल्ड रश" यावर आधारित सिनेमे आहेत का ? असल्यास डिटेल्स द्या ...

अतिशय उत्तम धागा ...........धन्यवाद मुक्तविहारी जी . मोकळा वेळ सत्कारणी लागेल या धाग्यामुळे!

ह्या 'वेगळ्या' चित्रपटान्च्या तोर्रन्त डाउनलोड लिन्क हव्यात. धन्यवाद. बघायचे आहेत सिनेमे. (म्याक्सिमम सीद्स आनि मिनिमम फाइल साइझ असनार्या लिन्क्स.)

रन सायलंट रन डीप.. श्वाशांक रिडम्पशन बेबिज डे आउट फॉरेस्ट गम्प सायलेंस ऑफ द lambs Schindler's List ब्लड डायमंड

My cousin Vinny फुल टाईमपास आणि विशेषतः Marisa Tomei च्या कोर्टातील साक्षीचा प्रसंग तर अप्रतिम आहे! आपला 'काय द्याच बोला' याची हुबेहूब कॉपी असला तरी चांगला होता :) नोलान चे तिन्ही बॅटमॅन पट जाम आवडतात, विशेषतः डार्क नाईट - ज्याचा उल्लेख झाला आहेच आधी. 'ब्यूटिफुल माइंड' चा उल्लेख झाला की नाही आठवत नाही.

टॉम हैंक्स, आपण तर दीवाना हाय बाबा त्याचा, द टर्मिनल बघताना एकदा ,दोनदा रडून देखिल घेतले आहे. गॉड मस्ट बी क्रेझी , अफलातून, माणसाला जगायला काय लागते याची आठवण करून देतो हां सिनेमा! त्यातील कलाकार अभिनय करीत आहे असे वाटतच नाही इतका नैसर्गिकपणा या चित्रपटात आहे. आणि ती द गुड बैड एण्ड अगली चा क्लाइमेक्स कोण विसरेल? ते काटा आणनारे पार्श्वसंगीत अजूनही कानात रेंगाळत आहे. हिंदी मधे अ वेडनेसडे , अनुपम खेर व नासिर ची जुगलबंदी लाजवाब, जाकिर हुसैन व् रविशंकर यांची जशी होईल तशीच. नानाचा प्रहार, आणि हो स्टेलोनचा ओवर द टॉप आवर्जून पाहा, स्टेलोन ला पण अभिनय येतो म्हटल.

In reply to by भंकस बाबा

सर्जी लिओनचाच 'वन्स अपोन अ टाइम इन द वेस्ट' हा चित्रपट तर 'द गुड द ब्याड एंड द अग्ली' पेक्षा काकणभर सरसच. काय अफ़लातून चित्रपट दिलेत राव एकेक. क्लिंट इस्टवूडचा 'अनफर्गिवन' आणि झेवियर बार्डेमचा 'नो कंट्री फॉर ओल्ड मेन' हे दोन वेस्टर्न्स पण उच्च दर्जाचे.

काय चित्रपट आहे बाप! स्पीलबर्गने एकेक फ्रेम जिवंत केलेली आहे. जाळल्या जाणाऱ्या ज्यूंची राख शिंडलरच्या गाडीवर उडते तेव्हाचा लियाम नीसनचा आणि आरशात दिसणाऱ्या स्वतःच्या प्रतिबिंबावर फिदा होऊन I pardon you म्हणणाऱ्या राल्फ पाईन्सचा अभिनय केवळ अविस्मरणीय. आवडणारा दुसरा दिग्दर्शक म्हणजे रहस्यकथांचा बादशहा आल्फ्रेड हिचकाॅक. सायको, रिअर विंडो, स्ट्रेंजर्स आॅन द ट्रेन, थर्टीनाईन स्टेप्स, नाॅर्थ बाय नाॅर्थवेस्ट असे अफाट आहेत पण सर्वात सुंदर व्हर्टिगो. रहस्यकथेतली प्रेमकथा किंवा प्रेमकथेतलं रहस्य असलेला हा हिचकाॅकचा सर्वोकृष्ट चित्रपट. मार्टिन स्काॅर्सेसी हाही एक जबरदस्त दिग्दर्शक. त्याचे डिपार्टेड, गुडफेलाज, शटर आयलंड हे सगळेच सुंदर पण अविस्मरणीय असा टॅक्सी ड्रायव्हर. क्लिंट ईस्टवूडचे मिलियन डाॅलर बेबी आणि जे.एडगर हे दोन्ही अफाट. जे.एडगरमधला लिओनार्डो डीकॅप्रिओचा अभिनय बावनकशी!

एका आफ्रिकन अमेरिकन बटलर चा व्हाईट हाऊस मधला जवळ जवळ तीस वर्षाचा कार्यकाल. हा माणूस या काळातील अमेरिकेतील सामाजिक, राजकीय स्थीत्यन्तरे आणि आठ प्रेज़िडेंट्सच्या कार्यकाळाचा साक्षीदार आहे. त्याच्या नजरेतून हा चित्रपट आपल्यासमोर उलगडतो.

द ग्रीन माइल (टॉम हँक्स) द मशिनिस्ट (ख्रिस्चिआन बेल) द लाइव्हज् ऑफ अदर्स (ईस्ट जर्मनीतील स्टासी ऑफिसर विषयी) मेमेंटो (दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलान) गुड नाईट, अ‍ॅंड गुड लक (जॉर्ज क्लूनी) फार्गो फ्युरी (ब्रॅड पिट) ओ ब्रदर, व्हेअर आर्ट दाउ (जॉर्ज क्लूनी) ड्रायविंग मिस डेझि (मॉर्गन फ्रीमॅन) द नोट्बुक एटर्नल सनशाइन ऑफ द स्पॉट्लेस माइंड (जिम कॅरी, केट विन्स्लेट) द बकेट लिस्ट (जॅक निकल्सन, मॉर्गन फ्रीमॅन) बर्न आफ्टर रीडिंग (जॉर्ज क्लूनी, ब्रॅड पिट) द प्रेस्टिज ((ख्रिस्चिआन बेल, ह्यू जॅकमॅन, स्कार्लेट योहान्सन) द इल्युजनिस्ट (एड्वर्ड नॉर्टन) गॉन गर्ल (बेन अफ्लेक; याच नावाचं पुस्तकही मस्त्त आहे.) ब्लु जॅस्मिन (केट ब्लांचेट) वी नीड टु टॉक अबाउट केविन

१. थ्री डेज ऑफ़ द कॉन्डोर २. टिंकर टेलर सोल्जर स्पाय हे २ हेरपट नक्की पहावेत

The dead poets socity.. the railway man .. parents trap... R.V... CRUEL INTENTIONS..

अरे काय हे? कार्टून चित्रपट कोण सांगनार? १. टॉय स्टोरी सिरीज २. वॉल ई ३. लायन किंग ४. हाऊ टू ट्रेन युअर ड्रागन ५. कुंग फु पांडा ६. मॉन्स्टर्स ईऩ्क ७. कार्स कूंग फु तर कितीही वेळा पाहिला तरी पुन्हा तितकाच ताजातवाना वाटतो. मागे २ महिने अंथ रुणाला खिळ्लेला असताना तर २०-२५ वेळा पाहिला. निखळ आनंद. ईंग्रजी ची अजिबात गरज नाही.

+१ निखळ मनोरंजन... फील गुड मूवीज. अजुन काही- पॅडिंग्टन फ्रोज़न

आणखी एकः क्लासिक्सची आवड असणार्यांसाठी प. पु. हिच्कॉक बाबा. उत्तम कथानक, देखण्या नायिका, राजबिंडे नायक, अप्रतीम दिग्दर्शन. रोप सायको बर्डस रीअर विंडो रोप मधले सलग चित्रिकरण तर दिग्दर्शन कौशल्याचा वस्तुपाठच.

आता काही चित्रपट बापांसाठी. बाप आणि मुल यान्च्यात दुराव्याने होनारा संघर्ष आणि त्यांचे मनोमिलन हा हॉलिवूड मधला खूप आवडता विषय. त्यामुळे या प्रकारात खूप चांगली उदाहरणे मिळ्तात. आताचा शेफ असो किंवा रिअल स्टील, पाया तोच. रिअल स्टील चा मेलोड्रामा फार पुर्वि ओवर द टॉप नावच्या सिनेमात पाहीला होता. यातील अबाउट श्मिद्ट नावाचा जाक निकोल्सनचा सुन्दर सिनेमा पहाच. बिग फिश, फिल्ड ऑफ ड्रिम्स हे मुलांनी आपल्या बापाला सम्जुन घेन्याचे चित्रपट.

काही चित्रपट खवय्यांसाठी. १. शेफ ( कितिदा हे एकच नाव सांगाय्च) २. रातातुली (कोणि स्पेलिंग टंकता का स्पेलिंग?) ३. जुलि आणि जुलिया ४. शोकोलाट

१. द स्टिंग : सर्वोत्कृष्ट कॉनमन मूव्हीज पैकी एक. अतिशय सुंदर कथा, पटकथा, संवाद, अभिनय, अभिनेत्यांची निवड, कला दिग्दर्शन. चित्रपट कलेचा एक उत्तम नमुना. २. इनटू द वाइल्डः जगापासून तुटून एकटं राहण्याचा अनुभव घेणार्‍या व शेवटी जीव गमावून बसलेल्या तरुणाची सत्यकथा. हा चित्रपट आपले एक वातावरण तयार करतो, आपल्या रोजच्या जगण्यावर काही प्रश्न उपस्थित करतो. ३. इडियोक्रसी: सद्य समाजाचं मार्मिक व्यंगचित्र उभं करणारा चित्रपट. धमाल विनोदी त्याच वेळेस गंभीरपणे विचार करायला भाग पाडणारा. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न झाले. खुद्द निर्मात्यांनी ह्या चित्रपटाची गळचेपी केली. अजून आहेत. सध्या हे तीनच आठवले, बाकी काही वर इतरांच्या प्रतिसादात आले आहेत. माझ्या मते धाग्याचा उद्देश फक्त गाजलेले किंवा आवडीचे चित्रपट न सांगता फारसे माहित नसलेले पण हटके चित्रपट सांगा हा असावा. डॉक्युमेंटरीज चालतील काय?

In reply to by संदीप डांगे

या मुव्ही चा प्रचंड प्रभाव आहे माझ्यावर.
इनटू द वाइल्ड
पाहूनच मागच्या महिन्यात ३ दिवस कोकण निवांत जागेवर मुक्कामी सुट्टी घेतली, ते ३ दिवस भन्नाटच होते. फोन, फेबु, सगळं बंद. जगाशी संपर्क तोडून आपल्याच मस्तीत जगण म्हणजे भारीच असत कि

The Three Burials of Melquiades Estrada हे नाव पण बोलता येत नाहि. टॉमी ली जोन्सचा आहे. वेस्टर्न टाइप आहे हान्स झिमरचे सन्गीत असलेले सगळेच झकास.पल्प फिक्शन समजला नाही पण ईन्ग्लोरिअस बास्टर्डअस मस्त जमला आहे.

From Me: True story Black Book (film) Munich Action Olympus Has Fallen Now You See Me Animation The Croods Horror House of Wax The Hills Have Eyes Comedy The Pink Panther Sci-fi Congo

रोड मूव्हीज या प्रकारातील चांगले चित्रपट कोणते?

माझे बरेचसे आवडते चित्रपट वर येऊन गेलेत. काही आणखी - My cousin vinny It's a wonderful life It happened one night Bourne series Inglourious basterds Miracles The Adventures of Tintin: The Secret of the Unicorn Unstoppable The Equalizer Lean on me The departed The aviator

निकोलस केज चे चित्रपट या यादीत दिसले नाहीत ,

In reply to by कपिलमुनी

निकोलस केज ज्या चित्रपटात असतो त्याच्या अभिनयामुळे इतरांच्या चांगल्या अभिनयाकडेही दुर्लक्ष असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

... चांगल्या अभिनयाकडेही दुर्लक्ष असते." ह्या नियमाला एक अपवाद आहे.... तो म्हणके निकोलस केज आणि जॉन ट्रॅव्होल्टाचा "फेस ऑफ". च्यामारी परत एकदा "फेस ऑफ" बघायला लागणार. स्वगत : आमच्या सौ.चा अत्यंत आवडता नट म्हणजे हा निकोलस केज आणि हा सिनेमा.

In reply to by मुक्त विहारि

शस्त्रास्त्र व्यापारावरचा हा चित्रपट भारी आहे. एक युद्धपट पण आहे पण नाव आठवत नाही