Skip to main content

लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

लेखक खटासि खट यांनी मंगळवार, 03/12/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते. मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो. नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो. मी गबाळयासारखी घरभर फिरु शकते. समोरच्या बिल्डींगवर तरूण मुलं येऊन बसतात. त्याला एण्जॉय करता येत नाही पण तो काही बोलू शकत नाही. मला एण्जॉय करता येतं मी पण बोलत नाही. मी टापटीप राहाणं गरजेच नाही. वाटेल तितका वेळ लोळू शकते. तुझ्याशि फोनवर बोलायची इच्छाच होत नाहि ........... ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळाली नाहि तर मी याला चल फूट म्हणू शकते. मग दुस-या स्वप्नातला राजकुमार. मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे नाहि. त्यांना इथं आणणंच अलाऊड नाहि. मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा जाउ शकते. अगदि तुझ्याकडेहि ........................ पण लिईरित असल्यापासुण इच्छाच झालि नाहि. एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं नसेल?'. खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत. खुप गप्पा माराव्याशा वाटतात. पण त्या कोंडवाड्यात तुम्ही दोघांनी काढलेले दिवस आठवून शहारे येतात. अजुणही तुच करतेस ना ? मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला. सगळ्या नातेवाइकांना, शेजार्यांना जळवायला. वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. म्हणजे यू सर्टिफिकेटवाल्या गं पण अचानक मला जाणिव झाली कि तु लग्न केल होतंसं ना? माझ्या अंगावर शहारे आले. त्या काळि फक्त लग्न झाल्यावरच मुलं व्हायची ना ? आज इतकी प्रगती झाली कि त्यासाठी लग्नाची गरज नाही. आणि मुलांचीही नाही. कूटुंबा साठी किति फसवणुक केलीस स्वतःची . आहे त्या मधे मन मारत राहिलिस. ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........ आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते. आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात. तुम्हि दोघांनी स्वतःची ही फसवौक केली नसतीत तर आज माझ्या जवळ जे काहि शहाणपण आहे ते कदाचित नसतं. हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या लिवैन्रिलेशनिता असण्याचा अर्थ उमगतो. मुलीच्या शहाणपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे. वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी तू ही अ‍ॅक्सेप्ट करशील हे सर्व आणी लग्ना शिवायचं आमचं आयुश्यही आवडु लागेल तुला हळु हळू........................................... तू आणि पप्पांनी केलेल्या घोडचुकां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम......... तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................

वाचने 39821
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

अम्मळ गंडलय .

जिलबी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! -(शुभेच्छुक) सोकाजी

अगदी तुमच्या आयडीला साजेसे विडंबन..

http://hindi.boldsky.com/img/2011/11/10-20-jalebi-201011.jpg

लिविन्न्वालिच्या भावना छान उभ्या केल्यात विडंबन म्हणावे का प्रश्न पडतो?

In reply to by कवितानागेश

बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट आहे. अनेकदा मुलिंना लग्न (Commitment) हवे असते, मुलांना स्वातंत्र्य...

In reply to by कवितानागेश

बळंच??? अमेरीकेत बरोब्बर उलट आहे. अनेकदा मुलिंना लग्न (Commitment) हवे असते, मुलांना स्वातंत्र्य...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अहो, जगात फक्त भारत आणि अमेरिका इतकी २च स्थळं आहेत का? आणि कमिट्मेंटचे म्हणाल तर ती प्रत्येकालाच समोरच्याकडून हवी असते! अगदी आईवडलांनासुद्धा अपत्यांकडून म्हातारपणी सांभाळ करण्याची हमी हवीच असते. ... मी फक्त निरिक्षण नोंदवत होते. :)

In reply to by सांजसंध्या

लिव इन स्त्रियांना वरदान वाटू शकतं
लेखात लिहीलेल्या सवलती सोडल्या तर इतर काही अँगल आहे का तुमच्या या म्हणण्याला? (कारण ते स्वातंत्र्य तर दोघांनाही आहे, त्यात विषेश काही नाही)

In reply to by संजय क्षीरसागर

काय भारी अँगल मारलाय राव. मला तर आनंदाने ओरडावसंच वॉटतया! हॉ कू SSS हॉ कू SSS हॉ कू SSS... .

झक्कास

:D मस्त.

मस्त जमलय.

विडंबना ऐवजी सुडंबन म्हणेन!!! मला एक प्रश्न पडतो या लिव इन वाल्यांबद्दल. लग्न करायच नाही, बंधन नको आहे, कुणाची जोर जबरदस्तीसुद्धा नको आहे अन जबाबदारीही नको आहे. मग राहता राहिली भूक! मग त्यासाठी वन नाईट स्टँड का नाही स्विकारला जात? उगा लिव इन मध्ये चुकुन एखादा पार्टनर गुंतला भावनिकरित्या तर लोचा होतो तो तरी नाही व्हायचा!

In reply to by स्पंदना

भूकेसंबद्धीची सुरक्षा मिळविण्यासाठी मानव हंटर-गॅदरर जीवनपद्धती सोडून शेतकरी झाला. :)

In reply to by स्पंदना

मग त्यासाठी वन नाईट स्टँड का नाही स्विकारला जात?
आमचे वाघिणीचे दूध अंम्मळ कच्चे असल्याने याचा अर्थ नीट उमजला नाही. 'वन नाईट स्टँड' म्हणजे एक रात्रभर उभे रहाणे, खडा पहारा देणे, असा आहे का? मग त्याचा लिविन वगैरेशी काय संबंध? की 'वन नाईट स्लीप' असे म्हणायचे आहे?

In reply to by चित्रगुप्त

एका रात्रीपुरता संबंध ठेवून आपापल्या वाटेने निघून जाणे म्हणजेच वन्नैट्ष्ट्यांड.

In reply to by बॅटमॅन

म्हणूनच म्हटले वन नाईट स्लीप. :)

In reply to by चित्रगुप्त

Sleep की Slip? Sleep असल्यास चुकलं की राव.. ते काय झोपायला एकत्र येतात की काय? ;-) ह्यावरुन आठवलेला एक विनोद : मुलगा, पाद्र्यास : Father, is it wrong to sleep with a girl before marriage? पाद्री: No, son.. But the problem is you don't sleep... ;-) :-D

मूळ धाग्यापेक्षा विडंबनच सरस ठरले आहे खटासि खट मझा आणलात तुम्ही

माझ्या पहाण्यात तरी कोणी अजुन लिवइन मधे नाहीये पण मला प्रश्ण असा पडतो की खरच लिविनची का गरज पडते यांना? बर लिविन आहत तर मग लग्नाला काय प्रॉब्लेम आहे? यातुन मुल झालच तर त्याच संगोपन कोणी करायचं? आणि संस्कार काय आणि कोण करणार? कदाचित काही लोकांना हे खुप बुरसटलेले विचार वाटु शकतात.

In reply to by Dhananjay Borgaonkar

कमाल आहे! माझ्या पाहण्यात तर मीच होते. लिव इन मध्ये राहणारे लोक मुलं होऊ न देण्याइतके हुशार असतात. लग्न न करण्याची हजार कारणे असु शकतात.

विडंबन?? (मूळ पत्राहून अधिक) विचार करायला लावणारं पत्र आहे खरं!

मीही अजुन कोणाला पाहिलेले नाहिये लिवइन मध्ये राहिलेल... पण मला हे पट्तच नाही. असे राहुन काय साध्य करायाचे आहे? जो आदर आपल्याला लग्न झाल्यावर मिळतो तो लिवइन मध्ये राहिल्यावर नाही मिळू शकत. उलट लोक म्हण्तात "हेच संस्कार केले का तुमच्या आई-वडील यांनी?" ह्या मध्ये फक्त आई-वडीलच बद्नाम होतात.

आता विषय चाललाच आहे तर बेसिक माहीती काही मिळेल का? कसा सुरु झाला हा लिव्ह इन चा ट्रेंड? त्याचे फायदे काय अन तोटे किती? माझ निरिक्षण. आज ऑस्ट्रेलियात मुले १५-१६ची झाली की मातापित्यांना त्यांनी त्यांच्या घरात राहुन त्यांची कमाई खावी हे पटत नाही. त्यातच १६ वर्षापासून सरकार या मुलांना स्वतःचा भत्ता द्यायला सुरवात करते. तरुणवयातला उथळपणा, हातातले स्वतःच्या नावावर येणारे पैसे या मुळे ही तरुणाई पालकांनाही डोइजड होते. मग हे असे तरुण रक्त घराबाहेर पडुन चाचपडत जगायला सुरवात करते. त्यातुनही काहीजण काम करत शिक्षण चालु ठेवतात यशस्वी होतात. पण त्यांची पालक त्यांच्या कोणत्याही निर्णयात सहभागी नसल्याने स्वतःचा स्वतः जोडीदार शोधुन तसेच राहीले जाते. त्यातही भांडणे, हेवेदावे असतातच. पण अश्यावेळी लग्न करुन सेटल होण्याचा जो एक महत्वाचा टप्पा असतो त्याचा निर्णय घेण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. तरीहे येथे लग्ने होतात. इकडे पालक हळुहळु वृद्ध होत जातात. शरीर साथ द्यायच बंद करत. लग्न झाल असेल ठिक नाहीतर मग एकट रहाव लागत. प्रॉपर्टी असेल तर ती विकुन वृद्धाश्रमात १००,००० पासून ३००,००० पर्यंत पैसे भरले जातात. मुलांना फक्त माहीत असत आई या ओल्डएज होम मध्ये आहे. मी भेट दिली आहे अश्या होम्सना. परत जायची इच्छा नाही. मदत करायलाही नाही, अन ते विदिर्ण करणार आयुष्य पहायलाही नाही. काही दिवसांनी मग मुलांना कळवले जाते आई-बाप जो कोणी असेल तो सिरिअस. जमल तर मुल जातात नाहे तर "आज माझ्या आईच फ्युनरल आहे तिकडे लांब पण मी कामामुळे जाउ नाही शकत अस सहज बोलुन जातात". उसासा वगैरे टाकुन,"धिस इज लाईफ" वगैरे बोलल जात. आई बापान असेल ती प्रॉपर्टी विकुन कधीच बंध तोडलेले असतात, त्यामुळे यांच्याकडुन अपेक्षेलाही तोंड नसत. इनमिन १५ वर्षाचा सहवास काय गोडी लावणार? मुलांना स्वतःला आपणही याच मार्गाने जाणार हे दिसत असत. अन ते त्यांनी स्विकारलेलेही असते. बोला रहायच आहे लिव इन मध्ये?

In reply to by स्पंदना

@इनमिन १५ वर्षाचा सहवास काय गोडी लावणार? मुलांना स्वतःला आपणही याच मार्गाने जाणार हे दिसत असत. अन ते त्यांनी स्विकारलेलेही असते. बोला रहायच आहे लिव इन मध्ये? >>> बाप रे!!!!!!!!!!!!!!!

In reply to by स्पंदना

हे सगळे लग्न करून सुद्धा होऊ शकते की. म्हणजे मला हे दोन वेगवेगळे मुद्दे वाटत आहेत.

In reply to by स्पंदना

ज्यांची जन्मापासून अशी मनोधारणा तयार झाली असेल त्यांना कदाचित ह्यात कांही वावगं वाटतही नसेल. परंतु नात्यांची घट्ट वीण असणार्‍या आपल्या समाजात ही परिस्थिती फारच धक्कादायक म्हणावी अशी आहे. नात्यातील अत्युच्चतम ओलावा मुलं आणि आई-वडिलांमध्ये आणि त्यानंतर इतर रक्ताच्या नात्यात दिसून येतो. (अपवाद असतीलही पण फक्त नियम सिद्ध करण्यापुरते). तिथेच एवढी शुष्कता असेल तर आयुष्यातील इतर नातेसंबंधांची काय अवस्था असेल? माणुस हा पहिल्या पासून कळपात राहणारा प्राणी आहे. नातेसंबंध हा अशा कळपाला एकत्र धरून ठेवणारा समान धागा म्हणावा लागेल. त्याचीच वानवा असेल तर असा समाज ऐहिकतेपलीकडे कसा विचार करत असेल ह्याची कल्पना करता येत नाही.

जर का आप्ल्याला कोणतीच जबाब्दारी नको आणी स्वतन्त्र जगायच असेल तर, एकट किन्वा मित्र-मैत्रिनीन सोबत राह्ता येत. लीव-इन चि गरज काय? आणी जर फक्त वासना शमविण्याचा प्रश्न असेल (शब्द जरा वाईटच आहे पण...तेच खर पण आहे. ) तर मग वन-नाईट-स्टयाण्ड आहेतच...त्यात तर काहिच रेस्पोन्सीबिलिटी नसते. एका जागी राहायचि पण नाहि...

लग्न ही संस्था पुरुषसत्ताक आहे असं ऐकून आहे. मुलीनेच सासरी का जायचं ? तिनेच घरकाम का करायचं ? अपत्याच्या जबाबदा-या तिच्यावरच का ? सासू सास-यांच्या जबाबदा-या तिने घ्यायच्या पण तिच्या आईवडिलांबद्दल काय ? खूप कमी जोडप्यात वरील प्रश्नांचं सोल्युशन काढलेलं असतं. नाहीतर आनंदीआनंदच असतो सगळा. लिव इन म्हणजे स्वैराचार हे टोकाचं मत आहे. काही आयटी शहरात जागा शेअर करण्यातून झालेल्या लिव इन मधून झालेलं हे मत असणार. लिव -इन - रिलेशन म्हणजे विचारांती घेतलेल्या निर्णयाचाच आपण विचार करू. लग्नसंस्थेला पर्याय असला तर बिघडलं कुठं ? शेवटी लग्नसंस्था म्हणजे तरी काय आहे ? दुर्बल पुरुषाला त्याची बायको त्याच्यासोबत नांदण्याची समाजाने दिलेली ग्वाही अशीही व्याख्या करता येईल . पूर्वी एखाद्या बाहुबलीला कुणाची सुंदर स्त्री आवडली तर उचलून नेली जात होती. त्याच्याविरुद्ध अपील कुठं होतं ? आणि लग्नाचा नवरा काय करत होता ? अशा रक्षण करू न शकणा-या पुरुषाबरोबर राहण्याची ग्वाही कायद्याच्या राज्यात पुरुषाला मिळते. विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.

In reply to by खटासि खट

ही आंतरजालाची इच्छुकांस मिळालेली देणगी होय
लै भारी! बाय द वे, आता तुम्हीच लिव-इनवर चर्चा सुरु केलीये म्हणून प्रतिसाद देतो.
विवाहसंस्थेचे असे तोटे काढायचं म्हटलं तर लक्षात येईल कि ही संस्था पूर्णपणे पुरुषांच्या फायद्याची आहे.
हे एकांगी विधान आहे. मानवी जीवनाचा (स्त्री असो की पुरुष) समग्रतेनं (जन्म ते मृत्यू) विचार करुन विवाह ही संकल्पना निर्माण झालेली आहे. मानवी मुलाला स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वात प्रदीर्घ कालावधी लागतो (साधारण तेवीस ते पंचवीस वर्ष). या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.

In reply to by निराकार गाढव

ग ग म्हटलं कि प्रातःस्मरणीय गाढवाचा(च) आठवतो आठवणीनं. त्यातून निराकार असल्यानं वंदन करतो. - सावळा खट

In reply to by संजय क्षीरसागर

व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.
माझ्या जवळपास मात्र १७ वर्षापासुन ते ८५ वर्षापर्यंतची जोडपी एकत्र काही अपरिहार्य, काही जमतय का बघु असे म्हणुन, काही दोघांनाही कोणि इतर मिळाले नाहित म्हणुन, काही दोघांचीही गरज म्हणुन असे (लीव्ह-इन)राहात आहेत. काहि आनंदाने तर काही ना आनंद ना दुःख अश्या विचारात.

या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे.
लिव इन मधे राहून हे सर्व करता येणार नाही हे कशाच्या आधारावर ठरवलंय ? (त्यासाठी विवाहाची गरज काय ?)

In reply to by खटासि खट

एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो. त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे. >> याला काही आधार ? लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?

In reply to by खटासि खट

एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो.
मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?

In reply to by खटासि खट

म्हणजे चर्चेला दिशा राहील. वेगवेगवेगळे मुद्दे किंवा मुद्यांची पुनरावृत्ती टाळता येईल.
लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?
मूल हवं असेल तर रितसर लग्नाचा समाजमान्य पर्याय आहे. मग लिव-इन कशाला?
मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?
तुम्ही असफल विवाह आणि लिव-इन यांची सरमिसळ करतायं. असफल विवाहाची वेगळी कारणमिमांसा आहे. तुम्ही फक्त लिव-इन वर्सेस (सफल किंवा वेल अ‍ॅक्सेप्टेड) विवाह अश्या दृष्टीकोनातून तुमचे विचार लिहा.

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे ते लिहा ना, ते बरं पडेल. चर्चेसाठी तुम्हीच उत्सुक होता म्हणजे माहीतगार तुम्हीच. आम्ही मौजमजा, टाईमपास या कॅटेगरीत मोडणारे..

In reply to by खटासि खट

आदर्शची काही गरज नाही. तुम्ही स्वतः केलेले स्टेटमेण्टस का केले हा सोपा प्रश्न आहे उत्तरासाठी. तेव्हढी उत्तरं द्या. आग्रह नाही.

व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही. >> हे पण काय झेपलं नाय बाबा. लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?

In reply to by खटासि खट

मग तुमच्या दृष्टीनं लिव-इनचं वय काय? टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?
तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?
असफल विवाह हा वेगळा मुद्दा आहे. विवाहाला लिव-इन हा पर्याय आहे का असा विषय आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? त्यांचे वय किती होते? त्या मरेपर्यंत लिवईनमध्ये होत्या. आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते. काकूचे वय ४८-५० असेल. काकांचे वय ५०-५५. काकांना स्वतःची मुले आहेत काकूंना मुलबाळ नाही. दोघंही अगदी प्रतिष्ठितपणे आपापल्या समाजात वावरतात (दोघे वेगवेगळ्या जातींचे आहेत) तोंडावर तरी त्यांना नाव ठेवायची कुणाची हिंमत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला मुद्दे समजत नाहीत असं दिसतंय. तुम्ही एका ठिकाणी लिव इन २५ ते ४० वर्षे एकत्र राहणे असं म्हणता. सर्वात पहिल्यांदा हे स्टेटमेण्ट कसं काय केलं हे जाणून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. दुसरं म्हणजे विवाह बंधनात स्त्री पुरूष "समाधानी" असते तर वर सांगितलेलं झालं असतं का ? विवाह झाला म्हणजे स्त्री-पुरूष समाधानी होतात, सुखी होतात, त्यांची टक्केवारी किती याबद्दल तुमच्याकडे काही विदा आहे काय ?

In reply to by संजय क्षीरसागर

टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?
मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का? केवळ लग्न या संस्थेने त्यांना बांधून ठेवलंय म्हणून ते स्वतःशी आणि बायकोशी प्रतारणा करत जगतात का? मग लिव इन मधला प्रामाणिकपणा काय वाईट? केवळ भावनिक गुंतवणूक नाकारणे या कारणासाठी लिव इन वर टीका करत असाल, तर भावनिक नातं अजिबात नसूनही आयुष्यभर केवळ 'लग्न झालंय' म्हणून एकत्र राहणार्‍यांच्या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे?