टी एन शेषन , केजरीवाल अन भारत ....
आजच चार विधानसभांचे निवडणूक परिणाम प्राप्त झालेले आहेत. व त्यात भाजप ची सरकारे चारही राज्यात येणार हे दिसते आहे. भाजपाला असलेला पाठिंबा वाढला आहे का ? याचे उत्तर हे निकाल देउ शकणार नाहीत त्यासाठी मतदानाची आकडेवारी अभ्यासावी लागेल. आम आदमी चा दिल्लीतील उदय हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
पूर्वी एक नोकरशहा ने असा इतिहास घडवलेला आहे. त्यांचे नाव श्री टी एन शेषन . पण शेषन साहेब काही निवडून येउ
शकलेले नाहीत. केजरीवाल ना जे यश मिळालेले आहे त्याची दिलखुलास दाद देताना अण्णा हजारे यांची जीभ लटपटते आहे तर केजरीवाल यांची फजिती होणार आहे असे काही लिखित माध्यमाचे संपादक म्हणू लागले आहेत. केजरीवाल यानी एका अर्थाने असा इतिहास घडविला आहे ज्याची तुलना थोरले बाजीराव यांच्याशीच करावी लागेल. कारण लढाईत घुसून पलिकडच्या राजालाच अंबारीवरून खाली खेचण्याचे बाळासाहेब ठाकरे याना जमले नाही , ना उद्धवला ना राजला ! आता सुद्धा भाजपचे चौहान हे दोन ठिकाणी उभे होते. तसे केजरीवाल नी केले नसावे असे वाटते. बाकी एका वेळी दोन दोन मतदारसंघातून उभे राहण्याची चाल अनेक मान्यवर राजकारण्यानी खेळली होती असे इतिहास सांगतो. आम आदमी पक्षाचा विजय व १९८३ चा भारतीय संघाचा विजय यात एक साम्य आहे ."We could win the game because we had nothing to lose " असे वर्णन त्याच संघातील एका खेळाडूने केलेले होते. लालूप्रसाद ( तुरुंग फेम ) यानी व कपिल सिब्बल ( आज ते कोठे आहेत?) यानी हेळाळणीच्या स्वरांत निवडून या व कायदे बदला असे केजरीवालना बजावले होते. भारतीय जनतेची हेटाळणी करण्याची संवय जी उद्दाम राजकारण्याना त्यानी पोसलेल्या तथाकथित विश्लेषकाना झालेली आहे त्यांची थोडी तरी झोप केजरीवालनी उडविली आहे. पण खरे सांगायचे म्हटले तर अण्णा हजारे व फाळणीनंतर त्यांच्याकडे आलेल्या सैनिकाना हा धडा केजरीवालनी दिला आहे.
मी इथे बर्याच वेळा भाजपा व कोंग्रेस ची एक कार्यकर्ता कल्चर आहे. त्यांचा लोकांशी थेट संबंध नाही याचा उल्लेख वारंवार
केलेला होता. आज कुणी नाही तरी राहुल गांधीनी हा आपल्या राजकरणातील दोष ऑळखला आहे. सामान्य लोकांशी पाच वर्षे
संपर्क ठेवला तर भेळभत्ता , पैसे, पदे मागणारा कार्यकर्ता नावाची पंगत मांडावीच लागणार नाही हा तो विचार आहे. राजकारणी लोकांचा हा सवता सुभा जमीनदोस्त केल्याखेरीज लोकांच्या आकांक्षापर्यंत पोचता येणार् नाही हे त्याना कळू लागले आहे तर.
आज रॉबर्ट वद्रा यांच्या जमीनव्यवहाराचे खेळ उजेडात आणणार्या नोकरशहा वर आरोपपत्र तेथील सरकारने ठेवले आहे म्हणे! अरूण भाटियांची रवानगी कोणत्या एका नगण्य विभागात करण्यात आली होती हे सर्वाना आठवत असेलच.
बेकायदेशीर बांधकामे नियमित करावीत म्हणून नगरसेवक , आमदार उपोषणाला बसणार म्हणजे कहर आहे. अशा माहोलात
काम करणे केजरीवाल व त्यांचे साथीदार याना कठीण जाणार आहे. पण या जगात इमानदारी इतकी ताकद कशातच नसते
ती त्यानी ठेवली तर आशेचा नवा किरण ते जनतेला दाखवू शकतील. आता तरी अण्णा हजारे यातून धडा घेउन आम आदमी पार्टीला निदान नैतिक आधार देण्याचे धैर्य दाखवतील का ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
दिल्लीत केजरीवाल यांचा
केजरीवाल हा एक अत्यंत 'धूर्त'
ते यांच्यापेक्षाही
मुळात जातकुळी (पिंड) वेगळी
सहमत
माझंही असंच मत आहे.
सध्या
+१
आपण
काँग्रेस आता कशी "वागते" हे
एक आशेचा किरण!
आम्ही सामान्य लोक
बराचसा सहमत
सहमत
आता आप आणि बीजेपी हे दोघेही
छे हो.
आम आदमी पक्षाचा विजय व १९८३
महाराष्ट्रात संधी मिळाली तर
सगळ्यान मूर्ख बनविण्यात पटाईत
याला आधार काय ?
=))
आप पार्टी जर सत्ते वर येईल तर वीज चोरी वाढेलच केजरीवाल ती थांबवू
जे जे फुकट ते ते पोष्टीक
फूकट विषय दररोजचाच आहे.
डॉक्टर
बाकींच्याच माहित नाही.
लोकसभा
केजरीवाल यांनी मिळवलेले यश
हे फक्त एकट्या केजरीवाल यांचे
कोण केजरीवाल?