✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<नवविवाहिताचे बाबांस पत्र>

र
राजेश घासकडवी यांनी
Tue, 12/03/2013 - 06:01  ·  लेख
लेख
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे) प्रिय बाबा, प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे कटकटी, वैताग आणि 'बस बाई, तुझंच खरं' यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितक्या सिगरेटी ओढु नाहि शकत. मला सिगरेट ओढल्यानंतर तोंड धुणं गरजेच आहे. मी गबाळयासारखी घरभर बीयरच्या बाटल्या टाकू नाहि शकत. मी टापटीप राहाणं गरजेच आहे. वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत. वाटेल तितका वेळ मित्रांशी फोनवर बोलु शकत नाहि ........... मी ए़खाद्या राजकुमारासारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत. पण च्यायला एखाद्या नोकरापेक्षा बरी वागणूक नको मीळायला? मी मला हव्या त्या वेळी आणि हव्या त्या बारमध्ये मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत. आणि जायचं तर तुम्हाला भेटायला जातो असली भंपक कारणं द्यावि लागता..... एकेकदा मी स्वत: ला विचारतो , ' का बरं मी लग्न केलं असेल?'. खुप खुश होतो हो मी दोस्तांसोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत. खुप गप्पा माराव्याशा वाटतात. मला एकदा घरी यायचं आहे तुमच्याशी एकदा आमनेसामने बोलायला. माझ्या ठेवणीतल्या शिव्या चाखवायला. कारण अचानक मला जाणिव झाली कि तुम्ही हि पण लग्न केलसं ना? कशासाठी इतका त्याग केलात? आहे त्या मधे खुप समाधानी असल्याचं नाटक केलंत? तुम्हाला काय इतर गर्लफ्रेंडा नसत्या मिळाल्या........ आम्हि खुप शिकाव म्हणुन तुम्ही आणि मम्मीने घेतलेले श्रम आजहि आठवतात, पण च्यायला, संसार म्हणजे केवढा वैताग असतो हे शिकवलं असतं तर काही बिघडलं असतं का? तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर माझे जे काहि गोड गैरसमज होत ते कदाचित नसते. हे सर्व आठ्वून मी प्रचंड फ्रस्ट्रेट होतो आणि मला माझ्या नवरा असण्याचा अर्थ उमगतो. मुलाला संसाराचा त्रास व्हावा याच साठि बाप संसारात अडकून राहतो हेचं खरे. वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे. आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही सहन होऊ लागेल मला हळु हळू........................................... तुम्ही आणि मम्मीने केलेल्या फसवणुकी बद्द्ल आणि गैरसमजांबद्दल माझ्याकडून शिव्यांची लाखोली......... तेच माझ्या साठि लग्नाच्या बेडीत अकडवणारे ठरतात.......................................................
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
28873 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

लेकाहो....

बाबा पाटील
Tue, 12/03/2013 - 16:44 नवीन
दिवाळी पासुन मी हेच सांगत होतो,तर बॅट्याभाउ सोडला तर एक जण तोंड उघडायला तयार नव्हता.शेवटी आले एकदाचे सगळे.आखिल भारतीय पुरुष मुक्ती संघटनेचा कारभार आता तरी सुरु होइल अस वाटतय.
  • Log in or register to post comments

परवानगी मिळाली.

प्रभाकर पेठकर
Tue, 12/03/2013 - 16:49 नवीन
अशी सुचना मिपावर मांडायची मला, माझ्या बायकोकडून, परवानगी मिळाल्याने उत्साहाने मी तशी इच्छा माझ्या प्रतिसादातून व्यक्त केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

नक्कीच! पाटीलसायबांनी मनावर

बॅटमॅन
Tue, 12/03/2013 - 17:35 नवीन
नक्कीच! पाटीलसायबांनी मनावर घेतलं तर औघड काये आँ? एक उत्साही कार्यकर्ता म्हणून मी तर आहेच. बाकी पितामहांना सोडा, नव्या दमाच्या रक्तावरच आता भिस्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

पितामहांना सोडा

अभ्या..
Wed, 12/04/2013 - 02:26 नवीन
पितामहांना सोडा
हम्म त्यांना सोडाच द्या फक्त. ;) लै झाली आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अभ्या!

स्पंदना
Wed, 12/04/2013 - 03:27 नवीन
अभ्या! :)) आरं घास अडकला तोंडात. :)) किती हसू? किती हसू? :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/04/2013 - 10:13 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हाहाहाहाहाहा

बॅटमॅन
Wed, 12/04/2013 - 12:12 नवीन
हाहाहाहाहाहा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

झाल...

बाबा पाटील
Tue, 12/03/2013 - 17:01 नवीन
पितामहांनी लढाईच्या सुरुवातीसच तलवार म्यान केली...
  • Log in or register to post comments

बोथट

llपुण्याचे पेशवेll
Wed, 12/04/2013 - 10:53 नवीन
कींवा पितामहांची तलवार आताशा बोथट झाली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

या धाग्याच शतक होयलाच पायजे .

जेपी
Tue, 12/03/2013 - 17:37 नवीन
या धाग्याच शतक होयलाच पायजे . पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग व्हायलाय पायजे . अरे प्रतिसाद कुणाचा§§§§§§§§
  • Log in or register to post comments

तत्थ्यु काका

दिपक.कुवेत
Tue, 12/03/2013 - 19:14 नवीन
तुम्हि फक्त तुमचं नाव घ्या.......पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग लगेच होईल. चला नव्या दालनाचं नाव सुचवा बघु.....माझ्याकडुन असेल "मुक्ति"
  • Log in or register to post comments

मुक्ति नाव कसं Girlish वाटतं.

आनन्दिता
Tue, 12/03/2013 - 21:21 नवीन
मुक्ति नाव कसं Girlish वाटतं...." मोकाट" कसं वाटतय?? हाकानाका.... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

ते टोपणनाव .

प्यारे१
Tue, 12/03/2013 - 21:29 नवीन
ते टोपणनाव . बाकी 'अनाहिता'ला बरीच टोपण नावे असल्याचे 'विशेष' सूत्रांकडून समजते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

किंवा घुळी, कठाळ्या, वळू,

अभ्या..
Wed, 12/04/2013 - 02:29 नवीन
किंवा घुळी, कठाळ्या, वळू, सांड हे चालेल. शिंबॉल तर काय मोहेन्जोदारो पासून चालत आलेला वापरु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

झेंडू विसरला की काय? नाव ठरल

स्पंदना
Wed, 12/04/2013 - 03:29 नवीन
झेंडू विसरला की काय? नाव ठरल कधीच. घुगर्‍या झाल्या, पाळणा म्हंटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

झेंडू ..... बेक्कार !!!!

आनन्दिता
Wed, 12/04/2013 - 04:31 नवीन
झेंडू ..... :) =)) बेक्कार !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

आरे पुतण्या दिकु ,

जेपी
Tue, 12/03/2013 - 19:23 नवीन
आरे पुतण्या दिकु , हिथ कोण ईचारतय आमाला , त्या बायकांना आदीच झेंडु नाव दिलय पुरुष विभागाला . म्या पामर काय नाव देणार .
  • Log in or register to post comments

"मुक्ती " हा शब्द स्त्रीलिंगी

विजुभाऊ
Tue, 12/03/2013 - 20:28 नवीन
"मुक्ती " हा शब्द स्त्रीलिंगी आहे. विभागाचे नाव पुरुषीच हवे. " धुमाकूळ " कसे वाटतय नाव. ( ती मुक्ती.तो धुमाकूळ )
  • Log in or register to post comments

हैदोस ठेवा !!

सूड
Tue, 12/03/2013 - 20:38 नवीन
हैदोस ठेवा !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

प्रचंड अनुमोदन...+१००

शिद
Tue, 12/03/2013 - 21:40 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@ठेवा !! >>> धन्य.........

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/03/2013 - 23:05 नवीन
@ठेवा !! >>> =)) धन्य............... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जाहीर अनुमोदन!!!!!!!!!!!!!!!

बॅटमॅन
Wed, 12/04/2013 - 12:12 नवीन
जाहीर अनुमोदन!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हैदोस

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 12/05/2013 - 13:55 नवीन
संसदेत टेबल बडवतात तसे टेबल बडवुन जोरदार अनुमोदन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जास्त बडवू नका. हैदोस सुरु

प्यारे१
गुरुवार, 12/05/2013 - 13:57 नवीन
जास्त बडवू नका. हैदोस सुरु व्हायच्या आधी बंद व्हायचा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

असू द्या प्यारे भौ.

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 14:11 नवीन
असू द्या प्यारे भौ. 'बडवलेलेच' जास्त आहेत ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अबा ब्बा ब्बा ब्बा....! नको

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/05/2013 - 19:20 नवीन
अबा ब्बा ब्बा ब्बा....! Image removed. नको..नको..! अभ्या मेल्या...थांब की जरा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अब्याडब्या काय बे हे????????

बॅटमॅन
गुरुवार, 12/05/2013 - 19:23 नवीन
अब्याडब्या काय बे हे???????? फुटलो की राव =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मेलो

प्रसाद गोडबोले
Fri, 12/06/2013 - 13:08 नवीन
=)) अरे पण अभ्या , शिंग मोडुन वासरात शिरलेले वळु आवरणेच जास्त अवघड असते ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शिंग मोडुन वासरात शिरलेले वळु

बॅटमॅन
Fri, 12/06/2013 - 15:03 नवीन
शिंग मोडुन वासरात शिरलेले वळु आवरणेच जास्त अवघड असते
अगदी अगदी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

असू द्या प्यारे भौ.

अभ्या..
गुरुवार, 12/05/2013 - 14:12 नवीन
असू द्या प्यारे भौ. 'बडवलेलेच' जास्त आहेत ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बडवलेले कसा घालणार, हैदोस ???

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 12/05/2013 - 20:45 नवीन
बडवलेले कसा घालणार, हैदोस ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

धांगडधिंगा...

प्रभाकर पेठकर
Tue, 12/03/2013 - 20:40 नवीन
'घुमाकुळ' पेक्षा 'धांगडधिंगा' हा शब्द, पुरुषीवृत्तीला, जास्त जवळचा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

काय आरती चाललीय स्वतःची तरी.

स्पंदना
Wed, 12/04/2013 - 03:31 नवीन
काय आरती चाललीय स्वतःची तरी. ____/\___!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हे: हे: हे:

प्रभाकर पेठकर
Wed, 12/04/2013 - 10:29 नवीन
महिलांची झाली, आता आमची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

झक्कास!

सोत्रि
Tue, 12/03/2013 - 20:37 नवीन
वाहव्वा गुर्जी! मझा आ गया!! -(गुर्जीँचा विद्यार्थी) सोकाजी
  • Log in or register to post comments

हैदोस

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 12/03/2013 - 21:28 नवीन
या नावाला प्रणाम __/\__ __/\__ ..जबरदस्त
  • Log in or register to post comments

धुमाकूळ विभाग झालाच पाहिजे !!

खटपट्या
Tue, 12/03/2013 - 23:16 नवीन
धुमाकूळ विभाग झालाच पाहिजे !!!! पुरुष मुक्ती (मुक्ती नको, स्त्रीलिंगी होतेय परत) पुरुष धुमाकूळ झिंदाबाद !!!!
  • Log in or register to post comments

पुरुषविभाग - नाव

राजेश घासकडवी
Wed, 12/04/2013 - 03:20 नवीन
या लेखाच्या निमित्ताने मिपाकरांची पुरुष विभागाची मागणी पुन्हा उठून उभी राहिली आहे हे पाहून बरं वाटलं. तर विभागाला नाव दिल्याशिवाय तो सुरू कसा करणार, हा प्रश्न बरोबरच आहे. पण आत्तापर्यंत सुचवलेली नावं ही फारच दांडगट वाटताहेत. माझ्या मते नावासाठी काही निकष आहेत. मी काही उदाहरणं देतो, तशी नावं निवडण्याचा प्रयत्न करा. अपाशवी नलाघवी अजाबलिन संपादित
  • Log in or register to post comments

नतदृष्ट? अच्रत बव्लत?

यशोधरा
Wed, 12/04/2013 - 05:33 नवीन
नतदृष्ट? अच्रत बव्लत? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

चालेल

वेताळ
Wed, 12/04/2013 - 10:47 नवीन
सख्याहरी हे ठेवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अजाबलिन म्हन्जे कै रे भौ ??

खटपट्या
गुरुवार, 12/05/2013 - 00:30 नवीन
अजाबलिन म्हन्जे कै रे भौ ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पुरुष विभागाला

आशु जोग
गुरुवार, 12/05/2013 - 10:54 नवीन
पुरुष विभागाला संपादित असं नाव का सुचवल्या(!) गेले आहे? बा द वे दुहेरी निष्ठेमुळे जनता सरकार पडलं माहित आहे ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पुरुष विभागाला

राजेश घासकडवी
Fri, 12/06/2013 - 22:13 नवीन
पुरुष विभागाला संपादित असं नाव का सुचवल्या(!) गेले आहे?
कृपया गैरसमज नसावा. तो शब्द संपादकांनी लिहिलेला आहे. मी जे काही निकष लिहिलेले होते ते संपादित झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

स्त्रीलिंगी / पुल्लिंगी

वामन देशमुख
गुरुवार, 12/05/2013 - 21:26 नवीन
पुरुष विभागाची मागणी पुन्हा उठून उभी राहिली आहे
मागणी = स्त्रीलिंगी पुरवठा = पुल्लिंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आर पार गेला तीर....! बाबान्ना

तुषारहुषार
Wed, 12/04/2013 - 08:21 नवीन
आर पार गेला तीर....! बाबान्ना पथवतो हेच पत्र....!
  • Log in or register to post comments

हे "इंटुक" म्हणजे काय?

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/04/2013 - 14:42 नवीन
हे "इंटुक" म्हणजे काय? (अज्ञानी) इए
  • Log in or register to post comments

इंटेलेक्च्युअल चे आखूड रूप.

बॅटमॅन
Wed, 12/04/2013 - 14:44 नवीन
इंटेलेक्च्युअल चे आखूड रूप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

असं होय? ध्न्स अ मिल्येन !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/04/2013 - 14:45 नवीन
असं होय? ध्न्स अ मिल्येन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

म्ह्णजे मर्र्हाठी भाषेत हुच्च

प्रचेतस
Wed, 12/04/2013 - 15:12 नवीन
म्ह्णजे मर्र्हाठी भाषेत हुच्च काय रे बॅट्या? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हुच्च अन हुच्चभ्रू!!! ब्रोब्र

बॅटमॅन
Wed, 12/04/2013 - 15:14 नवीन
हुच्च अन हुच्चभ्रू!!! ब्रोब्र रे वल्ली =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा