✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<नवविवाहिताचे बाबांस पत्र>

र
राजेश घासकडवी यांनी
Tue, 12/03/2013 - 06:01  ·  लेख
लेख
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे) प्रिय बाबा, प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे. तर त्याहि पलिकडे लग्न म्ह्णजे कटकटी, वैताग आणि 'बस बाई, तुझंच खरं' यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितक्या सिगरेटी ओढु नाहि शकत. मला सिगरेट ओढल्यानंतर तोंड धुणं गरजेच आहे. मी गबाळयासारखी घरभर बीयरच्या बाटल्या टाकू नाहि शकत. मी टापटीप राहाणं गरजेच आहे. वाटेल तितका वेळ लोळू नाहि शकत. वाटेल तितका वेळ मित्रांशी फोनवर बोलु शकत नाहि ........... मी ए़खाद्या राजकुमारासारखी मला वागणू़क मीळावी अस नाहि म्ह्णत. पण च्यायला एखाद्या नोकरापेक्षा बरी वागणूक नको मीळायला? मी मला हव्या त्या वेळी आणि हव्या त्या बारमध्ये मनाला वाटेल तेव्हा नाहि जाउ शकत. आणि जायचं तर तुम्हाला भेटायला जातो असली भंपक कारणं द्यावि लागता..... एकेकदा मी स्वत: ला विचारतो , ' का बरं मी लग्न केलं असेल?'. खुप खुश होतो हो मी दोस्तांसोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत. खुप गप्पा माराव्याशा वाटतात. मला एकदा घरी यायचं आहे तुमच्याशी एकदा आमनेसामने बोलायला. माझ्या ठेवणीतल्या शिव्या चाखवायला. कारण अचानक मला जाणिव झाली कि तुम्ही हि पण लग्न केलसं ना? कशासाठी इतका त्याग केलात? आहे त्या मधे खुप समाधानी असल्याचं नाटक केलंत? तुम्हाला काय इतर गर्लफ्रेंडा नसत्या मिळाल्या........ आम्हि खुप शिकाव म्हणुन तुम्ही आणि मम्मीने घेतलेले श्रम आजहि आठवतात, पण च्यायला, संसार म्हणजे केवढा वैताग असतो हे शिकवलं असतं तर काही बिघडलं असतं का? तुम्हि दोघांनी संसार केला नसतात तर माझे जे काहि गोड गैरसमज होत ते कदाचित नसते. हे सर्व आठ्वून मी प्रचंड फ्रस्ट्रेट होतो आणि मला माझ्या नवरा असण्याचा अर्थ उमगतो. मुलाला संसाराचा त्रास व्हावा याच साठि बाप संसारात अडकून राहतो हेचं खरे. वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे. आणी लग्ना नन्तरचं आयुश्यही सहन होऊ लागेल मला हळु हळू........................................... तुम्ही आणि मम्मीने केलेल्या फसवणुकी बद्द्ल आणि गैरसमजांबद्दल माझ्याकडून शिव्यांची लाखोली......... तेच माझ्या साठि लग्नाच्या बेडीत अकडवणारे ठरतात.......................................................
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
28873 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

अप्रतिम..

शेखर
Tue, 12/03/2013 - 06:19 नवीन
अप्रतिम विडंबन ... झकास .
  • Log in or register to post comments

थोडीफार सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/04/2013 - 05:47 नवीन
पण यापेक्षा <नवविवाहिताचं गर्लफ्रेंडला पत्रं> लिहायचंत की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

मधला मजकूर गेला ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/04/2013 - 05:48 नवीन
मधला मजकूर गेला ... पण यापेक्षा (नवविवाहिताचं गर्लफ्रेंडला पत्रं) लिहायचंत की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आणखी एक पुरवणी

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/04/2013 - 05:53 नवीन
एक पत्र, अनेक पत्रं हे शुद्धलेखन माहित्ये. पण लेखाच्या मूडनुसार शुद्धलेखन झोपवायचा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसाद टंकण्याबद्दल काही

प्यारे१
Wed, 12/04/2013 - 12:20 नवीन
प्रतिसाद टंकण्याबद्दल काही म्हणणं नाही पण जाणीवपूर्वक पहिल्या पानावर नि पहिल्या पाचसात प्रतिसादात नाव दिसावं ही धडपड कायमच असते काय? आजचा सुविचार (शब्दरचना: सूड) : न्हाई न्हाई म्हनायचं नि पायलीभर हानायचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लई दिसांनी आईकली/वाचली ही म्हन !!

सूड
Wed, 12/04/2013 - 17:37 नवीन
>>न्हाई न्हाई म्हनायचं नि पायलीभर हानायचं! लई दिसांनी आईकली/वाचली ही म्हन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गुरुजी तुम्ही सुद्धा या

आशु जोग
Wed, 12/04/2013 - 23:35 नवीन
गुरुजी तुम्ही सुद्धा या म्हणीचा आज अर्थ कळला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

****

जेपी
Tue, 12/03/2013 - 06:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments

मुलाला संसाराचा त्रास व्हावा

स्पंदना
Tue, 12/03/2013 - 08:20 नवीन
मुलाला संसाराचा त्रास व्हावा याच साठि बाप संसारात अडकून राहतो हेचं खरे.
खंप्लिट साष्टांग.
  • Log in or register to post comments

अरे वा वा!

पैसा
Tue, 12/03/2013 - 08:40 नवीन
पुरुष विभागाचा धागा का? बरं बरं. बेशुद्धलेखन उत्तम जमलंय.
  • Log in or register to post comments

+१

विकास
Tue, 12/03/2013 - 09:58 नवीन
एकदम सहमत. सुधीर मोघ्यांची या निमित्ताने एक कविता आठवली... लक्षात नव्हती पण थोडीशी जालावर मिळाली. 'खरं म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो.. एका दुर्लभ क्षणी.. एक चेहरा आपल्याला भेटतो.. अक्कल गहाण पडते.. भेजा कामातून जातो.. टक्क उघडय़ा डोळय़ांनी आपण चक्क लग्न करतो.. त्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं.. बायको नावाचं वेगळंच प्रकरण आपल्यापुढे येतं.. हा दारुण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का?.. सगळय़ा मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं का?' आनंद मोडक यांनी त्यांना (मोघ्यांना) दुसरी बाजू विचारली तेंव्हा त्यांनी त्याला खालील उत्तर दिले: 'सगळे पुरुष एकजात ढोंगी कांगावखोर बायको म्हणजे त्यांना वाटते नाचणारी लांडोर लग्नाआधी ज्याच्यासाठी तिच्यावर जीव टाकतात त्याच गोष्टी लग्नानंतर त्यांचा जीव खातात प्रेयसी कशी स्मार्ट, चंट आणि बिनधास्त हवी लग्नानंतर मात्र तिची काकूबाई व्हावी प्रत्येक पुरुषी भेजात हा सावळा गोंधळ का? सगळय़ा मुलांचं लग्नानंतर हे अस्संच होतं का?'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=)=)

लॉरी टांगटूंगकर
Tue, 12/03/2013 - 08:41 नवीन
=)=)
  • Log in or register to post comments

मस्त

मुक्त विहारि
Tue, 12/03/2013 - 08:49 नवीन
झक्कास विडंबन...(असे नुसते म्हणायला, पण खरे तर, तुम्ही पुरुषांवर होणार्‍या अन्यायावर एक उत्तम लेख लिहिला आहे....)
  • Log in or register to post comments

एकेकदा मी स्वत: ला विचारतो ,

अनुप ढेरे
Tue, 12/03/2013 - 09:32 नवीन
एकेकदा मी स्वत: ला विचारतो , ' का बरं मी लग्न केलं असेल?'. खुप खुश होतो हो मी दोस्तांसोबत.
सहमत!! विडंबन मस्तच...
  • Log in or register to post comments

आता वाटतय हायलाइट केलेल

अनुप ढेरे
Tue, 12/03/2013 - 09:34 नवीन
आता वाटतय हायलाइट केलेल वाक्यं खूप द्वयर्थक आहे. मी साध्या अर्थाशी सहमत अस म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/03/2013 - 09:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रणाम स्वीकारावा गुर्जी.

मृत्युन्जय
Tue, 12/03/2013 - 10:26 नवीन
प्रणाम स्वीकारावा गुर्जी. :)
  • Log in or register to post comments

खर आहे....खरी व्यथा मांडलीत भाऊ

वेताळ
Tue, 12/03/2013 - 10:27 नवीन
किती किती मनाला बरे वाटले म्हणुन सांगु तुम्हाला.....
  • Log in or register to post comments

बरं लिहलय! मजा आली

अग्निकोल्हा
Tue, 12/03/2013 - 10:31 नवीन
पण सुरवात मस्त होउनही शेवट तोचतोच पणा मधे अडकलाय.
  • Log in or register to post comments

शेवट तोचतोच पणा मधे अडकलाय.

राजेश घासकडवी
Tue, 12/03/2013 - 10:34 नवीन
शेवट तोचतोच पणा मधे अडकलाय.
पण तसं होणार नाहीतर काय होणार? शेवटी पुरुषच असतात पुरुषांचे शत्रू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

पण पुरुषस्वातंत्र्याच्या

अग्निकोल्हा
Tue, 12/03/2013 - 12:32 नवीन
पण पुरुषस्वातंत्र्याच्या अभिव्याक्तिचा समग्र मागोवा घेण्यात लेख थोडा कमी पडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पण मुळात पुरुषस्वातंत्र्य अशी

कवितानागेश
Tue, 12/03/2013 - 15:22 नवीन
पण मुळात पुरुषस्वातंत्र्य अशी कुठली गोष्ट अस्तित्वातच नाही. मागोवा घेणार तरी कशाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

या विषयाला अनुसरून आठवलेले

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 12/03/2013 - 10:33 नवीन
या विषयाला अनुसरून आठवलेले गाणे घाल घाल दारु दोस्ता माझ्या या ग्लासात बीडी काडी चखण्याची कर बरसात टाईट आहे जावई सांग सासर्‍यांच्या कानात त्यांच्या कडे पाहुनीया मन खंतावत विसरलास का रे लगनाला वर्स झाल पहिल्या सारख आता लेका काही नाही उरल फिरुन फिरुन शॉपिंग करुन पाय दुखतात तरी सुध्दा काही वस्तु घ्यायच्या रहातात अमेरिकेतली मेव्हणी, चिवट आहे फार तिचा फोन आला की रे, होतो मी बेजार दोस्त सारे माझ्या नावे फोडतात खडे लग्ना नंतर माजलो मी म्हणतात वेडे सुपात आहेत साले, लवकर पडतील जात्यात सुखी संसाराची भोळे स्वप्न पाहतात विंबल्डन सुरु झाले जीव व्याकुळला लग्ना नंतर रिमोटही तिच्या हाती गेला घाल घाल दारु दोस्ता माझ्या या ग्लासात बीडी काडी चखण्याची कर बरसात
  • Log in or register to post comments

+ १....

मुक्त विहारि
Tue, 12/03/2013 - 11:20 नवीन
जबरा.... आत्ताच मुलाला वाचायला दिली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

+२....

दिपक.कुवेत
Tue, 12/03/2013 - 19:07 नवीन
परीस्थीती (विवाहित पुरुषांची) अगदि तंतोतंत खरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पाय कुठे आहेत पैजार बुवा!!

स्पंदना
Tue, 12/03/2013 - 11:26 नवीन
पाय कुठे आहेत पैजार बुवा!! इकडे पाठवुन द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पाय कुठे आहेत पैजार बुवा!!

अभ्या..
Tue, 12/03/2013 - 15:32 नवीन
पाय कुठे आहेत पैजार बुवा!! इकडे पाठवुन द्या!
मुलगा कवटाळून बसलाय. सोडले की पाठवतील. ;) . . बाकी गुर्जींना दंडवत. अप्रतिम विडंबनाबाबत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

घाल घाल दारु दोस्ता माझ्या या

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/03/2013 - 13:36 नवीन
घाल घाल दारु दोस्ता माझ्या या ग्लासात बीडी काडी चखण्याची कर बरसात पैजारबुवा, _______________________>>> =)) __/\__ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

दंडवतच!!

सूड
Tue, 12/03/2013 - 14:29 नवीन
दंडवतच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

भारी !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 12/03/2013 - 16:32 नवीन
भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

*****

जेपी
Tue, 12/03/2013 - 10:35 नवीन
दंडवत बुवा .
  • Log in or register to post comments

झकास..!!

पिलीयन रायडर
Tue, 12/03/2013 - 10:36 नवीन
झकास..!!
  • Log in or register to post comments

दंडवत!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 12/03/2013 - 11:30 नवीन
दंडवत! 'ही लग्नसंस्था साली फार माजली आहे' हे तुमचेच सुवचन आठवून (आणि आयटीत असल्यामुळे) अंमळ हळवा झालो! :ड
  • Log in or register to post comments

आगागागागा!

प्यारे१
Tue, 12/03/2013 - 12:16 नवीन
आगागागागा! मान गये घासुशेट! ___/\___ पैजार बुवा ना पण दंडवत.
  • Log in or register to post comments

ठ्ठो!!!! =))

बॅटमॅन
Tue, 12/03/2013 - 12:22 नवीन
ठ्ठो!!!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

छान

रमताराम
Tue, 12/03/2013 - 12:38 नवीन
फक्त बायकोमुळे हिरावल्या गेलेल्या स्वातंत्र्याबाबत असलेल्या सूचीत दारु नि सिग्रेट यांचाच उल्लेख सातत्याने होतो हे खटकते. कदाचित बहुसंख्येने यापलिकडचे स्वातंत्र्य जसे वैचारिक, सामाजिक स्वरूपाचे - असते याचा विचारच केला नसावा. खरंतर खंत व्यक्त करायचीच झाली तर त्याबद्दलची अधिक तीव्र हवी असे मला प्रामाणिकपणे वाटते. निदान लेखक गुर्जी असल्याने ती अपेक्षा अधिक होती. -(मद्यप्रेमी, सिग्रेटद्वेष्टा) रमताराम
  • Log in or register to post comments

हा सीरियस प्रतिसाद आहे ?

प्यारे१
Tue, 12/03/2013 - 12:43 नवीन
हा सीरियस प्रतिसाद आहे ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

कुणी

रमताराम
Tue, 12/03/2013 - 13:18 नवीन
कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सहमत!

बॅटमॅन
Tue, 12/03/2013 - 12:49 नवीन
पुरुषांच्या स्वातंत्र्याच्या व्याख्याच इतक्या मर्यादित केलेल्या पाहून एक पुरुष म्हणून शरम वाटल्या गेली आहे. ( निव्वळ अखंड चखणाप्रेमी ) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मनातलं बोललात.

अग्निकोल्हा
Tue, 12/03/2013 - 12:50 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ररांशी सहमत आहे.

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 12/03/2013 - 12:53 नवीन
ररांशी सहमत आहे. इंग्रज कसे आधि व्यापारा साठी आले आणि मग राज्यकर्ते झाले. तशी लग्नानंतर वाटाघाटींची सुरुवात दारु सिग्रेट ने होते आणि मग पुरुष नकळत सारे राज्य गमावुन बसतो. त्यामुळे दारु आणि सिग्रेटचा सिंबॉलीक वापर पुरुषवर्गाकडुन होत असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हाहाहाहा

मी_आहे_ना
Tue, 12/03/2013 - 14:21 नवीन
-^- झकास प्रतिसाद -^- हा दुसरा दंडवत आपल्या काव्याला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

दारु आणि सिग्रेटचा सिंबॉलीक

राजेश घासकडवी
Tue, 12/03/2013 - 19:02 नवीन
दारु आणि सिग्रेटचा सिंबॉलीक वापर पुरुषवर्गाकडुन होत असावा.
यग्झ्याक्टली. दारू आणि सिग्रेट ही निव्वळ प्रतीकं आहेत - डोक्याला नसलेल्या कटकटीची. 'हर फिक्र को धुए मे उडाता चला गया' या गाण्यातून तेच सुचवलेलं आहे. डोक्यावर कुठचंही ओझं नसलेला आर्मीमधला कप्तान बिनधास्तपणे उंडारतो, तसं उंडारणं हे पुरुषांच्या मनात दडलेलं स्वप्न असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

खरंतर खंत व्यक्त करायचीच झाली

राजेश घासकडवी
Tue, 12/03/2013 - 19:10 नवीन
खरंतर खंत व्यक्त करायचीच झाली तर त्याबद्दलची अधिक तीव्र हवी असे मला प्रामाणिकपणे वाटते.
हे झालं नाही कारण पडलेली कलात्मक बंधनं. मूळ लेखाच्या ढाच्याप्रमाणे विडंबन होणं ही कलात्मक गरज होती. सिग्रेट, दारू ही खरी तर प्रतीकंच आहेत. पण या कलाकृतीतून व्यापक संदेश येत नाही असं म्हणत आहात तेव्हा तो कलाकृतीचा दोष म्हणावा की वाचकाचा हे कळत नाही. कारण मानवी मानसजीवनाच्या एका महत्त्वाच्या पैलूवर भाष्य आहे. फ्रॉइडने म्हटलं की प्रत्येक पुरुषाचा आपल्या वडिलांवर राग असतो. मात्र त्याची कारणमीमांसा चुकली. या लेखात त्याचं 'बापावरचा राग संसाराबद्दल चुकीचं चित्र निर्माण केल्याबद्दल असतो' हे पर्यायी कारण दिलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हिरावल्या गेलेल्या

विजुभाऊ
Tue, 12/03/2013 - 20:26 नवीन
हिरावल्या गेलेल्या स्वातंत्र्याबाबत असलेल्या सूचीत दारु नि सिग्रेट यांचाच उल्लेख सातत्याने होतो हे खटकते दारू जाळते. सिग्रेट जळते. जाळलेल्या आणि जळालेल्या स्वातन्त्र्याचे प्रतीक म्हणून या दोन गोष्टी वापरल्या जातात. संपादित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

_____/\______

आशु जोग
Tue, 12/03/2013 - 13:48 नवीन
_____/\______ शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथच जिंकलस मित्रा
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन

मी_आहे_ना
Tue, 12/03/2013 - 14:23 नवीन
बरेच दिवसांनी मिपावर एक मस्त विडंबन वाचल्याचा आनंद दिल्याबद्दल स.पु.मंडळ गुर्जींचे आभारी आहे.
  • Log in or register to post comments

मस्तं.

प्रभाकर पेठकर
Tue, 12/03/2013 - 16:19 नवीन
मस्तं विडंबन. ठुसठुसती जखम भळाभळा वाहू लागली. मिपावर 'स्वतंत्र पुरुष विभाग' (म्हणजे पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग, स्वतंत्र पुरुषांसाठी एक विभाग नाही, नाहीतर तो रिकामाच राहायचा), नाही ह्याचे प्रचंड दु:ख होते आहे.
  • Log in or register to post comments

(म्हणजे पुरुषांसाठी स्वतंत्र

llपुण्याचे पेशवेll
Wed, 12/04/2013 - 10:52 नवीन
(म्हणजे पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग, स्वतंत्र पुरुषांसाठी एक विभाग नाही, नाहीतर तो रिकामाच राहायचा) हे टाकलेत म्हणून बरे, कारण स्वतंत्र पुरुष नावाचा प्रकार तात्विकदृष्ट्या सिद्ध करता येतो पण प्रत्यक्षात असंत नाही. ज्या अविवाहीत पुरुषाना आपण स्वतंत्र आहोत असे वाटते त्याना मी सांगू इच्छितो की तो भ्रमच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नक्की का?

बॅटमॅन
Wed, 12/04/2013 - 12:13 नवीन
नक्की का? मी स्वतंत्र आहे हा भ्रम कसा काय? आता कुठलाही माणूस कसा स्वतंत्र नस्तो वैग्रे सांगू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा