व्यायाम हा प्रत्येक आणि प्रत्येक जणाला किती महत्वाचा आहे हे सगळेच जाणतात. ते नव्याने सांगायला नको. पण तो न केला जाण्याची जी अनेक कारणं असतात त्यापैकी जास्तीत जास्त जणांना लागू होणारी आणि टॉप ३ कारणं अशी असतील.
१. कंटाळा
२. वेळच नाही (याचं खरं कारण क्र.१ आहे)
३. त्यापेक्षा सोप्पं काहीतरी सांग ना
पण या तिन्ही कारणांचं समाधान करणारी व्यायामाची एक पद्धती आहे. जिला सर्किट ट्रेनिंग म्हणतात. इथे सर्किट म्हणजे व्यायामप्रकारांची एकामागोमाग केलेली जोडणी. ४ ते ५ मोजके व्यायामप्रकार घेऊन ते एकामागोमाग ठराविक वेळ, किंवा ठराविक वेळा केले जातात आणि असं ठराविक वेळ/ठराविक वेळा केलं जातं.
तुम्हाला काही विशिष्ट शारीरिक समस्या नसेल तर सर्किट ट्रेनिंग कुणालाही (वयाचं तसं बंधन नाही; १५ ते ६५ या साधारण मर्यादा) करता येतं (आपापल्या परीने) आणि व्यायामाचा आनंद घेता येतो. यात शक्यतोवर आपल्या शरीराचं वजन वापरूनच व्यायाम केला जातो, त्यात अतिरिक्त वजन/डंबेल्स इत्यादींची गरज लागत नाही. व्यायामाचा रोख स्नायूंची ताकद वाढवण्याकडे असतो; आकार वाढणं हे ‘बाय प्रॉडक्ट’ असतं.
साधारणपणे सर्किट ट्रेनिंग २०-३० मिनिटात संपतं. यात विश्रांती कमी असते, त्यामुळे ती २०-३० मिनिटं तुमचा पल्स रेट ऑप्टिमम हाय ठेवणं हे उद्दिष्ट असतं. यात कार्डिओ आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा मिलाफ साधला जातो त्यामुळे ही पद्धत बरीच लोकप्रिय आहे. बारीक व्हायचं असो त्याचबरोबर शरीर टोन करायचं असो; किंवा जस्ट टू मेंटेन असो; सर्किट ट्रेनिंग ला संधी द्यायला हरकत नाही.
(खाण्याचा विषय आणल्याशिवाय चैन पडत नाही) खाण्याची रेसिपी करावी; म्हणजे, कुणाला साखर चालत नाही, मग गूळ घालावा, तिखट कमी, मसाला जास्त वगैरे वगैरे, तसं हे सर्किट ट्रेनिंग कस्टमाईझ करता येतं. पण त्यासाठी मुळात व्यायामप्रकारांची माहिती असणं गरजेचं.
मी माझ्या माहितीच्या आणि थोडक्या अनुभवाच्या आधारे एक सर्किट ट्रेनिंग डिझाईन केलंय, जे, साधारणपणे सगळ्यांना करता येईल; ते इथे शेअर करतोय; २० मिनिटात हा व्यायाम करून होतो. पण ती २० मिनिटं तुम्ही शिस्तीत दिल्याप्रमाणे व्यायाम करणं जरूरीचं आहे, त्याशिवाय इफेक्ट वाटणार नाही. बघा करून महिनाभर; सांगा कसं वाटतं ते.


वाचने
50565
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्म.......
In reply to अतिशय उपयुक्त धागा by दिपक.कुवेत
प्लॅन्क नेमाने केलां, तर पुढे
In reply to म्म....... by वेल्लाभट
मस्त धागा.. स्वानुभव..
एक उपयोगी पूरक व्यायामप्रकार...
In reply to मस्त धागा.. स्वानुभव.. by उपास
३. जर व्यायालाचे रिझ्ल्ट दिसायला हवे असतिल तर खाण्यावर ताबा अत्यंत अत्यंत महत्त्वाचा!यासाठी खालील व्यायामप्रकार करा: १. काहीही खाताना पहिल्यांदा योग्य इतकेच वाढून घ्या. २. स्वत: अथवा इतर कोणी केलेल्या दुसर्या वाढपाच्या वेळी स्वतःची हनुवटी स्वतःच्या एका खांद्यापासून दुसर्या खांद्यापर्यंत कमीत कमी तीनदा तरी फिरवा... गरज पडल्यास आवश्यक तेवढ्या जास्त वेळेस. हमखास फायदा होतो :)शंभर टक्के सहमत
In reply to एक उपयोगी पूरक व्यायामप्रकार... by डॉ सुहास म्हात्रे
छान धागा.
गेल्या चार दिवसांपासून
ये हुई ना बात!
In reply to गेल्या चार दिवसांपासून by इष्टुर फाकडा
तीनही अॅडिशन्स स्वागतार्ह
In reply to गेल्या चार दिवसांपासून by इष्टुर फाकडा
सगळ्यांना कामाला लावले या
वा वा! कीप इट अप!
In reply to सगळ्यांना कामाला लावले या by ज्ञानोबाचे पैजार
मस्त...
आठवड्यातून तीन वेळा सेक्स हा
(No subject)
In reply to आठवड्यातून तीन वेळा सेक्स हा by विजुभाऊ
गप झोपा.
In reply to आठवड्यातून तीन वेळा सेक्स हा by विजुभाऊ
आम्ही गेमाडपंथी नाही
In reply to गप झोपा. by प्रभाकर पेठकर
हाण्ण तेच्या........ छप्पर
In reply to गप झोपा. by प्रभाकर पेठकर
सेक्स हे व्यायामासाठी करतात?
In reply to आठवड्यातून तीन वेळा सेक्स हा by विजुभाऊ
SEX AFTER MARRIAGE – ONCE A
In reply to सेक्स हे व्यायामासाठी करतात? by सुबोध खरे
आज व्यायाम चुकवीन म्हटलं तर
पोट सुटलय.......
हंसा आठवली
In reply to पोट सुटलय....... by ज्ञानव
हा हा
In reply to हंसा आठवली by वेल्लाभट
उत्तम माहितीपूर्ण धागा
फिट्नेस चा मुल्मन्त्र
या धाग्याबद्दल वेल्लाभट यांचे
थ्यांक्यू !
In reply to या धाग्याबद्दल वेल्लाभट यांचे by संदीप डांगे
सल्ला
थोडं देउ का माझ्याकडचं =))
In reply to सल्ला by लालगरूड
खिक्क ... :-D काहीही हं ची
In reply to थोडं देउ का माझ्याकडचं =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा ची कोण
In reply to खिक्क ... :-D काहीही हं ची by लालगरूड
आपले चिमणराव ... :-D
In reply to हा ची कोण by टवाळ कार्टा
मी पण मी पण.. ३० किलो सहज..
In reply to थोडं देउ का माझ्याकडचं =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
१०० झाल्यव झाल्यबद्दल