२० मिनिटात होणारा व्यायाम - सर्किट ट्रेनिंग
व्यायाम हा प्रत्येक आणि प्रत्येक जणाला किती महत्वाचा आहे हे सगळेच जाणतात. ते नव्याने सांगायला नको. पण तो न केला जाण्याची जी अनेक कारणं असतात त्यापैकी जास्तीत जास्त जणांना लागू होणारी आणि टॉप ३ कारणं अशी असतील.
१. कंटाळा
२. वेळच नाही (याचं खरं कारण क्र.१ आहे)
३. त्यापेक्षा सोप्पं काहीतरी सांग ना
पण या तिन्ही कारणांचं समाधान करणारी व्यायामाची एक पद्धती आहे. जिला सर्किट ट्रेनिंग म्हणतात. इथे सर्किट म्हणजे व्यायामप्रकारांची एकामागोमाग केलेली जोडणी. ४ ते ५ मोजके व्यायामप्रकार घेऊन ते एकामागोमाग ठराविक वेळ, किंवा ठराविक वेळा केले जातात आणि असं ठराविक वेळ/ठराविक वेळा केलं जातं.
तुम्हाला काही विशिष्ट शारीरिक समस्या नसेल तर सर्किट ट्रेनिंग कुणालाही (वयाचं तसं बंधन नाही; १५ ते ६५ या साधारण मर्यादा) करता येतं (आपापल्या परीने) आणि व्यायामाचा आनंद घेता येतो. यात शक्यतोवर आपल्या शरीराचं वजन वापरूनच व्यायाम केला जातो, त्यात अतिरिक्त वजन/डंबेल्स इत्यादींची गरज लागत नाही. व्यायामाचा रोख स्नायूंची ताकद वाढवण्याकडे असतो; आकार वाढणं हे ‘बाय प्रॉडक्ट’ असतं.
साधारणपणे सर्किट ट्रेनिंग २०-३० मिनिटात संपतं. यात विश्रांती कमी असते, त्यामुळे ती २०-३० मिनिटं तुमचा पल्स रेट ऑप्टिमम हाय ठेवणं हे उद्दिष्ट असतं. यात कार्डिओ आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा मिलाफ साधला जातो त्यामुळे ही पद्धत बरीच लोकप्रिय आहे. बारीक व्हायचं असो त्याचबरोबर शरीर टोन करायचं असो; किंवा जस्ट टू मेंटेन असो; सर्किट ट्रेनिंग ला संधी द्यायला हरकत नाही.
(खाण्याचा विषय आणल्याशिवाय चैन पडत नाही) खाण्याची रेसिपी करावी; म्हणजे, कुणाला साखर चालत नाही, मग गूळ घालावा, तिखट कमी, मसाला जास्त वगैरे वगैरे, तसं हे सर्किट ट्रेनिंग कस्टमाईझ करता येतं. पण त्यासाठी मुळात व्यायामप्रकारांची माहिती असणं गरजेचं.
मी माझ्या माहितीच्या आणि थोडक्या अनुभवाच्या आधारे एक सर्किट ट्रेनिंग डिझाईन केलंय, जे, साधारणपणे सगळ्यांना करता येईल; ते इथे शेअर करतोय; २० मिनिटात हा व्यायाम करून होतो. पण ती २० मिनिटं तुम्ही शिस्तीत दिल्याप्रमाणे व्यायाम करणं जरूरीचं आहे, त्याशिवाय इफेक्ट वाटणार नाही. बघा करून महिनाभर; सांगा कसं वाटतं ते.


वर्गीकरण
प्रतिक्रिया
उताम माहिती
उत्तम माहिती प्रयत्न करीन....
वाह चान चान .... सुरुवात करा
Good I was expecting this.
अपुर्व माझ्या कंपनीत अत्याधुनिक व्यायाम शाळा आहे तिथे मी रोज सकाळी १ तास व्यायाम करतो मला काही प्रश्न आहेत जर मी तुला व्य.नी. केला तर काही मार्गदर्शन कर्शील काय.
जरूर!
इतरांनाही लाभ
व्हेरी गुड धागा!!
व्हेरी गुड धागा!!
व्हेरी गुड धागा!!
मी रोज हेच करतो..
हर्बल पावडर म्हणजे कुठली?
.
धन्यवाद माहिती शेअर
मस्त धागा!
अशा प्रकारचे व्यायाम केल्याने
हाच सर्किट व्यायाम
खचितच.
आलं लक्षात
मी तर म्हणतो, ऒन अ लायटर साइड
खरं आहे!
झुम्बा करायला मस्त वाटत. माझा
मुक्त नाच
शेअर केलेले डॉ. दिसत नहि.....
नाहीच..
वजन...........
होय
हा वीस मिनिटाचा व्यायाम, आणि
असं बघा की...
वजन कमी करणे
कॅलरी काऊंटसकट प्रतिसाद
स्टेपिंगनेही खूप कॅलरी कमी
स्किपिंगबद्दल काय मत आहे?
हा घे कॅल्क्यूलेटर
धन्यवाद्स!!
दैनंदिन व्यायाम.
साहेब,
धन्यवाद.
छान
व्यायामाला कि खाण्याला ?
सर्किट ट्रेनिंग
+१
मला एक प्रश्न पडतो बर्याचदा.
फिटनेस! नो डाउट
वजन आणि वय
हे सर्किट ट्रेनिंग डायरेक्ट
नाही नाही,
मस्त धागा, आणि माहिती.
काम की चीज है.. थँक्स !
सुंदर उपयोगी धागा !
कालच माझे वजन चेक केले,आकडा