Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ७

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 18/11/2013 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
४-२ गुणांनी मागे पडलेल्या आनंदसाठी अत्यंत कळीचा डाव! आज त्याला जिंकायलाच हवे. ड्रॉ होणारा प्रत्येक डाव कार्लसनला विजयाच्या जवळ नेतोय अर्ध्या गुणानी. कोणते ओपनिंग? कोणती स्ट्रॅटॅजी? २० कोटी लोक जगभरातून हा गेम फॉलो करताहेत. कदाचित क्रिकेट्पेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे! चला गेम बघूयात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20819
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

डावात खेचायला हवे. आक्रमक खेळल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण कार्लसनला काठावर बसून भागणार आहे!

ही बरीचशी परिचित खेळी. आल्याआल्या उंटाला हुसकावून लावणे. अगदी नवीन नवीन बुद्धिबळ खेळायला लागलो तेव्हा 'उंट इतका जवळ येतो म्हणजे काय?' असं म्हणत त्याला ताबडतोब हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जाई त्याची आठवण झाली. :)

In reply to by रमताराम

अगदी, अगदी!! चल हाकल मागे असा आविर्भाव चेहेर्‍यावरती!! :)

सायकॉलॉजिकल लढाई जिंकण्याचा मार्ग. आनंद्ला वेगळ्या खेळ्या हुड्कल्याच पाहिजेत. आतापर्यंतच्या सगळ्या डावात आनंदची प्यादे रचना दुबळी पडल्याने तो एंडगेमला अडचणीत आला होता. तो भाग त्याला यावेळी सांभाळावा लागेल.

त्यांने उंट एच पट्टीत नेऊन पिन कायम राखला. आनंद इतक्यातच जी प्यादे पुढे आणणार नाही असा त्याचा - वाजवी - अंदाज आहे. कारण तसे केले तर त्याला उजवीकडे कॅसल-इन करण्याचा पर्याय जरा दुबळा होऊन जातो.

In reply to by रमताराम

वजीर पुढे सरकून राजाला पर्यायी जागा देत नाही तोवर मेट-थ्रेट (क्वीन ई-४ आणि नंतर क्वीन x एफ-२ ने येणार) वाचवण्यासाठी कॅसल हा पर्याय त्याला हाताशी ठेवावा लागेल.

आज आनंदला फायद्याचे आहे. कार्लसन ज्या प्रकारे बसलाय ते बघण्यासारखे आहे! इतका कॅज्युअल बसलाय तो की कुठल्याशा क्लबात कॉफीटेबल खेळ चालू असावा. आनंदला लक्ष फक्त पटावर ठेवायचे आहे. आणि जिंकायचे आहे.

पुन्हा एकवार घो एफ-१? दुसर्‍या डावाप्रमाणे पुन्हा घोड्यांना जागा शोधण्यात आनंद वेळ घालवणार की काय?

In reply to by रमताराम

कारण घोडी राजाच्या बाजूला हल्ला करुन नेणे महत्त्वाचे आहे. कार्लसनने घोडा मारला. तो डाव सोपा करायला बघतोय. वजिराने घोडा घेतला. जी ६ प्यादे सरकले आता घोड्याच्या उड्या थांबवल्यान त्याने.

आनंदला घोडा जी ३ खेळून उंट मागे हाकलायला हवा. आज किल्लेकोट अजून टाळलेले आहेत. कदाचित आता काळा जी ६ खेळेल.

मस्तच चाल आहे विशिची! कालुचा अंदाज चुकायला सुरुवात समजायची काय ?

आज मी ऑफीसात आहे , कोणतीही स्पोर्ट साईट ओपन होत नाहीये :( कोणी तरी इथे खेळ्या टाकेल काय ? प्लीझ

In reply to by प्रसाद गोडबोले

फक्त बोर्ड आहे, वीडिओ नाही. त्यामुळे बॅण्डविड्थ कमी असली तरी चालेल. http://www.chessdom.com/world-chess-championship-2013-live/

In reply to by मृत्युन्जय

तोंडात साखर पडो च्या ऐवजी बुद्धीबळ खेळतोय म्हणून तसे म्हंटले. असो. मला डावात जास्त इंटरेस्ट आहे!

In reply to by चतुरंग

तुला हव्या त्या ठिकाणी पोटभर मिसळ खाऊ घालेन. हत्तीवरून मिरवणूक काढेन तुझी. होऊ दे खरचं.

मागच्या ३ सामन्यात असेच धावते समालोचन देऊन आम्हाला अगणित आनंद दिल्याबद्दल ररा, रंगाशेठ आणि इतर सर्वांचे आभार. साला टिव्हीवरची कॉमेंट्री ऐकायला लै मज्जा येते. - छोटा डॉन

जाम वाढलाय! विडिओ थांबतोय मधेमधे. उंट ई३? उंटांचे एक्सचेंज का करतोय आनंद? वजिराने मारुन मग एच ६ असे घुसायचा प्रयत्न आहे का? वजीर जी ४ अशी जास्तडायनामिक होती. किंबहुना आज ओपनिंग सुद्धा दुसरे करायला हवे होते!

In reply to by आतिवास

हा प्रतिसाद गिरीजा यांच्या प्रतिसादाला होता - तोवर मध्ये बरेच प्रतिसाद आले :-)

In reply to by आतिवास

धन्यवाद धन्यवाद !! खेळ्याबघुन बर्‍यापैकी बोर्ड इमॅजिन करता येतोय

असं दिसतंय कारण राजाच्या बाजूला प्यादी रेटायची असली तर ते सोयीचे पडेल. आता बहुतेक ०-०-० आणि त्यानंतर एच४ असे प्यादे पुढे सरकेल असा अंदाज.

आता कार्लसनला चॉइस करायचाय कॅसल कुठल्याबाजूला? तोही बहुदा तेच करेल. येस! त्याचेही लाँग कॅसल. मॅग्नुस त्या त्या खेळीसाठी जे आवश्यक आहे तेवढेच करतो आहे. जास्त लांबवर विचारकरुन डोके शिणवून घेत नाहीये!

कॅसल्स. लांबणार डाव पहिल्या सहा प्रमाणेच. (बायली या वीडिओला काय होतंय. बंद पडतोय सारखा. आणि पुन्हा चालू होतो तेव्हा पुन्हा मागचेच संवाद ऐकू येतायत.)

In reply to by चतुरंग

ती खेळी आनंदसाठी महत्त्वाची आहे. पटाच्या मध्यात डाव कॉम्प्लिकेट करणे आवश्यक.

In reply to by तिरकीट

ई५ प्याद्याने ते मारायचे आणि मग ई४ वरचे आनंदचे प्यादे वजीर, हत्ती असे डबल जोरात येते

राजा बी १ मधे गेला. ए२ मधले प्यादे सपोर्ट केले शिवाय पुढे मारामारी झाली तर राजा उघडा पडायला नको. मॅग्नुस बहुदा कॉपीकॅट स्टाईलने त्याचाही राजा हलवेल बी८ मधे.

एच प्यादे सरकवले आनंदने. उत्तम. आता उंट जी ५ अशी धमकी. कारण कार्लसन घोडा बी८ ला न्यायला बघत होता ती खेळी थांबली.

प्यादे एच ५ आता हत्ती पुढे काढून ई४ प्याद्याला सपोर्ट करायचा इरादा दिसतोय. मॅग्नुसने उंट मारला. पुढल्या २ खेळ्या चटचट झाल्यात. एच प्यादी पटावरुन गेलीत. काळ्याचा डाव सॉलिड आहे. अजूनतरी काही वीकनेस नाही.

फार हुषार आहे. डाव लाँग एंडगेमम्धे नेणे हे त्याचे उद्दिष्ट तो साध्य करतोय. आनंदला प्यादी सुद्धा सहज सरकवता येणार नाहीत. रुक एंडगेम तर आनंदसाठी चांगला नाहीच्.\जी ३ प्यादे सरकवले.

पहिल्यांदा मॅग्नुस विचारात पडलेला दिसतोय. गुरुची विद्या गुरुला करण्याशिवाय आनंदकडे पर्याय दिसत नाही. तुला लाँग एंडगेम हवाय का घे मग आणि त्यातही मी जिंकून दाखवतो!

In reply to by अग्निकोल्हा

आज त्याला चुक करावीच लागेल! आनंद आज जिंकणार आहे :)

In reply to by अग्निकोल्हा

या डावात अजून तरी तसे दिसले नाहीये..

या संपूर्ण सामन्यात कार्लसन आनंदला कोणत्याही डावात फार मोठे पोझीशनल अ‍ॅडवांटेज घेऊ देणार नाही त्यामुळे होम प्रिपरेशनचा फारसा उपयोग नाही. काय खेळायचे ते आत्ता इथे पटावर. मॅग्नुस खेळलाय ए ५! नेहेमीप्रमाणेच अनपेक्षित खेळी. तो राजाच्या बाजूला प्याद्यांची मोर्चे बांधणी करतच नहिये. सध्या जागा बळकावणे आणि वेटिंग मूव, आनंदला आव्हान आहे तुझा प्लॅन दाखव!

आक्रमक खेळी हत्ती एच ७! आता हत्तींची मारामारी होणार का? दुसरा हत्ती एच स्तंभात आणून हत्तींची मारामारी झाली. आता वजीर एफ ६ असा घेणार मॅग्नुस.

आनंदने फक्त एक गोष्ट साध्य केली आहे की त्याची प्याद्यांची रचना उअत्तम आहे. आणि मॅग्नुसचे दी प्यादे डबल आहे. एवढ्या तुटपुंज्या भांडवलावर त्याला विजय मिळवायचा आहे!!

In reply to by चतुरंग

त्या डबल झालेल्या प्याद्यांनीच उत्तर कोट करून ठेवला आहे त्याच्या राजासाठी. याउलट आनंदचा राजा शेवटच्या पट्टीत असल्याने आणि पुढची तीनही प्यादी जागीच असल्याने लास्ट-फाईल चेक चा धोका कायम ध्यानात ठेवून चाल करावी लागते आहे. हे बंधन काहीसे परवाच्या एच पट्टीतला बंधनासारखे ठरू नये म्हणजे मिळवली.

In reply to by रमताराम

स्थितीत बरोबर आहे. परंतु एंडगेम मधे त्याचे भांडवल करणे महत्त्वाचे ठरणार आहे, आनंदसमोर दुसरा पर्याय नाहीच आहे!

आनंदने ई प्यादे घेण्याची घाई का केली कोण जाणे. कोपर्‍यात गेलेला वजीर पुन्हा सक्रीय झाला मॅग्नसचा. शेवटच्या फळीतला मेट-थ्रेट वाचवायला इतर पर्याय होते. खरंतर घोडा पुरेसा आहे. आणि घोड्यासाठी वजीर अडकवून ठेवणे परवडले नसते मॅग्नसला. :(

झपाट्याने ड्रॉकडे निघालाय असे दिसते. आता कार्लसन एफ ५ अशी धमकी देतोय. त्यामुळे एफ ३ मधे वजीर.