Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user निमिष सोनार
Submitted by निमिष सोनार on Sat, 11/09/2013 - 13:35
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

  • Log in or register to post comments
  • 27878 views

प्रतिक्रिया

Submitted by इरसाल on Fri, 11/15/2013 - 15:06

In reply to आपल्याकडच्या महाभारताला नावे ठेवणारे आपण मात्र .... by निमिष सोनार

Permalink

खल्लास

ते जरा बोंड च बॉन्ड्/बॉण्ड्/बाँड करा लैच इचित्र वाटतय.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 11/15/2013 - 15:27

In reply to आपल्याकडच्या महाभारताला नावे ठेवणारे आपण मात्र .... by निमिष सोनार

Permalink

मा.श्री. निमिष सोनार सो|,

मा.श्री. निमिष सोनार सो|, आक्षेप काल्पनिकतेवर नसून त्याच्या सादरीकरणाला आहे. मला सांगा, महाभारत-रामायणात काय कमी मसाला आहे? अख्खे हरी पुत्तर, स्टार वॉर्स, लॉर्ड ऑफ द रिंग्ज झक मारतील जर रामायण-महाभारतावर त्या तोडीचे पिच्चर काढले तर. मोठ्या आशेने पहावे तर स्पेशल इफेक्ट्स त्या तोडीचे आहेत का? चोप्रासायबांनी आपल्या परीने चांगला प्रयत्न केला तसा पण त्याच्यापलीकडे जायची वेळ आलेली आहे. जरा विचार करा, लॉर्ड ऑफ द रिंग्स मधल्या धनुर्धर लेगोलाससारखा अर्जुन, ट्रॉय मधल्या अजॅक्स सारखा भीम अन सर्वांचा पोलिटिकल गेम करणारा कृष्ण, अन गँडाल्फसारखे भीष्मद्रोण दाखवले तर का नाही लोक फिदा होणार? प्लस जरा अजून रिअलिस्टिक पोलिटिकल कटकारस्थाने दाखवली तर खात्रीने सांगतो, उड्या पडतील लोकांच्या.
  • Log in or register to post comments
Profile picture for user निमिष सोनार

Submitted by निमिष सोनार on Fri, 11/15/2013 - 11:05

Permalink

आणि हो .. मी कुठलाही पेड प्रीव्ह्यू करत नाही....

एखाद्याने एखाद्या सिनेमाला आणि मालिकेला चांगले म्हटले म्हणजे त्याला निर्मात्याने पैसे दिले असे गृहीत जर सगळेजण धरत असतील तर मग जे चित्रपटावर/मालिकेवर टीका करत आहेत आणि चित्रपट, मालिका वाईट आहे असे म्हणत आहेत त्यांना मग काय त्या निर्मात्याच्या विरोधकांनी पैसे दिले असे समजायचे का?
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 11/15/2013 - 15:46

In reply to आणि हो .. मी कुठलाही पेड प्रीव्ह्यू करत नाही.... by निमिष सोनार

Permalink

एकून मालिकेचा दर्जा बघता

एकून मालिकेचा दर्जा बघता विरोधकांनी पैसे देऊन बदनामी करायची गरज आहे असे वाटले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Fri, 11/15/2013 - 20:07

In reply to आणि हो .. मी कुठलाही पेड प्रीव्ह्यू करत नाही.... by निमिष सोनार

Permalink

हा प्रतिसाद

हा प्रतिसाद तुम्ही दिलात म्हणजे धाग्यावर तुम्ही डोकावून गेलेले आहात. जुन्या महाभारतात एकदा (चुकून अनावधानाने असेल) दुर्योधन (पुनीत इसार) म्हणाला होता, "हमे यहा ड्यूटी है" त्याने इंग्रजी शब्द वापरला होता.... ह्या संदर्भात मी वरती काही माहिती विचारली होती. त्याबद्दल तुमचा काहीही प्रतिसाद आलेला नाही. माहिती देताय ना?
  • Log in or register to post comments

Submitted by ग्रेटथिन्कर on Fri, 11/15/2013 - 11:06

Permalink

-|:O}

-|:O}
  • Log in or register to post comments

Submitted by ग्रेटथिन्कर on Fri, 11/15/2013 - 11:07

Permalink

=|:O}

=|:O}
  • Log in or register to post comments
Profile picture for user निमिष सोनार

Submitted by निमिष सोनार on Fri, 11/15/2013 - 21:07

Permalink

आजचा एपिसोड पाहिला का? (द्रोणाचार्य, अर्जुन, एकलव्य)

खरेच सुंदर एपिसोड होता आजचा. गुरू शिष्य संबंधातले बारकावे तर होतेच तसेच द्रोणाचार्यांनी एकलव्याला अंगठा मागण्यामागाचे खरे कारण अर्जुनाला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये असे नव्हते तर एकलव्य मगध देशाचा असल्याने आणि मगध देश हस्तिनापुराचा शत्रू असल्याने ते त्याला अंगठा मागून त्याची धनुर्विद्या शिकण्याची शक्यता नष्ट करून मगध देशात त्याला परत पाठवतात. कारण ते हस्तिनापुरा चे मीठ खात असतात... वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Fri, 11/15/2013 - 21:13

In reply to आजचा एपिसोड पाहिला का? (द्रोणाचार्य, अर्जुन, एकलव्य) by निमिष सोनार

Permalink

ते ठीक आहे

ते ठीक आहे. पण आख्खी महाभारत मालिका यू ट्यूबवर उपलब्ध आह बी आर चोप्रांचीे. तुम्ही म्हणत आहात ती चूक कुठे आहे ते दाखवून देउ शकाल का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 11/15/2013 - 21:39

In reply to ते ठीक आहे by मन१

Permalink

ह ह पु वा.

ह ह पु वा. का पाठपुरावा करत सुटला आहेस सगळ्यांचा बाबा? एवढं पॉलिटीकली करेक्ट असायला नि राहायला तू का आता बिनलग्नाचा आहेस? ;) सोड की पिच्छा सोनारबुवांचा =))
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Fri, 11/15/2013 - 22:02

In reply to ह ह पु वा. by प्यारे१

Permalink

थांबवतोय

दोन तीन गोष्टी आहेत. १. महाभारत सिरियल, जो जीता वही सिकंदर चित्रपट ह्यांचा मी जबरदस्त पंखा आहे. त्यात पुन्हा समाजात काही टोकाचे भावनिक लोक असतात, emotional fool च्या पातळीवर त्यांचा भावनिक आवेग असतो. मी त्या जमातीतलाच म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे ह्या महाभारत वगैरेला कुणी खराब म्हटलं तर मी तो पर्सनल इन्सल्ट मानतो. २. ह्याउप्पर "आपण अत्यंत न्यायी असावं" असा एक ट्रिगर माझ्या मनात सतत असतो. त्यामुळे "महाभारत सिरियल दळभद्री आहे" म्हटलं तर वाईट वाटलं तरी मी ऐकून घेतो.फक्त समोरच्याचं म्हणणं तसं का आहे; हे त्यानं सांगावं इतकीच अपेक्षा असते. किम्वा साधार तसे म्हटले तरी चालेल. ३. वैधानिक मार्गानं लोकांना भंडावून सोडायला मनाच्या एका कोपर्‍यात कुठे तरी मजा पण येते. बालिश आनंद म्हणा हवं तर; ताईचे केस ओढण्यातला किंवा दादाला चिमटे काढण्यातला. शिवाय मार्ग वैधानिक असल्यानं समोरच्याची गोची होते. ४. इतकं असून कुणी स्वतःहून व्यवस्थित बोललं, थँक्स वगैरे म्हटलं; किम्वा goodwill gesture दाखवलं तर त्याला पिडणं मला अजिबात ठीक वाटत नाही. मी ते तत्काळ थांबवतो. (कारण तेच. "न्यायी असण्याचा डोक्यात सुरु असलेला ट्रिगर") . . तस्मात्, खाली " धन्यवाद " असा एक शब्द दिसतो आहे. मी ह्या धाग्यावर माझ्यातर्फे थांबत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 11/15/2013 - 21:24

In reply to आजचा एपिसोड पाहिला का? (द्रोणाचार्य, अर्जुन, एकलव्य) by निमिष सोनार

Permalink

हहपुवा.

हहपुवा. एकलव्य निषाद देशाचा होता. कुठे सुदूर पूर्वेकडे असलेला मगध तर कुठे हस्तिनापुराच्या नैऋत्येला असलेला निषाद. कैच्याकै. मालिका टुकार आहे हे सिद्धच होते अशा बादरायण संबंधांमुळे. बाकी त्या मनोबाच्या प्रश्नाचे उत्तर एकदाचे देऊन टाका राव.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदमयी on Sun, 11/17/2013 - 00:53

In reply to हहपुवा. by प्रचेतस

Permalink

@वल्ली

@वल्ली एकलव्य निषाद देशाचा होता. कुठे सुदूर पूर्वेकडे असलेला मगध तर कुठे हस्तिनापुराच्या नैऋत्येला असलेला निषाद. तुमच्या या प्रश्नाचं हे उत्तर. आपणा सर्वांच्या आवडत्या जुन्या महाभारतातला हा भाग http://www.youtube.com/watch?v=Xd2MdEGkFBQ&client=mv-samsung-bada&hl=en&guid=&gl=IN
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदमयी on Sun, 11/17/2013 - 01:42

In reply to @वल्ली by आनंदमयी

Permalink

हा केवळ माहितीपट नव्हे

महाभारत ही एक महाकथा आहे. विविध भावभावनांनी परिपूर्ण असलेल्या या महाकथेचे वर्णन 'जे येथे नाही , ते जगात अन्यत्र कुठेही नाही' असे केले जाते. इथे प्रत्येक पात्राचे, घटनेचे विभिन्न पैलू आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांचा सारभाग म्हणजे ही महाकथा... या कथेला केवळ एक माहितीपट न बनवता विविध व्यक्तिमत्वांचे विविध पैलू आपल्यासमोर आणून धर्माची बाजू योग्य पध्दतीने मांडण्याचे स्तुत्य कार्य सध्या स्टार प्लसवर प्रसारित होणारी महाभारत ही मालिका करत आहे. एकलव्यासारख्या गुरूभक्तीत समरस झालेल्या धनुर्धराकडे त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागण्यापुर्वी गुरू द्रोणांच्या मनात चाललेले द्वंद्व आणि गुरूंच्या प्रती आत्मसमर्पणाची परिसीमा गाठून एकलव्याने अंगठा कापून दिल्यानंतर अपराधीपणाच्या भावनेने ग्रस्त झालेल्या त्या महान गुरूच्या मनाची तळमळ तुमच्या आवडत्या जुन्या महाभारतात दाखवली नव्हती! त्यामुळे नवीन मालिकेला शिव्या देण्याकरता शिवशिवणारी तुमची जीभ आवरती घ्या आणि टिकाकार म्हणून नव्हे, तर केवळ एक प्रेक्षक म्हणून या कलाकृतीचा आनंद घ्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 11/17/2013 - 02:20

In reply to हा केवळ माहितीपट नव्हे by आनंदमयी

Permalink

>>>महाभारत ही एक महाकथा आहे.

>>>महाभारत ही एक महाकथा आहे. मिसळपाववर 'मूळ' महाभारत जवळपास तोंडपाठ असलेले मला किमान दोन आयडी माहिती आहेत. कुठल्या पर्वात कुठं काय होतं त्याचं पुलंच्या हरितात्यांसारखं 'धावतं समालोचन' ते करतात. त्यातला एक वल्ली नि दुसरा मृत्युंजय. अर्थात म्हणून त्यांच्या विरोधात कुणी बोलू नये अथवा काही म्हणू नये असं नाही. मात्र मूळ महाभारतात नसलेल्या गोष्टी जेव्हा दाखवल्या जातात सांगितल्या जातात तेव्हा ते 'अमुक तमुक'चं महाभारत होतं. मूळ महाभारत नव्हे! नि तशा वेगळ्या सादरीकरणाला हे लोक विशेषतः वल्ली येऊन मतप्रदर्शन करतो. :) जे महाभारताचं तेच रामायणाचं.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sun, 11/17/2013 - 08:19

In reply to >>>महाभारत ही एक महाकथा आहे. by प्यारे१

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदमयी on Sun, 11/17/2013 - 09:54

In reply to >>>महाभारत ही एक महाकथा आहे. by प्यारे१

Permalink

इथे नवीन महाभारत जुन्या

इथे नवीन महाभारत जुन्या महाभारताच्या तुलनेत सुमार आहे हे सिध्द करण्याचा जो प्रयत्न होत होता तो फक्त मी जुन्या मालिकेच्या एका भागाचा दाखला देवून मोडीत काढला... महाभारताबद्दल जर इथे कुणाला इत्यंभूत माहिती आहे तर त्यांचा मी आदरच करते. पण मी पुर्वी म्हणाले तसंच महाभारत मालिका केवळ एक माहितीपट म्हणून न दाखवता घटनांचे विविध भावनिक पैलू दाखवण्याचे काम ही नवीन मालिका करत आहे. मी फक्त नवीन मालिकेची बाजू मांडली आणि त्याच मालिकेतल्या एका प्रसंगाबद्दल एक प्रश्न उपस्थित झाला होता त्याचं जुन्या मालिकेतल्या एका भागाकरवी उत्तर दिलं इतकंच, कुणाच्याही माहितीबद्दल शंका घेतलेली नाही. अर्थात मी लहान तोंडी मोठा घास घेतला याबद्दल क्षमा मागते... __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 11/17/2013 - 10:13

In reply to इथे नवीन महाभारत जुन्या by आनंदमयी

Permalink

जुन्या महाभारत मालिकेबरोबर

जुन्या महाभारत मालिकेबरोबर(चोप्रा) मी नविन मालिकेची तुलना कुठे केली आहे हे कृपया माझ्या निदर्शनास आणून द्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदमयी on Sun, 11/17/2013 - 10:35

In reply to जुन्या महाभारत मालिकेबरोबर by प्रचेतस

Permalink

माझी प्रतिक्रीया या धाग्यावर

माझी प्रतिक्रीया या धाग्यावर ती तुलना करणार्यांसाठी होती, आपल्यासाठी नाही. मी तर केवळ आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. माझ्या इतर कुठल्याही प्रतिक्रीयेत आपण दोन मालिकांमध्ये तुलनाकरत आहात असं मी कुठेही म्हटलेलं नाही किंवा असेल तर माझ्या निदर्शनास आणून द्यावं...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 11/17/2013 - 10:55

In reply to माझी प्रतिक्रीया या धाग्यावर by आनंदमयी

Permalink

कुठला प्रश्न

बाकी मी कुठला प्रश्न उपस्थित केला होता हे सांगाल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदमयी on Sun, 11/17/2013 - 11:32

In reply to कुठला प्रश्न by प्रचेतस

Permalink

''एकलव्य निषाद देशाचा होता.

''एकलव्य निषाद देशाचा होता. कुठे सुदूर पूर्वेकडे असलेला मगध तर कुठे हस्तिनापुराच्या नैऋत्येला असलेला निषाद. कैच्याकै. मालिका टुकार आहे हे सिद्धच होते अशा बादरायण संबंधांमुळ ..'' 'एकलव्य आणि मगध देशाचा काय संबध? तो तर निषाद देशाचा होता!' अशा आशयाची एक प्रतिक्रीया आहे वर. तर एकलव्य आणि मगध देशाचा संबंध असा , की एकलव्याचे पिता हे मगध नरेश जरासंधाच्या सेनेतील एक निष्णात सैनिक होते, हा आशय स्पष्ट करणारी एक व्हिडियो क्लिप मी प्रतिक्रिया म्हणून पाठवली होती :) असो! मला अत्यंत भावलेली नव्या मालिकेतली ही कृष्णाची सीख आपणा सर्वांना ही नक्की आवडेल म्हणून सर्वांसोबत शेअर करू इच्छिते... www.youtube.com/watch?p=AM7IOZnvD2F5fyXXeKoFdAQIdxOOQgSW&v=4GWhQYkwPJw&gl=IN&client=mv-google&hl=en-GB&guid=
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 11/17/2013 - 14:53

In reply to ''एकलव्य निषाद देशाचा होता. by आनंदमयी

Permalink

ह्यात मी प्रश्न विचारलेला

ह्यात मी प्रश्न विचारलेला कुठे दिसला तुम्हास? ते एक निव्वळ विधान आहे.
तर एकलव्य आणि मगध देशाचा संबंध असा , की एकलव्याचे पिता हे मगध नरेश जरासंधाच्या सेनेतील एक निष्णात सैनिक होते, हा आशय स्पष्ट करणारी एक व्हिडियो क्लिप मी प्रतिक्रिया म्हणून पाठवली होती
बाकी ह्याचा मूळ महाभारतातील (चोप्रांच्या किंवा नव्या मालिकेतील नव्हे) दाखला देऊ शकाल काय? माझ्या अत्यल्प ज्ञानाप्रमाणे एकलव्य हा निषादराजा हिरण्यधनु याचा मुलगा. जर हिरण्यधनु हा व्याधराजा असेल तर तो सैनिक म्हणून मगधराज्यात कसा राहिल? अवांतरः हाच एकलव्य पुढे पौंड्रक वासुदेवाबरोबर द्वारकेवर चालून आला होता. पौंड्रकाचा वध हा कृष्णाने तर एकलव्याचा पराभव हा बलरामाने केला. हा उल्लेख खिलपर्वात आला आहे (हरिवंश). याव्यतिरिक्त एकलव्याचा उल्लेख आदिपर्वाशिवाय कुठेच नाही. तस्मात एकलव्याची कथा संपूर्ण प्रक्षिप्त असावी असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदमयी on Sun, 11/17/2013 - 17:09

In reply to ह्यात मी प्रश्न विचारलेला by प्रचेतस

Permalink

1.He was son of Vyatraj

1.He was son of Vyatraj Hiranyadhanus, a talented soldier in the army of King of Magadha. Magadha was ruled by Jarasandha, who was at odds with the Kingdom of Hastinapura 1.Source: en.m.wikipedia.org/wiki/Eklavya एकलव्य हा निषाद राजाचा पुत्र. निषाद ही एक जमात होती. या जमातीचा उदय कसा झाला याचा संदर्भ 2.'काकःकृष्णाति~हस्वांगो~हस्वबाहुर्महाहनुः। ~हस्व पाद्निम्न नासाग्रो रक्तक्षस्ताम्रमूर्धजः॥ तम् तू तेऽवनतम् दीनम् किमकरोमिती वदिनम्। निषिदेतिऽब्रुवंस्तात सा निषादस्तथा भवत्॥' श्रीमद् भाग्वतम् 4.14.44-45 2.source: http://vedabase.net/sb/4/14/44/en अशा प्रकारे राजा वेण याच्या मांडीतून निषाद या जमातीच्या जनकाचा जन्म झाला. शिकार करणा~या, राज्य नसून केवळ एक जमात असलेल्या निषादांचा राजा हिरण्यधनुष जर सैनिक म्हणून मगधराज जरासंधाची सेवा करायचा यात विस्मयित होण्यासारखे काही नाही. 3.बाकी मूळ महाभारत ग्रंथातील एकलव्याबद्दलचे वर्णन हे संक्षिप्त आहे व एकलव्याच्या पित्याबद्दल विस्तृत माहिती यात उपलब्ध नाही 3.source: www.sacred-texts.com/hin/m01/m01135.htm
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 11/17/2013 - 18:08

In reply to 1.He was son of Vyatraj by आनंदमयी

Permalink

संहितेतच जर नाही --

मूळ महाभारतातच अगदी कमी माहिती असताना विकीत दिलेली माहिती कितपत ग्राह्य धरायची?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदमयी on Sun, 11/17/2013 - 23:20

In reply to संहितेतच जर नाही -- by प्रचेतस

Permalink

विकिपीडीयात ससंदर्भ माहिती

विकिपीडीयात ससंदर्भ माहिती दिली जाते. तिच्यात बहुतांश तथ्य असतं म्हणून आज बहुतेकांसाठी ते माहिती मिळवण्याचे ठिकाण झाले आहे... अर्थात तुम्हाला हे नसेल खरं मानायचं तर नका मानू! तात्पर्य काय की महाभारत मालिकांमध्ये (जुन्या व नव्या दोन्ही) एकलव्याच्या वडिलांबद्दल जी माहिती दिली गेली, तिला कुठेतरी आधार आहे. अर्थात एवढ्यावरूनच तुम्ही ही किंवा आधीची मालिका सुमार ठरवत असाल तर ते योग्य नाही. @ इथे उपस्थित सर्व टिकाकार: प्रत्येक कलाकृतीबद्दल प्रत्येकाचं वैयक्तीक मत असतं, त्याचा मी आदरही करते. पण इथे उपस्थित सर्व टिकाकारांनी केवळ त्यांना ही मालिका आवडली नाही म्हणून जे काही शाब्दीक वार या धाग्यावर केलेत त्यांनी एकदा मालिकेविषयी असणार्या आपल्या नापसंतीचं कारण शोधून पहावं. बाकी ही मालिका आवडणारेही या धाग्यावर बरेच आहेत, केवळ धागाकर्ता एकटा नाही, हे लक्षात घ्यावं. उद्या तुमच्या आवडत्या, अगदी मनापासून आवडत्या गोष्टीला एखाद्याने विनाकारण नावं ठेवली तर तुम्हाला रुचेल का??? स्वयं विचार कीजिये.... :) :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 11/17/2013 - 09:20

In reply to हा केवळ माहितीपट नव्हे by आनंदमयी

Permalink

ओके.

ओके. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sat, 11/16/2013 - 16:14

In reply to आजचा एपिसोड पाहिला का? (द्रोणाचार्य, अर्जुन, एकलव्य) by निमिष सोनार

Permalink

महाभारतकालीन भारताचा नकाशा

महाभारतकालीन भारताचा नकाशा संदर्भासाठी डकवत आहे: (हस्तिनापूर ते मगध (राजगृह) अंतर सुमारे १३०० कि.मी. आहे). Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Fri, 11/15/2013 - 21:13

Permalink

@धागाकर्ते ! जाउदे हो झालं गेलं गंगेला मिळाले.

यापुढे फक्त अभ्यास वाढवा अन परिक्षण खुमासदार व महत्वाचे म्हणजे वास्तववादी लिहा म्हणजे विषय संपला. आपली मते लोकांना पटतात हे फक्त तेंव्हाच वास्तव असते जेव्हां लोक त्याविरोधी बोल्तातच पण त्याचा प्रतिवाद आपल्या एकट्यालाच करावा लागत नाही, अन्यथा आपण मन गच्च कर व बाकी सगले गोडयावर सोड सारखे लेखान्पुरते मर्यादित व्हाल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user निमिष सोनार

Submitted by निमिष सोनार on Fri, 11/15/2013 - 21:28

Permalink

मान्य !!!

चला आता पुढे महाभारतात काय काय घडते ते पाहू आणि चर्चा करू. धन्यवाद अग्निकोळा आणि मन१ !! आता सोमवारी कौसव पांडव मोठे होणार !! आणि त्या जुन्या चुकीबद्दल: ते मी यु ट्यूब वर नव्हते बघितले, तर लहानपणी पुसट से मला आठवते तसे!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुहासदवन on Sat, 11/16/2013 - 08:47

Permalink

कौसव पांडव

कौरव पांडव असतील हो कदाचित
  • Log in or register to post comments

Submitted by म्हैस on Sat, 11/16/2013 - 15:26

Permalink

एकलव्य कुठल्या राज्याचा होता

एकलव्य कुठल्या राज्याचा होता ते माहीत नाही पण द्रोनांनी धृतराष्ट्राला वचन दिल होत कुरु कुमारांच्या शिवाय इतर कोणाला विद्यदान करणार नाही म्हणून. आत्ताच्या काळामध्ये टेस्ट tube baby वगेरे किवा आणखी बर्याच तंत्रज्ञानाने शरीराच्या बाहेर गर्भ धारणा होऊ शकते . मग त्या काळात सुधा काहीतरी असेल ज्याने direct हाता मधेच बाल प्रगट होत असेल. द्रोपदी आणि तिचा भाऊ धृष्ट्धुम्न यांचा जन्म सुधा असाच झालाय कि. यज्ञातून .. अग्निदेवांची हि २ मुलं. अग्निकन्या असल्यामुळे द्रोपदी मुळातच कणखर , जहाल, बुद्धिमान, रंगाने सावली पण सुंदर, सुगंधी होती. आणि ह्या युधिष्ठिराला धर्मराज का म्हणतात कुणास ठावूक ... ह्याला तर अधर्मराज म्हणायला पाहिजे. इतर पांडवांच्या, द्रोपदीच्या अपमानाला हाच कारणीभूत होता. त्याच्यामुळेच महाभारत घडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Sat, 11/16/2013 - 15:54

In reply to एकलव्य कुठल्या राज्याचा होता by म्हैस

Permalink

ज्याने direct हाता मधेच बाल प्रगट होत असेल.

__/।\__
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 11/16/2013 - 16:34

In reply to एकलव्य कुठल्या राज्याचा होता by म्हैस

Permalink

द्रोनांनी धृतराष्ट्राला वचन

द्रोनांनी धृतराष्ट्राला वचन दिल होत कुरु कुमारांच्या शिवाय इतर कोणाला विद्यदान करणार नाही म्हणून.
म्हैसतै, तुम्ही नेहमीच संदर्भांशिवाय बोलत असता. आणि संदर्भ मागितले कि देत नाहीत. ह्या वचनाच्या दाखल्याचा काही संदर्भ देऊ शकाल काय?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Sun, 11/17/2013 - 09:40

In reply to एकलव्य कुठल्या राज्याचा होता by म्हैस

Permalink

म्हैस ठरवून मनोरंज करताय की

आम्हाला तसं वाटतय?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sat, 11/16/2013 - 15:50

Permalink

एकलव्य डावखुरा होता

एकलव्य डावखुरा होता, त्यामुळे त्याने उजव्या हाताचा अंगठा खुशाल कापून दिला, त्यामुळे त्याच्या धनुर्विद्येवर फारसा परिणाम झाला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Sat, 11/16/2013 - 17:31

In reply to एकलव्य डावखुरा होता by चित्रगुप्त

Permalink

शक्यता नाकारता येत नाही...

शक्यता नाकारता येत नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sat, 11/16/2013 - 17:45

In reply to एकलव्य डावखुरा होता by चित्रगुप्त

Permalink

***

=)) चित्रगुप्तजी यामुळे कुमार दिवाळी अंकात वाचलेली टाईम मशीनची गोष्ट आठवली . काहि मुल वेळेत मागे जाऊन एकलव्यला सावध करतात आणी डाव्या हाताने प्रॅक्टीस करायला सांगतात .जुनी गोष्ट आहे दुवा दे नाय
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर जोशी on Mon, 11/18/2013 - 00:11

In reply to एकलव्य डावखुरा होता by चित्रगुप्त

Permalink

माझे बाबा मेघालयात गेले होते

माझे बाबा मेघालयात गेले होते (भारत मेरा घर कार्यक्रम)... तेथे आजही अंगठ्या शिवाय घनुष्य बाण चालवतात ...
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 11/17/2013 - 16:22

Permalink

पांडूची व्याधी

आत्ताच मी परिचयातील एका निष्णात वैद्यांना भेटायला गेलो होतो, त्यांचा पुराणे वगैरेंचाही अभ्यास आहे. त्यांना विचारले, की पांडुला कर्दम ॠषींनी शाप दिला होता वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन वैद्यकीय दृष्टीने पांडूला कोणती व्याधी झालेली असावी, ज्यामुळे त्याला स्त्रीसंग करताच मृत्यु यावा? त्यावर त्यांनी सांगितले, की पांडूने जो दिग्विजय वगैरे केला, त्यात त्याला अनेक स्त्रिया लाभल्या, शिवाय दासी वगैरे असतच. तस्मात कामातिरेकामुळे त्याचे ओज नष्ट झालेले होते, अश्या स्थितीत औषधी सेवनाने कृत्रिम रीत्या तात्पुरती शक्ती मिळवण्याचा आणखीनच वाईट परिणाम होतो. परिणामी त्याचे र्‍हदय कमकुवत झाले असावे, आणि उत्तेजनेमुळे वाढणार्‍या र्‍हदयगतिचा ताण सहन न झाल्यास मृत्यु ओढवू शकतो. अश्या प्रकारचे संशोधन करून जर या मालिकेत त्याचा अंतर्भाव करतील, तर ते आजच्या प्रेक्षकांना जास्त खरे वाटेल, पटेल.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदमयी on Sun, 11/17/2013 - 17:23

In reply to पांडूची व्याधी by चित्रगुप्त

Permalink

असू शकते

ऐकण्यात आले आहे की पांडू हा पांडूरोगाने ग्रस्त होता. ह्रदयाच्या आश्रयी असणारं साधक पित्त वाढल्यामुळे हा रोग होतो... पण याबाबतीत आपण वर्तवलेली शक्यता अधिक पटण्यासारखी वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 11/17/2013 - 17:42

Permalink

पांडुचा पंडुरोग

पांडुला पंडुरोग म्हणजे अ‍ॅनिमिया होताच. मात्र नियोगाच्या वेळी (अंबिका, आंबालिका पैकी जी कुणी होती तिने) डोळे मिटले म्हणून धॄतराष्ट्र आंधळा, आणि भयाने पांढरी पडली, म्हणून पांडुला पंडुरोग, हे पटत नाही, कारण मग या न्यायाने आंधळा धॄतराष्ट्र आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली गांधारी यांची सर्व संतती अंध व्हायला हवी होती. मागे एक पुस्तक वाचलेले आठवते (आता नाव विसरलो) त्यात असे म्हटले होते, की महाभारतात जिथे जिथे शाप-वर-चमत्कार इ. आहेत, ते सर्व कोणती न कोणती वस्तुस्थिती दडवण्यासाठी टाकलेली भर आहे. याबद्दल सर्व उदाहरणे त्या पुस्तकात आहेत. कुणाला ठाउक आहे का हे पुस्तक?
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Sun, 11/17/2013 - 17:54

In reply to पांडुचा पंडुरोग by चित्रगुप्त

Permalink

'वस्तुस्थिती दडवण्यासाठी'

'वस्तुस्थिती दडवण्यासाठी' म्हणजे? जास्त माहिती मिळेल का यावर? म्हणजे काही उदाहरणार्थ..
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदमयी on Sun, 11/17/2013 - 18:13

In reply to पांडुचा पंडुरोग by चित्रगुप्त

Permalink

आपण एस एल भैरप्पा यांच्या

आपण एस एल भैरप्पा यांच्या पर्व ह्या कादंबरीबद्दल बोलत आहात काय??
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 11/18/2013 - 09:23

In reply to आपण एस एल भैरप्पा यांच्या by आनंदमयी

Permalink

पर्व नाही

पर्व नाही, बरेच जुने मराठी लेखकाचे पुस्तक होते.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 11/17/2013 - 22:55

Permalink

हायला ! खर्‍या महाभारतापेक्षा

हायला ! खर्‍या महाभारतापेक्षा जास्त घमासान या धाग्यावर चालू आहे !! आता असते तर कौरवपांडव लढायचं सोडून मिपा हे असलं काही वाचत पडीक पडले असते आणि त्यांना लढायला वेळच मिळाला असता !!!
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर जोशी on Sun, 11/17/2013 - 23:56

Permalink

माझे बाबा मेघालयात गेले होते

माझे बाबा मेघालयात गेले होते (भारत मेरा घर कार्यक्रम)... तेथे आजही अंगठ्या शिवाय घनुष्य बाण चालवतात ...
  • Log in or register to post comments
Profile picture for user निमिष सोनार

Submitted by निमिष सोनार on गुरुवार, 11/21/2013 - 15:59

Permalink

प्रतियोगिता, प्रदर्शन, "मैत्री" बद्दल "सं(वाद)" & "कल देखिये" !!

आज सगळ्यांच्यात "प्रतियोगिता" होणार आहे. धृतराष्ट्र आणि शकुनी यांना "प्रदर्शन" नको आहे... आज सगळे पांडव आणि कौरव बहुतेक मोठे झालेले चेहेर्‍यांसह दाखवणार असे वाटते.... खूप उत्सुकता आहे... कालच्या भागात (जेव्हा अश्वत्थामा कौरव पांडवांचे नाव लाकडी चक्रावर कोरत असतो तेव्हा) द्रोण आणि अश्वत्थामा यांच्यात "मैत्री" बद्दल जो "सं(वाद)" झाला त्यातले विचार परत परत ऐकण्या जोगे. चिंतन मनन करण्याजोगे आहेत.एपिसोड चुकला असेल तर ऑनलाईन पहा बरे का!! महाभारताची निर्माते, लेखक या सह कलाकार हे सगळे अक्षरश मन लावून काम करत आहेत आणि महाभारत "जगत" आहेत असे मला वाटते आणि ते दिसून ही येत आहे.... बरं, मी लिहिलेल्या एका निरिक्षणाबद्दल कुणाची अजून प्रतिक्रिया आलेली नाही: मी लिहिले होते की: महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 11/21/2013 - 21:25

Permalink

रजनीअण्णांचे बाप

आजचा एपिडोस (२१ नोहेंबर) बघितला. च्यामारी नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर तर रजनी अण्णांचेही बाप आहेत. बुरुजावरून उड्डाण करून आगमन (तेही नव्वद अंशातून 'सरळ उलटे' लटकत) काय, अण्णा स्टाईलने खड्गे हवेत फेकून झेलणे काय, लाथ मारल्यावर पनास-शंभर हात उडत जाऊन पडणे काय, लई स्टाईलबाज लोक्स. आणि हे दाढी-मिश्यावाले झाले तरी त्यांच्या आया अजून तितक्याच चिकन्या. कहर आहे. विनोदी सिरियल म्हणून बघावे.
  • Log in or register to post comments

Submitted by ह भ प on गुरुवार, 11/21/2013 - 21:59

In reply to रजनीअण्णांचे बाप by चित्रगुप्त

Permalink

डोक्याला जे शॉट लागले.. काय

डोक्याला जे शॉट लागले.. काय सांगू.. तत्काळ पेप्रात डोके खुपसले..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 11/21/2013 - 23:50

In reply to रजनीअण्णांचे बाप by चित्रगुप्त

Permalink

=))

=)) =)) =))
आणि हे दाढी-मिश्यावाले झाले तरी त्यांच्या आया अजून तितक्याच चिकन्या. कहर आहे.
धन्य _/\_
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com