Skip to main content

मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 09/11/2013 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
मालिकेचे नाव : महाभारत निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * ) संगीत दर्जा : उत्तम ( * * * * ) पुनर्प्रसारणाबद्दल : सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. प्रस्तावना : स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच! जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले. परीक्षण : बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल. मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते. त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते. त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले. आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते. त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे) अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!! महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात. सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे. कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे: भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात. मराठीतून : स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे. अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series) https://www.facebook.com/OfficialMahabharat
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27916
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

''एकलव्य निषाद देशाचा होता. कुठे सुदूर पूर्वेकडे असलेला मगध तर कुठे हस्तिनापुराच्या नैऋत्येला असलेला निषाद. कैच्याकै. मालिका टुकार आहे हे सिद्धच होते अशा बादरायण संबंधांमुळ ..'' 'एकलव्य आणि मगध देशाचा काय संबध? तो तर निषाद देशाचा होता!' अशा आशयाची एक प्रतिक्रीया आहे वर. तर एकलव्य आणि मगध देशाचा संबंध असा , की एकलव्याचे पिता हे मगध नरेश जरासंधाच्या सेनेतील एक निष्णात सैनिक होते, हा आशय स्पष्ट करणारी एक व्हिडियो क्लिप मी प्रतिक्रिया म्हणून पाठवली होती :) असो! मला अत्यंत भावलेली नव्या मालिकेतली ही कृष्णाची सीख आपणा सर्वांना ही नक्की आवडेल म्हणून सर्वांसोबत शेअर करू इच्छिते... www.youtube.com/watch?p=AM7IOZnvD2F5fyXXeKoFdAQIdxOOQgSW&v=4GWhQYkwPJw&…

In reply to by आनंदमयी

ह्यात मी प्रश्न विचारलेला कुठे दिसला तुम्हास? ते एक निव्वळ विधान आहे.
तर एकलव्य आणि मगध देशाचा संबंध असा , की एकलव्याचे पिता हे मगध नरेश जरासंधाच्या सेनेतील एक निष्णात सैनिक होते, हा आशय स्पष्ट करणारी एक व्हिडियो क्लिप मी प्रतिक्रिया म्हणून पाठवली होती
बाकी ह्याचा मूळ महाभारतातील (चोप्रांच्या किंवा नव्या मालिकेतील नव्हे) दाखला देऊ शकाल काय? माझ्या अत्यल्प ज्ञानाप्रमाणे एकलव्य हा निषादराजा हिरण्यधनु याचा मुलगा. जर हिरण्यधनु हा व्याधराजा असेल तर तो सैनिक म्हणून मगधराज्यात कसा राहिल? अवांतरः हाच एकलव्य पुढे पौंड्रक वासुदेवाबरोबर द्वारकेवर चालून आला होता. पौंड्रकाचा वध हा कृष्णाने तर एकलव्याचा पराभव हा बलरामाने केला. हा उल्लेख खिलपर्वात आला आहे (हरिवंश). याव्यतिरिक्त एकलव्याचा उल्लेख आदिपर्वाशिवाय कुठेच नाही. तस्मात एकलव्याची कथा संपूर्ण प्रक्षिप्त असावी असे मला वाटते.

In reply to by प्रचेतस

1.He was son of Vyatraj Hiranyadhanus, a talented soldier in the army of King of Magadha. Magadha was ruled by Jarasandha, who was at odds with the Kingdom of Hastinapura 1.Source: en.m.wikipedia.org/wiki/Eklavya एकलव्य हा निषाद राजाचा पुत्र. निषाद ही एक जमात होती. या जमातीचा उदय कसा झाला याचा संदर्भ 2.'काकःकृष्णाति~हस्वांगो~हस्वबाहुर्महाहनुः। ~हस्व पाद्निम्न नासाग्रो रक्तक्षस्ताम्रमूर्धजः॥ तम् तू तेऽवनतम् दीनम् किमकरोमिती वदिनम्। निषिदेतिऽब्रुवंस्तात सा निषादस्तथा भवत्॥' श्रीमद् भाग्वतम् 4.14.44-45 2.source: http://vedabase.net/sb/4/14/44/en अशा प्रकारे राजा वेण याच्या मांडीतून निषाद या जमातीच्या जनकाचा जन्म झाला. शिकार करणा~या, राज्य नसून केवळ एक जमात असलेल्या निषादांचा राजा हिरण्यधनुष जर सैनिक म्हणून मगधराज जरासंधाची सेवा करायचा यात विस्मयित होण्यासारखे काही नाही. 3.बाकी मूळ महाभारत ग्रंथातील एकलव्याबद्दलचे वर्णन हे संक्षिप्त आहे व एकलव्याच्या पित्याबद्दल विस्तृत माहिती यात उपलब्ध नाही 3.source: www.sacred-texts.com/hin/m01/m01135.htm

In reply to by प्रचेतस

विकिपीडीयात ससंदर्भ माहिती दिली जाते. तिच्यात बहुतांश तथ्य असतं म्हणून आज बहुतेकांसाठी ते माहिती मिळवण्याचे ठिकाण झाले आहे... अर्थात तुम्हाला हे नसेल खरं मानायचं तर नका मानू! तात्पर्य काय की महाभारत मालिकांमध्ये (जुन्या व नव्या दोन्ही) एकलव्याच्या वडिलांबद्दल जी माहिती दिली गेली, तिला कुठेतरी आधार आहे. अर्थात एवढ्यावरूनच तुम्ही ही किंवा आधीची मालिका सुमार ठरवत असाल तर ते योग्य नाही. @ इथे उपस्थित सर्व टिकाकार: प्रत्येक कलाकृतीबद्दल प्रत्येकाचं वैयक्तीक मत असतं, त्याचा मी आदरही करते. पण इथे उपस्थित सर्व टिकाकारांनी केवळ त्यांना ही मालिका आवडली नाही म्हणून जे काही शाब्दीक वार या धाग्यावर केलेत त्यांनी एकदा मालिकेविषयी असणार्या आपल्या नापसंतीचं कारण शोधून पहावं. बाकी ही मालिका आवडणारेही या धाग्यावर बरेच आहेत, केवळ धागाकर्ता एकटा नाही, हे लक्षात घ्यावं. उद्या तुमच्या आवडत्या, अगदी मनापासून आवडत्या गोष्टीला एखाद्याने विनाकारण नावं ठेवली तर तुम्हाला रुचेल का??? स्वयं विचार कीजिये.... :) :)

In reply to by निमिष सोनार

महाभारतकालीन भारताचा नकाशा संदर्भासाठी डकवत आहे: (हस्तिनापूर ते मगध (राजगृह) अंतर सुमारे १३०० कि.मी. आहे). .

यापुढे फक्त अभ्यास वाढवा अन परिक्षण खुमासदार व महत्वाचे म्हणजे वास्तववादी लिहा म्हणजे विषय संपला. आपली मते लोकांना पटतात हे फक्त तेंव्हाच वास्तव असते जेव्हां लोक त्याविरोधी बोल्तातच पण त्याचा प्रतिवाद आपल्या एकट्यालाच करावा लागत नाही, अन्यथा आपण मन गच्च कर व बाकी सगले गोडयावर सोड सारखे लेखान्पुरते मर्यादित व्हाल.

चला आता पुढे महाभारतात काय काय घडते ते पाहू आणि चर्चा करू. धन्यवाद अग्निकोळा आणि मन१ !! आता सोमवारी कौसव पांडव मोठे होणार !! आणि त्या जुन्या चुकीबद्दल: ते मी यु ट्यूब वर नव्हते बघितले, तर लहानपणी पुसट से मला आठवते तसे!!

एकलव्य कुठल्या राज्याचा होता ते माहीत नाही पण द्रोनांनी धृतराष्ट्राला वचन दिल होत कुरु कुमारांच्या शिवाय इतर कोणाला विद्यदान करणार नाही म्हणून. आत्ताच्या काळामध्ये टेस्ट tube baby वगेरे किवा आणखी बर्याच तंत्रज्ञानाने शरीराच्या बाहेर गर्भ धारणा होऊ शकते . मग त्या काळात सुधा काहीतरी असेल ज्याने direct हाता मधेच बाल प्रगट होत असेल. द्रोपदी आणि तिचा भाऊ धृष्ट्धुम्न यांचा जन्म सुधा असाच झालाय कि. यज्ञातून .. अग्निदेवांची हि २ मुलं. अग्निकन्या असल्यामुळे द्रोपदी मुळातच कणखर , जहाल, बुद्धिमान, रंगाने सावली पण सुंदर, सुगंधी होती. आणि ह्या युधिष्ठिराला धर्मराज का म्हणतात कुणास ठावूक ... ह्याला तर अधर्मराज म्हणायला पाहिजे. इतर पांडवांच्या, द्रोपदीच्या अपमानाला हाच कारणीभूत होता. त्याच्यामुळेच महाभारत घडलं.

In reply to by म्हैस

द्रोनांनी धृतराष्ट्राला वचन दिल होत कुरु कुमारांच्या शिवाय इतर कोणाला विद्यदान करणार नाही म्हणून.
म्हैसतै, तुम्ही नेहमीच संदर्भांशिवाय बोलत असता. आणि संदर्भ मागितले कि देत नाहीत. ह्या वचनाच्या दाखल्याचा काही संदर्भ देऊ शकाल काय?

एकलव्य डावखुरा होता, त्यामुळे त्याने उजव्या हाताचा अंगठा खुशाल कापून दिला, त्यामुळे त्याच्या धनुर्विद्येवर फारसा परिणाम झाला नाही.

In reply to by चित्रगुप्त

=)) चित्रगुप्तजी यामुळे कुमार दिवाळी अंकात वाचलेली टाईम मशीनची गोष्ट आठवली . काहि मुल वेळेत मागे जाऊन एकलव्यला सावध करतात आणी डाव्या हाताने प्रॅक्टीस करायला सांगतात .जुनी गोष्ट आहे दुवा दे नाय

In reply to by चित्रगुप्त

माझे बाबा मेघालयात गेले होते (भारत मेरा घर कार्यक्रम)... तेथे आजही अंगठ्या शिवाय घनुष्य बाण चालवतात ...

आत्ताच मी परिचयातील एका निष्णात वैद्यांना भेटायला गेलो होतो, त्यांचा पुराणे वगैरेंचाही अभ्यास आहे. त्यांना विचारले, की पांडुला कर्दम ॠषींनी शाप दिला होता वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन वैद्यकीय दृष्टीने पांडूला कोणती व्याधी झालेली असावी, ज्यामुळे त्याला स्त्रीसंग करताच मृत्यु यावा? त्यावर त्यांनी सांगितले, की पांडूने जो दिग्विजय वगैरे केला, त्यात त्याला अनेक स्त्रिया लाभल्या, शिवाय दासी वगैरे असतच. तस्मात कामातिरेकामुळे त्याचे ओज नष्ट झालेले होते, अश्या स्थितीत औषधी सेवनाने कृत्रिम रीत्या तात्पुरती शक्ती मिळवण्याचा आणखीनच वाईट परिणाम होतो. परिणामी त्याचे र्‍हदय कमकुवत झाले असावे, आणि उत्तेजनेमुळे वाढणार्‍या र्‍हदयगतिचा ताण सहन न झाल्यास मृत्यु ओढवू शकतो. अश्या प्रकारचे संशोधन करून जर या मालिकेत त्याचा अंतर्भाव करतील, तर ते आजच्या प्रेक्षकांना जास्त खरे वाटेल, पटेल.

In reply to by चित्रगुप्त

ऐकण्यात आले आहे की पांडू हा पांडूरोगाने ग्रस्त होता. ह्रदयाच्या आश्रयी असणारं साधक पित्त वाढल्यामुळे हा रोग होतो... पण याबाबतीत आपण वर्तवलेली शक्यता अधिक पटण्यासारखी वाटते

पांडुला पंडुरोग म्हणजे अ‍ॅनिमिया होताच. मात्र नियोगाच्या वेळी (अंबिका, आंबालिका पैकी जी कुणी होती तिने) डोळे मिटले म्हणून धॄतराष्ट्र आंधळा, आणि भयाने पांढरी पडली, म्हणून पांडुला पंडुरोग, हे पटत नाही, कारण मग या न्यायाने आंधळा धॄतराष्ट्र आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली गांधारी यांची सर्व संतती अंध व्हायला हवी होती. मागे एक पुस्तक वाचलेले आठवते (आता नाव विसरलो) त्यात असे म्हटले होते, की महाभारतात जिथे जिथे शाप-वर-चमत्कार इ. आहेत, ते सर्व कोणती न कोणती वस्तुस्थिती दडवण्यासाठी टाकलेली भर आहे. याबद्दल सर्व उदाहरणे त्या पुस्तकात आहेत. कुणाला ठाउक आहे का हे पुस्तक?

हायला ! खर्‍या महाभारतापेक्षा जास्त घमासान या धाग्यावर चालू आहे !! आता असते तर कौरवपांडव लढायचं सोडून मिपा हे असलं काही वाचत पडीक पडले असते आणि त्यांना लढायला वेळच मिळाला असता !!!

आज सगळ्यांच्यात "प्रतियोगिता" होणार आहे. धृतराष्ट्र आणि शकुनी यांना "प्रदर्शन" नको आहे... आज सगळे पांडव आणि कौरव बहुतेक मोठे झालेले चेहेर्‍यांसह दाखवणार असे वाटते.... खूप उत्सुकता आहे... कालच्या भागात (जेव्हा अश्वत्थामा कौरव पांडवांचे नाव लाकडी चक्रावर कोरत असतो तेव्हा) द्रोण आणि अश्वत्थामा यांच्यात "मैत्री" बद्दल जो "सं(वाद)" झाला त्यातले विचार परत परत ऐकण्या जोगे. चिंतन मनन करण्याजोगे आहेत.एपिसोड चुकला असेल तर ऑनलाईन पहा बरे का!! महाभारताची निर्माते, लेखक या सह कलाकार हे सगळे अक्षरश मन लावून काम करत आहेत आणि महाभारत "जगत" आहेत असे मला वाटते आणि ते दिसून ही येत आहे.... बरं, मी लिहिलेल्या एका निरिक्षणाबद्दल कुणाची अजून प्रतिक्रिया आलेली नाही: मी लिहिले होते की: महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

आजचा एपिडोस (२१ नोहेंबर) बघितला. च्यामारी नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर तर रजनी अण्णांचेही बाप आहेत. बुरुजावरून उड्डाण करून आगमन (तेही नव्वद अंशातून 'सरळ उलटे' लटकत) काय, अण्णा स्टाईलने खड्गे हवेत फेकून झेलणे काय, लाथ मारल्यावर पनास-शंभर हात उडत जाऊन पडणे काय, लई स्टाईलबाज लोक्स. आणि हे दाढी-मिश्यावाले झाले तरी त्यांच्या आया अजून तितक्याच चिकन्या. कहर आहे. विनोदी सिरियल म्हणून बघावे.

In reply to by चित्रगुप्त

=)) =)) =))
आणि हे दाढी-मिश्यावाले झाले तरी त्यांच्या आया अजून तितक्याच चिकन्या. कहर आहे.
धन्य _/\_

मग काय ठरलं शेवटी? मी या मालिकेचे १ ते दीड भाग पाहिले आणि मग मालिका आहे हे विसरून गेले. पूर्वीची महाभारत अशीच काहीकाळ पाहिली होती. मग रामायण आणि महाभारत या मालिका सुरू असताना बाजारात गेल्यास रस्ते आणि दुकाने रिकामी मिळतात हा बहुमूल्य शोध लागला त्यामुळे त्या मालिका प्रचंड आवडू लागल्या. महाभारतावर अनेकांनी अनेक प्रकारे लिहिले आहे त्यात आणखी थोडी भर. काय फरक पडतो? जौ द्या. टीव्हीवर आलेल्या महाभारत मालिकांपैकी "भारत एक खोज" मालिकेच्या काही भागात जे महाभारत दाखवले होते ते मला बर्‍यापैकी आवडले होते.

In reply to by पैसा

रामायण आणि महाभारत या मालिका सुरू असताना बाजारात गेल्यास रस्ते आणि दुकाने रिकामी मिळतात हा बहुमूल्य शोध लागला त्यामुळे त्या मालिका प्रचंड आवडू लागल्या.
अगदी असेच आमचेही झाले. त्यावेळी निवांतपणे फिरायला जायचो. बाकी आतचे महाभारत विनोदी कार्टून सारखे बघावे, असा विचार आहे. या सिरियलबद्दल एक मला न सुचलेला विचार काल कळला, तो म्हणजे कार्टून मालिका बघाणार्‍या अल्पपवयीन मुलांना हे असे उड्डाण करून येणारे पांडव वगैरे प्रचंड आवडतात. त्यामुळे ही बाळगोपाळ मंडळी महाभारत बघतील, आणि त्यांच्या आवडीच्या स्वरूपात त्यांच्यापर्यंत महाभारत पहुचेल, ही एक फार चांगली गोष्ट होईल, असे म्हणू शकतो. वयस्क, ज्यांनी महाभारतावरील अनेक पुस्तके वाचली आहे, त्यावर मनन केलेले आहे, त्यांनी ही मालिका बघण्यापेक्षा आजवर महाभारताची ओळख न झालेल्या लहान मुलांनी ती बघणे जास्त गरजेचे आहे, आणि हल्ली उपलब्ध असलेल्या कार्टूनांशी स्पर्धा असल्याने निर्मात्यांनी महाभारतात असा मालमसाला टाकला असावा, असे वाटते.

कौरवांसारखे ह्या धाग्याचे बघताबघता १०० झाले... :)

अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे धावते समालोचन आहे कि काय? झाला नविन भाग की टाक स्टोरी. मराठी आंतर्जालावर हा एक नविन प्रकार सुरु झालाय असे समजावे का? ;)

अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे धावते समालोचन आहे कि काय? झाला नविन भाग की टाक स्टोरी. मराठी आंतर्जालावर हा एक नविन प्रकार सुरु झालाय असे समजावे का?
माबो ची परंपरा मिपावर सुरू झालेली दिसतीये

फारएंड सायबाच्या कडून परीक्षण कस करावे ते शिकावे .............फारइंडांचे परीक्षण कमीतकमी पुढील १० वर्षे वाचावे .......आणि लिहिते व्हावे .....

म्हैसतै, तुम्ही नेहमीच संदर्भांशिवाय बोलत असता. आणि संदर्भ मागितले कि देत नाहीत.
इकडचं तिकडचं काहीतरी वाचत बसण्यापेक्षा मूळ महाभारत वाचा. द्रोण वचनाला बांधील होते म्हणून त्यांनी असं केलं. तसच खाल्लेल्या मिठाला जागायला सुधा बांधील होते म्हणून इच्छा नसताना कौरवांच्या बाजूने लढावं लागलं

चित्रगुप्ताच्या मताशी सहमत . ह्यात 6०% उगीच आपला काहीतरी बाळबोध दाखवलंय पण ४०% मूळ महाभारताला धरून आहे ह्याच्याशी सुधा सहमत