Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ५

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/11/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36277
प्रतिक्रिया 215

प्रतिक्रिया

घोडा ई५ मधे येऊन वजिराला मागे हटवायला बघणार असेल. कारण आता उंटाचा सपोर्ट असल्याने वजीर ई४ असा घोड्यावर येऊ शकत नाही.

In reply to by केदार-मिसळपाव

आता कार्ल्सन काय करणार? वजीरावजीर ? मग आनंद किल्लेकोट नाही करु शकणार

प्याद्यांची संख्या समान आहे आणी सगळी प्यादी समोरासमोर आहेत. त्यामुळे प्याद्यांच्या रोलरकोस्टरला आपोआपच खीळ बसली! पांढरा घोडा बी आणि ई५ दोन्हीकडे येऊ शकत नाही. आता आनंद कॅसल करुन घेईल बहुदा.

कार्ल्सन हत्ती डबल करेल त्यच्याकडे तसाही पांढर्‍या घरातला ऊंट आहे.

In reply to by arunjoshi123

मला त्यांनी खेळलेली चाल समजून घ्यायला वेळ लागतोय, प्रेडिक्ट काय करणार? :-)

ई७ मधे घेतलाय आनंदने आणि मग उंट डी७ कारण सी६ च्या प्याद्याला सपोर्ट.

बहुतेक त्याचे दोन्ही हत्ती कार्लसनच्या वजिराच्या बाजूला आणायचे असावेत. तिकडून बी स्तंभ उघडा आहे आणि कार्लसन तिकडे हत्ती चटकन आणू शकत नाहीये!

तुम्ही आम्ही जर बुद्धिबळ खेळत असलो तर गेम खूप खुला आणि बेसिक लेवलला असतो. हे दोघे जसे खेळताहेत ते पाहता पुढची खेळी काय असेल हे सांगणे कठीण आहे. मुळात एक खेळी ठरवून, प्यादी विकसित करून पुढे जातच नाहीयेत दोघे जण. ह्या क्षणी कार्लसन कडे एक घोडा ज्यादा आणि दोन हत्ती आहेत त्यावर गेम चा निर्णय लागायला हवा पण तो लगेच आक्रमण करणार नाही, समोरच्याचा पेशन्स पाहणार आणि आनंद काही पुढे जाणार नाही.

आता सी ६ वरचे दुबळे प्यादे एक्प्लॉईट करायला बघणार. घोडा ई४ मधे आणला त्याने. आता पुढची खेळी घोडा सी ५ अशी होऊन डी७ वरच्या उंटावर दबाव येणार आणि ए८ वरचा हत्ती धोक्यात येऊ शकतो. आनंदची पोझीशन नाजूक होत चालली आहे.

In reply to by arunjoshi123

दुसरीकडे लिहितोय हो. जास्त लिहीत राहिलो तर खेळ बघता येत नाही!

पुढच्या ४ खेल्या पटापट झाल्या! एकाच रंगाचे उंट आहेत आता प्याद्यांची संख्या सुधा समान आहे. आता आनंद त्याचे हत्ती डबल करणार का?

In reply to by केदार-मिसळपाव

त्याला त्याची प्यादी सुरक्षित करावी लागतील ऊंटा पासुन

एकतर ई स्तंभ धरला गेला आणि आता एच मधला हत्ती हलू शकत नाहीये कारण एच२ प्यादे पडेल उंटाने! आनंदने बी ५ वर ह्त्ती आणलाय.

ई४ वरचा उंट घट्ट बसलाय. त्याला कोणत्याच प्याद्याची थ्रेट नाहीये. आता आनंद हाती ई४ मधे आणून उंटाला हलवायला बघणार. डी १ मधला हत्ती मदतीला आला तर सी ४ असे प्यादे येते.

In reply to by मालोजीराव

मला तरी हा डाव निकालात निघणार ह्याची खात्री नाहीय ह्या दोघांच्या मुव्सकडे मिपाकरच नाही तर संपूर्ण जगातील अनेक चाहते डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या खेळ्या, त्या रचत असलेल्या चाली, सरकणारे प्यादे ह्याकडे अनेक नवबुद्धीबळपटू एक खाद्य म्हणून बघत असणार. पण त्या मानाने फारच बचावात्मक (खास करून आनंद) आणि सपक खेळताहेत दोघे जण.

In reply to by सुहासदवन

विशेषत: आजचा डाव अतिशय बोरिंग भासतोय! विश्रांती नंतर ही अपेक्षा नक्कीच न्हवती.

ई४ मधे घेईल आनंद असे वाटते. कारण मग जी ५ आणि एफ ५ असा हत्तीवर हल्ला होऊ शकतो आणि डी४ असा हत्ती आला तर सी ५ असे प्यादे येऊ शकते. करेक्ट आनंद जी ५ असा हत्तीवर आला.

In reply to by आतिवास

आनंद तेच खेळलाय! एच ५ हत्तीला पट्टी बंद करुन टाकली. पण धोका असा आहे की उंट आत शिरुन प्याद्यावर मागून हल्ला करु शकतो. मग प्यादी काळ्या घरात आणून ठेवणे भाग पडते.

रंगाकाकांच्या लाडक्या पुतणीला आणि आमच्या फेवरिट रमेशचाही अजून प्रेडिक्शन बरूबर येईना आणि आम्ही कसले डोंबलाचे तर्क करतोय. दोघेजण आपल्या सगळ्यांची फिरकी घेताहेत झालं. :)

हत्ती डबल झालेत. पण आनंदने उंट ई८ मधे आणून चांगला बचाव केलाय. पण हत्ती आता एफ ६ असा आत घुसू शकतोच!!

बुद्धिबळ हा फक्त पटावर नाही तर समोरच्या व्यक्तिमत्वाशी देखील खेळायचा असतो. दोघांना माहित आहे, जो पहिला डाव जिंकेल तो वरचढ होईल आणि मग इतर डावांत त्याचाच वरचष्मा राहील. म्हणून मग आधी समोरच्याचा पेशन्स आणि खेळी जोखायच्या आणि मग आक्रमण करायचे. ह्या पटाबाहेरील खेळीत कार्लसन उजवा ठरला आहे. त्यामुळेच पहिल्या काही डावात कार्लसन आधी बचावात्मक होता आणि डाव दर डाव कार्लसन आक्रमणावर भर देतोय. त्याच वेळी आनंद मात्र बचाव सोडून बाहेर पडण्याचा सेफ धोका सोडत नाहीये.

In reply to by सुहासदवन

कार्लसनच्या पेशन्सचा अंत पाहणे ही आनंदची रणनीति दिसतेय. ती कितपत यशस्वी होईल, माहिती नाही!

घुसला हत्ती आतमधे एफ ६. आता आनंदचा बचाव काय असेल? ओके. आनंदने एच ४ असे प्यादे टाकले. तसेही आत्ताच्या स्थितीत कार्लसनचे हाती लगेच काहीकरु शकत नाहीत म्हणा! उंट बी२ वर आला तर आनंदचा हत्ती ई५ मधे येऊन डिफेंड करु शकतोच.