Skip to main content

आनंद - कार्लसन डाव - ३

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 12/11/2013 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
तिसरा डाव सुरु झालाय. पुन्हा कार्लसनने रेटी सदृश खेळ्यांनी सुरुवात केली आहे परंतु तिसर्‍या खेळीला पहिल्या डावापासून फारकत घेतलीये. डाव खेळून बघता येईल. आणि तूनळीवरती या डावाचं फार सुरेख विश्लेषण आलंय तेही मदतीला घ्या! एन्जॉय माडी!!:) http://www.youtube.com/watch?v=D4mRcBHdlfw&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9mV…
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35835
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

पांढरा वजीर कोपच्यात नेला. आनंदचे उंट त्याची चांगलीच कोंडी करू शकतात. कार्लसन काय विचार करतोय कळंना. कार्ल्याचा वजीर मागे गेला. आपल्या डोक्याची मंडई व्हायलीय ऊऊऊप्स. वजीर एच-१ मधे. बाप रे. दणादण हल्ले चालू केले आनंदने. अब आयेगा मजा.

In reply to by रमताराम

मागे जाऊनही उंटाच्या मदतीने वजीर काही गडबड करू शक्तो कार्लसनचा. ये हुई ना बात.

सी५. हा कॉमेंटेटर कार्लसनला एकदम सगळे मार्क का देतोय सारखा? अजून केवढातरी डाव बाकी आहे.

त्या पांढऱ्या हत्तींना कशाला पोसतोयस बिन कामाचा, फिरव न जरा त्यांना त्या भरवश्यावरच तुझे चान्सेस होते मघाशी

आता राजा जी ७ किंवा एफ ६?

आनंदला त्याच बाजूला खेळायला हवे कारण राजाच्या बाजूला फार काही हालचाल तो करु शकत नाही. प्रत्येकाला एका खेळीला साधारण दोन दोन मिनिटं आहेत. टाईमप्रेशर आता काम करायला लागेल!

घोडा एफ३?

कार्लस्टन वजीरा ला मोकले करण्यासाठी ऊंट इ४ वा सी३ ?

समोरचा कधी चुक करतोय त्याची वात बघतोय.

आरसी1 आरX सी5 जर वजिराने हत्तीला घेतले तर केइ6 चेकमेट

आनंदचं पारडं वरचढ आहे असं म्हणू शकतो. मॅग्नसचा वजीर बाहेर पडणे फारच अवघड झाले आहे. पुढचा उंट त्याला योग्य जागा शोधण्यात एक खेळी वाय घालवेल. मगच वजीर बाहेर पडू शकतो. आता वेळेचे दडपणही बरेच आहे. मॅग्नसला बारा खेळ्यांना सतरा मिनिटेच आहेत.

In reply to by रमताराम

राजा ला हलवुन वजीर बाहेर काढेल.

भौ ल म्हने लौकर लौकर खेल . घरी जायाचा टैम झाला .. दोघेहीजण "ठंडा कर के " खाओ ..असे आहे .. पांढर्या मोहर्‍यांचा अ‍ॅड्व्हांटेज कार्ल भौ नी घालवला आहे ..मॅच संतुलीत आहे .. ड्रॉ झाली तर आंनंद चा फाय्दा आहे

इंट्रेस्टिंग! आता अतिशय नाजूक पोझीशन आहे. आनंद प्यादे मारेल. हत्तीने प्यादे घेतले. तर उंटाने बी २ प्यादे मारता येईल पण मग पांढरा उंट एच ३ मधे येऊन आनंदचा उंट पिन करतो हत्तीशी!!

आनंदने अतिशय सुंदर खेळी केली आहे. ते प्यादे बर्‍यापैकी विषारी होते!

आनंदच्या चेकमेट ला सुरुवात

शेवटी इतका वेळ जागा धरून बसलेल्या डी-४ प्याद्याने आनंदच्या उंटाला उत्तम जागा राखून ठेवली.

आता प्याद्यांची मारामारी मग बी स्तंभ ओपन, आणि बी२ प्याद्यावर हल्ला. कार्लसनला त्याचा वजीर खेळूच देत नाहीते आनंद!

आता आनंद चा वजीर मोकळा होणार

आनंद प्रत्येक मूव मधे मॅग्नसचे कुठले तरी मोहरे धोक्यात आणून वजीराची सुटका करण्याची मॅग्नसची मूव रोखून धरतोय. वेळेत मार खाण्याची वेळ येणार त्याला बहुतेक.

एफ३?

In reply to by केदार-मिसळपाव

एफ६?

डी ३ वर डोळा आहे कार्ल भौ चा !! आणि आनंद भौ नी हत्ती चा वापर करावा अशी आमची इछा आहे

पांढरा उंट असताना सर्व प्यादी पांढर्ञा घरात आहे .. ही कदाचित डोकेदुखी होइल ..आणि आता सेटल करायला वेळ / मूव्ह नाहियेत

पटावर कुरुक्षेत्र झाला .. आनं दच्या राजाची पोझिशन वीक आहे .. काळजी वाटू लागली आहे..

पांढर्या वजीरावर बराच लोड आहे ..तो हालला तर डीफेन्स अवङ्ह्ड होइल .. आनंद चा वजीर मो़कळा आहे ..हाच फायदा

सद्य स्थिती पहाता ड्रॉ !!

आम्हाला जरा एन्ड-गेमची मजाही लुटू द्या.

ड्रॉ?

अखेर ड्रॉ पण थोड्याश्या विपरीत स्थितीतून बाहेर आल्याने कार्लसन थोडा आनंदात असणार हे नक्की

आत्ता सायटीवर जाऊन बघितले तर दोघेही शेकहँडकरून उठताना दिसले लाईव्ह स्ट्रीम मधे. तेवढेच आपल्याला ड्रॉ झाल्यासारखे वाटले.

अर्र. शेवटीही आनंदने उंट-प्याद्याचे कॉम्बिनेशन न सोडत राजा पुढे आणत गेम प्रेस करायला हवा होता. मॅग्नस काहीही करून त्या दोघांना हात लावू शकत नव्हता. जर आनंदच्या राजाने मॅग्नसचे प्यादे मटकावण्याचा प्रयत्न करायला हवा होता. अर्थात इथे पुन्हा तीन रिपीट मूवची शक्यता ९९.९९% होती. पण आनंदने झटपट ड्रॉ घेतला. बहुत मजा आया आज.

पण मजा आली, जोरदार खेळून ड्रॉ झाल्यामुळे फार वाईट वाटले नाही!

श्या: श्या: श्या: आनंदने हाडाव जिंकायला हवा होता ...