✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !

र
राजु भारतीय यांनी
Wed, 10/30/2013 - 20:06  ·  लेख
लेख
माझी पार्श्वभूमी : १) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण. २) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली. ३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय. ४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती. ५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे . ६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल. सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही. अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते. संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत. भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
इतिहास
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
41767 वाचन

💬 प्रतिसाद (275)

प्रतिक्रिया

हिंदू आणि मुसलमान या केवळ

बलि
Wed, 10/30/2013 - 20:12 नवीन
हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत
यासाठी समाजातील सर्वच स्तरातील, धर्मातील लोकांनी पुढाकार घ्यायला हवा.

ह्म्म्म्म!

राजु भारतीय
गुरुवार, 10/31/2013 - 18:03 नवीन
या बाबतीत सर्वांनी पुढाकार घ्यावा हे मान्यच आहे. पण तो एक पुढचा टप्पा आहे. पहिला टप्पा हा या रेषा कृत्रिम आणि स्वार्थी आहेत आणि त्या पुसल्या पाहिजेत याची जाणीव सर्व समाजाला व्हावी लागेल, त्याही आधी दुभंग निर्माण करण्याचे प्रयत्न थांबले पाहिजेत. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: बलि

या रेषा कृत्रिम आणि स्वार्थी

श्रीगुरुजी
गुरुवार, 10/31/2013 - 20:06 नवीन
या रेषा कृत्रिम आणि स्वार्थी कशा काय?
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

रेषा कृत्रिम आणि स्वार्थी

राजु भारतीय
Mon, 11/04/2013 - 09:49 नवीन
४७ नन्तर तर या भेदांची गरज नव्हती. मुसलमानांचे लांगुलचालन करणं कॉंग्रेसने चालू ठेव्लं. मुसलमानांचे तुष्टीकरण ईंग्रजाकडून मिळालेल्या देणगी सारखं त्यांच्या स्वार्थासाठी,मतांच्या रा़जकारणासाठी चालु राहिलं, पण संघाने या काँग्रेसच्या खेळीला सामाजीक उत्तर द्यायचे सोडून राजकीय उत्तर द्यायची व्यवस्था केली - जनसंघाची स्थापना करुन ! संघ ही राजकीय संघटना नव्हती. इंग्रजांच्या, काँग्रेसच्या क्रुपेने निर्माण झालेला भेदाच्या आगीवर संघ एका बाजूला तेल ओतुन आपली ही पोळी भाजुन घेतोय. खरेतर तो भेद जिवंत ठेवायचाच सातत्याने प्रयत्न करतोय !गावागावात,तुमच्या आजुबाजुला असलेल्या मुसलमानांशी तुमचं वैयक्तिक भांड्ण असते का ? वैर असते का - ते मुसलमान आहेत म्हणून ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

???

इष्टुर फाकडा
Mon, 11/04/2013 - 18:29 नवीन
" पण संघाने या काँग्रेसच्या खेळीला सामाजीक उत्तर द्यायचे सोडून राजकीय उत्तर द्यायची व्यवस्था केली - जनसंघाची स्थापना करुन ! संघ ही राजकीय संघटना नव्हती." काय बोलतो भाऊ तू ? जरा दोन वाक्यात साम्य असुदेकी ! किती कोलांट्या माराव्या लागतात ना…. उगी असुदे :)
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला

प्रकाश घाटपांडे
Wed, 10/30/2013 - 20:14 नवीन
वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला असता तर ते अधिक उपयुक्त झाले असते. असो टिप्पण आवडले. जागा पकडून बसतो.

+१०००००००००

आदिजोशी
Wed, 10/30/2013 - 20:21 नवीन
+१०००००००००
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला

धन्या
Wed, 10/30/2013 - 20:42 नवीन
वैचारिक बदलाचा प्रवास लिहिला असता तर ते अधिक उपयुक्त झाले असते.
हेच म्हणतो.
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

संघ कार्यकर्ते आणि वैचारीक

विजुभाऊ
गुरुवार, 10/31/2013 - 12:35 नवीन
संघ कार्यकर्ते आणि वैचारीक गोष्टींचा संबन्ध असतोच असे नाही. तिथे विचारांची फक्त देवाण होते घेवाणीला फक्त काहीनाच परवानगी असते. ( एकेकाळी शाखेत जाणारा....विजुभाऊ)
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

वैचारिक बदलाचा प्रवास....

राजु भारतीय
गुरुवार, 10/31/2013 - 18:08 नवीन
वैचारिक बदलाचा प्रवास तपशील म्हणून फार महत्वाचा नाही आणि या लेखात विषयाचा रोख पहाता ते फार महत्वाचे नाही. राम मंदिर ज्या पद्धतीने प्रसवल गेलं त्या प्रक्रियेचा आघात प्रचंड होता ज्यामुळे बाहेर पडण्याचे धाडस केले, हे स्पष्ट केले आहेच. अर्थात हा ही निर्णय अचानक घेता येणे शक्य नव्हते. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

@ राजू भारतीय ...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 18:34 नवीन
मुद्दा जर फक्त राम मंदिराचाच असेल तर, गोष्ट निराळी आहे. केवळ ह्या एका कारणाने जर तुम्ही सगळ्या संघाला आणि स्वयंसेवकांना आणि त्यांच्या कार्यपद्धतीला दोषी समजत असाल तर ते चूकीचे आहे. तो निर्णय राष्ट्रीय पातळीवरुन घेतल्या गेला होता.कुठल्याही पक्षाच्या कार्यकारणीत एकदा निर्णय घेतला की , एक तर तो पाळावा किंवा गप्प बसावे. बरे दुसरी गोष्ट अशी की, तुम्हाला राम मंदिराचा निर्णय पटला नाही, मग तुम्हाला नंतर झालेले बाँब-स्फोट ते कसाब व्हाया गोध्रा हा प्रवास पण पटला नसेलच.तुम्ही कधी त्यावर आपले विचार का नाही मांडले?
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

तुमचा आबा झालाय !

राजु भारतीय
गुरुवार, 10/31/2013 - 18:51 नवीन
वरच्या विधानावरून मूवी तुमचा पक्का आबा झालाय ! २६/११ नंतर कुणीतरी एवढ्या मोठ्या शहरात असे छोटे मोठे कारनामे तर होतच असतात असे म्हणाले होते, आठवते ना ? अहो राम मंदिर हे फक्त मंदिरासाठी आंदोलन नव्हते - किमान - शहाण्या विचारी मनांनी तरी एवढे भाबडे असू नये. बाबरी पडल्यानंतर या देशाची संपूर्ण वैचारिक फाळणी झाली आहे - विनाकारण ! या देशाचे समाजकारण धर्माच्या पलीकडे जाण्याची गरज होती आणि आहे त्या प्रक्रिये मध्ये भारतीय समाज शंभर वर्षांनी मागे गेलाय !!! आता आधी हा खड्डा भरून काढावा लागेल मग रस्त्यातले खड्डे बुजतील, म्हणजे विकास सुरु करायला आपण विनाकारण मागे पडलोय ! ही फाळणी करण्याची स्वतंत्र भारतात गरज काय होती ? आणि त्या नंतरचे आपले प्रश्न हे आपण ही मूवी संसर्गित / बाधीत आहात याचा दाखला देते ! कसाब म्हणजे पाकिस्तानची कारवाई हा काय मुसलमानांचा हिंदुंवर हल्ला होता ? कमाल आहे !! गोधरा, १९९३ चे स्फोट हे बाबरी पाडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या फाळणीची विषारी फळे आहेत त्याचा जाब संघाला विचारा !
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

@ राजू भारतीय ...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 19:35 नवीन
प्रथमतः, माझे नांव मुक्त विहारी (किंवा मुवि) असेच आहे.मला कुठलीही उपाधी किंवा इतर राजकीय नेत्यांचे नांव देवू नका. दुसरे..."अहो राम मंदिर हे फक्त मंदिरासाठी आंदोलन नव्हते." निदान मला तरी ते फक्त त्यासाठीच आहे असे वाटते. तिसरे... "बाबरी पडल्यानंतर या देशाची संपूर्ण वैचारिक फाळणी झाली आहे." म्हणजे त्याआधी न्ह्वती असे आहे का? चौथे..."या देशाचे समाजकारण धर्माच्या पलीकडे जाण्याची गरज होती आणि आहे त्या प्रक्रिये मध्ये भारतीय समाज शंभर वर्षांनी मागे गेलाय !!!" हे फक्त एका राम मंदिरामुळेच का? पाचवे... "कसाब म्हणजे पाकिस्तानची कारवाई.हा काय मुसलमानांचा हिंदुंवर हल्ला होता?" हा "दार-उल-हरब" वरचा हल्ला होता.आता तुम्हाला दार-उल-इस्लाम आणि दार उल हरब माहीत नसेल तर गोष्टच वेगळी.. सहावे..."गोधरा, १९९३चे स्फोट हे बाबरी पाडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या फाळणीची विषारी फळे आहेत त्याचा जाब संघाला विचारा !" अच्छा म्हणजे त्याआधी हिंदू-मुस्लीम दंगे होतच न्हवते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

>>> अहो राम मंदिर हे फक्त

श्रीगुरुजी
गुरुवार, 10/31/2013 - 21:04 नवीन
>>> अहो राम मंदिर हे फक्त मंदिरासाठी आंदोलन नव्हते - किमान - शहाण्या विचारी मनांनी तरी एवढे भाबडे असू नये. मग अजून कशासाठी होते? >>> बाबरी पडल्यानंतर या देशाची संपूर्ण वैचारिक फाळणी झाली आहे - विनाकारण ! या देशाचे समाजकारण धर्माच्या पलीकडे जाण्याची गरज होती आणि आहे त्या प्रक्रिये मध्ये भारतीय समाज शंभर वर्षांनी मागे गेलाय !!! शहाबानो खटल्यातील निकाल राजीव गांधींनी पाशवी बहुमताच्या जोरावर फिरवून कोट्यावधी मुस्लिम स्त्रियांना म्हणजेच पर्यायाने भारतीय समाजाला किमान ५०० वर्षे मागे नेले त्याचे काय? अगदी १५ दिवसांपूर्वी कोणत्यातरी साधूच्या स्वप्नावर अंधविश्वास ठेवून उन्नानमध्ये उत्खनन करण्याचा मूर्खपणा करून आणि त्यासाठी प्रचंड खर्च करून भारताला अनेक शतके मागे नेले त्याचे काय? धर्माच्या आधारावर वेगळे कायदे करून भारतीय समाजात कायमची फूट पाडून ठेवली त्याचे काय? या देशाची वैचारिक फाळणी ८ व्या शतकातच झाली होती व ती नंतर ब्रिटिशांनी व त्यानंतर काँग्रेसने अजून रूंदावली. बाबरी मशीद पाडण्याचा व या फाळणीचा काहीही संबंध नाही. >>> आता आधी हा खड्डा भरून काढावा लागेल मग रस्त्यातले खड्डे बुजतील, म्हणजे विकास सुरु करायला आपण विनाकारण मागे पडलोय ! सर्वात धार्मिक आधारावर केलेल्या वेगळ्या कायद्यांमुळे व एका विशिष्ट धर्मातील लोकांचे धर्माच्या आधारावर सुरू असलेले फाजील लाडांमुळे तयार झालेल्या दर्‍या बुजविण्याची गरज आहे. >>> ही फाळणी करण्याची स्वतंत्र भारतात गरज काय होती ? धार्मिक आधारावर वेगळे कायदे करून दोन्ही समाजात कायमस्वरूपी दरी निर्माण करण्याची काय गरज होती? >>> कसाब म्हणजे पाकिस्तानची कारवाई हा काय मुसलमानांचा हिंदुंवर हल्ला होता ? अर्थातच >>> कमाल आहे !! गोधरा, १९९३ चे स्फोट हे बाबरी पाडल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या फाळणीची विषारी फळे आहेत त्याचा जाब संघाला विचारा ! आपण पूर्वी संघात असूनही आपले इतके अज्ञान कसे? गोध्रा किंवा १९९३ पूर्वीदेखील भारतात अनेक दंगली व बॉम्बस्फोट झालेल्या आहेत. ही कोणत्या घटनेची विषारी फळे होती? १९२१ मधील केरळमधील मोपल्यांची दंगल तर संघाच्या जन्माआधी झाली होती. १९४७ च्या दंगली, १९६८ ची भिवंडीची दंगल, १९८४ ची मालेगाव-भिवंडीची दंगल, १९८० पासून १९९२ पर्यंत होत असलेले बॉम्बस्फोट हे काय बाबरीमशीद्-गोध्रा प्रकरणामुळे झाले का? आणि गोध्रा येथे रेल्वेचा डबा पेटवून ६० कारसेवकांना जाळले नसते तर गुजरातची दंगल झाली असती का?
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

४७ नंतर ९१ पर्यंत ज्या अनेक

llपुण्याचे पेशवेll
Fri, 11/01/2013 - 15:50 नवीन
४७ नंतर ९१ पर्यंत ज्या अनेक धार्मिक दंगली झाल्या त्या काय राममंदिराच्या मुळे झालेल्या वैचारीक फाळणीमुळे (म्हणजे खरेतर वैचारीक फाळणी वगैरे काही न झालेल्या. फक्त काही लोकाना अशी कोल्हेकुई कायम करायची असते) झाल्या होत्या का? झालेच १८९२-९३ साली झालेल्या दंगली ही तथाकथित वैचारिक फाळणी (असेलच तर!) अनादि (म्हणजे इस्लामचे आक्रमण सुरु झाल्यापासूनची) अनंत आहे असे तुम्हाला वाटत नसेल तर खुषाल तुम्ही स्वतःशीच खोटे बोलत आहात असे समजा.
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

४७ नंतर ९१ ?????

राजु भारतीय
Mon, 11/04/2013 - 16:16 नवीन
४७ नंतर ९१ पर्यंत अनेक धार्मिक दंगली झाल्या .............??????
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

का अभ्यास कच्चा आहे वाटतं

llपुण्याचे पेशवेll
Mon, 11/04/2013 - 17:06 नवीन
का अभ्यास कच्चा आहे वाटतं? http://en.wikipedia.org/wiki/List_of_massacres_in_India यादी पहा. पर्फेक्ट नसेल पण अगदीच टाकाऊ नक्की नाही. :-)
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

समस्या जितकी जुनी तितकी ती

श्रीगुरुजी
गुरुवार, 10/31/2013 - 20:14 नवीन
समस्या जितकी जुनी तितकी ती सोडविणे त्रासदायक! श्रीरामजन्मभूमीवरील मूळचे मंदीर उध्वस्त करून तिथे मशीद बांधली ही संतापजनक व दु:खद घटना ४५० वर्षांहून अधिक जुनी. स्वातंत्र्यानंतरची ४५ वर्षे सुद्धा ही समस्या सोडविण्याऐवजी लोंबकळत ठेवली गेली. त्यामुळे समस्येच्या उत्तराचा आघात प्रचंड असणारच.
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

हे राहिलंच

आदिजोशी
Wed, 10/30/2013 - 20:32 नवीन
बरेच मुद्दे मांडलेत, स्पष्टीकरण एकाचेही नाही. उदा: ४७ च्या आधीच्या जखमा भळभळत ठेवण्यामागे आज संघाचा काय स्वार्थ आहे? लव्ह जिहाद संघाची चाल आहे का? देशातल्या समस्त हिंदुंची भावना तुम्हाला कशी काय कळली? इत्यादि इत्यादि. आणि हो, नसबंदी बद्दलही आम्हाला कळेल असं लिहा.

स्पष्टीकरण....

राजु भारतीय
गुरुवार, 10/31/2013 - 18:28 नवीन
माफ करा, स्पष्टीकरण देण्याच्या मुद्द्यांची जंत्री आपण तयार केलीत तर एकेक मुद्दा पटलावर घेता येईल. १९५० साली घटनेने हे स्वतंत्र राष्ट्र आहे असे घोषित करताना आता इथे कुणी हिंदू आणि मुसलमान नाही, इथे सगळे भारतीय म्हणून राहतील असे स्पष्ट केले आहे. या स्पष्टीकारणामध्ये प्रचंड अर्थ आहे. हे उपासना पद्धतीवर आधारित भेद वैयक्तिक स्वरूपात जपता येतील पण त्याचा राजकीय वा सामाजिक लाभ उठवता येणार नाही आणि कायद्याने तसा भेद करता येणार नाही. त्यामुळे तोवर असणारे मुस्लिम राखीव मतदार संघ बंद झाले. ब्रिटीश कालीन संसदे मध्ये रीतसर मुसलमान आणि हिंदू यांच्या टक्केवारी नुसार जागा भरल्या जाणा-याची पद्धत - कायद्याने - स्वतंत्र भारतात बंद झाली. मग आता हिंदूंचे संघटन " हिंदू " म्हणून करण्याचे कारण काय ? १९२५ ते १९४७ त्या संघटना करण्याला काही अर्थ होता. कारण इंग्रज सरकार तो भेद जिवंत ठेऊन आपली वाट सुकर करत होता. आपल्याच म्हणजे भारतीयांचे सरकार आल्यावर हिंदू म्हणून घाबरण्याचे काही कारण नव्हते आज ही नाही ! तरी देखील संघ हिंदू संघटीत झाला पाहिजे असे म्हणतो, याला स्वार्थ सोडून दुसरे कiरणच नाही. १९४७ नंतर राम मंदिरा सारखे निरर्थक आंदोलन सोडले तर एका तरी राजकीय वा सामाजिक विषयासाठी एकत्रित हिंदू म्हणून दाद मागावी लागली आहे का ? दुसरे - लव्ह जिहाद ची किती प्रकरणे तक्रारी च्या स्वरूपात अखिल भारतात पोलिसांकडे दाखल झाली आहेत ? मुसलमान आणि हिंदू व्यक्तींमधला सरसकट विवाह वा प्रेम हे लव्ह जिहादच आहे असा संघवाल्यांचा सरसकट दावा आहे ! तसा प्रचार रीतसर ते करतात याचे अनेक पुरावे आहेत. ते इथे देण्यासारखे नाहीत.
↩ प्रतिसाद: आदिजोशी

मुसलमान आणि हिंदू व्यक्तींमधला सरसकट विवाह वा प्रेम हे लव्ह जिहा

अनिरुद्ध प
गुरुवार, 10/31/2013 - 18:55 नवीन
आपण काय बोलत आहात हे आपल्याला तरि समजत आहे का?मला तरी हा आपला प्रसिद्धी मिळवण्याचा सवन्ग मार्ग वाटत आहे.
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

?????? !

राजु भारतीय
गुरुवार, 10/31/2013 - 18:59 नवीन
अनिरूध्द, आपली शंका काय आहे ? हमरीतुमरव्र्र नका येऊ. चर्चा करु. पटलं तर ठिक नाही तर सोडून द्या !!
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

… आणखीन एक !

राजु भारतीय
गुरुवार, 10/31/2013 - 19:10 नवीन
… आणखीन एक ! इथे मला प्रसिद्धी कशी मिळेल ? वा मिळते ? खच्चुन हजारेक मिपा सदस्यांमध्ये प्रसिद्धी साठी म्हणताय का ? पण असे काही म्हणजे तुमच्या लेखी सवंग वगैरे लिहिण्याने हि प्रसिद्धी कशी काय बुवा मिळते ? आणि मग त्या प्रसिद्धीचे लोक इथे काय करतात ? नोकरी मिळते ? मिपाच्या निवडणुका होतात ? की अवार्ड फंक्शन असते आणि अवार्ड मिळते ? की माझे होर्डिंग लावले जाते ? म्हणजे नेमके मिळते काय - असा तुमचा दावा आहे ? मिपा मध्ये लेखन करण्याचा तुमचा वा अन्य लोकांचा प्रसिद्धी मिळवणे हा हि एक हेतू असतो का ? पण पुन्हा तेच - या प्रसिद्धीतून सदस्यांना काय काय लाभ होतात ? याचे उत्तर तुम्ही द्यायला माझ्या पेक्षा लायक आहात कारण आपण मला मिपावर सिनियर आहात ! चला उत्तर द्या !!
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

धन्यवाद

अनिरुद्ध प
गुरुवार, 10/31/2013 - 19:55 नवीन
मी मिपा वर आपल्यापेक्षा सिनिअर वगैरे काही नाही,किवा आपण समवयस्क (मिपावर) आहोत असे समजु,सवन्ग प्रसिद्धी असे वाटण्याचे एक कारण म्हणजे आपण आजपर्यन्त ईतक्या दिवसात कुठल्याही धाग्यावर एकही प्रतिकिया लिहिलेली दिसली नाही,तसेच आपण हा नवा धागा सुरु केला तो सुद्धा सन्घ परिवार आणि हिन्दुत्व या विषयावर्,कारण हल्ली एक फेशनच झाली आहे सन्घ परिवार,मोदी हिन्दुत्व या वर टिका करुन झटपट प्रसिद्धी मिळवण्याची जी माझ्यामते सवंग आहे.
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

सगळ्या वाक्यांशी सहमत

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 20:14 नवीन
+ १
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

मला पहिला परिच्छेद खोटा वाटत

पुष्कर जोशी
Wed, 11/06/2013 - 17:06 नवीन
मला पहिला परिच्छेद खोटा वाटत आहे ..
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

का ?

राजु भारतीय
Wed, 11/06/2013 - 17:36 नवीन
का बरे खोटा ? मी जर मझा परिचय करुन नसता दिला तर मला संघाविषयी काही माहिती नाही अशी ओरड झाली असती.
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

का बरे खोटा ?

पिशी अबोली
Wed, 11/06/2013 - 18:16 नवीन
का बरे खोटा ?
कारण तुम्ही करुन दिलेला परिचय हा संघपद्धतीनुसार नाही... तसा करुन देण्याचे प्रश्न तुम्ही सोयीस्कररित्या टाळत आहात...
मी जर मझा परिचय करुन नसता दिला तर मला संघाविषयी काही माहिती नाही अशी ओरड झाली असती.
तुम्ही तुमची मतं प्रामाणिकपणे मांडली असती तर त्यांची कदर झाली असती.. कातडे पांघरुन 'मी कळपातला' असे दाखवण्याच्या प्रयत्नाने काहीच साध्य झाले नाही...
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

सोड ना!

प्यारे१
Wed, 11/06/2013 - 18:42 नवीन
सोड ना! बडे बडे देशोंमें ऐसे छोटे छोटे राजु 'भारतीय' बनके रहते है!
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

क्या बात क्या बात प्यारेआबा..

पिशी अबोली
Wed, 11/06/2013 - 18:48 नवीन
क्या बात क्या बात प्यारेआबा... ;)
↩ प्रतिसाद: प्यारे१

मी खरा की खोटा ......! धन्य आहे !!!

राजु भारतीय
Wed, 11/06/2013 - 19:02 नवीन
संघ पद्धतीने परिचय आपण कसा करता ? तो कसा करतात ? परिचय करून देण्याची पद्धत कुठे आणि संघातल्या कुणी लिहून ठेविली आहे ? आपण कोणत्या अभ्यासवर्गात परिचय करून देण्याचे प्रशिक्षण घेतले ? आपल्या गावातले भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते किंवा भाजप चे कार्यकर्ते किंवा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते किंवा संस्कार भारती चे कार्यकर्ते तुम्ही म्हणता तसाच परिचय करून देतात का ? ( बाय द वे ; भारतीय मजदूर संघाचा कार्यकर्ता पाहिलाय का कधी ? ) आणि पद्धतीने परिचय करून न देणा-यांना संघातून काढून टाकण्याचा अधिकार हल्ली पु. मोहनजीनि आपल्याला दिलाय का ? आणि शेवटी समजा ज्या कुठल्या स्तैल ला आपण संघ स्तैल परिचय म्हणता तो इथे करून द्यायला मिपा हे साप्ताहिक विवेक आहे का, म्हणजे संघ परिवारातील काही बाही ? मुद्दाचे बोला हो, मी खरा की खोटा याचा काय सबंध ? संपादित कृपया वैयक्तिक शेरेबाजी करू नये.: संपादक मंडळ
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

बस बस बस... थँक्यू...

पिशी अबोली
Wed, 11/06/2013 - 21:03 नवीन
बस बस बस... थँक्यू... :) इथे अनेक संघाशी संबंध आलेले लोक आहेत... तुमची ऑथेंटिसिटी की काय म्हणतात ती चेक करायची होती... ती करवून दिलीत... और क्या चाहिये... :)
मी खरा की खोटा याचा काय सबंध ?
अहो चिडताय काय असे? तुमचा धागा आहे...त्यात तुम्ही बरंच काहीबाही सांगत आहात... गुरूसुद्धा पारखून घ्यावा म्हणतात... तुमचे विचार पटवून घेण्याआधी तुम्ही खरे की खोटे ते तपासायला नको का?
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

होप आय एम नौ इनफ मोडेस्ट !

राजु भारतीय
Wed, 11/06/2013 - 22:28 नवीन
वंदनीय पिशी अबोली ताई , नमस्कार , आता - घडाभर तेल संपले असेल तर - मुळ मुद्द्यांवर आपले मत प्रदर्शन करून आम्हाला उपकृत कराल का ? आणि मी चिडत वेगैरे नाही हो . आणि चिडलो असतो तर संपादक मंडळाला मी ही तक्रार केलीच असती ना !.
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत

इष्टुर फाकडा
गुरुवार, 10/31/2013 - 19:47 नवीन
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत तुमचे काय मत आहे ? समान नागरी कायदा आला पाहिजे का नको ? या कायद्याला संघाने कधी विरोध केला? राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. तो वाचा आणि सांगा सुप्रीम कोर्ट कम्युनल आहे का ?
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

इथे वाचायला वेळ कुठे आहे?

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 20:17 नवीन
"मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाबाबत तुमचे काय मत आहे ? समान नागरी कायदा आला पाहिजे का नको ? या कायद्याला संघाने कधी विरोध केला?राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. तो वाचा आणि सांगा सुप्रीम कोर्ट कम्युनल आहे का ?" जावु दे... आधी बघावे गुगलून, अडल्यास बघावे विकीला हाच आमचा मार्ग एकला
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

३००+

बिपिन कार्यकर्ते
Wed, 10/30/2013 - 20:38 नवीन
३००+ Image removed.

३०० + होतील ही!

प्यारे१
Wed, 10/30/2013 - 20:43 नवीन
३०० + होतील ही! एकाच ग्राऊंडवर किती वेळा खेळायचं राव? राजु भारतीय यांना शुभेच्छा. तुमचा काळ कधीचा हो?
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

माफक सदस्य.

प्रभाकर पेठकर
Wed, 10/30/2013 - 20:51 नवीन
रा. स्व. संघाचा एके काळचा माफक सदस्य आहे मी. नुसताच स्वयंसेवक. गल्लीस्तरावरही कांही कार्य केलेले नाही. त्यामुळे कांही भाष्य करण्याची योग्यता नाही. वाचत राहीन. ज्या उद्देशाने धागा काढला आहे तो सफल होईल असे वाटते आहे.

संघाविषयी कधीही आपुलकी नव्हती पण......?

बाबा पाटील
Wed, 10/30/2013 - 20:59 नवीन
संघाविषयी कधीही आपुलकी नव्हती पण......? अश्या सुर्याजी पिसाळांची जास्त चीड येते.

काय हे ....?

राजु भारतीय
गुरुवार, 10/31/2013 - 18:37 नवीन
अळीचे फुलपाखरू झाल्यावर फुलपाखरू सूर्याजी पिसाळ होते का ? वाल्याचा वाल्मिकी होतो तेव्हा वाल्मिकी सूर्याजी पिसाळ ठरतो का ? फुलनदेवी माणसात येण्यासाठी डाकूगिरी सोडते तेव्हा ती डाकूगिरीशी गद्दारी करते का ? नक्षलवादी सामान्य नागरिक म्हणून जगण्यासाठी शरण येतात तेव्हा त्यांना पिसाळ म्हणतात का ? पिसाळ कोण प्रवाहातले कोण, बाबा ?
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

@ राजू भारतीय ...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 20:50 नवीन
"अळीचे फुलपाखरू झाल्यावर फुलपाखरू सूर्याजी पिसाळ होते का? वाल्याचा वाल्मिकी होतो तेव्हा वाल्मिकी सूर्याजी पिसाळ ठरतो का?" वरील दोन्ही उदाहरणे ही स्वतःच स्वतःची उत्क्रांती करण्याचा मार्ग आहे.अळी किंवा वाल्मिकी हे कुठल्याही सामाजिक कळपाचे सदस्य न्हवते. "फुलनदेवी माणसात येण्यासाठी डाकूगिरी सोडते तेव्हा ती डाकूगिरीशी गद्दारी करते का?" तिने डाकूगिरी का सोडली? तर तिला जिवंत रहायचे होते.संधी मिळताच तिचा खून झालाच. "नक्षलवादी सामान्य नागरिक म्हणून जगण्यासाठी शरण येतात तेव्हा त्यांना पिसाळ म्हणतात का?" संघाची तुलना फक्त संघा बरोबरच करता येते.तुम्ही निदान उदाहरण तरी संघाला शोभेल असे देत जा. "पिसाळ कोण प्रवाहातले कोण, बाबा ?" आता तुम्हीच सांगा पिसाळ कोण ते......मला तर तुम्ही खरोकरच संघात होतात का? असा प्रश्र्न पडला आहे.कारण ज्याला संघाची स्थापना का आणि कशी झाली? आणि त्यानंतर ५/६ वर्षांतच त्याचे परीणाम काय झाले? हे माहीत असलेला स्वयंसेवक असा धागा काढणार नाही.
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

मला लेखाचा पहिला परिच्छेद १००

पुष्कर जोशी
Wed, 11/06/2013 - 17:10 नवीन
मला लेखाचा पहिला परिच्छेद १००% खोटा वाटत आहे
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

का बरे ?

राजु भारतीय
Wed, 11/06/2013 - 17:38 नवीन
का बरे खोटा ? मी जर मझा परिचय करुन नसता दिला तर मला संघाविषयी काही माहिती नाही अशी ओरड झाली असती.
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

सरळ सरळ सांगा न राव धाग्या चे

चेतनकुलकर्णी_85
Wed, 11/06/2013 - 17:45 नवीन
सरळ सरळ सांगा न राव धाग्या चे बाळसे वाढवण्या साठी आयटेम सॉंग सारखा पहिला परिच्छेद टाकला आहे म्हणून !
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

:)

सोत्रि
Wed, 10/30/2013 - 20:59 नवीन
Image removed. - ('चड्डी' सरसावून बसलेला) सोकाजी

@ राजू भारतीय ...टाळी एका हाताने कधीच वाजत नाही...

मुक्त विहारि
Wed, 10/30/2013 - 21:36 नवीन
ज्या पोटतिडीकेने तुम्ही लिहीले आहे त्याच पोट तिडीकेने इथे कधीच खालील गोष्टीची चर्चा आपल्या मुस्लीम बांधवांनी केली नाही. १. समान नागरी कायदा. २. आझाद मैदान निषेध. ३. मुझ्झफर नगरचा निषेध. ४. घुसखोर बांगला-देशींचा (मग तो हिंदू असो की मुसलमान) निषेध. ५. मुस्लीम आंतकवाद्यांचा निषेध. अजून एक लक्षांत घ्या, भारत हा पुर्वीपासूनच "दार-उल-हरब" मानल्या गेल्या आहे.आज जितक्या सहजतेने तुम्ही हे एक भारतीय म्हणून लिहू शकता, इतक्या सहजतेने इथलेच काय पण कुठलाही मुस्लीम, ईंडीयन मुजाहिदीन, दावूद इब्राहिम किंवा रझा अ‍ॅकॅडमी बद्दल बोललेला नाही. तुम्ही संघात होता असे म्हणता, पण संघाची स्थापना का झाली? आणि तुम्हाला अजून पण असे वाटते का, की आता संघाने त्याचे विसर्जन करावे? वरील विचार मंथन हे राजू भारतीय ह्यांच्या बरोबर होत असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्‍यांनी मध्येच तोंड खूपसू नये, ही विनंती.

.

उद्दाम
गुरुवार, 10/31/2013 - 12:40 नवीन
दुसर्‍यानी तोंडं का खुपसायची नाहीत? खाजगी सवाल जबाबच करायचे तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत का द्यायचे? का, ही वेबसाइट म्हणजे फक्त तुमची पुण्यभू आणि पितृभू आहे आणि आम्ही कोणी इराणमधून आलो आहोत की काय? :)
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

दुरुस्ती

उद्दाम
गुरुवार, 10/31/2013 - 12:41 नवीन
दुसर्‍यानी तोंडं का खुपसायची नाहीत? खाजगी सवाल जबाबच करायचे तर एकमेकांच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत द्यायचे की. का, ही वेबसाइट म्हणजे फक्त तुमची पुण्यभू आणि पितृभू आहे आणि आम्ही कोणी इराणमधून आलो आहोत की काय?
↩ प्रतिसाद: उद्दाम

@ उद्दाम...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 12:48 नवीन
त्याचे काय आहे... मी शक्यतो ज्याने धागा काढला आहे, त्याच्याशी किंवा ज्याला काही किमान वैचारीक पातळी आहे त्याच्याशी विचार मंथन करतो. आपली आणि माझी वैचारीक किंवा सामाजिक पातळी जुळणे शक्यच नाही.कारण आपण नावाप्रमाणेच उद्दाम आहात.त्यामुळे आपण आमच्या पासून दुरच रहा.ही विनंती आहे. दुसरी गोष्ट...."आम्ही कोणी इराणमधून आलो आहोत की काय?" ते मला माहीत नाही, पण आपण भारतीय असाल तर... आपण अद्याप... १. समान नागरी कायदा. २. आझाद मैदान निषेध. ३. मुझ्झफर नगरचा निषेध. ४. घुसखोर बांगला-देशींचा (मग तो हिंदू असो की मुसलमान) निषेध. ५. मुस्लीम आंतकवाद्यांचा निषेध. ह्या विषयी निषेध का व्यक्त केला नाही?
↩ प्रतिसाद: उद्दाम

.

उद्दाम
गुरुवार, 10/31/2013 - 14:01 नवीन
देशात समान नागरी कायदाच आहे. ज्याने त्याने आपला धर्म पाळावा हाच तो समान नागरी कायदा. बहुपत्नीत्वाची चाल हिंदू धर्मातही होती. आणि ती हिंदुंनी स्वतः होऊन कयदा करुन बंद केली. तुम्ही ही चाल बंद करा, असा 'त्यान्नी' फतवा नव्हता काढला. आता तुम्ही तुमच्या पायावर धोंडा पाडून घेतला, तर त्याला बाकीच्यानी काय करायचे? ते पोटगीच्या कायद्याचेही तसेच. अस्ले आत्मघातकी कायदे करायला कोण सांगितले होते? उगाच दुसर्‍यांना दोष का द्यायचा?
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा