Skip to main content

हे शाश्वत ज्ञान नव्हे !

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 18/10/2013 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो: 'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. 'अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम | एतद ज्ञानमिती प्रोक्तं अज्ञानं त्दतो न्यथा|' म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे. यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी. जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित. पत्र वाचले आणि पत्रलेखकाबद्दल वाईट वाटले. लोक कुठल्या भ्रमात जगत असतात आणि "ग्रंथप्रामाण्याच्या" गुलामगिरीचं जोखड किती आनंदाने वाहत असतात याचं हे पत्र प्रातिनिधीक उदाहरण ठरावं. पत्रलेखकाच्या दृष्टीने अध्यात्म काय असेल ते असो, त्यांनी भगवदगीतेची साक्ष काढून वैज्ञानिक ज्ञानाला ज्या पद्धतीने निकालात काढलं आहे ते मात्र खरंच विचार करायला लावण्यासारखं आहे.
नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.
आजच्या घडीला नोबेल पारितोषिक हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदयकशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांमधील जागतिक पातळीवरचे सर्वोच्च पारितोषिक आहे. पारितोषिक विजेत्या व्यक्त या आपल्याला पारितोषिक मिळावे म्हणून नोबेल पारितोषिकाच्या कुठल्या स्पर्धेत भाग घेत नसतात. किंबहूना पारितोषिक जाहीर होईपर्यंत त्या व्यक्तीला हे माहितीही नसतं. नोबेल पारितोषिक हे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांनी मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कामाची पोच म्हणून दिले जाते. ते एक प्रकारचे त्या पारितोषिक विजेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं असतं. अशा वेळी त्या विजेत्या व्यक्तीला होणारा आनंद क्षणभंगुर कसा असेल? पत्रलेखक म्हणतोय की खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो. माझ्या अल्पमतीप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रांनूसार मोक्ष म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका. थोडा वेळ चौर्‍यांऐंशी लक्ष योनी, पुनर्जन्म वगैरे गोष्टी आहेत की नाहीत हे बाजूला ठेऊन असं गृहीत धरुया की मोक्ष म्हणून काहितरी आहे. मग मोक्ष मिळवून आपली जन्म मरणाच्या फेर्‍यामधून सुटका झाल्याचा आनंद आणी आपण मानवजातीच्या उपयोगी पडल्यामुळे याची देही याची डोळा मिळालेल्या पारितोषिकाचा आनंद यात श्रेष्ठ काय?
म्हणजे अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे.
कधीतरी चार साडेचार हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीतेत जे म्हटलंय तेच खरं. त्यानंतर कुणी काहीही म्हणो, तो सगळा मुर्खपणा. पत्रलेखक संन्याशाचं जीवन जगत असेल, आधूनिक ज्गातील एकही सुविधा वापरत नसेल तरच या म्हणण्याला निदान त्याचापुरता अर्थ आहे. पण मला खात्री आहे, पत्रलेखक आधुनिक "अज्ञानाने" निर्माण केललेया कितीतरी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असेल.
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे.
वैदयकशास्त्र, जीवशास्त्र हे थोतांड आहेत हाच या वाक्यांचा अर्थ.
नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा! नोबेल विजेत्यांत भारतीय नाव नाही याची खंत नसावी.
जे काही शोध लावायचे, जे काही मानवजातीचे पांग फेडायचे ते त्या पाश्चिमात्यांना करु दया. आपण आपल्या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते प्रमाण मानून "मोक्ष" मिळवूया.
जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित.
अशी कुठली यादी असेल तर त्यातील नावे वाचायला निश्चितच आवडेल. तसेच त्या यादीतील व्यक्तींना खात्रीने मोक्ष मिळाला आहे हे कसे ठरवले हे ही वाचायला आवडेल.

वाचने 58041
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

एकालाही प्रतिवाद करता येत नाही, फक्त घूमजाव. बरं, ते समर्थांनी मूढमतीला जगतवंद्य मानावे असे का सांगितले असावे बरे.?

लेखाचा विषय 'शाश्वत ज्ञान', लेखक धन्या आणि प्रतिसाद संख्या ६९ म्हणून उत्सुकतेने धागा उघ्डला तर काय... 'संक्षीं'चा एकही प्रतिसाद नाही! हे बघून सगळा उत्साह मावळला. - (हताश झालेला) सोकाजी

In reply to by अत्रुप्त आत्मा

सोत्रींकडे जा. त्यांच्या बरोबर औषध घ्या आणि डुलत डूलत घरी या.... (तुम्ही औषध घेत नाही हे माहीत आहे.)

In reply to by मुक्त विहारि

@त्यांच्या बरोबर औषध घ्या आणि डुलत डूलत घरी या....>>> :-D ह.....त! .... उत्साह घालवलात माझा! ;-)

सोत्रि, एकतर खुद्द यनावालांना शाश्वत ज्ञान म्हणजे काय ते माहिती नाही. ते फक्त लॉजिकप्रविण आहेत. त्यात ते स्वतः गैरहजर. दुसरी गोष्ट, हे पत्र त्यांनी विज्ञान विरूद्ध अध्यात्म या नेहेमीच्या हिट विषयावर लिहीलंय. मूळात विज्ञान आणि अध्यात्मात वादच नाही. शास्त्रज्ञ शोध लावून मानवतेवर उपकार करत आले आहेत आणि सिद्ध `स्व'चा उलगडा करण्याचा मार्ग सांगतात. थोडक्यात, शास्त्रज्ञ प्रकट जगाचं नंदनवन करण्याचा प्रयत्न करतात आणि सिद्ध त्या नंदनवनात सुखानं कसं जगावं ते सांगतात. यनावालांनी निर्माण केलेला `शाश्वत ज्ञान विरुद्ध अज्ञान' हा बखेडा
"अध्यात्मज्ञान हेच खरे ज्ञान. बाकी सगळे अज्ञान असे गीतेत स्पष्ट म्हटले आहे"
केवळ त्यांचं अध्यात्मिक अज्ञान दर्शवतो. आता इथे सदस्यांनी शाश्वत ज्ञान आणि मोक्ष याच्या ज्या बहुविध छटा दाखवल्या आहेत त्याबद्दल मी काही लिहीलं तर `स्वतःला शहाणा समजणे, अहंकार, विचार लादणे इतकंच काय तर नार्सिसिझम, मानसोपचारांची गरज' वगैरे नेहेमीचा खेळ सुरु होईल. मला त्या गोष्टींनी फरक पडत नाही पण ज्या विषयावर मी स्वतंत्र लेख लिहू शकतो तिथे गैरहजर सदस्याच्या लेखावर दंगा करणं अनुचित आहे. तस्मात प्रतिसाद दिला नाही.

श्री.धन्या यांनी म.टा.पुणे.तील एक पत्र उद्धृत केले आहे.पण त्यातील श्लोक त्यांनी दिला आहे. तो गीतेत आहे असे पत्रात म्हटले आहे.पण अध्याय आणि श्लोक यांचे क्रमांक, तसेच श्लोकाचे अन्वयार्थ मूळ पत्रात दिलेले नाहीत या त्या पत्रातील त्रुटी आहेत.तो श्लोक आणि माझ्या समजुतीप्रमाणे अन्वयार्थ असे: ...... अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनं । एतत् ज्ञानमिति प्रोक्तं अज्ञानं यदतोSन्यथा॥ (अ.१३. श्लो.११) ..... अन्वयार्थ: अध्यात्मज्ञान(स्य) नित्यत्वम्.....अध्यात्मज्ञानाची शाश्वतता (जाणणे), तत्त्वज्ञानस्य दर्शनम्...........तत्त्वज्ञानाचे (सम्यक)यथार्थ आकलन होणे, एतत् ज्ञानं (अस्ति) इति प्रोक्तम्....हेच ज्ञान होय असे म्हटले आहे. यत् अत: अन्यथा (स्यात्)......जे याहून वेगळे असेल , तत् अज्ञानं ।.......ते अज्ञान (होय).

In reply to by यनावाला

ते पत्र मी इथे जसंच्या तसं इटालिक अक्षरांमध्ये दिलं आहे. फक्त पत्रामध्ये उद्धृत केलेला श्लोक टंकताना मी "तदतो" हा शब्द "त्दतो" असा चुकीचा टंकला.

In reply to by यनावाला

अगदी बरोबर!!! या गोष्टी गीताकारांच्या मते अज्ञान आहेत. बर मग???????? गीताकार काही म्हणोत, काय कसं ते आपलं आपल्याला माहितीये, आपला आपण निर्णय घ्यावा , हाकानाका.

In reply to by यनावाला

अध्यात्मज्ञानाची शाश्वतता (जाणणे), तत्त्वज्ञानाचे (सम्यक)यथार्थ आकलन होणे, हेच ज्ञान होय. जे याहून वेगळे असेल ते अज्ञान (होय). `अज्ञाना'चा अध्यात्मिक अर्थ असा की `ते तुम्हाला तुमच्या स्वरुपाचा उलगडा करु शकत नाही' आणि तुम्ही हा अर्थ काढलायं -
यावरुन पेशीकार्याचे ज्ञान हे अज्ञान आहे हे सिद्ध होते. तसेच पेशी देहान असतात. देह नश्वर आहे. म्हणू पेशींविषयीचे ज्ञान शाश्वत नव्हे, हे उघड आहे. नोबेलचा उदोउदो करणार्‍यांना हे समजेल तो सुदिन म्हणायचा!
जो संपूर्ण विपर्यस्त आहे.

ज्ञान : `स्व'चा उलगडा अज्ञान : `स्व'चं विस्मरण किंवा `स्व'च्या ज्ञानाप्रत नेऊ शकत नाही असं ज्ञान विज्ञान : (कोणत्याही विषयाचं) विषेश ज्ञान उदा. मेडिकल सायन्स, फिजिक्स, कंप्युटर सायन्स... विज्ञान मानवतेला उपकारक आहे. अध्यात्मिक अर्थानं त्यानं स्वचा उलगडा होऊ शकत नसला तरी ते व्यर्थ निश्चित नाही (यनावलांनी अज्ञानचा तसा अर्थ काढला आहे आणि पत्र लिहीलं आहे). थोडक्यात, अध्यात्म विज्ञानविरोधी नाही. ते स्वविस्मरणाचं भान देतं. गीतेतल्या श्लोकाच्या `अज्ञानाचा' तो अर्थ आहे. अध्यात्म नोबेल विनर्सचा उपहास करत नाही. (ते यनावलांचं अज्ञान आहे! :-) ) तस्मात, `विज्ञान विरूद्ध अध्यात्म' असा बखेडा या संकेतस्थळावर पुन्हा होऊ नये.

In reply to by संजय क्षीरसागर

`स्व'चा उलगडा
याला ज्ञान, परमज्ञान काहिही म्हणा.. पण बाकीचे सगळे ज्यात स्व चा उलगडा नाही त्याला अज्ञान का म्हणावे?? विज्ञान तिसरी कॅटॅगरी करुन तुम्ही सोयीस्कररीत्या पळवाट काढलेली आहे :-) एखाद्याला विशेष ज्ञान असेल (कुठल्याही क्षेत्रातील) पण अध्यात्मिकदृष्ट्या त्या व्यक्तिला "स्व" चा उलगडा झाला नसेल तर ते ज्ञान की अज्ञान? हे तुमचं विवेचन म्हणजे गीतेतल्या श्लोकाला बरोबर ठरवण्यासाठी केलेली सारवासारव वाटली.. एका अर्थाने हेही ग्रंथप्रामाण्यच की!!

In reply to by बाळ सप्रे

१)
विज्ञान तिसरी कॅटॅगरी करुन तुम्ही सोयीस्कररीत्या पळवाट काढलेली आहे
नाही. विज्ञान ही अध्यात्मिकदृष्ट्या ज्ञानाचीच वेगळी शाखा आहे. विज्ञान प्रकट जगाशी संबंधित आहे तर (अध्यात्मिक) ज्ञान अप्रकट जगाशी. उदा. संगीतशास्त्र `ध्वनी' या शांततेच्या प्रकटरुपाशी संबंधित आहे तर अध्यात्म शांतता या अस्तित्वाच्या अनिर्मित स्थितीशी संबंधित आहे. २)
याला ज्ञान, परमज्ञान काहिही म्हणा.. पण बाकीचे सगळे ज्यात स्व चा उलगडा नाही त्याला अज्ञान का म्हणावे? एखाद्याला विशेष ज्ञान असेल (कुठल्याही क्षेत्रातील) पण अध्यात्मिकदृष्ट्या त्या व्यक्तिला "स्व" चा उलगडा झाला नसेल तर ते ज्ञान की अज्ञान?
विषेश ज्ञान त्याला जगणं सोयीचं करेल पण स्व गवसलेला नसल्यानं तो सर्वस्वी निश्चिंतपणे जगू शकणार नाही. इथे तुम्ही म्हणता तशी `ज्ञान आणि अज्ञान' अशी तफवात नाही. ३)
हे तुमचं विवेचन म्हणजे गीतेतल्या श्लोकाला बरोबर ठरवण्यासाठी केलेली सारवासारव वाटली.. एका अर्थाने हेही ग्रंथप्रामाण्यच की!!
गीता हा अध्यात्मावरचा एकमेव ग्रंथ नाही. माझा आक्षेप "विज्ञान श्रेष्ठ आणि अध्यात्म फोल" या यनावालांच्या (रिवर्स) लॉजिकला आहे. आणि मला विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीही उपयोगी आहेत असं म्हणायचंय. पेशीविज्ञान शरीराला उपकारक आहे कारण देह आहे तोपर्यंत देहाची काळजी घ्यावीच लागणार आणि अध्यात्म श्रेष्ठ आहे कारण ते तुम्हाला तुमच्या विदेहत्त्वाचा उलगडा घडवतं. याचा अर्थ विदेहत्त्वाचा उलगडा झालेला डॉक्टरकडे जाणार नाही असा नाही. आणि एखाद्याला शरीरशास्त्राच्या संपूर्ण ज्ञानाबद्दल नोबेल मिळालं तरी त्याला स्वतःचं विदेहत्त्व समजेललं असेल असं नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

यनावालांचं रीव्हर्स लॉजिक बाजूला राहु द्या.. ज्यात "स्व" उलगडत नाही ते अज्ञान याला माझा आक्षेप आहे.. तुमच्या पूर्वीच्या प्रतिसादाप्रमाणे.. तुमच्या आत्ताच्या प्रतिवादाप्रमाणे प्रकट जगातील कशालाही ज्ञान कींवा अज्ञान म्हणणे अ‍ॅप्लिकेबलच नाही.. हा दावा म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांच्या रुढ अर्थांना काहीच अर्थ नाही असे म्हणणे होते.. यालाच मी पळवाट म्हटले आहे.... साधं उदाहरण द्यायचं झाल्यास रुढार्थानं नाग विषारी असतो हे माहीत असणं म्हणजे ज्ञान . आणि नाग विषारी की बिनविषारी हे माहित नसणं म्हणजे त्याविषयीचं अज्ञान .. तुमच्या आत्ताच्या म्हणण्याप्रमाणे नाग प्रकट जगाशी संबंधित असल्यामुळे नाग विषारी असतो हे माहीत असणं म्हणजे ज्ञान नव्हे.. किंवा माहित नसणं हे अज्ञान नव्हे.. हा युक्तिवाद नुसता अयोग्यच नव्हे तर हास्यास्पददेखिल आहे..

In reply to by बाळ सप्रे

साहेब थोडंस्सं मी सांगू? मला एखाद्या गोष्टीबाबत ज्ञान (माहिती, माहिती कशी वापरायची ते) आहे अथवा नाही हे ज्यामुळे-ज्याच्या बेसवर-अधिष्ठानावर- सत्तेवर (जे असल्यानंतरच) कळतं ते ज्ञान. ही अध्यात्मातली व्याख्या आहे. ह्यालाच शुद्ध ज्ञान म्हणतात. कुणामुळं अथवा कशामुळं तरी झालेलं ते वृत्ती ज्ञान. ज्याबद्दल आपण बोलत आहात. काहीही अगदी स्वतःचं शरीर पण दिसत नसताना काळ्याकुट्ट अंधारात उभे राहिलात तर कदाचित मी काय म्हणतोय ते समजेल. :) ही अस्तित्वाची जाणीव म्हणजे ज्ञान. नि ते आत चैतन्य असल्यावर त्याच्या सत्तेवर 'कळतं' कोमातल्या माणसाला समजलं नाही तरी ते 'असतं'. आणखी थोडा विचार केला तर ते कॉमन फॅक्टर म्हणून सगळीकडेच असतं फक्त अभिव्यक्त नसतं. :) ते ओळखलं तर सगळं ओळखलं असं भगवान म्हणत आहेत.

In reply to by प्यारे१

ज्ञान ते ज्ञान.. त्याच्या आत जाउन ते शुद्ध की वृत्ती ते महत्वाचं नहिये.. एखाद ज्ञान की अज्ञान असा प्रश्न आहे.. गीतेच्या त्या श्लोकाप्रमाणे ते अज्ञान ठरतय.. जे मला पटत नाहिये.. संक्षी त्याला प्रकट जगातलं असेल तर "नॉट अ‍ॅप्लिकेबल" असं उत्तर देतायत.. जे ज्ञानाच्या/ अज्ञानाच्या रुढ अर्थाने अयोग्य उत्तर आहे.. तुम्हीही शुद्ध ज्ञान / वृत्ती ज्ञान वगैरे पद्धतीने सरळ उत्तर ने देता फाटे फोडताय..

In reply to by बाळ सप्रे

कारण विषय गीतेतल्या श्लोकाशी संबंधित आहे याचं भान ठेवाल तर उलगडा होईल.
तुमच्या आत्ताच्या म्हणण्याप्रमाणे नाग प्रकट जगाशी संबंधित असल्यामुळे नाग विषारी असतो हे माहीत असणं म्हणजे ज्ञान नव्हे.. किंवा माहित नसणं हे अज्ञान नव्हे..
नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नाही हा मुद्दा आहे. नाग विषारी आहे हे कळणं प्रकट जगात उपयुक्त आहे यात वाद तो काय? ते स्वचा उलगडा झालेल्या किंवा न झालेल्या दोघांनाही उपयोगी आहे. पण अध्यात्मिक दृष्ट्या (म्हणजे गीतेतल्या श्लोकाच्या संदर्भात) ते स्वचा उलगडा होण्यासाठी निरुपयोगी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नाही हा मुद्दा आहे.
नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नसलं तरी जगापासून कायमचं दूर नेऊ शकतं.

In reply to by धन्या

तुम्हाला एकतर अध्यात्म काय आहे हे अजून कळलेलं नाही. उगीच माझ्या प्रतिसादावर बालिश प्रतिसाद देण्यापुढे तुमची मजल नाही (तुमचा वरचा प्रतिसाद पाहा). तुमचं लेखन तुम्हाला स्वतःला सपोर्ट करता येत नाही याची पूर्ण जाणीव ठेऊन लिहीत चला. जे तुम्ही स्वतःपासून वेगळे होऊ शकत नाही याचा बोध घडवतं ते शाश्वत ज्ञान.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला एकतर अध्यात्म काय आहे हे अजून कळलेलं नाही.
असं तुम्हाला वाटतं. वस्तूस्थिती वेगळी असू शकते.
उगीच माझ्या प्रतिसादावर बालिश प्रतिसाद देण्यापुढे तुमची मजल नाही (तुमचा वरचा प्रतिसाद पाहा)
तुमच्याकडे विनोदबुद्धी नाही.
तुमचं लेखन तुम्हाला स्वतःला सपोर्ट करता येत नाही याची पूर्ण जाणीव ठेऊन लिहीत चला.
माझ्या लेखनातल्या चुका कुणी दाखवून दिल्या तर मी त्या मान्य करतो. तुमच्यासारखं "गीरे तो भी टांग उपर" असं म्हणत स्वतःचंच घोडं पुढे दामटत नाही.
जे तुम्ही स्वतःपासून वेगळे होऊ शकत नाही याचा बोध घडवतं ते शाश्वत ज्ञान.
व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असलेलं परंतू काहीही अर्थ नसलेलं वाक्य.

In reply to by धन्या

परंतू काहीही अर्थ नसलेलं वाक्य.
पुन्हा पुन्हा तोंडघशी पडण्याची तुम्हाला दांडगी हौस दिसते. म्हणजे मुळात म्हैस आणि रेडा इतपत विषय हाताळण्याची क्षमता आणि अध्यात्मावर लिहीण्याचा सोस!
जे तुम्ही स्वतःपासून वेगळे होऊ शकत नाही याचा बोध घडवतं ते शाश्वत ज्ञान.
या वाक्याला तुम्ही अर्थहिन म्हणतायं यातच तुमचं आकलन उघड होतं. कारण `नैनं च्छिंदंती शस्त्राणी' या दुसर्‍या अध्यायातल्या श्लोकाचा तो वास्तविक अर्थ आहे. आणि शून्य अध्यात्मिक आकलनामुळे तुम्हाला तो कळणं अशक्य आहे. तुमच्या कंपूतल्या मंदबुद्धी मित्रांना (हे त्यांचे स्वतःचे शब्द आहेत), आता तुमच्यासारखेच निरर्थक प्रतिसाद द्यायची सवय तुम्ही लावली आहे. तस्मात त्यांना तुम्ही मार्गदर्शन करत चला आणि म्हैस वगैरे (तुमच्या हातखंडा) विषयावर लिहीत राहा.
तुमच्याकडे विनोदबुद्धी नाही.
तुमच्या `सच्चिदानंदबाबांसारखा' विनोदी लेख मला लिहीता येत नाही म्हणून तुम्हाला तसं वाटतंय!

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जंगलामध्ये काळवीटाने गेंडयाच्या कातडीवर टकरा देण्यासारखं आहे. काळ्वीटाची शिंगं मोडतील पण गेंडयाच्या कातडीवर साधा ओरखडाही उमटणार नाही. तुमचं चालू दया.

In reply to by बॅटमॅन

मला हे एकदम बेस्ट वाटतं. स्वतःला काहीएक समज नाही आणि मुद्दा मांडता आला नाही की `नार्सिसिझम' वगैरे लेख टाकायचे! दुसर्‍याला `मीच शहाणा' म्हणायचं आणि स्वतःवर बेतलं की चर्चा करण्यात अर्थ नाही म्हणायचं! ते सप्रे आणि सोत्रिंचे प्रतिसाद वाचा. आकलन कसं असावं, चर्चा कशी करावी आणि विषय कसा पुढे न्यावा कळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

सगळ्या गोष्टी अध्यात्मिक पातळीवर न्यायची गरजच काय??
नाग विषारी आहे हे कळणं प्रकट जगात उपयुक्त आहे यात वाद तो काय?
हे वाक्य नाग विषारी आहे हे माहीत असणं म्हणजे 'ज्ञान' असं सूचित करतय..
नागाचं विषारी असणं माहिती असणं किंवा नसणं तुम्हाला स्वतःप्रत आणत नाही हा मुद्दा आहे
तर हे वाक्य नाग विषारी आहे हे माहीत असणं म्हणजे 'ज्ञान' नव्हे (म्हणजेच अज्ञान) असं सूचित करतय.. तुम्ही आडवळणं घेउन थेट उत्तर द्यायचं टाळताय.. मी दिलेलं उदाहरण फार स्पष्ट आहे.. नाग विषारी आहे हे माहीत असणं म्हणजे 'ज्ञान' की 'अज्ञान' ?? - एका शब्दात उत्तर अपेक्षित आहे.. (निखिल वागळे टोनमध्ये :-) )

In reply to by बाळ सप्रे

त्यात पुन्हा शीर्षक नीट वाचा : "शाश्वत ज्ञान" (नुसतं ज्ञान नाही). "शाश्वत ज्ञान" हा शब्द नाही. ती कायम स्थिती आहे. तुम्ही ज्ञान आणि अज्ञानाची वेगवेगळी उदाहरणं देऊन ज्या प्रकारे विषयाकडे पाहता आहात तो अध्यात्मिक दृष्टीकोन नव्हे. तुम्हाला कळेल किंवा नाही (कारण तुम्ही आडवळणं, पळवाट अशा शब्दयोजना करतायं) पण `कायम स्थिती' किंवा स्वरुप हे अपरिवर्तनीय आहे. इट इज अ‍ॅबसल्यूट! खरं तर त्या स्थितीचा भाषेशी काहीही संबंध नाही. कारण शब्द केवळ निर्देश आहे. नाग विषारी आहे हे माहीत असलं काय की नसलं काय तो व्यक्तिगत प्रश्न आहे आणि त्यानं स्थितीला काहीएक फरक पडत नाही. कारण ती व्यक्तिगत ज्ञानावर किंवा अज्ञानावर अवलंबून नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मला पळवाट काढणं किंवा आडवळणाची काहीएक गरज नाही. अध्यात्म काय, भाषा काय की विज्ञानाची सार्थकता काय सगळ्या गोष्टींचं यथार्थ आकलन आहे. तस्मात, तशी शब्दयोजना करु नका आणि गैरसमज काढा तर तुम्हाला समजेल.

In reply to by संजय क्षीरसागर

अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत ज्ञान.. परमज्ञान सगळं मान्य.. पळवाट, आडवळण शब्द मागे .. पण या सगळ्यात बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवल जातय.. ते अयोग्य आहे.. जे गीतेच्या श्लोकाच्या अर्थातून प्रतीत होतय.. तुम्हीही बाकिचे अज्ञान नाही असे स्पष्ट सांगत नाही आहात..

In reply to by बाळ सप्रे

संक्षींच्या सर्व प्रतिसादांचा रोख 'शाश्वत ज्ञान' हे एक स्थिती आहे असा आहे. ते, बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवत आहेत असे जाणवले नाही किंबहूना तो त्यांचा उद्देशही नसावा. इहलौकिक अर्थाने, ज्ञान - अज्ञान अशी फारकत करून, स्वत्व आणि त्याच्या भौतिक अवस्थांची जाणिव होते. पण 'शाश्वत ज्ञान' हे त्यातला फोलपणा किंवा स्वत्वाकडे भौतिक अवस्थेशी फारकत करून बघण्याची जाणिव करुन देते. - (कसलेच ज्ञान नसलेला, अज्ञानी) सोकाजी

In reply to by सोत्रि

अध्यात्मिक ज्ञान हे शाश्वत ज्ञान.. परमज्ञान सगळं मान्य.. पळवाट, आडवळण शब्द मागे ..
धन्यवाद! आता उत्तर देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
पण या सगळ्यात बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवल जातय.. ते अयोग्य आहे..तुम्हीही बाकिचे अज्ञान नाही असे स्पष्ट सांगत नाही आहात..
ते तर मी सुरुवातीला अगदी पहिल्याच प्रतिसादात म्हटलंय. जगायला विज्ञान (किंवा सोप्या शब्दात माहिती) उपयोगी आणि अनिवार्य आहे. डॉक्टरचा शारीरिकस्वास्थ्य बर्करार ठेवायला उपयोग आहे. आणि म्हणून रुढार्थानं ज्याला ज्ञान म्हटलंय (किंवा मी ज्याला विज्ञान अथवा विषेशज्ञान म्हणतो) ते उपयोगी आहे. नोबेल लॉरेटस व्यर्थ काम करत नाहीत. ते मानवतेला उपकारक आहेत. पण अ‍ॅट द सेम टाइम `शाश्वत ज्ञान' (गीतेतला श्लोक) सार्थ आहे कारण विषेश ज्ञान `स्व' ची उकल करु शकत नाही हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. आता शाश्वत ज्ञान हा प्रस्तुत चर्चेचा विषय नसून यनावालांचा "शाश्वत ज्ञानाचा उपहास" हा विषय आहे त्यामुळे चर्चा इथे संपन्न होते. थोडक्यात लेखकाचा उपहास अयोग्य आहे. विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीही उपयोगी आहेत. आय थिंक आय हॅव मेड द पॉइंट.
संक्षींच्या सर्व प्रतिसादांचा रोख 'शाश्वत ज्ञान' हे एक स्थिती आहे असा आहे. ते, बाकीचे सगळं सरसकट अज्ञान ठरवत आहेत असे जाणवले नाही किंबहूना तो त्यांचा उद्देशही नसावा.
दॅटस द पॉइंट आणि पूर्वग्रह सोडून माझं लेखन वाचलं तर तो कुणाच्याही लक्षात येईल.
इहलौकिक अर्थाने, ज्ञान - अज्ञान अशी फारकत करून, स्वत्व आणि त्याच्या भौतिक अवस्थांची जाणिव होते. पण 'शाश्वत ज्ञान' हे त्यातला फोलपणा किंवा स्वत्वाकडे भौतिक अवस्थेशी फारकत करून बघण्याची जाणिव करुन देते.
शाश्वत ज्ञान (किंवा स्थिती) सिंग्युलर आहे ते कुणाच्या विरोधात नाही. उदा. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं ज्ञानी (स्व समजलेला) काय की अज्ञानी ( स्व न समजलेला) काय दोघेही बद्ध आहेत. त्यामुळे शाश्वत ज्ञान ऐहिक ज्ञानाचा फोलपणा दर्शवत नाही. असा फोलपणा ज्यांना यथार्थ अध्यात्मिक आकलन नाही त्यांना वाटतो. म्हणजे एकतर त्यांना ऐहिक ज्ञान व्यर्थ वाटतं किंवा अध्यात्मिक ज्ञान ऐहिक ज्ञानापेक्षा श्रेष्ठ वाटतं. पण वस्तुस्थिती तशी नाही जगायला ऐहिक ज्ञान हवं आणि मजेत किंवा स्वच्छंद जगायला स्व गवसायला हवा!

In reply to by संजय क्षीरसागर

ठीक आहे तुम्हीही बाकीचे सरसकट अज्ञान ठरवत नाही .. पण गीतेच्या श्लोकाचा खालील अन्वयार्थ तर स्पष्ट "अज्ञान" हा शब्द वापरुन सांगत आहे. की बाकीचे अज्ञान आहे म्हणून..
अध्यात्मज्ञान(स्य) नित्यत्वम्.....अध्यात्मज्ञानाची शाश्वतता (जाणणे), तत्त्वज्ञानस्य दर्शनम्...........तत्त्वज्ञानाचे (सम्यक)यथार्थ आकलन होणे, एतत् ज्ञानं (अस्ति) इति प्रोक्तम्....हेच ज्ञान होय असे म्हटले आहे. यत् अत: अन्यथा (स्यात्)......जे याहून वेगळे असेल , तत् अज्ञानं ।.......ते अज्ञान (होय).
यनावालांचा उपहास अतिशयोक्त आहे.. पण गीतेचा श्लोक देखिल अतिशयोक्तच म्हणावा लागेल . अर्थात वरील अन्वयार्थ बरोबर आहे हे गृहीत धरुन.. मिपावरील संस्कृत पंडीतांनी यनावालांनी लावलेला अन्वयार्थ एकदा तपासावा..

In reply to by बाळ सप्रे

तेवढंच तर म्हणायचंय
पण गीतेचा श्लोक देखिल अतिशयोक्तच म्हणावा लागेल .
अजिबात नाही. एकतर गीतेच्या काळात `शास्त्रज्ञ' अशी वेगळी कॅटेगरी असण्याची शक्यता नाही त्यामुळे त्या श्लोकाचा अनुरोध विज्ञानाकडे नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे `एवरिथिंग मर्जेस अ‍ॅट अ सिंगल पॉइंट ऑफ टाईम : दॅट इज नाऊ!' त्यामुळे या घडीला योग्य संदर्भ आणि समतोल विचारसरणीनं पाहिलं तर अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही आवश्यक आणि आपापल्या जागी उपयुक्त आहे. अँड वेन वन कॅन हॅव बोथ वाय चूज वन? आणि तो सूज्ञपणा आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

गीतेच्या काळात शास्त्रज्ञ' अशी वेगळी कॅटेगरी नसली, अनुरोध विज्ञानाकडे नसला तरी बाकी सगळं (अध्यात्म सोडुन जे काही असेल ते) अज्ञान म्हणणे हे अतिशयोक्तच !!

In reply to by बाळ सप्रे

एका श्लोकात किती डिस्क्लेमर बसवणार? अर्थात, तुम्हाला अर्थाशी कर्तव्य की शब्दाशी हे आता तुम्ही पाहा. माझा मुद्दा मी निर्विवादपणे मांडला आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

जो शब्दांचा अर्थ आहे तोच घेतला जाणार.. गीतेतला आहे म्हणून चांगला अर्थ शोधुन तो याचा अर्थ आहे असे करणे योग्य नव्हे.. असे बेधडक विधान असेल तर डिसक्लेमर हवच.. नाहीतर अर्थ शब्दांचा अर्थ घेतला जाणारच..

In reply to by बाळ सप्रे

यत् अत: अन्यथा (स्यात्)......जे याहून वेगळे असेल , तत् अज्ञानं ।.......ते अज्ञान (होय).
अज्ञान म्हणजे जे स्वतःप्रत आणू शकत नाही ते. याचा अर्थ ते व्यर्थ आहे असा नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही पुन्हा तोच मुद्दा आणतायं
कारण तोच मुद्दा आहे. व्यर्थ की उपयुक्त हा मुद्दा नाहीच आहे.. ज्ञान की अज्ञान हा आहे.. तुम्हीही याप्रत आलात
अज्ञान म्हणजे जे स्वतःप्रत आणू शकत नाही ते
एखाद्या गोष्टीला अज्ञान म्हणण ही हेटाळणी झाली.. मग "पण ते व्यर्थ नाही" ही सारवासारव झाली!!!

In reply to by संजय क्षीरसागर

संपूर्ण गीता चुकीची कोण म्हणतय??? आणि हवा तसा अर्थ काढुन नव्हे.. जो अर्थ शब्दातुन सरळ निघतोय तोच पहाता हा श्लोक नक्कीच अतिशयोक्त आहे.. (अर्थात हा अर्थ बरोबर असल्यास!!)

In reply to by संजय क्षीरसागर

माझ्या कुठल्याही प्रतिसादात गीतेवर सरसकट भाष्य नाही त्यामुळे.. सगळा आक्षेप त्या श्लोकाच्या अर्थावर आहे..
गीतेविषयी पराकोटीचा अर्थ काढतायं
याला काहीही आधार नाही.. सारवासारव हा शब्द - त्या श्लोकाचा चांगला अर्थ शोधुन काढुन दाखवण्याच्या तुमच्या प्रयत्नांसाठी होता..

मोक्षाला गेलेल्यांच्या यादीत हिंदु लोक जास्त असतील तर आनंदच आहे. एकदा गांधीजींना लेप्रसी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला बोलावले होते. ते म्हणाले, लेप्रसी हॉस्पिटल सुरु करणे यापेक्षा ते बंद करताना मला जास्त आनंद होईल. हिंदु धर्माचेही तसेच आहे. सगळे आत्मे मोक्षाला जाऊन आता कुणाचा कर्मविपाक शिल्लकच नाही राहिला की कुणाला जन्मच घ्यायची गरज लागणार नाही आणि मग हा धर्मही नष्ट होऊन जाईल. केवळ हिंदु लोकच नव्हे तर अख्खा धर्मच मोक्ष पावून परमात्म्याशी तादात्म्य पावावा, यासाठी सर्वांना शुभेच्छा.

In reply to by उद्दाम

केवळ हिंदु लोकच नव्हे तर अख्खा धर्मच मोक्ष पावून परमात्म्याशी तादात्म्य पावावा, यासाठी सर्वांना शुभेच्छा
तुम्हाला मोक्ष म्हणजे काय ते माहिती नाही आणि धर्म म्हणजे काय ते ही माहिती नाही. उगीच प्रतिसादातून फ्रस्ट्रेशन दाखवण्याला काही अर्थ नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

विषेशतः अज्ञान म्हणजे काय हे इतक निट लिहल्यावर आता कशाला समोरच्यांवर असा अकाली चढतोस (चढाइ करतोस). कशाला समोरच्याला ही अक्कल नाही ती अक्कल नाही म्हणायलाच हवे काय ? त्यापेक्षा जे तुला जे माहित आहे ते विषद कर. समोरच्याला त्याच्या अज्ञानाची जाणीव आपोआप होइल.

In reply to by उद्दाम

साहेब, हे एव्हडे सहजशक्य नाही असे वाटते,माझ्या वाचनानुसार ला़खात एखाद्याला मोक्ष मिळतो ईतके व्यस्त प्रमाण आहे,बाकी जाणकार त्यावर भाष्य करतीलच.

In reply to by अनिरुद्ध प

पण ज्याने ही यादी बनवली तोही मोक्ष पावलेलाच असेल का? मग जर तो मोक्ष पावला आहे, तर त्याच्या वाट्याला 'यादी करणे' हे कर्म कसे आले?

In reply to by उद्दाम

ब्वा तुम्ही,यात "जन्म मरणाचे फेरे चुकवून आजवर मोक्ष मिळवणार्‍यांची यादी काढली तर त्यात भारतीय नावे सर्वाधिक असतील, हे निश्चित."यात ही यादी कोणी केली आहे याचा उल्लेखही नाही तर तो मोक्षाला पावला किवा नाही हे कोण आणि कसे ठरवणार?

In reply to by अनिरुद्ध प

पण तुमच्या वाक्यातील ते जे 'निश्चित' आहे, ते, जोवर अशी यादी प्रत्यक्ष कुणी काढून समोर ठेवत नाही, तोवर अर्थहीन ठरते. आधी अशी यादी काढा. आणि ती दाखवा. बरं, मोक्षाला गेलेला आत्मा भारतीय की अमेरिकन हे कसे ठरवणार? म्हणजे या जन्मात भारतीय असलेला मनुष्य गेल्या जन्मात अम्रेरिकेत कुत्रा असू शकतो, अँड वाइस वर्सा. भारतीय , अमेरिकन ही ओळख शरीराला असते, आत्म्याला नाही, शरीर तर मेलं, मग आता आत्म्यांचे भौगोलिक स्थानाण्मुसार वर्गीकरण कसे काय करणार बुवा? मग त्या यादीत भारतीय किती आणि अमेरिकन किती हा वादच मूर्खपणाचा नाही का? का, मोक्षाला जाणारा त्याचे सगळे जन्म भारतातच काढतो आणि भोगवादी आत्मा त्याचे सगळे जन्म अमेरिकेतच काढतो की काय? ---------

In reply to by उद्दाम

धन्यवाद्,पण माझ्या वरिल उत्तरातिल वाक्य हे मी लिहिलेले नसुन हे धागा कर्त्याने डकवलेल्या लेखातील आहे ते मी फक्त डकवुन बोल्ड केले आहे,तर याचे उत्तर एक तर लेखक किंवा फक्त धागाकर्ताच देवु शकेल.

In reply to by अनिरुद्ध प

अवघड आहे. :) ते पत्र श्री. य. ना. वालावलकर यांचं आहे. त्यामुळे याचं उत्तर तेच देऊ शकतील. मिपा आयडी यनावाला यांनी या धाग्यावर जरी प्रतिसाद दिला असला तरी पत्रलेखक श्री. य. ना. वालावलकर म्हणजे मिपावरचे यनावाला आहेत का ही बाब अजूनही गुलदस्त्यात आहे.

In reply to by उद्दाम

औ तूमाला ठावं नाय काय, बरमदेवानं पुथ्र्वी बनवली तवा त्यो भारतातच हूता, समद्या जीवांचा जल्म भारतातच झाल्यालाय... समदं जीव भारतीय हायती,कायबी आरडत जौ नगासा... (मतिमंद असलेला आणि एका केसाचीही अक्कल नसलेला ... ग्रेटकुंथर)

In reply to by ग्रेटथिन्कर

काय म्हन्ता खरं की क्काय्,बरं जालं तुमी सान्गितलाव ते नायतर आमी अडानी हाव आमाला कोनी बी येतं आनी टपलीत मारुन जातय.

In reply to by अनिरुद्ध प

असंही म्हणतात की ब्रम्हदेवान स्वतःच्या मुलीशी काहीतरी गडबड केली होती. त्यामुळे त्याची पुजा केली जात नाही किंवा पुर्ण जगभरात दोन तीन ठीकाणे सोडली तर इतर कुठेही ब्रम्हदेवाचे मंदीर नाही.

In reply to by धन्या

त्या कहाण्यांचा कै संबंध नै. ब्रह्मा मूळची वैदिक देवता. प्रजापती. इंद्र, अग्नी, वायु, वरूण, अश्विनीकुमार यांबरोबर प्रजापतीची पण वेदांत सूक्ते आहेत. कालांतराने वैदिक देवता हळूहळू मागे पडत जाऊन त्यांची जागा विष्णू, इंद्र, देवी आदी दैवतांनी घेतली. मूर्तीपूजेच्या प्रसारामुळे साहजिकच त्यांची मंदिरे उभी राहिली व मूळच्या वैदिक देवतांचे पूजन थांबले. ब्रह्माबरोबरच इंद्र, वायु, अग्नी आदी देवतांची पण मंदिरे नाहीतच. अगदी क्वचितच एखादे आढळेल. बाकी विष्णू, शिव आदींच्या मध्ययुगीन मंदिरांमध्ये वैदिक देवतांच्या मूर्ती लै दिसतात. बाकी ग्रेटथिन्कर यांच्या कंसातल्या वाक्याशी सहमत.