Skip to main content

हि गणपतीची अहवेलना थांबवायला हवी.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 17/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो , सर्व प्रथम सर्व थोरा मोठ्यांना माझा नमस्कार. मी नवीन सभासद असून माझे काही विचार मी इथे मांडतो आहे. तेव्हा चूकभूल द्यावी घ्यावी. गेल्या काही वर्षात गणपती उत्सवाचे स्वरूप काहीसे बदलेले आहे, नदी तलाव प्रदूषित होवू नये म्हणून आपण सर्वजण इको फ्रेंडली (याला मराठी शब्द सुचवा कि कोणीतरी) गणेशोत्सव साजरा करीत आहेत. निसर्ग, पर्यावरण या विषयी जनता जागरूक होत आहे या बद्दल जनतेला धन्यवाद. पण एकीकडे काही मंडळे मात्र आपला हेका सोडायला तयार नाहीत, मोठ्या आकाराचे गणपती, भव्य दिव्य आरास, मोठे ध्वनी क्षेपक, संपर्ण परिसराला केलेली विद्युत रोशणाई याची रेलचेल दिसून येते ते सुधा फक्त स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, तर काही ठिकाणी याच गणपतीचे विविध स्वरूपातले रूप बघून खुद्द गणपती सुधा चाट पडत असेल. जीवना उपयोगी अशा सर्व गोष्टींचा म्हणजे भाज्यांचा, स्टेशनरी वस्तूंचा, वाद्यांचा, खाण्याच्या वस्तूंचा (या वर्षी मालाड मध्ये लहान मुलांचे कुरकुरे पासून गणपती बनवला आहे ), मण्यांचा अहो जे मनात येईल त्या सर्व वस्तूंपासून गणपती बनवायचा आणि "आपण काही तरी वेगळे केले" हे सर्व जगाला दाखवोन द्यायचे असे चालले आहे. यात भर घातली आहे टी चित्रपट माध्यमांनी , मला सांगा चलत चित्रपटांच शोध हा गोर्या लोकांचा बरोबर मग त्यात लहान मुलांसाठी कार्यक्रम हवा म्हणून वाल्ट डीस्ने हि कार्टून फिल्म याच गोर्या लोकांनी साधारण ७० / ८० वर्ष पुर्वी बनवली मग मला सांगा या animation च्या जगात त्यांनी येशूला, मेरिला किवा मुस्लिम राष्ट्रातील फिल्मी जगातील लोकांनी त्यांच्या अल्लाला किवा इतर कोणत्याही धर्मियांनी कधी तरी त्यांचं देवाला कार्टून स्वरूपात सादर केलय का हो?. नाहीना पण आपण मात्र गणपती सारखे कडक दैवत हव्या त्या स्वरूपात कार्टून मध्ये दाखवतो. मगं रामायण झाले,महाभारत झाले. दुसरे असे कि, मूर्तिकार लोक एक चूक करतात ते कधी गणपतीची मूर्ती तो साईबाबा, बाल गणेश, भगवी कफनी घातलेला , स्वामी विवेकानंद, कधी गांधी टोपी, पुणेरी पगडी घातलेला अशा विविध रुपात साकार करून दाखवतात. जर आपणच अशा प्रकारे देवांना अशी बालिश वागणूक देत बसलो तर इतर धर्मियांनी त्याची री ओढायला काय वेळ लागतो? आपण या बाबतीत आता जास्त गांभीर्याने विचार करायला हवा नाही का? दुसरे असे कि वर्षातून एकदा गणपती विसर्जन होते ते सुधा कृत्रिम तलावात करतात आणि शासन जे आवाहन करते त्याला आपण साथ देतो. मग याच शासनाला रोज वर्षाचे अगदी ३६५ दिवस मोठ मोठ्या कारखानातील दुषित पाण्यामुळे जी नद्या नाले यांची हानी होते ते काय दिसत नाही होय? त्या कारखानदारांना नुसत्या आवाहनाची नाही तर कडक कारवाईची गरज आहे मग त्या बाबतीत हेच शासन उदासीन का बरे. या कारखान्यातील प्रदूषणचे प्रमाणात गणपतीचे विसर्जनामुळे होणारे प्रदुषणाचे प्रमाण किती? कृपया तुम्हाला काय वाटते ते सांगा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14798
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

तर कोणत्याही धर्मियांनी कधी तरी त्यांचं देवाला कार्टून स्वरूपात सादर केलय का हो?
थोडं गूगल शोधून पाहिलंत तर बरं होईल असं सुचवावंसं वाटतं.
विविध रुपात साकार करून दाखवतात. जर आपणच अशा प्रकारे देवांना अशी बालिश वागणूक देत बसलो तर...
गणपती विद्येची देवता आहे आणि सृजनशीलता हा विद्येचाच एक आविष्कार आहे असा माझा एक समज होता.
या कारखान्यातील प्रदूषणचे प्रमाणात गणपतीचे विसर्जनामुळे होणारे प्रदुषणाचे प्रमाण किती?
"एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं का?" असं माझी आज्जी म्हणत असे. . पहिल्या परिच्छेदातल्या बर्‍याचशा गोष्टींशी सहमत आहेच; परंतु हीरो-व्हिलन अशा काळा/पांढर्‍या चष्म्यातून जग बघण्यापेक्षा ग्रे शेड्स समजून घेतल्या तर बरं होईल असं वाटतं...

In reply to by आदूबाळ

आदूबाळानि केलेल्या शवविच्छेदनाशी पूर्ण सहमत! आणि न्यूकमर लेखक महाशयांना णम्र इणंति,कि त्यांनि सांस्कृतिक अँगल सोडुन विचार करावा,जिवन खय्रा अर्थाने फलदायी होइल. :)

In reply to by अनुप ढेरे

चुकिची वानगी. हे काय कार्टून आहे का?

तुमच्या लेखात २/३ चर्चा होतील एवढे विषय आले आहेत. कार्टून्सबाबत आपण थोडे सहिष्णू राहिले तरी काही बिघडणार नाही. कार्टून्स अश्लील मात्र नक्कीच असू नयेत. याचा परिणाम होईल एवढे आपले देव लेचेपेचे नक्कीच नसावेत आणि हिंदूंना बरीच विनोदबुद्धी आहे असा माझा समज आहे. गणपतीला वेगवेगळी रूपे देऊ नयेत हेही ठीक. पण हे तुम्ही सांगत रहा. काही जणांना पटलं तरी बरंच साध्य झालं असं म्हणेन. पण तरीही कोणाला गणपतीला वेगळे रूप द्यावेसे वाटत असेल तर त्याला गणपती एवढा जवळचा वाटतो हे चांगलंच आहे म्हणायचं. त्यानिमित्ताने काही कलाकारांना आपली कला दाखवायला वाव मिळतो. गणप्ती 'कडक' दैवत आहे याबद्दल मात्र मला शंका आहे. कोणता देव कडक आणि कोणता मऊ असं काही नसतंय. प्रदूषणाच्या बाबत आदुबाळाशी सहमत. कारखान्यांना प्रदूषण करू देता कामा नयेच. पण आपण जे सहज करू शकतो, म्हणजे पी ओ पी, कृत्रिम रंग, प्लास्टिक पाण्यात न टाकणे हे जरूर करावंच. तसेही गणपतीच्या मूर्तीमधले देवत्व एकदा मंत्राने विसर्जन केले की राहिलेली मातीची मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन केली तरी काय फरक पडणार आहे!

जीवना उपयोगी अशा सर्व गोष्टींचा म्हणजे भाज्यांचा, स्टेशनरी वस्तूंचा, वाद्यांचा, खाण्याच्या वस्तूंचा (या वर्षी मालाड मध्ये लहान मुलांचे कुरकुरे पासून गणपती बनवला आहे ), मण्यांचा अहो जे मनात येईल त्या सर्व वस्तूंपासून गणपती बनवायचा
अहो वर्जिनल गणपतीच अंगावरच्या मळापासून बनलाय तर आपण कुठल्या तोंडाने लोकांना सांगायचं? बोला?

In reply to by राघवेंद्र

+२ दादांच्या कोंडकेपणाचे आम्ही फार पुर्वीपासुन फ्यान आहोत... :)

In reply to by दादा कोंडके

अगायायायायाया =)) पण पॉइंटाचा मुद्दा आहे खरा.

अहो लेखक महाशय, जरा गणपतीकडे लक्ष देउन बघा बघु! अहो किती मिश्किल देव तो! त्याला काय इतर देवांसारख सगुण सुंदर रुप घ्यायला जमल नसत? का म्हणुन बरे तो गजानन आहे? का तो तुंदिल तनुधारी आहे? एक दात काय म्हणुन तुटलाय? अन वाहन इटुकला चिटुकला मूषकराज! जरा विचार करा राव, आमचा देव भरपुर विनोदबुद्धी बाळगतो. अन या गणनायकाने बरेच बदल आणले ज्ञानाने त्याच्या काळात. म्हणुनच शिवाने त्याला आपला मुलगा मानले, तर देवांनी त्याला पुजेस्थानीचे पहिले अधिकार प्रदान केले.

लेखक मजकुर नवीन आहेत, सबब त्यांणी खालील धागे वाचावेत अशी शिफारस करितो: चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी http://www.misalpav.com/node/25414 पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ... http://www.misalpav.com/node/23698 थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा http://www.misalpav.com/node/18623

मूर्तिकार लोक एक चूक करतात ते कधी गणपतीची मूर्ती तो साईबाबा, बाल गणेश, भगवी कफनी घातलेला , स्वामी विवेकानंद, कधी गांधी टोपी, पुणेरी पगडी घातलेला अशा विविध रुपात साकार करून दाखवतात यांचा सूर तक्रारीचा असला तरी हिंदू धर्म वाढतो आहे हेच यांना सांगायचे आहे. वरून तक्रार आतून प्रचार असला हा प्रकार आहे. बा द वे इंडोनेशियामधे नोटेवरही गणपती असतो. एकूण काय प्रमोद देर्देक्रर यांनी म्हटल्याप्रमाणे गणपती इज पॉप्युलर एव्हरीव्हेअर.

मुळात हिदु धर्मात देवाचे अस्तित्त्वच मानण्याची सक्ती नाही, असे असताना तो अश्याच रुपात हवा वगैरे हट्टाहासाद्वारे (थोडक्यात हिंदु धर्म म्हटला की असेच हवे तसेच नको इत्यादी) किंवा ठोस नियम घालून त्याचे इस्लामीकरण का करावे? बाकी (तथाकथित) इको फ्रेंडली नसल्याने प्रदुषण होते का कचरा वाढतो?

>>हि गणपतीची अहवेलना थांबवायला हवी. काय करावं म्हणता मग?

इंडोनेशियामधे नोटेवरही गणपती असतो
हे ठाऊक नव्हते, गुगलून बघितल्यावर काय दिसले बघा: a d हिंदुस्थानाच्या नोटांवर फक्त गांधी, गांधी आणि गांधी... इतरांची अवहेलना केंव्हा थांबणार ?

In reply to by अनिरुद्ध प

खूप छान निरीक्षण आहे अनिरुद्ध प. मी पाहिलेल्या नोटेवर आत्ता दाखविलेल्या माणसाच्या जागी फूल साइज गणपतिचे चित्र होते.

In reply to by अनिरुद्ध प

नकाशा आणि नोटेचे चित्र देण्याचा हेतु हा, की इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश असूनही गणेशाचे चित्र नोटेवर छापतो.

मी स्वत; इंडोनेशियाची गणपतिचे चित्र असलेली नोट पाहिली आहे. आपण दिलेल्या नकाशात हिंदू धर्माचे बाहुल्य असणारे बालि बेट दाखविले आहे. इंडोनेशियात बर्याच लोकांची नावे सुद्धा संस्कृतोद्भ्व आहेत. उदाहरण - या देशाचे पहिले अध्यक्ष -सुकार्नो ( सुकर्ण). आणखीही अशी उदाहरणे आहेत.

In reply to by मालोजीराव

याच तुमच्या हिंदू सहिष्णुवादामुळे इतर धर्मिय कट्टरपंथियांचं फावतं. कसला फ्रेण्डली देव हो, नुसती इकडची सोंड तिकडे वळवली की भलेभले घाबरतात.

In reply to by मालोजीराव

बहुतेक दर वर्षी मुम्बैतील समुद्रकिनार्यावर दिसते,कारण मोठ्या आणि POP च्या मुर्ती,अजुनही सरकार्/महापालिकान्चे POP च्या मुर्तीवर बन्दि आणण्याचे कायदे फक्त कागदावरच दिसतात.

In reply to by मालोजीराव

सहमत. :( श्रींची दहा दिवस मारे पूजा करून अकराव्या दिवशी असला उकिरडा झालेला आजिबात पाहवत नाही. कशाला पाहिजेत मोठमोठ्या मूर्त्यांची थेरं? गप छोटे गणपती आणा अन त्यांचं विसर्जन करा. कशाला उगीच असली विटंबना? त्या डॉल्बींनी तर वात आणलाय. आयला, मेरा बस चलता तो डॉल्बीच उद्ध्वस्त केले असते.

In reply to by प्रचेतस

पूर्वकाळा साठीचे विवेचन योग्य आहे कारण मुर्ती ही पार्थीव म्हणजे मातीची होती तीचा आकार सहज बदलत असे विसर्जन केल्यावर्,आणि त्याला रन्गकामसुद्धा केले नसायचे,त्यामुळे प्रदुशणाचा धोका नसायचा.

In reply to by बॅटमॅन

मुळात बुद्धीच्या देवतेकडे ज्या मागण्या केल्या जातात त्यात बुद्धी सोडून सर्व काही असते. बुद्धीच्या देवतेकडून बुद्धीचे वरदान मागून त्या जोरावर आयुष्यातील प्रश्न सोडवायचे असतात हे समजण्याइतकी तरी बुद्धी असायला हवी. पण एकदा श्रद्धा हा विषय आला की बुद्धी चालवायची नसते हे भक्तांना पक्के ठाऊक आहे. स्वत:ची बुद्धी वापरायची म्हणजे सर्व जबाबदारी स्वत:च्या खांद्यांवर घ्यावी लागते. मग संकटांचे खापर देवाच्या डोक्यावर कसे बरे फोडता येईल? एकदा सर्व जबाबदारी त्याच्यावर ढकलली की पुढच्या वर्षी लवकर या म्हणायला आम्ही मोकळे! माणसांना निर्भय बनवते ती श्रद्धा. अगतिक बनवते ती अंधश्रद्धा. ज्ञानदेव, नामदेवांपासून ते तुकोबांपर्यंत एकही संत अगतिक झालेला दिसत नाही. उलट त्यांच्या श्रद्धेने त्यांना तर महत्पदाला पोचवलेच पण शेकडो वर्षे प्रेरणा देणारी परंपरा देखील निर्माण केली. आज सामान्य जनतेपासून ते नेत्यांपर्यंत आणि बुवा बापुंपर्यंत सारेच अगतिक झालेले दिसून येत आहेत. स्वत:च अगतिक झालेले इतरांना कसली **ची प्रेरणा देणार? ज्याप्रमाणे हॉलीवूडमध्ये पडद्यावर काहीतरी अक्राळविक्राळ दाखवल्याशिवाय लोक थिएटरमध्ये येणारच नाहीत अशी समजूत रूढ झाली आहे तसेच काहीतरी या मंडळांच्या बाबतीत झाले असावे. शेवटी असा मी असामी मध्ये बाप लेकाला सांगतो तेच खरे! "बेंबट्या हा गोल गरगरीत वाटोळा रुपया हाच खरा देव हो!"

In reply to by अवतार

प्रचण्ड सहमत. आणखी, एकदा मंत्राक्षता टाकून मूर्ती स्थानावरून हालवली की नंतर त्या मूर्तीत देवत्व रहात नाही नुसती माती (किंवा जे काही असेल ते, म्हणजे पेन्सिली, बिस्किटे, शंख,सुपार्‍या वगैरे ज्या साहित्याने मूर्ती घडवली असेल ते) उरते. त्याची विटंबना होऊ शकत नाही. तेव्हा भावना दुखावल्या जाण्याचा प्रश्न उद्भवू नये.

इको फ्रेंडली (याला मराठी शब्द सुचवा कि कोणीतरी)
पर्यावरणवादी, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणस्नेही इ,इ.इ. प्रतिशब्द म्हणून वापरता यावा.

अहवेलना थांबली पाहिजे याला पूर्ण अनुमोदन गणपतीचे एक नाव विनायक आहे आणि ते आम्ही धारण केलेले असल्याने अवहेलना आमच्या नशिबी पण आहे [पुराव्यादाखल मिपावरील आम्हाला मिळणारे प्रतिसाद संख्या पहा .{तेही करणार नाहीत } ]

धाग्याचे नक्की प्रयोजन काय आहे? गणपतीची नव्हेच तर आपन आपल्या बहुतेक देवांची थट्टा केलेलीच आहे. इंद्राचे हलणारे सिंहासन / इंद्राने सुरापान करून ऋषीमुनींच्या पत्नींवर असणारी वाकडी नजर/ ब्रम्हदेव वगैरेंचे इतर प्रताप / याच बरोबर गणपतीला देखील लम्बोदर वगैरे नावे ठेवणे कृष्णाला काळ्या म्हणून हिणवणे इत्यादी प्रकार आपल्या पुराणात आढळतात. तीच री आपन ओढत असतो. खुन्या मुरलीधर / डुल्या मारुती इत्यादी नावे पुण्यात आढळतातच ना. मग कार्टून सिरीयलस मधून श्रीकृष्णाच्या /गणेशाच्या लीलांचा परीचय करुन देणारी मालीका उलट चांगलीच म्हंटली पाहिजे. फटके उडवताना लक्ष्मी बार फटाके / कृष्ण छाप फटाके यांच्या बद्दल कोणी का बोलत नाहीत? त्याम्चे निर्माते एतद्देशीय हिंदुच आहेत ना? ती देवतांची विटंबना होत नाही का? चांगल्या गेणेशोत्सवाचे / गोकुळअष्टमी / नवरात्र या उत्सवांचे स्वरूप आपण कसे बदलले आहे त्यावर कोणी बोलत नाहीत कारण त्यातले अर्थकारण आड येते.त्याबाबत अळीमिळी गुपचिळी पाळतो. हीच अवस्था इतर उत्सवांची आहे.पंढरपूरच्या वारीतील गैरप्रकारांबद्दल बोला ना? किम्वा बहुतेक तीर्थ क्षेत्रांतील असणारा घाणेरडा परीसर ही विटंबना ठरत नाही का? लोकांपर्यन्त गणेशलीला / कृष्ण लीला पोहोचवणारी कार्टून्स मात्र वाईट धर्मबुडवी ठरतात हा दुहेरी न्याय कशाला? धार्मीकस्थळी असणार्‍या बडव्यांचा अनागोदी कारभार / भिकार्‍यांचा सुळसुळाट / बेवारस गाईगुरे / कमालीची अस्वच्छता याबद्दल कोणी बोलले की त्याना " हे असे बोलायचा टीका करायचा तुम्हाला अधिकार नाही. तेवढा अधिकार मिळवा मग बोला " असे हिणवायचे. कित्येक तीर्थ क्षेत्रातील लॉजेस मधे काय धंदे चालतात हे माहीत असूनही त्याबद्दल बोलायचे नाही . मात्र कोणी सुंदर कार्टून्स काढली की त्यावर गहजब माजवायचा हे दुट्टपी धोरण बम्द करा अगोदर. बोलायचे तर सर्वच घणीवर बोला. त्यात सुधारणा कशी करता येईल या बद्दल बोला.

In reply to by विजुभाऊ

विजूभाऊ, प्रत्येक विषयात समान सूत्र असले तरी ते वेगवेगळे विषय आहेत. जेंव्हा जेंव्हा ह्या पैकी एखादा विषय ऐरणीवर येतो तेंव्हा तेंव्हा त्या त्या विषयावर आपापली मते मांडली जातातच.

मिळवणारा धागा. कचरा करणारे आपणच आणि त्याची तक्रार करणारे आपणच.. ईथे मा.छो.डानरावांची स्वाक्शरी (गणपती बाप्पा बद्दल)फार चपखल लागू आहे. कुणाला मिळली तर डकवा

अहो खटपटेराव , बिचारा वगैरे कहो म्हणता मी तर एका चांगल्या विषयां बद्दल जागुरगता निर्माण करायला हवी या उद्देशाने हा धागा टाकला होता .
विजुभावू
आमच्या पेक्षा तूम्हांस जास्त अनुभव तेव्हा तुमचे निरीक्षण जास्त शिवाय धाग्याच्या शेवटी मी लिहिलच आहे कि तुमचेही विचार मांडा. आणि तुम्ही तर बहुतेक सर्व विषयाला स्पर्श करीत आहात कि त्या सर्व गोष्टींचा एक स्वतंत्र धागा निघू शकतो. पण आता फक्त आपण मिपा वाले नुस्ताच काथ्याकुट करणार कि, सर्व मिपाकर मंडळी एकत्र येवून काही उपाय शोधून पर्यावरण समतोल, अनागोदी कारभार यावर काही मदतीचा हातभार लावणार? जसे आज सकाळी नाही का काही शाळा, संस्था एकत्र येवून ज्या मूर्ती पाण्याच्या बाहेर आल्या आहेत त्या गोळा करून समुद्र किनारा, नदी परिसर स्वच्छ करत आहेत. तसे काही तरि. कारण खाली
नाद खुळा
यांनी म्हटल्या प्रमाणे कचरा करणारे आपणच आणि त्याची तक्रार करणारे आपण
प्रभाकर पेठकर / अनिरुद्ध प
तुमही म्हटल्या प्रमाणे "पर्यावरणस्नेही" हाच शब्द योग, एकदम चपखल. धन्यवाद
अदुबाळ
"एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं का?" असं माझी आज्जी म्हणत असे आपण वासरू मारणार नाहीच आहोत नाही ते आपल्याच्याने होणार पण नाही पण जो कोणी एक आहे म्हणता तो एक नाही हो , हजारो आणि लाखो आहेत जे रोज एक दोन नाही, तर हजार गायी मारत सुटले आहेत मग त्या सर्वाना अडवायला नको काय ?

खूप छान निरीक्षण आहे अनिरुद्ध प. मी पाहिलेल्या नोटेवर आत्ता दाखविलेल्या माणसाच्या जागी फूल साइज गणपतिचे चित्र होते. आठवले काका इंडोनेशियामधे नोटेवरही गणपती असतो हे निरीक्षण माझे आहे.

In reply to by आशु जोग

आशु जोग यांस, आपले, माझे आणि अनिरुद्ध प यांचे या विषयावरील प्रतिसाद ज्या क्रमाने सध्या दिसतात त्याच्या ऐवजी ज्या वेळेला ते टाकले गेले त्या क्रमाने वाचले तर आपला गैरसमज दूर होईल असे वाटते. तो क्रम असा - १.आशु जोग - Tue, 17/09/2013 - 19:२३,इंडोनेशियामधे नोटेवरही गणपती असतो २ मी .Wed, 18/09/2013 - 05:४२- नोटेवर गणपति ३अनिरुद्ध प - Wed, 18/09/2013 - 13:०० अहो ४ मी- Wed, 18/09/2013 - 17:०३ फूल साइज . मिसळ पाव मध्ये उत्तर दया हि सोय आहे. तिचा फायदा होतो पण त्यामुळे उत्तरे वेळेच्या क्रमाने न राहता मधेच दुसरा कोणी आपला नन्तरच्या वेळेचा प्रतिसाद घुसवू शकतो, ही गैरसोय ही निर्माण झाली आहे. इंडोनेशियआच्या नोटेवर गणपती असल्याची नोंद सर्वात आधी आपणच केली हे मला मान्य आहे.

मुलतान म्हटलं की मिसळीवरच्या मित्रांना इंझमाम उल हक आठवतो. ९२च्या वर्ल्डकपमधे ज्याने पाकिस्तानला बरे दिवस दाखवले. पण आम्हाला मूलस्थान म्हटलं की गणपतीची आठवण येते. पाकिस्तानी लोक मूळचे हिंदूच. आजही तिथे अनेक देवळे अस्तित्त्वात आहेत. सौदीधर्मीयांच्या स्वार्‍या होवू लागल्यानंतर तेथील आक्रमक जे जे उत्तम उदात्त उन्नत असेल ते पायदळी तुडवत. त्यांचा नाइलाज असे. त्यांना तशी लिखित आज्ञाच होती. घराघरातील देवाच्या मूर्तींचा विध्वंस करण्यात त्यांना कोण आनंद मिळत असे. त्या काळात तिथले अनेक लोक मारले गेले. अनेकांनी सौदी धर्मा स्वीकारून आपले जीव वाचवले(अलिकडे पाकिस्तानातील हिंसाचारावरून सिद्ध झालय सौदीधर्म स्वीकारूनही जीव वाचत नाही) पण देवांच्या मूर्ती मात्र जमिनीखाली गाडून टाकल्या जेणेकरून त्यांची विटंबना होवू नये. आजही मुलतानमधे पुरातत्त्वखाते खोदकाम करते तेव्हा जमिनीखाली गणपतीच्या मूर्ती सापडतात.

मुलतान म्हटलं की मिसळीवरच्या मित्रांना इंझमाम उल हक आठवतो. छ्या ! मला तर आपला वीरेंद्र सेहवागच आठवतो …।

In reply to by चेतनकुलकर्णी_85

मला तर आपला वीरेंद्र सेहवागच आठवतो …।
यावरून त्याने रावळपिंडी लोकलला मारलेली "बाप बाप होता है और बेटा बेटा होता है |" ही शब्दचपराक आठवली.