मित्रांनो ,
सर्व प्रथम सर्व थोरा मोठ्यांना माझा नमस्कार. मी नवीन सभासद असून माझे काही विचार मी इथे मांडतो आहे. तेव्हा चूकभूल द्यावी घ्यावी. गेल्या काही वर्षात गणपती उत्सवाचे स्वरूप काहीसे बदलेले आहे, नदी तलाव प्रदूषित होवू नये म्हणून आपण सर्वजण इको फ्रेंडली (याला मराठी शब्द सुचवा कि कोणीतरी) गणेशोत्सव साजरा करीत आहेत. निसर्ग, पर्यावरण या विषयी जनता जागरूक होत आहे या बद्दल जनतेला धन्यवाद. पण एकीकडे काही मंडळे मात्र आपला हेका सोडायला तयार नाहीत, मोठ्या आकाराचे गणपती, भव्य दिव्य आरास, मोठे ध्वनी क्षेपक, संपर्ण परिसराला केलेली विद्युत रोशणाई याची रेलचेल दिसून येते ते सुधा फक्त स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, तर काही ठिकाणी याच गणपतीचे विविध स्वरूपातले रूप बघून खुद्द गणपती सुधा चाट पडत असेल. जीवना उपयोगी अशा सर्व गोष्टींचा म्हणजे भाज्यांचा, स्टेशनरी वस्तूंचा, वाद्यांचा, खाण्याच्या वस्तूंचा (या वर्षी मालाड मध्ये लहान मुलांचे कुरकुरे पासून गणपती बनवला आहे ), मण्यांचा अहो जे मनात येईल त्या सर्व वस्तूंपासून गणपती बनवायचा आणि "आपण काही तरी वेगळे केले" हे सर्व जगाला दाखवोन द्यायचे असे चालले आहे.
यात भर घातली आहे टी चित्रपट माध्यमांनी , मला सांगा चलत चित्रपटांच शोध हा गोर्या लोकांचा बरोबर मग त्यात लहान मुलांसाठी कार्यक्रम हवा म्हणून वाल्ट डीस्ने हि कार्टून फिल्म याच गोर्या लोकांनी साधारण ७० / ८० वर्ष पुर्वी बनवली मग मला सांगा या animation च्या जगात त्यांनी येशूला, मेरिला किवा मुस्लिम राष्ट्रातील फिल्मी जगातील लोकांनी त्यांच्या अल्लाला किवा इतर कोणत्याही धर्मियांनी कधी तरी त्यांचं देवाला कार्टून स्वरूपात सादर केलय का हो?. नाहीना पण आपण मात्र गणपती सारखे कडक दैवत हव्या त्या स्वरूपात कार्टून मध्ये दाखवतो. मगं रामायण झाले,महाभारत झाले.
दुसरे असे कि, मूर्तिकार लोक एक चूक करतात ते कधी गणपतीची मूर्ती तो साईबाबा, बाल गणेश, भगवी कफनी घातलेला , स्वामी विवेकानंद, कधी गांधी टोपी, पुणेरी पगडी घातलेला अशा विविध रुपात साकार करून दाखवतात. जर आपणच अशा प्रकारे देवांना अशी बालिश वागणूक देत बसलो तर इतर धर्मियांनी त्याची री ओढायला काय वेळ लागतो? आपण या बाबतीत आता जास्त गांभीर्याने विचार करायला हवा नाही का?
दुसरे असे कि वर्षातून एकदा गणपती विसर्जन होते ते सुधा कृत्रिम तलावात करतात आणि शासन जे आवाहन करते त्याला आपण साथ देतो. मग याच शासनाला रोज वर्षाचे अगदी ३६५ दिवस मोठ मोठ्या कारखानातील दुषित पाण्यामुळे जी नद्या नाले यांची हानी होते ते काय दिसत नाही होय? त्या कारखानदारांना नुसत्या आवाहनाची नाही तर कडक कारवाईची गरज आहे मग त्या बाबतीत हेच शासन उदासीन का बरे. या कारखान्यातील प्रदूषणचे प्रमाणात गणपतीचे विसर्जनामुळे होणारे प्रदुषणाचे प्रमाण किती?
कृपया तुम्हाला काय वाटते ते सांगा.
वाचने
14798
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
तर कोणत्याही धर्मियांनी कधी
आदूबाळानि केलेल्या
In reply to तर कोणत्याही धर्मियांनी कधी by आदूबाळ
+१
In reply to तर कोणत्याही धर्मियांनी कधी by आदूबाळ
काहितरिच...
In reply to +१ by अनुप ढेरे
+१११
In reply to काहितरिच... by जे.जे.
मिपावर स्वागत
.
मिपा आयडी दादा कोंडके फॅन
In reply to . by दादा कोंडके
एकदम बरोबर मित्रा
In reply to मिपा आयडी दादा कोंडके फॅन by अभ्या..
+२
In reply to एकदम बरोबर मित्रा by राघवेंद्र
अगायायायायाया
In reply to . by दादा कोंडके
अहो लेखक महाशय, जरा गणपतीकडे
गाडी सुरवातीला बरोबर
ह्याला काय म्हणाल
बाळ गणेश !!!
In reply to ह्याला काय म्हणाल by कपिलमुनी
डोळ्यावर कातडी???
In reply to बाळ गणेश !!! by राघवेंद्र
नवीन लेखक मजकुर
मूर्तिकार लोक एक चूक करतात ते
मूर्तिकार लोक एक चूक करतात ते कधी गणपतीची मूर्ती तो साईबाबा, बाल गणेश, भगवी कफनी घातलेला , स्वामी विवेकानंद, कधी गांधी टोपी, पुणेरी पगडी घातलेला अशा विविध रुपात साकार करून दाखवतातयांचा सूर तक्रारीचा असला तरी हिंदू धर्म वाढतो आहे हेच यांना सांगायचे आहे. वरून तक्रार आतून प्रचार असला हा प्रकार आहे. बा द वे इंडोनेशियामधे नोटेवरही गणपती असतो. एकूण काय प्रमोद देर्देक्रर यांनी म्हटल्याप्रमाणे गणपती इज पॉप्युलर एव्हरीव्हेअर.कै च्या कै
बरं!!
इंडोनेशियात नोटेवर गणपती, इकडे फक्त गांधी
अहो
In reply to इंडोनेशियात नोटेवर गणपती, इकडे फक्त गांधी by चित्रगुप्त
फूल साइज
In reply to अहो by अनिरुद्ध प
नकाशा आणि नोट
In reply to अहो by अनिरुद्ध प
नोटेवर गणपति
गणपती हा जगातील सर्वात क्युट
.
In reply to गणपती हा जगातील सर्वात क्युट by मालोजीराव
नुसती इकडची सोंड तिकडे वळवली की भलेभले घाबरतात.
In reply to . by दादा कोंडके
आपल्या लोकांना आवरा आधी
In reply to . by दादा कोंडके
हे चित्र
In reply to आपल्या लोकांना आवरा आधी by मालोजीराव
सहमत. श्रींची दहा दिवस मारे
In reply to आपल्या लोकांना आवरा आधी by मालोजीराव
हाहाहा.
In reply to सहमत. श्रींची दहा दिवस मारे by बॅटमॅन
हम्म्म्म....
In reply to हाहाहा. by प्रचेतस
हे
In reply to हाहाहा. by प्रचेतस
+१
In reply to सहमत. श्रींची दहा दिवस मारे by बॅटमॅन
अवतार दादांना .... जोरदार +१
In reply to +१ by अवतार
जोरदार तालियाँ
In reply to +१ by अवतार
+१
In reply to सहमत. श्रींची दहा दिवस मारे by बॅटमॅन
इको फ्रेंडली (याला मराठी शब्द
पेठकर काका
In reply to इको फ्रेंडली (याला मराठी शब्द by प्रभाकर पेठकर
+१
In reply to पेठकर काका by अनिरुद्ध प
नाही हो… पर्यावरण हितैषी
In reply to +१ by विटेकर
अहवेलना थांबली पाहिजे याला
धाग्याचे नक्की प्रयोजन काय
बोलूच की...
In reply to धाग्याचे नक्की प्रयोजन काय by विजुभाऊ
बिचारा नवीन सभासद
शंभरी
सर्व प्रतिसादासाठी धन्यवाद
विजुभावू
आमच्या पेक्षा तूम्हांस जास्त अनुभव तेव्हा तुमचे निरीक्षण जास्त शिवाय धाग्याच्या शेवटी मी लिहिलच आहे कि तुमचेही विचार मांडा. आणि तुम्ही तर बहुतेक सर्व विषयाला स्पर्श करीत आहात कि त्या सर्व गोष्टींचा एक स्वतंत्र धागा निघू शकतो. पण आता फक्त आपण मिपा वाले नुस्ताच काथ्याकुट करणार कि, सर्व मिपाकर मंडळी एकत्र येवून काही उपाय शोधून पर्यावरण समतोल, अनागोदी कारभार यावर काही मदतीचा हातभार लावणार? जसे आज सकाळी नाही का काही शाळा, संस्था एकत्र येवून ज्या मूर्ती पाण्याच्या बाहेर आल्या आहेत त्या गोळा करून समुद्र किनारा, नदी परिसर स्वच्छ करत आहेत. तसे काही तरि. कारण खालीनाद खुळा
यांनी म्हटल्या प्रमाणे कचरा करणारे आपणच आणि त्याची तक्रार करणारे आपणप्रभाकर पेठकर / अनिरुद्ध प
तुमही म्हटल्या प्रमाणे "पर्यावरणस्नेही" हाच शब्द योग, एकदम चपखल. धन्यवादअदुबाळ
"एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं का?" असं माझी आज्जी म्हणत असे आपण वासरू मारणार नाहीच आहोत नाही ते आपल्याच्याने होणार पण नाही पण जो कोणी एक आहे म्हणता तो एक नाही हो , हजारो आणि लाखो आहेत जे रोज एक दोन नाही, तर हजार गायी मारत सुटले आहेत मग त्या सर्वाना अडवायला नको काय ?खूप छान निरीक्षण आहे अनिरुद्ध
खूप छान निरीक्षण आहे अनिरुद्ध प. मी पाहिलेल्या नोटेवर आत्ता दाखविलेल्या माणसाच्या जागी फूल साइज गणपतिचे चित्र होते.आठवले काकाइंडोनेशियामधे नोटेवरही गणपती असतोहे निरीक्षण माझे आहे.स्पष्टीकरण
In reply to खूप छान निरीक्षण आहे अनिरुद्ध by आशु जोग
.
........................
मुलतान म्हटलं की मिसळीवरच्या मित्रांना इंझमाम उल हक आठवतो.छ्या ! मला तर आपला वीरेंद्र सेहवागच आठवतो …।+१ येस! मला पण! मुलतान का
In reply to ........................ by चेतनकुलकर्णी_85
मला तर आपला वीरेंद्र सेहवागच
In reply to ........................ by चेतनकुलकर्णी_85