थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
26 Jul 2011 - 12:21 pm

नमस्कार मंडळी,
आम्ही अधून मधून आमच्या जुन्या-पुराण्या नोंदवह्या चाळत असतो, आणि वेळोवेळी त्यातील काही प्रसंग मनुष्ययोनीत प्रसृत करत असतो. वस्त्रहरण प्रसंगी, द्रौपदीने कृष्णाचा केलेला धावा सर्वविदित असला, तरी यापेक्षा पुष्कळ आधी एकदा द्रौपदीला कृष्णाचा धावा करावा लागला होता, ती घटना अशी:

प्रसंग: अर्जुनाने एकट्याने पण जिंकला असून द्रौपदीस पाची जणांची पत्नी बनावे लागले..

तपशील:
पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे" हे ऐकून अर्जुनाचा चेहरा गोरामोरा झाला, कुन्तीलाही द्रौपदी कडे बघताच आपली चूक कळून आली, परंतु युधिष्टीराने हट्ट धरला, की मातृवचन ही कृष्णपाषाणावरील अमिट रेषा. तिचे पालन झालेच पाहिजे ... आता काय करावे? सर्व पांडवांची द्रौपदीविषयी लालसा ओळखून, पुढे काही अघटित घडू नये, या विचाराने कुंतीने निर्णय दिला, की द्रौपदीने पाची पांडवांची पत्नी बनून राहावे. परंतु हे साधायचे कसे? शेवटी तिने तोडगा काढला, तो असा:

युधिष्ठिरास सोमवार
अर्जुनास मंगळवार
भीमसेनास बुधवार
द्यावा म्हणिजे बरे ||

नकुल-सहदेव लहान
मातेविन पोरके, अजाण
त्यांसी द्यावे दोन दोन दिन
म्हणिजे बरे ||

नकुलासी गुरु-शुक्र वार
सहदेवास शनी-रविवार
ऐशी वाटणी क्रमवार
करोन वंश वाढवावा ||

मग कुंती द्रौपदीस म्हणाली, " हे सुभगे, (शब्दकोश बघणे) त्वां पराकाष्ठेची भाग्यवान आहेस, कारण माझे पाच पराक्रमी पुत्र तुजला एकसमयावच्छेदेकरून पती म्हणून लाभत आहेत. याप्रकारे तुझी आता पाचावर धारण बसली आहे, तस्मात यापुढे तू या पाची जणांकडून धारणा करून घेत त्या गांधारी प्रमाणे शतपुत्र प्रसवावेत, अशी माझी कामना आहे... का रे बाळांनो, पटली ना तुम्हास ही योजना?

युधिष्ठिर-भीम आनंदे हसले
अर्जुनासही मान्य जाले
नकुल-सहदेव कष्टी जाहले
कसे कोण जाणे ||

कुंतीने हे ओळखले, म्हणाली, बाळांनो, तुम्ही कष्टी का? तुम्हास तर दोन दोन दिवस मिळत आहेत?

नकुल म्हणाला माते, आम्ही सर्वात लहान, आम्हास दोन दोन दिवस कशाला?
आम्हाला दोन दोन तास सुद्धा पुरेत,
पण ते भीमाच्या आधीचे...
कारण शास्त्रवचन आहेच, "देही ज्याच्या बळकटी, क्रम त्याचा शेवटी "
सहदेवही घाइघाईने म्हणाला, होय माते, अगदी खरे, कारण शास्त्रवचन असेही आहे, " सर्वांमध्ये जो सबळ, त्याने सोसावी कळ "

कुंतीस हे पटले. शास्त्रवचनच ते, पटणारच. युधिष्ठिराने संमति दिली. भीमास तर आता उरलेले तीनही दिवस आपले, या विचाराने आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. त्याचे सर्वांग स्फुरण पावू लागले... परंतु द्रौपदी?

द्रुपदाच्या भव्य महालात लाडात वाढलेली द्रौपदी ध्यानीमनी नसता अचानक या झोपडीत येऊन आधीच बावरली होती, त्यातून कुंतीने केलेली तिची निर्दय वाटणी, सर्व पांडवांच्या नजरेतील तिच्याप्रती अभिलाषा हे सर्व बघून तर तिची बोबडीच वळली... ती अबला धाय मोकलून काकळूतीने श्रीकृष्णाचा खालील प्रमाणे धावा करू लागली:

(जाति: धावा-धावा / वृत्त: वसंतलतिका / चाल: झुलवू नको रे बाळा / ठेका: धिंगाणा )

घननीळा लडिवाळा
निस्तर घोळ तू सगळा ...
विनवितसे ही अबला
धाव धाव तू सबला...
तू नच येता, निर्मळा
होईल माझा, चोळामोळा ...
धाव आता रे सबळा
दे सद्बुद्धी तू सकळां ||

झाले, भगवंत तत्क्षणी प्रकट झाले, त्यांनी सर्व काही अंतरज्ञानाने जाणले होतेच, त्यांना द्रौपदीची दया आली, पण प्रसंगाचे गांभीर्य आणि संभावित धोका ओळखून त्यांनी मधला मार्ग काढला:

युधिष्ठिरास सोमवार
अर्जुनास मंगळवार
नकुलासि बुधवार
बरा असे ||

सहदेवास गुरुवार
भीमसेनास शुक्रवार
मग शनिवार-रविवार
पूर्ण सुट्टी ||

मग पांडवांना ते म्हणाले, खबरदार जर कुणी द्रौपदीला सप्ताहांती छळाल तर... त्या ऐवजी तुम्ही स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, केरवारे, या सर्वात कुंतीमातेला सर्वतोपरी सहाय्य करायचे... द्रौपदीला संपूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे... असे म्हणून भगवान अंतर्धान पावले.

... पुढे कलियुगात भारतवर्षाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना आम्ही दृष्टांत देऊन ही घटना कळवली. भगवंतास जशी द्रौपदीची काकळूत आली, तशीच त्यांना त्यांच्या हाताखालील लाखो कर्म-आचार्यांची येऊन त्यांनी सरकारी फतवा काढून 'पंच-दिन कर्म सप्ताह' हा नियम भारतवर्षात लागू केला.
असेच अनेक दृष्टांत आम्ही प्रसिध्द मराठी लेखक आनंद साधले यांना देत आलो, त्यावर त्यांनी 'हा जय नामक इतिहास आहे' या ग्रंथाची रचना केली, जिज्ञासूंनी वाचावा.
बरंय, यम यम | (तुम्ही जसे राम राम म्हणता, तसे आम्ही यम यम म्हणतो)
चित्रगुप्त.

शृंगारहास्यकरुणअद्भुतरससंस्कृतीविनोदवाङ्मयइतिहासव्युत्पत्तीसाहित्यिकमौजमजा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

26 Jul 2011 - 12:50 pm | श्रावण मोडक

हाहाहाहाहा... पाच दिवसांच्या आठवड्याची महत्ती अशी आहे तर... ;)

किसन शिंदे's picture

26 Jul 2011 - 12:58 pm | किसन शिंदे

:D :D :D

अच्छा!! म्हणजे हे फाईव डेज वर्कींग त्याकाळापासुन चालू आहे तर.

स्वानन्द's picture

26 Jul 2011 - 1:02 pm | स्वानन्द

हा हा...
पण महाराज... कलियुगात हा फॉर्म्याट तुम्ही लै उशिरा का सुरू केला... त्याचे कृपया विवेचन करावे.

मम मम|

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jul 2011 - 1:05 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

बाकी नकुल सहदेवांची भिती लै भारी!

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jul 2011 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार

विनोद म्हणून ठिक आहे पण...

पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे"

असले चुकीचे दाखले दिले नाहित तर जास्ती बरे.

द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती.

परार्षी व्यास

स्मिता.'s picture

26 Jul 2011 - 3:24 pm | स्मिता.

द्रौपदी तिला पूर्वजन्मात मिळालेल्या शंकराच्या आशिर्वादाने पाच विविध कला असलेल्या पाच वेगवेगळ्या पुरुषांनी पत्नी बनली होती. उगा आपली कुंतीच्या नावानी लोकं बोंब का मारतात काय माहिती.

द्रौपदी ला पाच पुरुषांना वरावे लागले याचे कारण तिला पूर्वजन्मी मिळालेला शंकराचा आशिर्वाद तर आहेच पण तेच एक कारण नाही. तर पांडवांनी स्त्रिचा 'भिक्षा' असा उल्लेख करणं आणि कुंतीनेही न बघता आदेश देणं हे देखील तितकेच महत्त्वाचे कारणं आहेत. संदर्भासाठी पहावे. (वेळ वाचवण्यासाठी १६-१७व्या मिनीटानंतर बघावे.)

माझा महाभारताचा अभ्यास एवढाच असल्याने जास्तीचे संदर्भ मागू नये :P

सहज's picture

27 Jul 2011 - 6:53 am | सहज

एकाच प्रतिसादात धागालेखक, द्रौपदी, शंकर, महर्षी व्यास व ऐतिहासीक सत्य यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्राचे रक्षण, समर्थन परार्षी ने केल्याचे पाहून ड्वोळे पाण्वाले!

(पराश्रीचा मित्र) सहज

मग पांडवांना ते म्हणाले, खबरदार जर कुणी द्रौपदीला सप्ताहांती छळाल तर... त्या ऐवजी तुम्ही स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, केरवारे, या सर्वात कुंतीमातेला सर्वतोपरी सहाय्य करायचे... द्रौपदीला संपूर्ण विश्रांती मिळाली पाहिजे... असे म्हणून भगवान अंतर्धान पावले.

... पुढे कलियुगात भारतवर्षाचे पंतप्रधान राजीव गांधी यांना आम्ही दृष्टांत देऊन ही घटना कळवली. भगवंतास जशी द्रौपदीची काकळूत आली, तशीच त्यांना त्यांच्या हाताखालील लाखो कर्म-आचार्यांची येऊन त्यांनी सरकारी फतवा काढून 'पंच-दिन कर्म सप्ताह' हा नियम भारतवर्षात लागू केला.

अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही.
आन्याव घोर अन्याव......
जिथे वराहाला ३० मिनीटे पुरतात तिथे ६० मिनिटे फार झाली असती नै;)

नावातकायआहे's picture

26 Jul 2011 - 2:57 pm | नावातकायआहे

ओ गणपाशेट!
पार्टीचा पन काय तरी विचार करा....

गणपाशेट तुम्हाला विभागणी ऐवजी बोळवण तर म्हणायचे नाही ना ?

चित्रगुप्त's picture

28 Jul 2011 - 12:17 am | चित्रगुप्त

अरे रे भगवंताने पाच पांडवांना १ - १ तास अशी सगळी मिळुन सरळ ५ तासांतच का विभागणी केली नाही.....

असे केले असते तर पुढचे चे महाभारत घडलेच नसते:
वाचा द्रौपदीचा धावा, पुन्हा एकदा.

सुनील's picture

26 Jul 2011 - 2:56 pm | सुनील

कहाणी मस्त!

सहज's picture

26 Jul 2011 - 3:03 pm | सहज

व्हॉट हॅपन्स इन अज्ञातवास स्टेज इन अज्ञातवास!

धमाल मुलगा's picture

27 Jul 2011 - 2:33 pm | धमाल मुलगा

किसनद्येवानं म्हण्लं, "आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर" म्हणजे मग?

सहज's picture

27 Jul 2011 - 2:46 pm | सहज

किसनदेवाने म्हणल्याचे ऐकण्यात नाही. तुमचे महाभारत कोणी लिहले आहे? तशी वेगळी स्टोरी असेल तर येउ द्या!

धमाल मुलगा's picture

27 Jul 2011 - 2:51 pm | धमाल मुलगा

आम्ही फक्त प्रयत्न करत होतो धर्म-रुढीद्वेष्ट्यांच्या पध्दतीनं चेष्टा करण्याचा. :P
नीट जमला नसल्यास रद्दबातल समजावा. ;)

मदनबाण's picture

26 Jul 2011 - 5:33 pm | मदनबाण

अच्छा... ही गोष्ट आहे काय ? ;)

नकुल-सहदेव कष्टी होण्या मागचे कारण रास्तच दिसते ! ;)

बाकी जाता जाता...
भगवान श्री कॄष्ण गीतेत हे देखील सांगुन गेले आहेतः---
इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च।जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्॥१३- ८॥

अर्थात :---
इन्द्रियों के विषयों के प्रति वैराग्य (इच्छा शून्यता), अहंकार का अभाव, जन्म मृत्यु जरा (बुढापे) और बिमारी (व्याधि) के रुप में जो दुख दोष है उसे ध्यान में रखना (अर्थात इन से मुक्त होने का प्रयत्न करना)।

संदर्भ :--- अध्याय १३ वा श्लोक ८ वा.

गणेशा's picture

26 Jul 2011 - 5:44 pm | गणेशा

विनोदी लेखन .. आवडले

तिमा's picture

26 Jul 2011 - 7:19 pm | तिमा

एका स्त्रीच्या असहाय्य अवस्थेचे असे विनोदी(?) चर्वितचर्वण आवडले नाही.

अप्पा जोगळेकर's picture

26 Jul 2011 - 8:47 pm | अप्पा जोगळेकर

हा जोक पूर्वीही ऐकला होता पण तरीही वर्णन करण्याची पद्धत विशेषत्वाने आवडली.

पंगा's picture

27 Jul 2011 - 8:29 pm | पंगा

हा जोक पूर्वीही ऐकला होता...

'कूपसूचियोग'? ;)

शशिकांत ओक's picture

26 Jul 2011 - 11:14 pm | शशिकांत ओक

फार प्राचीन आहे म्हणायचा.
चित्रगुप्ताच्या हिशोबी पाच रात्रींचा आठवडा महाभारतकालीन असल्याचा साक्षात्कार कै. राजीव गांधींना झाला अन् पाच दिवसाचा आठवडा करून कार्यालयिन बाबूंना शनि-रवि झाडूपोच्छा दिन म्हणून वाटणीला आले झालं.

>>पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, तेव्हा त्यांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली, "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे" हे ऐकून अर्जुनाचा चेहरा गोरामोरा झाला,

कुठल्या तरी पुस्तकात वाचल होत कि हे पुर्ण खर नाही आहे (पुस्तकाच नाव आठवत नाही आहे आता), काय खरं आणी काय खोट माहीत नाही, पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की :-)

पंच-दिन कर्म सप्ताह पाळणारा.
--टुकुल

५० फक्त's picture

27 Jul 2011 - 6:48 am | ५० फक्त

'' पण जर का त्या दिवशी कुंती पण उपाशी असती आणी म्हणाली असती "बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते आपण सहाजणात वाटून घेवु" तर काय ? इतिहास आणी वर्तमानच बदलुन गेला असता की''

मेलो मेलो, फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.)

आम्ही या संदर्भात आमची नोंदवही पुन्हा एकदा वाचल्यावर दिसून आले, की त्या दिवशी कुन्तीला एकादशीचा उपास असल्याने ती उपासाचे चमचमीत जिन्नस बनवण्यासाठी दाणे कुटीत बसलेली होती, कुटण्याच्या आवाजात व नादात तिला द्रौपदीच्या बांगड्यांची किणकिण ऐकू आली नाही. एकादशीचा उपास फक्त कुंतीलाच असे, पांडव काहीही खात, प्रसंगी अभक्ष्यभक्षण ही करीत.

आमच्या मते बिचार्‍या द्रौपदीवर जन्मभर अन्याय झाला, तिची घोर विटंबना झाली, यास मुखत्वेकरून युधिष्ठिरास जबाबदार धरता येते, परंतु तो पडला साक्षात आमच्या बॉसचा, यमधर्माचा पुत्र, त्यामुळे द्रौपदीच्या मूक रुदनाची नोंद करत बसण्यापलिकडे आम्हाला कधीच काही करता आले नाही...

त्याकाळी आमच्या दफ्तरात फावल्या वेळी या सर्व प्रकरणाविषयी आम्ही सर्व जण खूप उहापोह करत असू, अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी, मग कोणी बीज-क्षेत्र न्याय वगैरे चा हवाला देत.. ते दिवस फार धामधुमीत गेले, रोज नवीन काहीतरी सनसनाटी घडत असे, परंतु शेवटी सर्वनाशच झाला.

स्मिता.'s picture

27 Jul 2011 - 3:04 pm | स्मिता.

तुमच्या दफ्तरातल्या फावल्या वेळात होणार्‍या चर्चेत आम्हाला फार म्हणजे फारच इंटरेस्ट आहे. तो उहापोह इथे (पुन्हा एकदा) झाला तर रंगतदार चर्चा होईल.

तसेच वर हर्षदरावांनी केलेली सूचना:
फक्त एकच दुरुस्ति महाभारत आपला इतिहास आहे का फक्त एक महाकाव्य (याबद्दल एक जोरदार चर्चा झालि पाहिजे.)
हिसुद्धा विचारात घेतली पाहिजे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Jul 2011 - 7:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>> अनेकांच्या मते पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हताच, कारण ती पांडूची संतती नव्हतीच मुळी
मग कौरवांचा तरी कसा अधिकार? धृतराष्ट्र कुणाची संतती होता?? काय राव, लोकांना नियोग आणि त्याचे नियम माहित नसतात. तुम्ही चित्रगुप्त, तुम्हाला तरी माहित पाहिजे का नाही ?

रण्गोपा's picture

27 Jul 2011 - 3:48 pm | रण्गोपा

जुनाच सोमरस नविन बाटलीत? पण बाटली छान वाटली.
नविन विनोद आणि छोटे समर्पक शिर्षक येऊ द्या...

बट्ट्याबोळ's picture

2 Aug 2011 - 11:21 am | बट्ट्याबोळ

"पाचावर धारण" .. आवडलं !!
भीमाच्या आधिचे २ तास :) टू गूड !!