जोवरी हे जग, जोवरी भाषण - १
नमस्कार ..
मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा.
आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...
आत्तापर्यंत मला जे काही ५० च्या घरात गीतरामायणाचे कार्यक्रम करायला मिळाले त्यामध्ये हे दिसलं कि बरीचशी गाणी समोर बसलेल्या लोकांना तोंडपाठ आहेत, गाणं सुरु करायचा अवकाश त्यांचं गुणगुणणं सुरु...गीतरामायणामधील ५६ गाणी, प्रत्येक गाण्याला जवळपास ७ ते ९ कडवी...प्रत्येक वेळेला गाण्याची तयारी करताना किंवा सादर करतान वेगळाच आनंद मिळतो कि आपण या नितांत सुंदर गोष्टीचा एक भाग होऊ शकतो..
अर्थात हा आनंद मिळालेला काही मी एकटाच नाही..महाराष्ट्रात आणि बाहेरसूद्धा अनेक कलाकार, श्रोते हा आनंद वर्षानुवर्षे मिळवतायत. गीतरामायणाचे अजून एक विशेष म्हणजे इतके वेळेला अनेक लोकांनी ह्या विषयावर बोललेलं असलं तरी ही गोष्ट कायम ताजी आहे..
यावरून असं वाटलं की गीतरामायणवरील माझे विचार, कार्यक्रमादरम्यानचे काही अनुभव, किस्से आपल्याला सांगावेत.
तुमच्याकडेही याबद्दल काही सांगण्यासारखे असेल तर जरूर सांगा, मला नक्की आवडेल. मिपाकरांना आवडले तर गीतरामायणामधील काही गाण्यांवर लेख लिहायचा विचार आहे..
(तुम्हाला आवडल्यास क्रमश:) )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लिहा.
+१
मिपा वर स्वागत .
धन्यवाद
अगदी !! माझ्या लेकीला तर गीत
हाहाहा !!!!
त्यात हसण्यासारख काय आहे?
@हाहाहा !!!! >>>
अगदी,
नक्की लिहा. लेखनाला शुभेच्छा!
प्रतिक्षेत.
गीत रामायण म्हटल्याबरोबर जसे
@विटेकर, प्रभाकर पेठकर, दत्ता
जरूर लिहा ! पुभाप्र.
जोवरी हे जग, जोवरी भाषण - १
जरूर लिहा वाचायला नक्की आवडेल
अरे वा!
मला त्यात्ले " माता न तु
गीत तरामायण वरील लेखमाला
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद....
नेकी