सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच..
निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते..
कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले...
आणखी काय लागते..!
गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता..
यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली..
टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला..
अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते !
ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली..
पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..
डोळ्यात काहीतरी तरळले आणि तिच्याही नकळत दोन अश्रू कोसळले..
तिची अन तिच्या पोरांच्या, आजच्या जेवणाची सोय झाली होती !
- तुमचा अभिषेक
वाचने
5667
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिल्या शतशब्दकथेला मिळालेला
सॉलीड
मस्तच!
शेवट मस्त जमलाय...
असेच म्हणतो. शेवट विशेष आवडला
In reply to शेवट मस्त जमलाय... by डॉ सुहास म्हात्रे
वा
आतिवास
तुम्ही शेन वॉर्न चे चेले काय??
छान कलाटणी
छान
लवकरच आतिवास यांना हेल्दी
In reply to छान by तिमा
लवकरच आतिवास यांना हेल्दी काँपिटिशन!!! "काँपिटिशन" कशाला? अजून लोकांनी लिहावं.. त्यातून शतशब्दकथा अधिक भक्कम होईल - ते महत्त्वाचं :-)बरं बुवा!
In reply to लवकरच आतिवास यांना हेल्दी by आतिवास
सहमत तिमा .. आपण जे म्हणालात
In reply to बरं बुवा! by तिमा
लक्षात राहण्याजोगी.
काका, तुमचा प्रतिसाद वाचून
In reply to लक्षात राहण्याजोगी. by प्रभाकर पेठकर
****
धन्यवाद सर्वांचे
तिसर्याची वाट पाहतो.
In reply to धन्यवाद सर्वांचे by तुमचा अभिषेक
तुम्ही नका हो दडपण घेउ.
In reply to धन्यवाद सर्वांचे by तुमचा अभिषेक
"पण" या शब्दासाठी विशेष
In reply to तुम्ही नका हो दडपण घेउ. by अभ्या..
आवडली.
झक्कास...! शेवट तर अप्रतिम...
सुंदर....
आवडली..
मस्तच
छानच.
धन्यवाद